काश्मीरचा स्वातंत्र्यदिन (स्वामिनाथन अय्यर यांच्या लेखाचा अनुवाद) - २

भाग १ वरून पुढे

दुर्दैवाने सहा दशकांपैकी बहुतांश काळ काश्मीरमध्ये लोकशाही म्हणजे एक तमाशा बनून राहिला आहे. ही कीड १९५१ मध्ये शेख अब्दुल्लांपासून सुरू झाली. त्यांनी जवळजवळ सर्व विरोधकांचे उमेदवारीचे अर्ज फेटाळून लावले आणि त्यामुळे ७५ पैकी ७३ जागी बिनविरोध विजय मिळवला. लोकशाहीच्या या फसवणुकीत नेहरूही सहभागी होते.

पुढील निवडणुकातही दिल्लीने नेमलेल्या उमेदवाराच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले. फक्त १९७७ मधील निवडणूक निष्पक्ष वातावरणात झाली आणि त्यात शेख अब्दुल्लांचा विजय झाला. काही वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला आणि १९८८ पासून निवडणुकीत गैरव्यवहारांना पुन्हा सुरुवात झाली. त्यातूनच फुटिरतावादी उठावाला सुरुवात झाली.

काश्मीरात बर्‍याच कालावधीसाठी राहिलेल्या शांततेचा दाखला देऊन अनेक भारतीय म्हणतात की फुटिरतावादी अल्पसंख्य आहेत. पण ब्रिटिशांच्या राज्यातही चळवळीचे काही अपवाद वगळता बरेच असे शांततेचे कालखंड होते. आणि चळवळीत पन्नास कोटी लोकांपैकी फक्त काही लाख लोक सहभागी होते. १९४२ मध्ये एक लाख लोक भारत छोडो चळवळीत सहभागी झाले त्याचवेळी २५ लाख इतर भारतीय ब्रिटिश साम्राज्याच्या बाजूने लढण्यासाठी ब्रिटिश सैन्यात सामील झाले.

बहुसंख्य भारतीयांना नोकरी हवी आहे आणि सर्वसामान्य आयुष्य जगायचे आहे असा अर्थ ब्रिटिशांनी काढला. ब्रिटिशांनी भारतात रेल्वेमार्ग तयार केले, जगभरात कालवे बनवले. बहुसंख्य भारतीय या अर्थिक प्रगतीने समाधानी आहेत आणि काही अल्पसंख्य उपद्रवी लोकच स्वातंत्र्याची मागणी करत आहेत असे त्यांचे म्हणणे होते. या प्रतिक्रियेत आणि काश्मीरी लोकांच्या स्वातंत्र्याच्या मागणीविषयी भारत सरकारच्या अधिकृत प्रतिक्रियेत अस्वस्थ करण्याइतके साधर्म्य आहे.

मला अतिशयोक्ती करायची नाही भारताचे काश्मीरवरील राज्य काही पारंपरिक साम्राज्यवाद म्हणता येणार नाही. भारताने काश्मीरमध्ये प्रचंड पैसा ओतला आहे आणि ब्रिटिश सरकारप्रमाणे काही महसूल वसूल केला नाही. काश्मीरी नागरिकांना वैधानिक अधिकार आहेत जे ब्रिटिशांच्या काळात नव्हते. काही निवडणुकाही निष्पक्ष वातावरणात झाल्या.

भारताने काश्मीरच्या विलिनीकरणाची इच्छा केली काश्मीरवर फक्त राज्य करण्याची इच्छा बाळगली नाही. पण तरीही काश्मिरी लोकांना स्वातंत्र्य पाहिजे आहे. हेतू कितीही चांगला असला तरी दीर्घकाळ लोकांच्या विरोधाला न जुमानता त्यांच्यावर राज्य करणे हा एक प्रकारचा साम्राज्यवादच झाला.

काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचे वचन आपण सहा दशकांपूर्वी दिले होते. आता ते घेऊ आणि त्यांना तीन पर्याय देऊ : स्वातंत्र्य, पाकिस्तानात विलिनीकरण, भारतात विलिनीकरण. यातून काश्मिरी लोक स्वातंत्र्यच निवडतील हे जवळजवळ नक्की आहे. जम्मू आणि बहुतेक लडाख भारतात राहण्याचा निर्णय घेतील. काश्मीर विषयी राजकारणि आणि लष्कराच्या ऐवजी काश्मीरच्या लोकांना निर्णय घेऊ दे.

समाप्त

मूळ लेख
SWAMINOMICS
Independence Day for Kashmir
Swaminathan Aiyar
http://timesofindia.indiatimes.com/Opinion/Columnists/Swaminathan_A_Aiya...

Comments

लेख आवडला.

लेख आवडला. भाषांतर करुन इथे उपलब्ध केल्या बद्दल नविन ह्यांचे आभार.

काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचे वचन आपण सहा दशकांपूर्वी दिले होते. आता ते घेऊ आणि त्यांना तीन पर्याय देऊ : स्वातंत्र्य, पाकिस्तानात विलिनीकरण, भारतात विलिनीकरण. यातून काश्मिरी लोक स्वातंत्र्यच निवडतील हे जवळजवळ नक्की आहे. जम्मू आणि बहुतेक लडाख भारतात राहण्याचा निर्णय घेतील. काश्मीर विषयी राजकारणि आणि लष्कराच्या ऐवजी काश्मीरच्या लोकांना निर्णय घेऊ दे.

सहमत!

रोचक

काय म्हटले आहे ते रोचक आहे, आणि कोण म्हणत आहे, तेही रोचक आहे.

हे स्वामिनाथन म्हणजे कोणी अरुंधती रायचे पुरुषावतर नसावेत.

आताच त्यांच्या "स्वामिनॉमिक्स" अनुदिनीवर जाऊन त्यांचे अन्य लेख वाचलेत.

गुजरात येथील मोदीशाहीतील हिंसा काँग्रेसच्या शिखांविरुद्ध दिल्ली-हिंसेपेक्षा वाईट नाही (दुवा), बोगस सोशलिझम (दुवा), समाजवादी पक्ष आणि कम्यूनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) हे अतिरेकी मुसलमान संघटनांची मदत घेतात (दुवा).

(हा मनुष्य स्यूडो सेक्युलर मानला जातो का? या वर्गीकरणाच्या बाबतीत मी तसा अनभिज्ञ आहे. पण पूर्वीचे लेख बघून बुवा तसा उजवखुरा असावा अशी शंका येते.)

स्वामिनाथन अय्यर

स्वामिनाथन अय्यर हे बर्‍यापैकी प्रसिद्ध अर्थतज्ञ/अर्थविषयक लेखक आहेत. दर रविवारी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्यांचे स्वामीनॉमिक्स नावाने वेगवेगळ्या विषयांवर लेख येतात. (नवीन यांनी अनुवादित केलेला लेख गेल्या रविवारी आला होता बहुतेक, म्हणजे अरुंधती रॉय यांच्या वक्तव्याच्या आधी) वृत्तवाहिन्यांवरही वावर असतो. इकॉनॉमिक टाइम्स चे कन्सल्टिंग एडिटर आहेत असेही कळते. त्यांचा कल कोणत्याही विशिष्ट बाजूकडे आहे असे वाटत नाही कारण त्यांनी त्यांच्या लेखांमध्ये प्रसंगानुसार सर्वांवर अनुकूल/प्रतिकूल टिप्पणी केलेली असते.

सहमत आहे

अय्यरशेठ बर्‍यापैकी लिहितात असे माझेही निरीक्षण आहे. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अरुंधती

अरुंधतींचे म्हणणे म्हणजे हा लेख का? दोन्ही लेख पटण्याजोगे वाटले.

लेख

तसे बॉर्डरवरचे अनेक प्रदेश असे निघतील ज्यांना दुसर्‍या देशात सामील व्हायचे आहे. लेखातल्या बर्‍याच गोष्टी खर्‍या असतील. सार्वमताचे वचन देउन न घेणे आपली चुकच आहे. परंतु सार्वमत घेऊ ह्याचे वचन देणे हीच त्याआधी केलेली चुक वाटते. असो. आता काश्मीर भारतात आहे.तेंव्हा आता तिथल्या लोकांना स्वातंत्र्याची संधी देणे (भारतापासुन वेगळे होण्याची संधी देणे) ही चुक ठरणार नाही का. या बोलण्यात विरोधाभास वाटत् असेल. परंतु, काश्मीरला स्वातंत्र्याची संधी दिल्यानंतर् भारतातील इतर भागांमधे काय परिणाम होतील. याचा विचार अय्यर साहेबांनी केलेला दिसत नाही.

असो, असे लेख म्हणजे काश्मीर वर उदक सोडण्याची नांदी आहे काय?

- सूर्य.

काश्मीर

लेख वाचले.हल्ली आमचे ही मत काहीसे काश्मीर सोडून द्या असेच होते आहे. जुन्या राजकारण्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हट्टापायी आज समस्त भारतीयांच्या घामाची आणि रक्ताची अवहेलना होत आहे. काश्मीर प्रश्न हा आजवर फक्त भावनीकरित्या हाताळण्यात आला आहे असे नाही का वाटत? विचार केल्यास काही मुद्दे समोर येतात.
काश्मीरवरचा हक्क सोडणे:
ज्यांना भारतात राहायचेच नाही त्यांना मारुन मुटकुन काय होणार आहे? त्यापेक्षा त्यांना वेगळे करा. त्यांच्या सोबत एक राष्ट्रासोबत ठेवायचे तेच संबंध ठेवा. परत त्यांना सामावून घेतलेच तर मग लष्करी बळावर कायमचे घ्या आणि विरोधकांना कायमचे संपवा.
काश्मीरला स्वातंत्र्य दिले तर पुर्वेकडची राज्ये ही हेच मागतील आणि दक्षिणेकडचे एक राज्य सुद्धा. पण यांना वेगळे केले आणि हे मुद्दे कायमचे संपवले तर भारताचे काही प्रमाणात का होईन प्रश्न सुटतील.
भारताच्या आर्थिक राजधानीतुन म्हणजेच महाराष्ट्रातुन आणि इतर भारतीय घटने सोबत एकरुप असणार्‍या राज्यातुन जो काही महसुल गोळा होतो, तो या सर्व राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी खर्च होतो. विकास कोणाचाच नाही. ना आमचा ना त्यांचा. पैसा मात्र वाया.
मोदींनी जेंव्हा मध्ये करासंदर्भात वक्तव्य केले त्यावेळी फारसे कोणी बोललेच नाही. ते काही प्रमाणात बरोबर होते आणि काही प्रमाणात चुक. पण जेथे भारताच्या राष्ट्रीय राजकारणात राज्यपातळीच्या पक्षांचेच बळ वाढत चालले आहे तेथे राष्ट्रीयत्वाची भावना येणे अवघड आहे. कदाचित उद्या भारताची अनेक शकले होतील. सत्तेचा हव्यास भारतीयांचा नेहमीच रसातळाला घेउन गेला आहे. भारतीयांना स्वतःचे राज्य योग्य प्रकारे संघटीत करून चालवता येत नाही आणि परकियच चांगले राज्य करतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

ख्रिश्चन इंग्रजांना हिंदू आणि मुसलमानांनी एकजुट होउन घालवले (?) हे विधान मान्य केले तर त्याच वेळी पाकिस्तानची निर्मीती होत असताना मुसलमानांना वेचुन वेचुन पाठवले असते, कदाचित काश्मीर सुद्धा देवुन टाकले असते तर आज भारत कितीतरी प्रगत आणि हिंदू राष्ट्र बनला असता. पण त्यावेळी सुद्धा सत्ता आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नसते विलिनीकरण केले आणि आज आम्ही तन, मन आणि धनापासून असलेले भारतीय, रोज त्याची किंमत मोजतोय. आजुबाजुला पाहिलं तर विस्थापित काश्मीरी हिंदूंना आम्ही वर लिहिलेल्या भारतीयांनी कधीच सामावुन घेतल आहे.

काश्मीरला स्वातंत्र्य दिले तर पाक सोबत योग्य ती भाषा बोलायला आम्हाला नक्कीच हक्क आहे. पण सदासर्वदा धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घालुन वावरणार्‍या आमच्या, खास करून काँग्रेसच्या राजकारण्यांना ते या काय कोणत्याच जन्मात जमणार नाही. फार तर फार, सुशिक्षीत हिंदू त्यांना शक्य तेथे स्थलांतर करत जातील. आपल्यात इतरांना सामावून घेणे आणि आपण इतरांशी जुळवून घेणे हे हिंदूंचे रक्त आहे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. असे झाले तर अजुन काही दशकांनी भारतातल्या नव बौंद्धांना मुस्लिम आक्रमणाला तोंड द्यावे लागेल अथवा सम्स्त भारत एक मुस्लिम राष्ट्र बनेल आणि त्यातुन काही येथे उरलेच तर ते अल्पसंख्यांक म्हणजे हिंदू असतील.

आत्ता हे वाचताना अतिरेकी नक्कीच वाटेल पण कदाचित भविष्यात पटेल.

प्रश्न सुटतील ?

शरद
काश्मीरला स्वातंत्र्य दिले तर पुर्वेकडची राज्ये ही हेच मागतील आणि दक्षिणेकडचे एक राज्य सुद्धा. पण यांना वेगळे केले आणि हे मुद्दे कायमचे संपवले तर भारताचे काही प्रमाणात का होईन प्रश्न सुटतील
बांगला देश स्वतंत्र झाला तेंव्हा आपण लष्करी जोरावर त्याला सामिल करून घेऊ शकलो असतो. आपण तसे केले नाही. पण
त्यामुळे घुसखोरांचा प्रश्न सुटला का ? काश्मीरला स्वतंत्रता देऊन आज जे युध्द एल.ओ.सी. वर चालले आहे ते जम्मुच्या हद्दीवर
येणार नाही याची काय खात्री ?
समित्पाणी

कठोर निर्णय

इतरांना हवे ते दिले कि उरलेल्या भारताला कठोर निर्णय घेणे नक्कीच सोपे जाईल. खासकरून धर्मांधांच्या विरोधात.

दक्षिणेकडचे एक राज्य सुद्धा

दक्षिणेकडच्या 'त्या' राज्याची द्रविडीस्तानची मागणी आता नाही असे वाटते. बहुधा जयललिता यांच्याशी कराव्या लागणार्‍या स्पर्धेमुळे द्रमुकचे धोरण थोडे मवाळ झाल्यासारखे वाटते. गेली काही वर्षे ऐकल्याप्रमाणे करुणानिधी यांच्या मते भारताने फेडरल पद्धतीप्रमाणे राज्यांना राज्यकारभारात अधिक स्वायत्तता द्यावी. केंद्रीय सरकारचे राज्यावरील नियंत्रण थोडे सैल करून ते हक्क स्थानिक राज्य सरकारांना द्यावेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लेख आवडला

भारताने काश्मिरच्या बाबतीत ऐतिहासिक चुका केल्या आहेत असे मलाही वाटते. परंतु आता देशाची पुन्हा पुन्हा फाळणी करत बसणे अयोग्य वाटते कारण हे दुष्टचक्र थांबायचे कोठे? दोन्ही देश काश्मिरप्रश्नावर सामोपचाराने तोडगा काढतील तरच प्रश्न योग्य मार्गाने आणि रितीने सुटू शकेल असे वाटते.

लेख भाषांतर करून येथे देण्याबद्दल धन्यवाद.

++++१

++++१
अगदी असेच म्हणतो
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

आत्याबाईंच्या मिशा

ज्या दिवशी हे होईल, त्या दिवशी दोन्ही देशांना माझ्या दोन मिशी फुटलेल्या आत्या समजून 'काका!!!!!!' म्हणून (किंवा कदाचित 'काका!!!!! मला वाचवा!!!!!!' म्हणूनसुद्धा!) हाक मारून घट्ट मिठी मारेन!

एलेन डी जेनेरेस आणि पोर्शिया दी रॉसी यांच्या लग्नाची बातमी वाचली का हो? पन्नास वर्षांपूर्वी हे शक्य नाही असेच बहुतांश लोकांनी म्हटले असते. आत्याबाईंना मिशा येणेही कठीण नाही. हार्मोन्समध्ये थोडे फेरफार करण्याची गरज आहे एवढेच. दोन्ही देशांतही हे शक्य होईलही, तेव्हा आशा ठेवा हे ही होईल. :-)

हेच

असेच म्हणतो.

बुद्धीभेद

भारतातला मध्यमवर्गीय बुद्धीजीवी वर्ग काश्मिरात होणार्‍या प्रकारांनी स्तीमित झालेला आहे.
स्वतः करण्यासारखे हाती काहीही बळ नाही.
विचारांशी प्रामाणिक राहणारे नेतृत्व नाही.
विचारातून कार्यसिद्धी करण्यासाठी आवश्य असे सामान्य जनतेचे पाठबळ आता उरलेले नाही.
अजाण बहुसंख्येकडे विचारांना मानण्याची मानसिकता नाही.
अशा परिस्थितीत केवळ हतबल होऊन सर्व पहात राहाण्यापलिकडे या वर्गाकडे पर्याय नाही.
वास्तवाशी कधीही संबंध नसलेले आणि देशाशी वैचारिक बांधिलकी नसलेले तथाकथित विचारवंत असे फुटीर विचार उघडपणे मांडून या शबलतेला एक सोनेरी मुलामा चढवत आहेत. एक नैतिक अधिष्ठान देत आहेत.

म्हणजे (ईश्वर करो आणि तसे न होवो) उद्या काश्मिर स्वतंत्र झालेच तर ,"बघा, आम्ही किती मोठ्या मनाचे आहोत. विचारांनी देशप्रेमासारख्या संकुचित भावनेवर मात केली आणि काश्मिरी लोकांना त्यांचे प्रिय स्वातंत्र्य देऊन टाकले" असे 'गिर्‍या तोभी टांग उप्पर' म्हणायला मध्यमवर्गीय बुद्धीजीवी मोकळे.

असे विचार समाजात उघडपणे मांडणे हा देशद्रोह आहे.

जरा इतर देशांकडे पहा. 'माझे ते माझे आणि तुझे तेही माझे' अशी नीती बाळगत मोठ्या अभिमानाने जगात मिरवतात. चीन = तिबेट + अक्साई चीन + तैवान , पाकिस्तान = आझाद काश्मिर , रशिया = दक्षिण ओसेटिया , अमेरिका = कुवेत + इराक... तुमचे वैचारिक डोस त्यांना पाजा आणि पहा काय उत्तरे मिळतात.'बळी तो कान पिळी ' हा न्याय सर्वत्र लागू होतो हे विसरू नये.

काश्मिरला स्वातंत्र्य मिळाले तर देशाला उत्तरेत आणखी एक शत्रू मिळेल याची खात्री आहे. बांगला देशाचे उदाहरण समोर आहेच. आता नेपाळही माऑवाद्यांच्या (म्हणजे अन्वयाने चीनच्या) ताब्यात गेला.
काश्मिरही द्या.
अरे, आणि हैदराबाद तर भारताने चक्क जिंकून घेतले. हा धडधडीत अन्याय आहे. युनोकडे निझामाच्या मानवी हक्कांची पायमल्ली झाली म्हणून दाद मागा.
गोवाही भारताने गिळला आहे. तोही द्या. अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणीपूर, आसाम हवेतर पंजाबही द्या. दक्षिणेत तामिळनाडू ..

शाबास!
काय लॉजिक आहे...

स्वातंत्र्य

म्हणजे (ईश्वर करो आणि तसे न होवो) उद्या काश्मिर स्वतंत्र झालेच तर ,"बघा, आम्ही किती मोठ्या मनाचे आहोत.
काश्मीर 'वेगळे' होण्याला विरोध आहे की 'स्वतंत्र'? भारताचा काश्मीरवर कब्जा वगैरे असावा असे हे वाक्य वाचताना वाटले.

२२ फेब्रुवारी १९९४

२२ फेब्रुवारी १९९४ ह्या दिवशी संसदेने एकमताने संमत केलेला ठराव वाचण्यासारखा आहे.

त्यातील शेवटचा भाग असा आहे:
"The state of Jammu and Kashmir has been and shall be an integral part of India and any attempts to separate it from the rest of the country will be resisted by all necessary means.

"India has the will and capacity to firmly counter all designs against its unity, sovereignty and territorial integrity and demands that Pakistan must vacate the areas of the Indian state of Jammu and Kashmir which they have occupied through aggression."

काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.
काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे. काश्मिर हा भारताचाच भाग आहे.

लेट काश्मीर गो?

टाइम्स ऑफ इंडिया ने केलेल्या सर्वेक्षणाची बातमी.

चांगला अनुवाद

हा दृष्टिकोन सांगणार्‍या लेखकाच्या लेखाचा अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.

 
^ वर