उत्थान

पुण्यातील श्री. अरविंद हर्षे प्रत्येक दिवाळीला आम्हाला पत्र पाठवून एखाद्या तळागाळातील संस्थेला दिवाळीसाठी धनरुप / वस्तुरुप मदत करण्याविषयी सुचवितात. ह्या वेळी त्यांनी डॉ. भीमराव गस्ती ह्यांच्या संस्थेविषयी लिहून पाठवले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा.

स.न.वि.वि.,

एका समर्पित कार्यकर्त्याचा अल्प परिचय - डॉ. भीमराव गस्ती, एम.टेक. पीएच.डी. मूळ बेळगावचे. रशियातून डॉक्टरेट मिळाल्यावर त्यांनी देवदासींच्या उत्थानाचे कार्य हाती घेतले. ते दु:ख त्यांनी स्वत:च्याच घरी अनुभवले होते. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार इ. झालेल्या आहेत. निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह चालू केले आहे. नुकताच त्यांना इंडियन एक्सप्रेस समुहाचा मॅन ऑफ द ईयर हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. ते अ.भा. बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनी विपुल लेखन सुद्धा केले आहे. त्यांचे बेरड हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांनी सामाजिक समरसता मंच प्रणित समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले आहे. दीपावलीच्या मंगल प्रसंगी आपल्या देवदासी भगिनींची आठवण ठेऊन त्यांना भाऊबीज पाठवावी ही कळकळीची विनंती.

डॉ. भीमरावजी गस्ती, उत्थान ट्रस्ट, १७९, मारुती गल्ली, यमुनापुर, बेळगाव - ५९००१०. दु.क्र. ९७४०६३८९३०.

जळती कितीक युवती
वणव्यात त्या रुढीच्या - धृ.
देवीस त्या वाहती
लेकीच त्या स्वत:च्या
दासी बनून जगती
भोळ्या अजाण बाला - १
दृष्टीस भक्ष्य पडता
झडपाच घालती ते
असती दलाल जगी
या नाही तयांस माया - २
स्वप्नेच रंगविती
देऊन भूलथापा
मुंबापुरीस नेती
सांगून त्या कळ्यांना - ३
भगिनीच त्या अभागी
चुकताच वाट त्यांची
कोणी नुरेच वाली
नरकात त्या पडता - ४
आक्रोश ऐकुनिया
कृष्णापरीस 'गस्ती'
जाती धावूनी ते
साह्यार्थ द्रौपदीच्या - ५
'उत्थान' ते घडाया,
झिजवीच 'भीम' काया
नाही विराम यत्नां
साथीस जाऊ त्यांच्या - ६

कळावें,
आपला नम्र,
अ.स. हर्षे.

Comments

शुभेच्छा !

गस्ती महोदयांचे काम खरेच महत्वाचे आणि स्पृहणीय आहे. त्यांच्या कामास शुभेच्छा !

अश्या तर्‍हेचे अनेकानेक उपक्रम समाजात गाजावाजा न होता चालू असतात. हे उपक्रम राबवणार्‍या तपस्वी लोकांबद्दल आदर वाटतो. वृत्तपत्रातील आणि टिव्ही चॅनेल्स वरील वीट आणणार्‍या भडक बातम्यांत अश्या उपक्रमांच्या माहितीला काहिच स्थान नसते याचा खेद वाटतो.

श्री. अ. स. हर्षे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांना माझा नमस्कार.
--लिखाळ

दुर्दैवाने

वृत्तपत्रातील आणि टिव्ही चॅनेल्स वरील वीट आणणार्‍या भडक बातम्यांत अश्या उपक्रमांच्या माहितीला काहिच स्थान नसते याचा खेद वाटतो.

उपक्रमवर संस्कृत भाषेच्या अस्तित्वाची उठाठेव करणार्‍या लोकांना तरी ह्या चांगल्या माहितीची दखल घ्यावी, त्यावर प्रतिसाद नोंदवावा असे वाटते का? तर नाही.

माझ्यावरचा राग मी समजू शकते पण भीमरावजींचे मोकळ्या मनाने कौतुक करण्याची दिलदारवृत्ती पण ह्या संकुचित विचार करणार्‍या मंडळींकडे असू नये? आणि उपक्रमवर येता जाता बहुजन समाज आणि फुले दाम्पत्य, आंबेडकरांची भलावण करणारे थोर साहित्यिक कुठे गेले? का भीमरावजी त्यांच्या पट्टीत बसत नाहीत? हा तर दांभिकपणा झाला. असो.

पुण्यातील अनेक विद्यार्थी आजही हर्षेकाकांचे नाव काढतात. भारतातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे नाव जुळलेले आहे. निस्पृह आणि निरलस कार्यकर्ता अशी त्यांची ओळख सर्वत्र पसरलेली आहे. गेल्या वर्षी त्यांनी पारधी समाजासाठी चालत असलेल्या यमगरवाडी प्रकल्पाविषयी आम्हाला कळवले होते.

खरोखरच आपण आनंदाच्या प्रकाशात न्हाऊन निघत असताना ज्यांना पणतीची गरज आहे त्यांची पण आठवण ठेवायलाच हवी.

_____________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

प्रतिसाद


माझ्यावरचा राग मी समजू शकते पण भीमरावजींचे मोकळ्या मनाने कौतुक करण्याची दिलदारवृत्ती पण ह्या संकुचित विचार करणार्‍या मंडळींकडे असू नये? आणि उपक्रमवर येता जाता बहुजन समाज आणि फुले दाम्पत्य, आंबेडकरांची भलावण करणारे थोर साहित्यिक कुठे गेले? का भीमरावजी त्यांच्या पट्टीत बसत नाहीत? हा तर दांभिकपणा झाला. असो.


प्रतिसाद हा लेखनाला असला तरी उत्तर वा प्रतिक्रिया देणारा हा लेखकच असतो. जी एंच्या लेखनावर प्रेम करणारी माणसे ही जीएंवर् प्रेम करणारी होतीच् असे नव्हे. प्रतिसाद दिला नाही याचा अर्थ उपक्रमींना भीमरावजींविषयी आकस आहे असा नाही. फार फार तर भीमरावजी आपल्या पर्यंत पोचवणार्‍या व्यक्तिविषयी असु शकतो. लेखनातला वाचकाला जाणवणारा "उद्दामपणा" वा "अभिनिवेश्" हा व्यक्तिसापेक्ष आहे. तो पुर्वग्रहांवर आधारित आहे.संवेदनशीलतेवर आधारित आहे. मांडणीत वाचकांना सुसंवादीपणा वा स्नेहाचे आवाहन वाटले तर वाचक आकर्षीत होतो. त्याला जवळीक वाटते.बौद्धिक उन्माद जर वाटला तर् वाचक लांब पळतो. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशीच राहू द्या असे तो म्हणतो. असे विद्वान लोक पुढे एकाकी पडतात. वाचकांना क्षुद्र लेखल्याची ती एकप्रकारे शिक्षा असते.नंतर त्यांनी वाचकांशी जवळीक साधायचा प्रयत्न केला तरी वाचकाच्या मनात त्याची पुर्वीचीच प्रतिमा असल्याने तो अजुन लांब पळतो.
अवांतर - ही सर्वसाधारण प्रतिक्रिया आहे
(क्षुद्र वाचक)
प्रकाश घाटपांडे

कविता

कविता वाचून प्रिती पाटकर व प्रवीण पाटकर यांनी लिहिलेल्या मानवी लैंगिक वाहतुक या विषयावरील पुस्तकाची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे

डॉ भीमराव गस्ती

ह्यांचे कार्य जवळून पाहण्याचा आणि त्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. जवळपास ५-६ वर्षांची दरी पडल्याने आठवणी काहीशा पुसट झाल्या होत्या... त्या या लेखाने उजळल्या. धन्यवाद!

त्यांच्या कार्यास भाऊबीजेच्या शुभेच्छा!

जरा थांबा

सृष्टीलावण्या,
ज्या सदिच्छेने ही माहिती आणि चर्चा उपक्रमावर् लिहिली त्याबद्दल आभारी आहे. अशा उपक्रमांना सहकार्य करणे आणि इतरांनी करावे असे वाटणे हे कौतुकास्पद आहे.
आपण ही माहिती दिली त्याबद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद.

उपक्रमवर संस्कृत भाषेच्या अस्तित्वाची उठाठेव करणार्‍या लोकांना तरी ह्या चांगल्या माहितीची दखल घ्यावी, त्यावर प्रतिसाद नोंदवावा असे वाटते का? तर नाही.
माझ्यावरचा राग मी समजू शकते पण भीमरावजींचे मोकळ्या मनाने कौतुक करण्याची दिलदारवृत्ती पण ह्या संकुचित विचार करणार्‍या मंडळींकडे असू नये? आणि उपक्रमवर येता जाता बहुजन समाज आणि फुले दाम्पत्य, आंबेडकरांची भलावण करणारे थोर साहित्यिक कुठे गेले? का भीमरावजी त्यांच्या पट्टीत बसत नाहीत? हा तर दांभिकपणा झाला. असो.


-खरच की कोणीच कसे इथे लिहायला नाही?

प्रशासनाला विनंती-
याकडे जमेल तेव्हा लक्ष द्यावे-
वरवर चांगल्या हेतूचा /उपक्रमाचा आव आणून न व्यक्तिगत हल्ले आणि टिकाटिप्पणी वारंवार होत असेल चांगल्या हेतूवर पाणी पडते. (खरच चांगला हेतू होता का?अशी शंका येते) प्रत्येकाने आपला वेळ् कसा घालवावा ही अतिशय व्यक्तिगत् गोष्ट आहे. इथे प्रतिसाद देणे न देणे हा प्रत्येकाचा निर्णय आहे. त्यावर टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही. याची समज इथे कसे वागावे मध्ये आहे का? नसल्यास तशी तरतूद करावी.

 
^ वर