टेडी बेअर ते एम एफ हुसेन

आत्ताच ही बातमी वाचली.

मुहम्मदाचे कार्टून काढले की जग पेटते, खेळण्याला मुहम्मदाचे नाव दिले की जेलमध्ये जावे लागते. अशा घटना जगभरात घडत असताना आपल्याकडे मात्र बहुसंख्यांक नागरिकांच्या धार्मिक भावनांना कोणीही अन कसाही नाचवायचा प्रयत्न करतो. संडासात, चपलावर तसेच आंतर्वस्त्रांवर हिंदूंच्या देवदेवतांचे चित्रे काढण्याचा डझनावर घटना घडत असतात. येवढ्यावरच ना थांबता हिंदूंच्या देवदेवतांची नागडी उघडी चित्रे काढणार्‍यांचा सन्मान केला जातो, चित्रपटांतून उघड उघड हिंदूंच्या आबृची लक्तरे वेशीवर टांगली जातात. हिंदूंच्या सहिष्णूतेचा हा गैरफायदा म्हणावा की हिंदूंचा नेभळटपणा?

Comments

आदर्श...

डॅन ब्राऊनला पाश्चिमात्य ख्रिस्ती जगताने कसे वागविले? मला वाटते आपण त्यांचा आदर्श ठेवावा. ते अधिक प्रागतिक आणि उदारमतवादी ठरेल.

नाहीतरी आमच्या भावना आजकाल फारच हळव्या झाल्यात...हुसेन काय नि जेम्स लेन काय...

छान

असेच म्हणतो. धर्माबाबत इतके हेकेखोर राहिले तर "त्यांच्यात" आणि आपल्यात काय फरक? नाही का?

- आजानुकर्ण

कशानेही

केन्डेसाहेब,
असा 'कशानेही बुडेल असा धर्म' असेल
तर तो त्वरीत बुडवून टाकणेच योग्य!

चपलेवर गणपती काढला म्हणून माझ्या मनातला गणपती भंग पावत नाही...
त्यावर कुणी चालल्यानीही काही फरक पडत नाही.
त्यावर वादंग करण्या पेक्षा गणपतीचे रुपक 'तसे प्रॉडक्ट' बाजारात
आणणार्‍या कंपनीच्या डायरेक्टर्स ना समजावले तर उत्तम.

शिवाय आमच्या ब्लॉग वर आम्ही 'या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरू नका" असे कँपेन करू शकु असा धमकी वजा खुलासाही ,
खुप राग येत असेल तर करता येईलच
मात्र याचा उपयोग करून कंपनीच खुप मोठी तर होणार नाही ना याचाही विचार केला तर बरे..

आपला
गुंडोपंत धर्मबुडवे

धर्म बुडणार नाही

धर्मबुडवे पंत... (ह. घ्या. :) )

आपण म्हणता ते सत्य आहे. अशा गोष्टींनी धर्म बुडत नसतो हे खरे आहे.

आपण वर अजानुकर्ण म्हणतात तसे "त्यांच्यासारखे आपण नाही" असे दाखवून देण्यात अन आपल्यावर झालेली आक्रमणे थोपवण्याचे प्रयत्न करण्यातच धन्यता मानतो. पण "नेट रिझल्ट" काय आहे? या घडीला जगात सर्वांत जास्त पसरले ते "वैश्विक शांततेचा" मंत्र आपल्याच घरात सांगत बसणारे धर्म नव्हे तर जहाल आक्रमक धर्म!

आपला,
(डोळस) भास्कर
आम्ही येथे वसतो.

धर्म

>या घडीला जगात सर्वांत जास्त पसरले ते "वैश्विक शांततेचा" मंत्र आपल्याच घरात सांगत बसणारे धर्म नव्हे तर जहाल आक्रमक धर्म!

धर्म-प्रसार हेच धर्माचे ध्येय/साध्य आहे का?

न पटणारे

सर्वसामान्य भावनांची निर्भत्सना होईल असे कुठलेच वर्तन अयोग्य वाटते. वर सुनील यांनी म्हणल्याप्रमाणे नजीकच्या काळातील डॅन ब्राऊन यांचे उदाहरण योग्यच आहे. पण त्याचनरोबर नॅशनल एंडॉमेंट ऑफ आर्ट ह्या सरकारी अनुदानावर अवलंबून असलेल्या संस्थेच्याबाबतीत असे अनेकदा झाले की ज्यात कलेचे स्वातंत्र्य टिकवण्याच्या नादात सामान्यांच्या अथवा विषिष्ठ श्रद्धावंतांच्या (येथे ख्रिश्चन) भावनांची कदर केली गेली नव्हती. याचे एक टोकाचे उदाहरण म्हणजे, येशूचा क्रॉस हा युरीनल मधे पडलेला दाखवलेले चित्र. त्यावर लोकांनी जेंव्हा आक्षेप घेतला तेंव्हा ती "कला आहे" असे म्हणण्यात आले आणि दाखवण्याचे स्वातंत्र्य सांगण्यात आले.

हिंदू देवदेवतांच्या बाबतीत असे अनेक प्रकार, आपण वर म्हणल्याप्रमाणे, झाल्याचे माहीत आहेत. पण त्यावर उपाय हा त्यावर बंदी आणणे हा नसून त्या त्या कंपन्यांकडे सभ्येतेच्या मर्यादेत तक्रार करणे / निषेध नोंदवणे इतपतच योग्य वाटते. तसे करण्यात काही चूकपण नाही, कारण जसे त्यांचे स्वातंत्र्य आहे तसे निषेध करून आवडले नाही हे सभ्यतेच्या मर्यादा न सोडता सांगण्यात आपलेपण स्वातंत्र्य असते. डॅन ब्राऊना आणि विशेष करून डी वीन्ची कोड च्या बाबतीत असा प्रकार केला होता. अर्थात कधी कधी अशा घटनांकडे दुर्ल़क्ष करणे हा पण योग्य उपाय असतो कारण त्यामुळे त्या विशिष्ठ "प्रॉड़क्ट/पब्लीकेशनची " फुकट पब्लीसिटी होऊन खप वाढायला/आकर्षण वाढायला आपल्याच हातून न कळत मदत होत नाही !

टेडी बेअर, कार्टून या प्रसंगातील इस्लामी वागणे आणि जेम्स लेन च्या संबंधात महाराष्ट्रात भांडारकर प्राच्य विद्या संशोधनासारखी संस्था आणि त्यातील दुर्मिळ दस्ताऐवजाचा नाश करणे/खराब करणे हे काही योग्य उपाय नाहीत. त्यात फक्त स्वतःबद्दल असलेला भयगंड बाहेर येतो. शिवाजीबद्दल जर कोणी गोम्या सोम्या लिहून आपण त्याचे महाराष्ट्रापुरते / भारतापुरते तोंड बंद करणार असलो तरी त्याचे पुस्तक हे जगात इतरत्र असणारच आहे. विचारांना उत्तर विचाराने देयचे असते हा महाराष्ट्राच्या मातीतला आदर्श यात दिसत नाही. जेंव्हा पंडीत नेहेरूंनी शिवाजीची निर्भत्सना ही कुठल्यातरी पाश्चात्य ग्रंथाचा संदर्भ देऊन त्यांच्या "डीसकव्हरी ऑफ इंडीया" या पुस्तकात केली तेंव्हा इतिहासाचार्य वै. का. राजवाडे यांनी पुराव्यानिशी त्यांना ते खोटे असल्याचे सिद्ध केले. त्यात मला आठवते त्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी देखील मदत केली होती. ज्या लोकांनी नेहेरूंना विरोध केला त्यांनीपण या संदर्भात दंगली केल्या नाहीत तर निषेध आणि वैचारीक उत्तर् दिले आणि यशस्वी झाले. असो, हे उत्तर अमेरिकेतील संदर्भातील जास्त असले तरी कुठेही लागू होऊ शकेल असे वाटते.

आता आपल्या प्रश्नाबाबत, हिंदूंच्या सहिष्णूतेचा हा गैरफायदा म्हणावा की हिंदूंचा नेभळटपणा?

ह्यात हिंदूंची सहिष्णूता कुठेच नाही की नेभळटपणा पण असला तरी तो विशेष नाही. असेल तर केवळ निष्क्रीयता. अमेरिकेत ६०च्या दशकात योगासनांना ब्लॅक मॅजिक म्हणले गेले आज काय होत आहे? भारतीय पोषाख, कुंकू यावर हल्ले झाले, आज हॉलीवूडमधेपण साडी आली आहे. याच वर्षी दिवाळी सणाबद्दल अमेरिकन सिनेटमधे ठराव पास झाला तर न्यूयॉर्कसिटीने ती धार्मिक सुट्टी मानली (म्हणजे कामाला सुट्टी दिली नाही, पण पार्कींग मिटर्स बंद होते, त्यामुळे सर्वधर्मीय खुष झाले!). असे अजून बरेच काही. हे काही एका दिवसात झाले नाही. मान द्या असे मागे लागून मिळवला नाही, पण तो मिळू लागला हे मात्र खरेसगदी पोखरणा २ नंतर पण काय होणार असे वाटूनही मिळाला. याची कारणे अनेक आहेत. पण एक साधे कारण हे खालील संस्कृत श्लोकात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आहे:

वनानी दहतो वन्ही, सखा भवती मारूतः सएव दिपनाशाय कृशे कश्चास्ती सौहृदम्

(भावार्थ: जंगलात लागलेल्या वणव्याला वाढण्यास मदत करणारा वारा, हा लहानसा दिवा मात्र फुंकरेने विझवतो, थोडक्यात दुर्बळाला कोणी मित्र असतो का?)

सहमत आहे

वा विकासराव,
आपण नेहमी प्रमाणेच अतिशय संयतपणे व
चपखल उदाहरणे देवून अतिशय योग्य असा प्रतिवाद केला आहे.
मला आपल्या या गुणाचे अतिशय कौतुक वाटते आहे.

राजवाड्यांनी नेहरूंचा प्रतिवाद केल्यावर त्यांनी पुढील अवृत्ती मध्ये तो भाग बदलला होता/आहे का?

आपला
गुंडोपंत

आवांतर पण महत्वाचे:
परवा कडे अजून एक हवेतल्या हवेत क्षेपणास्त्र नष्ट करणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी भारताने केली आहे.
एका हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या देशांच्या पंक्तीत आता भारत आहे, याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे.
शिवाय याचा काहीसा दबदबाही व्हावा ही अपेक्षा आहेच!

राजवाडे, शिवाजी वगैरे

राजवाड्यांनी नेहरूंचा प्रतिवाद केल्यावर त्यांनी पुढील अवृत्ती मध्ये तो भाग बदलला होता/आहे का?

नेहेरूंनी नंतरच्या आवृत्तीत अर्थातच बदल केले. पण त्यांना "मराठा" (म्हणजे सर्व महाराष्ट्रीयन्स, एक जात नव्हे) बद्दल कायमच "ग्रजअ" होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आधी, त्यांचे महाराष्ट्राविरुद्धचे वर्तन पाहून सी.डी. देशमुखांनी अर्थमंत्रीपदाचा संसदेत त्यांच्या (नेहेरुंच्या) तोंडावर, "तुम्हाला महाराष्ट्राबद्दल आकस असल्या कारणाने.." असे सांगून राजीनामा दिला. नेहेरुंनी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. मग त्याच वेळेस स्थापन झालेल्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन चे त्यांना पगारी अध्यक्षपद स्विकारायची विनंती केली. देशमुखांनी ती मान्य केली पण १ रुपया वार्षिक मानधन या अटीवर आणि तसेच काम केले.

अवांतरः

आणिबाणिच्या का त्यानंतरच्या सुमारास दिल्लीतील शिवा़जीच्या पुतळ्याची आणि दिल्लीची अवस्था पाहून अटल बिहारी वाजपेयींनी खालील ओळी लिहील्या होत्या:

अंधेरेमे लढे शिवाजी, अंधेरेसे लढे शिवाजी
दिल्ली की दुर्दशा देखकर, लाज शरम से खडे शिवाजी ||

हो पण

श्री. विकास,

आपले मुद्दे पटतात. आपल्या नेटक्या प्रतिवादास आम्ही मान्य करतो. पण...

"थोडक्यात दुर्बळाला कोणी मित्र असतो का?"
--- तर मन सबल कसे बननार? सामजिक/धार्मिक निश्क्रीयतेतून? त्यासाठी समाजमंथन व्हायला नको? ते कोणी करावे? कसे व्हावे?

आपला,
(निश्क्रीय) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सहमत/सुधारणा

आपण दिलिल्या सर्व मुद्द्यांशी सहमत आहे. माझा प्रतिसाद देण्याचा विषय कदाचित मूळ विषयाशी विसंगत वाटेल,पण तुम्ही दिलेला संस्कृत श्लोक हा असा पाहिजे (बाकी काही नाही, केवळ र्‍हस्व-दीर्घ पहा)-
वनानि दहतो वन्हि:,सखा भवति मारुतः ।
स एव दीपनाशाय, कृशे कश्चास्ति सौहृदम् ।

पूर्णपणे सहमत

सर्वश्री सुनीत, गुंडोपंत आणि विकास यांच्या प्रतिसादांशी शंभर टक्के सहमत. अशा किरकोळ घटनांनी बुडणारा हिंदु धर्म नव्हे. जगातल्या कुठल्याही धर्माने दिले नाही एवढे व्यक्तिस्वातंत्र्य हिंदुधर्म देतो. एका पुस्तकात बंदिस्त न केलेला कदाचित हा एकुलता एक धर्म असावा. देव माना, मानू नका, एकच किंवा दोन चारच देव माना, किंवा ३३ कोटी माना. पूर्ण स्वातंत्र्य. पुस्तके, प्राणी, पशुपक्षी, साप, दगड सगळे देव मानायला हरकत नाही. अगदी जमीनसुद्धा. नाही मानले तरी चालेल.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले । विष्णुपत्‍नि नमस्तुभ्यम्‌ । पादस्पर्शम्‌ क्षमस्व मे ॥

अशी जमिनीची क्षमा मागून तिच्यावर पाय ठेवायचा. अशी भारतीय संस्कृती.--वाचक्‍नवी

बुडणारा हिंदु धर्म नव्हे

"बुडणारा हिंदु धर्म नव्हे" हे मान्य पण म्हणून सामाजिक स्वैराचारावर अंकुश सुद्धा नसावा?

आपला,
(न बुडणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

शिवाजी वगैरे.

शिवाजी, संभाजी, टिळक, आंबेडकर, गांधी यांच्याबद्दल कितीही आदर असला तरी त्यांची नावे रस्त्याला, चौकांना आणि संस्थांना देणे यात त्यांचा सन्मान नसून अपमान आहे असे माझे मत आहे. पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीचे उद्‌घाटन करणार्‍या नगरसेविकेचे नाव तिथल्या कोनशिलेवर कोरलेले अनेक ठिकाणी आढळते. तसाच हा प्रकार मला वाटतो. मुंबईत कांदिवली(पश्चिम) या उपनगरात आंबेडकर या नावाचे तीन रस्ते आहेत. महात्मा गांधी रोड मुंबईत दहाबारा आहेत. एका 'भीमराव रावजी आंबेडकर' रस्त्याला लोक सर्रास ब्रा रोड म्हणतात, अहमदनगरच्या 'लोकमान्य टिळक' रस्त्याला लोटि रोड. यांत त्यांना कोणतीही टिंगल अभिप्रेत नसते.
संस्था(रस्ता, पूल, नगर, वस्ती, लोहमार्ग इ.) जर एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ, तिच्या देणगीतून किंवा त्या व्यक्तीच्या परिश्रम आणि सूचनेच्या पाठपुराव्यामुळे निर्माण झाली असेल, तरच त्या व्यक्तीचे नाव त्या संस्थेला द्यावे असे माझे ठाम मत आहे. पुण्याच्या डेक्कन जिमखान्याला संभाजीनगर म्हणण्यात संभाजीचा अपमान आहे. तिथल्या पाटीच्या समोर बसणार्‍या भाजीवाल्यांनी 'सं ' खोडून टाकले होते. पुण्यात आणखी एक संभाजीनगर आहे असे बसवरील पाटीवरून समजले. औरंगाबादला शिवसैनिक संभाजीनगर म्हणतात हे ज्ञात असेलच.
सर्वात प्रथम पुण्यातील शिवाजीनगरचे नाव बदलून भांबुर्डा करावे आणि शिवाजी विद्यापीठाचे कोल्हापूर. शिवाजी(आणि इतर काही)विद्यापीठात शिकलेल्यांनी अर्ज करू नये अशी सूचना अनेक जाहिरातीत पूर्वी वाचल्याचे आठवते.
परवा मी रेल्वेचे आगाऊ आरक्षण करताना प्रपत्र हिंदीत भरले. छशिट ते छशाट भरल्यावर मला बरोबर मुंबई ते कोल्हापूरचे तिकिट मिळाले. खिडकीवरच्या कर्मचार्‍याच्या दृष्टीने असे प्रपत्र पाहणे सामान्य असावे.--वाचक्‍नवी

:)

छशिट ते छशाट :)))))))) सह्ही!

किंचित अवांतर मतः असो.. रस्त्यांना प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच नद्या, पर्वत, झाडे, फुले, किल्ले, शाळा, पुस्तके इ.ची नावे देता येतील. नावाच्या पाटीखाली त्या नावाचं महत्व/माहितीही द्यावी.
चौकांपुरतं बोलायचं तर त्या चौकात पुतळा आहे त्या चौकाला ज्या शिल्पकाराने पुतळा बनवलाय त्याचं नाव द्यावं. जर कोणताही पुतळा नसेल तर चौकाला नाव हवंच् असं नाही

झाडांची नावे

मुंबईत चौपाटी ते नाना चौकादरम्यान (या चौकाचे नाव आता मुंबईचे शिल्पकार श्रीयुत जगुनाथ ऊर्फ नाना संकेरसेट्ट चौक असे केले आहे.) एक लॅबर्नम रोड आहे. लॅबर्नम म्हणजे बहावा, एक पिवळ्या फुलांचा वृक्ष. त्या रस्त्यावर बहावाची अनेक झाडे आहेत. विशिष्ट ऋतूत जमीन पुष्पवर्षावाने पिवळीजर्द होते. झाडांवर असंख्य पोपट शेंगा सोलून खाण्यात गर्क असतात. असे असताना, महापालिकेने हे विदेशी माणसाचे नाव(!) बदलण्याचा घाट घातला होता. तशीच पाळी मादाम कामा रोडवरपण आली होती. --वाचक्‍नवी

करवीर

करवीरनगरी हे करवीरवृक्षावरून पडलेले नाव आठवले!

चर्नी रोड

चर्नी रोड हे नाव बदलायचा प्रयत्‍न झाला होता. गुरचरणी जमिनीवरून चर्नी रोड नाव पडले हे कुणीतरी निदर्शनास आणून दिले तेव्हा तो प्रयत्‍न थंडावला.
एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाणारा दादर जिथे पहिल्या प्रथम बांधला(चूभूद्याघ्या) त्या दादर स्टेशनचे नाव 'चैत्यभूमी 'का असेच काहीतरी करायचे प्रयत्‍न अधूनमधून होत असतात. अशी मागणी करणार्‍या मंडळींनी कोळीवाडा(कोलवाडा) ऊर्फ जीटीबीएनया नामांतरांवरून स्फूर्ती घेतलेली असते. कुर्ला टर्मिनसचे नाही का लोटि टर्मिनस केले, मग दादरचे का न करावे? मुद्दा बरोबर आहे!--वाचक्‍नवी

सँडहर्स्ट रोड

सँडहर्स्ट रोडचे नाव मात्र लोकांनीच बोलता-बोलता बदलले आहे!!

आता

आता म्हणजे फारच थोड्या वर्षांपूर्वी. परवा परवा म्हणजे दहाबारा वर्षांपूर्वी असू शकते तसे.-वाचक्‍नवी

फार पूर्वीपासून..

नाना चौक हे नाव फार पूर्वीपासूनचे आहे. माझे आजोळ तिथले. माझ्या आजी-आजोबांच्या तोंडूनदेखील मी नेहमी नाना चौक हे नावच ऐकत आलो होतो. (तसे आजोबा फोर्टाला कोट म्हणत, आणि धोतरावर कोट चढवून तेथे जात!). तशीच त्या परीसरातील इतर नावे म्हणजे फ्रेंच ब्रीज, केनेडी ब्रीज आणि फ्रिअर ब्रीज (नवी नावे कोणी वापरीत नाहीत).

म. गांधी रोड

गांधीजींचे नाव इतक्या रस्त्यांना आहे (एम जी रोड) की त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की "गांधीजी रोडावलेत":)

सहमत

सहमत आहे. :)
इथेही एक एम जी रोड आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

छशिट ते छशाट

म्हणजे काय ??

मुम्बई आणि कोल्हापूर..

मुम्बई=छत्रपती शिवाजी टर्मिनस (छशिट) ते

कोल्हापूर्=छत्रपती शाहू टर्मिनस (छशाट)

हाहाहा!

मस्त! :)

ओ माय गॉड् !

भीषण विनोदी ! वाचनक्वी साहेब महान आहेत. धन्य ती रेल्वे आणि धन्य तो हिंदीभाषिक कारभार !

नावांचा विपर्यास

मुम्बई=छत्रपती शिवाजी टर्मिनस (छशिट) ते
कोल्हापूर्=छत्रपती शाहू टर्मिनस (छशाट)

हे सांगीतले नसते तर समजलेच नसते! असाच एक ऐकलेला किस्सा (पण खरा देखील असू शकेल).

मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकलचे तिकीट काढताना स्वतःसाठी आणि १२ वर्षाखालील मुलासाठी तिकीट मागताना, " एक फूल शिवाजी आणि एक हाफ शिवाजी द्या" :-)

तसेच

एस व्ही रोड - स्वामी विवेकानंद...
व्ही एस रोड - (स्वातंत्र्य)वीर सावरकर
एल बी एस मार्ग- लाल बहाद्दूर शस्स्त्री मार्ग
वगैरे

छशिट

आज मुंबई वरून परत येताना बोरीबंदर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक बोर्ड (याला विफलक म्हणावे काय? विरोप च्या धर्तीवर) वर छशिट ते पुणे असे लिहिले होते. वाचक्नवी यांचा प्रतिसाद जाण्यापूर्वी वाचला नसता तर तिथल्या पोलीसमामांना छशिट हे काय आहे हे विचारावे लागले असते.

उपक्रम व वाचक्नवी यांना धन्यवाद. :))

आजानुकर्ण

लाल बहादुर शास्त्री मार्ग

अवांतर: लाल बहादुर शास्त्री मार्ग म्हणजे कुठला हो? ईस्टर्न एक्सप्रेस हायवे काय?

बरोबर!

..मुंबईकरांच्या तोंडून बहुधा अजूनही घोडबंदर रोड, कॅडेल रोड, झालंच तर तुलसी पाइप रोड, मरीन ड्राइव, वॉर्डन रोड किंवा (कधीही न मावळणार्‍या सूर्याचा विजय असो!) प्रिन्सेस स्ट्रीट वगैरेच येणार!

यात अजून एक विसरलात - भुलाभाई देसाई मार्ग!

ब्रीच कँडी

यात अजून एक विसरलात - भुलाभाई देसाई मार्ग!

म्हणजे ब्रीच कँडी! ;-)

मला वाटते...

पेडर रोड

चूक

>> अवांतर: लाल बहादुर शास्त्री मार्ग म्हणजे कुठला हो? ईस्टर्न एक्सप्रेस हायवे काय?
>बरोबर!

नाही. इस्टर्न् एक्स्प्रेसच्या समांतर जाणारा रस्ता म्हणजे एल् बी एस्. दोन रस्त्यांच्या मधून मध्य रेल्वे जाते.

एल्‌बीएस रोड

लाल बहादुर शास्त्री रोड म्हणजे आग्रा रोड. एस्‌व्ही ऊर्फ स्वामी विवेकानंद रोड म्हणजे घोडबंदर रोड. सॅन्डहर्स्ट रोडला वल्‍लभभाई पटेल रोड म्हणत असले तरी रेल्वे स्टेशनचे नाव अजून तेच आहे.--वाचक्‍नवी

चुक

एस्‌व्ही ऊर्फ स्वामी विवेकानंद रोड म्हणजे घोडबंदर रोड
मला वाटत होतं की हे चुकीचे आहे.. खरं पाहता (असलेल्या नकाशावरुन आणि मी लहानपणापासुन पाहतोय त्यावरुनही) स्वामी विवेकानंद रोड दहिसर चेक नाक्याला संपतो. घोडबंदर रोड अलि यावर जंग मार्गातुन (पश्चिम द्रुतगती महामार्ग/मुंबई-अहमदाबाद महामर्ग) जो ठाण्याला जायला फाटा निघतो त्याचं नाव घोडबंदर रोड आहे. (याच रोडवरुन रोज ऑफिसातही जायचो)(इथे काशिमिर्‍यापुढे घोडबंदर नावाचं गावही आहे. )
एस्‌व्ही रोड आणि घोडबंदर रोडचा संबंध असल्याचे ऐकीवात नव्हतं. असो. पण नुकतच प्रियालीताईंनी सप्रमाण दाखवलं की अजुनही बरेच जण स्वामी विवेकानंद रोडला घोडबंदररोड म्हणतात (की समजतात? की खरंच कधीकाळी होता?) त्यामुळे वाचक्नवींचा प्रतिसाद चुक नसावा. असं म्हटल्याबद्दल क्षमस्व!

अजून म्हणत नसतील

अजुनही बरेच जण स्वामी विवेकानंद रोडला घोडबंदररोड म्हणतात (की समजतात? की खरंच कधीकाळी होता?)

मला वाटतं की आता तसे म्हणत नसतील. उलट, आता अनेकांना हाच घोडबंदर रोड असे माहितही नसेल. माझ्या लहानपणी माझे वडिल आणि आजोबा मात्र एस व्ही रोडलाच घोडबंदर रोड म्हणत.

वॉर्डन रोड

अहो, भुलाभाई देसाई रोड (बी डी रोड) म्हणजेच पूर्वीचा वॉर्डन रोड.

पेडर रोडचे नवीन नाव आहे गोपाळराव देशमुख मार्ग

भरकटलेली चर्चा....

मला वाटते चर्चा फारच भरकटली आहे...

एम् एफ् हुसेन पासून ते पेडर रोड पर्यंत (मार्गे छशिट-छशाट) !!

हिंदूंच्या देवदेवतांची नागडी उघडी चित्रे

प्रत्येकाचे "मी माझे" संबंधात एका बाहेर एक अशी वर्तुळे असतात. सर्वात पहिले वर्तुळ मी, माझे व्यक्तित्व, माझी प्रतिष्ठा इत्यादि. त्यापलिकडे माझे कुटुंब, मग माझे घर, त्याबाहेर माझा गाव, प्रांत, देश, धर्म इत्यादि इत्यादि. प्रत्येकासाठी कोणते वर्तुळ आतले (महत्त्वाचे) व कोणते त्याबाहेरचे ही देखील वेगवेगळी असतात. कार्तिकेयासाठी बाप आणि त्याची आज्ञा आईपेक्षा जवळचे वर्तुळातील. शंकराचार्यांसाठी बुडत आलेल्या वैदिक धर्माचे उत्थापन करणे हे आतल्या वर्तुळातील. सावरकर, टिळक यांच्यासाठी 'स्वातंत्र्य माझा अधिकार' inner circle मधले. आधी माझ्या वर्तुळांचीही संख्या खूप होती आणि धर्म त्यात फार लांब नव्हता. आता हा वर्तुळांचा आवाका आणि वर्तुळांची सख्याही कमी कमी व्हायला लागली आहे. धर्म आता माझ्या खूप खूप बाहेरच्या वर्तुळातील विषय म्हणून मला त्याबद्दल विशेष आस्था नाही. मी म्हणतो माझा धर्म काही एवढ्या तेवढ्या गोष्टीनें बुडणारा नव्हे. एम् एफ हुसेन ने नग्न चित्र काढून त्याखाली 'सरस्वती' म्हणून लिहिले तरी मला काही वाटत नाही, कारण 'सरस्वती' म्हणजे काही माझी आई नव्हे. अशोक सिंघल (का विहिंप चा आणखी कोणी पुढारी - आठवत नाही) इटालियन बाईपुढे हुसेनची तक्रार करतो आणि ती म्हणते "हुसेन चांगला माणूस आहे, मी चांगले ओळखते त्याला". तिच्या उत्तरावर तिच्याबरोबरचे कितीतरी लोक अशोककडे पाहून फिदिफिदी हसतात, मलाही हसूच आले. काय धर्म धर्म करीत बसला आहे, वेडा कुठचा. गणपतीच्या मूर्तिवर कोणी विष्ठा टाकली तर माझा गणपती काही तेवढ्याने विटाळत नाही. जवळपासच्या बायाबापड्यांची कोणी अब्रू लुटत असेल तर मला त्याचे काही वाईट वाटत नाही. करण ते माझ्या वर्तुळांपैकी नव्हेत. शिवाजी साठी ते महत्त्वाच्या वर्तुळामध्ये असतील. माझा धर्म, माझा स्वाभिमान, माझे स्वातंत्र्य त्याच्यासाठी आतल्या वर्तुळातले म्हणून बसला औरंगजेबशी लढत. मला काय त्याचे ? नीति अनीतिची चाड वगैरे माझ्या धर्मातल्या महत्त्वाच्या बाबी. पण हा विषय माझ्या वर्तुळातला नव्हे म्हणून मला वाटते की भीमाने दुःशासनाचे रक्त प्यायला नको होते. दुःशासनाने असे केलेच काय ? बलात्कार तर केला नव्हता, नुसते केस ओढले एवढेच ना ? पांडवांनाच लढाईची खुमखुमी म्हणून त्यांनी कौरवांवर अन्याय केला. रामाने तर सीतेला रावणाने नुसते पळवून नेले तर अख्खी लंका बेचिराख करून टाकली. सहिष्णुतेचा अभाव दुसरे काय ? अणु चाचणीची आपल्याकडे बरीच आधीपासून तयारी होती म्हणतात. १९७४ पासून अणु चाचणी इंदिराबाईंच्या एजेंडावर होते असे कुठे तरी वाचले पण आपण 'अहिंसावादी' पडलो ना ? आणि सारे जग आपल्याला वाळीत टाकील त्याचे काय ? जॉर्ज फर्नांडिस (आणि बीजेपी) जहाल लोक. मे १९९८ मध्ये पोखराणचा चाप ओठला आणि International restrictions मुळे देशाला किती संकटात टाकले. मूर्खच एकूण. " शापादपि शरादपि " (शाप देण्याची पात्रता वा शर चालविण्याचे सामर्थ्य) अशा शक्तिची कुठे आवश्यकता असते काय ? muscle power दाखवून काय मिळते ? व्यर्थ उपद्‍व्याप नुसता. धार्मिक पुस्तकांतून ते नुसते वाचणे बरे. अशा गोष्टी काही अंमलात आणायच्या नसतात. एक गाल फाडला की दुसरा पुढे करायचा की होते ना काम. खूप उदार आहे माझा धर्म. त्याला माझ्या सर्वात बाहेरच्या वर्तुळात ठेवणेच बरे. मग मला त्याबद्दल उठणाऱ्या विचारांमुळे उठणारी झळही लागत नाही, आणि हुसेन काही गैर करतो आहे असेही जाणवत नाही.

उपहास

वर्तुळा-वर्तुळातून गोल-गोल फिरवत निगरगट्ट चामड्यांवर अशा उपहासत्मक उपदेशांनी काय परिणाम साधला जाणार ही सुद्धा एक शंकाच आहे. कारण तुमचा हा प्रतिसाद कोणाच्या कुठल्या वर्तुळात बसतो का हीच शंका आहे ... मला वाटते आपण आपल्या सामाजिक जीवनात धर्माला सर्वांत बाहेरच्या वर्तुळात टाकले आहे. असे दिसते आहे की सध्या आताल्या वर्तुळात "सच्चर आयोगासारखे" चलनी नाणे एकदम आतल्या वर्तुळात आहेत.

एक-एकाने या सामाजिक चौकटीला छेद देऊन बाहेर पडल्याशिवाय ही वर्तुळे पुन्हा लहानमोठी करणे शक्य नाही.

आपला,
(वर्तुळातला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

हिंदूंच्या देवदेवतांची नागडी उघडी चित्रे -

आधी ठरवून देखील माझ्या वरील प्रतिसादात एक वाक्य घालायचे शेवटी राहूनच गेले. ते म्हणजे - माझे मत ह्याआधीच्या कोणत्याही प्रतिसादाशी संबंधीत नव्हे. हिंदूंच्या सहिष्णूतेचा .. बद्दल माझ्या विचारांचे माझे निरीक्षण आहे हे.
एकोहम् -

त्रागा

एकोहम्,

तुमचा प्रतिसाद वाचताना कितीही म्हणत असलात तरी वरील प्रतिसाद वाचून आपल्यास "फ्रस्ट्रेशन" आल्याचे समजते. तसे वाटल्यामुळे आणि आपला त्रागा समजल्यामुळे मला (अथवा तत्सम इतरांना) काय वाटते ते सांगण्याचा प्रयत्न करतो. बाकी ऍग्री टू डिसऍग्री हे जेथे स्वतंत्र विचारांना मान देणार्‍यात असते तसे आपल्या सर्वांमधे आहे असे समजूया, त्यामुळे "नथींग पर्सनल":

आपले उत्तर् वाचताना मला चर्चीलचे साम्यवादी (स्वप्नाळू आदर्श पण अव्यवहार्य) विचारसरणिवरचे एक मजेशीर वाक्य आठवले. तो म्हणाला होता की,"जर विशीचा तरूण हा साम्यवादी विचारांचा नसला तर त्याला हृदय नाही आणि तोच तिशीचा झाल्यावर पण साम्यवादी विचारांचाच असला तर त्याला डोके नाही".

यात कुणाचीही थट्टा करण्याचा उद्देश नाही पण एखाद्या घटनेला प्रतिक्रीया देताना कशी द्यावी या बद्दलची ही मतमतांतरे आहेत. यात नेभळट पणा अजिबात नाही. एक उदहरण साधारण पंधरा वर्षापुर्वींचे देतो: एटी ऍन्ड टी या कंपनीने भारतीयांसाठी जाहीरात करताना नकाशा काढलेला होता त्यात काश्मीर नव्हते. "टेक्नीकली" ते चूक नव्हते कारण तो नकाशा तसाच अमेरिकन सरकार आणि अगदी आंत्रराष्ट्रीय स्तरावर वापरला जातो. तमाम भारतीयांनी तेंव्हा एटी ऍन्ड टी च्या कस्टमर सर्व्हीसला फोन करून (तेंव्हा ईमेल वगैरे इतके नव्हते) निषेध व्यक्त केला. एटी ऍन्ड टी ने ताबडतोब तो बदलला आणि काश्मीरसहीत नकाशाची भेटकार्डे भारतीय कस्टमर्सना पाठवली!

कॅलीफोर्नीयात गेल्या वर्र्षी झालेले सहावीच्या पुस्तकाचे आणि त्यात ज्या पद्धतीने हिंदू शर्म शिकवला जात होता (एन्शंट सिव्हीलीझेशन म्हणून) त्यावरचे रामायण माहीत नसल्यास सांगा आणि त्यावेळेस हिंदू एज्यूकेशन फाउंडेशन आणि हिंदू अमेरिका फाउंडेशनने उठवलेला आवाज हा नेभळटपणा दाखवत नाही. तर स्वतः मध्ये असलेल्या उर्मीचा आणि स्वाभिमानाचा योग्य वापर (चॅनलायझेशन या अर्थी) दाखवतो.

वरचे चर्चीलचे वाक्य हे जसे व्यक्तीस लागू होते तसेच समाजाला पण लागू होते. आज आपण आपल्यासाठी असलेल्या अधुनिक काळात समाज म्हणून पण मॅच्युअर होऊ लागलो आहोत. त्यामुळे एम एफ हुसेन सारख्या प्रकरणांमधे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचा निषेध करून थांबणे आणि बाकी जी काही प्रतिक्रीया देयची आहे ती बुद्धीने द्यावी योग्य वाटते. नाहीतर त्याला फुकट प्रसिद्धी मिळत राहणार. (मधे असे एक प्रकरण मला समजले होते, अमेरिकेतील साप्ताहीकाचे, पण त्यावर बोलणे म्हणजे तसले फालतू मासीक नवीन पिढीला उगाच माहीती करून देण्यासारखे वाटले).जर अशी गोष्ट भारतात होत असेल तर तेथिल नागरीहक्कांचा वापर करून पुढे जाता येईल. अमेरिकेपुरते बोलाल तर येथे सर्वच स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपण जर ते उपभोगत असलो तर त्यातील चांगल्या वाईट गोष्टीं मान्य व्हायला पाहीजेत. कारण या देशात विचार स्वातंत्र्याचा अतिरेक आहे पण ते प्रामाणीक पणे सगळ्याच गोष्टींसाठी पाळतात. मग ते स्वतःचा झेंडा शाळेत जाळणे असो अथवा ख्रिस्ताबद्दल काही असो...

आपण शिवाजीला सर्वच मोठा समजतो. सावरकरांनी त्यांच्या गाण्यात जे शिवाजीला मागीतले आहे त्यात आपल्या क्रिया-प्रतिक्रीया कशा असाव्यात त्याचे अचूक वर्णन दिले आहे ते सांगून थांबतो, बाकी एकच विनंती, आपण आपल्यापुरते आपल्यास जे काही जिव्हाळ्याचे वाटते त्यात नुसते त्रागा करून कामाच्या वेळेस निष्क्रीय नाही आहोत ना हा स्वतःस सर्वांनीच प्रश्न विचारावा इतकेच वाटते...

जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी बुद्धी पातशाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी

ती शुद्धी हेतूची कर्मी राहूदे
ती बुद्धी भाबड्या जीवा लाभूूदे
ती शक्ती शोणीता माजी वाहू दे
दे मंत्र पुन्हा जो दिले समर्थे तुज ज्या

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||

पटले

श्री. विकास,

आपण आपल्यापुरते आपल्यास जे काही जिव्हाळ्याचे वाटते त्यात नुसते त्रागा करून कामाच्या वेळेस निष्क्रीय नाही आहोत ना हा स्वतःस सर्वांनीच प्रश्न विचारावा इतकेच वाटते
--- १००% पटले.

उत्तम प्रतिसाद!

आपला,
(भारावलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सेटानीक व्हर्सेस

एकदम आठवले म्हणून...

अयातुल्ला खोमेनीचा आवडता लेखक कोण होता? - सलमान रश्दी

सेटानीक व्हर्सेस हे रश्दींचे पुस्तक कुठे छापले गेले? - अमेरिकेत

त्यावर सर्वात प्रथम बंदी कोणी घातली? - भारत सरकार !

परीणाम? - जास्तच प्रसिद्धी मिळून आजतागायत रश्दींना लपून जगावे लागत आहे! बर ते पुस्तक पण काही चांगले नव्हतेच! पण त्याचा खप उगाच वाढला.

सगळ्यात आश्चर्य म्हणजे याच रश्दींनी "मिडनाईट चिल्ड्रन" पुस्तकात शंकराबद्दल् वाटेल ते लिहीले पण त्यावर मात्र भारत सरकारने बंदी घातली नव्हती..

दा विंची कोड

यावरून आठवले. दा विंची कोडवरही भारत सरकारने बंदी घातली होती. नंतर काढली बहुतेक. त्यावेळी इथले कट्टर कॅथोलिक आरामात होते.
स्पिलबर्गच्या इंडियाना जोन्स अँड टेंपल ऑफ डूमवर अजूनही बंदी आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

टेंपल ऑफ डूम

टेंपल ऑफ डूमवर भारतीयांविषयी आक्षेपार्ह विधानांमुळे बंदी घातली होती. पण आता ती उठवण्यात आली आहे. दुरूस्तीबद्दल धन्यवाद.
आग आणि पाणी दोन्ही बघितले नसल्यामुळे याबद्दल काही माहिती नाही.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कितीही म्हणत असलात तरी ?

कितीही म्हणत असलात तरी ? म्हणजे ह्यात 'फ्रस्ट्रेशन' व्यतिरिक्त आणखी काही जाणवू शकेल असा मला संशयही नाही. सर्वांनी मिळूनवैदिक धर्म खूप मोठा आहे असे घसा फोडून सांगितले तरी तो मोठा होणार नाही व त्याला कितीही पायदळी तुडवले तरी तो हीन होणार नाही हे मलाही समजते. पण अकारण माझ्या धार्मिक भावनांची पायमल्ली व्हावी आणि त्याला शासनाचा पाठिंबा असावा ह्याबद्दल होणारे फ्रस्ट्रेशन आणि अगतिकताच मी व्यक्त केली आहे. कारण ह्या निधर्मी वा सर्वधर्म समावेशक स्वतंत्र देशात वैदिक धर्मियांच्या भावनांचा खेळ केल्याचीच उदाहरणे जास्त दिसतात. वैदिक धर्मियांनी इतरांच्या धार्मिक भावनेची टिंगल केल्याची उदाहरणे दिसत नाहीत. आणि तसे कोणी करत असेल तर तेही अजिबात क्षम्य नाहीच.
एकोहम्

यावरून एक गोष्ट आठवली.

फारा वर्षांपूर्वी माझ्या अबुधाबीतील ऑफिसात एक पाकिस्तानी सहकारी होता. त्यावेळेस बाबरी मशिद आणि नंतर मुंबई बाँबस्फोट आणि त्यानंतरच्या अनेक घटना घडून गेल्याने भारताचे नाव मध्यपूर्वेत गाजत होते. तर हा मनुष्य कधीतरी बोलताना म्हणायचा -

"तुम्ही हिंदू एवढे धर्मवेडे का बॉ असता?" आणि त्याच्याकडे अशी अनेक उदाहरणे तयार असत. (...त्यात टेंपल ऑफ डूमचे पण असे)

मला हसावं की रडावं ते कळत नसे. "हे नेमके कोण कोणाला बोलत आहे?" असे म्हणून वेळ मारून न्यावी लागे.

"इन गॉड्ज् नेम" सीबीएस डॉक्यूमेनटरी

खालील डॉक्यूमेनटरी बघण्यासारखी असावी (डिसेंबर २३)

राम के नाम पे

ही आनंद पटवर्धनांची 'राम के नाम' (१९९२) तर नाही?

नाही

>>>ही आनंद पटवर्धनांची 'राम के नाम' (१९९२) तर नाही?

नाही. सीबीएसची ही डॉक्यूमेंटरी नवीन आणि ९/११ च्या संदर्भातील आहे. आनंद पटवर्धन यांची डॉक्यूमेंटरी एकांगी वाटावी अशी होती. अर्थातच त्याचे कारण संघ/भाजप (उजवे) म्हणजे दुसरे टोक (ते डावे). आता नंदीग्रामवर काही काढताहेत का याची उत्सुकता आहे...

 
^ वर