वर्णमाला

प्रस्तावना:

संस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का? त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत? थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कृ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.

Comments

भारतीय भाषांमधील वर्णमाला

आपला लेख वाचून इतक्या जवळच्या विषयाबद्दल माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद !
भारतीय भाषांच्या वर्णमालेत बरेचसे साम्य आहे. या भाषांच्या वर्णमालांबद्दल तुलनात्मक स्वरुपाचा लेख लिहिला तर इतर भाषांच्या वर्णपद्धतींद्दल असणारे अज्ञान दूर होईल.

 
^ वर