एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

सध्या घरच्या डिशटिव्हीच्या कनेक्शनचे काहीतरी लफडे झाले आहे. वृत्त वाहिन्यांमधे फक्त झी२४तास आणि आयबीएन-लोकमत या दोनच वाहिन्या उपलब्ध आहेत. 'समथिंग इज बेटर दॅन अज्जिबात नथिंग' या न्यायाने सध्या आयबीएन-लोकमतच बघत असतो. नाविलाज आहे. पण परवा अचानक एक चांगला कार्यक्रम बघायला मिळाला.

'ग्रेट भेट' नावाचा एक कार्यक्रम असतो. त्यात आयबीएन-लोकमतचे सर्वेसर्वा निखिल वागळे हे प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेतात. परवाच्या कार्यक्रमात अतिशय जुने आणि वरिष्ठ राजकारणी डॉ. एन. डी. पाटिल यांची मुलाखत घेतली गेली. एनडी (त्यांना सगळे एनडीच म्हणतात) बद्दल मला फक्त एवढीच माहिती होती की ते एक राजकारणी आहेत आणि शे. का. पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मुलाखत बघताना हा माणूस किती मोठा आहे हे कळले. मुलाखत अर्ध्याच तासाची होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला म्हणले गेले तसे, जरी त्यांनी शे.का. पक्षाचे नेतृत्व केले असले तरी आज ते खर्‍या अर्थाने सर्वपक्षिय झाले आहेत. महाराष्ट्रातील सगळ्याच प्रमुख लोकचळवळींशी ते आजही जातीने निगडीत आहेत. त्यांना बघूनही ते ८० वर्षांचे असतील असे वाटत नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे सेझ विरोधात म्हणा किंवा तथाकथित आधुनिक विकासामुळे भूमिपुत्र भरडला जात आहे तिथे त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. ते स्वतः तिथे जाऊन मार्गदर्शन करतात.

त्यांच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा वाटला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, आपलं मत ते बेधडक मांडतात. आयुष्यभर स्वच्छ राहिलेला माणूसच हे करू शकतो. इतर राजकीय नेत्यांबद्दल त्यांनी मांडलेली मतं खरोखरच जहाल आहेत. देशातील सगळेच राजकारणी हे कोणाला ना कोणाला तरी विकले गेले आहेत हे स्वतः राजकारणात राहून स्पष्टपणे ठणकावून सांगणे हे सोपे नाही. आधुनिक चाणक्य शरद पवार हे त्यांचे मेव्हणे. पवार हे एनडींच्या बायकोचे भाऊ. पण पवारांच्या प्रभावाखाली नसलेला एकमेव नेता असे त्यांचे वर्णन केले जाते असे वागळे म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटिलांच्या तालमीत तयार झालेला हा गडी अजूनही रयत शिक्षण संस्थेची गाडी हाकत आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजकारणी वाटलेले एनडी मुलाखतीच्या शेवटी मात्र त्यापेक्षा खूप मोठ्ठे समाजकारणी आहेत असेच वाटले.

हा कार्यक्रम आपल्याला http://www.ibnlokmat.tv/gallery.php?id=1&conid=57082 या लिंकवर बघता येईल. माझ्याकडे सगळे भाग उतरवून घेतले आहेत. कोणाला या दुव्यावरून बघता येत नसेल तर मी हे भाग आंतरजालावर चढवायचा प्रयत्न करेन.

Comments

धन्यवाद

लेख आवडला. जमेल तशी मुलाखत पाहीन.
शेतकरी कामगार पक्षाबद्दल थोडी अधिक माहिती देऊ शकलात तर उत्तम होईल. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचा या पक्षाशी काही संबंध आहे काय ?

धन्यवाद!!!

खरं तर शेकाप बद्दल माझी माहिती फार मर्यादित आहे. हा एक डाव्या विचारसरणीचा, सध्या केवळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात प्राबल्य असलेला एक पक्ष एवढंच माहित आहे. बहुधा शरद जोशींच्या शेतकरी संघटनेशी काहीच संबध नाहीये.

इथल्या जाणकारांकडून एनडी आणि शेकाप बद्दल सर्वांगिण चर्चा ऐकायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते

शेकापविषयी ...

भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा मुख्यता डाव्या विचारसारणीचा पक्ष आहे.
म्हटलं तर बराच जुना इतिहास ह्या पक्षाला आहे परंतु चांगले नेते, कार्यकर्ते, कार्यक्रम ह्यांच्या अभावी ह्यांचा म्हणावा इतका विस्तार झाला नाही ...
ह्यांचा प्रभाव प्रामुख्याने रायगड, अलिबाग व काही अंशी पनवेल् व त्या आसपासचा प्रदेश ह्यांच्यात् आहे ...
स्थानीक पातळीवर नेहमीच शिवसेनेशी चांगले संबंध ठेऊन ह्यांनी बर्‍याच ग्रामपंचायती, पंचायत समित्यात सत्ता कायम् ठेवली आहे, त्याबदल्यात ह्यांचे कार्यकर्ते मोठ्ठ्या निवडणुकात शिवसेनेच्या खांद्याला खांदा लाऊन प्रचार करतात ...
राज्यपातळीवर शेकाप नेहमीच् काँग्रेसमबरोबर जमवुन घेऊन सत्तेत सहभागी होत असतो ...
सद्यपरिस्थीतीत जयंत पाटील व सुनील तटकरे ही नावे सोडली तर ह्यांच्याकडे दुसरा नावाजलेला नेता नाही ...

मात्र ह्यांचा आणि शेतकरी संघटनेचे "शरद जोशी" यांचा दुरदुरपर्यंत संबंध नाही ...
शरद जोशी ह्यांनी प्रथम् "अराजकीय" म्हणुन ही संघटना चालवली व बर्‍यापैकी नाव व कार्यकर्ते कमावले ...
मात्र गेल्या काही काळात शरद जोशी हे विविध राजकीय पक्षांच्या मंचावर हजरी लावताना दिसतात ...

बाकी एनडींबद्दलची माहिती आवडली ...
त्यांच्या शेतकर्‍यांविषयींच्या कार्यांचे बरेच पैलु कळाले ...

उत्तरेत "महेंद्रसिंग टिकैत" नावाचे असेच प्रभावशील व नामवंत शेतकर्‍यांचे नेते आहेत् हे ह्या निमीत्ताने आठवले ....

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

धन्यवाद !

छान , माहितीपूर्ण प्रतिसाद, धन्यवाद.

दुरुस्ती

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे आहेत.
शे.का. प. सध्या रायगडमध्येच अस्तित्वात असला तरी पुलोद्च्या राज्कारणापूर्वी एक प्रमुख विरोधी पक्ष होता.

विद्याधर

एन डी पाटील आणि रयत शिक्षण संस्था

एन. डी. पाटील आणि रयत शिक्षण संस्था यांचा घनिष्ट संबंध होता / आहे. खुद्द रयतमध्ये एन डीं बद्दल अजिबात बरे बोलले जात नाही.
सन्जोप राव

पाटील साहेब

पाटील साहेब खूप मोठा माणूस. शरद जोशी सारख्याशी त्याला कंपेर करू नका.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

कंपॅरिजन

मूळ प्रतिसादात अजिबातच नसलेली कंपॅरिजन हमाल यांना कुठे दिसली ते कळल्यास आनंद होईल.

थोडा गोंधळ

कर्मवीर भाऊराव पाटिलांच्या तालमीत तयार झालेला हा गडी अजूनही रयत शिक्षण संस्थेची गाडी हाकत आहे.
आणि
खुद्द रयतमध्ये एन डीं बद्दल अजिबात बरे बोलले जात नाही.

या दोन विधानांमुळे गोंधळ उडाला आहे. यापैकी एक विधान असत्य आहे का ? ही दोन्ही विधाने खरी असतील तर दुसरे विधान हे कुठल्याही संस्थेत कुठल्याही अत्युच्चपदस्थांबद्दल "बरे न बोलणारे" घटक असतातच या बद्दल आहे का ? तर मग "अजिबात" च बरे न बोलले जाता हा माणूस या संस्थेची गाडी कशी हाकारत असेल बरे ?

पंचायत

आमच्या पंचायतीतपण आमच्याविषयी नेहमी बरे बोलले जात नाही. पन आम्ही पंचायतीची गाडी हाकतो.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

"अजिबात"

"अजिबात" बरे बोलले जात नाही ? :-)

अजिबात

"अजिबात" अस नाही. आमचे पंचायतीचे लोक बर बोलतात. पन हमाल सदस्य तस नाही बोलत्.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

मुलाखतीचा वृत्तांत

वाचला, नवीन माहिती कळली.

मी ज्या गावांत काम केले तिथे रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल होते. शिवाय कर्मवीर भाऊराव पातील यांच्यावर शाळेच्या पुस्तकात धडा होता. रयत शिक्षण संस्थेचे पुढील मार्गदर्शन करणार्‍या नेत्याबद्दल माहिती या लेखाद्वारे मिळाली.

धडा

कर्मवीर भाऊराव पातील यांच्यावर शाळेच्या पुस्तकात धडा होता.
या धड्याचे शीर्षक "मायेची पाखर" असे होते का ? वसतिगृहात झोपलेल्या मुलांवर भाऊराव रात्री पांघरूण घालून जात ही गोष्ट होती. आम्हाला भाऊराव पाटलांबद्दल हा धडा होता.

मायेची पाखर

होय - हाच तो धडा.

लेख

बिपीन लेख, दुवा आवडला.

महाराष्ट्रात ह्या वेगवेगळ्या चळवळी चालू आहेत त्याची एकत्रीत माहीती कुठे मिळू शकेल?

असेच म्हणतो !

>>बिपीन लेख, दुवा आवडला.

असेच म्हणतो !

अंनिस चे आधारस्तंभ

एनडी पाटील हे अंनिस चळवळीचा मोठा आधारस्तंभ आहेत. साधना ट्रस्ट व अनेक पुरोगामी चळवळींचा ही ते आधारस्तंभ आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील द्रष्टा माणुस.
प्रकाश घाटपांडे

बेळगाव

बेळगाव आंदोलनाचे महाराष्ट्रातर्फे नेतृत्व करत आहेत म्हटलं तरी वावगं ठरू नये...

अधिक माहिती

तसेच उरणचा रिलायन्स सेझ विरोध...सरकारला जनतेचं मतदान घेणं भाग पाडलं..

अधिक माहिती
N D Patil, a senior Peasants and Workers Party leader who is spearheading the protest, however, warned of going on hunger strike if the government did not take back the sez proposal.

पाटलांचं नाव लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण संजोपराव म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल वाईट कधीही ऐकलं नाही. खरं खोटं माहीत नाही.

अभिजित यादव
कर्‍हाड

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

धन्यवाद !

तुमचा प्रतिसाद , दुवे , माहितीवर आधारलेले आहेत. ते उपयोगी वाटले. आभारी आहे.

धन्यवाद

दुव्यासाठी धन्यवाद. फार त्रास झाला हे ऐकून, पाहून!
"लोकांमधून पर्याय येत नाही" याचा विचार माझ्यासारख्या प्रत्येकानेच करण्यासारखा!

अदिती

स्फूर्तिस्थान

लेख आणि दुव्याबद्दल अनेक आभार. लेखातील मुद्यांशी संपूर्ण सहमत आहे. आजच्या काळात इतकी निर्भिड मते असणारा नेता फारच विरळा.
काही माणसे अशी असतात की त्यांची बुद्धीमत्ता आणि प्रगल्भ विचारशक्ती वयाबरोबर कमी व्हायच्याऐवजी वाढत जाते. एनडी पाटील याचे उत्तम उदाहरण आहेत. ८०व्या वर्षीही त्यांचा काम करण्याचा झपाटा पाहून तरूणांनाही लाज वाटावी.
अशाच व्यक्तीमत्वाचे आणखी एक उदाहरण म्हणजे म्हणजे नामवंत शास्त्रज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

अजून काही!

एनडींबद्दल अजून काही माहिती इथे आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर