ओम् फट् स्वाहा|

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आलेला महेश कोठारेंचा झपाटलेला आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असावा. त्यातील दिलीप प्रभावळकरांनी सादर केलेले तात्या विंचूचे पात्र आणि रामदास पाध्यांचा बोलका बाहुला अद्यापही लक्षात आहे. तात्या विंचूचा परकाया प्रवेशासाठी वापरला जाणारा मंत्र मात्र बराचसा विसरले आहे. तरी त्यातील शेवटची पंक्ती ओम् फट् स्वाहा| ही चांगलीच लक्षात आहे. त्यावेळेस कोणीतरी सांगितल्याप्रमाणे असे श्लोक अथर्ववेदात येतात किंवा जारण-मारण आणि इतर तांत्रिक विधींत वापरले जातात. (चू. भू. दे. घे)

नुकत्याच चाललेल्या एका चर्चेमुळे अथर्ववेदासंबंधी थोडीशी माहिती मिळवाविशी वाटली. मला माहित असणार्‍या अत्यल्प माहितीनुसार --

अथर्व वेदाची रचना भृगु आणि अंगीरस या दोन मुख्य ऋषी आणि त्यांच्या गणातून झाली. या शिवायही इतर ऋषींच्या रचना त्यात येतात. या अथर्ववेदाबद्दल अनेक वाद-प्रवाद आहेत आणि ते तज्ज्ञांकडून मांडले किंवा खोडले जातात. त्यापैकी काही प्रवाद खाली देत आहे (त्यांच्या सत्यासत्यावर खाली चर्चा व्हावी)

१. अथर्ववेदाला इतर वेदांप्रमाणे मान्यता नव्हती. वेदांत त्याची गणना बर्‍याच काळानंतर झाली.
२. पहिल्या मुद्द्याचे कारण अथर्ववेद हा जादू, मंत्र, तंत्र, जारण-मारण यासंबंधी भाष्य करतो.
३. ब्राह्मणी आचारांपेक्षा अथर्ववेद हा स्थानिक लोकांच्या (आर्यांच्या?) तत्कालीन जीवन आणि राहणीवर प्रकाश टाकतो.
४. अथर्ववेदात येणारा गायत्री मंत्र हा वापरातील गायत्री मंत्रापेक्षा वेगळा आहे.

तरी, मला सध्या पडलेले काही प्रश्न असे -

१. हल्ली बर्‍याच मुलांचे नाव अथर्व असते. गणपती अथर्वशीर्षावरून अनेकजण अथर्व या शब्दाचा अर्थ गणपती असा करतात. अथर्वचा खरा अर्थ काय? गणेश ही देवता जी पूर्वी अघोर मानली जाई तिचा अथर्ववेदाशी संबंध आहे का?
२. जारण-मारण आणि तांत्रिक विधींसाठी पूजनात येणार्‍या देवता कोणत्या?
३. ओम् फट् स्वाहा या वाक्याचा अर्थ काय आणि तो नेमका कोठे वापरण्यात येतो?
४. जर अथर्ववेद मुख्य वेदांचे अंग म्हणून गणला जात नव्हता तर त्याची चार वेदांत गणना कधीपासून होऊ लागली?

अथर्ववेद आणि त्यातील काही जारण मारण मंत्र येथे मिळतील.
विकिपीडियावर अथर्ववेद येथे सापडेल.

विशेष सूचना : ही चर्चा गंभीरपणे चालावी आणि त्यातून काही दडलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असा हेतू आहे. महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर, बोलक्या बाहुल्या आणि इतर विषयांसाठी वेगळी चर्चा सुरू करावी.

Comments

हिरवा फुलकोबी?

हा खाण्यास काय अडचण आहे.? हिरवी बर्फी आम्हीही खात नाही पण हिरव्या भाज्या खातो.--वाचक्‍नवी

हिरव्या फुलकोबीची अडचण

चर्चेशी संबंधीत नसल्याने खरडवहीत लिहिते. :-)

पण ज्यासाठी नव्या चर्चेचा अट्टहास केला त्या अथर्ववेदावरील माहितीचे काय झाले? :०

:(

बोकड कापणार ही बातमी कळल्यावर त्याचे ताजे रक्त विकत घेण्यासाठी भांडी घेऊन रांगा लावल्या जातात!

हा प्रकार मागे मुंबईतील एका कसायापुढे रांग लागली असता कळला होता. तेव्हाही ऐकून शहारा आला होता अंगावर!!!
असो. जो जे इच्छील तो ते खाओ हेच खरे!

मला मागे अमेरिकायणाच्या वेळी बर्‍याच जणांनी लोकांच्या अन्नाला नावे न ठेवण्याबद्दल दटावले असल्याने गप्प बसतो ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

आम्हीसुद्धा!

(मला मागे अमेरिकायणाच्या वेळी बर्‍याच जणांनी लोकांच्या अन्नाला नावे न ठेवण्याबद्दल दटावले असल्याने गप्प बसतो ;) आम्हीसुद्धा!----वाचक्‍नवी

अजूनही

चित्रविचित्र आवाज काढत बाधिक गोष्टींचा प्रतिबंध करणे हा एक प्रकारचा वैद्यकीय व्यवसाय होता. वेगवेगळ्या वनस्पती आणि पशूंच्या भागांचा वैद्यकीसाठी उपयोग हा याच संस्कृतीचा भाग असला पाहिजे.

हा भाग अजूनही जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये पहायला मिळू शकतो.
मी जगातल्या म्हणतो तेंव्हा, भारत, आशिया, ऑस्ट्रेलियातीला आदिवासी ते द.अमेरिकेतील लोक माझ्या डोळ्यासमोर आहेत!
मध्यपुर्वेत याचे असलेले स्तोम बेट्टी महमूदीच्या नॉट विदाउट माय डॉटर मधेही वाचायाला मिळतेच.

आपला
गुंडोपंत

अथर्ववेद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
* ओम् फट् स्वाहा|" विषयीच्या सर्व शंकांचे निरसन श्री. वाचक्नवी आणि श्री. शशांक यांनी केले आहे.
* भगस्(हलन्त नपु.) या शब्दाचे अर्थ भाग्य, ऐश्वर्य असेही आहेतच. सुभग/सुभगा,
चराति चरतो भगः| यांत भाग्य असा अर्थ आहे. तर भगवती, भगवंत, भगवान या शब्दांत भगचा अर्थ ऐश्वर्य असा आहे.
* अथर्ववेद हा जारण-मारण विद्येसंबंधी(ब्लॅक मॅजिक) आहे हे बहुश्रुत आहे.
*गीता अ.९ श्लोक १७ मधे
.........वेद्यं पवित्रमोंकारं ऋक्साम यजुरेवच| असा तीनच वेदांचा उल्लेख आहे. अथर्व वेदाचा नाही.
*ऋग्वेदातील ऋचांचे गायन कसे करावे याचे शास्त्रीय ज्ञान सामवेदात आहे.सामवेदात वेगळ्या ऋचा नाहीत असे ऐकले आहे.

भगवान

यनावाला,
भगवती, भगवंत, भगवान या शब्दांत भगचा अर्थ ऐश्वर्य असा आहे.
शंकासमाधानाबद्दल आभार.
--लिखाळ.

नानार्थी भग शब्द

अमरकोशात "भग" शब्दाचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत

भगं योनि: ...। २.६.७६ मनुष्यवर्गात सापडते.

पण नानार्थवर्गात त्या शब्दाचे पुढील अर्थ सापडतात :
भगं श्रीकाममाहात्म्यवीर्ययत्नार्ककीर्तिषु । ३.३.२६
म्हणजे अर्थ असे
१. श्री
२. काम
३. माहात्म्य
४. वीर्य
५. यत्न
६. अर्क (सूर्य)
७. कीर्ती

"भग-वत्" "भग्-इनी" वगैरे शब्दांमध्ये "भग" हा मूळ शब्द आहे. भगस् = भग असा शब्दही प्रचारात आहे.

"भग" शब्दाचा कुठला अर्थ घ्यावा यासाठी संदर्भ महत्त्वाचा. बहुतेक संदर्भांत अर्थ स्पष्ट असतो.

या मंत्रात 'भग' या शब्दाचा अर्थ -

या मंत्रातील - वरदे रेते सुरेते भगक्लिन्ने क्लिन्नद्रवे क्लेदया द्रवया अमोघे... या शब्दांच्या संदर्भामुळे भग या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो. (धनंजयांना दुजोरा)
नाही का? येथे भग म्हणजे भाग्य, ऐश्वर्य, यत्न, सूर्य, किर्ति यांपैकी कोणता अर्थ लावू शकतो?
मूळ चर्चेला अवांतर प्रतिसाद आहे. पण चर्चेने या शब्दाचा अर्थ लावण्याचे वळण घेतले आहे. तेंव्हा-

 
^ वर