ओंकार जोशीचे कौतुक..

राम राम मंडळी,

आजच्या मटाच्या 'संवाद' या रविवारीय पुरवणीमध्ये माधव शिरवळकर यांच्या 'कंप्युटरसॅव्ही मराठी' या मुखपृष्ठीय लेखात आपला एक उपक्रमीय सदस्य ओंकार जोशी, याच्या 'गमभन' या प्रणालीचा कौतुकपूर्ण उल्लेख आला आहे.

एक उपक्रमी या नात्याने मला ओंकारचे कौतुकही वाटते आणि अभिमानही वाटतो. त्याच्या क्षेत्रात त्याला अधिकाधिक यश मिळो हीच शुभेच्छा! ओंकार उत्तम गझलकार असून रेखाचित्रेही अतिशय सुरेख काढतो हे जाता जाता सांगावेसे वाटते!

त्याच्या मिश्किल चेहेर्‍यावरून त्याला आणीही काही कला अवगत असाव्यात असे सतत वाटत राहते! :)

ओंकारला आणि 'गमभन' ला पुन्हा एकवार शुभेच्छा!

आपला,
(ओंकारवर आज ना उद्या एखादे व्यक्तिचित्र लिहायचा विचार करणारा!;) तात्या.

Comments

शुभेच्छा!

ओंकारला आणि त्याच्या 'गमभन' ला आपल्याही शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुवा?

मटा वाचला नाही, दुवा असेल तर मिळेल का?

ओंकारवर आज ना उद्या एखादे व्यक्तिचित्र लिहायचा विचार करणारा!

त्यांच्याबद्दल माहिती लिहाच

हा घ्या दुवा!

इथे वाचा.
ओंकार जोशी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही त्यांच्या हातून अशीच मराठीच्या उज्वल परंपरेत भर घालण्याचे भरीव कार्य घडो अशा शुभेच्छा!

अभिनंदन

ओंकार जोशी यांचे अभिनंदन

प्रमोदकाका, दुवा लगेच दिल्याबद्द्ल तुम्हालाही दुवा !!

आदर

मला ओंकार बद्द्ल आदर वाटतो. पडद्या मागे किती कष्ट आहे हे समजते. पुढे असूयायुक्त आदर ,आदरयुक्त प्रेम हे देखील आले. आभासी जगात एवढीच एक जागा व्यक्त करण्यसाठी.
प्रकाश घाटपांडे

आदर

मला ओंकार बद्द्ल आदर वाटतो. पडद्या मागे किती कष्ट आहे हे समजते. पुढे असूयायुक्त आदर ,आदरयुक्त प्रेम हे देखील आले. आभासी जगात एवढीच एक जागा व्यक्त करण्यसाठी.
प्रकाश घाटपांडे

अभिनंदन

ओंकार जोशींचे हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! ही चांगली बातमी उपक्रमींपुढे मांडल्याबद्दल तात्या आणि दुव्याबद्दल प्रमोदकाकांचे आभार!

स्नेहांकित,
शैलेश

अभिनंदन आणि आभार

ओंकार जोशींचे हार्दिक अभिनंदन आणि तात्याचे मनःपूर्वक आभार

सहमत

आदरणीय सर्वसाक्षी महाशयांशी सहमत.
आपला
प्रणव सदाशिव काळे

अभिनंदन

ओंकारचे कार्य कौतुस्कापद आहे. :)

त्याचे हार्दिक अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! ही चांगली बातमी उपक्रमींपुढे मांडल्याबद्दल तात्या आणि दुव्याबद्दल प्रमोदकाकांचे आभार!येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

श्री.ॐकार जोशी.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
उपक्रमी' होऊन गमभन वापरू लागलो तेव्हा प्रत्ययास आले की उच्चारानुसारी देवनागरी लेखना साठी गमभन ही सर्वोत्कृष्ट प्रणाली आहे.ती अगदी तर्कसुसंगत आहे.त्यामुळे टंकलेखनासाठी फार काही लक्षात ठेवावे लागत नाही. शब्दात कोणते स्वर आणि व्यंजने कोणत्या क्रमाने आहेत याचे ज्ञान असले की झाले.(ते तर असायलाच हवे.) अशा प्रणालीची निर्मिती हे अत्यंत उच्च अशा बौद्धिक क्षमतेचे काम आहे.( जरी त्यातले ओ का ठो कळत नसले तरी ते किती गहन आहे याची मी कल्पना करू शकतो.)
अशा या ॐकार जोशींना प्रणाम. द्विवार प्रणाम!त्रिवार प्रणाम!! शतवार प्रणाम!!!
(श्री.तात्या यांनी त्यांचे शब्दचित्र अवश्य लिहावे. सर्वांनाच वाचायला आवडेल.)
......यनावाला.

ॐकारचा गमभन प्रवास.

ॐकारने लिहिलेला त्याचा गमभन विकसनाचा प्रवास वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होणे आवश्यक आहे असे मनापासून वाटते. मैत्रीपार्क किंवा उपक्रमावर कोणी वार्ताहर नाही का जो हे प्रकाशित करु शकतो. अर्थात ॐकारची परवानगी असेल तरच!येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मनोगताचा उल्लेख चुकीचा नाही

तो लेख युनिकोड तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आहे.

या तंत्राचा वापर करून manogat.com सारख्या अनेक दर्जेदार मराठी वेबसाइट्स आज इंटरनेटवर आल्या आहेत .

येथे "या" तंत्राचा म्हणजे युनिकोड तंत्राचा.

- योगेश

गमभन : ॐकार जोशींचे उपकार

मराठी वाङ्मयाला 'गमभन'साठी एकेदिवशी ॐकार जोशींचे उपकार मानावेच लागतील.
माधव शिरवळकर आणि तात्यांचेही आभार.

गमभन : ॐकार जोशींचे उपकार

मराठी वाङ्मयाला 'गमभन'साठी एकेदिवशी ॐकार जोशींचे उपकार मानावेच लागतील.
माधव शिरवळकर आणि तात्यांचेही आभार.

सहमत

"सुवर्णयुग" वगैरे शब्द जरा मोठे वाटतात पण तसंच काहीतरी सुरू झालं आहे.

अगदी सहमत!

मराठी वाङ्मयाला 'गमभन'साठी एकेदिवशी ॐकार जोशींचे उपकार मानावेच लागतील.

सहमत आहे...
ॐकार ने मराठीला जाला वरती मुक्त केले असेही म्हणायला हरकत नाही...

आपला
गुंडोपंत

वा!

ॐकार ने मराठीला जाला वरती मुक्त केले असेही म्हणायला हरकत नाही...

वा!गुंडोपंत क्या बात है.
प्रकाश घाटपांडे

अभिनंदन

ॐकारचे हार्दिक अभिनंदन!
आपण बर्‍याचदा 'हे करायचे आहे, ते करायचे आहे' असे नुसतेच खयाली पुलाव पकवतो, कधीकधी थोडाफार प्रयत्न करून मधेच सोडूनही देतो. पण ॐकारने मात्र आपली कल्पना प्रत्यक्षात आणली. तेवढ्यावरच न थांबता, देवनागरी सोबत गुरुमुखी, तेलुगु, गुजराती इत्यादि भाषांसाठीही ही सोय वापरता येईल यासाठी कष्ट घेतले, त्यात सतत बदल करत राहिला, अजूनही करतो आहे. हे मला अभिनंदनीय वाटते.
ॐकारचे व्यक्तिचित्र वाचायला उत्सुक आहे.
राधिका

खयाली पुलाव

खयाली पुलाव

शब्दप्रयोग आवडला.. खमंग आहे.

अभिजित

अभिनंदन

गमभन खरंच खूप सुटसुटीत आहे..

अभिजित

:)

धन्यवाद धन्यवाद ! :)

वाह

वाचून छान वाटले. युयुत्सुंचे आभार. आभार यासाठी की आपल्यातल्याच एक होतकरू युवकाच्या एका उत्पादनासाठी ते चांगले क्षेत्र मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहेत. ॐकार आणि युयुत्सु यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

मराठीत लिहा. वापरा.

खयाली पुलाव

आपण एकदम बरोबर बोललात. नव्हे लिहिलेत. :)

मराठीत लिहा. वापरा.

अभिनंदन

ओंकार,

हार्दीक अभिनंदन !

नीलकांत

अभिनंदन आणि शुभेच्छा!

ॐकार जोशी यांचे हार्दिक अभिनंदन! गमभन टंकलेखन सुविधा आणि गमभन शुद्धलेखन चिकित्सा या दोन्ही प्रकल्पांना शक्य त्या प्रकारे मदत करून सर्वांना यात सहभागी होता येईल. या दोन्ही प्रकल्पांना उपक्रम व्यवस्थापनाकडून हार्दिक शुभेच्छा!

ही री ओढतो आहे...

ॐकार जोशी यांचे मनापासून अभिनंदन!

हा लेख आणि गमभनच्या वाटचालीचा लेख मित्रमंडळीना पाठवितो आहे.

(आनंदी) एकलव्य

 
^ वर