जपून! ते लक्ष ठेवून आहेत - ३

गरगॉयल, कायमेरा आणि ग्रोटेस्क याविषयी यापूर्वीच्या लेखांत माहिती दिली आहेच. गॉथिक बांधणीच्या एखाद्या चर्चच्या किंवा कॅथेड्रलच्या मनोर्‍यांवरून आणि खांबांवरून नजर फिरवली तर बर्‍याचदा ही गरगॉयल्स नजरेस पडतात. चर्चच्या भिंतींवर गरगॉयलचे अस्तित्व हे दुष्ट शक्ती चर्चच्या भिंतींबाहेर ठेवण्यासाठी आहे पासून ही गरगॉयल्स चर्चला सुरक्षितता देण्यासाठी आहेत अशा विविध कारणांसाठी असल्याचे सांगितले जाते. अधिक माहिती -

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २

वॉशिंग्टन डिसीतील नॅशनल कॅथेड्रल ही निओ-गॉथिक बांधणीची प्रसिद्ध इमारत. इमारतीची रचना, भव्यता, स्टेन्ड-ग्लासच्या प्रचंड खिडक्या यामुळे ही इमारत लक्षवेधी ठरते. केवळ बांधणीसाठीच नाही तर वॉशिंग्टन डिसी भागातील सर्वात लांब चाललेलं बांधकाम याच इमारतीचे. १९०७ साली सुरु झालेले हे बांधकाम १९९० साली संपुष्टात आले, म्हणजेच तब्बल ८३ वर्षे चालले. एम्पायर स्टेट बिल्डींग, व्हाईट हाऊस यांच्यानंतर अमेरिकन स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट इमारतींचा नमुना म्हणून नॅशनल कॅथेड्रलकडे बोट दाखवले जाते. भव्यतेच्या दृष्टीतून या कॅथेड्रलचा जगात सहावा क्रमांक लागतो. हा लेख नॅशनल कॅथेड्रलवर नसल्याने यापेक्षा अधिक माहिती येथे मिळेल.

नॅशनल कॅथेड्रलच्या भेटीत "गरगॉयलची सहल" करता येते. आम्ही ज्या वेळात तेथे पोहोचलो त्या वेळात अशी सहल नसल्याने आम्हीच दुपारी टळटळीत उन्हात आकाशाकडे बघत गरगॉयल शोधण्याचा प्रयत्न केला. ड्रॅगन, रानटी कुत्रे, सर्प, मगर अशी अनेक भयानक गरगॉयल्सनी ही इमारत सजली आहे परंतु इमारतीच्या उंचीमुळे सर्वच गरगॉयल जमिनीवरून दिसत नाहीत. काही इतक्या उंचीवर आहेत की माझ्याकडील कॅमेराचा झूम पुरेसा नव्हता त्यामुळे फोटो काढले तरी ते चांगले आले नाहीत. सातव्या माळ्यावरील सज्जातूनही काही सुरेख गरगॉयल आणि ग्रोटेस्क यावेळी नजरेस पडली. त्यापैकी आवडलेली काही येथे देत आहे.

गरगॉयल १

DSC00127

DSC00127

गरगॉयलच्या संदर्भातील एक घटना येथे देत आहे. ८० च्या दशकात कॅथेड्रलच्या पश्चिमेकडील भागाचे काम सुरु होते. या भागाच्या सुशोभीकरण गरगॉयल्सनीच करायचे होते. या सुशोभीकरणासाठी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. नॅशनल जिओग्राफिकच्या मासिकातून ही माहिती देण्यात आली. ज्यांना त्यात पारितोषिके मिळाली त्यातील तिसर्‍या क्रमांकावरील गरगॉयल खाली दिले आहे.

चाणाक्ष वाचकांना हे गरगॉयल कोणाचे ते सांगण्याची गरज नाही.

Darth

तिसरे चित्र http://www.nationalcathedral.org/ येथून साभार.

Comments

तिसरं

तिसरं गारगॉयल बघून गंमत वाटली. तोंड बंद असलेलं पण तितकंच भीतीदायक; गारगॉयलच्या सर्वसाधारण वळणावळणांच्या आकृतीऐवजी भौमितिक आकार असलेलं; आणि पुरातन मिथ्यकथांऐवजी आधुनिक मिथ्यकथांमधलं...

१० च्या दशकात अशी स्पर्धा झाली तर मी लॉर्ड ऑफ द रिंग्ज मधला गोलम पाठवेन... की मेट्रिक्समधलं कोणी...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

स्पर्धेत विजय

१० च्या दशकात अशी स्पर्धा झाली तर ....

स्पर्धेत यांचाही विजय होण्याची शक्यता आहे.

अशी स्पर्धा भारतात घेतली तर गुलशन ग्रोव्हरचा छप्पन टिकली अवतार चांगली टक्कर देऊ शकेल.

फोटो आवडले

पहिल्या चित्रातल्या गरगॉयलच्या हातात काय आहे?
इथे लहान मुलांसाठी गरगॉयल कसे तयार करायचे ते शिकवले आहे.

असेच

म्हणतो. फोटू आणि लेख दोन्ही आवडले.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पॅन फ्ल्युट

गॉर्गोयलच्या हातात काय आहे? उत्तर - पॅन फ्ल्युट
ते गॉर्गोयल ग्रीक देव "पॅन'' असावे. (पायाजवळ खूर पहा.)
पॅन फ्ल्युट आणि (इंजेक्शन देण्याची) सिरिंज यांच्यातील संबंध रोचक आहे.

मोठ्यांसाठीही

इथे लहान मुलांसाठी गरगॉयल कसे तयार करायचे ते शिकवले आहे.

मुलेच का, मोठ्यांसाठीही चांगला दुवा आहे. धन्यवाद! :-)

पॅन फ्लूट आणि पॅन देवतेबद्दल विसुनानांनी दिलेल्या प्रतिसादाशी सहमत आहे.

गरगॉयल्स

गरगॉयल्स ची हि संकल्पना आवडली आणि तुमचा माहिति संग्रह् अतिसशय व्यापक आहे. धन्यवाद!

हे गरगॉयल्स का ?

.

नाही हो!

हे तर छानसे यक्ष, अप्सरा, डेमी-गॉड प्रकार दिसतात. आधी छत तोलून धरणारे यक्ष असावेत का काय असे वाटले पण त्यांच्या हातात नेमके काय आहे ते दिसत नाही.

पण फोटो छान आहे. कुठला आहे?

अच्छा....!

आमच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या काठी सिद्धेश्वराचे बहूतेक सतराव्या शतकातले हेमाडपंती मंदिर आहे. अहिल्याबाईच्या सांगण्यावरुन ते बांधले असावे. नावाडी असला तर, नदी ओलांडून जावे लागायचे. आता मात्र पूल केल्यामुळे सहज तिथे जाता येते. मंदिर पाहता पाहता अचानक 'गरगॉयल्सची' आठवण झाली. या मंदिरांबद्दल आणि तेथील कोरीव शिल्पांवर कुठे तरी वाचले आहे पण आता संदर्भ नाहीत.

-दिलीप बिरुटे

 
^ वर