उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
भुते असतात का ?
वेमीत्८५
February 9, 2008 - 6:05 pm
मी नविनच या वेबसाइटचा सदस्य झालो आहें.
मला काही प्रश्न आहेत. पण ते कुठे विचारायचे ते माहित नाही म्हणुन या ठिकाणी देत आहे. ( प्रश्न कुठे विचारायचे माहित नाही चुकले असेल तर क्षमा करा.) भरपूर पुस्तके वाचली / वेबसाइट पहिल्यात पण मनाला पटतील अशी उत्तर मिळाले नाही, येथे उत्तर मिळेल असे वाटते.
१. भुते असतात का ?
२. कुठे असतात ?
३. ते कसे दिसतात ?
४. भूतांचा आपल्याला फायदा होतो की टोटा ?
कृपया ज्यांना याची उत्तरे माहित असतील त्यानी सांगावित
आपला नवीन मित्र
विजय
दुवे:
Comments
माहीत नाही...
सर्वप्रथम उपक्रमावर स्वागत!
"भूते असतात का?" या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणावेसे वाटते की मी काही पाहीली नाहीत म्हणून माहीत नाही. पण कदाचीत आपण अशा संकेतस्थळांवर सादप्रतिसादात भाग घेत रहाल तर "भूते असू शकतात" इथपर्यंत नक्की वाटू शकेल असे वाटते :-)
(ह्. घ्या. - हलकेच घ्या, टेक इट इझी!)
+१
पण कदाचीत आपण अशा संकेतस्थळांवर सादप्रतिसादात भाग घेत रहाल तर "भूते असू शकतात" इथपर्यंत नक्की वाटू शकेल असे वाटते :-)
सहमत आहे. मर्हाठी संकेतस्थळांवरच्या चर्चांमध्ये कळफलक झिजेपर्यंत बडवून माझी तर खात्री पटली आहे :)))
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
भुते असतात का?
१. भुते असतात का ?--का नसावीत?
२. कुठे असतात ?--रात्री सर्वत्र. श्रीक्रूष्णाने म्हटलेच आहे की "या निशा सर्वभूतानाम्" ही रात्र सर्व भुतांची आहे.
३. ते कसे दिसतात ?--दिसत नाहीत म्हणूनच अडचण आहे. दिसली असती तर फार मजा आली असती.
४. भूतांचा आपल्याला फायदा होतो की टोटा ? --अंगात शिरली तर तोटा नाहीतर ना तोटा ना फायदा.
आणखी काही?... पहा सभासद झाल्यापासून दोन तासात तुम्हाला एवढे ज्ञान झाले.
हे तर मला सुधा माहीत आहे
हे तर मला सुधा माहीत आहे. मला सवीस्तर माहीती हवी आहे
विजय
भुतं असायला माझी हरकत नाही
१. भुते असतात का ?
भुते असायला हरकत नसावी, म्हणजे देव असेल तर राक्षस, भुतं, सैतान का नको? त्यामुळे जसे देव असायला माझी हरकत नाही तशी भुतांनाही नाही.
पण तुम्हाला कोणती भुतं हवीत? आठवणींची भुतं, संशयाची भुतं, भितीची भुतं का मेलेल्या सजीवांची भुतं? जर मेलेले सजीव भुतं होत असतील तर आतापर्यंत मारलेले डास भुतं म्हणून आपल्याला छळतील का असा प्रश्न पडतो.
२. कुठे असतात ?
कुठेही असू शकतील. मनात, विचारांत, आचारांत, हृदयात, कपाटांत आणि राहिलीच तर रस्त्यांवर, घरांत, जंगलांत, ऑफिसांत, पाण्यात, हवेत, हवेल्यांत वगैरे.
३. ते कसे दिसतात ?
मी तरी पाहिली नाहीत पण जसे तुम्ही आम्ही दिसतो तशीच दिसत असावीत असं वाटतं. म्हणजे मेलेल्या माणसांची भुतं तुम्हा-आम्हांसारखी, मेलेल्या डासांची भुतं डासांसारखीच दिसत असावीत.
४. भूतांचा आपल्याला फायदा होतो की टोटा ?
भुतांचं की नाही अगदी माणसांसारखंच असतं, चांगल्या भुतांचा फायदा होतो आणि वाईट भुतांचा तोटा.
जी उत्तरं पटत नाहीत ती हलकेच घ्या.
हो
१. भुते असतात का ?
हो असणारच...
मी नाही का येथे उत्तरे देत बसलेला
२. कुठे असतात ?
इथे उपक्रमावर टेबलवर... कुठेही. अगदी तुमच्या खांद्यामागुन पण एक वाकुन बघते आहे आत्ता..
३. ते कसे दिसतात ?
हा प्रॉब्लेम आहे... मला पाहण्यासाठी तुम्हाला 'मरणे' नावाची छोटीशी क्रिया करावी लागेल की मी लगेच दिसेन. मीच काय सगळी गर्दी दिसेल. हल्ली साउअबर कॅफेमध्ये आमच्या सुद्धा लायनी आहेत बरं
४. भूतांचा आपल्याला फायदा होतो की टोटा ?
ते आम्हाला काय 'हवे' आहे त्यावर अवलंबुन आहे...
आपला
गुंडोपंत भुत
भूते नसतात :)
सर्वप्रथम आपले इथे स्वागत आहे.
आल्याबरोबर आपण चांगला विषय इथे आणला.
( प्रसिद्धी / प्रतिसादासाठी उपक्रमालाही अशा लेखनाची गरज होतीच )
तेव्हा भूतानंतर, माणसे असतात का ? या विषयावर चर्चा करायला आम्हाला आवडेल. :)
१. भुते असतात का ?
हो
२. कुठे असतात ?
प्रत्येक माणसात त्यांचा निवास आहे. शक्यतो आमावश्याच्या रात्री बहूतेक ती स्मशानात दिसतात, ( त्या रस्त्याने जाऊ नये )
३. ते कसे दिसतात ?
शक्यतो भुताचे पाय उलटे असले पाहिजे असे लोकसंकेत आहेत.तब्येत जरा लुकडी, चेहरा लांबट, डोळे नसतात नुसती खोबणी, शर्ट वगैरे काही घातलेला नसतो. पण ती माणसासारखीच असावीत असे आमचे मत
४. भूतांचा आपल्याला फायदा होतो की टोटा ?
फायदा झाल्याचे वाचनात नाही. त्याच्या सहवासाने माणसे भूतासारखी वागतात म्हणजे विचित्र वागतात.
भुतांचा बागुलबुवा
'भुतांचा बागुलबुवा' हे आपले यनावाला यांनी संपादित केलेले पुस्तक वरदा बुक्स ने प्रकाशित केले आहे. लेखक आठवत नाहीत.बरच जुन पुस्तक आहे. पण त्यात एक उल्लेख आठवतो. जर एखाद्याचा खुन झाला आहे.अन्यायाने मारले आहे.तर तो भूत होउन त्या अन्यायाचा बदला का घेत नाही? त्याला जडदेहाचे नियम लागु होत नाहीत.
प्रकाश घाटपांडे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या प्रतिक्रिये वरुण गुंडोपंत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या प्रतिक्रिये वरुण
गुंडोपंत मला फोटो पाठवा म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर मिळेल (पायाचा फोटो पाठवायला विसरु नका )
विजय
फोटो
भूताचा फोटो?
अरे कोणी घेतलाय का कधी?
हा फोटो आवडला
आज सुटीचे सर्व कसब पणाला लावले आणि भूतांसाठी गूगलत बसलो. काय काय प्रकार दिसलेत भूतांचे विचारु नका !!!
काही भूते सामाजिक दिसलेत, म्हणजे खेळकर वगैरे वाटले. असो भूत होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व क्वॉलीफिकेशन या फोटोत दिसले.
हा बघा फोटो.
भुतांना असं दिसायला हरकत नसावी. ;-)
फोटो www.ceticismoaberto.com येथून साभार.
हा हा
छे!! हा काही खरा प्रकार नव्हे.
आमचे फोटो येतच नाहीत!
हे अर्ध्यात अडकलेले... म्हणून यांचे येतात.
आमच्या सारख्य पुर्ण भुतांचे कसले फोटो येणार?
आपला
गुंडोपंत
प्रकार खरा नाहीच
फारा वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेट नवीन होते तेव्हा कोणीतरी हा विरोप ढकललेला होता. त्यावेळी हा फोटो वरील फोटोपेक्षा अधिक सुस्पष्ट होता आणि त्याखाली ओळ असे की या फोटो कडे १० मि. टक लावून पाहा... पण पाहणे शक्य होणार नाही! इंडोनेशियातील एका मुलांच्या हॉस्पिटलातील मेलेल्या लहान मुलीचा फोटो आहे वगैरे वगैरे. तेव्हा भलताच फेमस झाला होता आणि आमच्यासारखे रामसेपट पाहिलेले (त्यावेळेस) आणि द रिंग, ग्रज वगैरे सारखे आशियाई भुतं न पाहिलेले सर्व फसले होते. ;-)
कालांतराने कळले की फक्त ट्रिक फोटोग्राफी आहे.
अवांतरः भुतांचे फोटो येतात पण व्हॅम्पायर्सचे येत नाहीत. गुंडो, तुम्ही नेमके कोण ते आरशात तपासून पहा.
आपली,
(मांत्रिक नं.१) प्रियाली.
छे छे!!!
छे छे!!!
कोणत्याही भुताचे फोटो येत नाही त हे एक भुत या नात्याने छातीठोकपणे सांगतो ना मी.
हे व्हँपायर लोक वगैरे काही खरं नाही हो. खरी भुतं आम्हीच!
तुम्हाला पटत नसेल तर भूतान च्या राजाला विचारा...
आपला
गुंडोपंत
यातील तुम्ही कुठले?
गुंडोपंत,
फोटो येत नसला तरी खालील चित्रांवरून तुम्ही कुठले ते कळायला आवडेल!
(चित्रगुप्तांना विशेष धन्यवाद एकदम "डेडली" संकेतस्थळ सुचवले!)
बाकी ऑस्ट्रेलीयन-अमेरिकन संकेतस्थळावर वरील चित्रांबरोबर चेटकीण, हडळ, जखीण, पिशाच्च असे "युझर फ्रेंडली" शब्द आलेले पाहून आपल्या संस्कृतीचा प्रभाव सर्वत्र होता या बद्दल खात्री पटली.
हडळ - जखिण
या हडळी जखिणी सर्व पाश्चिमात्य कपड्यांत का बॉ?
सहमत आहे. एकदम भन्नाट साईट आहे. :))))
भुतान्चा फोटो
बरं आले विचारून.
हा भूतानच्या राजाने दिलेला फोटो. आता तरी खात्री पटली का?
ह. घ्या.
तेथे येणारे प्रत्येक मानुस बोलतो की भुते असतात
आमच्या बाजुलाच एक दर्गा आहे. तेथे मी काही लोकांना पाहिले आहे
ते हलतात , डोलतात, बोम्बलतात,
तेथे येणारे प्रत्येक मानुस बोलतो की भुते असतात
मी तर संभ्रमात आहे, भुते असतात की नसतात
याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी मला ऑस्ट्रोलिया च्या एका वेबसाइट वर ही माहिती मिळाली
त्याची लिंक पाठवतो
http://www.spiritualresearchfoundation.org/spiritualresearch/difficultie...
तुझे उत्तर मिळाले असेल तर धन्यवादाचे पत्र पाठवायला विसरु नकोस
चल आता होतो मी गुप्त, माझे नाव :}
चित्रगुप्त
अप्रतिम वेबसाइट आहे.
अप्रतिम वेबसाइट आहे.
परकीय असून सुद्धा या विषयावर एवढे संशोधन जबरदस्त................................
मला अवश्य असलेली सर्व माहिती यावर मिळाली,
http://www.spiritualresearchfoundation.org/spiritualresearch/difficultie...
आपले मनापासून धन्यवाद
अशाच आमच्या प्रश्नांना उत्तरे द्या
विजय मीत
संकेतस्थळ आवडले.
भुतांचे संकेतस्थळ आवडले. आपल्या सदस्या श्री. अनु यांना फारच आवडेल. त्यांना भुतांत फार रस आहे.--वाचक्नवी
परीक्षेबद्दल काही (व्यस्त) म्हणी
वरील फोटोतले पाय नीट दिसत नाही, त्यामुळे निर्णय नीट लागत नाही. शिवाय वर दिलेल्या मानचित्रांमध्ये असे दिसते की कधीकधी भुताला पायाऐवजी लांब ओढलेले एकच टोक असते (पण असेच काही जलपर्यांनाही असते, त्यामुळे गोंधळ होणे शक्य आहे.)
शितावरूनही भुताची परीक्षा करता येते - ही असतील तर ती नाचतील, आणि अशा प्रकारे ओळखू येतील, नजरेस येतील.
भुतांचे वसतिस्थान
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
*****************************
असा बिषय येथे चर्चेसाठी यावा याचे सखेदाश्चर्य वाटते.
भुतांचे वसतिस्थान एकच. ते म्हणजे माणसाचे मन.देव,दैत्य,राक्षस,सैतान,भुते,समंध,देवचार, ब्रह्मराक्षस,मुंजे,हडळी, चुडैली, ही सर्व माणसाच्या मनात असतात. अन्य कोणत्याही ठिकाणी त्यांचे अस्तित्व असूच शकत नाही कारण ही काल्पनिक मंडळी आहे. मनात असते ते कुठेही असल्याचे भासते. मनातून गेले की कुठेही नाही.
यादी फार छोटी झाली.
आणखी भुते--आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवाई, जखाई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा.--वाचक्नवी
काही शंका...
चकवा हा काही भूताचाप्रकार नाही तर ती एक "स्थिती " आहे, फार तर त्याला भूताटकी म्हणू शकाल
सटवाई पण भूताच्या प्रकार धरली जाते असे वाटत नाही.
बाकी खवीस, कैदाशीण, वीर, इर ही भूते आहेत हे नवीनच कळले! मला खवीस आणि कैदाशीण या उपाधीला पोचलेले नक्कीच काही महाभाग माहीत आहेत. याचा अर्थ ती भूते आहेत असे समजले तर तो माझ्या मनाचा खेळ ठरत नाही आणि भूते खरी ठरतात! :-)
असो. ही चर्चा मला वाटते बहुतांशी उपक्रमी विरंगुळा म्हणून घेत आहेत. निदान तशी आशा करतो.
विरंगुळा की डेड अर्नेस्ट?
कित्येक लोकांच्या (आणि माझ्या) लिखाणात "डेड अर्नेस्ट" हा प्रकार आम्ही येथे उपक्रमावर बघितलेला आहे. मृत असून चढणारा हा अर्नेस्ट म्हणजे भूत नव्हे तर काय?
चकवा: एक वनस्पती
माझ्या ऐकीव माहिती नुसार (स्त्रोतः सुधागड ट्रेकमधील ग्रामस्थ वाटाड्या) चकवा एका वनस्पतीमुळे लागतो. त्या वनस्पतीची फुले (त्या वनस्पतीचे नाव विसरलो) संध्याकाळी फुलतात व त्यातील परागकण नाकात गेल्यास एक प्रकारची धुंदी येते. त्यामुळे दिशेचं भान रहात नाहि.
उपायः ट्रेकच्या वेळी रात्री अंधारात चकवा लागल्यास त्याच जागी बसावे व सकाळी पेव फुटल्यावर पाणी शोधून गटागटा प्यावे (रात्री पाणी शोधण्याच्या भानगडीत पडू नये ;) )त्याने धुंदी उतरते.
-(वाटाड्यां कडून अनेक गावठी उपाय शिकलेला) ऋषिकेश
चकवा
चकव्यासंबंधी वरील ऐकीव माहिती विचारात घेण्यासारखी आहे.
पण यातले पेव फुटणे म्हणजे काय? माझ्या माहितीप्रमाणे याचा अर्थ : भिकारी, याचक, मुंग्या यांचा मोठा समुदाय एकदम येणे.
आपल्याला तांबडे फुटणे म्हणायचे आहे काय?---वाचक्नवी
तांबडे फुटणे
हो मला तांबडे फुटणे म्हणायचे आहे. पण माझ्या गावी सगळे त्याला पेव फुटले असेच म्हणतात का हे माहित नाहि :)
-ऋषिकेश
पेव फुटणे चा अर्थ
वरील अर्थ बरोबर् आहे. मोठा समुदाय एकत्र दिसणे किंवा प्रकट होणे म्हणजे पेव फुटणे. "माणसांचे पेव फुटले होते" म्हणजे खूप गर्दी झाली होती.
-- आजानुकर्ण
मान्य!
सटवाई म्हणजे दुर्गेचे एक रूप. ही मुलाच्या वयाच्या सहाव्या दिवशी पूजतात. ही सटवाई उर्फ षष्टी मुलाच्या कपाळावर त्या दिवशी त्याचे भविष्य लिहिते.
मला डंखीण लिहायचे होते, सटवाई नाही.
डंखीण म्हणजे ठाकूर जातीच्या स्त्रीचे भूत. इर-वीर ही युद्धात मेलेल्या माणसांची भुते. जखीण हे बाळंतपणात किंवा विहिरीत बुडून मेलेल्या स्त्रीचे भूत. मुंजा किंवा मुंज्या म्हणजे मुंज झालेल्या पण सोडमुंज व्हायच्या अगोदर मेलेल्या मुलाचे भूत. इ. इ.--वाचक्नवी
खवीस
खवीस हे मुसलमान माणसाचे भूत. वेताळ हा भुतांचा राजा. आग्यावेताळ वेगळा. याला मंत्राने प्रसन्न करून घेतले, की तो यजमान सांगेल त्या माणसाच्या शरीरात दाह निर्माण करतो किंवा त्याच्या घराला वा घरातल्या वस्तूंना आग लावतो. --वाचक्नवी
वेताळ
गोव्याच्या एका देवळात (धनंजय सांगू शकेल कदाचीत कुठले ते पण ) मला वाटते रामानाथ (का रामनाथी) देवळात वेताळाचे देऊळ पाहील्याचे आठवते.
बहुतेक शंकराच्या देवळांत
वेताळ असतो. देऊळ नसले तर भिंतीत महिरपी देवळी तरी असतेच. त्यामुळे रामनाथीला तुम्ही वेताळ बघितला असणार.
वेताळाचे देऊळ
माझ्या आठवणीप्रमाणे पुण्यातदेखील वेताळाचे एक देऊळ आहे. वेताळबाबा चौकात असेल किंवा हनुमान टेकडीवर. --वाचक्नवी
चकवा आणि काही भूतकथा
चकवा म्हणजे वेळ, काळ, स्थळ यांचे आपापसांतील संबंध सैलावणे आणि यात अडकलेली माणसे त्यामुळे चकणे. परंतु याच नावाचे भूत जे माणसांना चकवते त्यालाही काही ठीकाणी चकवा असे म्हटले जाते.
असो त्या निमित्ताने काही जुन्या भूतकथांची आठवण झाली. इथे दुवे देते.
आऽऽई!
चकवा
अंधश्रद्ध
इच्छा
विचारांचा चकवा
भुतांविषयी बोलताना (लिहिताना) प्रियलीताई नेहमीच ऍब्स्ट्रॅक्ट लिहितात. पण सत्य मात्र काँक्रीट आहे. चकवा हा ग्रासित व्यक्तीला खूप खाऊ घालतो, पाणि मात्र देत नाही. (पाणी.. पाणि म्हणजे कर, ज्याला मराठीत हात म्हणतात, संदर्भ पुणे मराठी ग्रंथालय--वाचक्नवी). आणि मग ग्रासित व्यक्ती पाणी मागते/तो. मग चकवा त्याला/तिला विहीरीकडे नेतो आणि बुडवून टाकतो.
- (डेड अर्नेस्ट) सर्किट
आपल्या वरील विचारांत आपण काय सांगायचे आहे ते हरवून बसला आहात असे वाटले :)
काही परदेशी भुते
खवीस, वेताळ आणि मुंज्यांच्या राज्यातून परदेशात चला!! ;-) काही प्रसिद्ध परदेशी भुते पुढीलप्रमाणे -
पोल्टरगाईस्ट : ही घरात गोंधळ माजवणारी भुतं. ती सहसा ठक, ठक आवाज करतात. भिंती बडवतात, खुर्च्या पाडतात. एखाद्या लहान मुलासारखा उच्छाद मांडतात.
डॉपलगँगरः हे भूत घरातल्या एखाद्या व्यक्तीचे रूप घेऊन समोर येते. ज्याचे रूप घेऊन येते त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित असतो.
व्हँपायरः हे रक्तपिपासू भूत माणसाच्या नरडीचा घोट घ्यायला उत्सुक असते. त्याला रूपे बदलण्याची कलाही अवगत असते. प्रसिद्ध उदाहरण - ड्रॅक्युला (ब्रॅम स्टोकरचा)
बान्शी: हे ही डॉपलगँगरप्रमाणे ओळखीच्या माणसाचे रूप घेऊन मृत्यूसंदेश आणते.
झोंबी - मेलेल्या माणसांच्या प्रेतांना मांत्रिक वश करून आपल्या किंवा आपल्या गिर्हाईकाच्या मतलबाची कामे करायला लावतात.
बोगीमॅन - हे भूत/ सैतान लहान मुलांना पाठीवरल्या पोत्यात घालून पळवते.
फँटम वगैरे इतर भुतेही प्रसिद्ध आहेत.
भुतांसारखे अन्य चमत्कार होतात का?
भुते, भानामती, युएफओ असतात कि नाही या सारख्या विषयांवर साधार माहिती करिता प्राचार्य गळतगे यांचा 'विज्ञान आणि चमत्कार' ग्रंथ अवश्य वाचा. (inscript facility? Please guide.)
शशिकांत ओक. विंग कमांडर (निवृत्त)
ए -4/ 404, गंगा हॅमलेट हौसिंग सोसायटी विमान नगर, पुणे.
मो - 9881901049.
कल्पना नाही
असतात की नाहीत या विषयी काही कल्पना नाही
पण काही गोष्टी जगात अतर्क्य आहेत हे अमान्य करूनही काही हाताला लागत नाही.
काही घरांमध्ये चमत्कारिक वाटते असे जाणवले आहे. पण भ्रमही असेल. हु नोज!
-निनाद
झोटिंग
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संशयकल्लोळ नाटकातील एक गीतः
संसारीं शांतिचा झरा|
संशय खट झोटिंग महा|
देऊं नका त्या थार जरा| हा बोध खरा|
निशाचरी कल्पना खुळी.....
....यांत झोटिंग हा एक भूतप्रकार आहे.
झोटिंग
झोटिंगसुद्धा मुसलमानाचेच भूत. --वाचक्नवी
म्हणूनच
मुसलमान राजांच्या राजवटीला झोटींगशाहि म्हणत असतील का? ;)
जोटिग-झोटिंग-ज़्होटिंग
मूळ संस्कृत शब्द-जोटिंग, अर्थ स्वत:च्या शरीराला खूप पीडा करून तपश्चर्या करणारा साधू; शंकर. त्यावरून झालेला हिंदी शब्द झोटिंग.--अर्थ महादेव. मराठीत आला तो उच्चार बदलून-ज़्होटिंग. अर्थ: मुसलमानाचे भूत; ज्याला घरदार नाही आणि जो दुसर्याला फसवून पळून जाऊ शकेल असा मनुष्य; अव्यवस्थित, गैरशिस्त माणूस. याला शाही किंवा पातशाही हे फार्सी प्रत्यय लागले की होतो-ज़्होटिंगपातशाही. अर्थ: बेबंदशाही, अंदाधुंदी. --वाचक्नवी
बंद करा राव या चर्चा
बंद करा राव या चर्चा!
भुतांच्या कसल्या चर्चा करता?
त्रास होतो ना जीवाला इथे.
शिवाय दिवसा झोप येत नाही ती वेगळीच.
आपला
गुंडोपंत
मलासुद्धा!
शिवाय दिवसा झोप येत नाही ती वेगळीच.
मलासुद्धा! म्हणून भरदुपारी इथं लिहणं चाललंय.--वाचक्नवी
भुते असतात आणि ती लोकसभेत, राज्यसभेत असतात.
भुते असतात आणि ती लोकसभेत, राज्यसभेत इत्यादी ठिकाणी असतात. ती त्यांची नेहमीची निवासस्थाने मात्र नसावीत. भुते चढली की माणसे तिकडे जायला लागतात. इतर माणसांच्या मानगुटींवर बसून शक्य असेल तेवढे डोके सरकवतात. भुते उतरली की मात्र चालायला लागतात.
पण ही भुते लवकर उतरत देखील नाहीत. काही काही मेल्यानंतरही उरतात.
तात्पर्य = ह्या भुतांपासून सावधान.
हैयो हैयैयो!
हक्कभंग
भुते असतात आणि ती लोकसभेत, राज्यसभेत इत्यादी ठिकाणी असतात.
सावध...हक्कभंग ठराव होईल!