प्रकल्प : गमभन टंकलेखन सुविधा


गमभन टंकलेखन सुविधा

दुवा : गमभन

१) मागणी
मराठीमध्ये उच्चारानुरूप टंकलेखन करण्याकरता जाळ्यावर आणि जाळ्याशिवाय चालणारी सुविधा.
ह्यात पुस्तिका लिहून साठवणे, साठवलेल्या पुस्तिकेत बदल करणे, सजावट करणे, लिप्या निवडणे ( मराठी भाषेव्यतिरिक्त) इ. सोई उपलब्ध असाव्यात.

२) विचारसरणी
प्रत्य्क्षात केलेली मागणी पुरवताना ती विकासकाला त्याच्या सुविधेत जोडताना अतिरिक्त श्रम कारावे लागू नयेत. किमान आयई/फायरफॉक्स वर ही सुविधा विनासायास वापरता यावी. कळसंच सुलभ असावा. दस्तऐवज उत्तमरित्या तयार करावा जेणेकरून आज्ञावली समजण्यासाठी आणि नवे बदल करण्यासाठी त्रास होऊ नये. जवास्क्रिप्ट अश्यापद्धतीने वापरावे की वापरकर्त्याला जाळ्यावर न येताही सुविधा वापरता आली पाहिजे.

३) आखणी
तंत्र : जावास्क्रिप्ट, एचटीएमएल, मुक्त जतुदितउजा पाटी
काही संकेतः
lv: लोकल व्हेरिएबल
gv: ग्लोबल व्हेरिएबल
iv: इनपुट व्हेरिएबल
gf: ग्लोबल फंक्शन
इ.
आधिक माहिती करता दुवा पहावा.

वेळ, पैसा, मनुष्यबळ यांची पुन्हा आखणी करावी लागेल असे मोठे बदल सद्ध्यातरी दिसत नाहीत.

४) बांधणी
बांधणी करून झालेली आहे. दस्तऐवजात माहिती सापडेल .

५) चाचणी
चाचण्या चालू राहतील. आपल्याला येणार्‍या अडचणी, दिसणार्‍या चुका कळवत जाव्यात.

६) श्रेणी
आयई वर योग्यप्रकारे चालत आहे.
फायरफॉक्स मध्ये जोडाक्षरे आणि अनुस्वाराचा प्रश्न नुकताच सोडवला आहे.
पुस्तिका साठवता येतात, त्यात बदल करता येतात.
लिप्या निवडता येतात.
मुक्त पाटीसह सजावटीची सोय आहे.
३-४ ओळींमध्ये सुविधा जोडता येते.

७) मोजणी
आयई,फायफॉक्स वर चालते.
मूळ जावास्क्रिप्ट पुस्तिका आकाराने मोठ्या होत्या. त्या आता आकाराने कमी केल्या आहेत.
टंकलेखन करताना कळ दाबणे आणि अक्षरसंच उमटणे यांमध्ये दखलमात्रही वेळ दवडत नाही.
जाळ्यावर आणि उतरवून घेण्याकरता सदिअव उपलब्ध आहे.

८) जोडणी
उपक्रम, विकी इ. बरोबर यशस्वीरित्या जोडले आहे. ड्रुपल वर कसे जोडावे याकरता लवकरच नवा लेख लिहिण्याचा मानस आहे.

९) परतावा
सुविधा वापरणार्‍यांकडून आजपावेतो बर्‍याच सुचना, सुचवण्या, बदल, चुका यांबद्दल माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुविधा अधिकाधिक वापरण्यायोग्य आणि दर्जेदार बनत आहे.

ही सुविधा मोफत असून याचा स्रोत मुक्त आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

चाचणी

ॐकार,
प्रत्येक मुळाक्षरा नंतर a टंकित करणे टाळता येणार नाही का?

सवय

टाळता येऊ शकते. परंतु हा सवयीचा भाग आहे. भाषेनुसार धातू + स्वर मिळून वर्ण तयार होतो. त्यामुळे जो नियम आ,इ,ई,उ अथवा ओ कार जोडताना लागू होतो तोच अकारासाठीही लागू केला आहे. वर्ण तयार होण्याच्या पद्धतील अनुसरूनच अकारन्त शब्दांतील अंत्यवर्णही अकार मिसळूनच पूर्ण होतात. संस्कृतोद्भव भाषांकरता थोडा सवयीचा भाग म्हणून हे आत्मसात करावे लागेल. मूळ संस्कृत भाषेत मात्र शब्दाच्या शेवटी हलन्त असणारे भरपूर शब्द आहेत. सोय म्हणून बदल करायचे आहे असे म्हटले तर आपला मुद्दा योग्य आहे. पण माझ्या बुद्धीला सवय आणि सोय ह्यानुसार सद्ध्या हा बदल करणे पटत नाही. चुकीच्या सवयी लावून घेण्यापेक्षा योग्य तंत्र आवलंबणे केव्हाही चांगले असे मला वाटते.

पटत नाही

मूळ मराठीत (हातानी) लिहितांना आपण प्रत्येक अकारांत शब्दापुढे अ कार लावत नाही. मग संगणकावर का लावावा लागावा? आपल्याला प्रत्येक अक्षरामधे वर्ण आणि स्वर आहे हे माहिती आहे. मराठी टाईप करणे सोपे केल्याने गमभन चा वापर वाढायला मदत होईल. असेच करा कारण ते पटत नाही म्हणून तुम्ही Usability कडे दुर्लक्ष करता आहात.

सहमत..

जितेन१२ यांच्याशी आम्ही सहमत आहोत..

तात्या.

विचाराधीन

वापरायला सोपे, तंत्र, भाषा यापैकी कशा-कशात तडजोड करणे चांगले आहे याचा विचार करतो आहे.

बदल,सोय,सवय

वापरकर्त्यांच्या मागण्यांवरून असा बदल स्थायी स्वरूपात केला आहे. सद्ध्या याच्या चाचण्या चालू आहेत. लवकरच ( येत्या शनि-रवि) ह्या बदलासकट गमभन सुविधा उपलब्ध होईल. यात गरजेनुसार हलन्त ठेवायचे की काढायचे हे ठरवण्याची सोयही केलेली आहे. हलन्त आणि अनुस्वारासाठी आणखी कळसंचही उपलब्ध होतील.

७.०४.२१ हलन्त,ऑटोकरेक्शन इ.

गमभन ७.०४.२१ ह्या आवृत्तीमध्ये अकारान्त शब्दातील हलन्त काढण्याचे बदल केले आहेत. त्याचबरोबर ऑटोकरेक्शनची सुविधा प्राथमिक स्वरूपात उपलब्ध केलेली आहे. जावा पुस्तिका आकाराने लहाना केल्या आहेत. आयई आणि फाफॉ साठी लिप्यंतरण सोय सुधारली आहे. वर दुवा दिलेलाच आहे. त्यावरून नवी आवृत्ती उअतरवून घेता येईल.

सुंदर

आताच सुविधा तपासून बघितली. छान आहे.

धन्यवाद.

उपक्रम गुरुजींनी येथे नवीन टंकप्रणालीची प्राणप्रतिष्ठा केल्यास सर्वांचाच एक अतिरिक्त अ टंकण्याचा त्रास वाचेल.

एक अडचण

मी "मायबीबी" चे लोकलायझेशन करताना मुक्त जदिजातउजा व गमभन हे दोन्ही वापरले आहेत. मात्र गमभनच्या नवीन आवृत्तीतही पूर्वी येणारी अडचण भेडसावत आहे.

संदेश देताना असणार्‍या "विषय" या सदराशी जोडलेले गमभन फाफॉ मध्ये चालत नाही. मात्र आयई मध्ये काहीही अडचण येत नाही. असे का?

आय.ई.
फाफॉ

नक्की

काय काय बदल केलेत ते कळले तर शोधाशोध करता येईल...

काय केले आहे ते.

मायबीबी मध्ये जदिजातउजा प्रकारचा एडिटर टाकण्यासाठी त्याच्या टेम्प्लेटमधील कोडबटन विभागात खालील कोड टाकला आहे.

येथे "विषय" (subject) साठी जदिजातउजा उपयोगाचे नसल्याने केवळ गमभनची जोडणी केली आहे.

हा प्रकार आयई मध्ये व्यवस्थित चालतो मात्र फाफॉ मध्ये आधी दाखवल्याप्रमाणे अडचण येत आहे.


मराठी टंकलेखनासाठी वापरा

सविस्तर

अशी समस्या खरे तर येऊ नये. आपण ह्या पानाचा दुवा दिल्यास अथवा जेथे बदल केले आहेत त्या पुस्तिका पाठवल्यास मला सोपे जाईल. त्याचबरोबर फाफॉ मध्ये टूल्स् - एरर कन्सोल मध्ये जाऊन स्क्रिप्टींगच्या काही चुका असल्यास त्या शोधता येतील.

द्न्य् = ज्ञ

द्न्य = ज्ञ (dny) ही सोयही केलेली आहे.

असेही करता येईल

ज्याना (webmasters) अकारान्त हलंत नको असेल् त्याना तसा एक पर्याय द्या. म्हणजे ज्याना तुमचे पटते ते आहे ते तसे वापरतील . ज्याना पटणार नाही ते तो काढून वापरतील.

तसेही युनीकोड मधे हलंत हा नैसर्गिक नाहीच. क हा खरेतर क+अ असतो आणि हलंत साठी जास्तिचे एक अक्षर (ZWNJ- Zero width Non Joiner) जोडावे लागते असे काहिसे वाचल्याचे स्मरते पण ते कदाचित् चुकिचे असेल. हलंत येण्यासाठी ((धातू + स्वर्)+(-स्वर)) असे काहिसे युनिकोड मधे आहे, बरोबर्? क् + backspace केल्यावर क होतो हे इथे लिहून पडताळून पहा.

मुख्य मुद्दा पर्याय देण्याचा. त्याचा विचार व्हावा.

ऍ ऐवजी आपण मराठीत अ वर अर्धचंद्र देऊन लिहितो (त्या दुसर्‍या संकेतस्थळासारखे) त्याची कृपया सोय करावी. मला माहीत नसलेली काही वेगळी युक्ती असल्यास ती सांगावी. ऍ हे कॅसॅतॅरी वाटते.
- दिगम्भा

नवे बदल

नवे बदल वापरून पहातो आणि सांगतो. a ते बरे झाले

७.०४.२८

७.०४.२१ मध्ये फाफॉ मध्ये टेक्स्टएरीआ मध्ये delete कळ दाबल्यावर पूर्णविराम येत होता. ही त्रुटी आता ७.०४.२८ मध्ये दूर केली आहे. नवे बदल इथे आहेत.
घरबसल्या वापरासाठी गमभन टंकलेखन सुविधा इथून उतरवून घ्यावी.
गमभन टंकलेखन सुविधा

७.०४.३०

७.०४.३० मध्ये बरहा अथवा तत्सम इतर प्रणाली बरोबर वापरताना येणारा 'इन्फायनाइट् लूप' चा प्रश्न सोडवला आहे.
नवे बदल इथे आहेत.
घरबसल्या वापरासाठी गमभन टंकलेखन सुविधा इथून उतरवून घ्यावी.

७.०५.०१

७.०५.०१ मध्ये नुक्ता,चरण,उदात्त, अनुदात्त इ. संबंधीचे घोळ निस्तरले आहेत.
नवे बदल इथे आहेत.
घरबसल्या वापरासाठी गमभन टंकलेखन सुविधा इथून उतरवून घ्यावी.

प्रकल्प : गमभन टंकलेखन सुविधा

सौरभ

ही शेवटचा 'अ' टंकित करायची सवय लावून घेताना मलाही खूप त्रास होतोय. पण मी ती सवय लावून घेतोय. आणि भाषाशास्त्र व लिपीशास्त्राचा विचार करता तीच पद्धत बरोबर आहे.

देवनागरी ही लिपी मूळ संस्कृत भाषेचीच आहे, त्यामुळे, तिची हाताळणी संस्कृतच्या नियमांनुसार होणं टाळता येणार नाही, अगदी तुम्ही म्हणता तसं संस्कृतामधे सगळ्यात कमी लेखन होत असलं तरीही.

जेव्हा जेव्हा देवनागरीने संस्कृताची कास सोडलीय तेव्हा तेव्हा तिची अधोगती झाल्याचं माझं वैयक्तिक मत आहे. सोपं करण्याच्या नावाखाली तिच्यातील सौंदर्यच हिरावून घेण्याचे प्रयत्न विशेशत: महाराष्ट्रातच घडले आहेत. त्यांवर जास्त चर्चा करण्याचं हे ठिकाण नव्हे, म्हणून ती चर्चा टाळत आहे.

मला एक सुचवावंसं वाटतंय, ज्यांना हा शेवटाचा 'अ' टाइप करायचा नाही त्यांनी तो करू नये. फार तर फार काय होईल ? तुमच्या प्रत्येक शब्दाच्या शेवटी एक हलन्त येईल. म्हणजे काहीसं असं दिसेल :
"मी काय् म्हणत् होतो, ते तुम्हाला नीट् कळलं नाहीय् बहुतेक्, म्हणुन् तुम्ही मला दोष् देताय्"
सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल पण एकदा सवय होऊन गेली की काही वाटणार नाही.

तशा अपल्या आयुष्यात (आणि विशेषतः मरठी भाषेच्या बाबतीत) बर्याच अशा गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल सुरुवातीला बरंच काही वाटूनही हळू हळू काहीही न वाटून घेण्याची आपण सवय करून घेतो, त्यातलीच ही एक, काय ? :):):)

श् + र आणि श् + न

उपक्रमावरील टंकलेखन सुविधेमध्ये श् + र आणि श् + न ही दोन्ही जोडाक्षरे सारखीच दिसत आहेत.
श् + न : प्रश्न
श् + रः श्रीमती

मात्र गमभन वर ही अक्षरे योग्य प्रकारे दिसत आहेत. या चुकीचे निरसन करण्यासाठी उपक्रमपंतांनी आवश्यक ते होमहवन व पिवळ्या रंगाचा खडा जो की गोमेद हा डाव्या हाताच्या अनामिकेत येत्या सोमवारपासून श्रावणातील शेवटच्या सोमवारपर्यंत घालणे आवश्यक आहे. नंतर हा खडा सवत्स धेनू आम्हाला दान करावा. आपोआप सर्व अडचणी दूर होतील असा ठाम विश्वास वाटतो.

खड्याची किंमत ७५० रुपये प्रति कॅरेट. मात्र आमच्याकडे विशेष योजनेद्वारे हाच खडा ७४९ रुपये प्रति कॅरेट या दराने मिळेल. खडा प्रभारित करण्यासाठी आवश्यक ते मंत्रोपचार व संस्कार खड्यावर मोफत केले जातील.

योगेश गुरुजी!





मराठी टंकलेखनासाठी वापरा.

मला फरक दिसतो. :)

मला उपक्रमावरही फरक दिसतो आहे. फाँटसाईझमुळे होत आहेसे वाटते पण गमभनवर जरा ठळक दिसतो आणि चांगला वाटतो.

श्र श्न

अरे बापरे

योग्य अक्षरे दिसण्यासाठी एवढा मोठा फॉन्ट साईझ करण्याऐवजी एखाद्या कुडमुड्या ज्योतिषाप्रमाणे भिंग घेऊन संगणकासमोर बसावे असे वाटते. :(



मराठी टंकलेखनासाठी वापरा.

योगेश गुरुजींना जाहीर पत्र

योगेश गुरुजी यांना,
सा. न. वि. वि.
तीन चार वर्षांपूर्वी माझ्या संगणकात सतत 'एरर मेसेज' येत होता, तेव्हा चार चार वेळा निरोप पाठवूनही आपण आला नाहीत. मोठ्या मिनतवारीने आपली भेट मिळाल्यावर तुम्ही मला हाच सल्ला दिला होतात. (फक्त खडा अनामिकेत न घालता मध्यमेत आणि दर ७५० च्या ऐवजी ६५० सांगितल्याचे स्मरते) पूर्ण श्रावण हा सल्ला निष्ठेने पालन केल्यावरही संगणकातील बिघाड दूर न झाल्याने आपल्याशी संपर्क केला असता, श्रावणातील शेवटच्या सोमवारी नेमकी अमावास्या आल्यामुळे ही गोष्ट भाद्रपदातील पहिल्या सोमवारापर्यंत रेटायला हवी होती असे आपले मत पडले. दरम्यानच्या काळात माझ्या पुतण्याने ५ मिनिटांत संगणकातील दोष दूर केल्यामुळे माझ्या घरच्यांचे ज्योतिषविषयक पूर्वग्रह दूर करण्याची आयती संधी माझ्या हातून निघून गेली व मनस्ताप झाला तो वेगळाच.
हे सर्व येथे लिहिण्याचे कारण उपक्रमपंतांना व इतरांना योग्य ती काळजी घेण्यास उद्युक्त करणे हे आहे.

आपला विश्वासू
शंतनू ओक

ता. क. : मायक्रोवेव्ह गेल्या दोन वर्षात तिसऱ्यांदा दुरुस्त करून घेतला आहे. कोणत्या ग्रहाची दशा आहे ते शोधून काढून काही जालीम इलाज करता आला तर पाहा.

पत्रोत्तर

तुमच्या संगणकाला झालेली व्याधी ही आषाढ महिन्यातील चतुर्दशीला होती असे पुसटसे आठवत आहे. दुसर्‍याच दिवशी असलेल्या अमावास्येला (गटारी अमावास्या) आमचे इतर महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळे आपणाकडे येणे जमले नसावे. श्रावण प्रतिपदेला झालेल्या आपल्या भेटीत तुम्हाला दिलेला सल्ला नीटसा स्मरत नाही. (अमावास्येच्या तीर्थप्राशनाचा व काही आन्हिकांचा दुष्परिणाम असावा.)
तुम्ही आमच्याकडून त्यावेळी खडा न घेता दुसर्‍या व्यक्तीकडून घेतल्याचे आम्हाला बाहेरून कळाले. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे निराकरण झाले नसावे. मात्र आपला पुतण्याने त्याच सप्ताहात आमच्याकडून नेलेला पक्व सफरचंदाप्रमाणे लालबुंद असा खडा जो की माणिक त्याच्या तर्जनीमध्ये घातल्याचे तुम्हाला दिसलेच नसावे. तुमच्या पुतण्याच्या हातामध्ये या खड्यामुळे यश आहे.

तुमच्या मायक्रोवेव्ह ला दुरुस्त करण्यासाठी सरड्याची कातडी जाळून तिची राख कोल्ह्याच्या रक्तामध्ये भिजवा. होणारे मिश्रण हे अमावास्येच्या रात्री भाजलेल्या एका मडक्यामध्ये भरून त्यानंतर येणार्‍या ७व्या पौर्णिमेला गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली वटवाघळांना खायला द्या. ही वटवाघळे मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानात प्रगत असल्याचे काही नास्तिक शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेच आहे. ८व्या पौर्णिमेला १३वी घटका भरल्यानंतर (वीज असेल तर) मायक्रोवेव्ह आपोआप चालू होईल. ही गोष्ट होणार यासाठी आम्ही चुन्याचे बोट भिंतीवर लावून ठेवत आहोत.


मराठी टंकलेखनासाठी वापरा.

०७.०५.०५

गमभनच्या या नव्या आवृत्तीमध्ये पुढील बदल केले आहेत -

१) फाफॉ + विंडोज् / लिनक्स यात .h तसेच .n वापरल्यावर अनुक्रमे हलन्त आणि अनुस्वार उमटत नसे. आता ही त्रुटी दूर केली आहे.
२) gamabhanaphoneticmaps.js या पुस्तिकेचे आकारमान १६.८ कि.बा. वरून ३.२३ कि.बा. करण्यात यश मिळाले आहे.
३) क़ ख़ ग़ ज़ फ़ ड़ ढ़ य़ या वर्णांचा बाराखडीमध्ये समावेश केला आहे.
४) नुक्ता वापरण्याकरता .q ची सोय केली आहे.

नवे बदल इथे आहेत.
घरबसल्या वापरकारता बदल इथून उतरवून घ्यावेत.

वा वा!

२) gamabhanaphoneticmaps.js या पुस्तिकेचे आकारमान १६.८ कि.बा. वरून ३.२३ कि.बा. करण्यात यश मिळाले आहे.

हा बदल अतिशय महत्त्वाचा आहे. :) आमच्या ब्रॉडबँड वापराचा खर्च थोडासा कमी होईल.

(खिसोबा) योगेश!





मराठी टंकलेखनासाठी वापरा.

सुधारणा

गमभनची चाचणी करताना आणि मदत वाचनाना एक सुधारणा असयला हवी हे जाणवले. सुधारणा कळफलकाच्या मदतीमध्ये करणे गरजेचे आहे.

rha आणि Rha यांच्या वापरा बद्दल गफलत झाली आहे असे वाटते. हा बद्दल उपक्रमावर सध्या सोदाहारण दाखवता येत नाही. पण नवीन गमभनची मदत वाचुन rha टंकित करून पहावे वा Rha टंकित करून पहावे.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

चूक सुधारली आहे

मदतीच्या पानावरील चूक आता सुधारली आहे. Rhaa = र्‍हा

वर्षभराचा आढावा

गमभन टंकलेखन सुविधेच्या विकासाचा गेल्या वर्षभराचा आढावा इथे उपलब्ध आहे.

वा

ओंकार,
आपला आढावा वाचला. गमभन च्या जन्मामागे केवढ्या प्रसूतीयातना आहेत हे जाणवले. गमभन ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो व त्याला आमचाही फुल ना फुलाची पाकळी हातभार लागो या शुभेच्छा.

मी वापरते.

वाखाणण्यासारखे/शुभेच्छा!

गमभनच्या निर्मितीमागील चिकाटी आणि कष्ट खरेच वाखाणण्यासारखे आहेत. टंकलेखन सुविधेबरोबरच शुद्धलेखन चिकित्सा आणि इतर मुक्त उपक्रमांसाठी शुभेच्छा! तंत्रज्ञ मराठी लोकांत सहकार्य वाढून असे अनेक मुक्त प्रकल्प चालावेत आणि यशस्वी व्हावेत असे वाटते.

अगदी असेच

अगदी हेच म्हणतो. ॐकार यांचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. विनामोबदला (थँकलेस-रिवार्डलेस) कामासाठी तुम्ही केलेले कष्ट आणि चिकाटी पाहून अभिमान वाटला.

एक सूचना: उपक्रम/माझे शब्द वगैरे गमभन वापरणार्‍या स्थळांनी "Powered By गमभन" असे कुठेतरी सुंदर चित्रामध्ये ठरवून ठळकपणे दिसेल असे लावावे.



मराठी टंकलेखनासाठी वापरा.

लाख मोलाची सूचना!

एक सूचना: उपक्रम/माझे शब्द वगैरे गमभन वापरणार्‍या स्थळांनी "Powered By गमभन" असे कुठेतरी सुंदर चित्रामध्ये ठरवून ठळकपणे दिसेल असे लावावे.

क्या बात है! लाख मोलाची सूचना..

तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

वरील सुचना

आम्ही दोन दिवसपुर्वीच वरील सुचना अमंलात आणली आहे.

धन्यवाद.

अभिनंदन/ शुभेच्छा

ओंकार,

गमभनच्या टंकलेखन सुविधेच्या विकासाचा रोचक प्रवास वाचला. करावे तेवढे कौतुक अपुरे आहे म्हणून अभिनंदन करते. गमभनच्या या विकासात जे श्रम तुम्ही आणि इतरांनी घेतले आणि इतरांनी ही सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल इतरांचेही कौतुक वाटते.

यापुढेही गमभनची वाटचाल जोमाने व्हावी यासाठी अनेक शुभेच्छा!

प्रियाली.

पडद्यामागे

ओंकार,
कुठलीही सुविधा वापरताना पडद्यामागच्या लोकांना किती परिश्रम घ्यावे लागतात याची वापरणार्‍यांना कल्पना येत नाही. गमभनच्या विकासाबद्दल आपण घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. या प्रयत्नांमधे उत्तरोत्तर आपल्याला असेच यश मिळो या शुभेच्छा.
राजेंद्र

ॐकार,अभिनंदन आणि पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा. तुझ्यात असलेली हि क्षमता उत्तरोत्तर वाढत राहो. शक्य तेथे आमचा खारीचा वाटा द्यायला आम्ही आहोतच. तुझ्या प्रयोगांना व्यावसायिकतेची जोड भविष्यात यावी अशी आशा व्यक्त करतो...


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

०७.०६.२०

गमभनची नवी आवृत्ती ०७.०६.२० आता उपलब्ध आहे. हिंदीतील हूँ, क्यूँ सारखे वर्ण आणि alt कळसंचात सुधारणा केल्या आहेत. फा.फॉ. मधला डिलिट ची त्रुटी सुधारली आहे. आँकारयुक्त वर्ण उदा. फाँ चा युनिकोड सुधारला आहे.
ड्रुपलकरता जावापुस्तिका आणि पीएचपी मधल्या सुधारणांसकट नमुना पुस्तिका चढवल्या आहेत.

श ख स्ट्यि वगैरे

गमभनमध्ये टकलू श ऐवजी शेंडीफोड्या श देता येईल का? तसेच ट, ठ, ड, ढ, ह या अक्षरांना जोडण्यासाठी पाऊण य हवा. गमभन मधले ट्य वगैरे कसेसेच दिसतात. तसेच ट्ट न्न क्क क्त वगैरे जोडाक्षरे टंकण्यासाठी एकापेक्षा अधिक पर्याय हवेत. र्‍हस्व इकारासाठी वेगवेगळ्या रुंदीच्या वेलांट्या हव्यात. वेलांटी जोडाक्षराच्या शेवटच्या अक्षरापासून पहिल्या कान्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मला वाटते राजहंस या मराठी फॉन्टवर ही सोय आहे. स्ट्यि लिहिताना वेलांटी फार अपुरी पडते. ती य च्या उभ्या रेघेपर्यंत यायला हवी होती. खमरेखाली खंजीर खुपसणारा ख बघवत नाही. वच्या पेकाटात मागच्या पायाने दुगाणी झाडणारा र असे त्याचे स्वरूप असते. जुना संस्कृत ख चा पर्याय मिळावा. गमभनमध्ये टंकलेल्या ख्रिस्तमध्ये आहे तसा. --वाचक्नवी

टकलू

आपल्या टकलू श च्या पर्यायाशी जास्त सहमत नसले तरी 'टकलू श' आणि व च्या पेकाटात मागच्या पायाने दुगाण्या झाडणारा र हे शब्दप्रयोग भयंकर आवडले.
(आपण कोणीतरी दुसर्‍या कोणत्यातरी संकेतस्थळावरच्या ओळखीचे आहात असा कधीकधी भास होतो.)

फॉन्ट आणि वर्ण

आपण म्हणता ते सारे बदल फॉन्टच्या संबंधात आहेत.
उदा द्यायचे झाल्यास रोमन लिपीत फॉन्ट बदलले की अक्षरे वेगळ्या प्रकारे दिसतात ( उद. तहोमा, कोर्सिव्हा इ . इ. ). मराठीकरता वेगवेगळे युनिकोड फॉन्ट वापरायची सोय झाल्यास आणि आपण म्हणता तसे बदल असलेले फॉन्ट मिळाल्यास हे जमू शकेल. वेलांटीचे म्हणाल तर युनिकोड फॉन्टसाठी ही सोय कितपत करण्याजोगी आहे हे तपासून पहावे लागेल.

०७.०७.२१ - उर्दू आणि नेपप्र

गमभनची नवी आवृत्ती ०७.०७.२१ आता उपलब्ध आहे. उर्दू भाषेकरता लिपीचा अंतर्भाव केला आहे. नेहमी पडणारे प्रश्न ( नेपप्र - FAQs) साठी नवे पान जोडले आहे. उर्दू भाषेकरत असलेली सोय सद्ध्या चाचणीस्वरुपात आहे. नवे बदल लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहेत.

गूगल सुविधा

मराठी टंकन करण्याची इच्छा असणाऱ्याना ही सुविधा सहजपणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे असे वाटते. गूगलने नुकतीच एक अशीच नवीन सुविधा देऊ केली आहे.

http://google.com/transliterate/indic/

हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेतही शब्द सुधारणा शक्य आहे असे दिसते. अर्थात स्वयंसुधारणा अद्याप उपलब्ध नसली तरी गूगलबाबा लवकरच तेही करेल असे वाटते.
गूगलचे अभिनंदन

मस्त! + भारतीयांसाठी भेट..

धन्यवाद या माहीती बद्दल.

गुगलचा आजचा (१५ ऑगस्टचा) ब्लॉग पहा: Namaste India!

झकास.

शंतनू सेठ,
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा

गमभन ची होणारी सातत्याने प्रगती पाहून खूप आनंद होतो.

देवनगरी मध्ये टंकलेखन करण्याकरता सुधारणा केली पाहिजे.

माझे मत आहे की, जो पर्यंत काही नवीन सोय करता येत नाही किंवा होत नाही तो पर्यंत संगणकावर टंकलेखन ही तारेवरील कसरत रहणार आहे. मला फक्त दोन गोष्टी सुचतात
१. ऑनलाईन व ऑफलाईन लेखन यांची अदलाबदल करता आली पाहिजे. ऑफलाईन लेखन् विंडोजच्या कोठल्यही अप्लिकेशन मध्ये करुन इंटर्नेट एक्प्लोरर मध्ये वाचता व सुधारता आले पाहिजे. तसेच त्याच्या उलटही करता आले पाहिजे.
२. हे करण्याकरता स्वराकरता एकच चिन्ह वापरावे व सीडॅकच्या पद्धतीने कीबोर्ड लेऑट बनवावा
असे काही करता येईल का पहा. केले तर समस्त देवनागरी वापर कर्त्याव मोठे उपकार होतील

देवनागरीलिपीकरता संगणकप्रणाली

मी लिहताना रोमनच लिहित आहे.
याचा अर्थ मला जर 'क' लिहायचे असेल तर मी 'के' दाबुन नंतर 'ए' हे बटण दाबतो. याला कारण कीबोर्ड रोमन अक्षराकरता बनवला आहे. रोमन ५२ अक्षरे आहेत तर देवनागरी लिपीत ५६ अक्षरे अधिक प्रत्येक स्वराकरता दोन दोन चिन्हे आहेत. त्या मुळे कीबोर्ड वरची बटणे कमी पडतात व सर्व स्वर लिहण्याकरता दोन किंवा जास्त बटणे वापरावी लागतात. त्या मुळे लिहण्याकरता दुप्पट किंवा जास्त वेळ लागतो. प्रत्येक स्वराचे दोन ऐवजी एकच चिन्ह केले तर देवनागरीलिपी सुद्धा ५२ बटणावर बसवणे शक्य आहे. त्यामुळे लेखनाचा वेग खूप वाढेल.

कीबोर्ड
रोमन कीबोर्ड वरील बटणांचा लेआऊट इंग्रजी भाषेत वापरल्या जाणार्‍या अक्षरांच्या हिशेबाने ठेवला आहे. जास्त वापरात येणारी अक्षरे मध्यावर आहेत. मराठी करता आता मी वापरत असलेला कीबोर्ड वेळखाऊ आहे. सीडॅकने जिस्ट नावाखाली जी संगणकप्रणाली बनवली आहे त्या मध्ये 'इनस्क्रिप्ट' कीबोर्ड लेआऊट वापरला आहे. तो लेआऊट मराठीकरता उत्तम आहे. (इंग्रजीत सुद्धा शिफ्ट की वापरुन कॅपिटल अक्षरे त्याच बटणावर बसवली आहेत.) सीडॅकने 'डी' बटणावर् जोडाक्षरांची सोय केली आहे. एक व्यंजन टंकलेखीत करुन 'डी' बटण दाबुन दुसरे व्यंजन लिहले की दोन्ही व्यंजनाचे जोडाक्षर तयार होते.

माझे मत आहे की, जो पर्यंत अशी सोय करता येत नाही किंवा होत नाही तो पर्यंत संगणकावर टंकलेखन ही तारेवरील कसरत रहणार आहे. मला फक्त दोन गोष्टी सुचवाव्याशा वाटतात.
१. ऑनलाईन व ऑफलाईन लेखन यांची अदलाबदल करता आली पाहिजे. ऑफलाईन लेखन विंडोजच्या कोठल्यही अप्लिकेशन मध्ये करुन इंटर्नेट एक्प्लोरर मध्ये वाचता व सुधारता आले पाहिजे. तसेच त्याच्या उलटही करता आले पाहिजे.
२. हे करण्याकरता स्वराकरता एकच चिन्ह वापरावे व सीडॅकच्या पद्धतीने कीबोर्ड लेऑऊट बनवावा
असे काही करता येईल का पहा. केले तर समस्त देवनागरी वापर कर्त्यावर मोठे उपकार होतील.

सहज शक्य

तुम्ही म्हणाल त्या किबोर्ड लेआऊटसाठी गमभन चालवणे सहज शक्य आहे. तशी गरज असल्यास संपूर्ण कीबोर्ड लेआऊट तक्ता अथवा चित्रस्वरूपात पाठवावा.

विंडोजच्या कोणत्याही ऍप्लिकेशनमध्ये सद्ध्या तरी गमभन वापरता येत नाही. सद्ध्या ब्राऊसरमध्ये चालणारी सोय ह्या स्वरूपातच गमभन उपलब्ध आहे.

 
^ वर