मुर्तीपुजन म्हणजे मागसलेपणाचे लक्षण आहे का?
मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे का?
हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या दैवतांच्या मूर्तीपुजनाची प्रथा सर्रास चालते. किंबहुना बहुतांश मंदिरे ही त्याच कारणासाठी निर्मिलेली आहे. परंतु हिंदू तत्त्वज्ञानात मूर्तीची उपासना करणे जरुरी आहे असे कुठेही दिलेले नाही. देव चराचरात सामावलेला आहे, दगडात प्राणी /माणसांत सगळीकडे आहे असे संतवांग्म्यात देखिल लिहिलेले आहे.
धर्म अभ्यासक अल बिरुनी ह्यांच्या मते, "The Hindus believe with regard to God that he is one, eternal, without beginning and end, acting by free-will, almighty, all-wise, living, giving life, ruling, preserving; one who in his sovereignty is unique, beyond all likeness and unlikeness, and that he does not resemble anything nor does anything resemble him"
असे असताना,
- देवळे आणि मूर्त्या ह्यांचे हिंदू धर्मात इतके प्रस्थ का आहे?
- अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग आणि तत्सम ठिकाणे, गावोगावी असणाऱ्या शेकडो मंदिरांपेक्षा नेमकी काय वेगळी आहेत?
- देव चराचरात सामावलेला असताना मुळात त्या शेकडो मंदिरांची तरी काय गरज आहे?
- देव सर्वत्र आहे ही संकल्पना झेपण्यास सामान्य कुवतीच्या लोकांना अवघड जाते म्हणून ही सोय केली असावी का?
- अष्टविनायकाची यात्रा करणे वगैरे गोष्टींमध्ये वेळ व पैसा घालवणे म्हणजे अडाणी पणाचे लक्षण आहे का?
- मुळात मूर्तीपूजन हेच मागासलेपणाचे लक्षण आहे का?
खुलासा आणि लेखकाचा दृष्टिकोन : प्रश्न प्रामाणिक आहेत उत्तरे मुद्द्यांना धरून येतील ही माफक अपेक्षा. मी स्वतः काही मूर्तीभंजक नाही, किंबहुना मी घरी गणपती वगैरे बसवायचो, अजूनही गंमत म्हणून बसवतो. पण गंमती पलीकडे मूर्तीपूजा/मंदिर ह्यांमध्ये वेळ घालवणारे मागास असतात असे माझे मत आहे.
Comments
तपशील माझा अनुभव आहे
शब्दांचे किंवा मतांचे बुडबुडे नाहीत. साधनाचे स्तोम माजवले आहे की मूळ भीतीचे हे या चर्चेत महत्त्वाचे नाही. ईश्वरभक्ती, त्यामुळे वाटणारे भीती हा श्री लिमये यांच्या चर्चेचा विषय नाही. तशी चर्चा झाल्यास दुसर्या स्तोमांचा प्रश्न काढू.
आपला अनुभव...
...मी नाकारत नाही. केवळ त्याकडे बघण्याची माझी पद्धत कदाचित आपल्यापेक्षा किंचित वेगळी असावी, असे वाटते. असो. अधिक विचाराअंती.
दुसरी गोष्ट म्हणजे, मूर्तिपूजा ही संकल्पना मुळात जनसामान्यांच्या गरजेतून जनसामान्यांच्याच कल्पनेतून उद्भवली आणि पुरोहितांनी त्याचे केवळ commercialization केले (एजन्सी/सोल एजन्सी घेतली), की मुळात काही मूठभर पुरोहितांनी ही संकल्पना बनवून स्वतःच्या फायद्यासाठी जनतेच्या मनात रुजवली, याही बाबीचा विचार 'ब्राह्मणांनी/पुरोहितांनी पोटाची खळगी भरण्यासाठी मूर्तिपूजेचे स्तोम माजवले का' या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी करावा लागेल. याबाबत माझ्याजवळ कोणत्याही बाजूने खात्रीलायक माहिती नाही. आपल्याजवळ असल्यास तपशिलांसहित जरूर मांडावी.
बाकी वसुलिंच्या मूळ प्रस्तावाबद्दल बोलायचे झाल्यास हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे मूर्तिपूजा करणे आवश्यक नसले तरी कोणास वैयक्तिक पातळीवर तशी गरज भासल्यास तसा प्रत्यवायही नसावा असे वाटते. आणि त्याकरिता कोणी (देवळात जाऊन किंवा घरच्याघरी स्वतः) मूर्तिपूजा केल्यास त्यात काही गैर नसावे. उलटपक्षी लुबाडणे या अनुषंगाने यज्ञ करणार्या पुरोहिताने लुबाडले काय किंवा देवळातल्या देवापुढील दक्षिणेवर जगणार्या पुजार्याने लुबाडले काय, फरक काय पडतो?
(आपल्या गायत्रीमंत्राच्या उदाहरणात आणि घरच्याघरी स्वतः देवपूजा - मूर्तिपूजा - करण्यात या बाबतीत साम्य आहे. दोन्हींत पुरोहिताचा छदामाचाही फायदा होऊ नये. त्यामुळे मूर्तिपूजेत per se इतर उपासनापद्धतींच्या तुलनेत पुरोहिताच्या पोटाची खळगी भरण्याचे सामर्थ्य असतेच, असेही म्हणता येणार नाही.
त्यामुळे पुरोहितांनी केवळ पुरोहिताच्या एजन्सीचा जेथे संबंध येतो अशा कर्मकांडांचे स्तोम माजवले असे म्हणता यावे, मूर्तिपूजेचे per se नव्हे.)
फक्त एजन्सी घेतली?
एजन्सी घेतली. ज्ञान मिळवण्याचा अधिकार आम्हालाच आहे असे सांगून अजाण लोकांचे शतकानुशतके शोषण केले.
तुम्ही म्हणता 'मूर्तिपूजा ही संकल्पना मुळात जनसामान्यांच्या गरजेतून जनसामान्यांच्याच कल्पनेतून उद्भवली आणि पुरोहितांनी त्याचे केवळ commercialization केले'. समाजाचा विकास होतांना काही लोक अस्तित्त्वात असलेल्या गैरसमजांना खतपाणी घालतात व स्वतःच्या तुंबड्या भरतात. असे सगळीकडेच घडले आहे. भारतात ते काम ब्राह्मण जातीच्या लोकांनी केले. एजन्सी घेतली की माल खपवावा लागतोच की. मग स्तोम माजवून खपवला.
श्री लिमये यांनी मुर्तीपूजा मागासलेपणाचे लक्षण आहे का? असे विचारले आहे. मला मुर्तीपूजा मागासलेपण आहे की नाही याविषयी माहीत नाही. पण मुर्तीपूजा टीकून रहावी म्हणून ब्राह्मणांनी प्रयत्न केले. आता असे करतांना भारतीय समाज मागास राहीला का हा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो.
खंडन
असा दावा मी केलेला नाही.
१. मूर्तिपूजा ही संकल्पना मुळात जनसामान्यांच्या गरजेतून जनसामान्यांच्याच कल्पनेतून उद्भवून पुरोहितांनी त्याचे केवळ commercialization करणे, आणि
२. मुळात काही मूठभर पुरोहितांनी ही संकल्पना बनवून स्वतःच्या फायद्यासाठी जनतेच्या मनात रुजवणे,
या दोन शक्यतांपैकी नेमके काय घडले याची मला कल्पना नाही, आणि याचा विचार याबाबत कोणताही निश्चित निर्णय घेताना होणे आवश्यक आहे असे मला वाटते, एवढेच म्हटले आहे. त्यापुढे, यांपैकी कोणत्याही शक्यतेच्या बाजूने किंवा विरुद्ध आपल्याजवळ काही निश्चित माहिती असल्यास आपण ती जरूर मांडावी, असे आवाहन केलेले आहे. (माझ्याजवळ अशी कोणतीही माहिती नाही.)
या बाबीचा मूर्तिपूजेशी नेमका काय संबंध ते कळू शकले नाही.
याबाबत दुमत नसावे.
यामागील तत्त्वाबद्दल दुमत नाही. मतभेदाचे /शंकेचे मुद्दे एवढेच आहेत, की १. एजन्सी नेमकी कशा(कशा)ची होती? २. सदासर्वकाळ एकाच मालाची एजन्सी होती, की स्थळ, काळ, सोय, गिर्हाईक आणि नफा यांप्रमाणे विकायचा जिन्नसही वेगळा होता? दुकानदार सहसा एकच जिन्नस विकत नाही, आणि विक्रेत्याला शेवटी नफ्याशी मतलब असतो, मालाशी एकनिष्ठ असण्याशी नव्हे. सच्चा विक्रेता आज दुधाला भाव असेल तर आज दूध विकतो, आणि उद्या दुधाचा भाव घसरून व्हिस्कीचा भाव वधारला तर गवळ्याचा धंदा बंद करून व्हिस्कीची एजन्सी घेतो. किंवा जमले तर आणि फायदा असेल तर दोन्ही विकतो. त्या गिरगावातल्या विठ्ठल-कम-साईबाबा मंदिरातल्या पुजार्यासारखा.
आणि स्तोमाचे (म्हणजे जाहिरातबाजीचे) म्हणाल तर नीट बघायला गेल्यास जाहिरात ही मालाची नसून ब्राण्डची (म्हणजे शेवटी उत्पादकाची आणि/किंवा विक्रेत्याची) असते हे लक्षात यावे. लक्सची जाहिरात ही साबणाची (म्हणजे साबण या वस्तूची) जाहिरात नसून 'लक्स' ब्राण्ड साबणाची म्हणजेच हिंदुस्तान युनिलिवरची (?) असते. 'लाजरी'ची जाहिरात ही साडीची जाहिरात नसून साड्या विकणार्या दादर मुंबई पिनकोड ४०००२८मधील एका विशिष्ट दुकानाची असते. युनिलिवर डालडासुद्धा विकते आणि 'लाजरी' प्रत्यक्षात इतर काही विकते की नाही ते माहीत नाही, पण उद्या मार्केट बदलल्यास साडीविक्रीचे प्रमाण कमी करून (किंवा त्याच्या जोडीला) चुडीदारही विकू शकते. त्यांना धंद्याशी मतलब, मालाशी (म्हणजे माल कोणता याच्याशी) नव्हे. (थोडक्यात, 'हिंदू ब्रांड यज्ञयाग' किंवा 'हिंदू ब्रांड मूर्तिपूजा' किंवा 'हिंदू ब्रांड लिंगपूजा' किंवा 'हिंदू ब्रांड साधुपूजा' किंवा 'हिंदू ब्रांड मठ' किंवा 'हिंदू ब्रांड शंकराचार्यांचे पीठ' किंवा 'हिंदू ब्रांड आणखी काही जे असेल ते' यांपैकी कशाचेही स्तोम उर्फ जाहिरातबाजी ही 'हिंदू ब्रांड'ची किंवा 'हिंदू ब्रांड'च्या त्यात्या विक्रेत्याची - वेंडरची - स्तोम अथवा जाहिरातबाजी मानता यावी, त्यात्या प्रॉडक्टची नव्हे. विकेल तो माल आपला.)
('समाजात अस्तित्वात असलेल्या गैरसमजांना खतपाणी' म्हणताना समाजातील गैरसमज सर्वत्र आणि सर्वकाळ एकसारखे, uniform - याने कि कधीही कोठेही जा, मूर्तिपूजा एके मूर्तिपूजा, असे - होते असा आपला दावा आहे काय?)
दुसरे म्हणजे भिक्षुकीचा एक पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून विचार करतानासुद्धा, भिक्षुकीतील सर्वच - एकूण एक - कर्मकांडे ही मूर्तिपूजेशी संबंधित असतात असा आपला दावा आहे काय? मी याबद्दल थोडा साशंक आहे.
याबद्दल मला माहिती नाही. सोदाहरण स्पष्ट करू शकाल काय?
याचा मूर्तिपूजेशी अर्थाअर्थी काही संबंध असावा काय, किंवा मूर्तिपूजेअभावी भारतीय समाज प्रगत झाला असता काय, याबद्दल मी साशंक आहे.
सिमँटिक्सबद्दल वाद लांबणारा म्हणून समारोप
माझी घाईघाईत चूक झाली. तुम्ही असा दावा केलेला नाही. क्षमस्व. तुमच्या विधानाचा विपर्यास करण्याचा हेतू नव्हता.
ज्ञान मिळवण्याचा अधिकार आमच्याकडेच आहे असे सांगून सामन्यजनांना ज्ञान मिळवण्यापासून व्यवस्थित वंचित ठेवणे. अशा अज्ञानी समाजास मुर्तीपूजा सोडून उपासनेसाठी दुसरे पर्याय आहेत या जाणीवेपासून दूर ठेवणे आणि स्वतःचा माल खपविणे, अशी कारणमिमांसा मला दिसते.
अगदी सहमत. मग साईबाबा असो, गणपती असो, निरनिराळ्या देव्या असोत की राम असो. निरनिराळ्या मुर्त्यांचे ब्रँड होतेच खपवायला.
समाजातील गैरसमज सर्वत्र आणि सर्वकाळ होते. एकसारखे किंवा एकसंध नसावेत व मुर्तीपुजा हाच एकमेव पर्याय आहे असेही मी म्हटलेले नाही.
नाही. कर्मकांडे केवळ मुर्तेपूजेशी संबंधित नाहीत. पण कर्मकांडे आणि मुर्तीपूजा यांना मी एकाच चष्म्यातून पाहतो. मुर्तीपूजेतून स्थानिक ब्राह्मणांसाठी रोजगार उपलब्ध होणे सोपे होते. केवळ कर्मकांडांमुळे तसे झालेच असते का याविषयी मला माहिती नाही.
सोदाहरणः भारतात कुठल्याही देवळात जावे आणि विचारावे की मुर्तीची आंघोळ कोण घालते, कुठल्या कुठल्या भुकट्या कोण लावते, कुजलेली पाने-फुले कोण काढते, दानपेटी कोण उघडते आणि मंदिरांच्या आवारात चालणारी कर्मकांडे कोणाची मक्तेदारी आहे. उदाहरण मिळेल. हे विसरलोच की अमेरिकेतही मंदिरे आहेत, तेथेही चौकशी करता येईल.
मीही साशंकच आहे. म्हणूनच प्रश्न विचारला. जगात मुर्तीपूजा न करताही मागास असलेले अनेक समाज आहेत. व्यापक प्रश्न मुर्तीपूजेचे एकूणातच शोषित असलेल्या जातीव्यवस्थेस काय योगदान दिले असाही असू शकतो.
प्रश्न सिमॅन्टिक्सचाच आहे...
... अन्यथा तपशिलांबाबत मतैक्य आहेच. केवळ त्या तपशिलांचा अर्थ कसा लावायचा याबाबत मतभेद आहे. असो.
पहिल्या वाक्या(च्या तपशिला)शी सहमत आहे. मात्र दुसर्या वाक्यातील निष्कर्ष त्यावरून आपोआप निघतो असे वाटत नाही. अज्ञानी समाजाचे एक भले मोठे कॅप्टिव मार्केट पुरोहितवर्गाकडे होते आणि आपल्या फायद्याचा असा जो वाटेल तो प्रॉडक्ट गळी उतरवण्याची मुभा होती एवढाच यातून निष्कर्ष निघतो.
उपासनेसाठी इतर नवनवीन कल्पक पर्याय (प्रॉडक्ट्स) निर्माण करून अथवा उपलब्ध पर्यायांत (अर्थात विक्रेत्याच्या अधिकाधिक फायद्यासाठी - टू हेल विथ कस्टमर्स' इंटरेस्ट्स!) सुधारणा करत राहून असे वेगवेगळे, नवनवीन अथवा सुधारित प्रॉडक्ट्स समाजाच्या गळी उतरवत राहून स्वतःचाच अधिकाधिक फायदा करत राहणे पुरोहितवर्गास अशक्य असावे असे वाटत नाही. पण परिणामकारक स्पर्धेअभावी जनरल मोटर्स सिंड्रोम (किंवा भारतीय संज्ञांच्या भाषेत बोलायचे झाले तर अम्बॅसिडर सिंड्रोम) आड आला असावा. आहे तो माल खपतोय आणि होणार्या नफ्यावर भागते आहे तर सुधारणा कशाला करा आणि अधिक नफा तरी कशाला मिळवा? आणि नवीन प्रॉडक्ट्स तरी कशाला बनवा? जपानी स्पर्धा येईपर्यंत अमेरिकन मोटारउद्योगांनी (किंवा विदेशी स्पर्धा येईपर्यंत भारतीय मोटारउद्योगांनी) तरी याहून वेगळे असे काय केले? तोच तोच आणि तितपतच माल वर्षानुवर्षे खपवलाच ना? (आणि अमेरिकन मोटार उद्योगांच्या - विशेषतः जनरल मोटर्सच्या - बाबतीत जपानी स्पर्धा आल्यानंतरसुद्धा कितीसा फरक पडला?)
थोडक्यात आपला माल विकताना पुरोहितवर्गास मालाचे काही विशेष प्रेम होते असे वाटत नाही. माल खपत होता, बाजारात दुसरे पर्याय उपलब्ध नसावेत कदाचित, किंवा असले तर सहज उपलब्ध नसावेत, किंवा माहीत नसावेत, किंवा रुचण्यासारखे नसावेत. (शेवटच्या प्रकारात, उदाहरणादाखल, इस्लामचा पर्याय मोडावा. हा उपासनेचा पर्याय हिंदुस्थानात अनेक शतके उपलब्ध असावा. उपासनेचा एक पर्याय म्हणून तत्त्वतः त्यात काही गैरही नसावे. तरीही किती टक्के सामान्य हिंदू समाजजनांनी तो स्वेच्छेने स्वीकारला असावा याबद्दल खात्रीलायक विद्याअभावी निदान मी तरी साशंकच आहे. ख्रिस्ती धर्माच्या पर्यायाच्या बाबतीत इसवी सनाच्या पहिल्या काही शतकांत विशेषतः दक्षिण हिंदुस्थानात कदाचित स्वेच्छेने हा मार्ग काही प्रमाणात पत्करला गेला असावा, परंतु त्याचे प्रभावक्षेत्र एकंदरीत मर्यादितच असावे आणि त्यामुळे हा पर्याय सरसकट उपलब्ध नसावा. त्यानंतर युरोपीय सत्तांच्या आगमनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या मर्यादित प्रभावक्षेत्रात हा मार्ग उपलब्ध असला तरी हे उपलब्धताक्षेत्र आणि हा पर्याय उपलब्ध करून घेण्यामागील स्वेच्छेच्या किंवा स्वारस्याच्या घटकाचे प्रमाण याबद्दल एकंदर साशंकच आहे. त्यामुळे हे मार्ग कदाचित काही प्रमाणात उपलब्ध असले तरी पुरोहितवर्गास स्पर्धा देण्यास पुरेसे नसावेत.) याव्यतिरिक्त, उपासनेकरिता इतर पर्याय (हिंदू प्रथेतसुद्धा) उपलब्ध असू शकतात हे खुद्द पुरोहितवर्गातसुद्धा (काही मर्यादित जाणकार आणि/किंवा अभ्यासू मंडळी वगळल्यास) किती जणांना माहीत असावे याबद्दलही साशंक आहे. जेथे "मी पूजा करताना अमूक पद्धतीनेच का करायची?" या प्रश्नाचे उत्तर "कारण माझे वडील आणि त्यांच्यापूर्वी माझे आजोबाही असेच करत असत म्हणून" असे खुद्द पुरोहितवर्गात चालत असावे, तेथे पर्यायी माल विकायचा जरी ठरवला तरी तो आहे हे मुळात विकणार्यालाच जेथे माहीत नाही (आणि सध्या विकत असलेला माल तरी आपण नेमका का विकतो हेही जेथे ठाऊक नाही), तेथे असा विक्रेता पर्यायी माल विकणार तरी नेमका कसा?
त्यामुळे 'पुरोहितवर्गाने मूर्तिपूजेचे स्तोम माजवले' म्हणण्यापेक्षा 'मालात सुधारणा करण्यात आळस केला आणि तोचतोच माल शतकानुशतके विकत राहिले' असे म्हणता येईल फार तर. स्तोम माजवले ते माल विकण्याच्या आपल्या मोनॉपलीचे, किंवा 'ती मोनॉपली आपली(च) असावी' या संकल्पनेचे. (अर्थात, पुन्हा सिमॅन्टिक्सचाच प्रश्न.)
आणखी एक मुद्दा: पुरोहितवर्ग - कोणताही पुरोहितवर्ग - आपला शतकानुशतके खपणारा माल आपल्या फायद्यासाठी बदलू शकत नाही किंवा नवीन माल बाजारात आणू शकत नाही असेही नाही. मेक्सिकोतील चिचेन-इत्झाच्या मंदिराबद्दल मध्यंतरी काही मनोरंजक माहिती मिळाली. इतिहासाचा सखोल अभ्यासक वगैरे नसल्याने अशा प्रकारच्या माहितीतले तपशील सहसा फार काळाकरिता माझ्या स्मृतीत गोंदवले वगैरे जात नाहीत - आणि त्यामुळे फारसे टिकूनही राहत नाहीत - पण जेवढी प्राथमिक माहिती लक्षात आहेसे वाटते त्यावरून सांगतो. (तपशिलाच्या भरपूर चुका असणे सहज शक्य आहे. गरजूंनी अधिक माहिती स्वतः शोधून काढावी.) मायन लोकांच्या या प्राचीन मंदिराचे दैवत कुकुल्कान हे मुळातील मायन दैवत नाही. मध्य अमेरिकेतील टोल्टेक जमातींशी संबंध आल्यावर त्यांचे केत्झालक्वात्ल हे दैवत कुकुल्कानबाप्पाच्या स्वरूपात मायन पुरोहितवर्गाने आपल्या धर्मात आयात केले, त्याबरोबर अनेक नवीन धर्मसंकल्पनाही आयात केल्या, असे कळले. (जसे, तोपर्यंत नरबळीची संकल्पना मायन धर्मप्रथांमध्ये नव्हती, ती नव्याने आली, वगैरे वगैरे.) किंवा भारतातील उदाहरण द्यायचे झाल्यास सत्यनारायण ही कल्पना गेल्या काही शतकांत आपण स्थानिक मुसलमानी प्रथांवरून आयात केलेली आहे (शिवाजीमहाराजांच्या काळात ती नव्हती) असे मध्यंतरी उपक्रमावरच वाचनात आले.
त्यामुळे, याही कारणामुळे 'पुरोहितवर्गाने मूर्तिपूजेचे स्तोम केले' या विधानाबाबत साशंक आहे. शतकानुशतके केवळ मूर्तिपूजाच विकली असली तर ती केवळ कल्पनादारिद्र्यामुळे, किंवा इतरही काही विकता येईल याची माहिती नसल्यामुळे / त्या दिशेने विचार न केल्यामुळे. 'माझा प्रॉडक्टच चांगला / माझ्या प्रॉडक्टअभावी तुझे काम चालणार नाही' याला प्रॉडक्टचे स्तोम म्हणता येईल. 'मीच तुला प्रॉडक्ट विकणार / माझ्या अभावी तुझे काम चालणार नाही' हे प्रॉडक्टचे स्तोम नव्हे, माझे (/ माझ्या विक्रीच्या सर्विसेसचे) स्तोम आहे.
'ब्राह्मण' या शब्दाच्या 'पुरोहितवर्ग' अशा व्यापक अर्थाने हे विधान असेल तर अधोरेखित विधानाशी सहमत आहे. 'हिंदूधर्मातील एक जात किंवा जातिसमूह' या अर्थाने हे विधान असेल तर याबाबत थोडा साशंक आहे. हा मुद्दा थोडासा "हिंदूधर्मात / हिंदू समाजात जातीय अर्थाने 'ब्राह्मण' या जातीची व्याख्या काय?" या (पुन्हा एकदा) सिमॅन्टिक्सच्या दलदलयुक्त प्रश्नाच्या दिशेने जातो. या दलदलीत शिरू इच्छीत नाही, आणि तपशीलवार माहितीही माझ्याजवळ उपलब्ध नाही (व्यक्तिशः त्यात फारसा रसही नाही), परंतु 'गुरव' या समाजाचे उदाहरण चटकन डोळ्यांसमोर येते. वरील सर्व कर्मकांडे या समाजाच्या अखत्यारीत येतात, मात्र या समाजाचे जातीय वर्गीकरण व्याख्येने 'ब्राह्मण' या जातिसमूहात केले जाते किंवा नाही याबाबत मतांतरे आहेत असे अर्धवट ऐकीव माहितीवरून समजते. (मुळात जातीय वर्गीकरणाच्या अर्थाने 'ब्राह्मण' या शब्दाची अशी काही ठोस, नि:संदिग्ध व्याख्या आहे काय इथपासून साशंक आहे.) शक्य असल्यास (आणि गरज भासल्यास) योग्य तो खुलासा व्हावा.
उत्तरासाठी जागा
ठेवत आहे. सिमँटिक्समध्ये न शिरता काही मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करण्यासारखे आहे. असहमत किंवा प्रतिवाद म्हणून नाही तर काही मुद्द्यांचे माझे आकलन योग्य आहे का ते पाहण्यासाठी. सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शोधा म्हणजे सापडेल
आपल्या कुतूहलाबद्दल आदर आहे.
मूर्तीपूजा हे प्रगल्भतेचेच लक्षण आहे. सीमेवर लढणारे जवान, भारताच्या ध्वजासाठी स्वतःचे रक्त सांडून प्राण ठेवतात तेव्हा तो ध्वज, केवळ एक कापड न राहता, भारताच्या अस्मीतेची मूर्ती होतो.
मूर्तीची पूजा करतांना, मंत्रांनी त्या देवतेला आवाहन करून, मग पूजा करतात, नंतर मंत्रांनी विसर्जन करतात. प्रत्येकाच्या आवाहन शक्तीनुसार, त्यांना तसा अनुभव येतो. एक उदाहरण देतो. आवाहन करण्याआधी ती मूर्ती म्हणजे केवळ धातूचा आकार असतो. परंतू, आवाहन केल्यावर सर्व शक्तीनिशी प्रयत्न केल्यावरही, अंगुष्ठमात्र मूर्तीस कुणी हलवू शकत नाही. त्या मूर्तीस हलवण्याचा प्रयत्न करून, ती हलवता येत नाही असा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले (त्या मूर्तीच्या पूजकाशिवाय) अनेक लोक आहेत. मूर्तीरूपात परमेश्वराची उच्च आराधना करणारे असे लोक आजही, इसवी सनाच्या २००९ व्या वर्षातही, भारतात आहेत. भक्ती म्हणजे स्वार्थी प्रतिष्ठेचे ढोंग नव्हे, असा संकेत असल्याने कुणी या अनुभवांवर सहसा चर्चा करत नाही.
तुमच्या प्रश्नांवरून मला स्वामी चिन्मयानंदांची आठवण झाली. ते आधी एक पत्रकार होते. बुवाबाजी वगैरे थोतांड आहे असा त्यांचा विश्वास होता. या ढोंगी लोकांचे बिंग फोडायचे असा दृढ निश्चय करून ते हिमालयात गेले. तेथे त्यांना ईश्वरी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव केलेले ऋषी भेटले. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले. त्यांचा सत्यशोधनाचा निश्चय इतका दृढ होता की सर्व लौकिकाचा त्याग करून ते संन्यासी झाले. सामान्य मनुष्यास हे साधणे शक्यच नाही, कारण इतका दृढ निश्चय असल्यावर मनुष्य आपोआप असामान्य होतो.
या विषयावर अधिक माहितीसाठी तुम्ही राहत्या जागेपासून शोध घेणे सुरू करा. पंचक्रोशीतील सत्पुरूषांना विचारत जा की मूर्तीत ते तुम्हाला देव दाखवू शकता काय, किंवा तसा एखादा अनुभव देऊ शकतात काय, असे सरळ विचारा. बारा वर्षे तळमळीने शोध घेतल्यानंतर तुमचा या विषयांत इतका अभ्यास होईल की या विषयावर तुम्ही एक चांगले पुस्तक लिहू शकाल. त्यानंतर, खरे काय हे तुम्ही स्वतःच प्रगल्भतेने मांडू शकाल. मग, अल बिरूनीसारख्या इतर अभ्यासकांच्या मताची तुम्हाला गरज राहणार नाही.
तुमच्या सत्यशोधनाच्या प्रयत्नासाठी खूप-खूप शुभेच्छा!
स्नेहांकित,
शैलेश
हाच
मुद्दा मी वरही मांडला होता पण त्याला सोईस्करपणे बगल दिली गेली. :)
जर मूर्तिपूजा मागासलेपणाचे लक्षण आहे तर झेंड्याला वंदन करणे हे ही त्याच श्रेणीत बसावे. मग आख्खे जगच मागासलेले आहे* कारण सर्व देशांमध्ये सामान्य माणसांपासून राष्ट्राध्यक्षांपर्यंत सर्व लोक एका रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्याला वंदन करतात. सो ब्याकवर्ड यू नो.
*वसुलि यांचा सन्माननीय अपवाद वगळता. ते बहुधा असे करत नसावेत.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
'गंमत म्हणून'
'गंमत म्हणून' ते तसे करतही असावेत!
एखादी गोष्ट 'गंमत म्हणून' केली गेली तर तो 'मागासलेपणा' होत नसून त्यास 'प्रगल्भतेचे' एक लक्षण समजावे.
(इति व्याख्याकर्ते श्री. वसुलि? उत्तर ते स्वतः, आणि ते गंमत म्हणून पूजत असलेला परमेश्वर हेच जाणोत!)
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
आवाहन करणारा मीच, हलवणाराही मीच!
आवाहन करणारा मीच, हलवणाराही (किंवा न हलवणाराही) मीच! हे काही पटत नाही. न हलवता येण्यासारखे काहीतरी, 'अहल्य' असे काहीतरी, हलवून दाखवता यायला हवे. अंगुष्ठमात्र मूर्तीपेक्षा १-२ टनाची मूर्ती हलवता आली तर उत्तम. एखादे अवकाशयान आवाहनाने अंतराळात पाठवता आल्यास अतिउत्तम. ह्यावर अधिक संशोधन व्हायला हवे.
मी पत्रकार नाही. त्यामुळे चिन्मयानंद होऊ शकेन असे वाटत नाही. अर्थात आदरणीय स्वामीजींच्या डाव्या पायाच्या अंगुष्ठाच्या नखाचीही बरोबरी करण्याची माझी लायकी नाही, हेही मला माहीत आहे. पण हिमालयाच्या सान्निध्यात जाऊन तिथल्या शुद्ध हवेत राहायला केव्हाही आवडेल.
स्वामी सामान्यानंद ऊर्फ धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आमचे प्रतिसाद कुठे आहेत.
व्यक्तीपुजा आणि मुर्तीपुजा यासंबंधी उदाहरणासहीत दिलेल्या प्रतिसादात आक्षेपार्ह काय होते ?
अवांतर : शषांकसाहेब, या संपादकांवर काही कंट्रोल आणा राव..!
-दिलीप बिरुटे
(वैतागलेला)
असे काय लिहिले होते?
काय लिहिले होते हे जरा खरडवहीतून सांगा की राव
आपला,
(माजी संपादक) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मागासलेपणाची व्याख्या सांगावी
वसंत लिमये यांनी मागासलेपणाची व्याख्या सांगावी. कोणत्या प्रकारचा मागसलेपणा त्यांना अपेक्षित आहे? (मी स्वतः मूर्तीपूजा करत नाही. मात्र माझ्या घरी मूर्तीपूजा चालते. मात्र मी घरच्यांना आर्थिक किंवा वैचारिकदृष्ट्या मागास समजत नाही. वसुलि यांनी मागासलेपणाची व्याख्या सांगितल्यास माझ्या समजुतीत फरक पडेल असे नसले तरी काही गोष्टी स्पष्ट होण्यास मदत होईल.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मागाहून आले...
माझ्या अत्यल्प वाचनानुसार (चू. भू. दे. घे.) मूर्तीपूजा ही हिंदुधर्मात(?) मागाहून आली. वैदिक काळात मूर्तींना फारसे महत्त्व नव्हते.
मूर्तीपूजा, मंदिर बांधणी वगैरे वगैरे हे ग्रीकांशी संबंध आल्यावर आणि बौद्ध स्थापत्यकलेचा विकास झाल्यावर हिंदु धर्मात वाढीस लागले.
म्हणजेच, जरा मागाहून आले. आता एखादी गोष्ट आपल्या धर्मात मागाहून येणे हे मागासलेपणाचे लक्षण आहे असे तर नाही ना? ;-)
बाकी, चर्चा नेहमीसारखीच अपेक्षित अंगाने जाते आहे. मी "मागाहून आले" हे उत्तम जाहले. :-)
एक निवेदन!
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची इच्छा असूनही काही काळासाठी उपक्रमावरुन रजा घेत आहे. उपक्रमाच्या स्वास्थ्यासाठी असे करणे आवश्यक आहे असे मला वाटते. उत्तरे न मिळाल्याने कुणाला मी 'पलायनवादी' वाटू नये म्हणून हा खुलासा.
धन्यवाद!
आपला,
वसुलि
कैच्या कै
उपक्रमाच्या स्वास्थ्याचा इथे काय संबंध? उपक्रम चांगले धडधाकट आहे, काळजी नसावी.
चर्चेतील एकाही मुद्याचे आपल्याला समाधानकारक उत्तर देता आलेले नाही ही वस्तुस्थिती स्वीकारावी आणि पुढच्या वेळेस चर्चा टाकताना ही आठवण असू द्यावी असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
स्वास्थ्य
ह्या चर्चेला काल आलेले ५० एक प्रतिसाद (जे आता नाहिसे झाले आहेत) पाहिले असतेत तर उपक्रमाचे स्वास्थ्य कसे धोक्यात होते ते समजले असते. खुद्द मालकांकडून अप्रत्यक्षरित्या उपक्रम स्वास्थविषयक विवंचना माझ्यापर्यंत पोहचवण्यात आली.
असो मला अधिक खोलात शिरायचे नाही. तूर्तास (निदान काही वेळे पर्यंत) उपक्रमावरील वावर बंद करण्याचा विचार केला आहे.
त्यावरुन तुम्हाला काय काढायचेत ते निष्कर्ष काढा.
उत्तरे देणारा मी कोण? मी तर उत्तरे मागतो आहे.
धन्यवाद!
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अलिबाग
उत्तरे देणारा मी कोण? मी तर उत्तरे मागतो आहे*.
आधी स्वतः अमुक गोष्ट मागासलेली आहे म्हणून धागा काढायचा. मग सदस्यांनी विचारले की मागासलेले म्हणजे नेमके काय तर बगल द्यायची किंवा पळ काढायचा. याला चर्चा म्हणत नाहीत. जर हे तुमचे मत आहे तर तुमच्याजवळच ठेवा. चर्चा करायची असेल तर सदस्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्या.
सत्यामध्ये कल्लूमामा म्हणतो त्याप्रमाणे," इधर क्या लोग अलिबाग से आया है क्या?"
*बाकी हे वाक्य कुठल्याही १०८ बाबांच्या प्रवचनात सहज खपून जाइल. :)
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
असा काही नियम आहे का ?
>>चर्चा करायची असेल तर सदस्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्या.
चर्चा प्रस्ताव टाकणार्या सदस्याने, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत असे काही उपक्रमवर नियम आहेत का ?
-दिलीप बिरुटे
नाही
असला कोणताही "नियम" उपक्रमावर पाहिल्याचे मला आठवत नाही आणि चर्चा सुरु करून नंतर त्यात भाग न घेणारे अनेक चर्चाप्रस्तावक दाखवता येतील. परंतु चर्चाप्रस्तावकाने चर्चा सुरु केल्यास त्यात भाग घ्यावा अशी अपेक्षा इतर सदस्य ठेवू शकतात.
एक उदाहरण म्हणून -
काही सनातनधर्मियांनी, इतरांचे लेख जसेच्या तसे छापून आपले कवडीचे मत न मांडता त्यावर इतर सदस्यांनी केलेल्या चर्चा उपक्रमावर दिसतील.
हे वरील प्रतिसादातील वाक्य आक्षेपार्ह वाटते कारण त्या वाक्याचा प्रयोग वसुलिंसकट इतर कोणीही व्यक्ती करू शकते.
धन्यवाद..!
>>असला कोणताही "नियम" उपक्रमावर पाहिल्याचे मला आठवत नाही आणि चर्चा सुरु करून नंतर त्यात भाग न घेणारे अनेक चर्चाप्रस्तावक दाखवता येतील.
धन्यवाद...!!!
जर हे तुमचे मत आहे तर तुमच्याजवळच ठेवा.
हे वाक्य आक्षेपार्ह आहेच. संपादकांनी अशा वाक्यांची नोंद घेऊन संबंधीत सदस्यांना समज दिली पाहिजे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
स्पष्टीकरण
हे वाक्य आक्षेपार्ह आहेच. संपादकांनी अशा वाक्यांची नोंद घेऊन संबंधीत सदस्यांना समज दिली पाहिजे असे वाटते.
प्रस्तुत चर्चाप्रस्तावामध्ये 'मूर्तिपूजा मागासलेली आहे' या मताबद्दल मी बोलत होतो. आता हे वसुली यांचे वैयक्तिक मत आहे हे त्यांनी चर्चाप्रस्तावामध्येच म्हटले आहे. तसे असूनही त्यांनी चर्चाप्रस्ताव टाकला म्हणजे त्यांची यावर चर्चा करायची इच्छा आहे असे मानायला हरकत नसावी. मग इतर सदस्यांनी मागासलेपणा म्हणजे नेमके काय बुवा असे विचारल्यास त्यांनी सांगायला हवे अन्यथा चर्चा होणार नाही. असे करायचे नसेल तर त्यांनी हे त्यांचे मूल्यवान मत स्वतःपुरतेच ठेवावे, त्यावर चर्चाप्रस्ताव टाकू नये. (म्हणजे इतरांचाही निष्कारण वेळ जाणार नाही.)
आता यात आक्षेपार्ह काय आहे हे मला समजावून सांगितल्यास आपला आभारी राहीन.
मराठी सायटींवर चर्चा या शब्दाची व्याख्या वेगळीच आहे असे दिसते.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
आक्षेपार्हच....
कोणी कोणाचा मुल्यवान वेळ कुठे घालवायचा, आपले मत कुठे मांडायचे किंवा मांडायचे नाही
हा ज्याचा त्याचा वयक्तीक प्रश्न आहे. इथे चर्चेत कोणाचा उगाच निष्कारण वेळ जात असेल तर इथे कोणी कोणाचे बोट धरुन इथे लिहिलेच पाहिजे असा आग्रह धरत नाही असे वाटते. 'तुमचे मत आहे तर तुमच्याजवळच ठेवा' असे बोलणे म्हणजे सदस्यांच्या मतांचा अनादर करण्यासारखे आहे. कोणाचे मत पटणारे असेल किंवा नसेलही म्हणून 'तुमचे मत तुमच्याजवळ ठेवा असे म्हणने' सभ्यपणाचे आणि शहाणपणाचे नाही असे वाटते.
'मुर्तीपुजा म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे' असे ग्रहित धरुन मुर्तिपुजा ही मागासलेपणाचे लक्षण नाही. यावर आपापली मतं मांडण्याची संधी सदरील चर्चेत होती, आहे. किंवा मुर्तिपुजा करणे मागासलेपणाचे कसे ठरते, यावरही मत मांडण्याची संधी होती. तेव्हा चर्चाप्रस्तावकाने उत्तर दिले नाही, देत नाही. म्हणून त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरे आलीच पाहिजेत असा आग्रह धरणे योग्य नाही. इतरांच्या असलेल्या मतांचा (प्रतिवाद करुनही) आदर करण्याचे सार्वजनिक ठिकाणी शिकले पाहिजे, एवढेच या प्रसंगी सांगायचे आहे.
-दिलीप बिरुटे
:-)
आय रेस्ट माय केस.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
धन्यवाद प्राध्यापक महाशय!
अगदी सहमत. पण मागास म्हणजे काय? अल बिरुनी कोण? लिमये बेगडी भंपक कसे आहेत ह्यावर मते नोंदवण्यात काही जणांनी उत्साह दाखवल्याने तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यावर एकही ठोस प्रतिसाद आला नाही.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अहो पण मागास म्हणजे काय
अहो पण मागास म्हणजे काय हे तरी सांगा ना! उगीच 'जो स्वतःला हिंदुत्ववादी समजतो तो हिंदुत्ववादी' अशा धर्तीची गोलमोल व्याख्या देण्यापेक्षा मूर्तिपूजक मागास आहेत म्हणजे नक्की काय आहेत हे तरी सांगा की.
आणि एक विनंती पुढचा चर्चाप्रस्ताव छायाचित्रण/फोटोपूजन म्हणजे मागसलेपणाचे लक्षण आहे का असा टाकू नका... तुमचा पुढचा चर्चाप्रस्ताव नक्कीच छायाचित्रणाबाबत असेल अशी शंका घेण्यास वाव आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धन्यवाद.
धन्यवाद.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
हैयो हैयैयो!
श्री हैयो,
विनाकारण क्रोधीत होता आहात. तुम्ही, चाणक्य वगैरे सभासदांना इतके भडकण्याचे कारण नाही. सभासदांचा तोल गेला की संकेतस्थळाचे स्वास्थ्य बिघडते आणि चर्चा प्रवर्तक ह्या नात्याने मला ते पातक स्विकारावे लागते.
वैयक्तिक पातळीवर गेला नाहीत असा दावा करण्यासाठी तुम्ही खटपत करता आहात पण मला आलेली तुमची ही खरड काय सांगते?
मुद्द्यांना बगल देउन अल-बिरुनी कोण ह्याच्यावर उपचर्चा सुरू करायच्या आणि वर मलाच प्रतिसाद गोळा करण्यासाठी लिहितो म्हणायचे , हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा बरे. (अर्थात त्यामुळे अलबिरूनीबद्दल लोकांना कळाले ही चांगली गोष्ट नाही काय़??) प्रतिसादांच्या संख्येचा उल्लेख करण्यामागचा हेतू कळला नाही. तुमच्या न्यायशास्त्राच्या चर्चेलाही चांगले प्रतिसाद आले आहेत त्यावरुन तुम्हाला कुणी तिरकस बोललेले मला तरी आवडणार नाही.
असो..
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
वेल्कम् बॅक!
वेल्कम् बॅक!
श्री. वसुलि, नमस्कार,
सर्वप्रथम स्वतःचा रजेचा अर्ज मागे घेतल्याबद्दल अभिनंदन.
आतां वैयक्तिक पातळीवर सार्वजनिकरीत्या विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सार्वजनिक उत्तरे.
चर्चेने हास्यास्पद वळण घेतले तर मला तरी क्रोधित होण्याचे काही कारण नाही. मुळात असल्या फुटकळ चर्चांमध्ये भडकण्यासारखे काहीच नसते हे आपणही (स्वतः अशा चर्चांमध्ये क्रोधायमान होत नसल्यास) मान्य कराल.
चर्चा प्रस्तावकाने 'पातके स्वीकारणे' इत्यादि गोष्टींना भिल्यास सुदृढ चर्चा होणार नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची इच्छा असूनही उत्तरे न दिल्यास (आपणांस ती देता येतील असे गृहित धरून) स्वतः चर्चेचाच तोल जातो. हे चर्चेसाठी चांगले नाही कारण असे झाल्याने स्वतः चर्चेचे स्वास्थ्य बिघडते. कोण्याही चर्चा प्रस्तावकाने कोणतीही चर्चा ही personally घेवू नये. पातके स्वीकारणे क्रमप्राप्तच असल्यास ती गंमत म्हणून स्वीकारली तर त्यांचा परिहार होईल. असो. सभासदांचा तोल गेला असल्यासारखे मला तरी कुठेही वाटत नाही. पक्षी संकेतदळाचे स्वास्थ्य बिघडले असल्याचे मान्य करता येत नाही. आपणास तसे वाटत असल्यास तसे सर्वांसमक्ष निदर्शनास आणून द्यावे.
उपक्रमाच्या धोरणांना अनुसरून वैयक्तिक पातळीवर पडलेला प्रश्न वैयक्तिक पातळीवरच विचारलेला आहे. खरडवहीची सुविधा त्यासाठीच उपलब्ध आहे. आपण मात्र विनाकारण खरडवहीत दरड कोसळल्यासारखे खरडगाणे गात आहात. ;-) असो. वैयक्तिक पातळीवर पडलेला प्रश्न मी स्वतः दक्षतेने चर्चेमध्ये येवू दिलेला नाही. तो तसा माझ्याकडून आल्याचे कुठे वाटत असल्यास दाखवून द्यावे.
अल् बिरूनी चा संदर्भ आपण घेतलेला आहे, त्याची तपासणी होणे इतर उत्तरांपूर्वी आवश्यक होते म्हणून तो तपासला. त्यामुळे त्याच्याबद्दल लोकांना कळाले ही चांगली गोष्ट असेल, आहे ही. परंतु त्यामुळे आपण मांडलेल्या आपल्या मुद्द्यांना प्रामाण्य कसे काय येते हे मला कळले नाही.
'आपण प्रतिसाद गोळा करण्यासाठी लिहिता' असे विधान मी केलेले नाही. येथे क्र. ६ पहा, मी आपल्या लेखनकौशल्याचे अंमळ कौतुक करितो आहे. तोच त्या उल्लेखामागील हेतु आहे. मी आरंभिलेल्या न्यायशास्त्रावरील चर्चेमध्ये मला स्वतःला उद्देशून उलटसुलट प्रतिसाद आले असते, तर मला स्वतःला आपला विचार पद्धतशीरपणे-व्यवस्थितरीत्या मांडता आलेला नाही असेच मी स्वतः समजलो असतो. असो.
येथील अनेक मान्यवर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्ना-मुद्द्यांना आपण स्वतः सोयिस्कररीत्या बागल दिलेली आहे, नाही कां? श्री. आरागार्न ह्यांनी सुचविल्याप्रमाणे चर्चेतील एकाही मुद्याचे आपल्याला समाधानकारक उत्तर देता आलेले नाही ही वस्तुस्थिती स्वीकारावी.
धन्यवाद.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
भडक?
वसुलि, तुम्ही येथे नावाचा उल्लेख केला आहे म्हणून विचारतो. मी भडकलो आहे असे तुम्हाला का वाटले? किंबहुना माझ्या एक प्रतिसादाला दिलेला प्रतिसाद मी वाचण्या आधीच नाहीसा झाला होता. तो काय होता हे सुद्धा मला माहित नाही. मी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर प्रियालीने दिले आहे मुर्तीपुजे संदर्भात. चर्चा करताना अशी उत्तरे अपेक्षीत असतात. पण प्रश्न विचारणे म्हणजे भडकणे असे जर आपले मत असेल तर ते असे व्यक्त करणे मला चुकीचे वाटते. मागच्या एका चर्चेत सुद्धा आपण माझ्यासोबत अशाच वैयक्तिक पातळीवर उतरला होतात. माझ्या अंदाजाने आपण वयाने मोठे आहात असा माझा कयास आहे. ते खरे असेल तर हे वर्तन तुम्हाला शोभत नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.
मूर्तीत देव राहतो व त्याला थंडी वाजू शकते, मूर्ती दूध पिऊ शकते
मूर्तीत देव राहतो व त्याला थंडी वाजू शकते, मूर्ती दूध पिऊ शकते अशा प्रकारच्या भाबड्या समजुती बाळगून मूर्तिपूजन करणे मागासलेपणाचेच लक्षण आहे. पण परंपरेचे निर्वहन करण्यासाठी मूर्तिपूजन करणे मागासलेपणाचे लक्षण अजिबात नाही.
मी वसंत सुधाकर लिमये यांना रजा घेऊ नये अशी विनंती करतो. त्यांच्या आगमनाने ह्या संकेतस्थळावर चांगल्या चर्चा झडत आहेत. संकेतस्थळावर वर्दळ वाढल्याने संकेतस्थळाचे थिल्लरीकरण होते असे मला तरी वाटत नाही. एखाद्या चर्चेला भरघोस प्रतिसाद मिळाले म्हणजे मला तरी फार आनंद होतो. आणि शिस्त लावायला संपादक मंडळ आहेच ना.
(डॉकिन्ज़वादी सांस्कृतिक हिंदू) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
असेच म्हणतो
श्री लिमये यांनी रजा घेऊ नये. या चर्चेत काहीही वावगे नाही. सदस्यांचा तोल सूटत असेल तर तो त्या सदस्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
सहमत
मीदेखील!
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असेच म्हणतो
असेच म्हणतो. वसुलि यांना स्वतःचा तोल जाण्याचे अथवा इतरांचा तोल जाण्यासाठी कारणीभूत ठरण्याचे भय वाटते म्हणुन ते रजा घेण्याचा विचार करतात. परंतु मानवी प्रवृत्ती भावभावनांपासुन अलग होउ शकत नाही. आम्ही विवेकी आहोत याची सुद्धा नशा असते.जरी तोल गेला तरी उपक्रमी स्वतःला ( व इतरांना)सावरु शकतात अशी माझी श्रद्धा आहे.
मुर्ती हा दगड आहे हे मुर्ती पुजकालाही माहित असते. एक बोधकथा आठवते. एक पाखंडी राजा असतो. त्याच्याकडे एक साधु येतो. राजा त्याचे आदरातिथ्य करतो. खंडन मंडन परंपरेतुन परस्परांची वैचारिक कंड शमवण्यासाठी वाद-संवाद होतात. राजा अर्थातच मुर्तीपुजेच्या विरोधात असतो. मुर्तीपुजेला मागसलेला म्हणण्याची एकही संधी सोडत नाही. साधुही देव मुर्तीत नसतो मनात असतो वगैरे वगैरे... सगळे होते. मग साधु राजाची तसबीर मागवतो. तसबीर पायदळी तुडवतो (किंवा थुंकतो) राजा क्रोधीत होतो. मी आपले एवढे आदरातिथ्य केले पण आपण माझा अवमान केलात. साधु म्हणतो तसबीर म्हणजे काही राजा नव्हे मी त्या वस्तुला पायदळी तुडवले राजाला नाही सबब मी अवमान केला नाही.
समजा या ठिकाणी राजा अगदीच पा ऽपाखंडी असता तर त्याला राग आला नसता असे गृहीत धरले तरी त्याऐवजी अन्यकाही त्याला विकपॉईंट असता.
असे आम्ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ..... च्या दुसर्या आवृत्तीच्या मनोगतात या पुर्वी म्हटले आहेच
असे वसुलि म्हणतात. एखाद्याच्या मनात असेही येईल हीच गंमत का? दुसर्या अनेक गंमती जंमती करायला आहेत कि? आणि एखाद्याने मुर्तीपुजक नसणे म्हणजे त्याने दुसर्या टोकाला मुर्तीभंजकच असले पाहिजे असे नाही. स्वतः मुर्तीपुजक नसुन इतरांच्या मुर्तिपुजक भावनेची आदरपुर्वक चिकित्सा करता येते.
पुजन अनुनय हे प्रकार कृतज्ञतेच्या अतिरेकातुन( अतिरेक ही गोष्ट सापेक्ष) येतात. काही लोक नेते असतात काही लोक बंडखोर असतात व बहुसंख्य लोक नेत्यांनी दाखवलेल्या दिशेने जातात. ही समुह मानसिकता आहे
मुर्तिपुजेत प्रत्येकवेळी पुज्य भाव असतोच असे नाही केवळ अनुकरणातुन (पक्षी समुह मानसिकतेतुन )आलेले कर्मकांड आहे असे देखील असु शकते.
मुर्तिपुजन म्हणजे केवळ मागासलेपणा व अमुर्तकुजन म्हणजे पुढारलेले पणा असे कृष्णधवल द्वैत मानणे ही देखील एक प्रकृतीच आहे
प्रकाश घाटपांडे
रॅगिंग
वसुलि यांनी जाऊ नये असे म्हणतो. कॉलेजमध्ये रॅगिंग होते तसेच समजावे. काही काळानंतर थांबेल.
विनायक
सहमत
वस्तुतः मालकांनी व्यक्त केलेल्या चिंतेचा आदर करून जर श्री. वसंत सुधाकर लिमये यांनी रजा घेतली असेल, तर तो मालक आणि श्री. लिमये यांच्यातील मामला आहे, त्यामुळे आपल्या, माझ्या किंवा इतर कोणाच्या विनंतीचा खरे तर यात संबंध किंवा प्रश्न येऊ नये. परंतु 'प्रत्येकास एकएक (तरी) मत असते' या न्यायाने (आपल्या आणि माझ्यासकट) आपणा सर्वांना आपापले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच, आणि त्याचा अर्थातच आदर आहे.
अधिक विचाराअंती, आपल्याशी मी सहमत आहे. किंबहुना, तूर्तास आपापल्या मतास हवा दाखवण्याचा हंगाम आहेच, तर त्या निमित्ताने श्री. वसंत सुधाकर लिमये यांची संपादनमंडळावर नियुक्ती केल्यास बहार* यावी, सबब अशी नियुक्ती (झालेली नसल्यास) त्वरित करण्यात यावी अशी शिफारस मी करू इच्छितो. (*'वसंत'रावांच्या आगमनाने 'बहार' येणे हे तसेही क्रमप्राप्तच आहे.)
वसंतरावांच्या आभारप्रदर्शनात्मक प्रतिसादातील अपील, तसेच इतरत्र त्यांनी केलेली "प्लीज स्पेअर उपक्रम!!" अशी (आणि "प्लीज स्पेअर उपक्रम ऑर मी" अशी) कळकळीची विनंती, या सर्वांमधून त्यांच्या उपक्रमाबद्दलच्या अतीव आस्थेबरोबरच ती जबाबदारी पेलण्याची त्यांची क्षमता आणि तळमळ दिसून येते. संपादनमंडळावरील नियुक्तीसाठी याहून लायक उमेदवार त्रिभुवनात शोधून सापडणार नाही. सबब संबंधितांनी कृपया तेवढे मनावर घ्यावेच!
पूर्णपणे सहमत आहे.
अवांतर: यावरून आठवले. श्री. अडॉल्फ हिटलर यांनी लादलेल्या जागतिक महायुद्धापायी खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे ब्रिटिशांना साम्राज्य सांभाळणे कठीण होऊ लागले. तसेच श्री. हिटलर यांनी केलेल्या ज्यूंच्या 'समस्ये'च्या 'अंतिम निराकरणा'मुळे त्यापूर्वी दशकानुदशके भिजत पडलेल्या ज्यूंसाठीच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला अचानक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला. श्री. हिटलर यांच्या आगमनामुळे अशा प्रकारे भारताचे स्वातंत्र्य आणि इस्राएलची स्थापना या दोन्ही (किमानपक्षी त्यात्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातून) चांगल्या घटना त्वरित शक्य झाल्या. सबब दोन्ही राष्ट्रांनी कृतज्ञतेपोटी श्री. हिटलर यांना आपापला राष्ट्रपिता घोषित करून त्यांच्या स्मरणार्थ किमानपक्षी पोष्टाचे एखादे तिकीट काढावे, अशी अपेक्षा करणे कितपत सयुक्तिक आहे, यावर तूर्तास विचार करीत आहे.
खुलासा: यातून श्री. हिटलर यांचे अथवा त्यांच्या कोणत्याही कृत्याचे अथवा तत्त्वज्ञानाचे समर्थन करण्याचा हेतू नाही. श्री. वसंत सुधाकर लिमये यांची श्री. हिटलर यांचेशी तुलना करण्याचाही उद्देश नाही. केवळ आपल्या उपरोल्लेखित 'मी वसंत सुधाकर लिमये यांना रजा घेऊ नये अशी विनंती करतो. त्यांच्या आगमनाने ह्या संकेतस्थळावर चांगल्या चर्चा झडत आहेत. ' या वाक्यद्वयात आपल्याला अपेक्षित असावा असे मला वाटलेला कार्यकारणभाव तर्कसुसंगत आहे किंवा नाही याबाबत माझ्या मनात उपस्थित झालेली शंका याद्वारे प्रकट करण्याचा हा प्रयत्न आहे. (बाकी अंतिम निर्णय हा अगोदर म्हटल्याप्रमाणे श्री. लिमये आणि मालक यांच्यातील वैयक्तिक मामला असल्याकारणाने मला अर्थातच त्यात स्वारस्य नाही.)
(धर्मनिरपेक्ष कुलपरंपरागतनाममात्र-किंचित्सांस्कृतिक हिंदू आणि स्व-वादी संघविरोधी हिटलरनथुरामादिविरोधी लेबलमात्र-परंतु-लेबलसिद्ध ब्राह्मण) पर्स्पेक्टिव.
"वाचनाचं जाऊ दे एक वेळ, पण पगारवाढीबद्दल साह्यबाजवळ बोललंच पाहिजे एकदा!"
सहमत
(*'वसंत'रावांच्या आगमनाने 'बहार' येणे हे तसेही क्रमप्राप्तच आहे.)
सहमत आहे. डाव्या हाताला आलेल्या सदस्यांमध्ये वसंतरावांचे नाव दिसले की आम्ही आनंदाने हे गाणे म्हणायला लागतो.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
पतझ़ड सावन वसंत बहार
'वसंत'रावांच्या आगमनाने 'बहार' येणे हे तसेही क्रमप्राप्तच आहे.
वरील गाणे नक्की कोणते आहे हे हॉपिसात युट्यूब ब्लाक असल्याने समजले नाही. पण 'पतझ़ड सावन वसंत बहार, एक बरस के मौसम चार, पाचवा मौसम प्यार का इंतजार का' या गाण्याचा संदर्भ घेतल्यास वसंत आणि बहार हे स्वतंत्र असून वसंताच्या आगमनाने बहार येणे क्रमप्राप्त आहे किंवा कसे याबाबत मनात शंका उत्पन्न होण्यास वाव आहे असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
:)
गाणे आप आए बहार आई हे आहे. :)
याचा अर्थ वसंतरावांच्या आगमनाने उपक्रमावर बहार येते असा घ्यावा. गाण्यात वसंत ऋतूबद्दल काही नाही.
बहार (स्पष्टीकरण)
शब्दार्थ
रजा घेण्याची गरज काय?
चर्चाप्रस्तावकाने खोडसाळपणे चर्चा सुरु केली असे बहुधा काहीजणांचे मत येथे असू शकते आणि त्यात तथ्य आहे असे एखाद्याला वाटणेही शक्य आहे परंतु त्या चर्चांमध्ये भाग घेऊन तोल जाईपर्यंत "तिरके तिरके" होणे याला वसुलि जबाबदार आहेत असे वाटत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या जबाबदारीने प्रतिसाद लिहितो आणि आपली मते व्यक्त करतो.
अनावश्यक प्रतिसाद, विषयांतरीत प्रतिसाद, व्यक्तिगत टिका वगैरे काढण्यास उपक्रमपंत जबाबदार आहेतच.
या चर्चांमुळे कोण किती पाण्यात आहे ते तरी दिसून येते. या आधीही असे चर्चा प्रस्तावक आहेत जे चर्चा टाकून, आपला दृष्टीकोण मांडून नंतर चर्चेत भाग घेत नाहीत. याचे खुलासेही त्यांनी केले आहेत की "आपला दृष्टीकोण आम्ही मांडला आहे, इतरांनी आपापल्या दृष्टीकोणावर चर्चा करावी." त्यामुळे जर कोणी आपले मत मांडा, चर्चा टाकून पळून जाता काय?, पलायनवादी वगैरे वगैरे असे लिहित असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येईल.
परंतु, मुद्दाम इतर संकेतस्थळांवरून विषय उचलून इथे मांडले जात असतील तर अनेकांना ते गैर वाटणे स्वाभाविक आहे.
मूळ लेखात वसुलि लिहितात,
मी व्यक्तिशः त्यांना मागास म्हणणार नाही पण वेळेचा अपव्यय करणारे आहेत असे म्हणेन. अर्थात, हे माझे मत झाले. काही लोकांना तो वेळेचा अपव्यय वाटणार नाही आणि असा वेळेचा अपव्यय करणारे अनेक असतात. आपला वेळ त्यांनी कसा लावावा, उदाहरणार्थ, हापिसातला पगार चापून त्यावेळात पानभर प्रतिसाद लिहून वगैरे हा त्यांचा प्रश्न झाला.
चर्चा
खरे आहे, उत्तर देण्याचे बंधन चर्चाप्रस्तावकावर नाही. इथे चर्चा कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घ्यायला हवे.
समजा मी ’विवेक मुश्रन हा उत्कृष्ट अभिनेता आहे असे माझे मत आहे’ असा चर्चाविषय दिला तर असे मला का वाटते हे सांगितल्याशिवाय चर्चा योग्य दिशेने पुढे सरकणार नाही. अर्थातच यावर माझी चर्चा करायची इच्छा असेल तर मी असे माझे मत का आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीन. याउलट समजा मी ’इथिओपियात अर्वाचीन मानवाचे अवशेष सापडले’ ह्या बातमीवर चर्चाप्रस्ताव टाकला तर त्यावर मी काहीही मत न देताही चर्चा सुरळीतपणे सुरू राहू शकते.
चर्चाप्रस्ताव टाकण्याचा हेतू आपल्या मताखेरीज आणखी वेगळी मते वाचायला मिळावीत, वेगळे दृष्टीकोन समोर यावेत असा असायला हवा. मराठी सायटींवर तो बहुतेक वेळा तसा नसतो. (अर्थातच अपवाद आहेत, किंबहुना त्या अपवादांमुळेच इथे यावेसे वाटते.) मागच्या चर्चेत एखाद्याने आपला मुद्दा खोडून काढला तर त्याला व्यक्तिगत संघर्षाचे स्वरूप देण्यात येते. चर्चा कशावर आहे यापेक्षा चर्चा कोण करतो आहे यावर सर्व अवलंबून असते. म्हणूनच काही डिप्लोम्याटिक मंडळी सहसा कुणाच्याही विरोधात न जाता गुण्यागोविंदाने वास्तव्य करतात. याखेरीज चर्चा टाकण्याचे हेतू म्हणजे उगीचच विवादास्पद चर्चा टाकून गंमत बघत बसणे, जुने स्कोअर सेटल करणे, एखाद्यावर सरळ टीका करता येत नसेल तर त्याच्या दैवतांना झोडपणे इत्यादी.
या चर्चाप्रस्तावात वसुलिंनी रजा घेण्याइतपत काही झाले होते असे मला व्यक्तिश: वाटत नाही. पूर्वीचा (व्हर्चुअल) रक्तरंजित इतिहास बघता हे दिवाळीचे फटाकेही नाहीत. तरीही त्यांना रजा घ्यावीशी वाटत असेल तर त्यांची मर्जी.
वेळ घालवण्याबाबत १००% सहमत आहे. म्हणूनच चर्चांमधून भाग घेण्याचे बंद केले होते पण बहुधा अजून सवय गेलेली नाही. भविष्यात आणखी जागरूक रहायला हवे.
हे इतकेही टंकायची गरज नव्हती पण नाही टंकले तर डोक्यात रहाते त्यापेक्षा इथे बरे.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
डिप्लोम्याटिक मंडळी
कोणी आहेत का? श्री लिमये यांचा पुर्वेतिहास पाहूनच काही सदस्य त्यांच्यावर टिका करतांना दिसतात. एक सन्माननीय सदस्य तर श्री लिमये यांच्यात उत्तर देण्याची क्षमता नाही असे सांगतात. जुणे स्कोअर सेटल करणारे हिंदू धर्माच्या चर्चेत इतर धर्मीयांवर गोळ्या मारतात. येथे श्री पर्स्पेक्टिव यांचे कौतुक करावेसे वाटते. त्यांच्याबरोबर झालेल्या माझ्या चर्चेत त्यांनी कुठलीही व्यक्तिगत टिका न करता मते मांडली.
गंमत बघणारे लोकच डिप्लोम्याटिक मंडळी आहेत का? त्यांच्या अशा वागण्याचे कौतुक वाटते. आजुबाजुला अन्याय होत असतांना मूग गिळून बसणारे लोक प्रत्यक्ष जगातही आहेत. ह्या डिप्लोम्याटिक मंडळीत त्यांचेच प्रतिबिंब दिसते.
(या संकेतस्थळावर नवीन आहे. इकडचा इतिहास माहीत नाही पण या चर्चाप्रस्तावर काही अभ्यासू मतेही वाचण्यास मिळाली. ज्याला जे हवे ते त्याने घ्यावे. जजमेंट पास करू नये.)
मत
एखाद्याने त्याचे मत व्यक्त केल्यास त्याचे मत कसे चुकीचे / बरोबर आहे हे पटवून देणे ही आपली उपक्रमाच्या सदस्यत्वातून आलेली प्राथमिक जबाबदारी आहे असे नव्हे. आपले 'मत' मांडावे (त्याचे शक्य तितके समर्थन करावे हवे तर).
त्याला चर्चाप्रस्तावात काही गैर दिसले नाही. चर्चाप्रस्तावकावर मात्र प्रतिसादकर्त्यांचा रोष असावा असे वाटले. त्यामुळे त्याला 'हवे-हवे'से वाटणारे मूर्तीपूजेचे समर्थन मात्र दिसले नाही.
बाकी ’विवेक मुश्रन हा उत्कृष्ट अभिनेता आहे असे माझे मत आहे’ यातच चर्चा संपली ;)
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
डिप्लोमसी
१००% सहमत. मलाही चर्चा प्रस्तावात फारसे काही गैर दिसले नाही. मागास या शब्दाऐवजी वसुलि दुसरा बरा शब्द योजू शकले असते असे मात्र वाटले. जसे की,वेळेचा अपव्यय, अंधश्रद्धा, पैशांचा अपव्यय वगैरे.
अनेक गैर प्रतिसाद या चर्चेत आलेले आणि उडवलेले मात्र दिसले आणि ते आपले होते का (आपल्या अनेक आयडींसह) हे प्रत्येकाने तपासून पाहावे म्हणजे चूक कोण आणि बरोबर कोण याची शहानिशा ज्याची त्याला करता यावी.
बाकी प्रश्न राहिला डिप्लोमसीचा तर मराठी संकेतस्थळावर "मी शहाणा आणि दुसरा अतिशहाणा" असे म्हटले जाते त्याप्रमाणेच "मी साळसूद आणि इतर डिप्लोम्याटिक" असे म्हणण्याचीही फ्याशन आहे.
गैर
या चर्चाप्रस्तावात गैर काहीच नव्हते. ती लेखकाची मते होती. चर्चाप्रस्तावकावरही रोष असण्याचे कारण नाही.
मुद्दा असा की माझे असे मत आहे असे म्हणल्यानंतर प्रतिसादकर्त्यांनी असे का बुवा असे विचारणे साहजिक आहे. असो. परत तेच मुद्दे मांडत नाही. बाकी श्री हैयो हैयैय्यो यांच्या प्रतिसादात आले आहेच.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
प्रतिवाद
सहमत आहे. प्रतिस्पर्ध्यास 'इट ऑल स्टार्टेड व्हेन ही हिट मी बॅक' म्हणण्याची संधी देण्याची काहीही आवश्यकता नसते.
'चर्चा प्रेडिक्टेबल आहे' (इन्क्लूडिंग द एक्स्पेक्टेड काउंटरआर्ग्युमेंट्स) याहून अधिक किंवा वेगळे मत नाही. ते मांडले. तूर्तास ते प्रकाशित अवस्थेत उपलब्ध नाही. त्याची गरजही नाही.
चर्चाप्रस्तावाचे शीर्षक आणि शेवटचे दोन प्रश्न वगळता चर्चाप्रस्तावात काहीही गैर नाही. किंबहुना तेवढा भाग सोडल्यास त्यात चर्चा करण्यासारखेही विशेष काही नाही. 'का नाही?' छापाच्या सोप्या प्रतिप्रश्नांतून आणि 'मला वाटते म्हणून' / 'वैयक्तिक निवड' छापाच्या सोप्या प्रत्युत्तरांतून या सर्व मुद्द्यांना निकालात काढता यावे.
चर्चाप्रस्तावाच्या शीर्षकातून आणि शेवटच्या दोन प्रश्नांतून मात्र चर्चेमागील अंतःस्थ हेतूबद्दल संशय निर्माण होऊ शकतो, आणि प्रस्तावकर्त्या आयडीच्या मर्यादित कारकीर्दीतील पॅटर्न्स पाहता तो बळावू शकतो. आणि त्यातून आक्षेप येणे अनाकलनीय नाही.
मूर्तिपूजा हा वैयक्तिक पसंतीचा मुद्दा असल्याकारणाने (आणि भारतीय कायद्यानुसार गुन्हा किंवा हिंदू धार्मिक चालीरीती किंवा नियमांस अनुसरून निषिद्ध नसल्याकारणाने) अशा समर्थनाची आवश्यकता आहे असे वाटत नाही.
'जगात इतक्या प्रकारचे (तुझ्या वैयक्तिक आहारनिर्बंधांच्या विरुद्ध न जाणारे असेसुद्धा) विविध खाण्यालायक पदार्थ उपलब्ध असताना तू रोज जेवताना पोळीभाजी/वरणभात/सांबारभात/भाकरी-मटणाचा रस्सा/माशाची करी-भात/मीटलोफ-मॅश्ड पोटेटो/जो-काही-तुझा-रोजचा-आहार-असेल-तो (सर्व स्टीरियोटिपिकल उदाहरणे केवळ चटकन उदाहरणाच्या सोयीसाठी) हेच ठराविक पदार्थ का खातोस?' या प्रकारच्या प्रश्नाहून वेगळे असे खरे तर वरील चर्चाप्रस्तावात (तेवढे दोनतीन मुद्दे वगळता) काही आहे असे वाटत नाही. आणि त्याकरिता 'मला वाटते म्हणून/मला सवय आहे म्हणून/नन ऑफ एनीबडीज़ बिज़नेस' याहून वेगळी उत्तरे आवश्यक (किंवा शक्य) आहेत असेही वाटत नाही.
'जगात वैयक्तिक आहारनिर्बंधांचे उल्लंघन न करतासुद्धा खाण्यालायक इतके पदार्थ असताना रोजरोज तेचतेच ठराविक पदार्थ खाणारे मागास आहेत का?' हे मात्र पूर्णपणे वेगळे प्रपोजि़शन आहे. असो.
जायचे तर खुशाल जा
उपक्रमावर आपल्याला कोणी आमंत्रण देऊन बोलावले होते असे वाटत नाही, आपण आल्याची वर्दीही दिली नव्हती तर मग उपक्रम सोडून जाण्याची दवंडी का? लोक येथे स्वखुशीने येतात, स्वखुशीने लिहितात आणि त्यांनी स्वखुशीने राहावे किंवा जावे.
(या़ज्ञवल्क्य) विनायक
आभारी आहे!
माझ्या समर्थनार्थ आणि विशेषकरून विरोधात लिहिणार्या सर्वांचे अनेक आभार. रजा संपवून उपक्रमावर नेहमीप्रमाणे रुजू होतो आहे.
मात्र सर्वांना एकच कळकळीची विनंती. प्रतिसाद देताना कृपया उपक्रमाच्या मर्यादेस सांभाळून प्रतिसाद द्यावेत.
असे प्रतिसाद काढून टाकण्यास संपादक असले तरी मूळात असले प्रतिसाद येऊच न देणे ही आपली सर्वांची जवाबदारी आहे.
धन्यवाद!
वसुलि
वसंत सुधाकर लिमये