सृजनशीलता - भाग १ - उगमस्थान

सृजनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. सृजनशीलता खालील चार प्रकारांत दिसून येते.
१) एखादी अगोदर अस्तित्वांत नसलेली अशी गोष्ट निर्माण करणे जी व्यवहारोपयोगी ठरेल.
२) नेहमी ठराविक पद्धतीने केली जाणारी गोष्ट निराळ्या पद्धतीने करणे, ज्यायोगे वेळ, श्रम व पैसा यांची बचत होईल.
३) एखादी अशक्य समजली जाणारी समस्या सोडविणे.
४) न सापडलेली नवीन तर्कसंगति शोधून काढणे. यामुळे विज्ञान/तंत्रज्ञानांत नवीन शोध लागतात, तर साहित्यांत त्यामुळे कधीकधी विनोदनिर्मिति होते.

प्रतिभावंत माणसे सृजनशील असतात. प्रत्येकाला इतरांनी आपल्याला प्रतिभावंत म्हणावे असे वाटत असते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी सृजनशीलता आपल्यांत नाही असे बहुतेकांना वाटत असते. प्रतिभा ही दैवी देणगी आहे, प्रतिभावंत जन्माला यावा लागतो, अशी त्यांची समजूत असते. प्रयत्नाने आपणही प्रतिभावंत होऊ शकतो यावर कोणाचा विश्वास नसतो.

वास्तविक सृजनशीलता हे मानवी मेंदूचे कार्य आहे. प्रत्येकाला जवळजवळ सारख्याच वजनाचा मेंदू लाभला आहे. तरीदेखील काही थोडी माणसे प्रतिभावान व इतर बहुसंख्य त्या सामर्थ्यापासून वंचित, असे का?

आपणापैकी बहुतेक जणांना मानवी मेंदूचे उजवा मेंदू व डावा मेंदू असे दोन भाग असतात हे ठाऊक असेल. त्यापैकी उजवा मेंदू नवीन नवीन कल्पना निर्माण करतो (त्यांच्या परिणामांचा विचार करीत नाही) व डावा मेंदू अनुभवावर व माहितीवर आधारित व्यावहारिक तर्काधिष्ठित विचार करतो. दैनंदिन जीवन चाकोरीबद्ध असते व त्यांत व्यावहारिकतेला महत्त्व असते. म्हणून सर्वसामान्य प्रौढ माणसे डाव्या मेंदूचा अधिकतम वापर करतात. किंबहुना त्यांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच असे म्हंटले तरी चालेल. असे का होते?

(क्रमशः)

Comments

चांगले

वाचायला चांगले वाटतेय. पुढील भागाची उत्सुकता आहे.

तेच तर

प्रत्येकाला जवळजवळ सारख्याच वजनाचा मेंदू लाभला आहे. तरीदेखील काही थोडी माणसे प्रतिभावान व इतर बहुसंख्य त्या सामर्थ्यापासून वंचित, असे का?

वा काय पण प्रश्न आहे.
मला आपलं उगीच वाटायचं की, काही लोकांना पुर्व जन्माचे आठवते काहींना नाही.

मला खात्रीच आहे विज्ञानाकडे याचे उत्तर आहेच!
मी तर म्हणतो की आपल्या ज्ञानाच्या बळावर आता सर्वच चित्रकार हे पिकासो आणि सर्व संगितकार हे बिथोविन असेच होणार!

आपला
गुंडोपंत

मेंदुचा वापर न करता >>

असे वाटते की >
१. ज्यागोष्टी केल्याने मनस्वी आनंद होतो त्या करणे म्हणजे स्रुजनशीलता .
२.प्रक्षेपक आणि प्रेक्षक (औडियन्स)असल्या शिवाय ती जगू शकत शकत नाही.
प्रक्षेपका शिवाय ती अस्तीत्व हीन तर प्रेक्षका शिवाय निरर्थक आहे .
३.प्रक्षेपक हा स्वतः पहीला प्रेक्षक असतो.
४.म्हणून स्रुजनशीलता सापेक्ष आहे .
५.प्रक्षेपक आणि स्रुजन यांची भेट घेण्या साठी उत्सुक असलेला , तहनलेला प्रेक्षक तितक्याच प्रमाणांत स्रुजनशील असतो. कमी असुच शकत नाही.
६.स्रुजन = करंट : प्रक्षेपक = फेज ; प्रेक्षक = न्युट्रल; बाकी सर्व जग - अर्थींग !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

शॉर्ट सर्किट

६.स्रुजन = करंट : प्रक्षेपक = फेज ; प्रेक्षक = न्युट्रल; बाकी सर्व जग - अर्थींग !
हे वाचून माझ्या मेंदूरुपी जनरेटरचे शॉर्ट सर्किट झाले आणि फ्यूज उडाला! आता फ्यूज उडाला म्हटल्यावर निवांतपणे AC/DC ऐकत बसलो, त्यात सृजनशीलता होती की नाही कल्पना (अय्यर नव्हे!) नाही.

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

 
^ वर