मुल्ये!
सत्गुण, वैयक्तिक नियम, चांगले वर्तन, असे अनेक अर्थ असलेले "मुल्य" आपल्या सगळ्यांना महत्वाचे वाटत असतेच- त्यासंबंधीच्या कल्पना, स्वतःच्या अशा धारणा आपण तयार केलेल्या असतात. वृद्ध आई-वडीलांची काळजी घेणे, हे एक अशा मुल्याचे उदाहरण म्हणता येईल.
सध्याच्या वडील पिढीला मुल्य-शिक्षण ज्यामाध्यमांव्दारे मिळाले त्याच माधमांनी आजच्या बाल, कुमारवयीन, युवा, पिढीला मिळते का ह्या प्रश्नाबरोबरच त्यांना मुल्यशिक्षण कोठून व काय मिळते आहे ते ही तपासून पाहिल्यास निराशाच पदरी पडते.
कोणती मुल्ये वयाच्या कोणत्या वेळी "शिकवली" जावीत, ती प्रत्येकासाठी वेगवेगळी असावीत का? किती असावीत, कशी मोजली जावीत असे अनेक प्रश्न पडतात. मुळात एखादे मुल्य "शिकवले" जावू शकते का असा मुलभूत प्रश्नही पडतो. जर उत्तर "हो" असेल तर ते कसे शिकवावे ह्यावर काही उपयुक्त पद्धती आहेत का? हे ही समजावून घेणे आवश्यक वाटते.
तुमच्या संपर्कात जर कोणी शिक्षक असतील तर त्यांना विचारता येईल की, त्यांना शाळेतील विद्यार्थ्यांकडून काय अनुभव मिळतात- खूपच धक्कादायक असे अनुभव असतात व ते ऐकून अनेकदा आपण सुन्न होऊन जातो. मनाला बधीरता आणणारे जे असे अनुभव येत आहेत ते लिंगभेद जाणत नाहीत. (शिक्षणपद्ध्तीतील सुधारणा असा विषय निघाला की, चर्चा "शिक्षक" ह्या विषयावर केंद्रीत होते- ते तसे होणे हे त्या चर्चेचे अपूर्णत्व आहे).
नोकरीच्या मुलाखतीला आलेल्या अभियंत्यांचे "ज्ञान" पाहून असा प्रश्न पडतो की, शिक्षणाची गुणवत्त कमी पडते आहे की, विद्यार्थीच कमी पडताहेत.
एखादे मुल्य एकाच पद्धतीतून, एकाच माध्यमाच्या सहाय्याने, एकदाच शिकवले की भागले असे होत असेल असे वाटत नाही- अशा प्रकारे शिकवणे जवळपास अशक्य असावे असे वाटते. तसेच प्रत्येकजण किती मुल्यांवर आणि केव्हा दृढ विश्वास ठेवतो हे ही पहाणे आवश्यक आहे. मुल्यांशी तडजोड का आणि कोणत्या परीस्थितीत केली जाते, हे ही पहाणे आवश्यक आहे.
अनेकदा सभोवतालची परिस्थिती अतिशय कष्टदायी, नकारात्मक असेल तर त्यातून भरडले जाणारे काही निश्चित पण टोकाचे असे चांगले-वाईट गुण/ मुल्ये जोपासतांना दिसतात. पण मुद्दा असा आहे की, मुल्ये शिकवायला अशी टोकाची परिस्थितीच हवी असते का? (मध्यंतरी एका बातमीत असे वाचायला मिळाले होते की, एक झोपडपट्टीवासी अत्याचारीत कुमारवयीन मुलगी, जिचे आई-वडील अपघातात गेले होते, कपडे शिवून अर्थार्जन करुन तिच्या लहान भावंडांना सांभाळत होती- अतिशय चांगले व उच्च दर्जाचे मुल्ये ह्या माहितीतून समजतात!)
थोडासा विचार केला तर खालील काही प्रश्न मनात येतात.
१. कोणती मुल्ये वयाच्या कोणत्या वेळी "शिकवली" जावीत?
२. ती प्रत्येकासाठी वेगवेगळी असावीत का?
३. साधारणतः एखादी व्यक्ति किती मुल्ये एकावेळी जोपासतांना दिसते?
४. मुल्यांच्या आत्मसात करण्याच्या परिणामकारकतेला कसे मोजता येईल?
५. ते कसे शिकवावे ह्यावर काही उपयुक्त पद्धती आहेत का?
६. मुलांसाठी आणि मुलींसाठी थोडे वेगळे मुल्ये आवश्यक आहे का?
७. मुल्यांची एक सविस्तर यादी
८. कालानुरुप मुल्ये व त्यांचा "अर्थ" बदलत असतील तर येत्या १० वर्षाच्या काळात कोणती मुल्ये आताच्या ५ वर्षे वयाच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली पाहिजेत?
Comments
मूल्ये
काही मूल्ये कालातीत असू शकतात. नियम कालातीत असतीलच असे नाही. तसेच सर्व मूल्ये कालातीत असतीलच असे नाही.
उदा. लोकांनी आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसेच आपण लोकांशी वागावे हे कदाचित कालातीत मूल्य असू शकेल.
पण दासाशीही चांगले वागावे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेले मूल्य कालातीत म्हणावे काय? कदाचित आजचे मूल्य दास ही कल्पनाच नाकारणारे असू शकेल.
परस्त्री मातेसमान हे मूल्य कालातीत म्हणायला हरकत नाही पण त्याचा जुन्या समाजातला अर्थ आपल्या समाजातील दुसर्याची स्त्री असा होता. दुसर्या विशेषतः शत्रूच्या समाजातील स्त्री मातेसमान मानण्याचे मूल्य त्याकाळी नव्हते. (ही मूल्याशी तडजोड होती असे म्हणता येणार नाही).
मूल्ये शिकवता येतात का? आणि ती कशी शिकवावी हा प्रश्न तसा सोपा आहे. मूल्ये शिकवता येतात आणि ती मोठ्यांच्या वागण्यातल्या उदाहरणांनीच चांगली शिकवता येतात. आपल्याला शिकविली जात असलेली मूल्ये मोठे पाळतात की नाही याचे निरीक्षण लहान मुले करीत असतात आणि ती पाळली नसतील तर त्यांना ते बरोबर समजते. अशा वेळी त्या मुलांनी ती मूल्ये आत्मसात करणे कठीण असते.
अभियंत्यांच्या ज्ञानाचा मूल्यांशी काय संबंध हे कळले नाही.
प्रतिसाद थोडा विस्कळित आहे. क्षमस्व.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
अभियंत्यांच्या ज्ञानाचा मूल्यांशी संबंध
>>अभियंत्यांच्या ज्ञानाचा मूल्यांशी काय संबंध हे कळले नाही.>>>
प्रश्न असा आहे की, शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे की, विद्यार्थी त्याची कर्तव्ये नीट पार पाडत नाहीए- आणि त्या अनुषंगाने मुल्ये जोपासायला कमी पडतो आहे का? जर एकीकडे तंत्रज्ञान आधुनिक होते आहे आणि माहिती संक्रमण हे अधिक वेगाने होते आहे तर आजचे तंत्रज्ञान शिकणारे विद्यार्थी त्याच तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुर्वीच्या मानाने कमी का पडताहेत. (ह्या ठिकाणी तुलना कशाशी केली जाते आहे हा प्रश्न महत्वाचा असला तरी, जास्त प्रभाव दृश्य माहितीचा आहे)
मुल्ये आणि काळ
>>काही मूल्ये कालातीत असू शकतात. नियम कालातीत असतीलच असे नाही. तसेच सर्व मूल्ये कालातीत असतीलच असे नाही.>>>
मान्य. तुम्ही दिलेली उदाहरणे देखिल चपखल आहेत.
>>मूल्ये शिकवता येतात का?>>
ह्या प्रश्नाला आपण दिलेल्या उत्तराशी सहमत् आहे. ह्यातील मुल्यशिक्षण घरातून होते आहे. आणखीही काही माध्यमं काय असू शकतात ह्याबाबत् आपले मत् वाचायला आवडेल.
मूल्ये
एका समाजाची मूल्ये दुसर्या समाजात उपयुक्त ठरतीलच असे नाही. मागे कधीतरी मिसळपावावर कोणीतरी लिहिले होते (नेमके कुठे आणि कोणी ते विसरले)
आपल्याकडे मोठ्यांसमोर खाली बघून बोलावे असे शिकवले जाते. मोठ्यांच्या नजरेत नजर मिळवणे याला उद्धटपणा म्हटले जाते. पाश्चात्य देशांत जर तुम्ही समोरच्याच्या नजरेत नजर मिळवून बोलत नसाल तर तुमच्या व्यक्तिमत्वात त्रुटी आहे असे मानले जाते.
शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे असे का वाटले?
शिक्षणाचा दर्जा
>>शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे असे का वाटले?>>
परिणाम जो दिसतो आहे त्यामागचे कारण काय् ते माहित नाही- वर म्हणाल्याप्रमाणे. परिणाम मोजण्यासाठी जी फूटपट्टी मी वापरत आहे ती "ओपीनियन" प्रकारात पडतेय. काही असे अनुभव आहेत त्यानी मला तसा विचार मांडणे भाग पाडताहेत. आणि असाच अनुभव इतरांचाही आहे - समव्यावसायिक.
अनुभव
तेच अनुभव थोडे विस्तार करून सांगितलेत तर मुद्दा स्पष्ट होईल. पूर्वीपेक्षा शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे असे गणले जाते असा माझा समज होता/ आहे (विद्यार्थांच्या पाठ्यपुस्तकांपासून, सोयी-सुविधा आणि विषयांपर्यंत) म्हणून तुम्ही घसरलेला दर्जा म्हटल्यावर कुतूहल वाटले.
शिक्षणाचा दर्जा
शिक्षणाच्या दर्जाची चर्चा या धाग्यावर सयुक्तिक आहे की नाही (विशेषतः मूल्ये या दृष्टीने) याची कल्पना नाही. पण अभियंता असल्याने काही सांगू पहातो.
विद्यार्थ्यांचा दर्जा कदाचित नेहमीच सुमार होता.
परंतु ब्रिटिशकालीन शिक्षण जे मुख्यत्वे ब्रिटिश पद्धतीने चालवले जाई त्यात शिक्षण हा महत्त्वाचा भाग असावा. स्वातंत्र्यानंतर जेव्हा ते एतद्देशीयांच्या हाती आले तेव्हा एतद्देशीय पारंपरिक (पाठांतरप्रधान) शिक्षणपद्धती त्यात हळूहळू शिरली.
माझे वडील जेव्हा इंजिनिअर झाले तेव्हा कदाचित इंजिनिअरिंगची तत्त्वे सांगणारी इंग्रज/अमेरिकन कठीण टेक्स्टबुके असतील आणि त्यावरच अवलंबून राहून त्यांचे शिक्षण झाले असेल.
मी इंजिनिअर झालो तेव्हा जराशी सोपी आणि आम्हाला सोयीची वाटतील अशी पुस्तके आली होती.
माझ्या पिढीतल्या ज्यांनी कॉटनचे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे पुस्तक पाहिले असेल आणि थेराजाचे पुस्तक पाहिले असेल त्यांना हा फरक बरोबर कळेल.
त्याचबरोबर आमच्या प्राध्यापकांचीही एकाच टेक्स्टबुकाच्या संदर्भाने शिकवण्याची प्रवृत्ती वाढली होती. आम्हीही मास्तर कोणत्या पुस्तकातून शिकवतात हे जाणून (सिनिअर्सच्या टिप्समधून) घेऊन त्यानुसार अभ्यास करू लागलो.
अलिकडेच माझ्या एका प्राध्यापक असलेल्या नातवाईकांनी लिहिलेले एक पुस्तक पाहिले. ते "पुणे विद्यापीठाच्या वर्ष २०** च्या सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणे अमुक अमुक पेपरसाठी" असे होते.
म्हणजे १९५०-५५ पासून क्रमाने परीक्षार्थीपणा कसा मुरत गेला हे लक्षात येईल.
तसेच १२वी ला बसणार्या एका (हुशार-भरपूर मार्क मिळवणार्या) मुलीला तू प्रत्येक विषयाची किती टेक्स्टबुके वापरलीस असे विचारल्यावर "एकही नाही, सगळा अभ्यास क्लासच्या नोट्स वाचून केला" असे (माझ्यामते) धक्कादायक उत्तर आले.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
प्रियालीला उत्तर देण्याचे माझे श्रम वाचले
धन्यवाद नितिन, प्रियालीला उत्तर देण्याचे माझे श्रम वाचले. खरे तर मी ही मेक इंजि. माझे ड्रॉइंग घेऊन जीट्या मारल्या जायच्या. पण मी जेव्हा आजच्या इंजि.चा इंटरव्हू घ्यायला बसतो तेव्हा... पुन्हा आभारी तुमच्या प्रतिसादाबद्दल.
अभियंत्यांचा दर्जा
पूर्वी काही भरपूर चांगले होते याच्याशी मी फारसा सहमत नसतो.
अभियंत्यांचा दर्जा खालावला आहे असे मलाही वाटते.
अभियंत्यांचा दर्जा घसरला असण्याची दोन कारणे. एक म्हणजे एकंदर उत्तीर्ण होणार्या अभियंत्यांची संख्या पूर्वीपेक्षा (खाजगीकरणापूर्वी) निदान १० पट वाढली आहे.
दुसरे म्हणजे त्यातील वरच्या दर्जाची मुले नंतरच्या आयुष्यात अभियंते म्हणून काम करत नाहीत. म्यानेजमेंट, संगणकतज्ञ अशाकडे जातात. त्यामुळे राहिले ते कदाचित कमी दर्जाचे असतील. यासाठी मूल्य शिक्षणाला गोवायचे कारण दिसत नाही.
शिक्षणाचा दर्जा वाडवायचा असेल तर भाराभार शिकवा पण वरवर शिकवा ते कमी शिकवा पण नीट शिकवा असा प्रवास केला पाहिजे.
औपचारिक मूल्य शिक्षणास फार कमी महत्व द्यावे असे मला वाटते.
प्रमोद
चर्चा थोडी वेगळ्या वळणावर
>>नोकरीच्या मुलाखतीला आलेल्या अभियंत्यांचे "ज्ञान" पाहून असा प्रश्न पडतो की, शिक्षणाची गुणवत्त कमी पडते आहे की, विद्यार्थीच कमी पडताहेत.>>
वरील प्रतिसादातील प्रियाली आणि प्रमोद ह्यांचे प्रतिसाद वाचून मी माझा लेख त्रयस्थाच्या नजरेने वाचला. वरील वाक्य हे सुटे लिहिले गेले असल्याने असे वाटते की, ते ह्या लेखाचा केंद्रबिंदू आहे. पण मला तो मुद्दा एक उदा म्हणून मांडायचा होता, सेंट्रल आयडीया म्हणून नव्हे. त्यामुळे मुळ हेतू व त्यानुसार उभे केलेले प्रश्न मागे पडताहेत. कृपया वरील वाक्य ओलांडून पुढे जावे.
माझ्यामते वरील वाक्यापेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांना जे अनुभव येतात त्यावर अधिक चर्चा झाली तर ह्या लेखामागचे कारण लक्षात येईल.
प्रियाली ह्यांच्या वरील धाग्याला मी प्रतिसाद देण्याचे मुद्दाम टाळतो आहे, ते वरील स्पष्टीकरण देऊन ही चर्चा थोडी वेगळ्या वळणावर नेण्यासाठी.
हरकत नाही
हरकत नाही. :-) चर्चा वेगळ्या वळणावर जावी असा माझाही हेतू नव्हता परंतु त्या विधानाबाबत थोडे कुतूहल वाटले. थत्ते आणि सहस्त्रबुद्धे यांच्या प्रतिसादांवरून थोडीफार कल्पना आली.
चांगला विषय
चांगला विषय आहे. व्याप्ती प्रचंड आहे. गेल्या २००० वर्षांहूनही अधिक काळात तत्वज्ञ, लेखक यांनी आपापल्या परीने हे प्रश्न हाताळले आहेत.
१. कोणती मुल्ये वयाच्या कोणत्या वेळी "शिकवली" जावीत?
मूल्ये "शिकवता" येतात याबद्दल शंका वाटते. शाळेत भोंगळ सुविचार शिकवले गेले. "साधी रहाणी उच्च विचार" म्हणजे उच्च विचार असण्यासाठी दारीद्र्य रेषेखाली असणे गरजेचे आहे का?
२. ती प्रत्येकासाठी वेगवेगळी असावीत का?
असावीत की नाही कल्पना नाही. असतात असे पाहण्यात आहे.
३. साधारणतः एखादी व्यक्ति किती मुल्ये एकावेळी जोपासतांना दिसते?
मोजदाद करणे कठीण आहे. बरेचदा ही मूल्ये जाणिवेत किंवा नेणिवेत असतात.
४. मुल्यांच्या आत्मसात करण्याच्या परिणामकारकतेला कसे मोजता येईल?
कठोर आत्मपरीक्षण हा एक मार्ग दिसतो.
५. ते कसे शिकवावे ह्यावर काही उपयुक्त पद्धती आहेत का?
प्रश्न क्र. १ चे उत्तर पहावे.
६. मुलांसाठी आणि मुलींसाठी थोडे वेगळे मुल्ये आवश्यक आहे का?
नाही.
७. मुल्यांची एक सविस्तर यादी
यादी सविस्तर नाही. खूप लिहावे लागेल.
सत्य : इथे सत्य म्हणजे खरे बोलणे हा संकुचित अर्थ झाला. स्वतःच्या आयुष्याविषयीचे सत्य : मी सध्या कुठल्या परिस्थितीत आहे? मी जी नोकरी करतो आहे तेच माझे अंतिम ध्येय आहे का? मी इतरांशी कसा वागतो? इतरांशी वागताना आपण तोंडावर गोड बोलून मागे टिंगल करतो का? एकाला एक, दुसर्याला दुसरे असे आपले वर्तन असते का? यासारख्य प्रश्नांची खरी उत्तरे स्वतःच स्वतःला देणे आणि ती उत्तरे स्वीकारणे हा ही सत्याचा एक भाग आहे.
माणुसकी : यात प्राण्यांनाही समान स्थान मिळायला हवे. आपल्या जगण्यामुळे, वागण्यामुळे इतर प्राणिमात्र आणि पर्यावरण यांना त्रास होऊ नये. हिंसा फक्त शारिरिक नसते. विचार न करता वाटेल तसे शिवराळ बोलणे हा मानसिक हिंसेचाच एक प्रकार आहे.
आदर : दुसर्याच्या मतांविषयी पुरेसा आदर असणे. एखाद्याचे मत वेगळे म्हणजे तो शत्रू असे नव्हे. मतभिन्नता राखूनही संबंध चांगले असू शकतात.
अशी बरीच मूल्ये आहेत. अर्थात बहुतेक लोकांशी याबाबत चर्चा झाली तर "जाऊ दे ना यार! थोडा उन्नीस-बीस तो चलता है" किंवा "माहीती आहे फार मुल्य जपणारे आहात ते. लाईफमध्ये रोज किती वेळा कॉम्प्रोमाइझ करावे लागते आमचे आम्हाला माहीत आहे." अशी उत्तरे ऐकावी लागतात.
८. कालानुरुप मुल्ये व त्यांचा "अर्थ" बदलत असतील तर येत्या १० वर्षाच्या काळात कोणती मुल्ये आताच्या ५ वर्षे वयाच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली पाहिजेत?
प्रश्न क्र. १ चे उत्तर पहावे.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
शिकवणे
अधिक विचारांती मुलांना मुल्ये शिकवण्यापेक्षा त्यांच्यासमोर तसे वागले तर ती अनुकरणाने शिकतील असे वाटते.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
मूल्यशिक्षण
सर्वधर्मसमभाव, राष्ट्रप्रेम, स्रीपूरुषसमानता, संवेदनशीलता, श्रमप्रतिष्ठा,भूतदया इ.मूल्ये सध्या शालेय अभ्यासक्रमात शिकवली जातात. त्या त्या मूल्यास विद्यार्थ्यांच्या विचारशैलीत प्रवर्धित करण्यासाठी गोष्टी, गाणी, खेळ, घोषवाक्ये, उपक्रम या स्वरुपातल्या कार्यपद्धतीही पूरेशी लवचिकता ठेऊन विहीत करण्यात आलेल्या आहेत. मूल्यशिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याने त्याला विषय म्हणून आज मान्यता जरी मिळाली अस ली तरी पूर्वी अनौपचारिक पद्धतीने मूल्यशिक्षण दिले जात होतेच. त्यात स्रीपूरुष समानता, सर्वधर्मसमभाव ही काही मूल्ये आधूनिक म्हणावी अशी आहेत.
असो
मूल्ये हा शब्द मुल्ये असा लिहीणे चुकीचे आहे.
विचार महत्त्वाचे, स्पेलिंग नाही!
मूल्य ह्या शब्दातली मु र्हस्व काढू नये जे जितके खरे आहे, तितकेच स्त्रीपुरुष ऐवजी स्रीपूरुष वा प्रवर्तित ऐवजी प्रवर्धित इत्यादी लिहू नये. पुरेशी, लवचीकता*(खरे तर लवचीकपणा), ठेवून, विहित, आधुनिक, लिहिणे हे शब्दही असेच लिहिले असते तर बरे वाटले असते.
एकूण काय, शुद्धलेखन महत्त्वाचे, पण त्याहूनही विचार अधिक!
*विशेषणाला ता लावून मराठी भाववाचक नावे बनतात? असे करायला मिळाले तर गाढवता, विसरभोळता, उंचसखलता, तोंडपुजता, धसमुसळता, कामचुकारता, हडेलहप्पिता वगैरे नवीन शब्द बनवता येतील.--वाचक्नवी
कुठे शोधायची?
मूल्ये कुठे शोधायची असा पुढचा प्रश्न येतो. थोरामोठ्यांची चरित्रे, विचार इ. मधून बरेचदा काही क्लू मिळतात. पण आजकाल आंतरजालामुळे काम सोपे झाले आहे.
उदा. ही चित्रफित पाहून मला बरेच काही सापडले. तुम्हाला सापडते का पहा.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
उदाहरणे
आरागॉर्न तुमच्या सखोल प्रतिसादांबद्दल आभारी.
विद्यार्थ्यांच्या मूल्यांविषयी व शिक्षकांवर त्याचा जो एक ताण येतो वर संदर्भ दिला आहे. मला कळालेल्या उदा पैकी एक उदाहरण असे आहे -
(हा प्रसंग आहे भारतीय शास्त्रीय नृत्याच्या शिकवणीला येणाऱ्या विद्या्र्थीनींचा. त्या नृत्य शिकवणाऱ्या ताईंकडे तक्रार घेऊन आल्या)
पहिली, "ताई, हीला आम्ही मिसेस <आडनाव> चिडवतो."
ताई, "का?"
पहिली, "ही माझ्या भावावर लाईन मारते"
ताई, ("ही"च्या कडे पाहून) "कागं, तुला चालतं का असे म्हणालेले?"
"ही", "हो चालते. हीचा भाऊ खूप चिकणा आहे!"
वरील प्रसंगातील मुली ६ वी तील होत्या. इतरही उदा आहेत पण वरील उदा वरुन त्यांचा अंदाज यावा. जवळपास ह्या स्वरुपाचे आहेत आणि त्यातील पात्रे खूप साधारण वरील उदा येव्हढीच लहान आहेत. काय वाटते तुम्हाला ह्या उदांवरुन? हे नेहमीच होत आले आहे? -आणि आता फक्त जास्त बोलले जाते आहे?
बदल
मी पालक नाही त्यामुळे यावर माझे मत अनुभवातून आलेले नाही.
प्रत्येक पिढी आधीच्या पिढीपेक्षा दोन पावले पुढे असते. आत्ताची मुले पाहिली की आपण त्यांच्या वयात किती बावळट होतो असे वाटायला लागते. विशेषत: आंतरजाल, च्यानेल यांच्यामुळे लहान मुलांमध्ये बदल अपरिहार्य आहे. या बदलाला योग्य वळण कसे द्यायचे याबद्दल अनुभवी पालक अधिक सांगू शकतील.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
कालातीत
शुद्ध नास्तिकांच्या दृष्टीने (बौद्ध नास्तिक किंवा ह्युमॅनिस्ट नास्तिक नव्हे) कोणतेही मूल्य कालातीत नसते. तात्कालीन परिस्थितीत, गेम थिअरीनुसार फायदा बघून, मूल्ये बनविली जातात कारण अशी मूल्ये न बनविणार्या व्यक्ति किंवा समाजांचा नाश होतो.
स्वतोमूल्य
शुद्ध नास्तिकांच्या दृष्टीने (बौद्ध नास्तिक किंवा ह्युमॅनिस्ट नास्तिक नव्हे) कोणतेही मूल्य कालातीत नसते.
मग शुद्ध नास्तिकता हे मूल्य धरले तर ते शुद्ध नास्तिकाच्या दृष्टीने कालातीत असते का? :) शाळेत वैज्ञानिक दृष्टीकोन हे मूल्य म्हणून शिकवले जाते. ते कालातीत आहे का?
इंग्रजीत मूल्यला व्ह्यल्यु असा शब्द आहे. तो आपण 'किंमत' म्हणून पण ओळखतो. मराठीत मात्र किंमत म्हणजे मूल्ये असे धरले जात नाही. मात्र तसे ते धरता येते. आणि फारसे बिघडत नाही. 'स्वतोमूल्य' म्हणजे जी गोष्ट मिळाल्यावर आपल्याला सुख जाणवते. (म्हणजे आवडता पदार्थ, वस्तु, व्यक्ति वगैरे.) तर परतो मूल्य म्हणजे हा परिणाम अनेक स्टेप्स नंतर जाणवतो. (उदा पैसा.) अशा काही गोष्टी आहेत की ज्यांचा परिणाम स्वतोमूल्य असलेल्या गोष्टीत परावर्त्तीत होताना लगेच जाणवत नाही. मात्र तो तसा असतो अशी सार्वत्रिक धारणा असते. जशास तसे वागणे, जास्तीत जास्त लोकांचे सूख कशात होईल हे पहाणे, माणुसकी, स्त्रीवाद, विवाहबाह्य संबंध नाकारणे इत्यादी गोष्टी त्यात मोडतात.
कुणालाही अशा परतोमूल्यवान गोष्टी स्वतोमूल्यवान गोष्टीत परिवर्तन पावतात हे पटवले तर स्वाभाविक स्वार्थी स्वभावामुळे त्यांचा अंगिकार सहज होतो.
लहान मुलांना हे सगळे सांगणे जड जाऊ शकते. वयाप्रमाणे नैतिकतेने वागायचे मात्र गरजेचे असते म्हणून मूल्य शिक्षणाचे धडे लहानांना देतात. पण कधीतरी या मूल्यांपलिकडचे मूल्य (स्वतोमूल्य) हा प्रवास सांगावाच लागतो. म्हणून वयानुसार भेदभाव केला तर मूल्यांच्या अन्यलिसिस कडे जायचा प्रवास काही वयात सुरु करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
अजय यांच्या सवालांना यातून काही उत्तर मिळेल् असे वाटते.
१. कोणती मुल्ये वयाच्या कोणत्या वेळी "शिकवली" जावीत?
२. ती प्रत्येकासाठी वेगवेगळी असावीत का?
३. साधारणतः एखादी व्यक्ति किती मुल्ये एकावेळी जोपासतांना दिसते?
४. मुल्यांच्या आत्मसात करण्याच्या परिणामकारकतेला कसे मोजता येईल?
५. ते कसे शिकवावे ह्यावर काही उपयुक्त पद्धती आहेत का?
६. मुलांसाठी आणि मुलींसाठी थोडे वेगळे मुल्ये आवश्यक आहे का?
७. मुल्यांची एक सविस्तर यादी
८. कालानुरुप मुल्ये व त्यांचा "अर्थ" बदलत असतील तर येत्या १० वर्षाच्या काळात कोणती मुल्ये आताच्या ५ वर्षे वयाच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली पाहिजेत?
प्रमोद
मूल्य
lolz
'मूल्य' या शब्दाचा 'मत' असा अर्थ मला अपेक्षित नव्हता. 'इतर व्यक्तींशी वागण्याचे नियम' असा मी अर्थ घेतला. "कसे वागले असता काय होईल" याचे उत्तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून मिळते. "कसे वागावे" याचे उत्तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून अपेक्षित नाही.
+१
अभ्यासलेख/पुस्तक
>>लहान मुलांना हे सगळे सांगणे जड जाऊ शकते. वयाप्रमाणे नैतिकतेने वागायचे मात्र गरजेचे असते म्हणून मूल्य शिक्षणाचे धडे लहानांना देतात.>>
हे जे धडे दिले जातात ते किती परिणामकारक आहेत ह्याबद्दल वरील एक् उदा. पुरेसे ठरावे. ह्या सगळ्याबद्दल एखादा अभ्यासलेख असेल, एखादे पुस्तक असेल तर् वाचायला आवडेल.
>>वयानुसार भेदभाव केला तर मूल्यांच्या अन्यलिसिस कडे जायचा प्रवास काही वयात सुरु करणे गरजेचे आहे असे मला वाटते>>
+१ सहमत.
रोचक चर्चा
रोचक चर्चा काळजीपूर्वक वाचतो आहे. मात्र प्रश्नांच्या आवाक्यामुळे मी खुद्द हतबल झालेलो आहे.
"मूल्य" शब्दाची व्याख्या समजलेलो नाही. "३. किती मूल्ये" वर्णनावरून असे वाटते की चर्चाप्रस्तावकाला जो काय अर्थ अभिप्रेत आहे तो एक-दोन-तीन अशा गणनीय संकल्पनेचा आहे. मात्र चर्चाप्रस्तावकाने उदाहरण दिलेली मूल्यांची कथाबीजे बघितली : वृद्ध आई-वडीलांची काळजी घेणे, भारतीय शास्त्रीय नृत्याच्या शिकवणीला येणाऱ्या विद्या्र्थीनींची तक्रार, भावंडांचे संगोपन करणारी थोरली बहीण, अभियंत्याचे ज्ञान... काय मोजले जात आहे, ते काही कळत नाही.
उदाहरणार्थ : "भावंडांचे संगोपन" कथेतले बंधुभगिनीप्रेम, नि:स्वार्थीपणा, "मी भावाची काळजी घेतली तर तो माझी काळजी घेईल" हा सुज्ञ विचार, शिवणकलेमधील प्राविण्य संपादन करण्यातली चिकाटी, कितीतरी गुण दिसून येतात. पैकी कुठलेतरी सद्गुण दुसर्या कथेत दिसतील, पण सर्व दिसणार नाहीत. येथे गणनीय सम्कल्पना कुठल्या आहेत?
आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये क्रियाशील निर्णय घेण्यासाठी काही तत्त्वे गृहीतके म्हणून घ्यावी लागतात. लहानपणी आईवडील, गुरुजनांच्या सांगण्याने, वागण्याने अशी काही तत्त्वे कळतात. त्यामुळे पुढच्या आयुष्यात नैतिकतेचे पारडे तोलताना, काय करावे हा निर्णय घेताना, वेळ वाचतो, असा माझा अनुभव आहे, हे खरे आहे. अशी तत्त्वे मी अजूनही शिकतो आहे. पूर्वी शिकलेल्या निर्णय-तत्त्वांच्या मर्यादा कधीकधी कळतात, असेही नवीन अनुभव येतात.
माझ्या या अनुभवाचा आणि निरीक्षणाचा वरील चर्चेशी काही संबंध आहे का?
प्रश्नांना व शंकांना खालील प्रतिसाद
धनंजय तुझी रीव्ह्युची हातोटी वाखाणण्याजोगीच! तुझ्या सर्व प्रश्नांना व शंकांना खालील प्रतिसाद- तुला अपेक्षित असलेली उत्तरे जर खाली नसतील तर अधिक प्रश्न विचार किंवा तसे सांग.
मोजण्याचा जो संदर्भ आलेला आहे तो प्रामुख्याने मुल्यशिक्षणाच्या उपयुक्ततेच्या बाबतीत आहे. मुल्यशिक्षण का केले पाहिजे ह्याचे महत्व सगळ्यांनाच पटले आहे पण ते कसे केले पाहिजे ह्यासाठी मी मार्गदर्शन घेतो आहे. त्याचे प्रकार कुठे, कधी, परिणामकारक ठरतात, कोणत्या मुल्यासाठी उपयुक्त ठरतात हे ताडण्याचा प्रयत्न आहे.
मुल्याची व्याख्या अनेकदा अनेकांनी केली आहे व त्याची व्याप्ती मोठी आहे. गटारी स्वच्छ करुन पोट भरणारे जर चोऱ्या-माऱ्या न करता असे काम स्वीकारण्याचा मार्ग पत्करत असतील तर त्यात काही मुल्ये मला नक्कीच दिसतात. पण हाच माणूस इतर सामाजिक व्यवहारात तितकाच "स्वच्छ"पणे वागेल हे सांगता येणार नाही. काही मुल्ये स्वीकारलेली आहेत तर काही नाकारलेली. असे प्रत्येकाच्या बाबतीत होते. तसेच आयुष्यभर एकच मुल्य घेऊन हा माणूस जगेल असेही म्हणता येत नाही. पण शाळेची पायरीही न चढलेला, आई-बापापासून तथाकथित मुल्यशिक्षणाची जराही शक्यता नसतांना जर असे म्हणत असेल की, चोऱ्या करुन जगण्यापेक्षा हे काम बरे, तर हे मुल्य तो माणून कसे शिकला? कोठून आले हे शहाणपण? जी प्रोसेस शालाबाह्य व इतर ज्ञात मार्गातूनही मुल्य शिक्षण देऊ शकते ती जास्त परिणामकारक म्हणायची का?- कारण त्यामुळे एका अशिक्षिताच्या मनावर चांगला परिणाम झालेला असतो. जेव्हा मोलकरीण घाबरे-घाबरे आम्हाला सांगते की, येरवडा जेल मधून नुकतेच काही जुने गुन्हेगार सुटून आले आहेत त्यामुळे झोपडपट्टीत तणाव आहे, मुलीला एकटं घरी सोडून येववत नाही. ती मुलीला खूप शिकवायचे म्हणते व त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी आहे असे म्हणते- कोठे होते हे मुल्यशिक्षण? तर माझ्या व्याख्येमधे ही सगळी मुल्यांचीच उदा आहेत.
ह्या अधुनिक जगात जगण्यासाठी कोणती मुल्ये आत्म्सात करणे गरजेचे आहे हे समजणे आवश्यकच आहे. कुठ्ल्याही परिस्थितीत सिग्नल मोडणार नाही हे ही मुल्यच होय व ते ह्या काळात अंगी बाणवणे अधिक चांगले. (कायदा न तोडण्याला जास्त धैर्य लागते.) अशी नवी मुल्ये जर शिकवण्याची वेळ आली तर ती कोणती असावीत असा प्रश्न आहे- हा फक्त मुल्य-संकलनासाठी. अशी मुल्ये जर शिकवायची असतील तर ती किती परिणामकारकतेने शिकवली जात आहेत ते समजण्यासाठी काय प्रोसेस असावी हा प्रश्नही विचारला आहे.
मोजकाम
म्हणजे प्रथम मूल्यांची संख्या मोज़ायची, नंतर त्यांची आत्मसात करायची परिणामकारकता आणि शेवटी उपयुक्तता. म्हणजे बरेच मोज़काम आहे.--वाचक्नवी
म्हणजे बरेच मोज़काम आहे
>>म्हणजे बरेच मोज़काम आहे>>
जे इंजिनीअरींग मॅथ्स शिकवतात त्यांना हे अवघड वाटणार नाही हे नक्क्की. तसेच काही जण म्हणतील हे मोजकाम नो-ब्रेनर आहे; इतरांबाबत मला सांगता येणार नाही.
शुद्धलेखन
'मूल्ये' या शब्दाचा उच्चार 'मूल्ल्ये' असा होतो असे वाटते.
'मुल्ये' हा शब्द 'मुलगी' या शब्दाचे संबोधन आहे ना?
मूल्ये.....
१) आपण मूल्ये आणि वागण्याच्या पद्धती यांची गल्लत् करतो आहोत का? पालकांचा सांभाळ , डोळे मिसळून् पाहाणं, मोठ्यांचा आदर,वेशभूषा इ. गोष्टी या मूल्यांचे "आउटपुट" आहेत असे मला वाटते.
२) प्रेम (व्यापक अर्थाने) आणि प्रामाणिकपणा ( स्वतःशी आणि सर्वांशी ) ही प्रत्येक् धर्म,संकॄती यांची मूळ मूल्ये आहेत. मूल्ये कधीच् बदलत् नाहीत , बदलतात त्या त्यांच्या आविष्कार् पध्दती..! ही मूल्ये पाळली जावीत् हीच् अपेक्षा असते..ती पाळली जातात की नाही यावर व्यकीचे, समाजाचे सुसंस्कॄतत्व ठरत असते.. मूल्यांची मोजदाद जरी केली तरी शेवटी आपल्याला अभिप्रेत् असणारे प्र्त्येक् मूल्य शेवटी या दोन मूल्यांशी जाऊन भिडेल असं मला वाटतं...! स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असणारी व्यकी तिच्या कामाशी , समाजाशी ,देशाशी प्रामाणिक राहीलच ! निखळ, स्वच्च् प्रेमाच्या पोटी आदर, संयम, समानता ,स्नेह्,बांधिलकीची जाणीव या गोष्टी असतातच ...!
३) आता ही मूल्यं कोणी शिकवायची ,कोणाला शिकवायची याचं उत्तर म्हटलं तर सोपं म्हटलं तर फारच कठीण...! कारण प्रेम, प्रामाणिकपणा या गोष्टी पुस्तकातून् शिकवता येतील असं वाटत नाही! ती जबाबदारी पालक, शिक्षक ,समाजाचा घटक म्हणून आपल्या प्र्त्येकावर नाही का? आणि त्यासाठी आपल्या वर्तणुकीतुनच ही मूल्यं दुसर्या पिढीला देता येतील.
कॉज & इफेक्ट?
+१
प्रत्येक वाक्याशी सहमत.
असेलही, मी संदर्भलेली उदा ही इफेक्ट असतील एखाद्या मुळ मूल्याचा (मुल्य> मूल्य- रीटेक घेतला). पण तरीही त्या अनुषंगाने मांडलेले प्रश्न तसेच राह्तात. अजिबात न् शिकलेली माणसं काही मूल्ये पाळतांना दिसत आहेत तसेच शिकलेली मुले मूल्ये टाकत चालली आहेत. असे असेल तर मूल्य शिक्षणाची जबाबदारी शाळांवर का टाकावी?
मूल्ये
४) मुळात शिक्षण म्हणजेच मूल्यांचे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमण ! किमान शालेय शिक्षणाचा तरी विचार या पध्दतीने करायला हवा.. तो आपण करतो का - पालक, शिक्शक ,समाज आपण सगळॅच तर केवळ परीक्षावादी आहोत्! नवी पिढी फार चाणाक्ष आहे आणि ती आपल्या पालकांच्या, शिक्षकांच्या वागण्यातली विसंगती, खोटेपणा, दुटप्पीपणा लगेच टिपते, हे आपण सोयिस्कर विसरतो का?