ओम् फट् स्वाहा|

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आलेला महेश कोठारेंचा झपाटलेला आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असावा. त्यातील दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेले तात्या विंचूचे पात्र आणि रामदास पाध्यांचा बोलका बाहुला अद्यापही लक्षात आहे. तात्या विंचूचा परकाया प्रवेशासाठी वापरला जाणारा मंत्र मात्र बराचसा विसरले आहे. तरी त्यातील शेवटची पंक्ती ओम् फट् स्वाहा| ही चांगलीच लक्षात आहे. त्यावेळेस कोणीतरी सांगितल्याप्रमाणे असे श्लोक अथर्ववेदात येतात किंवा जारण-मारण आणि इतर तांत्रिक विधींत वापरले जातात. (चू. भू. दे. घे)

नुकत्याच चाललेल्या एका चर्चेमुळे अथर्ववेदासंबंधी थोडीशी माहिती मिळवाविशी वाटली. मला माहित असणार्‍या अत्यल्प माहितीनुसार --

अथर्व वेदाची रचना भृगु आणि अंगीरस या दोन मुख्य ऋषी आणि त्यांच्या गणातून झाली. या शिवायही इतर ऋषींच्या रचना त्यात येतात. या अथर्ववेदाबद्दल अनेक वाद-प्रवाद आहेत आणि ते तज्ज्ञांकडून मांडले किंवा खोडले जातात. त्यापैकी काही प्रवाद खाली देत आहे (त्यांच्या सत्यासत्यावर खाली चर्चा व्हावी)

१. अथर्ववेदाला इतर वेदांप्रमाणे मान्यता नव्हती. वेदांत त्याची गणना बर्‍याच काळानंतर झाली.
२. पहिल्या मुद्द्याचे कारण अथर्ववेद हा जादू, मंत्र, तंत्र, जारण-मारण यासंबंधी भाष्य करतो.
३. ब्राह्मणी आचारांपेक्षा अथर्ववेद हा स्थानिक लोकांच्या (आर्यांच्या?) तत्कालीन जीवन आणि राहणीवर प्रकाश टाकतो.
४. अथर्ववेदात येणारा गायत्री मंत्र हा वापरातील गायत्री मंत्रापेक्षा वेगळा आहे.

तरी, मला सध्या पडलेले काही प्रश्न असे -

१. हल्ली बर्‍याच मुलांचे नाव अथर्व असते. गणपती अथर्वशीर्षावरून अनेकजण अथर्व या शब्दाचा अर्थ गणपती असा करतात. अथर्वचा खरा अर्थ काय? गणेश ही देवता जी पूर्वी अघोर मानली जाई तिचा अथर्ववेदाशी संबंध आहे का?
२. जारण-मारण आणि तांत्रिक विधींसाठी पूजनात येणार्‍या देवता कोणत्या?
३. ओम् फट् स्वाहा या वाक्याचा अर्थ काय आणि तो नेमका कोठे वापरण्यात येतो?
४. जर अथर्ववेद मुख्य वेदांचे अंग म्हणून गणला जात नव्हता तर त्याची चार वेदांत गणना कधीपासून होऊ लागली?

अथर्ववेद आणि त्यातील काही जारण मारण मंत्र येथे मिळतील.
विकिपीडियावर अथर्ववेद येथे सापडेल.

विशेष सूचना : ही चर्चा गंभीरपणे चालावी आणि त्यातून काही दडलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असा हेतू आहे. महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर, बोलक्या बाहुल्या आणि इतर विषयांसाठी वेगळी चर्चा सुरू करावी.

Comments

बीज मंत्र.

(बहुधा) मनाच्या शक्ती वाढविण्यासाठी अनेक बीज मंत्राचा वापर होत असतो. उदा. फट्, क्लिम, रिम, र्‍हिम इत्यादी इत्यादी.

दुसरे असे की अनेक देवता, कल्पना या काळानुसार बदलत जातात. उदा. असूर हे पारश्यांच्या धर्मप्रणाली नूसार अहुर म्हणजे देवता होत जातात. उदा अहुरमस्ज म्हणजे वरुण देवता.

विषय चांगला आहे आणि आपले सांगणे येथेच संपले आहे.

मी वाचले ते असे -

अथर्व म्हणजे पुरोहित, या नावाचे एक ऋषी होते. त्यांनी हे वेद प्रकाशात आणले.
अथर्व वेदात एक पृथ्वी सूक्त आहे, इतर देवता आहेत ज्यांचा उल्लेख बाकीच्या तीन वेदांत नाही.

गायत्रीसंबंधी - बाकीच्या तीन वेदांना एक त्रिपाद गायत्री आहे. अथर्ववेदासाठी एक वेगळी गायत्री आहे आणि त्यासाठी वेगळा उपनयन संस्कार आहे.

अथर्ववेद हा उत्तरेकडे अधिक प्रचलित आहे, दक्षिणेकडे कमी. ओरिसात अठरा ब्राह्मण जाती आहेत त्यातील एक जात अथर्वणि(नि)क समजली जाते.
गुजराथ, सौराष्ट्र आणि नेपाळमध्ये काही ठिकाणी अथर्ववेदी लोक राहतात.

प्रश्न, मूंडक आणि मांडूक्य ही उपनिषदे या वेदावर आधारित आहेत. असे म्हटले जाते की मुमूक्षूस (ज्याला सत्य शोधायचे आहे त्यास) मांडूक्य उपनिषद केवळ मोक्षापर्यंत नेऊ शकते.

( हे सर्व चंद्रशेखरेंद्र सरस्वती - कांची कामकोटीचे शंकराचार्य यांच्या पुस्तकातून)

धन्यवाद

चांगली माहिती मिळाली. आणखी विस्तृत माहिती देता आली तरी आवडेल.

अथर्ववेदी ब्राह्मण

शेजवलकरांच्या लेखसंग्रहात कुणा दादो नरसिंह नामक अथर्ववेदी भालंजनगोत्री ब्राह्मणाचा उल्लेख आहे. तो मूळचा विजयनगर भागातील असून बेदरला दुष्काळ पडला होता त्यावर इलाज करण्यासाठी आला होता. बेदरच्या सुलतानाने त्याच्या मदतीला एक गोरा तुर्की खोजादेखील दिला होता, त्यामुळे दादो नरसिंहाला लोक काळा खोजा म्हणू लागले. शेतीसंबंधी त्यांनी लै महत्वाचे काम केल्याचे उल्लेख सापडतात असे लेखात दिलेले आहे. लेख विजयनगर साम्राज्याच्या षट्सांवत्सरिक उत्सवानिमित्तचा आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

ॐ फट् स्वाहा

'ॐ फट् स्वाहा' हा मंत्र त्या चित्रपटासाठीच बनवला गेला आहे असे वाटते. फट्‌ हा शब्द अनेक मंत्रांत येतो. हा विघ्नहरणासाठी वापरायच्या मंत्रातला एक बीज शब्द आहे. संध्येतसुद्धा 'अस्त्र्याय फट्‌' हे शब्द येतात. स्वाहा म्हणजे 'मी अर्पण करतो-करते, मी आहुती देतो-देते.'
ओम्‌ शब्द अनेक मंत्रांच्या अगोदर येतो, तो बहुधा वाचाशुद्धीकरता असावा. म्हणजे पुढचे मंत्र शुद्ध उच्चारले जावेत यासाठी घसा साफ करून घेण्यासाठी. त्यामुळे 'ओम्‌ फट्‌ स्वाहा' या तीन शब्दांनी बनलेल्या मंत्राला काही अर्थ नाही आणि असा मंत्र अस्तित्वात नसावा. .
आताच एका संकेतस्थळावर अथर्ववेद हा पर्शियन देशांत अतिशय लोकप्रिय होता असा उल्लेख वाचला. त्या लेखात इजिप्त आणि भारतीय संस्कृतींमधील सृष्टिनिर्मितीच्या उपपत्तींची तुलना केली आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे इजिप्तच्या प्राचीन ग्रंथांत आणि अथर्व वेदाच्या शतपथब्राह्मणात समान मत मांडले आहे.--वाचक्‍नवी

न्यास/दिग्बंध

संध्येतसुद्धा 'अस्त्र्याय फट्‌' हे शब्द येतात.

कोणताही जप, सूक्त, स्तोत्र म्हणण्याआधी त्या त्या देवतेच्या मंत्रांनी विविध हातवारे करून केल्या जाणार्‍या कृतीला 'न्यास' किंवा 'दिग्बंध' असे म्हणतात. चूभूद्याघ्या. संध्येमध्ये गायत्री जपाच्या आधी गायत्रीमंत्राच्याच आधारे हा दिग्बंध केला जातो. शिखायै वषट्, नेत्रत्रयाय वौषट्, अस्त्राय फट्‌ ('अस्त्र्याय' तुम्ही चुकून लिहिले असावे.) हे त्यापैकी काही आहेत.

बाकी ॐ फट् स्वाहा च्या स्पष्टिकरणाशी सहमत आहे.

चित्रपटासाठीच

तसा तो तीन शब्दांचा श्लोक नव्हता. मला पूर्ण आठवत नाही परंतु त्या पंक्ती काही खर्‍या नसाव्यात. विनोदी चित्रपटासाठीच त्याची निर्मिती केली असावी. चाईल्डस प्ले नावाच्या मूळ इंग्रजी चित्रपटातही असेच काही व्हू डू जारणमंत्र आहेत. त्यांचीही निर्मिती चित्रपटासाठीच असावी. :-)

हा मंत्र तोंडाने उच्चारु नका.. :) मनात वाचा !!

ओम र्‍र्हीम क्लिम... भगबुगे..भगनी भागोदरी..भगमासे..भौमी ..भू.. ओम फट् स्वाहा !!
-- (३ वेळा मंत्र उच्चारणारा ) लिखाळ विंचू.

मोह आवरला नाही म्हणून हा अवांतर प्रतिसाद. बाकी चर्चा वाचनीय !

धन्यवाद

भागोदरी..भगमासे

असेच काहीसे शब्द होते आणि त्याला काही अर्थ नाही हे माहित आहे. आठवणीत ठेवून मंत्र येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

भकाराने सुरू होणारे शब्द

उच्चारताना एक प्रकारचा जोर असतो. विशेषकरून मराठीत. (असे "ती फुलराणी" मधल्या प्राध्यापकाचे मत असते.)

वरील मंत्रातील काही शब्दांना लावला तर व्रात्य अर्थ आहे.

व्रात्य अर्थ

वरील मंत्रातील काही शब्दांना लावला तर व्रात्य अर्थ आहे.

व्रात्य अर्थ म्हणावे का काय हे मला चटकन कळले नाही पण भागोदरीवर शोध घेता हा मंत्र नित्या देवी आणि चंद्रकलांवर आधारित आहे असे कळते. (म्हणजे शाक्तपंथियांच्या वापरातील असावेत का काय कोणास ठाऊक?)

चंद्राच्या १६ कला आहेत असे मानून प्रत्येक दिवशी एका देवीची पूजा केली जाते. त्यापैकी तिसरी देवी भागमालिनी हीच्यासाठी येणारा मंत्र काहीसा व्रात्य म्हटला नाही तरी नेहमीच्या मंत्रांपेक्षा वेगळा खचितच आहे... काहीसा असा -

Aim Hrim Shrim Am Aim Bhagabuge Bhagini Bhagodari Bhagamale Bhagavahe Bhagaguhye Bhagayoni Bhaganipatini Sarvabhagavashankari Bhagarupe Nityaklinne Bhagasvarupe Sarvani Bhagani Me Hyanaya Varade Rete Surete Bhagaklinne Klinnadrave Kledaya Dravaya Amoghe Bhagavicce Kshubha Kshobhaya Sarvasatvan Bhagodari Aim Blum Jem Blum Bhem Blum Mom Blum Hem Blum Hem Klinne Sarvani Bhagani Me Vashamanaya Strim Hara Blem Hrim Am Bhagamalini Nitya Shri Padukam Pujayami Tarpayami Namah.

मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व! मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व! मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!मराठी टंकायचा कंटाळा आला आणि वेळेची वानवा आहे. क्षमस्व!

ठीक आहे!

आम्ही पण इंग्रजीत म्हणू! ;))
नो प्रोब्लेम बाबा!!!

आपला
वेदोगुंड

रावसाहेबांचा भकार

पु लं च्या रावसाहेबांचे कुत्र जिम्या भडव्या उठ असे म्हटल्या शिवाय जागचे ढिम्म हलत नसे याची आठवण आली.
प्रकाश घाटपांडे

रिच्युअल इज़ ट्रान्समिटेड नॉटोन्ली विदाउट मीनिंग, बट ऑफ़न विदाउट

त्यामुळे 'ओम्‌ फट्‌ स्वाहा' या तीन शब्दांनी बनलेल्या मंत्राला काही अर्थ नाही आणि असा मंत्र अस्तित्वात नसावा. .

रोजच्या जीवनात जे धार्मिक विधी आणि त्या विधींशी निगडित जे मंत्र असतात त्यांना अर्थ असतोच असे नाही. ह्या आपल्या आदिम परंपरा आहेत. त्या आपण आजवर टिकवून ठेवल्या आहेत. "रिच्युअल्ज़ अँड मंत्राज़: रूल्ज़ विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक काही वर्षांपूर्वी चाळले होते. (लेखक: फ्रिट्स स्टाल, प्रकाशक: मोतीलाल बनारसीदास) त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले "रिच्युअल इज़ ट्रान्समिटेड नॉटोन्ली विदाउट मीनिंग, बट ऑफ़न विदाउट लँग्वेज" हे वाक्य 'ओम फट् स्वाहा'च्या संदर्भात लगेच आठवले.

गण गणी गणात बोते


रोजच्या जीवनात जे धार्मिक विधी आणि त्या विधींशी निगडित जे मंत्र असतात त्यांना अर्थ असतोच असे नाही

.
आता हा गजानन महाराजांचा मंत्र तसाच दिसतो. प्रत्येक गोष्ट अर्थ पुर्ण असण्याचा कंटाळा आला कि निरर्थक गोष्टीत सुद्धा ग्लॅमर वाटू लागते.
प्रकाश घाटपांडे

वैद्यकीय उपाय

वाचक्नवी,

मूत्रावरोध व्हावा म्हणून मंत्र आहेत. हा मंत्र पुढे वैद्यकीय उपाय म्हणून मान्य झाला.

हे तुम्ही या प्रतिसादात लिहिले आहे त्याबद्दल अधिक काय सांगता येईल? म्हणजे कोणता मंत्र आणि तो वैद्यकीय म्हणजे कोणत्या उपायांत आयुर्वेदात त्याची गणती केली गेली का?

मंत्र सापडला नाही

संगणकाचा उतरवून घेण्याचा वेग फार कमी झाल्याने मंत्र सापडवता आला नाही, पण तो ६.१३४ च्या आसपास असावा.--वाचक्‍नवी

उपाय


मूत्रावरोध व्हावा म्हणून मंत्र आहेत. हा मंत्र पुढे वैद्यकीय उपाय म्हणून मान्य झाला.


आता लईच घाईची लागली आन सोय नसन तर सोय होईपर्यंत खालील मंत्र
ओम् नमो भगवते
आंजनेयाय महाबलाय
ओम् फट् घे घे घे
घे घे घे स्वाहा||
हा मारुतीचा संकटविमोचन मंत्र म्हणावा.

प्रकाश घाटपांडे

अधिक माहिती

अथर्व वेदाच्या काळासंबंधी वगैरे अधिक माहिती इथे आहे.---वाचक्‍नवी

होता.

१.आजच लोकसत्तामध्ये या शब्दासंबंधी माहिती वाचली.
ऋग्वेदाची माहिती असलेल्यांना होता असे संबोधन असायचे. ओरिसात अश्या लोकांची आडनावे अजूनही प्रचलित आहेत.

महाराष्ट्रात मात्र हा शब्द या अर्थाने प्रचलित नाही.

२.वरील मंत्रातील काही शब्दांना लावला तर व्रात्य अर्थ आहे...

शाक्तपंथाचा उल्लेख आहे आणि बहुधा कथासरितासागर या पुस्तकात वाचल्याप्रमाणे भग हा शब्द स्त्रियांच्या योनी संबंधी वापरात आलेला आहे.

आदिम आणि वेद / असे ग्रंथ निर्माण होताना मनुष्याच्या प्रजननाच्या अवयवाना महत्त्व आहे असे मानण्यात आले असावे आणि हा मंत्र निर्माण झाला असावा.

भग

शाक्तपंथाचा उल्लेख आहे आणि बहुधा कथासरितासागर या पुस्तकात वाचल्याप्रमाणे भग हा शब्द स्त्रियांच्या योनी संबंधी वापरात आलेला आहे.

याबाबतचे उल्लेख गो. नी. दातारांच्या (बहुधा कालिकामूर्ती किंवा विलासमंदिर) पुस्तकातही आहेत असे आठवते. भग वरूनच भगदाड/भगंदर/भगवृत्ती वगैरे शब्द आलेले असावेत.

मोल्सवर्थ मध्ये भग चा अर्थ An ulcer or a sore; yet esp. applied to a venereal ulcer. 2 Pudendum muliebre असा दिला आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

भग !!

मग भगवान, भगवती यांचा अर्थ काय म्हणावा !

मला वाटते की भद्र चा अपभ्रंश होउन भग झाले असावे. भग म्हणजे पवित्र असे सुद्धा असावे.
-- (भगत) लिखाळ.

भगदाड

पण मग भगदाडात काय पवित्र?

अवांतरः भगवती दोन्ही अर्थांनी ठीक पण भगवान!!! - क्षमस्व!

भगदाड

भग म्हणजे मराठीत भोक, भगदाड म्हणजे मोठे भोक. तसेच खोबणपासून खबदाड. असे आणखी शब्द- भिंताड, खादाड, भोकाड, भोकांड, रेंदाड इत्यादी.-वाचक्‍नवी

मोल्सवर्थ

मोल्सवर्थ मध्ये भग चा अर्थ An ulcer or a sore; yet esp. applied to a venereal ulcer. 2 Pudendum muliebre असा दिला आहे.

मोल्सवर्थ मधे "भग" ह्या शब्दाचे बरेच (खालील) अर्थ दिले आहेत,

bhaga (p. 193) [ bhág-a ] m. [dispenser: &root;bhag] lord (of gods, esp. Savitri: V.); N. of one of the Adityas bringing welfare and love and instituting marriage; the lunar asterism Phalgunî; sun; good fortune, luck, happy lot (mostly V.); dignity, grandeur (mostly V.); loveliness, beauty; love, affection, amorousness; pudendum muliebre.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

मराठीत..

भग या संस्कृत शब्दाचे मराठीत अर्थ: आदित्यविशेष(विवाहाची देवता); सुदैव, कल्याण; बढती, उन्‍नती; सौंदर्य; कीर्ती; प्रयत्‍न; प्रेम; विलास; धर्म; सद्गुण; पुण्य; विरक्ती; मोक्ष; सर्वशक्तिमत्त्व; ऐश्वर्य; माहात्म्य; पराक्रम; पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि स्त्रीयोनी. भोक असा अर्थ संस्कृत कोशात सापडला नाही. भगवान शब्दाचे अर्थ-ऐश्वर्ययुक्त; पूज्य; ईश्वर; विष्णू; जैन; गौतमबुद्ध इ.--वाचक्‍नवी

भग

व्यासांचे पिता पाराशर मुनी यांनी दिलेला भग चा अर्थ ऐश्वर्य असा आहे. 'भग' वान म्हणजे षड् ऐश्वर्यसंपन्न (सौंदर्य, बल, संपत्त्ती, प्रसिद्धी, ज्ञान, वैराग्य) (पद्म पुराणातुन)

पुन्हा एकदा वाट्टेल ते!

'ॐ र्‍हीं क्लीं| भगभुगे....' संदर्भ घेऊन सुरू झालेली ही चर्चा अत्यंत आकर्षक आहे. (बारकाईने शोध करून पुष्ट्यर्थ पुरावे देणे सध्या शक्य नाही. क्षमस्व!)

आर्य आणि अनार्य (दस्यू, दास इ.) वेगवेगळे वंश होते अथवा नाही याबद्दल अनेक तज्ञांचे दुमत आहे. डॉ. आंबेडकरांनी ते एकच असल्याचे प्रतिपादन केल्याचे एका संदर्भ लेखात आले आहेच.
माझ्या मताप्रमाणे (जे बहुतांशी प्रचलित आहे-शिवाय 'असे असावे' हे पालुपद प्रत्येक विधानाच्या मागे आहे हे लक्षात घ्यावे.)

तमिळ लोक ज्यांना आज द्रविड म्हटले जाते त्यांची भाषा आणि संस्कृती प्रथम सिंधू- सरस्वती आणि नंतर समुद्राच्या कडेने द्वीपकल्पात पसरली. (इ.स्. पू. १००००पूर्वी). हे लोक सिंधू-सरस्वतीकडे मुख्यतः थेट आफ्रिकेतून आलेले होते. त्यांना (घनदाट) जंगलांमुळे अतिविषारी सर्प, विंचू, हिंस्त्र श्वापदे, भूते-खेते आदि गोष्टींची बाध होती. तसेच ते शेतीमुळे भूमीशी जोडले गेले होते. त्यांच्या पारलौकिक संकल्पना या बाधिक गोष्टींशी, भूमीशी आणि पुनरुत्पादनाशी घट्ट् बांधलेल्या होत्या. याच संस्कृतीत काष्ट-पाषाणाचा देव बनवण्याची परंपरा दिसते. (मूळ आफ्रिकेत अजूनही 'व्हूडू ' समाजमान्य आहे.)
उदा. सप्त मातृका, लिंग, (नंतर) गणपती इ. इ. चित्रविचित्र आवाज काढत बाधिक गोष्टींचा प्रतिबंध करणे हा एक प्रकारचा वैद्यकीय व्यवसाय होता. वेगवेगळ्या वनस्पती आणि पशूंच्या भागांचा वैद्यकीसाठी उपयोग हा याच संस्कृतीचा भाग असला पाहिजे.

त्यानंतर अमु दर्या आणि अफगाणिस्तानचा उत्तर पूर्व भाग यांच्यातून स्थलांतरित झालेले लोक (आर्य) दक्षिणेकडे येऊन सिंधू-सरस्वती संस्कृतीत विलीन झाले. (इ.स. पूर्व १०००० नंतर) तत्पूर्वी त्यांचा बराच कालावधी सपाट गवताळ मैदानी आणि उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये गेलेला असल्याने त्यांना घनदाट जंगलांपेक्षा आकाश, सूर्य, चंद्र, ग्रहगोल, स्वर्ग इ. या पारलौकिक कल्पना जास्त जवळच्या वाटत. या संस्कृतीतली असलीच तर देवाची मूर्ती म्हणजे सोन्याचे अंडे होती. (हिरण्यगर्भ).या कल्पनांवर आधारित ऋचा एकत्र करून आपण आज ज्याला 'ऋग्वेद' म्हणतो तो तयार झाला असावा. परंतु ते जेंव्हा सिधू-सरस्वती वातावरणाशी समरस झाले आणि जुन्या लोकांमध्ये मिसळू लागले तसे त्यांचे संस्कारही अनिवार्यपणे त्यांच्या वाङ्मयात प्रविष्ट झाले. अर्थातच नंतर निर्माण झालेल्या अथर्ववेदात याच गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. (मंत्र, तंत्र, योग - या त्रयीतूनच पुढे आयुर्वेद जन्माला आला. आयुर्वेदातील काही वचने जशीच्या तशी अथर्ववेदात आढळतात.)

थोडक्यात अथर्ववेद हा दोन संस्कृतींच्या एकत्रीकरणाचा परिपाक आहे.

"भगभुगे... (ॐ फट स्वाहा)"हा मंत्र सरळसरळ स्त्रीच्या जननेंद्रियासंबंधी (भग = छिद्र?) असलेला आणि त्या इंद्रियामुळे तिला प्राप्त झालेल्या शक्तीचा गौरव करणारा आहे - हे प्रियाली यांनी दिलेल्या रोमन लिपीतील मंत्रावरून दिसते. शक्ती माता अथवा मातृकापूजा हा शाक्त पंथाचा स्त्रोत अथर्वातूनच आला आहे. शाक्त पंथ हा नेहमीच निम्नस्तरीय मानला गेला आहे. तरीही तो मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे हे अमान्य करता येत नाही.
'गणपती अथर्वशीर्ष ' मध्ये इतिअथर्वणवाक्यम् असा प्रयोग असला तरी तो अथर्ववेदाचा उल्लेख नसून कोण्या अथर्व ऋषीचा उल्लेख असावा.
किंवा गणपती या देवतेला मुख्य विचारधारेत स्थान मिळवून देण्याचा तो प्रयत्न असावा- अथर्ववेद पूर्वीच संस्कृतीत समाविष्ट झाल्याने त्याचा संदर्भ घेतला तर ही अघोर देवतासुद्धा शुभ मानली जावी असा.

'दिग्बंध' हा प्रकार ब्राह्मण संध्या करताना वापरताना दिसतात. (दिशा बांधणे - कुणी अदृष्य शक्ती जवळपास फिरकू नये म्हण्ञ्न)पवित्र कार्ये करताना भुताखेतांची, दुष्टात्म्यांची बाधा होऊ नये म्हणून एक प्रकारचे कवच हे मंत्र निर्माण करतात अशी समजूत आहे.

नारळ किंवा कोहाळे/ भोपळे फोडणे हीसुद्धा अघोर पंथातून सर्वमान्य झालेली रुढी आहे. पर्यायाने ते शाकाहारी बळीच आहेत.

या निमित्ताने एक अनाहुत, अवांतर सल्ला : ज्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास आहे त्यांनी काली, अंबा, मातृका, ग्रामदेवता, गजानन, शिवलिंग आदि देवतांची पूजा करावी. या देवतांमध्ये लौकिक चमत्काराचे सामर्थ्य असू शकते. विष्णू आणि तत्सम देवतांच्या मूर्तींमध्ये ते गूढतत्त्व वास करत असेलच याची खात्री देता येत नाही.

वेद म्हणजे जाणणे.

वेद म्हणजे जाणणे आणि वेद हे अपौरुषिय आहेत या कल्पनांचाही विचार व्हावा.

माझी एक अकटोविकट अशी कल्पना आहे ( याला बरेच लोक मानतही आहेत) की वेदांचे निर्माण परमेश्वराने केले आणि काळाच्या ओघात माणसाचे सत्त्व ढासळत गेले. ( वर्णसंकर इत्यादी). त्यामूळे

बर्‍याचवेळेस आपण वेदांचा, उपनिषदांचा विचार पाश्चिमात्यांच्या नजरेतून करतो म्हणून काही तफावत येत असावी.

पाश्चिमात्य कल्पना

याहीपेक्षा मला नेहमीच भुरळ घालणारी कल्पना म्हणजे ' चॅरियट्स ऑफ द गॉडस् ?'.
थोडे ताणले तर -
परग्रहावरील अतिप्रगत मानवसदृश जीव पृथ्वीवर आले आणि त्यांनी त्याकाळच्या काही प्रगत कपींशी संकर करून मानव निर्माण केला.
या नव्या जमातींना त्यांनी विश्वोत्पत्तीबद्दल, समाजजीवनाबद्दल काही शिकवण्याचा प्रयत्न केला. हेच ते अपौरुषेय वेद! त्या परग्रहवासीयांची भाषा ती गीर्वाणवाणी - देवांची भाषा!
ही कल्पना मूळ पाश्चिमात्य असली तरी आपल्याला खूप जवळची वाटू शकते. कसे?

चॅरियट्स

चॅरियट्स च्या कल्पनेसाठी इतके ताणावे लागते की मग त्यात काही 'राम' उरत नाही.

----

अगदी सहमत

व्हॉन डॅनिकेनने इतके ताणले की काही प्राचीन आर्टीफॅक्टस् स्वतःच कुंभाराकडून बनवून घेतले. :-(

हेच म्हणतो.

म्हणूनच ती एक रम्य कल्पना आहे. ('राम' उरत नसला तरी 'इंद्र, वरूण' वगैरे उरत असावेत. ह. घ्या.)

इंद्र, वरूण

'राम' उरत नसला तरी 'इंद्र, वरूण' वगैरे उरत असावेत.

हम्म! कारण बहुधा ते ही पाश्चिमात्त्यच ;-)

चांगला प्रतिसाद

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पटणारा प्रतिसाद आहे.

तमिळ लोक मूळचे नेग्रॉईड वंशाचे आणि मध्य आशियातील भटक्या जमाती (अमूदर्या ते उत्तर पूर्व अफगाणिस्तान -अचूक स्थान) यांतील संस्कृती आणि त्यानुसार अस्तित्त्वात आलेल्या ईश्वराच्या किंवा सुष्ट-अनिष्ट दैवतांच्या कल्पनाही पटण्याजोग्या आहेत.

कोणतीही प्राचीन संस्कृतीही प्रजननेंद्रियांना अतिशय महत्त्व देते. श्लील अश्लिलतेच्या कल्पना रूढ झाल्यावर पुरातन कल्पनांना हळूहळू मूठमाती देऊन किंवा त्या निम्नस्तरातील आहेत असा प्रचार-प्रसार केला गेला.

अवांतरः

ज्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास आहे त्यांनी काली, अंबा, मातृका, ग्रामदेवता, गजानन, शिवलिंग आदि देवतांची पूजा करावी.

हे भारीच. :-) कालीही आद्य व्हॅम्पायर (रक्तपिपासू देवता) असल्याचे काही संशोधकांचे मत आहे त्याची आठवण झाली.

हे नक्कीच पाश्चात्य मत असावे

काली ही दुष्टांचे निर्दालन करते असा माझा समज आहे.
त्यानुसार तर दुर्गाही रक्तपिपासू देवता म्हणता येईल. पण त्या योग्य त्या कारणासाठी तसे करत आहेत असे वाटते.

आपला
गुंडोपंत

"रक्तपिपासू" शाब्दिक अर्थ अभिप्रेत असावा

रक्तबीज नामक राक्षसाच्या रक्ताचा थेंब जमिनीवर सांडताच नवीन राक्षस तयार होई. त्याच्यापुढे दुर्गेचे वरचढ युद्धबळ व्यर्थ होत होते. कारण रक्तबीजाला वार करून जितके जखमी करावे तसे रक्तबीजांचे मोठे सैन्यच तयार होत होते. म्हणून रक्त पिऊ शकणार्‍या कालीचा निर्माण झाला. रक्तबीजावर आघात झाल्यावर, त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडायच्या आधी काली चाटून घेई. अशा प्रकारे रक्तबीजाचा पराभव झाला.

दुर्गा शब्दशःदार्थाने "रक्तपिपासू" नव्हती, म्हणून शब्दशः अर्थाने "रक्तपिपासू" कालीची गरज पडली.

अगदी अगदी पौर्वात्य

काली ही दुष्टांचे निर्दालन करते असा माझा समज आहे.

कालीबद्दल धनंजयांनी लिहिलेच आहे परंतु मनुष्याचे रक्त पिणे हे काही पाश्चिमात्त्यांनी लादलेले नाही. महाभारतात भीमानेही दु:शासनाचे रक्त प्यायले होते. (म्हणजे तो रक्तपिपासू असे नाही परंतु त्याबद्दल भीमाची निर्भर्त्सना केल्याचे आठवत नाही तेव्हा मनुष्य रक्तप्राशन हा प्रकार जगावेगळा नसावा - चू. भू. दे. घे.)

खालील थोडेसे ह. घ्या

इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम मधला मोलारामचा प्रसिद्ध डायलॉग आठवतो का - "तुम्हारे अंतडीयोंमें शैतानोंका खून भर दूंगा|" ;-) (हे लालभडक रंगात लिहायला मजा वाटली - यावर लवकरच एक लेख टाकायला हरकत नाही) आता स्टीवन स्पीलबर्ग आणि कंपनीचे भारताबद्दल ज्ञान अगाध मानले तरी ठग नावाचा पंथ कालीसमोर हे प्रकार करत हे मानले जाते.

व्हॅम्पायर म्हणजे ड्रॅक्युला पद्धतीचा व्हॅम्पायर असे नसून मानवी रक्तप्राशन करणारा या अर्थी वापरलेला होता.

भीम

महाभारतात भीमानेही दु:शासनाचे रक्त प्यायले होते. (म्हणजे तो रक्तपिपासू असे नाही परंतु त्याबद्दल भीमाची निर्भर्त्सना केल्याचे आठवत नाही तेव्हा मनुष्य रक्तप्राशन हा प्रकार जगावेगळा नसावा - चू. भू. दे. घे.)

भीमाने रक्त प्यायले नव्हते. बघून सांगीन पण अगदी काही असलेच तर ओठांना स्पर्श केल्याचा प्रसंग असेल कारण छाती फोडून रक्त बाहेर काढेन अशा प्रकारची त्याने शपथ घेतली होती. प्यायले म्हणजे कपात ओतून फुंकर मारत वगैरे चवीने प्यायले असे काही तरी वाटले :-) - हे काही मी त्याची बाजू घेण्यासाठी लिहीत नाही आहे तर जे आठवते त्यावर. नंतर छाती फोडून त्यातील रक्ताने हात माखवून द्रौपदी कडे गेला होता. "ज्या हातांनी माझे केस ओढले त्या दूष्ट माणसाची छाती फोडून त्यातील रक्त जो पर्यंत मी माझ्या केसात माळणार नाही तो पर्यंत मी केस मोकळे सोडीन", अशी द्रौपदीची प्रतिज्ञा होती. अर्थात भीमाकडून झालेला किचकवध आणि दु:शासन वध हे खूप "ग्राफिक" म्हणता येतील असे प्रसंग आहेत.

भीमाची निर्भत्सना गांधारीने कडक शब्दात केली होती. असे वाटू शकेल की त्यात आश्चर्य ते काय ती दु:शासनाची आईच होती. पण गांधारी हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. तीने कुरू दरबारात युद्धाचे ढग जमू लागले तेंव्हा खडसावून सांगीतले होते:

प्रध्वंसिनी क्रूर समाहीता श्री: मृदू प्रौढा गच्छती पूत्रपौत्रान्

अर्थात दुसर्‍याला त्रास देऊन मिळवलेली संपत्ती (श्री: - लक्ष्मी) ही संपूर्ण कूलाचा नाश करते पण तीच जर न्यायाने मिळवलेली असली तर एखाद्या मृदू प्रौढ स्त्री प्रमाणे तीचे ममत्व हे मुलानातवंडांपर्यंत पोहचते.

याच गांधारीने युद्धाचे अठरा दिवस आशिर्वाद मागायला आलेल्या दुर्योधनाला अठराही दिवस, "यतो धर्मस्ततो जयः" असाच आशिर्वाद दिला होता (विजयी भव असा नाही).

तर जेंव्हा भीमाला गांधारीने खडसावले तेंव्हा त्याचे उत्तर इतकेच होते की मी असे (भीषण) वर्तन शपथपुर्ती साठी केले.

भीमाबद्दल - कृपया बघून सांगा

भीमाने रक्त प्यायले नव्हते. बघून सांगीन पण अगदी काही असलेच तर ओठांना स्पर्श केल्याचा प्रसंग असेल कारण छाती फोडून रक्त बाहेर काढेन अशा प्रकारची त्याने शपथ घेतली होती.

भीमाने मदात येऊन दु:शासनाचे रक्त प्यायले असेच मी वाचले आहे. पुराव्यादाखल

दुवा १
दुवा २
दुवा ३

आणि असे अनेक दुवे देता येतील तेव्हा आपला स्रोत पडताळून पहावा कारण काही सूज्ञ आणि आपल्या संस्कृतीबद्दल वेडे प्रेम असणारे लेखक अशा अनेक गोष्टी बाद करतात. आपल्याला शोधायचेच झाले तर महाभारतात हा भाग स्त्री पर्वात येतो. त्यात माझ्याकडे गांगुलींची कॉपी आहे त्यात म्हटल्याप्रमाणे -

O Bharata, thou quaffedst in battle the blood from Duhshasanas body!

मरियम वेबस्टर डिक्शनरीप्रमाणे-quaffed : to drink (a beverage) deeply

त्यामुळे ओठाला रक्त लावणे हे चुकीचे वाटते. आता, चहासारखे कपात ओतून की वाईनसारखे ग्लासात ओतून की कालीसारखे चाटून हे ज्याच्यात्याच्या कल्पनाबुद्धीवर अवलंबून असावे. :-)

भीमाची निर्भत्सना गांधारीने कडक शब्दात केली होती. असे वाटू शकेल की त्यात आश्चर्य ते काय ती दु:शासनाची आईच होती.

नाही, गांधारीही कौरवांची आईच होती आणि त्यापायीच पांडवांना भेटायला आली होती कारण तिला दुर्योधन आणि दु:शासन वधाचा राग होता आणि त्याचे स्पष्टीकरण हवे होते. त्यांच्या अधोगतीला ती तितकीच जबाबदार होती. तिने भीमाची निर्भर्त्सना केली तर खरेच विशेष नाही. आपल्या नावडत्या मुलालाही असे मरण दिलेलेही आईला आवडणार नाही. परंतु गांधारीने भीमाची निर्भर्त्सना केली हे खरेच, त्यामुळे त्याची निर्भर्त्सना झालीच नव्हती हे माझे वाक्य जरा चुकलेच! परंतु गांधारी म्हणते ते असे , "हे कृत्य राक्षसांना शोभेसे आहे, वीरांना नाही." यावरूनच रक्त पिणे ही पद्धत नावीन्यपूर्ण नव्हती किंवा ती अभावाने पाळली जात होती किंवा कुलीन लोकांनी पाळणे बंद केले होते. भीमाची निर्भर्त्सना कुंती, युधिष्ठीर, विदुर किंवा कृष्णाने (ज्यांना धर्मरक्षक, पुण्यात्मे इ. समजले जाते) केली असती तर समजण्यासारखे होते पण त्यांनी ती केलेली दिसत नाही.

फरक

संदर्भः (हा वेळे अभावी हा संदर्भ विकीवरील आहे पण हे जालावर नाही तर पुस्तकात पण वाचलेले आहे).
Bhima is furious at Dushasana and says, "I Bhim, Pandu's son vows until I cut off Dushasan's and drink his blood I will not show my face to my ansestors."

मला संस्कृतीबद्दल वेडे प्रेम अथवा आंधळा आकस, अहंगड अथवा न्यूनगंड यातील काहीच नाही. स्त्रोत माहीत होता म्हणून सुज्ञपणे सांगीतला. त्यात मी पुढे असेही म्हणालो की यात भीमाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही तर संदर्भ समजून बोलणे/लिहीणे महत्वाचे.

आपण लिहील्याचा अर्थ होत होता की रक्त पिणे हे सर्वमान्य अथवा "कॉमन" होते. तसे ते असते तर किमान भीमाच्या तरी बाबतीत त्याने इतरांचे रक्त प्यायल्याचा उल्लेख झालेला पाहीला असता. पण तसे दिसत नाही. थोडक्यात त्याने प्रतिज्ञा पाळली. अशा अनेक प्रतिज्ञा पाळण्यासंदर्भात महाभारत घडले. जशी दु:शासनाच्या बाबतीत प्रतिज्ञा त्याने (भीमाने) पाळली तशीच दुर्योधनाच्या बाबतीतपण पाळली - मांडीवर प्रहार करून जे त्याकाळच्या धर्मयुद्धाप्रमाणे अनैतिक होते. पण त्याने आणि कृष्णाने परत कारण तेच सांगीतले की तशी प्रतिज्ञा होती.
रक्त पिणे ही पद्धत नावीन्यपूर्ण नव्हती किंवा ती अभावाने पाळली जात होती

थोडक्यात रक्त पिणे ही कल्पना येथे अभावाने पाळली गेली नव्हती तर ज्या तिडीकीत त्याने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस शपथ घेतली होती त्याच तिडीकीत आणि स्वतःचे भय तमाम कौरवसैन्यात उत्पन्न करायला त्याने ती पाळली होती. म्हणूनच मी आधीच्या प्रतिसादात या प्रसंगाला "ग्राफिक" म्हणले होते.

गांधारीही कौरवांची आईच होती आणि त्यापायीच पांडवांना भेटायला आली होती कारण तिला दुर्योधन आणि दु:शासन वधाचा राग होता आणि त्याचे स्पष्टीकरण हवे होते.

गांधारी कौरवांसंदर्भात जबाबदार होती का नव्हती या बद्दल मी भाष्य केले नव्हते तर तीने युद्धकाळात "आंधळी" आशा केली नाही की आपल्या मुलांनी जिंकावे. किंबहूना आधी सांगितलेल्या श्लोकात तीने ते स्पष्ट केले की ह्यात आपल्या कुलाचा नाशच होणार आहे.

ती पांडवांना भेटायला गेली की पांडव तीला हे पहावे लागेल आत्ता आठवत नाही. पण त्यावेळेस तीने दोनच व्यक्तींची निर्भत्सना केली होती - भीमाची त्याच्या कृत्याबद्दल ज्यात त्याने अत्यंत ग्राफिकली दु:शासनाला मारले आणि दुसरे दुर्योधनाच्या बाबतीत धर्मयुद्धाचे नियम न पाळता मारले म्हणून. बाकी १०० च्या १०० कौरव भीमाने मारले होते. दुसरे ती बोलली होती आणि शाप दिला तो कृष्णाला कारण तीच्या लेखी फक्त तो एकच असा होता की जो हे युद्ध आणि ४० लाखांचा (१८ औक्षहणी) नरसंहार टाळू शकला असता. अर्थात त्याने तीला जरी सांगीतले नसले तरी, "तसे मी करणार नाही (युद्ध टाळणार नाही)" असा शब्द (परत प्रतिज्ञेसारखे) त्याने द्रौपदीला शिष्ठाईला जाण्याआधी दिला होता ...

अमान्य!

मला वाद घालायचा नव्हता पण आपण पुन्हा पुन्हा नसलेल्या गोष्टी माझ्या तोंडात कोंबता असे वारंवार दिसते तेव्हा फक्त त्याचेच खंडन करते.

१. मला संस्कृतीबद्दल वेडे प्रेम अथवा आंधळा आकस, अहंगड अथवा न्यूनगंड यातील काहीच नाही. स्त्रोत माहीत होता म्हणून सुज्ञपणे सांगीतला. - मी हे आपल्याला म्हटलेले नाही. बरेचदा लेखक असे करतात. यांत रामायण, महाभारत, अरेबियन नाईट्स, गुलबकावली पासून सर्व कथा समाविष्ट आहेत.

२. आपण लिहील्याचा अर्थ होत होता की रक्त पिणे हे सर्वमान्य अथवा "कॉमन" होते. - हा अर्थ आपल्याला कोठे दिसला? उलट भीमानंतर मी महत्त्वाचा डिस्क्लेमर टाकला आहे. (म्हणजे तो रक्तपिपासू असे नाही परंतु त्याबद्दल भीमाची निर्भर्त्सना केल्याचे आठवत नाही तेव्हा मनुष्य रक्तप्राशन हा प्रकार जगावेगळा नसावा - चू. भू. दे. घे.)

३. गांधारी कौरवांसंदर्भात जबाबदार होती का नव्हती या बद्दल मी भाष्य केले नव्हते - आपण असे भाष्य केल्याचे मी कोठेही म्हटलेले नाही. जशी आपण आपली बाजू सांगितलीत तशी मी माझी बाजू सांगितली.

भीमाबद्दल मी दिलेले मूळ महाभारतातील संदर्भ पुरेसे आहेत असे मला वाटते, त्यामुळे यावर अधिक भाष्य करायचे प्रयोजन नाही.

असो, सदर चर्चा भारतीयांच्या रक्तपिपासूपणाबद्दल नसल्याने यापुढे मी याबाबत प्रतिसाद देणार नाही. तेव्हा चालू दे!

दुवा १, २, ३.

दुवा १ आणि ३ मध्ये रक्त 'प्याला' असा शब्दप्रयोग नाही. दुसयात आहे, पण ते विकीतले वाक्य आहे, तुमच्या-आमच्यासारख्या अलबत्या-गलबत्याने लिहिलेले. गांगुलींनी बरोबर लिहिले असावे. क्‍वॉफ़्‌ म्हणजे मोठमोठे घुटके घेत पिणे, हे मात्र खरे.--वाचक्‍नवी

दुवा १ आणि ३ मध्ये

भीमाची प्रतिज्ञा दिली आहे. भीमाने प्रतिज्ञा केल्यावर अनेक वर्षांनी झालेल्या युद्धादरम्यानच्या काळात कोणीही भीमाला या भीषण प्रतिज्ञेपासून परावृत्त केलेले दिसत नाही. - चू. भू. दे. घे. विकी आपल्यासारखेच अलबते-गलबते लिहितात हे मात्र अगदी खरं पण ते दिशाभूल करण्यासाठी लिहितात असे तर नाही ना!

रक्तपिपासू

रक्ताची भाजी (रक्ती) हा प्रकार दक्षिण महाराष्ट्रात व विशेषतः पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडेही लोकप्रिय आहे. ;) दुकानात आता बोकड कापणार ही बातमी कळल्यावर त्याचे ताजे रक्त विकत घेण्यासाठी भांडी घेऊन रांगा लावल्या जातात!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मसाई

हे म्हणजे मसाई लोक गायी-गुरांच्या मानेजवळ छिद्र करून त्यांचे रक्तप्राशन करतात त्यासारखे काहीसे वाटले.

थेट नाही

मी पाहिलेला रक्ती हा प्रकार बोकडाचे रक्त तव्यावर गरम करून त्याच्या पनीरसारख्या दिसणार्‍या गोळ्या होईपर्यंत त्याला हलवत बसायचे अशा प्रकारे तयार करत होते. दुर्दैवाने यजमानांनी फार आग्रह करुनही हा पदार्थ खाणे शक्य झाले नाही :) मात्र हा पदार्थ अतिशय चविष्ट लागतो असे अनेकांकडून ऐकले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पनीर

हे वाचून आज काही मी पनीर (भयंकर आवडता पदार्थ) खाणार नाहीसे वाटते. ;-)

रक्त, मांस आणि दूध

आपण नॉन-व्हेजिटेरियन नसाल तर 'रक्ती 'हा प्रकार भयानक वाटेल.
परंतु नॉन-व्हेजिटेरियन असाल तर रक्त आणि मांस यांच्यात खाण्याच्या दृष्टीने काय फरक ते मला समजत नाही.

तसे असेल तर व्हेगन हेच फक्त खरे शाकाहारी म्हटले पाहिजेत.

रक्त आणि मांस आणि मांस

परंतु नॉन-व्हेजिटेरियन असाल तर रक्त आणि मांस यांच्यात खाण्याच्या दृष्टीने काय फरक ते मला समजत नाही.

चिकन वि. गोमांस, बेडकाचे पाय, कांगारूचे मटण, कुत्र्याचे मटण, भाजलेले उंदीर खाण्यात फरक आहे तोच. :-)

बाकी, रक्ती हा प्रकार मला भयानक वाटला नाही पण रक्ताच्या रंगाचे पनीर कसेसेच वाटले. तसा हिरवा कॉलीफ्लावर (ब्रोकोलीही) भाजीत मला कसासाच वाटतो.

 
^ वर