उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मदरशांना देशप्रेमाबद्दल बक्षीस?
शरद् कोर्डे
January 2, 2008 - 8:42 am
३१ डिसेंबरच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या 'इंडिया डायजेस्ट्' या सदरांतील बातमीनुसार मदरशांनी भारताचा स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट्) व प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हे राष्ट्रीय सण तिरंगी ध्वज उभारून साजरे केल्यास त्यांना आपले सरकार अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विशेष अनुदान देणार आहे.
आपण देशप्रेमापोटी राष्ट्रीय सण साजरे करतो. त्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही. मदरशांनी देशप्रेम दाखवावे म्हणून सरकार त्यांना विशेष अनुदानाचे प्रलोभन दाखवीत आहे. देशप्रेम असे विकत मिळत नसते. कदाचित सत्तेंत असणारे करदात्यांच्या पैशाने मुस्लिमांचे तुष्टीकरण करून राजकीय फायदा मिळवू पाहात असावेत.
दुवे:
Comments
याला काय म्हणावे?
आता याला काय म्हणावे? याचे उत्तर आपल्या इथले, धर्मनिरपेक्ष सरकार, धर्मनिरपेक्ष पक्ष आणि त्यांचे मतदारच देउ शकतील. बाकी भविष्यात भारत हा कदाचित
यासाठी ओळखला जाउ लागला तर आम्हाला नवल वाटणार नाही.
तुम्ही मदरशांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहातले समजत असलात तर आम्हालाच अनेक प्रश्न पडु लागले आहेत.
हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!
ओळख
चाणक्य महाराज,
आपण व्यक्त केलेल्या भितीतील ३ मुद्दे या क्षणीच भारताबद्दल लागू पडतात असे वाटते.
बाकी आपण भन्नाटच मुद्दे उपस्थित केलेत. आपल्या नावाला शोभतील असे.
आपला,
(सुटीत हमखास भारतात येणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
तिरंग्यासाठी खंडणी...
आजच्या सामनात याच विषयावर अग्रलेख आला आहे. आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांसारखे अनेक प्रश्न तेथेही उपस्थित केले आहेत. कोणी तो लेख युनिकोड मध्ये टाकून येथे चिटकवू शकेल काय?
सरकारने या प्रश्नाला हात घालून हे तर मान्य केले आहे की अजूनही खूप लोक या देशाला आपला देश मानायला तयार नाहीत.
हे असे अनुदान देऊन चुकीचे संदेश देश विघतक व्रूत्तींना देण्याचे टाळायला हवे. पण बरोबर वागतील ते भारतीय याजकारणी कसले? मला तर ही आगामी निवडणुकींवर डोळा ठेऊन काँग्रेसने खेळलेली एक चाल वाटते.
आपला,
(भारतीय) भास्कर
आम्ही येथे वसतो.
हेच
हेच तर चुकत आले आहे!
उद्या चर्चला पण हे लागु होईल... मग मंदिरांनाच का नको?
तिरंगा लावण्या बद्दल त्यांनाही पैसे मिळावेत.
(आणि माझ्या मते भारतात मंदिरे मदरशांपेक्षा जास्त असावीत या न्यायाने यात परत बहुसंख्यांचाच फायदा! ;-) )
शिवाय शाळेतल्या मुलांनाही जन गण बद्दल पैसे.. . किंवा २६ जाने. व १५ ऑगस्टला शाळेत आल्यबद्दल अभ्यासात काही खास सवलत वगैरेही द्यावी.
किंचित गल्लत..
चर्चा मदरशांबद्दल चालू आहे, मशिदींबद्दल नव्हे. तेव्हा चर्च आणि मंदिरे कोठून आली?
D
तपशिलातला फरक सोडा.. मुदद्द्याचं बोला
माझ्यामते हा तपशिलातला फरक आहे. तरही तुमच्या समजूतीसाठी निनाद यांचा प्रतिसाद असा वाचह्ता येईलः
हेच तर चुकत आले आहे!
उद्या चर्चस्कूल्स ला पण हे लागु होईल... मग मठांनाच का नको?
तिरंगा लावण्या बद्दल त्यांनाही पैसे मिळावेत.
(आणि माझ्या मते भारतात मठ मदरशांपेक्षा जास्त असावेत या न्यायाने यात परत बहुसंख्यांचाच फायदा! ;-) )
आता?
अनुनयी राजकारण बंद पाडायला हवे.
प्रतिसाद व वाचनसंख्या उत्साहवर्धक आहे.
अनुनयी राजकारणाला आळा घालणे गरजेचे आहे. त्याबद्दल आपल्याला काय करता येईल याचा विचार व्हावा.
पुढील बातमी
१) संदर्भित बातमीवर माझ्या मूळ लेखनांतील आशय व्यक्त करणारे पत्र मी टाइम्स् ऑफ् इंडियाला पाठवले होते. ते आजच्या (४ जानेवारीच्या) अंकांत पृष्ठ १३ वर 'नेशन् मेलबॉक्स्' या सदरांत प्रसिद्ध झाले आहे.
२) याहू वेबसाइटवरील बातमी :
सरकारच्या या निर्णयावर मुस्लिम समाजाकडूनही टीका होत आहे. ऑल् इंडिया पर्सनल् बोर्डाचे प्रवक्ते एस् क्यू आर् इलायस यांचे असे म्हणणे आहे की या निर्णयाने सरकार मदरशांतील लोक देशप्रेमी नसतात असा गैरसमज पसरवीत आहे. या अगोदर सरकारच्या मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी सेंट्रल् मदरसा बोर्ड स्थापण्याचा प्रस्तावालाही मुस्लिमांकडून कडवा विरोध झाला होता. शेवटी मुस्लिम धर्ममार्तंडांच्या दबावाखाली सरकारने तो प्रस्ताव बासनांत गुंडाळून ठेवला.
वाचा आणि विचार करा.
राष्ट्रभावना
नमस्कार मंडळी,
मला असे वाटते कि जोपर्यन्त् देशाबद्द्लची भावना प्रेम आत मधुन येत नाही तोपर्यन्त् असे विलोभने देवुन झेंडा फडकवून काहीही फायदा होनार नाही. त्यापेक्शा ही भावना जाग्रूत करण्याचा प्रयत्न व्हावा आणि तो प्रत्येक घरातून व्हावा. आपोआप समाजात ही भावना प्रकर्शाने जागी होइल् आणी वर्षातुन २ वेळा क होईना सगळा भारत देश तिरंग्याला सलामी द्यायला घराबाहेर आलेला असेल.
कल्याण खराडे