उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन
धम्मकलाडू
August 27, 2009 - 9:58 am
जसवंत सिंग ह्यांनी नुकतीच भाजपाची तुलना 'कू क्लक्स क्लॅन'शी केली. तर अरुण शौरींनी राजनाथ सिंगांना कधी 'ऍलिस इन दी ब्लंडरलँड' तर कधी 'टारझन' असे म्हटले. त्यांनी भाजपाला 'कटी पतंग' असेही म्हटले. आणि शीर्षस्थ नेतृत्वाला 'हम्टी डम्टी.'
- क्लू क्लक्स क्लॅन
- ऍलिस इन द ब्लंडरलँड
- टारझन
- कटी पतंग
- हम्टी डम्टी
हे संदर्भ माझ्यासारख्या सामान्य वाचकांच्या परिचयातले नसावेत. उपक्रमाचे जाणकार, जिज्ञासू, विचक्षण, व्यासंगी आहेत. त्यांनी ह्यावर प्रकाश पाडत काथ्याकूट केल्यास उपकृत राहीन.
विनंती
- गांधी, नेहरू, काँग्रेस ह्यांना मध्ये आणू नये.
- पुण्यावर विषय नेऊ नये.
- मुंबईच्या स्पिरिटशी संबंध जोडू नये.
अन्यथा, धागा संपादित होण्याची शक्यता/भीती आहे.
दुवे:
Comments
ऍलिस इन् वंडरलँड
ऍलिस इन द ब्लंडरलँड माहित नाहि मात्र ऍलिस इन् वंडरलँड नावाची एक उत्तम बालकादंबरी आहे. ज्यात ऍलिस ही बाल नायिका एका सशाच्या मागे एका अद्भूत दूनियेत जाते. तिथे असलेली पात्रे, बोलका-सतत घाईत असणारा-घसड्याळ बघणारा ससा, गायब होणारा बोका वगैरे लक्षात आहेत.
चर्चाविषय उत्तम.
आम्ही आमचे (अ)ज्ञान उघड केले आहे. आता जाणकार, जिज्ञासू, विचक्षण, व्यासंगी उपक्रमींच्या प्रतिसादाची वाट पाहतो :)
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे
अरूण शौरी -
हम्प्टी डम्प्टी आणि ऍलिस इन वंडरलँड हे दोन उल्लेख लूईस कॅरल (टोपणनाव) यांच्या Through the Looking-Glass, and What Alice Found There या कादंबरीतून आलेले आहेत. ('ब्लंडरलँड' हा शब्द मुळात अरूण शौरींचा नव्हे. तो मुलाखतकार शेखर गुप्ता यांनी वापरला आणि अरूण शौरींनी अनुमोदित केला.) दोन्ही उल्लेख 'भाषेचा आपल्याला हवा तसा अर्थ काढणे' किंवा 'अर्थहीन बडबड' यावर टीका म्हणून आहेत.
'मी टारझन' (Me Tarzan - You Jane) हा उल्लेखही असाच भाषेच्या संदर्भातला टीकात्मक उल्लेख आहे. खरेतर टारझनला कोणतीही मानवी भाषा येत नसता त्याचे हे उद्गार तोच 'जेन'ला भाषा शिकवत आहे असा आभास निर्माण करतात.
या तीन उपमांचा एकत्र अर्थ या मुलाखतीच्या निमित्ताने असा की - भाजपाचे शीर्ष नेतृत्त्व अर्थहीन बडबड करत आहे, भाषेचा आपल्याला हवा तसा अर्थ काढत आहे आणि आपल्यालाच काय ते योग्य वागता/बोलता येते अशा अविर्भावात आहे असे अरूण शौरींचे मत आहे.
कटी पतंग - 'ना कोई उमंग है...' या सुप्रसिद्ध गाण्यांच्या बोलांमुळे जनसामान्यात बोलवा असलेली प्रतिमा.(मूळ चित्रपटकथेशी या दाखल्याचा संबंध नाही.) २००९सालच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे दोलायमान झालेली भाजपाची अवस्था एखाद्या काटल्या गेलेल्या पतंगाप्रमाणे आहे. तो पक्ष दिशाहीनपणे भरकटत आहे असे अरूण शौरी यांचे म्हणणे.
जसवंतसिंग -
'क्लू क्लुक्स क्लॅन' हा उल्लेख संयुक्त अमेरिका गणराज्यातील दक्षिण राज्यांमधील विद्वेषाची मानसिकता बाळगणार्या श्वेतवर्णीय दहशतवादी गटांबाबत आहे. भाजप असाच एक विद्वेषी मानसिकता बाळगणारा पक्ष आहे असे जसवंतसिंग यांना सूचित करायचे आहे.
प्रश्नकर्ता सामान्य नाही. पण सामान्यपणे या प्रश्नांची सर्वसामान्य उत्तरे काय असू शकतील याचा हा सामान्य शोध.
अतिशय आभारी आहे
वरील प्रतिसाद उपक्रमाचे सदस्य हे जाणकार आणि व्यासंगी आहेत ह्याची खात्री पटविणारा आहे. आदरणीय विसुनानांचा मी खूप खूप आभारी आहे.
'कटी पतंग' गुगलून बघितले. भाजप ही पार्टी 'कटी पतंग'मधली 'आशा पारेख' झाली आहे. तिला संघाचा 'राजेश खन्ना'च आता वाचवू शकेल असे बहुधा शौरींना सुचवायचे होते तर.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गाणी
इथे आणखी काही गाणी आठवली.
जसवंत : तुम्हारी नजर क्यूं खफा हो गई, खता बक्श दो गर खता हो गई
अडवाणी (राजनाथ कोरसमध्ये) : हमारा इरादा तो कुछ भी न था, तुम्हारी खता खुद सजा हो गई
राजनाथ : जो भाय को देगा त्रास, वो होएंगा खलास.. टेंशन नई लेने का, भाय से पूछने का..
अडवाणी : (ब्रेथलेस गातायत, शंकर महादेवनचं)
पब्लिक : गोलमाल है भाई सब गोलमाल है.. (बाकी परिस्थिती कुठलीही असो, पब्लिकच्या नशीबी हेच गाणे असते.)
सुषमा स्वराज : जिसका मुझे था इंतजार, जिसके लिये दिल था बेकरार, वो घडी आ गई आ गई...
----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद. म्हणजे भाजपात बालिशपणा चालला आहे आणि भाजपा बालिशांचा पक्ष आहे असे त्यांना सुचवायचे आहे का? इथे ससा कोण बोका कोण, ससा घाईत का, बोका गायब का होतो हेदेखील सांगावे. तसेच हम्टी डम्टी बद्दल जाणून घ्यावेसे वाटते आहे. शाळेत असताना बोस्टन टी पार्टीबद्दल वाचले होते. त्यातल्या टी सारखाच हा टी आहे काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
टी नाही ब्रँडी
तसे हम्टी डम्टी लहान मुलांच्या गाण्यात अंड्याला म्हणतात. परंतु, विकी वाचनात हे नाव एका ब्रँडी आणि बीअरच्या मिश्रणाचे असल्याचेही कळले. :-)
चीअर्स!
ब्रॅंडी + एल म्हणजे कॉकटेल!
बाप रे! ब्रॅंडी + एल म्हणजे कॉकटेल! हा माहितीपूर्ण खुलासा धक्कादायक आहे. प्रियाली अत्यंत आभारी आहे. शौरींना नक्की म्हणायचे तरी काय? श्रेष्ठी अंड्यासारखे बेढब आहेत की श्रेष्ठींना सत्तेची नशा चढली आहे की श्रेष्ठी पट्टीचे मद्यपी आहेत?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
इतकेच
ह्या सार्या प्रश्नांची उत्तरे व्यासंगी... वगैरे उपक्रमी देतीलच तीच तर ऐकायला बसलो आहे :)
वर म्हटल्याप्रमाणे माझे (अ)ज्ञान इतकेच.
बाकी ब्लंडरलँड ह्या नावाने लिहिलेला अग्रलेख होता ही नवी माहिती दिल्याबद्दल शरद यांचे आभार
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
कटी पतंग वगळता
विसुनानांनी थोडक्यात माहिती दिली आहेच परंतु आपल्या देशातील नेतृत्वाला पंचतंत्रापासून महाभारतापर्यंत धडे देण्याची गरज दिसते. कटी पतंग वगळता सर्व उपमा परदेशी!!
अरेरे!! ;-)
त्यांना उपक्रमावर बोलवून महाभारतावरील आणि पौराणिक लेख वाचण्याची शिक्षा द्यावी काय? - ह. घ्या.
ज्ञानाचा उगम वेदांतूनच झालेला
अहो पण ह्या जगातल्या अखिल ज्ञानाचा उगम वेदांतूनच झालेला आहे नाही काय? त्यामुळे उपमा परदेशी की विदेशी हे इथे अप्रस्तुत ठरावे!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हाहाहा!
बोलती बंद! चालू दे.
आणखी एक
कदाचित थोडे अवांतर असेल पण तुम्ही दिलेल्या यादीत कालचे 'सुदर्शन चक्र' दिसले नाही म्हणून हा प्रतिसाद देण्याचा मोह झाला ;)
छान धागा सुरू केलात. 'क्लू क्लक्स क्लॅन' मलाही माहिती नव्हते. सकाळी विकीवर शोधले.
माझी माहिती
१) कू क्लक्स् क्लॅन् - खूप वर्षांपूर्वी वाचनात आलेल्या माहितीनुसार "कू क्लक्स् क्लॅन् " ही अमेरिकेतली कृष्णवर्णीयांविरोधात हिंसक कारवाया करणारी संघटना होती.
२) ऍलिस् इन् ब्लंडरलँड् - माझी माहितीही ऋषिकेश यांनी दिलेल्या माहिती सारखीच आहे. अवांतर - प्रियांका गांधींनी जेव्हा राजकारणात नव्यानी प्रवेश केला तेव्हा तत्कलीन काँग्रेस पक्षात त्यांची अवस्था वर्णन करणारा जो अग्रलेख टाइम्स् ऑफ् इंडियाने लिहिला होता त्याचं शीर्षक 'ऍलिस् इन् ब्लंडरलँड्' असं होतं.
३) हम्प्टी-डम्प्टी - शब्दकोषात या शब्दाचा अर्थ "गिड्डा गरगरीत वाटोळा मनुष्य" असा दिला आहे. हम्प्टी-डम्प्टी विषयी लहान मुलांची एक कविता प्रसिद्ध आहे ती अशी :
हम्प्टी-डम्प्टी सॅट् ऑन् अ वॉल्
हम्प्टी-डम्प्टी हॅड् अ ग्रेट् फॉल्
ऑल् किंग्ज् हॉर्सेस् अँड् ऑल् किंग्ज् मेन्
कुड् नॉट् पुट् हम्प्टी-डम्प्टी टुगेदर् अगेन्
सुदर्शन चक्र
सुदर्शन चक्र एकदा हातातून सुटले की ते ज्याचा बीमोड करायचा तो झाल्याशिवाय परत येत नाही. फक्त वाट बघा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील. राजकारणी, मग ते भाजपाचे असले तरी बाष्कळ बडबड कधीच करत नाहीत. देअर इज ऑलवेज अ मेथड इन देअर मॅडनेस
चन्द्रशेखर
दुर्दम्य आशावाद
इतकेच!
डिटेलवार माहिती हवी
ह्या सुदर्शनचे डिझाइन कुणी दिल्यास आवडेल. भौतिकशास्त्रातला कुठला सिद्धांत इथे लागू होतो. कुठल्या धातूपासून हे चक्र बनलेले आहे (की स्टायरोफोमचे आहे) इत्यादी माहिती डिटेलवार दिल्यास तर फारच आनंद होईल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सुदर्शन
हे पहा -
हे इथून घेता येईल.
की हे असावे बरे?
;):)
सुदर्शन् चक्र
गणपतींच्या देखाव्यात हे थर्मोकोलचे बनवतात.
चन्द्रशेखर
वाहवा
फारच मनोरंजन आणि उद्बोधक चर्चा.
केकेके हे नाव बंदूक लोड करताना येणार्या आवाजावरुन घेतले आहे असे होम्सच्या 'फाईव्ह ऑरेंज पिप्स' या कथेत वाचले आहे.
सन्जोप राव
ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है
मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है
इथेही केके आणि के
काय रावसाहेब! त्या केक्यानं काय गारूड टाकलंय कळत नाही. इथेही केके आणि के.
ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी
केके नावाचा एक नट आहे. त्याला काही जण बोलट म्हणतात. केके नावाचा एक गायकही आहे. पण इशारा त्याच्याकडे नाही.
तुम्हाला ही चर्चा मनोरंजक आणि त्याहीपेक्षा उद्बोधक वाटल्याचे बघून बरे वाटले.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आधी जीना आता कंदहार
पक्षाची अवस्था 'बुडत्याचा पाय खोलात' अशी दिवसेंदिवस होत आहे.
आधी जीना, आता कंदहार अडवाणी यांच्यावर चहुबाजूने प्रहार
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
टारझन
टारझन बद्दल कोणीच लिहित नसल्याने मिळालेली माहिती देतो. टारझन हे आंतरजालावरील एक सुप्रसिद्ध व्यक्तीमत्त्व आहे. येत्या ३० तारखेला टारझनचा वाढदिवस असतो. इथे त्याला (आगाऊ) शुभेच्छा देण्यात येत आहेत. ;)
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
महत्त्वाची माहिती
धन्यवाद. ही तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. असे असल्यास प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना प्रकाशझोतात आणायला हवे. हे तुमचे टारझन व त्यांची जेन खाली दिलेल्या 'यू जेन मी टारझन' ह्या विडियोतल्या टारझन-जेनसारखेच आहेत काय?
इंग्रजीचे सोडून द्या पण शौरींना राजनाथ सिंह जॉनी वेसमुल्लरइतके चिकणे आहेत असे म्हणायचे आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"