प्रकल्प : गमभन टंकलेखन सुविधा


गमभन टंकलेखन सुविधा

दुवा : गमभन

१) मागणी
मराठीमध्ये उच्चारानुरूप टंकलेखन करण्याकरता जाळ्यावर आणि जाळ्याशिवाय चालणारी सुविधा.
ह्यात पुस्तिका लिहून साठवणे, साठवलेल्या पुस्तिकेत बदल करणे, सजावट करणे, लिप्या निवडणे ( मराठी भाषेव्यतिरिक्त) इ. सोई उपलब्ध असाव्यात.

२) विचारसरणी
प्रत्य्क्षात केलेली मागणी पुरवताना ती विकासकाला त्याच्या सुविधेत जोडताना अतिरिक्त श्रम कारावे लागू नयेत. किमान आयई/फायरफॉक्स वर ही सुविधा विनासायास वापरता यावी. कळसंच सुलभ असावा. दस्तऐवज उत्तमरित्या तयार करावा जेणेकरून आज्ञावली समजण्यासाठी आणि नवे बदल करण्यासाठी त्रास होऊ नये. जवास्क्रिप्ट अश्यापद्धतीने वापरावे की वापरकर्त्याला जाळ्यावर न येताही सुविधा वापरता आली पाहिजे.

३) आखणी
तंत्र : जावास्क्रिप्ट, एचटीएमएल, मुक्त जतुदितउजा पाटी
काही संकेतः
lv: लोकल व्हेरिएबल
gv: ग्लोबल व्हेरिएबल
iv: इनपुट व्हेरिएबल
gf: ग्लोबल फंक्शन
इ.
आधिक माहिती करता दुवा पहावा.

वेळ, पैसा, मनुष्यबळ यांची पुन्हा आखणी करावी लागेल असे मोठे बदल सद्ध्यातरी दिसत नाहीत.

४) बांधणी
बांधणी करून झालेली आहे. दस्तऐवजात माहिती सापडेल .

५) चाचणी
चाचण्या चालू राहतील. आपल्याला येणार्‍या अडचणी, दिसणार्‍या चुका कळवत जाव्यात.

६) श्रेणी
आयई वर योग्यप्रकारे चालत आहे.
फायरफॉक्स मध्ये जोडाक्षरे आणि अनुस्वाराचा प्रश्न नुकताच सोडवला आहे.
पुस्तिका साठवता येतात, त्यात बदल करता येतात.
लिप्या निवडता येतात.
मुक्त पाटीसह सजावटीची सोय आहे.
३-४ ओळींमध्ये सुविधा जोडता येते.

७) मोजणी
आयई,फायफॉक्स वर चालते.
मूळ जावास्क्रिप्ट पुस्तिका आकाराने मोठ्या होत्या. त्या आता आकाराने कमी केल्या आहेत.
टंकलेखन करताना कळ दाबणे आणि अक्षरसंच उमटणे यांमध्ये दखलमात्रही वेळ दवडत नाही.
जाळ्यावर आणि उतरवून घेण्याकरता सदिअव उपलब्ध आहे.

८) जोडणी
उपक्रम, विकी इ. बरोबर यशस्वीरित्या जोडले आहे. ड्रुपल वर कसे जोडावे याकरता लवकरच नवा लेख लिहिण्याचा मानस आहे.

९) परतावा
सुविधा वापरणार्‍यांकडून आजपावेतो बर्‍याच सुचना, सुचवण्या, बदल, चुका यांबद्दल माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुविधा अधिकाधिक वापरण्यायोग्य आणि दर्जेदार बनत आहे.

ही सुविधा मोफत असून याचा स्रोत मुक्त आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

कीबोर्ड लेआऊट तक्ता

विषयः समजा लेखनामध्ये प्रत्यय वापरणे बंद केले तर?
मुद्दा: चिनी लिपीत ४०हजार मुळाक्षरे असतात
उपक्रम वर वरील संदर्भ मध्ये तक्ता दिला आहे. तो पाहणे स येथे टिचकी मारा.

मी ची खालील अपेक्षा आहे.
फाँट फक्त आई एक्पोरर मध्ये च नाही तर विंडोज च्या सर्व अप्लिकेशन मध्ये वापरणे सुलभ व शक्य व्हावे.
२६ बटण वर सर्व वर्णाक्षरे यावी
एक अक्षर लिहणे स एकच बटण पुरे व्हावे.
जोडाक्षर लिहत असता चूक झाली तर संपूर्ण अक्षरे खोडणे ची आवश्यकता नसावी
मी स्वर ची चिन्हे ३२ ऐवजी १६ करावी अशी सूचना केली आहे. त्या मुळे २६ बटण वर सर्व वर्णाक्षरे येतील असे मला वाटते. ते चूक ही असू शकेल.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

गरज

गमभनमध्ये आपण दिलेला तक्ता बसवणे शक्य आहे असे दिसते. याचे प्राथमिक युजर्स किती आहेत/असतील असा आपला अंदाज? गरजेनुसार गमभनमध्ये का किबोर्ड देण्याचे कामाचा अग्रकम ठरला की झाले. त्यानुसार सवड काढून मी हे बदल समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन.

कळावे.

गमभन मध्ये तक्ता

जर एक अक्षर लिहण्यास एकच कळ दाबणे अशी व्यवस्था असेल तर् सर्वच ती सोय वापरतील. जिस्ट च्या डेमो कॉपी सी डॅक च्या साईट व विनामूल्य मिळतात. त्याचा आपण फयदा घ्यावा.
त्या करता येथे टिचकी मारा

येथे आपल्याला त्यांचा इन्स्क्रीप्ट कीबोर्ड तक्ता पाहवयास मिळेल.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

गमभन मध्ये तक्ता

जर एक अक्षर लिहण्यास एकच कळ दाबणे अशी व्यवस्था असेल तर् सर्वच ती सोय वापरतील. जिस्ट च्या डेमो कॉपी सी डॅक च्या साईट व विनामूल्य मिळतात. त्याचा आपण फायदा घ्यावा.
त्या करता येथे टिचकी मारा

येथे आपल्याला त्यांचा इन्स्क्रीप्ट कीबोर्ड तक्ता पाहवयास मिळेल.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

विंडोजच्या ऍप्लिकेशनमध्ये सद्ध्या तरी गमभन वापरता येत नाही.

भविष्यात शक्यता आहे काय? ऍन्सी व युनिकोड मध्ये आदला बदल करणे करता कन्व्हर्टर बनवणे शक्य आहे काय? या चा मागोवा घेणे शक्य आहे काय?

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

०७.०९.२१

गमभनची नवी आवृत्ती ०७.०९.२१ आता लेखात दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहे. जावा स्क्रिप्ट्सची नवी मांडणी, कंप्रेस्ड जावास्क्रीप्ट्स, मोडुलर व्यवस्थापन असे तांत्रिक बदल यात समाविष्ट आहेत.

मी गमभन वापरत नाही ...

गमभन ही सुविधा खूपच चांगली असली तरी मी ती वापरत नाही.

मी गेली काही वर्षे उपलब्ध असणार्‍या मराठी संगणक प्रणाल्यांच्या वापर करत आलो आहे. आकृती, श्रीलीपी, आयएसएम इत्यादी लोकप्रिय मराठी नॉनयुनिकोड प्रणाल्या वापरणार्‍यांना काही कीबोर्ड पूर्वीपासूनच सवयीचे झालेले आहेत. पत्रकार, प्रकाशनव्यवसायातील मंडळी व अनेक विद्यार्थीही इन्सक्रिप्ट की बोर्ड वापरतात. इंग्रजी फोनॅटिक की बोर्डचे अ सह व अ विरहित असे दोन्ही प्रकार वापरले जातात. हे सारे युनिकोड मध्ये व विंडोडच्या सर्व प्रणाल्यात वर्ड, एक्सेल सकट वापरता येण्याची सोय अलीकडे झाली आहे. मायक्रोसॉफ्टने दिलेला मराठी आयएमई व सरकारी साईटवर उपलब्ध होणार्‍या सुविधा अगदीच टाकावू नाहीत. गमभनमध्ये उपलब्घ की बोर्डसह मराठी आयएमईत अनेक पर्याय आहेत. इंटरनेटशिवाय त्याचा वापर शक्य आहे. ही सोय गमभनच्या पुरस्कर्त्यानी ध्यानात घेऊन आपल्या मित्रांना तिच्याविषयी जागृत करायला हरकत नाही. खालील दोन दुवे पहावेत.
१) http://www.ildc.gov.in/
२)http://www.bhashaindia.com/Patrons/LanguageTech/Marathi.aspx

फायदे १) र् या व र्‍या चा प्रश्न वरील आयएमईत येत नाही. फक्त अॅ उपलब्ध नसणे हा युनिकोडमधील दोष असल्याने आपण तूर्तास हतबल आहोत.
२) याहू किंवा तत्सम कोणत्याही मेसेंजरमध्ये कोणत्याही प्लगईनशिवाय मी मराठीतून संदेश पाठवू शकतो. गप्पा मारू शकतो. इंग्रजीतून मराठी टाईप करावे लागत नाही .

उपक्रमावरील मित्रांचे याकडे लश्र वेधावे इतकाच माझा हेतू आहे.

उपक्रमवरील शुद्धलेखन चिकित्सेचे प्रयत्न फारच प्रसंनीय आहेत. यात शंका नाही.

एकापेक्षा जास्त

एकापेक्षा जास्त किबोर्ड लेआऊट गमभनमध्ये पुरवता येऊ शकतात. उदाहरणादाखल लोकमत - व्यासपीठ पहा. इथे फाँटफ्रीडम चा कीबोर्ड लेआऊट गमभनच्या सहाय्याने पुरवला आहे.गमभन ओपन सोर्स असण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे की लोकांना आपल्या निवडीनुसार ह्यात बदल करता यावेत. गमभन सद्ध्या वेब बेस्ड आहे आणि ऍप्लिकेशन बेस्ड सोय देण्याकडे सद्ध्यातरी कल नाही. त्या त्या वेळी वेगवेगळ्या वेंडर्सनी पुरवलेले किबोर्ड लेआऊट उत्तम होते यात शंका नाही. परंतु आज इतके पर्याय उपलब्ध असताना सोईनुसार प्रत्येकाने कोणता निवडायचा हे ज्याने त्याने ठरवावे. प्रकाशन व्यवसायात मुद्रणसुलभ तंत्रज्ञान ही महत्त्वाची बाजू असल्याने युनिकोड अंगिकारणे कठीण आहे हे मात्र मान्य आहे.
गमभनच वापरा या मताचा मी नाही. सवय, सोय आणि सुधारणा ह्या एकमेकांशी निगडीत बाबी आहेत. तुम्ही दिलेली उदाहरणे केवळ विंडोजसाठी लागू आहेत. वेब २, किंवा वेब ३ ह्यांची ऑपरेटींग सिस्टमशी तुलना याबबत सयुक्तिक ठरेल असे मल तरी वाटत नाही. एखादी सुविधा तुमच्या संगणकात असणे आणि ती वेबवर उपलब्ध असणे ह्यात नक्कीच फरक आहे. बराह (बरहा) ऍप्लिकेशन च्या दृष्टीने उत्तमच आहे पण म्हणून उद्या चालू होणार्‍या नव्या संकेतस्थळाच्या मालकाला ते माझ्या संगणकावर असेलच याची शाश्वती देता येत नाही. त्याऐवजी युजरच्या संगणकावर कोणतीही प्रणाली का असेना तशी सोय जर संकेतस्थळच देऊ शकणार असेल तर ते सोईचे आहे.
याहू किंवा इतर मेसेंजर्सना प्लगीन देण्याचे उद्योग त्यामुळेच करावे लागले.
वेब बेस्ड सोई सोडल्यास गमभनचा वापर मर्यादित आहे हे तसेही वेगळे सांगावे लागू नये. variety is the spice of the life इतकेच मी म्हणेन.

मायक्रोसॉफ्ट किंवा अन्य कोणाला भारतीय भाषांमध्ये प्राथमिक सोई देण्याजी गरज इतके वर्ष का भासली नाही हे सहज कळू शकते. व्यवसाय आणि नफा या एकाच तत्त्वावर मायक्रोसॉफ्टने चिनी भाषेत विंडोज उपलब्ध केली. अश्या मायक्रोसॉफ्टने की जिथे बरेच भारतीय पदभार सांभाळून आहेत, विंडोज भारतीय भाषांत उपलब्ध करून देण्यास मात्र दिरंगाई दाखवली. उलटपक्षी लायनक्ससे दाखवलेली लवचिकता वाखाणण्याजोगी आहे. कुठलेच तंत्रज्ञान टाकाऊ नसते. परंतु पर्याय उपलब्ध झाले की ते कालबाह्य होते हे मात्र नक्की.

ता. क.
http://www.ildc.gov.in/marathi/mindex.aspx
इथे असलेला मजकूर मला वाचता आला नाही. असो.

संगणकात असणे आणि ती वेबवर उपलब्ध असणे ह्यात नक्कीच फरक आहे.

संगणकात असणे आणि ती वेबवर उपलब्ध असणे ह्यात नक्कीच फरक आहे.

मी ला पटले. परंतु, कन्व्हर्टर बनवणे शक्य आहे. प्रिया इंफर्मेटिक्स ने ऍन्सी करता अशी सोय 'परिवर्तन' या प्रणाली द्वारे बनवली आहे. तशी प्रणाली वेब फाँट ते ऍन्सी व उलट बनवता आली तर पहावे.

व्यवसाय आणि नफा या एकाच तत्त्वावर
आपले म्हणणे १००% बरोबर आहे. व्यावसाईक पैसे प्रथम पहणार. ते करता भाषा वापरणारे वाढले पाहिजेत.

कोणतीही प्रणाली का असेना तशी सोय जर संकेतस्थळच देऊ शकणार असेल तर ते सोईचे आहे.
जी प्रणाली अचुक व वेगवान असेल ती टिकुन राहील

इथे असलेला मजकूर मला वाचता आला नाही.
ते करता 'युवराज' हा फाँट काँप्युटर वर असणे आवश्यक आहे.

पहा काय करता येईल.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

सुचवण्या

गमभन वापरताना काहि सुचवण्या द्याव्या असे वाटले. त्या खालील प्रमाणे

गमभनचा उजवी कडचा जो मेनु आहे त्यात थोडा फरक हवा. जसे की,

  1. लोड फाइल आणि ती शोधण्यासाठी, असे दोन पर्याय आहेत. मुळातच Load a File असे देउन त्यावर टिचकी मारताच फाइल शोधली जाउ शकते. तर हि दोन ऐवजी एकच पर्याय करता येइल काय?
  2. Clear Editor - हे सर्वात वर अथवा सेव्ह पासुन थोडे लांब करता येइल काय? सध्याच्या मांडणीमुळे लिखाण सेव्ह करताना ते नाहिसे करण्याचा धोका जास्त आहे.

उजवीकडे जी मांडणी आहे, ती खाली अथवा वर करता येइल काय? जेणे करुन लिहिताना जास्त रुंदी मिळेल आणि हि मांडणी वर केल्यास वापरकर्त्याला ते जास्त सोईचे पडेल.

मराठीत लिहा. वापरा.

उत्तर

गमभनचा उजवी कडचा जो मेनु आहे त्यात थोडा फरक हवा. जसे की,

लोड फाइल आणि ती शोधण्यासाठी, असे दोन पर्याय आहेत. मुळातच Load a File असे देउन त्यावर टिचकी मारताच फाइल शोधली जाउ शकते. तर हि दोन ऐवजी एकच पर्याय करता येइल काय?

फाईल शोधल्यावर ती लगेच लो़ड करण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. फाईल शोधल्यावर ती प्रथम ब्राऊसर लोड करतो आणि मग जावास्क्रीप्ट वापरून ती उपलब्ध करता येते. फाईलचा आकार ठरलेला नसल्याने ब्राऊसरला याकामी लागणारा वेळ सांगता येत नाही. त्याआधीच जर फाईल लोड करायला गेल्यास ते शक्य होत नाही. त्यामुळे सध्या स्वतःहून लोड करणे ही पळवाट आहे...

Clear Editor - हे सर्वात वर अथवा सेव्ह पासुन थोडे लांब करता येइल काय? सध्याच्या मांडणीमुळे लिखाण सेव्ह करताना ते नाहिसे करण्याचा धोका जास्त आहे.

सुचना चांगली आहे, पुढील आवृत्तीत बदल करतो.
उजवीकडे जी मांडणी आहे, ती खाली अथवा वर करता येइल काय? जेणे करुन लिहिताना जास्त रुंदी मिळेल आणि हि मांडणी वर केल्यास वापरकर्त्याला ते जास्त सोईचे पडेल.

ही मांडणी वर केल्यास उंची कमी होते त्यामुळे पान सारखे वर खाली करून वाचावे लागते. मेन्यू हाईड करायचा विचार करतो, जेणे करून आवश्यक असेल तेव्हाच मेन्यू दिसावा आणि इतर वेळेस संपूर्ण पान वापरता यावे.

वर्डप्रेस प्लगीन : गमभन

श्री. शंतनु ओक, रक्षित सेठ यांच्या पाठपुराव्याने; Automattic Inc. यांनी विकसित केलेले; गमभन वापरणारे वर्डप्रेसवरचे प्लगीन आता उपलब्ध झाले आहे.
अधिक माहितीकरता पहा:
वर्डप्रेस इंडिक प्लगीन - गमभन

गमभन आणि भारतीय भाषांच्या मुक्त प्रचाराला चालना देणार्‍या सर्वांचे आभार.

वर्डप्रेस प्लगीन : गमभन

वाह.. जमले. एक मोठा पल्ला गाठला आहे गमभन ने.

तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?

अंतर

'गमभन' आणि 'बरह' (बरहा नव्हे) ह्या दोहोंत काय अंतर आहे?

हैयो हैयैयो!

नमस्कार

ॐकार हार्दीक आभार. तु करत असलेले काम खरेच महत्वाचे आहे. तुझ्या श्रमांना तोड नाही.
एक सुचना आहे. प्रत्येक अक्षरांतर अ टंकीत करणे वेळखाउ आहे. मला माहित आहे की ते व्याकरणदृष्ट्या चुकिचे आहे पण सोयीचे आहे.usabilityचा विचार व्हावा.

पुन्हा हार्दीक अभिनंदन आणि आभार.

अनिकेत

गमभन ०८.०६.१२ नवी आवृत्ती

गमभनची नवी आवृत्ती ०८.०६.१२ आता उपलब्ध आहे. विजिविग एडीटरच्या नव्या आवृत्तीची जोडणी केली आहे. ह्यात आता मुद्रणपूर्व अवलोकन (प्रींट प्रिव्ह्यू) आणि मुद्रणाकरता (प्रींट) कळा पुरवल्या आहेत. याचसोबत तक्ते, चित्रे, दुवे (टेबल्स, इमेजेस, लिन्क्स) मध्ये जागच्या जागी बदल करता येणे सोपे झाले आहे. एडिटर पूर्ण पानभर करायची सोयही यात आहे. नवे बदल लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहेत.

जमले नाही

नवे गमभन उतरवून घेतले. पण फक्त इंग्रजी शिवाय कोणत्याच भाषेत लिहिता आले नाही. गमभनचे चित्र सुद्धा दिसत नाही.

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा उतरवून घ्या. आयई करता एक चूक झाली होती ती आता निस्तरली आहे...

धन्यवाद !!!

आपण दिलेल्या दुव्याच्या दिवशी आम्ही गमभन उतरुन घेतले होते. पण इंग्रजीच टाइप होत होते. बरं आम्ही पडतो जरा अडाणी म्हणुन कोणाला विचारताही येत नव्हते. पण आता आपण केलेल्या बदलामुळे आता टाइप करणे जमत आहे. धन्यवाद !!!

आपल्या गमभन च्या प्रकल्पाला शुभेच्छा आहेतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद!

ओंकार, नवीन अद्ययावत ' गमभन टंकलेखन सुविधा' उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार!

 
^ वर