सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ५



Secularism एक सर्वंकष विचार

(परम-मित्र दिवाळीअंक 2006)



ले. अरविंद बाळ



सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार - भाग १


सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग २

सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ३
सेक्युलॅरिझम् एक सर्वंकष विचार -भाग ४


राष्ट्रवाद


Secularism आणि राष्ट्रवाद यांच्या परस्पर संबंधांविषयी गैरसमजच फार आहेत. Secularism हा राष्ट्रवाद या संकल्पनेचा आधार असूच शकत नाही. प्रत्यक्षांत जगांतील कोणतंहि राष्ट्र Secularism वर आधारीत नाही. Secularism ही ऐहिक प्रगतीसाठी आणि ऐहिक नितिमत्तेसाठी सुध्दा एक आवश्यक गरज आहे. निरामय ऐहिक जीवनासाठी Secularism ही पूर्वअट आहे. हे विधान बऱ्याच जणाना धक्कादायक वाटेल. Secularism चा उहापोह केल्यावर आणि आता “राष्ट्रवाद” या संकल्पनेच स्पष्टीकरण केल्यानंतर हे विधान तर्कशुध्द आहे हे लक्षांत येईल.

Nation, Nationality, Nationalism राष्ट्र, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद याची विस्तृत तात्विक चर्चा डॉ. आंबेडकरांनी Pakistan OR The Partition of India. या त्यांच्या प्रसिध्द पुस्तकांत केली आहे.

डॉ. आंबेडकर अर्नेस्ट रेनाँ यांचे याविषयावरील विचार परिच्छेदामागून परिच्छेद उध्दृत करुन विषद करतात. या सर्व विचारांचा आत्मा असा आहे की राष्ट्र ही केवळ मानसिकच नव्हे तर एक प्रकारे आध्यात्मिक संकल्पना आहे. (Spiritual असा शब्द रेनॉ यानीच वापरलेला आहे) जेव्हा एखाद्या लोकसमूहाला आपण एक राष्ट्र आहोत असं वाटतं तेव्हांच ते राष्ट्र बनतं. रेनॉ यांनी “People longing to belong together” अशी केवळ होकारार्थी कल्पना न मांडता “Longing not to belong to any other group” अशी नकारार्थी भाषा ही वापरली आहे. समान धर्म, भाषा, वंश ह्या गोष्टी एकराष्ट्रीयत्वाला पुरेशा नाहीत. एकात्मतेला इतिहास आणि वर्तमान याचीही गरज असते आणि दुर्दम्य एकत्वाच्या मानसिकतेकरिता इतिहासांतील कडू आठवणी विसरण्याची तयारी असावी लागते, तसंच भविष्याच्या समान आकांक्षा असाव्या लागतात.

सारांश Secularism ही विवेकाने, तर्काने सिध्द करायची गोष्ट आहे. पण राष्ट्र ही कल्पना भावनेवर आधारलेली आहे. “देव, देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती” तसंच राष्ट्रप्रेमासाठी तळहातावर शीर घेऊन एकादा लढूं शकतो पण Secularism साठी कोणी जिवावर उदार होत नाही. Secularism ही मानवतेची किमान गरज आहे, तो मोठा थोर गुण नव्हे. राष्ट्रवाद ही एक भावनिक गरज आहे आणि वास्तव पण.

हे विस्ताराने लिहायंच कारण असं की Secularism हा राष्ट्रवादाचा, समान राष्ट्रीयत्वाचा आधर होऊ शकत नाही. हे वास्तव आणि तत्व म्हणूनही समजून घेणं आवश्यक आहे. Secularism आणि राष्ट्रवाद या वेगवेगळया स्वयंपूर्ण कल्पना आहेत. त्या परस्परावलंबी नाहीत. हे सर्व लक्षांत येणं अवघड वाटलं तरी समजून घेणं आवश्यक आहे.

राष्ट्र (Nation), राज्य (State),राष्ट्र राज्य (Nation State) आणि देश (Country ) या स्वायत्त कल्पनांच स्पष्टीकरण हा एक स्वतंत्र निबंधाचा विषय आहे आणि या निबंधात अप्रस्तुत आहे. पण दोन Secular असणारे मानवसमूह एकराष्ट्रीयत्वात विलीन होऊं शकत नाहीत आणि दोन वेगळे समाज Secular नसूनही एक राष्ट्र बनूं शकतात हा महत्वाचा मुद्दा इथे मांडायचा आहे.

केवळ Secularism हा राष्ट्रवादाचा पाया असता तर जगांतील उणेपुरे 130 Secular देश एकच राष्ट्रराज्य म्हणून नांदू शकले असते. प्रत्यक्षांत ते सर्व देश स्वतंत्र Secular States म्हणूनच राष्ट्रसंघाचे सभासद आहेत.

भारताचा विचार करण्यापूर्वी भारताबाहेरची काही उदाहरण हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी घेतो.

पहिलं उदाहरण जर्मनीच घेऊं या. हिटलरच्या Third Reich मध्ये इतिहासातील मोठयांत मोठं जर्मन राष्ट्र एकसंघपणे राष्ट्रराज्य म्हणून 1933 ते 1945 पर्यंत एकत्र नांदलं.

ऑस्ट्रिया हा 100 टक्के जर्मन लोकांचा देश हिटलरला जबरदस्तीनेच 1935 साली तिस-या साम्राज्यात विलीन करुन घ्यावा लागला. पण युध्द संपून हिटलरचा पराभव होताच ऑस्ट्रिया पुन्हा स्वतंत्र राष्ट्र-राज्य म्हणून वेगळा देश झाला. पण विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट ही की दुस-या महायुध्दानंतर Federal Germany करता घेतलेल्या मतचाचणींत बव्हेरिआतील लोकांनी Federation विरुध्द मतदान केलं होत. त्याकाळच्या राजकीय परिस्थिती योग्य राजनैतिक पवित्रे घेऊन बन्हेरियाला मनवून Federal German Republic मधे आणण्यांत आलं.

स्वित्सर्लंडंच उदाहरण पुन्हा असं दाखवत की दोन तृतियांश जर्मन लोकसंख्या असूनहि तिथले जर्मन स्वत:ला स्विस म्हणून ओळखतात. ते जर्मन राष्ट्राचा भाग कधीच व्हायला तयार नाहीत. सारांश जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झलंड यामधील सर्वच जर्मन Secular असूनहि, जर्मनभाषिक असूनही एक राष्ट्रीयत्वांत येऊ शकले नाहीत.

कॅनडाच उदाहरण पण बोलंक आहे. फेंच आणि इंग्लिश भाषिक लोक दोघेही Secular विचारसरणीचेच आहेत. पण एक राष्ट्रीयत्वांत विलीन व्हायची मात्र त्यांची इच्छा नाही. पुढच्या Referrendum च्या, सार्वमताच्या वेळी काय होईल ते सांगता येत नाही.

जबरदस्तीने रशियामध्ये आणलेले सर्व मुस्लिम देश रशियांच सामा्रज्य संपुष्टांत येताच स्वतंत्र राष्ट्र-राज्य म्हणून युनोचे सदस्यही झाले. युनोमध्ये आलेला पूर्व तिमूर हा शेवटचा सदस्य धर्माधिष्ठित राष्ट्रकल्पनेमुळे इंडोनेशियांतून फुटला.

सायप्रसची परिस्थिती वेगळी नाही. त्याची फाळणी होण अटळच दिसत आहे.

इराकचं उदाहरण अनेक कारणांसाठी घेण्यासारखं आहे. ओटोमान साम्राज्य लयास गेल्यावर इराक हा देश ब्रिटीशांच्या सोयीनुसार बनवण्यात आला. 1968 मधे बाथ पक्षाचे तिथे राज्य आले. पक्षाच्या समाजवादी आणि Secular सिध्दांताप्रमाणे इराक Secular देश झाला. सद्दाम हुसेनचे इतर काय दोष असतील ते असोत पण त्यांने इराकला पूर्णत: Secular आणि पुरोगामी राज्यव्यवस्था दिली. तरी पण इराकमधील मुख्य तीन लोक समूहांना तो एकराष्ट्रीयत्वांत गुंफू शकला नाही. उत्तरेकडील कुर्दिश हे वंशाने अरबांहून भिन्न स्वत:ला अ{भिमानाने आर्य म्हणवून घेणारे. त्यांना (इराण, तुर्कस्थान, सिरीयामधील, सिरीयामधील कुर्द लोकांसमवेत ) स्वतंत्र राष्ट्र - राज्य पाहिजे होतं. मध्य इराकमधील 20 टक्के सुन्नी अरब हे मुख्यत: राज्य करीत होते. दक्षिणेकडचे जवळजवळ 60 टक्के शिया अरब Secularism चे फायदे ओळखूनही सुन्नींबबोरबर एकत्वाने राहू शकले नाहीत.

एकराष्ट्रीयत्व नेमकं कशांत असतं, कशामुळे उत्पन्न होतं ? इराकचं उदाहरण फारच बोलकं आहे. आयतुल्ला खोमेनी हे स्वत: कट्टर शिया पंथीय. ते इराकमधे राजकीय आश्रय घेऊन बरीच वर्षे दक्षिण इराकच्या शियाबहुल भागांत राहिले. पण ते तेथल्या अरब शियांची मने जिंकू शकले नाहीत. कारण स्थानिक शियांची पहिली ओळख अरब अशी होती आणि नंतर शिया. त्यामुळे इराणविरुध्दच्या 10 वर्षाच्या लढाईत अरब शिया कधीही पर्शियन शियांना मिळाले नाहीत. तसंच उत्तरेतील बहुसंख्य कुर्द हे सुन्नी असून त्यांची पहिली ओळख कुर्दिश आर्य अशी राहिली आणि नंतर सुन्नी मुसलमान. सद्दाम हुसेन स्वत: सुन्नी असूनही तो कुर्दिश लोकांची मने जिंकू शकला नाही.

औपचारिक दृष्टया व्यवहारांत कुर्द, सुन्नी आणि शिया इराकी Secular होते पण त्यांचे राष्ट्रीयत्व मात्र भिन्नच राहिल.

Secularism आणि राष्ट्रीयत्व यांचे संबंध बारकाईने तपासून पहाण्यासारखे आहेत. मानवी मनाचे अनेक पापुद्रे राष्ट्रीयत्व बनवीत असतात. कोणती निष्ठा प्राथम्य मिळवील हे सहज सांगता येण्यासारखं नाही.

आपल्या शेजारीच असणा-या आणि सध्या पुन्हा उफाळून आलेल्या श्रीलंकेतील द्विराष्ट्रवादांच उदाहरण जास्त बोलकं आहे. तामीळ आणि सिंहली अशी दोन राष्ट्रे धर्म आणि भाषा अशा दुहेरी आधारावर बनू पहात आहेत. केवळ एकाच भूप्रदेशांत अगदी समुद्र वलयांकित काटेकोर सीमा असणा-या बेटांत हे दोन वेगळे लोकसमूह एकराष्ट्रीयत्वात विलीन होऊ शकत नाही हे पुन्हा पुन्हा सिध्द होत आहे. तामिळ लोकांना जर आपण एक स्वतंत्र राष्ट्र आहोत असं वाटत असेल तर सिंहली लोक त्यांच्यावर एकराष्ट्रीयत्व लादू शकत नाहीत, ते तामिळी लोकांवर राज्य करुं शकतात पण त्यांना एकात्म करुं शकतं नाहीत.

अशी अनेक उदाहरण देता येतील. निष्कर्ष असा की एकत्र नांदण्याची इच्छा नसणा-या लोकसमूहांना एकराष्ट्रीयत्वांत बांधून ठेवता येत नाही, सोय म्हणून कदाचित ते एकत्र नांदतात एवढच. आणि अशा एकराष्ट्रीयत्वाचा आधार कुठेही Secularism हा नाही.

आता भारताच्या राष्ट्रीयत्वाकडे वळू. भारतांच राष्ट्रीयत्व नेमकं कशांत आहे ? प्रादेशिक राष्ट्रीयत्व केवळ कोणी मानून ते लोकांच्यावर लादता येत नाही. इतिहासांतील कांही घटनांमुळे ज्या भूप्रदेशावर ब्रिटिशांचं राज्य एक शतक राहिंल केवळ त्याच अपघातामुळे त्या भूप्रदेशांतील सर्व लोक एकराष्ट्रीयत्वाच्या प्रेमरज्ज्ूनी बांधले गेले होते असा भ्रम निर्माण करुन प्रादेशिक राष्ट्रीयत्व लोकांच्या मानसिकतेत रुजू शकलं नाही. त्याचा अटळ परिणाम म्हणून भारताची धार्मिक तत्वावर 1947 साली भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली.

भारताच्या फाळणीच्या प्रक्रियेचा इतिहास हा या निबंधाचा विषय नव्हे पण फाळणीनंतरच्या भारतांत Secularism आणि राष्ट्रीयत्व यांचे परस्पर संबंध काय आहेत याचा आता विचार करुं.

पाकिस्तान हा एक इस्लामिक देश म्हणून जरी अखंड भारतातून फूटून निघाला असला तरी भारत हा एक Secular देश म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. आणि भारतीय राज्यघटनेने भारत हे एक Secular गणराज्य म्हणून 26 जानेवारी 1950 ला त्यावर शिक्का मोर्तब देखील केल.

पण लिखित राज्यघटना म्हणजे लोकांची मानसिकता नव्हे. भारतांतील हिंदू आणि मुसलमान या मुख्य दोन युध्यमान जमातींना Secularism पटलेलाच नव्हता. इस्लामशी इमान राखणा-या कोणत्याही मुसलमानाला Secularism च काय पण राष्ट्रवादही पटणं अशक्यच आहे. याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू धर्मनिष्ठही Secular व्हायला तयार नव्हते.राज्यघटना बनवतानाच याची कल्पना असल्यामुळे Uniform Civil Code - एकरुप नागरी संहिता Secularism चा जो पाया - त्याला निर्देर् र्शक तत्व म्हणून चौथ्या भागाच्या 44 व्या अनुच्छेदात ढकलून देऊन अशी “एकरुप नागरी संघटना” कधीच अस्तित्वात न येण्याची तरतूद घटनेतच केली.
त्यामुळे जरी कायद्याने समान नागरीकत्व प्रस्थापित झालं तरी समान राष्ट्रीयत्व मात्र प्रस्थापित होऊं शकलं नाही. म्हणजे निष्कर्ष असा की फाळणीनंतर आजही या देशांत अजूनही हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे अस्तित्वात आहेतच.

याबाबतीत एक अशास्त्रीय विधान वारंवार केलं जातं. त्याचा परामर्श घेणं आवश्यक आहे. पाकिस्तानातून 1971 साली बांगला देश फुटला आणि “द्विराष्ट्रवाद” पराभूत झाला. वास्तविक त्यामुळे त्रिराष्ट्रवाद सिध्द झाला. ज्या धार्मिक आधारावर भारतातून फूटून मुसलमानांसाठी इस्लाम धर्माधिष्ठित पाकिस्तान निर्माण झालं. या तत्वाला बांगला निर्मितीमुळे कसलाही धक्का बसला नाही. “आम्हाला तो इस्लाम धर्माधिष्ठित राष्ट्रवाद मान्य नाही. म्हणून पाकिस्तानातून फूटून पुन्हा आम्ही भारतात विलीन होऊ इच्छितो.” असं जर बंगलादेशच्या लोकांच प्रतिपादन असत तर कदाचित (कदाचितच हं कारण पश्चिम पाकिस्तान तसच इस्लाम धर्माधिष्ठित रहाणारच होत ) द्विराष्ट्रवादाचा पराभव झाला असं आपण म्हणूं शकलो असतो. प्रत्यक्षांत केवळ धर्म हा एकच घटक दोन लोक समूहाना एकत्र ठेऊ शकत नाही. वंश, भाषा असे घटकही राष्ट्र निर्मिती साठी आवश्यक असतात. एवढंच बांगलादेशाच्या निर्मितीने सिध्द झालं आणि त्यातही आश्चर्य वाटांव असं काहींच नव्हत. कारण फाळणीच्या वेळी आणि अगोदरसुध्दा बंगाली मुसलमानांची पंजाबी मुसलमानांबरोबर एक राष्ट्र म्हणून रहाण्याची इच्छा नव्हतीच. 20-25 वर्षे पंजाब्यांनी बंगाल्यावर समान धर्मीयतेच्या भ्रमाच्या आधारावर राज्य केलं एवढंच.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर