हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात?

नथूराम आणि हिटलर ह्या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल हिंदुत्ववाद्यांना नेहमीच कमालीचे आकर्षण राहिलेले आहे.

काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:

"नथुरामा, आधुनिक भारताचा दधिचि आहेस. तू अस्थि मागे ठेवत नाहीयेस, विचार ठेवतोयस..ह्याच विचारांची उद्या शस्त्रं होतील! "

कोणाही विशिष्ट व्यक्तीच्या नावे वरील वाक्याचा योग्य संदर्भ देता न आल्याने त्यासोबत असणारी टिप्पणी संपादित केली आहे. योग्य संदर्भ मिळाल्यास प्रतिसादांतून त्यावर चर्चा करावी. - संपादन मंडळ.

  1. हिटलर हा एक अत्यंत उच्च नेता होता, त्याचे नेत्रुत्वगुण, चिकाटी, राष्ट्रभक्ती हि फक्त असामान्य होती.
  2. त्याने ज्यु लोकांच्या कत्तली केल्या ही त्यांच्या आयुष्यातील एक काळी गोष्ट ठरु शकेल, पण म्हणुन ती एक गोष्ट हा नेता विकृत विचारांचा वगैरे होता असे म्हणायला अयोग्य ठरेल.
  3. डॉ. आंबेडकरांनी फाळणीनंतर इकडचे सर्व मुसलमान ति़कडे पाठवा व पाकीस्तानातल्या सर्व हिंदूना इकडे आणा असा प्रस्ताव ठेवला तेव्हा हेच महात्मा म्हणाले होते " राम के साथ रहीम रहेगा" काय झाल? राम रहायला तयार आहे हो.. पण रहीमच काय? कधी राहीलाय मनान? हाताच्या बोटावर मोजण्याइतके मुस्लीम सोडले तर बाकीच्यांच काय?
  4. नथुराम गोडसे यांनी गांधींचा "वध" केला, खुन नाही
  5. नथुराम गोडसेंना भेटावस वाटतय कारण त्यांना साष्टांग नमस्कार घालायचाय. त्यांच्या मुळेच या देशाच्या पुढील फाळण्या टळल्या.
  6. त्यांनी जे केल ते अतिशय योग्य केल.
  7. "हिटलर" हा द्रष्टा होता, अनेक विकासकामे त्याने हातात घेऊन ती थक्क करणार्‍या गतीत पुर्ण केली होती.

माझ्यामते ही वक्तव्ये जेवढी विनोदी आहेत तितकीच विकृत आणि लांच्छनास्पदही आहेत. पण मला तुमचे मत बघायचे आहे. ह्या विचारांत अजिबात तथ्य नाही हे पटवून देताना तुम्ही कुठले मुद्दे मांडायला हवेत?

Comments

फारच सुबुद्ध

लेखमाला. विचार करायला हवा बुवा ह्या मुद्द्यांवर.
_______________________________________________
भिकार संकेतस्थळावर आम्ही जाण्याचा अथवा न जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही म्हणजेच ते भिकार संकेतस्थळ आणि ते भिकार संकेतस्थळ म्हणजे आम्हीच. त्यात कोणताही द्वैत भाव नाही.

हिंदुत्त्ववादी

हिंदुत्त्ववादी

श्री. वसुलि, नमस्कार.

एखाद्याने 'मी शुद्ध हिंदुत्त्ववादी आहे, आणि मला गोडसे, हिटलर अजिबात आवडत नाहीत' असे सत्यप्रतिपादन केले तर आपले काय म्हणणे आहे?

आधी 'हिंदुत्त्ववादी' ह्या शब्दाची सर्वमान्य व्याख्या करा. ती नाही केली तर हा सणसणाटी खटाटोप व्यर्थ होय असे जाणून असा.

श्री. पर्स्पेक्टिव आणि श्री. धम्मकलाडू,

नमस्कार!

प्रस्तुत वाक्ये ही आपली स्वतःची आहेत असा दावा चर्चाप्रस्तावकाने कोठेही केलेला नाही. किंबहुना 'काही मासलेवाईक वक्तव्ये पाहा:' या वाक्यातून ही इतरत्र प्रसिद्ध झालेल्या इतरांच्या लिखाणाची उद्धृते आहेत हे पुरेसे स्पष्ट होते. या कारणास्तव हे कोणत्याही प्रकारे वाङ्मयचौर्य होऊ शकत नाही. ஃ ही उचलेगिरी नाही. इतरांची वक्तव्ये स्वतःच्या नावावर खपवण्याचा हा प्रकार नाही.

बौद्धिकसंपदाधिकार कायद्यांअनुसार १००% सहमत आहे.

धन्यवाद.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

वरील वाक्य...

वर ठळक केलेले वाक्य हे तात्यारावांचे आहे असा संदर्भ नाहीये. ( अद्याप तरी कुणी तो दिलेला नाही.) खरं तर तो 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नावाच्या नाटकातील एक संवाद आहे . त्यामुळे हे वाक्य खुद्द तात्याराव सावरकरांनी म्हटलंय असं म्हणायला वाव नाही. असं मला वाटते.

...नाही तरी वर चाललेली चर्चा सावरकरांवर नाहीये. संपादकांनी कृपया तात्यारावांच्या तोंडी दिलेलं हे चुकीचं वाक्य बदलावं अशी मी विनंती करतो.

- नीलकांत

वाक्य बदलू नये

माझ्या मते हे वाक्य काढू नये. हिंदुत्ववादाचा अतिरेक झालेल्या लोकांचे विचार कसे असतात ते सर्वांना कळावे म्हणून हे वाक्य इथे राहिलेच पाहिजे. फक्त 'तात्यारावांनी हे वाक्य म्हंटले आहे' ह्याठीकाणी हा डिस्क्लेमर घालावा: 'हे वाक्य एका संकेतस्थळावर तात्यारावांच्या नावावर आले होते'. तसेही तात्यारावांच्या मनात याहून वेगळे असेल असे मला वाटत नाही.

असो. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकातील हा संवाद असेल, तर तो कोणत्या पात्राच्या तोंडी आहे तेही कळवा. म्हणजे तशी दुरुस्ती करायला बरे पडेल.

तात्यांनी असे म्हंटले असेल किंवा नसेल पण लोकांच्यात काय काय समज आहेत ते कळले पाहिजे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अनैतिक

हिंदुत्ववादाचा अतिरेक झालेल्या लोकांचे विचार कसे असतात ते सर्वांना कळावे म्हणून हे वाक्य इथे राहिलेच पाहिजे.

ज्या वाक्यास पुस्तकी संदर्भ नाही ते वाक्य केवळ स्वतःचा हिंदूत्वावरचा द्वेष दाखवण्यासाठी ठेवणे, मूळ प्रतिसादास उत्तर न देणे आणि प्रतिसाद देणार्‍यास "दुतोंडी" म्हणजे वैयक्तिक वास्तवीक एक शिवी वापरणे, यातून ही केवळ वैचारीक दिवाळखोरी आहे की काय असे वाटते. वास्तवीक उपक्रमाच्या नियमांमधे वैयक्तिक चुकीचे शब्द लिहीलेले पण बसत नाहीत. तरी देखील अजून मी जिवंत आहे आणि टिकेस उत्तर देण्यास समर्थ आहे म्हणून त्याबद्दल काही वाटत नाही. पण कुठल्याही ऐतिहासीक व्यक्तीच्या मग त्या व्यक्तीचे विचार पटोत अथवा न पटोत, संदर्भ नसताना तसे घालणे हे सभ्यतेच्या नियमात बसते असे वाटत नाही.

बरं, "एका संकेतस्थळावरून..." असे मोघम लिहीणे यातून काहीच साध्य होत नाही, कारण एक तर त्यात त्या संकेतस्थळाचा संदर्भ नाही आहे आणि दुसरे म्हणजे अगदी संकेतस्थळाच्या नावाने संदर्भ दिला तरी त्यातून ते वाक्य चुकीचे असल्याने काढले गेले आहे. गुगलमधे शोध घेता हे वाक्य फक्त उपक्रमावर आहे असे दिसते.

थोडक्यात, अशा वेळेस त्या संकेतस्थळाच्या नावाने येथे ते ठेवणे म्हणजे त्या संकेतस्थळाची मानहानी/बदनामी आहे जी ते आवडले नाही म्हणून टिका करण्यापेक्षा वेगळी आहे. दोन्ही संकेतस्थळांवरील एकमेकांवरील टिका, चिडवाचिडवी इत्यादी कितीही कोणी करोत, तरी देखील असलेले मैत्रिपूर्ण संबंध लक्षात घेता असे खोटे संदर्भ देत कुणीच कुणाची बदनामी करू नये असे वाटते.

म्हणून संपादकांना विनंती कराविशी वाटत आहे की हे वाक्य येथून काढून टाकावे.

धन्यवाद

'हिंदुत्त्ववादी' हा शब्दच काढा.

'हिंदुत्त्ववादी' हा शब्दच काढा.

माझ्या मते हे वाक्य काढू नये. हिंदुत्ववादाचा अतिरेक झालेल्या लोकांचे विचार कसे असतात ते सर्वांना कळावे म्हणून हे वाक्य इथे राहिलेच पाहिजे.

श्री. वसुलि, नमस्कार.

माझ्या मते आपण 'हिंदुत्त्ववादी' हा शब्दच काढा. कारण माझ्या पूर्वीच्या प्रश्नाला आपणांस आत्तपर्यंत उत्तर देता आलेले नाही. आपले लेखनधोरण पाहता येथून पुढे आपण उत्तर द्याल अशी खात्री बाळगता येत नाही. तरीही उत्तर देणार असाल, तर पूर्वीचा प्रश्न पुनः एकदा - एखाद्याने 'मी शुद्ध हिंदुत्त्ववादी आहे, आणि मला गोडसे, हिटलर अजिबात आवडत नाहीत' असे सत्यप्रतिपादन केले तर आपले काय म्हणणे आहे?

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

असहमत

श्री हैयो, नमस्कार!

समस्त हिंदूत्ववाद्यांना हिटलर आणि नथूराम जवळचे वाटतात असे वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या निरिक्षणातील बहुतांश हिंदूत्ववादी लोकांना हिटलर आणि नथूराम वगैरे मंडळी जवळची वाटतात असे मी पाहिले आहे. त्यामूळे काही हिंदूत्ववाद्यांना ते जवळचे वाटत नसतील म्हणून तो शब्दच काढून टाकणे हे मला मान्य नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

आपण शब्दाची व्याख्या करणे का टाळता आहात?

आपण शब्दाची व्याख्या करणे का टाळता आहात?

समस्त हिंदूत्ववाद्यांना हिटलर आणि नथूराम जवळचे वाटतात असे वक्तव्य मी केलेले नाही.

आपण काय वक्तव्य करता हा प्रश्न नाही. जे वक्तव्य करता त्याबाबतीत काही प्रश्न उठविले गेल्यास त्यांची उत्तरे देणे आपले उत्तरदायित्त्व आहे. ज्या शब्दावर आपल्या विधानाचा सारा डोलारा उभा आहे, त्या शब्दाची मूळ व्याख्या करणे आपण का टाळता आहात? असे केल्याने आपण इतर कितीही आणि काहीही विधाने केलीत तरी त्यांचे मूल्य शून्य होते.

माझ्या निरिक्षणातील बहुतांश हिंदूत्ववादी लोकांना हिटलर आणि नथूराम वगैरे मंडळी जवळची वाटतात असे मी पाहिले आहे.

जोपर्यंत 'हिन्दुत्त्ववादी' शब्दाची व्याख्या होत नाही तोपर्यंत आपल्या विधानातील 'बहुतांश' ह्या शब्दांस काहीही अर्थ नाही.

त्यामूळे काही हिंदूत्ववाद्यांना ते जवळचे वाटत नसतील म्हणून तो शब्दच काढून टाकणे हे मला मान्य नाही.

मूळ विधानातील 'बहुतांश' ह्या शब्दांस आधी लिहिल्याप्रमाणे काहीही अर्थ उरत नसल्यामुळे ह्या पुढील विधानातील 'काही' ह्या शब्दाचादेखील अर्थ संपुष्टात येतो.

तथापि आपली ही विधाने अशी अस्ताव्यस्त होत असलेकारणे त्यासंबंधी काहीएक विचार करणेही शक्य होत नाही. आपल्या विचारांवर आपले भोळेभाबडे प्रेम असल्याकारणाने आपणास एक शब्द मागे घेणे कदाचित मान्य होणार नाही, परंतु पूर्वी सांगितलेप्रमाणे जोवर व्याख्या होत नाही तोवर तो शब्द मागे घेणे हेच योग्य होय.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

व्याख्या

हे पाहा श्री.हैयो मी काही स्वतःला हिंदुत्ववादी समजत नाही. तेव्हा जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवुन घेतात त्यांनीच ह्या शब्दाची व्याख्या करावी. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजता, तेव्हा तुम्हीच हे व्याख्या देण्याचे कष्ट घ्या.

माझ्या मते जो स्वतःल हिंदुत्ववादी म्हणवुन घेतो तो हिंदुत्ववादी.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

पलायनवादी

हे पाहा श्री.हैयो मी काही स्वतःला हिंदुत्ववादी समजत नाही. तेव्हा जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवुन घेतात त्यांनीच ह्या शब्दाची व्याख्या करावी. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजता, तेव्हा तुम्हीच हे व्याख्या देण्याचे कष्ट घ्या.

कुठले तरी कॉपी करून चर्चा करायला लावणे सोपे असते पण विचाराने त्याला उत्तर देता आले नाही के जे असतात त्यांना पलायनवादी म्हणतात.

पलायनवाद?

ही चर्चा, 'हिंदुत्वाची व्याख्या काय?' ह्यावर नाही. आणि मी स्वतः हिंदुत्ववादी मानत नसल्याने व्याख्या वगरे करायच्या भानगडीत मला पडायचे नाही. ह्यात कसला आलाय पलायनवाद?
चर्चा ज्या विषयावर सुरू आहे त्यावर प्रतिसाद द्या. उत्तर देण्याचा जरुर प्रयत्न करू. पण उगीचच हिंदू म्हणजे कोण आणि मुसलमान म्हणजे कोण? असले फाटे ह्या चर्चेत फोडले गेल्यास उत्तर देण्यास मी जवाबदार नाही. त्यावर तुम्हास मला पलायनवादी म्हणून स्वतःची समजूत काढायची असेल तर माझी हरकत नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

व्याख्या

आपण काय वक्तव्य करता हा प्रश्न नाही. जे वक्तव्य करता त्याबाबतीत काही प्रश्न उठविले गेल्यास त्यांची उत्तरे देणे आपले उत्तरदायित्त्व आहे. ज्या शब्दावर आपल्या विधानाचा सारा डोलारा उभा आहे, त्या शब्दाची मूळ व्याख्या करणे आपण का टाळता आहात? असे केल्याने आपण इतर कितीही आणि काहीही विधाने केलीत तरी त्यांचे मूल्य शून्य होते.

हैयो हैयैयो, वरील वाक्यांतील पुढील संज्ञांच्या व्याख्या आपण करू शकाल काय?: उत्तरदायित्त्व, मूळ, व्याख्या, मूल्य.

हे विचारण्याचे कारण म्हणजे बर्‍याचदा आपल्याला अपेक्षित असलेल्या व्याख्या सामान्यपणे मान्य असलेल्या व्याख्यांपेक्षा निराळ्या असतात.

समज.

समज.

श्री. वसुलि, नमस्कार.

हे पाहा श्री.हैयो मी काही स्वतःला हिंदुत्ववादी समजत नाही.

आपण तसे समजत असाल असे आपल्या लेखनावरून माझाही समज झालेला नाही, तेंव्हा हा अनाठायी खुलासा व्यर्थ आहे.

जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवुन घेतात त्यांनीच ह्या शब्दाची व्याख्या करावी.

दुसर्‍यांनी केलेल्या व्याख्येवर आपण आपली चर्चा बेतणार आहात काय? अशा अस्ताव्यस्त धोरणांमुळे ह्या चर्चेचे एकूण महत्त्व फोल असल्याचे दिसतेच आहे. मुदलांत ज्या शब्दावर आपल्या विधानाचा सारा डोलारा उभा आहे, त्या शब्दाची मूळ व्याख्या करणे आपण टाळता आहात, आणि तसे करतांना इतरांनी आपणांस पलायनवादी म्हटले तर आक्षेप घेता आहात. ह्यास शुद्ध दुतोंडी धोरण म्हणावे काय?

तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी समजता, तेव्हा तुम्हीच हे व्याख्या देण्याचे कष्ट घ्या.

मी स्वतःस हिन्दुत्त्ववादी समजतो असा आपला समज नेमका काय कारणाने होतो आहे हे कारण मला कळू शकेल काय? जेथे मला मुळात हिन्दुत्त्ववादी म्हणजे काय हेच माहिती नाही, तेथे मी स्वतःस हिन्दुत्त्ववादी असल्याचे कोठे म्हटले असेल असे आपणास कसेकाय वाटते आहे ते सप्रमाण दाखवून द्यावे. तसे करतांना आपल्याला हिन्दुत्त्ववादी ह्या शब्दाची व्याख्या सुचलीच तर तीही कळवावी, म्हणजे चर्चा पुढे चालविता येईल.

श्री. कर्क, नमस्कार,

हैयो हैयैयो, वरील वाक्यांतील पुढील संज्ञांच्या व्याख्या आपण करू शकाल काय?: उत्तरदायित्त्व, मूळ, व्याख्या, मूल्य. हे विचारण्याचे कारण म्हणजे बर्‍याचदा आपल्याला अपेक्षित असलेल्या व्याख्या सामान्यपणे मान्य असलेल्या व्याख्यांपेक्षा निराळ्या असतात.

मला अपेक्षित असलेल्या व्याख्या सामान्यपणे मान्य असलेल्या व्याख्यांपेक्षा निराळ्या असतात (आपल्यांच शब्दांत) असा आपला समज का होतो आहे ते सांगावे. आपण व्यक्तिगतरीत्या विचार करीत आहात असा माझा समज मी करून घेऊ काय? मी दिलेल्या व्याख्यांमुळे मूळ चर्चेतील कोणत्या मुद्दयांमध्ये अंतर पडणार आहे ते सोदाहरण सांगावे, म्हणजे व्याख्या द्यावयाच्या किंवा नाही किंवा कसे ह्याबाबत मला विचार करता येईल.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

पुन्हा तेच.

श्री हैयो,

पुन्हा तेच. जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात त्यांना मी हिंदूत्ववादी म्हणतो असे स्पष्ट लिहिलेले तुम्हाला दिसले नाही का? आता ते त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या कशी करतात हे मला काय माहित?

तुम्हाला कळेल असे उदाहरण देतो.
मी स्वतः काही वकिल नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या परिक्षा पास झाल्या म्हणजे एखादी व्यक्ती वकिल म्हणवून घेण्यास पात्र ठरते ह्याची मला कल्पना नाही. पण माझ्या ओळखीत काही वकिल आहेत आणि बर्‍याचदा ते काळे कोट घालतात असे माझे निरिक्षण आहे. आता हे निरिक्षण मांडायला मला वकिल म्हणून संबोधण्यासाठी नेमके काय काय केले हे माहित असायची काय गरज. तो प्रश्न तुम्ही वकिलालाच विचारावा.

आता समजतंय का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मत, व्याख्या, सर्वमान्यता आणि चर्चा

मत, व्याख्या, सर्वमान्यता आणि चर्चा

श्री. वसुलि, नमस्कार.

जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात त्यांना मी हिंदूत्ववादी म्हणतो असे स्पष्ट लिहिलेले तुम्हाला दिसले नाही का?

दिसले ना. परंतु तेथे आपण ती आपण केलेली व्याख्या आहे असे न म्हणता ते आपले 'मत आहे' असे स्पष्ट केलेले आहे. मी आपणांस सर्वमान्य व्याख्या करण्याचे सुचविले होते, ते ह्यासाठी की चर्चा पुढे सरकविण्यास उपयोगी व्हावे. आपले मत हीच आपली व्याख्या असे ग्राह्य धरण्यात यावे काय ते स्पष्ट करावे. मात्र तसे असल्यास सदर चर्चाप्रकरणांस भवितव्य शून्य आहे हेही जाणून असावे.

आता ते त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या कशी करतात हे मला काय माहित?

इतर कोणी ती व्याख्या कशी करतांत हे येथे अपेक्षित नसून आपण ती कशी करतां हे अभ्यासणे अपेक्षित आहे. ह्याचे कारण असे की 'हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात?' असा प्रश्न आपणांस पडला आहे. ह्या प्रश्नाची उत्तरे अभ्यासण्यापूर्वी हा मूळ प्रश्नच वैध आहे की नाही किंवा कसे हे तपासणे आवश्यक आहे. असो. आपण आपणांस काही माहिती नाही असे आत्ता मान्य करता आहात. सबब, सदर चर्चाप्रकरणाचे भवितव्य शून्य आहे.

बाकी किरकोळ उदाहरणाच्या नादात पडण्याऐवजी सरळ व्याख्या करण्याकडेच वळला असतांत, तर चर्चाप्रकरण पुढे सरकविण्यास बरे झाले असते, असो.

---

श्री. कर्क, नमस्कार,

आपल्याला आपल्याच प्रतिसादातील संज्ञांच्या व्याख्या विचारल्याने तो तसा व्यक्तिगत प्रश्न आहे. यामागे आपला प्रतिसाद व्यवस्थित समजावून घेणे एवढाच हेतू आहे.

धन्यवाद. सांप्रतकाली लोक दुसर्‍याची मते किंवा विचार अभ्यासण्याकरिता प्रश्न विचारत नसून त्यांचा अभ्यास आहे अथवा नाही हे परीक्षिण्याकरिता प्रश्न विचारित असतात. तरी आपल्या प्रश्नामागील हेतु जाणून घेण्याकरिता मी आपणांस तसे विचारले होते. असो. आपला प्रश्न अवश्य रास्त आहे, परंतु त्याची उत्तरे तूर्तास आपणही मान्य केलेप्रमाणे मूळ चर्चेतील मुद्द्यांमध्ये काही अंतर पाडणार नाहीत. म्हणजे, मूळ चर्चेस ती उत्तरे पोषक नाहीत. येणेकरिता हा प्रश्न सध्यापुरता अनुत्तरित ठेवू. श्री. वसुलि सरांकडून चर्चा पुढे चालविली गेलीच, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी ती उत्तरे योग्य रीतिने मांडता येतील.

धन्यवाद.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

स्पष्टीकरण

चिकित्सा या मुद्द्यावर झालेल्या चर्चेने असा माझा समज झाला असावा. (समज होण्यासाठी इतरही लेखन कारणीभूत असू शकेल पण या क्षणी चिकित्सा विषयावरील चर्चाच मला आठवत आहेत. नेमके त्या चर्चेत काय होते ज्याने माझा असा समज झाला हे विचारल्यास त्याचे उत्तर देण्यास मी अनुत्सुक आहे.)

आपण व्यक्तिगतरीत्या विचार करीत आहात असा माझा समज मी करून घेऊ काय?

आपल्याला आपल्याच प्रतिसादातील संज्ञांच्या व्याख्या विचारल्याने तो तसा व्यक्तिगत प्रश्न आहे. (म्हणजे आपण सोडून दुसर्‍या कोणी त्यास उत्तर देणे अपेक्षित नसल्याने.) यामागे आपला प्रतिसाद व्यवस्थित समजावून घेणे एवढाच हेतू आहे. त्यामुळे त्यात समज करावा असे काही नाही.

मी दिलेल्या व्याख्यांमुळे मूळ चर्चेतील कोणत्या मुद्दयांमध्ये अंतर पडणार आहे ते सोदाहरण सांगावे, म्हणजे व्याख्या द्यावयाच्या किंवा नाही किंवा कसे ह्याबाबत मला विचार करता येईल.

मूळ चर्चेत या प्रतिसादाच्या उत्तराने काहीच फरक पडणार नाही. चर्चा करणार्‍या सदस्यांस व्याख्या देऊन चर्चा सुरू करावी असे वाटण्याचा संभव आहे. असा कदाचित सकारात्मक, अप्रात्यक्षिक परिणाम घडू शकतो. (असा परिणाम न घडणे यात काही आश्चर्य नाही. ही केवळ एक लांबची शक्यता आहे.) व्याख्या देणे किंवा न देणे हा आपला व्यक्तिगत निर्णय मला मान्य आहे.

व्याख्या?

हिंदुत्वाच्या व्याख्येच्या भानगडीत पडणे म्हणजे शब्दांचा खेळ. त्यापेक्षा हिंदुत्व च्या व्यावहरिक अर्थाची संकल्पना विचारात घेउन चर्चा केलेली चांगले.
सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व व सनातन प्रभात सारख्यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व वेगळे आहे.
हिंदुत्ववादी असुन् देखील गांधीहत्या व नथुरामचे समर्थन न करणारे असु शकतात. नथुराम ही हिंदु आणि गांधीही हिंदुच. शोषकही हिंदु आणि शोषितही हिंदुच.
आत हिंदु असणे म्हणजे नेमके काय असणे?
प्रकाश घाटपांडे

हाय होप्स

विकासराव

नीलकांताने विनंती करून १६ तास उलटून गेले तरी हे वाक्य अजूनही आहे. माझे प्रतिसाद १५ - २० मिनिटात उडालेले पाहिले आहेत. ब्राह्मणद्वेष हे उपक्रमाचे अधिकृत धोरण असल्याने हे वाक्य खरोखरीच काढले जाईल ही आशा मला अजिबात नाही. बौद्धिक प्रामाणिकपणाकरता उपक्रमाच्या संपादकांची ख्याती कधीच नव्हती.

विनायक

एक विनंती

विनायक राव,

माझे याआधीचे प्रतिसाद लेखन वगैरे वाचले असले तर लक्षात येयला हवे की मला जातीवरून बोलणे नको असते. आवडत ही नाही. मी जात मानत नाही. आणि जर इतर कोणीही माझ्याकडे केवळ जातीच्याच नजरेतून बघू लागले तरी मी त्या वादात पडायचा मोह मला होत नाही. माझी इतरांना अनेकदा करून झाली आहे आणि तुम्हाला देखील येथे करतो, की आपल्याला वाटणारे योग्य असले तरी कितीही जातीच्या चष्म्यातून बघत जाऊ नका.

माझा या चर्चेतील वाद अशा करता आहे की गांधीजींना नावे ठेवणार्‍यांना वगैरे विकृत म्हणणारे स्वत: गांधीजींचे सत्य बोलणे दाखवायला तयार नाहीत तर केवळ हिंदूत्ववादी कसे वाईट हे वाटेल त्या पद्धतीने दाखवण्यासाठी असे खोटे ठेवायचा हट्ट चालू ठेवत आहेत. गांधीजींचा खून एकदाच झाला. गांधीवादाचा खून मात्र त्यांचे तथाकथीत समर्थक दरोज करत असतात. चुकीचा संदर्भ ठेवण्याचा हट्ट हा यातलाच एक प्रकार आहे.

धन्यवाद

असहमत

ब्राह्मणद्वेष हे उपक्रमाचे अधिकृत धोरण असल्याने

या वाक्याशी पूर्णपणे असहमत आहे.

सर्वप्रथम, माझ्या माहितीप्रमाणे उपक्रमाचे घोषित उद्दिष्ट (stated purpose अशा अर्थी) 'माहितीची देवाणघेवाण' हे आहे. 'माहितीची देवाणघेवाण' या संज्ञेची नेमकी आणि अचूक कायदेशीर व्याख्या मला माहीत नाही, परंतु 'ब्राह्मणद्वेष' हा या संज्ञेचा अर्थ होत नसावा, किंवा ब्राह्मणद्वेष हा माहितीच्या देवाणघेवाणीच्या कक्षेत बसू शकत असल्यास तो त्या कक्षेत बसू शकणारा एकमेवाद्वितीय विषय नसावा, असे माझी अल्पमती मला सांगते. तसेही उपक्रमावरील सर्वच (किंवा बहुतांश) मजकूर हा ब्राह्मणद्वेषयुक्त असल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे ब्राह्मणद्वेष हे उपक्रमाचे अधिकृत उद्दिष्ट मानता येणार नाही.

त्यापुढे जाऊन, 'ब्राह्मणद्वेष हे उपक्रमाचे धोरण आहे' असे (नि:संदिग्धपणे किंवा अप्रत्यक्षरीत्या) मांडणारे जाहीर प्रकटन उपक्रमावरील अधिकृत सूत्रांकडून कधीही आले असल्याचे निदान माझ्या तरी पाहण्यात किंवा वाचनात नाही. त्यामुळे 'ब्राह्मणद्वेष हे उपक्रमाचे अधिकृत धोरण आहे' हे विधान सयुक्तिक होऊ शकेल असे वाटत नाही.

अर्थात, दुसर्‍या पक्षी, ब्राह्मणद्वेष हे उपक्रमाचे अघोषित किंवा पडद्यामगचे धोरण असण्याची शक्यता वरील युक्तिवादामुळे आपोआप वगळली जाऊ शकत नाही. त्या शक्यतेचा (गरज भासल्यास) वेगळा विचार करता येणे शक्य आहे. किंवा, तिसर्‍या पक्षी, ब्राह्मणद्वेष हे उपक्रमावरील काही व्यक्तींचे वैयक्तिक धोरण असण्याची शक्यताही या युक्तिवादाच्या आधारे आपोआप नाकारता येत नाही. ही शक्यता, आणि यदाकदाचित ती खरी ठरून अशा व्यक्तींनी उपक्रमाचा ताबा घेतल्यास उपक्रमाची होऊ शकणारी संभाव्य पडझड, हे पूर्णपणे वेगळे विषय होऊ शकतात.

या (दुसर्‍या किंवा तिसर्‍या पक्षीच्या) शक्यता खर्‍या आहेत किंवा नाही याबद्दलही कोणताच निष्कर्ष वरील विवेचनातून अर्थातच निघू शकत नाही. त्या शक्यतांच्या सत्यासत्यतेबद्दल कोणतेही विधान करण्याकरिता त्यांबद्दल गरज पडल्यास वेगळा तपास करणे इष्ट ठरेल. व्यक्तिशः असा तपास करण्यात मला स्वारस्य नाही. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास याबाबत कोणतेही ग्रह कोणत्याही निकषांवर, अधिक तपासाअंती किंवा तपासाविना, करून घेण्याचे किंवा कोणतेही वैयक्तिक मत बनवून घेण्याचे, तसेच येथील काही न आवडल्यास माझ्या येथील वावराबद्दल, वावराच्या प्रमाणाबद्दल किंवा वावराच्या दर्जाबद्दल मला जो योग्य वाटेल तो निर्णय घेण्याचे, स्वातंत्र्य मला आहेच - ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे या बाबतीत अधिक तपास करून माझे ग्रह, मते अथवा निर्णय हे भक्कम किंवा सयुक्तिक कारणांवर आधारलेले आहेत अथवा नाहीत याची खात्री करून घेण्याकरिता माझी वैयक्तिक ऊर्जा खर्च करण्याची मला इच्छा नाही, आणि तशी गरजही मला वाटत नाही. (तसेही माझ्या वैयक्तिक मतांबद्दल - किंवा एकंदर कशाबद्दलही - मी कोणालाही कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देणे लागतो असे मला वाटत नाही.) ज्यांना अशी गरज वाटते त्यांनी या प्रश्नांवर आपली वैयक्तिक ऊर्जा जरूर खर्च करावी - त्यात मला प्रत्यवाय असण्याचे मला काही कारण दिसत नाही.

बाकी आशा, निराशा किंवा एखाद्या संकेतस्थळाचे भवितव्य वगैरेंबद्दल बोलायचे झाले, तर मराठी संकेतस्थळे आणि/किंवा मराठी माणसांची संकेतस्थळे ही येतजात असतात. एखाद्या संकेतस्थळावरील आपला वावर यदाकदाचित काही कारणांमुळे अशक्य झाल्यास पुढेमागे दुसरे येतेच (आणि आले नाही तरी काहीही बिघडत नाही), आणि एखाद्या संकेतस्थळावर आपला वावर बंद पडण्याने किंवा एखादे संकेतस्थळ बंद पडण्याने आपले, संकेतस्थळाचे किंवा मराठी भाषेचे एकंदरीत काहीही नुकसान होत नाही. तेव्हा या बाबतीत आशा किंवा निराशा बाळगण्याची किंवा अधिक विचार करून आपल्याच डोक्याला ताप करून घेण्याची गरज निदान मला तरी वाटत नाही.

असो.


"Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely." -Lord Acton's dictum.

वध आणि हत्या

हा 'तिकड' चा 'इकडे' चिकटवित आहे. कारण तिकडे हा प्रतिसाद वाचण्यासाठी काही लोक जाणार नाहीत.त्यांच्यासोयीसाठी हा प्रपंच

नथुराम गोडसे यांनी गांधींचा "वध" केला, खुन नाही

रावणवध महिषासुरवध हे शब्द पाहिले तर हत्या या शब्दात जे क्रौर्य आहे ते वध या शब्दात नाही. विशिष्ट (न्याय्य असा अर्थ अभिप्रेत) हेतुने केलेली हत्या म्हणजे वध.

समजा रामायणात उलट घडल असत तर रावणाने रामाची हत्या केली अस म्हटल असत.

इतिहासाच्या क्रमिक पुस्तकात नथुराम गोडसे या माथेफिरुने गांधीजींची हत्या केली असा उल्लेख आहे. याबाबत मी एकदा आमच्या फलज्योतिष चिकित्सक कै. माधवराव रिसबुडांना विचारले होते. ते त्या वर्तमानकाळाचे साक्षीदार होते. तसेच एकदा ते नथुरामला भेटले ही होते.(खलबतासाठी नाही) त्यांच्या मते नथुराम हा माथेफिरु नव्हता. गांधीजींनी ५५ कोटींसाठी देशाला वेठीस धरले होते. तात्विकदृष्ट्या गांधीजींचे म्हणणे 'आपण पाकिस्तानचे ५५ कोटी देण लागतो' हे योग्य असले तरी त्यावेळी देण म्हणजे पाकिस्तानला हिंसक कारवाईसाठी बळ देण्यासारखे होते त्याचा उपयोग त्यांनी लगेच शस्रास्त्रा साठी केला असता. पटेलांनाही हे ५५ कोटी त्यावेळी देणे मान्य नव्हते. पण गांधींजींचे आमरण उपोषणाचे अस्त्राला राजकारणी घाबरत असत. या अर्थाने त्यांनी देशाला वेठीस धरल होत. नथुरामने 'आता मात्र आमचा नाईलाज आहे' अशा भुमिकेतुन हत्या केली. जर ती केली नाही तर 'गांधीजींचे हे मुस्लिम धार्जिणत्व देशाला संकटात नेईल' अशा भुमिकेतुन नथुरामने हे 'राष्ट्रकर्तव्य' केले. त्यावेळी राष्ट्रप्रेमासाठी सळसळणारे तरुण होते. तो माहोलच काही और होता. देशात अशी चैतन्याची लाट येत असे.

थोडक्यात हत्येच समर्थन होत नसले तरी नथुरामला माथेफिरु म्हणणे हे रिसबुडांना मान्य नव्हते. त्यांच्या मते सावरकर हे गांधी हत्येचे मुकसंमतीदार होते.
प्रकाश घाटपांडे

पुस्तकी संदर्भ

सदर वाक्य तात्यारावांनी म्हंटले आहे की नाही ह्यावरुन गदारोळ माजवणारर्‍यांसाठी हा घ्या संदर्भ!
जयवंत दळवी लिखीत नाटक 'मी नथुराम गोडसे बोलतोय' ह्या पुस्तकात हा संदर्भ सापडेल. ह्यामध्ये तात्यारावांनी असे विचार मांडल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
हे पुस्तक खरेदी करुन वाचण्याइतकी कळ निघत नसेल तर इथे हे प्रत्यक्ष पाहा:

चित्रफित मोठी असल्याने ७व्या मिनीटापासून सुरू केलीत तरी कळेल.
माननीय संपादकांनी नमूद केल्याप्रमाणे संदर्भ सापडल्याने, मूळ लेखातील बदल माघारी घ्यावेत अशी मी विनंती करतो
वसुलि
वसंत सुधाकर लिमये

'मी नथुराम गोडसे बोलतोय'

माझ्या माहितीप्रमाणे प्रदीप दळवींचे होते, जयवंत दळवींचे नव्हे.

प्रदीपच

अनवधानाने झालेली चूक मान्य आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

प्रदीप दळवी?

'दळवी' म्हणजे...? नाही म्हणजे, 'ते' तर नव्हेत, अशी शंका आली, म्हणून विचारले... नाही म्हटले, खात्री करून घ्यावी... 'त्यांच्यातले'च निघायचे एखादवेळेस... नथुरामावर लिहिताहेत, म्हणजे नक्की 'त्यांच्या'तलेच असणार! (तसेही 'विकृत' आहेत हे इतरत्र ठरलेलेच आहे!)

माहीतगारांनी प्रकाश पाडावा.

हे घ्या...

सर्वप्रथम नाटक जयवंत दळवींचे नसून प्रदीप दळवींचे आहे हे जर "नीट" वाचू शकलात तर कळेल आणि त्या नाटकाचा संदर्भ नीलकांत ने आधीच दिला आहे, त्यामुळे त्यात युरेका युरेका म्हणण्यासारखे काहीच नाही. आता हे नाटक असल्याने यात नाटककाराला हवे ते प्रसंग गोवण्यात आले आहेत. या संदर्भात खालील एक उतारा वाचा:

Dalvi's Nathuram tells the audience, "After he read my will, Tatyarao (Savarkar) said to me, 'Nathuram, you are fit to be the sage Dadhichi of modern India. Like his bones, your bones too will turn into weapons."

Since most people in the audience were probably mesmerized and lost their corporeal consciousness while seeing the first scene in Dalvi's Marathi play, they must not have realized the true situation that since Swatantryaveer Savarkar was released from the jail in the Red Fort on February 10, 1949,he was never together with the other accused Nathuram Godse and Narayan Apte in the dark and lonely cell in Ambala Jail. And since Savarkar was not present there when Nathuram made his will on November 14, 1949, how would he call him 'the sage Dadhichi of modern India'? I have read that many senior devotees (admirers) of Savarkar like Gopal Godse and Sudheer Phadke were present in the audience. I wonder how they approved of this reckless flight of Dalvi's imagination.

(संदर्भः http://www.mkgandhi-sarvodaya.org/godse.htm)

अहो बाकी काही नाही पण जरा थोडा कॉमन सेन्स वापरलात तर समजेल की असे जर सावरकर खरेच म्हणाले असते तर आत्तापर्यंत अनेक सुडोसेक्युलर्स डाव्या "विचारवंतांनी" कितीवेळा हे सांगितले असते ते! अर्थात जेंव्हा द्वेषानेच सगळे विचार भरलेले असतात तेंव्हा अजून काय दिसणार म्हणा. खेद होतो असल्या वृत्तीचा इतकेच म्हणू शकतो.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वाटलंच होतं

नीलकांत ह्यांनी नाटकातला संवाद आहे हे दिले होते पण नाटकात ते तात्यारावांचे वक्तव्य आहे हा उल्लेख खूबीने टाळला होता.

पुस्तकी संदर्भ द्या म्हंटल्यावर दिला तरीही तुमचे रडगाणे सुरूच का? दळवींनी सांगीतलेले बरोबर की चूक हे तुम्हीच ठरवा.
माझ्या मते पुस्तकात हे छापून आले आहे, महाराष्ट्र शासनाच्या मंजूरीने ह्या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. तेव्हा संपादन मंडळाने ह्या वादावर पडदा घालून मूळ लेखातील बदल मागे घ्यावेत इतकीच विनंती.

तात्यारावांच्या तोंडात कुणी मनाची वाक्ये भरत असेल असे तुम्हाला वाटते तर दळवींच्या नावाने बोटे मोडा. प्लीज स्पेअर उपक्रम ऑर मी.

मागेही माझ्याच प्रतिसादातीह हा उल्लेख तुम्हाला दिसला नव्हता का?

तात्यांनी असे म्हंटले असेल किंवा नसेल पण लोकांच्यात काय काय समज आहेत ते कळले पाहिजे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

खोटेनाटे

--------------
काहीच्या काही खोटेनाटे. हिंदूत्ववादाने नाहीतरी किमान बुद्धीवादाने तोंड देऊ शकाल असे वाटले होते. वरील मी दिलेला लेखसंदर्भ अजून खणले असता ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे अशा य.दि. फडक्यांनी लिहीलेला आढळला आणि तो देखील सबरंग या अतीडाव्या संकेतस्थळाने प्रकाशीत केला होता. त्यात हे वाक्य खोटे असल्याचे दाखवले असताना देखील आपण हट्टाने पेटला आहात आणि वर मला स्पेअर उपक्रम म्हणता? इथे काय तुम्हाला खोटे लिहीण्याचा उपक्रम चालवायचा आहे का?

महाराष्ट्र शासनाच्या मंजूरीने ह्या नाटकाचे प्रयोग झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीने नथुरामचे आणि गोपाळ गोडश्यांचे पुस्तकपण प्रकाशीत झाले आहे मग त्यात जे काही म्हणले आहे ते संदर्भ म्हणून वापराल का?

बरं नीलकांतने खुबीने काही टाळले होते हे तुम्हाला वाटत असेल. चर्चा आणि वाक्य यात सावरकरांचे नाव गोवले होते त्या संदर्भात नीलकांतने लिहीले तेंव्हा त्यात सर्व काही आले. अर्थात जिथे नाटक प्रदीप दळवींच्या ऐवजी जयवंत दळवींचे वाटते तिथे इतके कसे समजणार म्हणा...

अवघड आहे!

तुम्हाला मराठीत लिहिलेलं वाचायला, समजायला, कळायला अवघड जातं का हो? की ओव्हरऑलच आकलनशक्ती मर्यादीत आहे समजत नाही.

सदर वाक्य तात्यारावांनी म्हंटले आहे असा पुस्तकात उल्लेख आहे. ते खरेच असेल असा काहीही पुरावा नाही. पण इतरत्र असे लिखाण आढळ्याने मूळ वाक्य उपक्रमावरुन काढले जाऊ नये. लोकांच्यात काय काय समज आहेत ते कळलेच पाहिजे. असा माझा सुरुवाती पासून मुद्दा आहे.

ह्यातला कोणता भाग तुम्हाला समजत नाही कळत नाही.

हिंदूत्ववादाने नाहीतरी किमान बुद्धीवादाने तोंड देऊ शकाल असे वाटले होते.

माझी तुमच्याकडून तितकीही अपेक्षा नाहीये. तेव्हा उगीच खालच्या पातळीवर उतरुन टीका करायची असेल तर तुमच्या लाडक्या मिसळपाववर जा. तिकडच्या लिंबू टिंबूंमध्ये विचारवंत म्हणून मिरवा. प्लीज स्पेअर उपक्रम!!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

आक्षेपार्ह

तुम्हाला काही वाट्टेल ते करून सावकरांना बदनाम करायचे आहे. आणि मला सावरकरच काय पण कोणत्याही हयात नसलेल्या व्यक्तींच्या तोंडी कुठलाही ऐतिहासीक पुरावा नसलेली वाक्ये टाकणे हे आक्षेपार्ह वाटते आणि त्यासाठी उपक्रमासारख्या संकेतस्थळाचा किंवा इतरत्र गैरवापर होऊ नये असे वाटते. लोकांच्यात काय समज आहे हे सावरकरांच्या नावे खोटे वाक्य न टाकता पण लिहीता येते. त्याबद्दल मी आक्षेप घेतलेला नाही.

बाकी राहीला माझ्या आकलन शक्तीचा मुद्दा. कमी आहे समजा. पण मी खोट्याचा वापर स्वतःला खरे दाखवायला करत नाही. "पडलो तरी नाक वर" असे आता बास झाले.

माझी तुमच्याकडून तितकीही अपेक्षा नाहीये. तेव्हा उगीच खालच्या पातळीवर उतरुन टीका करायची असेल तर तुमच्या लाडक्या मिसळपाववर जा. तिकडच्या लिंबू टिंबूंमध्ये विचारवंत म्हणून मिरवा. प्लीज स्पेअर उपक्रम!!

मला दुतोंडी म्हणालात तेंव्हा कुठे गेली होती पातळी? बरं तुम्हाला कोणी मला असे सांगायला सांगितले आहे का की येथे लिहू नका म्हणून तसे असल्यास स्पष्ट कळले तर लिहीणे थांबवीन नाहीतर उगाच येथे स्वतःच्या ऑर्डर्स सोडू नका. उपक्रम चुकीच्या गोष्टीं लिहीण्यासाठीचे स्वर्गस्थान होऊ नये आणि त्यातून ते स्पेअर व्हावे म्हणून तर इतके लिहीत आहे. तेंव्हा सॉरी तुम्ही असले खोटे नाटे लिहीणे सोडा वाद घालायचा प्रश्नच येणार नाही.

बाकी मिसळपावमधे लिंबूटिंबू असले तर अशा लिंबूटींबूंच्या मतावर येथे लेख कसे टाकावेसे वाटतात? त्यासाठी मिसळपाव वाचायला कसे येता बरे? स्वयंप्रेरणेने लिहीता येत नाही का?

माझ्याकडूनही विषय संपला

सावरकरांना बदनाम मी करत नाही. असली नाटके लिहिणारे आणि त्यावर टाळ्या वाजवणारे हिंदुत्ववादीच करतात. शेवटी सत्यशोधनासाठी तुम्हाला य.दी फडक्यांच्या आणि अति डाव्या सबरंगच्या वळचणीला जावे लागले त्यातच सगळे आले.
असो..माझ्याकडूनही विषय संपला.

बाकी मिसळपावमधे लिंबूटिंबू असले तर अशा लिंबूटींबूंच्या मतावर येथे लेख कसे टाकावेसे वाटतात?

हाहाहा.. अतिशय वैचारिक आणि अभिमानास्पद मते आहेत नाही?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

धन्यवाद

सावरकरांना बदनाम मी करत नाही.

धन्यवाद. म्हणूनच असली विधाने त्यांच्या नावावर ठेवायला तुमचा देखील विरोध असायला हवा होता.

असली नाटके लिहिणारे आणि त्यावर टाळ्या वाजवणारे हिंदुत्ववादीच करतात.
अगदी मान्य. तशी मी अजूनही उदाहरणे देऊ शकेन.... त्यांना मी सुडोहिंदूत्ववादी म्हणतो. कारण सावरकरांच्या हिंदूत्वाचे तत्व अशांना जीवनात कधीच पेलवत नाही.

शेवटी तुम्हाला य.दी फडक्यांच्या आणि अति डाव्या सबरंगच्या वळचणीला जावे लागले त्यातच सगळे आले.
य.दी.फडक्यांना शेवटी म्हणायची गरज नाही, त्यांची विद्वत्ता मान्य आहे. कधी काही विचार पटले नाहीत तरी मुद्दामून खोटे नक्कीच लिहीणार नाहीत याची खात्री आहे. सबरंगचे देण्याचे कारण - एक तर होते आणि दुसरे तुमच्यासारख्या डाव्यांचा त्यावर अधिक विश्वास बसेल म्हणून.

असो..माझ्याकडूनही विषय संपला.
पुनश्च धन्यवाद

संदर्भांचं काय विकासकाका

गोपाळ गोडश्यांचे पुस्तकपण प्रकाशीत झाले आहे मग त्यात जे काही म्हणले आहे ते संदर्भ म्हणून वापराल का?

"५५ कोटींचे बळी" आणि "गांधी हत्या आणि मी" या पुस्तकांचे संदर्भ जागोजागी दिलेले बाजूच्या संकेतस्थळावर आढळतात हो. तिथे तुम्ही प्रश्न विचारलेले दिसले नाहीत.

-राजीव.

सत्यवचनी, प्रामाणिक डावे

ह्या चर्चेत डाव्यांची मदत/सोय झालेली बघून आश्चर्य वाटले. एकंदरच हे डावे सत्याची बाजू घेणारे, सत्यवचनी, प्रामाणिक दिसतात.

I have read that many senior devotees (admirers) of Savarkar like Gopal Godse and Sudheer Phadke were present in the audience. I wonder how they approved of this reckless flight of Dalvi's imagination.

हं. हा मुद्दा राहतोच. आदरणीय बाबूजींना ह्याबाबत काय वाटायचे हे जाणून घ्यावेसे वाटते आहे. (इथे य. दि. फडक्यांना कसे काय समर्थन करू शकले असे म्हणायचे नसावे)

अहो बाकी काही नाही पण जरा थोडा कॉमन सेन्स वापरलात तर समजेल की असे जर सावरकर खरेच म्हणाले असते तर आत्तापर्यंत अनेक सुडोसेक्युलर्स डाव्या "विचारवंतांनी" कितीवेळा हे सांगितले असते ते!

खरे आहे. काळ्या पाण्यातून लवकर सुटका व्हावी म्हणून तात्यारावांनी मागितलेल्या माफीबद्दल डाव्यांनी (इतिहासकार बिपिन चंद्रा व मणिशंकर अय्यर इत्यादींनी) बरेच 'प्रबोधन' केले होते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

१. सावरकर कननॉट बी अ रोल मॉडल

पैसा वसूल

चर्चेने अपेक्षेप्रमाणे विनोदी व मनोरंजक वळण घेतले आहे. पैसा वसूल टाईमपास!!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उत्त्तम चर्चा

उत्त्तम चर्चा!!

सगळ्यांकरिता एक प्रश्न.

सगळ्यांकरिता एक प्रश्न.

ह्या चर्चेचे फलित काय?

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

टाईमपास

वेळ चांगला गेला. हेच फलित.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

व्हॅलिड नाही

ह्या चर्चेचे फलित काय?
हा प्रश्न विचारणे इस्लाम, हिंदुत्ववाद तसेच आफ्रिकेतील स्वाहिली लोकांचा बंटुकवाद या सर्वांच्या विरोधात आहे. अहो, असे प्रश्न विचारले तर निम्म्या मराठी सायटी बंद पडतील. आजवर झालेल्या कुठल्याही चर्चेचे काही फलित आहे का? वाचायला पुस्तके नाहीत, सिरीयल रटाळ अशात हिंदुपतपातशाहीतील कंटाळलेल्या मराठी मनाने करावे तरी काय?

---

 
^ वर