निमंत्रण - गुरुपौर्णिमा महोत्सव - २००८

गुरुपौर्निमेच्या हार्दिक शुभेच्छा !


गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'

निमंत्रण

प.पू. भक्‍तराज महाराज, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान

श्री गुरवे नम: ।

सप्रेम नमस्कार,

श्री व्यासपूजा व प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्रतिमापूजन सोहळा आषाढ पौर्णिमा, कलीयुग वर्ष ५११०, शुक्रवार, १८ जुलै २००८ रोजी साजरा होणार आहे. संस्थेतर्फे या वर्षी भारतात १७६ तर विदेशांत १९ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या सोहळयाला आपण सहकुटुंब उपस्थित राहून अमोल सत्संग व प्रवचने यांचा लाभ घ्यावा, ही विनंती.

कार्यक्रमाचे स्वरूप : श्री व्यासपूजा, गुरुपूजन व प्रवचन
प्रवचनाचा विषय : धर्माचरणाचे महत्त्व हिंदु धर्माची सद्यस्थिती व तिच्यावरील उपाय हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी बालसाधकांनी केलेले प्रबोधन !
विशेष मार्गदर्शन : राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांच्याशी संबंधित विषयांवर संत किंवा हिंदुत्ववादी नेते किंवा संरक्षणदलातील निवृत्त अधिकारी यांचे मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमाविषयक माहिती येथे वाचा

Comments

किती वाजता?

मित्रा...किती वाजता आणि कुठे यायचे हे तर लिहिलेच नाहीस..

हे म्हणजे बरे आहे...कॉल कर म्हणायचे आणि नंबरच द्यायचा नाही.

अभिजित
अनियमिततेतही एक सुसुत्रता असते.

सनातन

सनातन ही संस्था पुण्याची दिसते!

आपला
गुंडोपंत

छान

गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने प्रवचनाच्या माहितीबरोबर काही प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या जीवन कार्यावर काही माहिती दिली असती तर वाचायला आवडले असते.हिंदु धर्माची सद्यस्थिती व तिच्यावरील उपाय हा तर आमचा आवडता विषय आहे. तसे सनातनच्या दुव्यावर जाऊन आलो. पण अशा विषयावर उपक्रमवर वाचन आणि चर्चा करतांना आमच्या आनंदाला पारावर उरत नाही.

निमंत्रण पोहचले आम्ही आपले आभारी आहोत.

संपादित

प्रतिसाद संपादित

सामाजिक बांधिलकी

आसले लै पप्पु महाराज
पाहिले हो!

पण त्यांचे काही तर योगदान असेल ना, की उगाच लोक गर्दी करतात त्यांच्यासाठी.
तसा गारुड्याने पोतडीत हात घातल्यावरही गर्दी होते, पण काही गर्दी अनेक दिवस टिकते.
काही विषय हे भावाचे ,काही बुद्धीचे असतात काही लोकांना आपण बुद्धीतून पाहतो कधी-कधी भावातून... तेव्हा असे उद्गार निघतात.
तेव्हा अशाच काही अध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकीवर काही लेख आले पाहिजे असे वाटते.

हेच!

तेव्हा अशाच काही अध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकीवर काही लेख आले पाहिजे असे वाटते.

अहो हेच तर म्हणतो मी. काही चांगले लेखन् यावे. नुस्त्या पुजा बांधून काही समाजाचे भले होत नाही.
अर्थात नुसते विज्ञानानेही होत नाहीच म्हणा.

दारू प्यायल्याने दु:ख कमी होत नाही, पण म्हणून दूध प्यायल्याने तरी कुठे कमी होते?

आपला
गुंडोपंत

गुरु महाराज गुरु

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गुरु महाराज गुरू
....धार्मिकगुरू आसारामबापू यांच्या आश्रमात दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला.ही दोन्ही मुले आसारामबापूंच्या गुरुकुलात शिक्षण घेत होती.त्यांचे मृतदेह साबरमती नदीत संशयास्पदरीत्या आढळले. संतप्त लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त शहरात(अहमदाबाद) लागलेली पोस्टेर्स त्यांनी खाली उतरवून फ़ाडली.(सकाळ:१७ जुलै,२००८)
..................................................
***काही वर्षांपूर्वी सत्यसाईबाबांच्या पुट्टपर्ती येथील आश्रमात दोन तरुणांचा खून झाल्याची बातमी होती. पुढे हे प्रकरण दडपले गेले असे वाचले.
................

बोला!

बोला!! यनावाला महाराज की जय!

आपला
गुंडोपंत

बाँबस्फोट | बौद्धिक, कार्यशाळा?

खरे आहे. ठाण्यात झालेला बाँबस्फोट सनातन भारतीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला होता असे पोलिस चौकशीत बाहेर आले आहे. त्यात अनेक हिंदू लोकांना इजा झाल्याचे समजले. सनातन च्या आश्रमातूनच आरोपींना अटक करण्यात आली. या लोकांच्या मनात एवढा द्वेषभाव निर्माण होण्याच्या कारणांचा तपास व्हावा.

प्रवचनाचा विषय : धर्माचरणाचे महत्त्व हिंदु धर्माची सद्यस्थिती व तिच्यावरील उपाय हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी बालसाधकांनी केलेले प्रबोधन !
विशेष मार्गदर्शन : राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांच्याशी संबंधित विषयांवर संत किंवा हिंदुत्ववादी नेते किंवा संरक्षणदलातील निवृत्त अधिकारी यांचे मार्गदर्शन !

हिंदू धर्माचे रक्षण आणि राष्ट्ररक्षणाच्या नावाखाली द्वेषमूलक प्रचार करण्याऐवजी गुरुपौर्णिमेनिमित्त काही विधायक केलेले चांगले.

अवांतर - भारतातील लोकशाही उलथून टाकणे यावर बौद्धिक (हे मुख्य तत्त्व म्हणून उपक्रमावर आधी आलेल्या काही विनोदवीरांनी सांगितल्याचे आठवते) किंवा अंगात भूत आल्याचा अभिनय करण्याची कार्यशाळा वगैरे कार्यक्रम कधी होतील?

अनपेक्षित वर्तणुकीकडे शांतचित्ताने बघणारे

गृहस्थ असलेली एक चित्रफीत मागे उपक्रमावर बघितली होती.

खिडकी बाहेर एक स्त्री सामान्य आयुष्यात दिसते त्यापेक्षा वेगळी वर्तणूक करत होती, आणि आत एक गृहस्थ निश्चल बसले होते. या लेखात ज्यांचे चित्र आहे, ते गृहस्थ तेच का?

हो तेच ते

हो तेच ते ह्यांचे सर्वेसर्वा.

नाही हो!

यांना मिशी आहे त्यांना नव्हती. ती व्यक्ती अंमळ बारिकही आहे. ;-)

फरकाचा हा प्रतिसाद लिहिताना गंमत वाटत होती.

फोटोतले नव्हेत

फोटोतले गृहस्थ ते नव्हेत. फोटोतली व्यक्ती विडिओतल्या व्यक्तीच्या गुरुस्थानी वगैरे आहे असे वाटते. पण विडिओतील गृहस्थ या संस्थेचे सर्वेसर्वा असावेत.

गुरुपोर्णिमा उत्सव

असे अनेक गुरुपोर्णिमा उत्सव महाराष्ट्रभर होत असतात, त्यांतला एक चिंचवड येथे आहे.
पत्ता: काशीधाम मंगल कार्यालय, पवनानगर सोसायटी, सुपरटेक हॉस्पिटलजवळ, चैतन्य सभागृहाच्या पाठीमागे, चिंचवड, पुणे ३३.
वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ५.
विशेष:- इथे कुणीही संत, हिंदुत्ववादी नेता किंवा सेवानिवृत्त सैनिक अधिकारी नसेल. फक्त एक योगशिक्षिका आणि त्यांचे योग्याभ्यासी शिष्य असतील.

गुरूपौर्णिमा सभागृहाचे पत्ते

सप्रेम नमस्कार,
श्री व्यासपूजा व प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्रतिमापूजन सोहळा आषाढ पौर्णिमा, कलीयुग वर्ष ५११०, शुक्रवार, १८ जुलै २००८ रोजी साजरा होणार आहे. संस्थेतर्फे या वर्षी भारतात १७६ तर विदेशांत १९ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या सोहळयाला आपण सहकुटुंब उपस्थित राहून अमोल सत्संग व प्रवचने यांचा लाभ घ्यावा, ही विनंती.

कार्यक्रमाचे स्वरूप : श्री व्यासपूजा, गुरुपूजन व प्रवचन
प्रवचनाचा विषय : धर्माचरणाचे महत्त्व हिंदु धर्माची सद्यस्थिती व तिच्यावरील उपाय हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी बालसाधकांनी केलेले प्रबोधन !
विशेष मार्गदर्शन : राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांच्याशी संबंधित विषयांवर संत किंवा हिंदुत्ववादी नेते किंवा संरक्षणदलातील निवृत्त अधिकारी यांचे मार्गदर्शन !

वेळ : साय. ६.३०

गुरूपौर्णिमा सभागृहाचे पत्ते :

भाषा : मराठी
पत्ता : श्री कच्छ जैन महाजन सभागृह, (नप्पू सभागृह),चिंचपोकळी, महाजनवाडी, डॉ। आंबेडकर मागॅ, जयहिंद सिनेमासमोर, मुं - १२.
संपर्क : ९३२४१३३९४६

भाषा : हिन्दी
पत्ता : यशोमंगल सभागृह, फडकेवाडी, गणेशमंदिर, विठ्ठलभाई पटेल मार्ग, सिक्कानगरसमोर,गिरगाव, मुंबई- ४००००४.
संपर्क : ९३२३६३०६३९

भाषा : कन्नड
पत्ता : चंद्रप्रभा सोसायटी सभागृह, कुर्ला, नागरी बँकेसमोर, भांडूपगाव (पू.)
संपर्क : ९३२२०९०५१२

भाषा : मराठी
पत्ता : जैनम् बँकेट सभागृह, जैनम् ऑकेड, बी.टी. एम. कंपाउंड, एल.बी. एस.मार्ग, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, भांडूप (प.) मुं.७८
संपर्क : ९३२४७८३२८२

भाषा : मराठी
पत्ता : गोमांतक सेवा संघ, उत्कर्ष मंडळाशेजारी, मालवीरा रोड, विलेपार्ले (पू.) मुंबई- ४०००५७
संपर्क : ९३२२०६२६९९

भाषा : मराठी
पत्ता : ठाणे जिल्हा मच्छिमार समाज सभागृह, २रा मजला, दर्यासारंग शॉपिंग सेंटर, पाचबत्तीजवळ, माहिम रोड, पालघर, जिल्हा ठाणे
संपर्क : ९४२२६९०३३९

भाषा : मराठी
पत्ता : सौराष्ट्र पटेल सभागृह, सेक्टर क्रमांक। २, ओरिएंटल कॉलेजशेजारी, सानपाडा (पू.)
संपर्क : ९३२४८९५८५२

Language: English

The workshop will include:
1.Understanding how the spiritual dimension can affect our lives
2.Shedding light on the causes of problems that could be spiritual in nature
3.Exploring some spiritual remedies that you can implement to alleviate them

Time: 3.00 PM - 5.00 PM
Address : Seattle Public Library, Seattle (WA), USA On (Sunday, 20 July २००८)

 
^ वर