लेखाचा खुलासा
तरीही ते म्हणतात, `आम्ही महाशक्ती होणार !'
दारूगुत्ते वाढताहेत, वेश्या रस्त्यावर खुणावताहेत
गॅसटंचाई भेडसावत आहे, झोपडपट्टी वाढत आहे ।। १ ।।
गुन्हेगारीच्या चित्रपटांची चलती आहे, दरोड्यांची संख्या वाढती आहे
तरीही यांचे पालुपद आहे, `आम्ही महाशक्ती होणार !' ।। २ ।।
गुंड धीट होत आहेत, राजकारणात शिरत आहेत
सज्जन माणूस अंग चोरून सारे काही बघत आहे ।। ३ ।।
गुन्हेगार लोकसभा, विधानसभा काबीज करत आहेत
सात्त्विक जनता भजन व प्रवचन यांत मग्न आहे ।। ४ ।।
गुंड-गुन्हेगार संघटित आहेत
सज्जन-शक्ती विघटीत आहे ।। ५ ।।
तरीही आम्ही म्हणतो `आम्ही महाशक्ती होणार !'
- श्री. अशोक तेलंग (लोकजागर, ऑगस्ट २००७)
दहशतवादाची समस्या आज भारतात `आ' वासून उभी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दहशतवाद्यांनी आपले जाळे पसरले आहे. त्याच्या विरोधात सर्व हिंदूंनी आज संघटितपणे उभे रहाण्यासाठी प्रयत्न करत असतांना या लेखाला `समाजात आग लावणे' म्हणणारे हिंदू दहशतवादाची आग स्वत:च्या घरापर्यंत पोहोचल्यावर जागे होणार का ? `मी आणि माझे घर' ही वृत्ती जोपासणारे समष्टीसाठी काही करतील अशी आशाच करता येत नाही. काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचाराबाबत इतके संवेदनहीन असणारे जन्महिंदू दहशतवाद्यांकडून मारले जाण्याच्याच लायकीचे होत !
दुबळयांच्या शांती-अहिंसेने देशाचा घात होतो. देश टिकवायचा तर शक्ती हवी, शस्त्रे हवीत. रामाच्या हातात धनुष्य आहे आणि श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शनचक्र. सज्जनांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष देवांनाही हाती शस्त्रे घ्यावी लागतात. राष्ट्राच्या सीमा फक्त तलवारीनेच आखता येतात. हे हिंदू तरुणा उठ, जागा हो. राष्ट्ररक्षणार्थ शस्त्र उचल. - स्वा. सावरकर
भारतियांनो, सर्व राजकीय पक्ष क्रांतीकारकांना सोयीस्कररीत्या विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !
कदाचित या वरुण मी जो लेख पाठवला होता त्याबद्दल ज्यांना जे समजायचे असेल ते समजतील आणि ज्याना समजत नसेल (? ) त्यांनी का समजले नाही याचा विचार करवा असे वाटते
आपला
गणेश
Comments
निदान
या लेखात तरी योग्य जागी स्वल्पविराम टाका. भलताच अर्थ निघत आहे.
-- आजानुकर्ण
गूड वन!
या लेखात तरी योग्य जागी स्वल्पविराम टाका. भलताच अर्थ निघत आहे.
गूड वन!
ये क्या हो रहा है
ही एक्सप्रेस कुठून कुठे जाते आहे? की कोण काय म्हणते आहे याची तमा न बाळगता फक्त 'गर्व से कहो हम हिंदू है'?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
कल्पना नाय बा!!
कल्पना नाय बा!!
यातील "कोण काय म्हणते आहे याची तमा न बाळगता" हे चालू आहे इतकं नक्की.
असो. उपक्रमपंताना आता हा खेळ थांबवावा असे मात्र सुचवावेसे वाटते.
हे
वाचल्यावर लगीच आम्हाला या शिनेमाची याद आली.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
समष्टी
म्हंजे काय? या निमित्ताने एक नवीन शब्द कळाला तर वेळ अगदीच वाया गेल्यासारखे वाटणार नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
व्यक्ति आणि समष्टी
...असा रूढ वाक्प्रयोग आहे. समष्टी म्हणजे "कम्युनिटी" असा माझा कयास.
धन्यवाद
मोल्सवर्थमध्ये बघितले, पण तिथे इल्ले.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
समष्टि
व्यष्टि म्हणजे स्वतासाठी व समष्टि म्हणजे समजासाठी
धन्यवाद
भक्तांच्या रक्षणाला जसे हिंदू देव धावून येतात त्याप्रमाणे येऊन शब्दाचा अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता असेच चर्चांनाही उत्तर द्यावे ही विनंती. (की त्यासाठी ऍडीशनल तप करावे लागेल?)
बाकी मोल्सवर्थची विकेट काढणारा शब्द वापरला म्हणजे तुम्ही पावरबाज भाषातज्ञ वगैरे दिसता राव!
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
मरगळलेल्या संस्थळांत जान
उपक्रमावर विचारप्रवर्तक, अभ्यासपूर्ण, उत्तम विश्लेषक, माहितीपूर्ण अश्या अनेक गोष्टी वाचनात आल्या होत्या. पण त्यावर प्रतिसाद संथपणे येत. इथे बघा, हिट मारल्यावर जसा मेलेल्या डासांचा सडा पडावा तसे प्रतिसाद पडले आहेत.
शेवटी मरगळलेल्या संस्थळांत जान यायला असे विषय बरे असतात म्हणून का अशा चर्चा इथे टिकून आहेत?
-ऋषिकेश
समष्टी!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
समष्टी (स्त्री.) - १. अनेक घटकांनी युक्त, समग्रता. २. समाज, समुदाय.
३. ब्रह्मांड
--राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोशात दिल्याप्रमाणे.
निषेध !!!
चिथावणीखोर लेखांचा उपक्रमावर वाढता प्रभाव पाहता, लोकप्रिय होण्याचा एक चांगला मार्ग संस्थळाच्या मालकांनी, संपादकांनी शोधून काढला आहे, आम्ही उपक्रमाच्या धोरणांचा निषेध करतो.
आरोप
हे किंवा तत्सम 'चिथावणीखोर' लेखन उपक्रमाच्या चालक/ मालकांनी स्थळ 'लोकप्रिय' होण्यासाठी म्हणून लिहून घेतले असावे अथवा तसे ते नसले तरी अशा हेतूने मुद्दाम ही चर्चा चालू ठेवली असावी असा आपण गंभीर आरोप येथे करत आहात, त्याचा मी निषेध करतो.
तसे नसावे
उपक्रमांनी उत्तर दिलेले नाही त्यामुळे ते बहुधा गैरहजर असावेत, अन्यथा ते उत्तर देतात. माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यातून कधीतरी वेळ काढणे अशक्य होते असे समजायला येथे जागा आहे असे वाटते. उपक्रमाच्या धोरणांत सामाजिक चिथावणीखोर लेखन असू नये असा स्पष्ट इशारा न दिल्याने संपादकांना काय करावे याचा उलगडा झाला नसावा. अशा प्रकारचे अधिक लेखन येत राहिले तर मात्र धोरणांचा विचार न करता, लेखन उडवावे लागेल असे निदान माझे मत आहे. अशा लेखांची उपक्रमाला (कु)प्रसिद्धीसाठी गरज आहे असे वाटत नाही.
तूर्तास, नियमीत येणार्या सदस्यांनी असहकार पुकारू नये असे वाटले.
------
* हा प्रतिसाद सरांना उद्देशून होता. जागा चुकली. क्षमस्व!