भारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने

२८ डिसेंबर, १८८५ ला इंडीयन नॆशनल कॊंग्रेसची अथवा मराठीत "राष्ट्रीय सभेची" स्थापना झाली. स्थापना करण्यात पुढाकार घेणारे होते: ब्रिटीश सनदी अधिकारी ऎलन ह्यूम, दादाभाई नवरोजी, दिनशा वाच्चा तसेचे अनेक रावसाहेब रावबहाद्दूर... विकीवर पटकन संदर्भ मिळाला नाही, पण मला वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे काशिनाथ तेलंग, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तैय्यबजी आदी पण पहील्या बैठकीस हजर होते.

काँग्रेसची स्थापना एका दिवसात झाली नव्हती तर त्याला १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध आणि नंतर तसाच प्रयत्न झालेली वासुदेव बळवंत फडके यांची प्रथम क्रांती तसेच देशभरात इतरत्रपण होत असलेले लहान-मोठे उठाव हे कारण होते. "नेटीव्हांना" जर संवादाचे माध्यम मिळाले नाही, तर त्याचा विपरीत परीणाम होऊ शकतो हे मायबाप ब्रिटीश सरकारच्या ध्यानात आले होते. ही सर्व (थोडक्यात) काँग्रेस स्थापनेची पार्श्वभूमी होती. स्थानीक सुिशिक्षीतांनी या व्यासपिठाचा उपयोग करून एक तत्कालीन अधुनीक चळवळ उभी करावी आणि त्याला चांगला प्रतिसाद म्हणून ब्रिटीशांनी स्थानीक पातळीवर राज्यकारभार करणारी यंत्रणा - जी त्यांना ब्रिटन मधून आणणे शक्यपण नाही आणि नियंत्रण ठेवायला गरजेची पण आहे - अशी स्थानीक स्वातंत्र्याच्या रूपात द्यावी असा एकंदर हेतू होता.

लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या वरील हेतूला एका अर्थी पहीला सुरूंग लावला. काँग्रेसच्या माध्यमातूनच त्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही घोषणा प्रसिद्धीस आणली आणि स्वतः 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून प्रसिद्ध झाले. (गंमत म्हणजे त्यांना असे म्हणल्याबद्दल त्यांनी चिरोलच्या विरुद्ध खटला दाखल केला होता...!)

अर्थात सुरवातीपासून काँग्रेसमधे जहाल-मवाळ गट तयार झाले. टिळक आणि गोखले यांच्यात तात्वीक वाद होऊन काँग्रेस पहील्यांदा फुटली (त्यात गोखल्यांच्या बाजूने बोलविते धनी हे फिरोजशहा मेहता होते). टिळकांच्या शेवटच्या लंडन निवासाच्या वेळेस गांधीजींनी चळवळ चालू केली होती आणि टिळकांनी दूरदृष्टीने येणार्‍या काळाची चाहूल आणि (कदाचीत) भारतीय मानसीकतेच्या मर्यादा समजून, आपल्या अनुयायांयांना गांधीजींना पाठींबा देयला सांगीतले. त्या काळाला "टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरवात" असे म्हणले जाते.

पुढे अनेक दिग्गज काँग्रेसच्या चळवळीने पुढे आणले त्यातील ठोस नावे म्हणजे मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, आंबेडकर, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार पटेल इत्यादी.

गांधीजी स्वतःला "मी चार आण्याचा पण सदस्य नाही" असे म्हणायचे जे मला सर्वात जास्त खटकते... एखाद्या संस्थेचा सदस्य नाही म्हणायचे आणि त्या संस्थेवर/चळवळीवर सर्वात जास्त हक्क आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा करणे हे बाकी कितीही आदर्श व्यक्तिमत्व असले तरी त्या संस्थेस/चळवळिस आणि परीणामी त्यातून अपेक्षित असलेल्या फलीतास मारक ठरू शकते. त्यांच्या आधी तोच प्रकार फिरोजशहांनी केला होता. (अर्थात फिरोजशहा सदस्य होते, पण मी म्हणतो तेच खरेहा हट्ट). दुर्दैवाने त्य्याचा सर्वात घातक परीणाम झाला तो एका व्यक्तीकडे बघून स्वतंत्र वृत्तीने विचार न करण्याचा आणि एक व्यक्तीजरी मुख्य समजली तरी कुठल्याच पातळीवर स्वतःच्या जबाबदारीचे पितृत्व (ओनरशिप) न घेण्याची सवय... याला स्वातंत्र्योत्तर दोन सन्मान्य अपवाद - लाल बहाद्दूर शास्त्री - रेल्वे अपघातानंतर, जबाबदारी स्विकारून दिलेला राजीनामा आणि इंदीरा गांधी - खलीस्तानचे भूत स्वतः तयार करायची चूक समजल्यावर स्वतःच्या प्राणाशी बेतले तरी भोगत यशस्वी केलेले "ऑपरेशन ब्ल्यू स्टार"...

स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही स्वातंत्र्युद्धाचे एक छ्त्र होती - अपवाद फक्त हिंदूत्ववादी आणि कम्यूनिस्ट क्रांतीकारक यांचा असेल. त्यातील पटणारे, न पटणारे गूण-अवगूण, तत्कालीन ऐतिहासीक प्रसंग आणि निर्णय समजून सुद्धा एक सांगावेसे वाटते की हे छ्त्र म्हणजे सनदशीर मार्गाने अवलंबलेली पक्षातीत राजकीय चळवळ होती. तशी चळवळ मान्य होती म्हणून आज भारताचा पाकिस्तान झाला नाही... या चळवळिस आज १२३ वर्षे झाली. आजच्या एका पक्षाला १२३ वर्षे झाली असे म्हणणे म्हणजे लोकभ्रम तयार करण्याचे उद्योग आहेत आणि ते तसे माध्यमांसहीत तमाम कॉग्रेसजन, तथाकथीत विचारवंत आणि न समजता सामान्य जनता करत असते.

गांधीजींनी स्वातंर्याच्या पहाटेच सांगीतले की काँग्रेस विसर्जीत करा... अर्थात तसे न करण्याचा मोह त्यावेळच्या दिग्गजांना झाला. पण नंतर या चळवळीच्या झालेल्या पक्षात अनेक फाटे फुटत गेले... मूळ चळवळीतले अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात विभागले गेले. प्रथम प्रजासमाजवादी, नंतर सिंडीकेट-इंडीकेट, नंतर इंदिरा काँग्रेस, समाजवादी काँग्रेस इत्यादी. शिवाय आंबेडकरांसारख्या नेत्याने स्वतःचा रिपब्लीकन पक्ष काढला.

यातील कोणचा राजकीय पक्ष म्हणजे १८८५ ते १९४७ पर्यंतच्या खर्‍या काँग्रेसचळवळीचे वंशज समजायचे? म्हणाल तर सर्वच. पण मग केवळ एक गांधी हे आडनाव ज्याचा महात्मा गांधीशी काडिचाही संबंध नाही आणि नेहरूंचे थोडेफार (फारथोडे) रक्त या केवळ कारणांसाठी राहूल गांधी - सोनीया गांधींच्या कॉग्रेसला १२३ वर्षाचा पक्ष म्हणणे म्हणजे तमाम स्वातंत्र्य चळवळिची आणि आपणच आपली एक भारतीय म्हणून क्रूर थट्टा करून घेतो असे वाटते...

तुम्हाला काय वाटते?

Comments

मान्य

राहूल गांधी - सोनीया गांधींच्या कॉग्रेसला १२३ वर्षाचा पक्ष म्हणणे म्हणजे तमाम स्वातंत्र्य चळवळिची आणि आपणच आपली एक भारतीय म्हणून क्रूर थट्टा करून घेतो असे वाटते...

१००% सहमत.

बाकी लेखातील काहि मते मात्र वादनिष्ठ आहेत. पण ही चर्चा काँग्रस बद्दल असुन गांधी अथवा गोखले यांच्या बद्दल नाही तेव्हा ती मते इथे मांडण्याचा मोह आवरतो आहे :)

-ऋषिकेश

बरेच

बरेच मुद्दे पटले. खास करुन शेवटचा. कालची भुट्टोंची हत्या झाल्या पासुन राहुल गांधींचा उदय अशा प्रकारेच होइल कि काय अशी शंका वाटु लागली आहे.
आजची काँग्रेस हिच मुळी इंदिरा काँग्रेस अशी ओळखली जाते. पण त्याला १२३ वर्षांचा इतिहास आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे.

हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

सहमत

सहमत आहे. मूळ काँग्रेस आणि आत्ताचा काँग्रेस पक्ष (किंवा कुठलाही इतर पक्ष) यांचा फारसा संबंध आहे असे वाटत नाही.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

खरे आहे

अनेक मुद्द्यांशी सहमत.
हाच लेख भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जन्मदिनाच्या वेळी काही नावे बदलून जसाच्या तसा लिहिता येईल.

-- आजानुकर्ण

समजले नाही...

>>>हाच लेख भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जन्मदिनाच्या वेळी काही नावे बदलून जसाच्या तसा लिहिता येईल.

आपल्यास काय म्हणायचे आहे ते नीटसे समजले नाही.

भारतीय जनता पक्ष स्वतःस १९८० साली जन्माला आलेला पक्ष समजतो. ते पुर्वाश्रमीचा जनसंघ असेही कधी कधी स्वतःस म्हणतात. पण तरी देखील स्वत्:च्या वाडदिवसाच्या वर्षात ती वर्षे घालत नाहीत.

कम्यूनिस्ट हे सुरवातीपासूनच वेगळे होते. तरी देखील भाकप आणि माकप अशी दोन शकले पडल्यावर ते आधीच्या कम्यूनिस्ट पक्षाचा, जो स्वातंत्र्यपूर्व काळात होता त्याचे सध्याचे पक्ष चुकीच्या पद्धतीने नाव घेत नाहीत.

बाकी तीच कहाणि इतरांची अगदी रिपब्लीकन पक्षाची पण.

एकट्या शरद पवारांनी (पटण्यासारखा योग्य) प्रकार काँग्रेस जन्मशताब्दीच्या वेळेस केला होता, ती म्हणजे इतरांना बोलवून एकत्र जन्मशताब्दी साजरी केली. अर्थात त्यावेळेस नुकत्याच इंदीरा हत्येमुळे आणि राजीव गांधींच्य उदयामुळे त्यांनी केलेल्या समारंभासच प्रसिद्धी मिळाली होती, जरी पवारसाहेब लक्ष वेधण्यात यशस्वी झाले होते तरी..

थोडक्यात विद्यमान सोनीया काँग्रेस (आणि त्या आधी राजीव काँग्रेसपण) आणि त्यातील काँग्रेसजन जो भोंदूपणा करून काँग्रेस नामक राष्ट्रीय चळवळीशी फक्त आमचेच काय ते नाते म्हणतात ते पाहून केवळ समर्थांच्या "सांगे वडीलांची किर्ती, तो एक मूर्ख" याच ओळी आठवतात!

आंबेडकर

आंबेडकरांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध नसावा असे वाटते. त्यांच्या पक्षाचे नाव "शेड्यूल कास्ट फेडरेशन" की काहीसे होते. पुढे आंबेडकरांच्या मृत्यूसमयी रिपब्लीकन पक्षात तिचे रुपांतर झाले.

-- आजानुकर्ण

आंबेडकर आणि कॉंग्रेस

आंबेडकरांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध नसावा असे वाटते.

तुम्ही म्हणता ते एका अर्थाने बरोबर आहे.

मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे काँग्रेस ही एक चळवळ होती ज्यात बहुतांशी प्रवाह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामील होते. आंबेडकर या अर्थी (स्वातंत्र्यपूर्व) काँरेसशी संबंधीत असावेत असे वाटत. सधयच्या कॉंग्रेसच्या (जे स्वतःला १२३ वर्षाचे समजतात) संकेतस्थळावर पण त्यांचा मध्यभागी फोटो आहे. सुरवातीचा कल (आणि नंतरपण बराचसा कल) हा राजकारणापेक्षा सामाजकारणाकडे होता. म्हणूनच त्यांचे विचार हे बर्‍याचदा वेगळे राहीले किंबहूना स्वतंत्र राहीले. त्या अर्थाने ते काँग्रेसशी संबंधीत नव्हते कारण वरीष्ठांसमोर (श्रेष्ठींसमोर) वैचारीक स्वातंत्र्य दाखवण्याची परंपरा (आणि नंतरच्या काळात हिंमत) काँग्रेसमधे नव्हती (नाही). पुढे राखीव मतदार संघाच्या प्रकरणावरून गांधींजींनी आमरण उपोषण केल्यामुळे (ऐकल्याप्रमाणे) आंबेडकरांच्या पत्नीने त्यांना जरा मोडते घेयला सांगीतले (उगाच महात्म्याच्या मृत्यूचे पातक डोक्यावर घेऊ नका अशा अर्थाचे सांगून). त्यावेळेस पुणे करार झाला. काँग्रेसने प्रथमच राजकीय पक्षाप्रमाणे निवडणूका लढवण्याचे ठरवले आणि त्यात आंबेडकरांचा पक्ष त्यांच्यासकट हरला आणि तेंव्हा त्यांची राजकीय चूक त्यांच्या लक्षात आली...

त्यावेळेस काढलेल्या आंबेडकरांच्या पक्षाचे नाव होते "इन्डीपेंडंट लेबर पार्टी".

फोटो

काँग्रेसने आंबेडकरांचा फोटो लावणे हे शिवसेनेने शिवरायांचा फोटो लावण्याइतकेच बिनमहत्त्वाचे आहे. :)

-- आजानुकर्ण

सभासद आणि स्फुर्ती

काँग्रेसने आंबेडकरांचा फोटो लावणे हे शिवसेनेने शिवरायांचा फोटो लावण्याइतकेच बिनमहत्त्वाचे आहे. :)

काँग्रेसच्या संकेतस्थळावरील आंबेडकरांचा फोटो हा काँग्रेसला जे महान सभासद म्हणून दाखवायचे त्या व्यक्तींमधे लावण्यात आला आहे - म्हणून त्यात गांधीजी, नेहरू, अब्दूल कलाम आझाद, पटेल, बोस, आंबेडकर, शास्त्री, कामराज, इंदीरा गांधी आणि राजीव गांधी या क्रमात लावला आहे.

शिवसेना शिवाजीचे चित्र हे स्फुर्ती म्हणून लावते ते कधी बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी, दत्ता साळवी इत्यादींच्या मधे एक शिवाजी म्हणून लावत नाही. उत्सुकतेपोटी त्यांचे संकेतस्थळ पाहीले तर लक्षात आले की त्यात त्यांनी फक्त बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि वाघ इतकेच दाखवलेत :).

थोडक्यात ह्यात त्या त्या व्यक्तीला (आंबेडकर/शिवाजी) त्या त्या पक्षांनी दिलेल्या महत्वापेक्षा त्यांना कसे दाखवण्यात आले (portray केले)आहे ह्याबाबत विचार करणे महत्वाचे वाटते.

काँग्रेस ई

खरतर आजचा काँग्रेस हा काँग्रेस ई म्हणजेच काँग्रेस इंदिरा असा ओळखला जातो. अनेक संघ विचारसरणीचे लोक आता त्याला काँग्रेस ईसाई (सोनिया आणि त्यांचे चमचे) असे म्हणतात असे ऐकुन आहे.

हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

सहमत

२८ डिसेंबर, १८८५ ला स्थापीत व स्वातंत्र्यपुर्व काळातील इंडीयन नॆशनल कॊंग्रेस व आजचा सोनीया गांधी यांचे नेतृत्व असलेला राजकीय पक्ष यात खूपच (जमीन अस्मानाचा) फरक आहे. कितीही समाजसेवेचा आव आणला तरी आजचे सगळेच राजकीय पक्ष हे धंदेवाईक राजकारणात आहेत.

पुर्वीच्या काँग्रेस मधे अनेक माननीय नेते होते (ज्यांना सहजासहजी नावे ठेवणे सामान्य लोकांना शक्य नव्हते. ) आता काँग्रेस मधे फक्त हायकमांड व "निष्ठावान" किंवा "बंडखोर" अशीच नावे/विशेषणे का झळकतात.

खरोखर चांगला नेता ज्याला देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रश्रांची योग्य जाण आहे तसेच बर्‍यापैकी उकल करत आहे व देशविदेशचे प्रतिथयश लोक (कॉर्पोरेट, सनदी, राजकीय) आशीयाखंडा विषयक गोष्टींबद्दल ज्याचा वेळोवेळी सल्ला घेत असतात असे का नाही कुठले नाव ऐकू येत? किंवा अशी जर कोणी लोक असतील तर ती मुख्य राजकीय प्रवाहात अग्रेसर, लोकप्रिय का नाहीत?

खर्‍या काँग्रेस चळवळीचे वंशज

माझ्या मते सध्याचा अखिल भारतीय काँग्रेस पक्ष - ज्याला सोनिया काँग्रेस असे म्हटले आहे - हाच काँग्रेस चळवळीचा वंशज आहे. मूळच्या काँग्रेसचा जन्म एतद्देशीयांना स्थानिक राज्यकारभारात थोडीशी स्वायत्तता देण्याच्या हेतूने - निवडणुकांच्या माध्यमातून - होता. त्यानंतर सर्व निवडणूक आयोगांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्ष ऊर्फ इंदिरा काँग्रेस हाच त्या पक्षाची चिन्हे व नावाचा योग्य दावेदार असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सोनिया काँग्रेसला खरी काँग्रेस मानण्यास काही हरकत नसावी.

अर्थात मूळ चळवळीचे आताचे स्वरूप हे भ्रष्ट झाले आहे हे मान्य आहे. पण हे तर इतर सामाजिक व्यवहारातही दिसते. केवळ काँग्रेसचेच ते व्यवच्छेदक लक्षण आहे असे नाही.

>>>हाच लेख भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जन्मदिनाच्या वेळी काही नावे बदलून जसाच्या तसा लिहिता येईल.

या माझ्या वाक्याचा उद्देश हाच होता. राजकीय पक्षांची सुरुवात ज्या उद्देशाने झाली होती ते शेवटपर्यंत टिकवून धरणे बहुधा कोणत्याही पक्षाला जमले नाही.

>>अपवाद फक्त हिंदूत्ववादी

स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी १९३५ पर्यंत हिंदू महासभा राकाँ सोबतच होती असे ऐकले आहे.

- आजानुकर्ण

"च"

माझ्या मते सध्याचा अखिल भारतीय काँग्रेस पक्ष - ज्याला सोनिया काँग्रेस असे म्हटले आहे - हाच काँग्रेस चळवळीचा वंशज आहे.

मी माझ्या लेखात शेवटी विचारले होते की "तुम्हाला काय वाटते?" - थोडक्यात हा ज्याच्या त्याच्या वाटण्याचा प्रश्न आहे. माझा मुद्दा/आक्षेप "हा" वंशज आहे म्हणताना जो "च" वापरला जातो त्याबद्दल आहे. त्यासंदर्भात मी म्हणतोय की स्वातंत्र्यपूर्व काँग्रेस ही चळवळ होती, केवळ एक स्वातंत्र्योत्तर पक्ष नव्हता आणि १९७७ नंतर तयार झालेला पक्ष तर अजिबात नव्हता. ही मोठी ऐतिहासीक गल्लत होते आणि त्यावर हा आक्षेप आहे कारण त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही संकुचीत ठरते.

मूळच्या काँग्रेसचा जन्म एतद्देशीयांना स्थानिक राज्यकारभारात थोडीशी स्वायत्तता देण्याच्या हेतूने - निवडणुकांच्या माध्यमातून - होता.

निवडणूकीचे माध्यम हे जरी १९०९ मधे मोर्लेमिंटो सुधारणात स्थानीक स्वराज्य सम्स्थांसाठी दिले गेले असले तरी त्यात माझ्या माहीती प्रमाणे काँग्रेस नव्हती. उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय (रावसाहेब/रावबहाद्दूर) हे अशा स्थानीक स्वराज्य संस्थात निवडून येयचे (कसे त्याची मला कल्पना नाही, कोणाला माहीत असल्यास येथे सांगावे). पण १९३५ च्या कायद्यात प्रथमच प्रांतिक निवडणूका करायचे ब्रिटीश सरकारने ठरवले. (अर्थात त्याला पार्श्वभूमी ही २६ जाने. १९३० ला काँग्रेसच्या आधिवेशनात केलेला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव ही आहे). त्यावेळेस काँग्रेसने निवडूणाकात (१९३७ साल) भाग घेयचे ठरवले.

त्यानंतर सर्व निवडणूक आयोगांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्ष ऊर्फ इंदिरा काँग्रेस हाच त्या पक्षाची चिन्हे व नावाचा योग्य दावेदार असल्याचे मान्य केले आहे.

ह्यातच गोम आहे. इंदीरा गांधीच्या काळात आणिबाणिनंतर जी काही काँग्रेसची शकले उडली आणि त्या (त्यामानाने) एकट्या पडल्या (असे त्यांच्या, त्यांच्याच पक्षातील दुबळ्या विरोधकांना वाटले) तेंव्हा त्यांनी स्वतःच्याच नावाची काँग्रेस चालू केली जी काँग्रेस (इं). त्या गेल्यावर कधीतरी राजीव गांधींच्या काळात "इं "चा अर्थ "इंदिरा" ऐवजी "इंडीया " झाला तो ऑफिशियल कधी झाला ते माहीत नाही.

बरं चिन्ह म्हणाल तर स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसचे चिन्ह हे चरखा होते. इंदिरा गांधींच्या १९६७ साली फुटलेल्या काँग्रेसचे चिन्ह हे "गाय वासरू" होते. ("गाय-वासरू, नका विसरू ," अशी घोषणा आणिबाणी नंतरच्या निवडणूकीच्या काळात होती). आणि १९८० च्या इंदीरा काँग्रेसचे चिन्ह हे (कुठल्याशा ज्योतिषाला दाखवून शुभ समजून घेतलेले) "हात" होते आणि आजही तेच आहे.

अर्थात मूळ चळवळीचे आताचे स्वरूप हे भ्रष्ट झाले आहे हे मान्य आहे. पण हे तर इतर सामाजिक व्यवहारातही दिसते. केवळ काँग्रेसचेच ते व्यवच्छेदक लक्षण आहे असे नाही.

या लेखाचा संबंध काँग्रेसला नावे ठेवणे या विषयी नव्हता, त्यावर लेखमालीका लिहीता येईल आणि तशीच इतरांवरही लिहीता येईल :) मुद्दा इतकाच होता आणि आहे की ब्रिटीशांशी सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मागणार्‍या एका राष्ट्रीय चळ्वळीस, फक्त आम्ही म्हणजे ती काँग्रेसची चळवळ म्हणणे हे गैर आणि अयोग्य आहे हे दाखवण्यापुरता मर्यादीत होता - तो पण काँग्रेस नामक चळवळीच्या जन्मदिनानिमित्ताने.

>>स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी १९३५ पर्यंत हिंदू महासभा राकाँ सोबतच होती असे ऐकले आहे.

मी असे कधी ऐकलेले नाही . असले तरी आश्चर्य वाटायचे कारण नाही कारण परत सुरवातीस लेखात म्हणल्याप्रमाणे काँग्रेस ही चळवळ होती ज्यात सर्व मतप्रवाह कमी अधीक प्रमाणात होते. कोणी तीला राजकीय पक्ष समजत नसे तर सनदशीर मार्गाने ब्रिटिशांशी तमाम भारतीयांनी लढण्याचे एक समान माध्यम समजायचे. म्हणूनच केवळ सोनीयाची काँग्रेस म्हणजे पुर्वीची काँग्रेस म्हणणे हे चुकीचे वाटते.

बैल!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
कॉंग्रेस फुटण्याच्या आधी तिचे निवडणूक चिन्ह "बैलजोडी"(बहुधा खटार्‍याला जुंपलेली) होते असे पुसटसे आठवतेय. समाजवादी पक्षाचा प्रचार करताना शाहीर अमरशेख त्यांच्या निवडणूक गीतांत म्हणायचे "काँग्रेसच्या बैलाला मतं द्या म्हणता,आम्ही काय बैलोबा म्हणून घ्यायचे?"

थट्टा वाटू द्या पण......

कॉग्रेसला १२३ वर्षाचा पक्ष म्हणण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. सुरुवातीला जर काँग्रस ही चळवळ होते असे आपण मानायला तयार आहोत आणि आज त्या पक्षाचे रुप बदलले असेल म्हणुन तो पक्ष जुना नाही, असे का म्हणत आहात ते मात्र कळत नाही.

आपला
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोंधळलेला कार्यकर्ता.
(राष्ट्रवादी काँग्रेस)

गुणदोषासह.

राष्ट्रीय महासभा यात आपणही कळतनकळत सहभागी आहोतच. आपल्यापैकी बर्‍याच जणांचे आजोबा आणि आजी महासभेच्या आदेशाशी बांधिल होतो. कदाचित ते खादीच्या स्वरुपात असेल अथवा अस्पृश्यतानिर्मुलनासाठी असेल.

महासभेने आपले आंदोलन हे खर्‍या अर्थाने जनाआंदोलन बनवले यात संशय नाही.

माझ्या मते खरे स्वरुप हे १९०५ च्या वंगभंग आंदोलनात, १९१७ चंपारण्य आणि १९३२ च्या चौरीचौरा किंवा कळसाध्याय १९४२ च्या वेळी झाला.

विकि

चांगला लेख.
योग्य ते बदल करून हा लेख विकि वर चढवता येईल का?

विकी लेख

योग्य ते बदल करून हा लेख विकि वर चढवता येईल का?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विकीवर लेख चढवायची कल्पना चांगली आहे. जर त्यात उचीत बदल सुचवले गेले तर बरे होईल.

अभ्यासाचा विषय ठरावा !!!

आपला लेख वाचल्यानंतर आणि आमच्याच येथील प्रतिसादानंतर, आम्ही एक पुस्तक चाळले "काँग्रेस के सौ वर्ष संघर्ष और सफलता का इतिहास" लेखक मन्मथनाथ गुप्त. आपण घेतलेला धावता आढावा योग्य त्या स्वरुपात घेतला आहे.
विकासराव, आपण जी चळवळ आणि पक्ष यात जी तफावत दाखवता तो अभ्यासाचा विषय ठरेल असे वाटते. बाकी, जहीदी यांनी काँग्रेस या पक्षासंबंधी काही खंडात लेखन केलेले आहे म्हणतात. ते कोणी चाळले आहे का ? त्यात काही विशेष माहिती असल्यास वाचायला आवडेल. मात्र आपल्या विचाराने काँग्रेस हा पक्ष १२३ वर्ष जूना नाही, हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे आणि तो अधिक आवडला !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद + एकत्मता (अवांतर)

धन्यवाद बिरूटे साहेब आणि इतर,

माझा उद्देश कुठल्याएका बाजूने लेख लिहायचा नव्हता इतकेच... जसे कोणी हिंदूत्ववादी व्यक्ती पक्ष जर असे बोलू लागला की तुम्ही आम्हाला मानत असला तरच हिंदू नाहीतर नाही, तर हे जसे वाह्यातपणाचे ठरेल तितकेच आत्ताचे गैरकाँग्रेसपक्षिय जे चळवळीतील नेत्यांना आजही आपले नेतेच मानतात त्यांच्याबाबतीत ठरेल.

आता थोडे अवांतरः काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनीया गांधी यांना बरे नसल्याने त्या इस्पितळात आहेत (कदाचीत आज त्या परत घरी येतील ही..). त्यांना बरे होण्यासाठी मनःपूर्वक सदीच्छा.

एक मजेशीर चित्र मला गल्फ टाईम्समधे दिसले: कॅथलीक व्यक्तीला बरे वाटण्यासाठी, हिंदूंनी केलेला यज्ञ हा इस्लामी वृत्तपत्रात! याहून वेगळी एकात्मता ती काय असणार! :)

Congress Party supporters offer prayers and perform a Hindu ritual for the recovery of Gandhi outside a hospital in New Delhi yesterday

संकुचित विचार.

प्रिय विकासराव,

आपण आधुनिक भारतात राहत आहोत. त्यामुळे कॅथलिक, हिंदु, मुस्लिम इत्यादी विचारांना थारा देऊ नका.

काल परवाच एक जुना दिवाळी अंक वाचण्यात आला. प्रियकर आणि प्रेयसी अश्या विषयावर अंक काढलेला आहे. त्यात सोनिया आणि राजीव यांच्या बद्दल लिहिलेले आहे. राजीव यांच्या इच्छेप्रमाणे त्या दोघांना मृत्युनंतर हिंदु पध्दतीने दहन करण्यात यावे असे सुचवले आहे.

त्यामुळे कृपया असा विचार अथवा वाद करु नका.

द्वारकानाथ.

संकुचित कोण?

मा. द्वारकानाथ,

आपण संकुचित कुणाला आणि कशाला म्हणताहात?

एक "मजेशीर निरिक्षण" म्हणून दाखवलेल्या बातमीस आपण उगाचच चुकीच्या चष्म्यातून पाहून धार्मिक वळण लावले याची खंत वाटत आहे.पण यात मला वैयक्तिक "संकुचित" म्हणल्यामुळे उत्तर देणे भाग आहे. ते, कृपया आपल्यासाठी वैयक्तिक धरू नये, कारण ते व्यक्तीपेक्षा त्यामागील वृत्तीबद्दल आहे, जी कुठेही सापडू शकते...

त्यामुळे कॅथलिक, हिंदु, मुस्लिम इत्यादी विचारांना थारा देऊ नका.

नक्की थारा दिला म्हणजे काय केले ते कळेल का? कोणाची ओळख काय हे सांगणे म्हणजे त्या विचांरानी वागणे असा अर्थ होत नाही आणि त्यात गैरपण काही नाही. त्यात कुणाला काही नावे पण ठेवली नाहीत अथवा ठेवण्यासारखे काही नव्हते देखील. अमेरिकेन लोकांशी अमेरिकन राजकारणावरून (जे अजून सामाजीक दृष्ट्या मागासेलेले म्हणावे असे आहे) चर्चा करताना भारतीय लोकशाही आणि मानसीकते बद्दल कौतुकाने सांगतो की "बहुसंख्य हिंदू धर्मीय असलेल्या स्वतंत्र राष्ट्राचा कधी धार्मीक दृष्ट्या अल्पसंख्य राष्ट्रपती, कधी धार्मीक दृष्ट्या अल्पसंख्य पंतप्रधान, कधी स्त्री पंतप्रधान/राष्ट्रपती, कधी बहुमतवाल्या राजकीय पक्षाची अध्यक्षा ही परकीय धर्माची आणि परदेशात जन्माला आलेली स्त्री होऊ शकते." त्यात जसे धर्म, लिंग आदीबद्दलचे निरीक्षण असते तसेच या बाबतीत केवळ मजेशीर निरीक्षण म्हणून सांगीतले गेले.

कदाचीत सोनीयांचा धर्म कॅथलीक आहे असे म्हणल्यामुळे आपल्यास कदाचीत रुचले नसावे. पण ते सत्य ही आहे आणि त्यामुळे मला अथवा मला वाटते इतरांनाही पण काही फरक पडत नाही... तसे पहाल तर त्यांच्या तमाम (विशेष करून या संदर्भात अगदी हिंदूत्ववादी )विरोधक आणि राजकीय पक्षांनी त्यांच्या जन्माने, "इटालीयन" असल्याला विरोध केला आहे, त्यांच्या वैयक्तिक धर्माला नाही...

त्यात सोनिया आणि राजीव यांच्या बद्दल लिहिलेले आहे. राजीव यांच्या इच्छेप्रमाणे त्या दोघांना मृत्युनंतर हिंदु पध्दतीने दहन करण्यात यावे असे सुचवले आहे.

हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे . असले काही तरी संदर्भ सांगून आपण जी गोष्ट "डिफेन्ड" करण्याची गरज नाही ती करत आहात असे वाटले. त्या स्वेच्छेने अथवा त्यांच्या नवर्‍याच्या इच्छेने काय करताहेत/करणार आहेत त्यात कुणालाच काही ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही. पुरल्याने कोणी लहान होत नाही आणि जाळल्याने कोणी महान होत नाही. ते ती व्यक्ती जीवन कसे जगतीय ह्यावर आणि त्याचा इतरांवर होणार्‍या परीणामावर अवलंबून असते. तसे पहाल तर नर्गीस दत्त ने पण तीच्या शेवटच्या इच्छेत सांगीतले होते की घरातून बाहेर पडायच्या आधी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत आणि बाहेर पडल्यावर दफन. सुनील दत्तनी तसेच केले. पण त्यामुळे नर्गीस मोठी ठरली नाही तर जे काही तिने तिच्या क्षेत्रात योगदान केले आणि बाहेर पडल्यावर समाजोपयोगी उपक्रम तयार केले त्यामुळे ती श्रेष्ठ ठरली...(आणि हो तमाम अमेरिकन्स आजकाल जन्माने ख्रिश्चन असून देखील दहन करतात आणि कधी कधी अस्थी पुरतात अथवा कपाटात ठेवून देतात)

आता तुम्ही सुरवातीस म्हणालात त्याबद्दलः "आपण आधुनिक भारतात राहत आहोत. "
असे जर आपल्यास वाटत असेल तर,

  1. शरदरावांनी मदरशांच्या बाबत जे केंद्र सरकारने धोरण ठरवले आहे त्याबद्दल का बोलत नाही आहात?
  2. आपल्याला सर्व भारतीयांना समान मानणे मान्य होते का अल्पसंख्य, बहुसंख्य इत्यादी चष्मे लावणे योग्य वाटते?
  3. जर नरेंद्र मोदी म्हणाले की मी राज्यकारभार हा "साडेपाच कोटी गुजराथी"याच नजरेने सर्वांकडे बघून करणार आणि अल्पसंख्य आणि बहुसंख्य म्हणून बघून करणार नाही, आणि तरी त्यातपण, विशाल दृष्टीकोन असणार्‍या सुडोसेक्युलर्सना त्यांना वाटणारे हिंदूत्व दिसणे हे आपल्यास विशाल वाटते की संकुचित?
  4. आपण म्हणता तसे धर्मावरून बोलणे जर गैर तर तसा स्त्री-पुरूष भेदभाव करणे पण गैर. मग सोनीयांनी म्हणणे की आम्ही "पहीली महीला राष्ट्रपती केली" तर हे देखील आपल्यास संकुचीत वाटते का?

हे सर्व समजले तर बरे होईल...का त्यासाठी वेगळ्या भिंगांचा चष्मा?

सहमत

आपल्या सर्व मुद्यांशी सहमत.

असाच एक ऐकिव किस्सा. त्याला संकुचीत म्हणायचे कि गांधीजींचा किस्सा म्हणुन महान हे आपण ठरवा...
रा.स्व.सं. च्या एका शिबीरात गांधीजींना बोलावण्यात आले होते. त्या शिबीरात आल्यावर गांधीजींनी विचारले हरिजनांची वेगळी व्यवस्था आहे का? तर त्यांना उत्तर मिळाले होते कि इथे सर्व समान आहेत.
आता हा हरिजनांचा विचार संकुचीत की महान?

थोडे विषयांतर झाले आहे खरे. पण काँग्रेस म्हणजे गांधी हे चुकीचे समीकरण खुद्द गांधीजींनीच घालुन दिले ते आज तागायत तसेच आहे. किंवा असे म्हणा कि एखाद्या खोट्या गोष्टीचा खरी गोष्ट म्हणुन मारा केला की तीच खरी वाटु लागते. त्यातला हा प्रकार आहे.

हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

माझे मत.

प्रिय विकासराव्,

आपण फक्त बातमी दिली असती तर वेगळी गोष्ट होती परंतु आपण कॅथलिक व्यक्ती, हिंदुचा यज्ञ आणि इस्लामी पत्रीका असा विचार मांडला म्हणून मला हा विचार संकुचित वाटला.

आता दहन विधी हा वैयक्तीक प्रश्न आहे हे नक्की. पण जन्म, विवाह आणि दहनात जरी एखाद्याने हिंदुधर्माचे पालन केले तरी तो कॅथलिकच राहणार का हा मला पडलेला प्रश्न. ते हिंदु की मुस्लिम अथवा इतर काही याचे प्रमाणपत्र आपण ( कलंत्री अथवा विकास यांनी द्यायचे का?)

आता आपण बरेच मुद्दे मांडले आणि ज्याचा उल्लेख केला त्यांना काही मर्यादा आहेत. पण आपण स्वतावरच अश्या मर्यादा का लादुन घ्यायच्या हा एक प्रश्न.

आपण उमद्या आणि पुरोगामी विचारांचा पाठपूरावा का करु नये हा प्रश्न आहे.

आपला,

द्वारकानाथ

माझ्या मनात हाही विचार डोकावत असतो की धर्माचे, जातीपातीचे, भाषेचे ओझे आपण वाहिलेले आहे आणि अजूनही वाहत असतो, ते कधीतरी झूगारण्याचे साहस आपणासर्वांना होणार आहे काय? तूर्त इतकेच.

धर्म , साहस इत्यादी...

आपण फक्त बातमी दिली असती तर वेगळी गोष्ट होती परंतु आपण कॅथलिक व्यक्ती, हिंदुचा यज्ञ आणि इस्लामी पत्रीका असा विचार मांडला म्हणून मला हा विचार संकुचित वाटला.

माझ्या लिहीण्यात धर्माची नावे आली म्हणून ते संकुचित वाटले. पण ज्या संदर्भात एक विनोद म्हणून लिहीले ते न समजून घेता नसलेला अर्थ आपण काढता तो काय उदारमतवादीपणा वाटतो का? Beauty is in the eyes of beholder, similarly nature of a mind (mindset)reflects from the interpretation it makes...असे काहीसे म्हणावेसे वाटत आहे.

पण जन्म, विवाह आणि दहनात जरी एखाद्याने हिंदुधर्माचे पालन केले तरी तो कॅथलिकच राहणार का हा मला पडलेला प्रश्न.... ते हिंदु की मुस्लिम अथवा इतर काही याचे प्रमाणपत्र आपण ( कलंत्री अथवा विकास यांनी द्यायचे का?)..आपण उमद्या आणि पुरोगामी विचारांचा पाठपूरावा का करु नये हा प्रश्न आहे.

तुमचा कधी कॅथलीक लोकांशी संबंध आला आहे का? माझा आला आहे आणि उदाहरण म्हणून सांगतो. त्यांच्यातल्या एका अंत्यविधीच्या वेळेस मी चर्चमधे हजर होतो. आजूबाजूस सर्व गोरे आणि "लिबरल्स" भरले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीप्रमाणे, सर्व त्यांच्यातले म्हणून जे काही "मंत्र(मंत्रासारखे) म्हणून झाल्यावर त्या कॉफिनच्या बाजूने सर्वजण जाऊ लागले. त्यात मृत व्यक्तीचे जसे अंत्यदर्शन घेणे (कॉफिनचेच कारण ते बंद असते) चालू होते तसेचे तेथील पाद्री आणि त्याचा सहाय्यक हे एक वाईनचा ग्लास आणि आठ आण्याचे नाणे दिसावे असा ब्रेडचा तुकडे घेऊन उभे होते. प्रत्येक व्यक्ती जाताना त्याच ग्लासातून ती रेड वाईन थोडी पित होती (जिझसचे रक्त समजून) आणि ब्रेड खात होती (जिझसचे शरीर समजून - दोन्ही स्वतःचा भाग करण्यासाठी). माझ्याबरोबरची सहकारी माझ्या कानात हळूच पुटपुटली की तुला ते करायची गरज नाही. म्हणले मला काहीच फरक पडत नाही. नंतर तीला सांगीतले की मी आत्ता जेथे आहे तेथील पद्धती हे एक "रिस्पेक्ट" म्हणून करतो. गेलेल्या व्यक्तिस, तिच्या नातेवाइकांस आणि ज्यांच्या बरोबर आहे त्यांत स्वतःला उगाच वेगळे ठरवण्यासाठी करणे मला पटत नाही.

काही महीन्यांनी परत एका अशाच "सर्व्हीस" (अंत्यसंस्कार) जाण्याची वेळ आली. तेंव्हा आत जायच्या आधी या याच व्यक्तीने मला परत सांगीतले की "तसे करू नकोस". तर मी परत उत्तर दिले की "आय डोन्ट माइंड..." पुढे काही बोलायच्या आत तीने मला तोडून सांगीतले की "आय नो, यू डोन्ट, बट अदर्स (कॅथलीक्स) डू!" मग तीने मला सांगीतले की चूक तुझी नाही पण कॅथलीक्सना तसे केल्याचे आवडत नाही (जेंव्हा मी कॅथलीक नसतो तेंव्हा) कितीही लिबरल्स असले तरी...

हा किस्सा सांगायचे कारण इतकेच (त्यात आपल्या या सादप्रतिसादाप्रमाणेच कॅथलीक्स असणे हा निव्वळ योगायोग आहे) हे सर्व लोक इतर वेळेस आपण वापरलेल्या शब्दाप्रमाणे पुरोगामीच आहेत पण धर्माचे अस्तित्व आहे हे मान्य केले की ते मानणार्‍यांचे त्या त्या धर्माशी असलेले नाते न वापरणे म्हणजे पुरोगामीपणा नाही तर दुधखुळेपणा वाटतो. तुम्ही जर असे म्हणत असलात की तुम्हाला धर्म मान्य नाही हिंदू काय अथवा ख्रिश्चन/मुस्लीम आदी काय तर ते फारतर तुमचे स्वतःबद्दलचे आचरणात आणायचे मत झाले, आणि हो आपल्या तत्वज्ञानप्रमाणे मग तुम्ही "नास्तीक" (पण) धर्मीयच ठरणार! पण तुमचा आटापिटा परत परत जो दिसतोय त्याप्रमाणे सोनीयांना कळत नकळत हिंदू समजण्याचा आहे. तसे असेल तर फार तर "मी सोनीयांना हिंदू समजतो" असे म्हणा. मी आपलाच आदर राखत म्हणेन की ते तुमचे मत आहे. पण म्हणून त्यांचा काही धर्म बदलत नाही आणि तसा न बदलल्याने मला काही फरक पडत नाही आणि म्हणूनच त्या जे आहेत त्यांना त्या धर्माचे म्हणणे हे काही शिवी ठरत नाही की संकुचितपणा ठरत नाही...त्यामुळे आपण म्हणता तसे मी काही कुणाला प्रमाणपत्र देत नाही आहे तर त्यांची धार्मीक ओळख जी आहे ती वस्तुस्थिती म्हणून सांगतली आणि ती ही कुठल्यातरी विशिष्ठ संदर्भात..


माझ्या मनात हाही विचार डोकावत असतो की धर्माचे, जातीपातीचे, भाषेचे ओझे आपण वाहिलेले आहे आणि अजूनही वाहत असतो, ते कधीतरी झूगारण्याचे साहस आपणासर्वांना होणार आहे काय?

तुम्ही स्वतःला कुठल्या धर्माचे मानता का? मानत असल्यास का मानता? नसल्यास काहीच प्रश्न नाही उलट मग मी वरील प्रश्न विचारण्याचा आपल्याला निदान नैतीक हक्क आहे असे मी म्हणेन जरी मला तो प्रश्न १००% पटला नसला तरी. १००% अशा साठी कारण जातीपाती मी काही मानत नाही आणि त्याचे समर्थन करत नाही. धर्माचे तुर्त बाजूला ठेवू पण भाषा ही आपल्याला ओझे कधी व्हायला लागली? आणि कुठली भाषा ही ओझे आहे आणि कुठली भाषा ही हलकी-फुलकी? बाकी आधी म्हणल्याप्रमाणे आपण निधर्मी आहात का ते कळले तर बरे होईल. बाकी मी धर्म माझ्यापुरता मानतो इतरांनी काय करायचे त्याच्या भानगडीत पडत नाही (चाहे तू माने, चाहे ना माने!). स्वतःला हिंदू धर्मीय वगैरे मी उगाच म्हणत नाही पण ती ओळख देयला कचरत ही नाही कारण जो पर्यंत जगात इतर धर्म असणार आहेत तो पर्यंत धर्माचे नाव घेयचे नाही वगैरे शहाणपण फक्त भारतीयांनी आणि त्यातही हिंदूंनी पाळावे असे मला अजीबात वाटत नाही... साहस हे धर्म/रूढी न पाळता समाजात समानतेने वागण्यात जसे आहे तसेच ते तसे वागत स्वतः कोण आहोत हे कुठलाही न्यूनगंड न बाळगता सांगण्यात देखील असते.

सहमत आहे.

त्या जे आहेत त्यांना त्या धर्माचे म्हणणे हे काही शिवी ठरत नाही की संकुचितपणा ठरत नाही..

हे अगदी योग्य आणि सुस्पष्ट बोललात.

स्वतःला हिंदू धर्मीय वगैरे मी उगाच म्हणत नाही पण ती ओळख देयला कचरत ही नाही कारण जो पर्यंत जगात इतर धर्म असणार आहेत तो पर्यंत धर्माचे नाव घेयचे नाही वगैरे शहाणपण फक्त भारतीयांनी आणि त्यातही हिंदूंनी पाळावे असे मला अजीबात वाटत नाही

वा! हे अगदी मार्मिक बोललात. आजकाल हिंदूधर्माला नाकारून, नावे ठेऊन आभासी पुरोगामित्व घेण्याची फॅशन आली आहे. हिंदूंव्यतिरिक्त सर्वधर्मीय अधिकाधिक कट्टर होत असताना हिंदूंना आपण हिंदू आहोत हे म्हणण्याचीही भीती, लाज वाटावी अशी मनोभूमिका तयार करण्यात यांना धन्यता वाटते. सर्वसामान्य जनतेने अश्या बुद्धिभ्रमित लोकांच्या अनुकूल प्रतिकूल मतांची काळजी न करता आपल्या धर्माविषयीचा योग्य तो अभिमान जोपासणे आणि वाढवणे आवश्यक आहे.

आपला
(स्वाभिमानी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

तुम्ही काय मानता ह्यापेक्षा......

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
दुसरे तुम्हाला काय मानतात ह्याला खूप महत्व आहे.
उदा, तुम्ही अमूक एका धर्माचे असूनही धर्म मानत नसाल. सगळे मानव एक आहेत असा सिद्धांत मानत असलात तरीही इतर धर्मीय तुम्हाला तसे मानत नाहीत. म्हणजे एखादा हिंदू स्वतःला हिंदू म्हणून न मानता(हे फक्त हिंदू व्यक्तीच बोलू शकते; इतर धर्मीय नाही)
आपण निव्वळ मानवतावादी धर्म मानतो असे म्हणत असेल तरीही इतर धर्मीय त्याला हिंदूच मानतात. हा अनुभव आहे,वस्तुस्थिती आहे.
कम्युनिस्ट लोक धर्म मानत नाहीत असे म्हणतात.पण ही खोटी गोष्ट आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.

 
^ वर