उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
प्रतिभाताईंचे अभिनंदन
योगेश
June 14, 2007 - 2:55 pm
आपल्या (अर्थातच) आदरणीय वगैरे व सर्वांच्या लाडक्या सोनियाजींनी प्रतिभा पाटील यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले आहे. भारताच्या सर्वोच्च नेतेपदी एका महिलेने विराजमान व्हावे आणि ती संधी एका मराठी माणसाला मिळावी ही आनंदाचीच गोष्ट आहे.
पण त्यांना "राष्ट्रपती" म्हणणे कसेसेच वाटते.
आणि राष्ट्रपत्नी हा तर भयंकर शब्द आहे.
तेव्हा प्रतिभाताई या पदावर विराजमान झाल्यावर त्यांना आपण राष्ट्राध्यक्ष ह्या Neutral Gender नामाने संबोधूयात :)
थॅंक्यू सोनियाजी. अभिनंदन प्रतिभाताई
दुवे:
Comments
सोनियाजींचे कौतुक
वाटल्याशिवाय राहत नाही. सुशीलकुमारांऐवजी प्रतिभाताईंचे नाव सुचवल्यामुळे मायावतींच्या दलित वोट ब्यांकेला धक्का लागलेला नाही त्यामुळे त्यांना काही ऑब्जेक्षण असेल असे वाटत नाही.
पण इतर उपक्रमींना एक मराठी महिला सर्वोच्चस्थानी जाणार आहे याचा आनंद व्यक्त करावा वाटत नाही का? की आनंद झालाच नाही?
पहिला?
पोलिटिकली ब्रिलियण्ट मूव्ह !
सहमत! प्रतिभाताईंचे अभिनंदन. सोनिया गांधींची हुषार चाल हे खरेच. पण त्यापलिकडे पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष व्हायला भारतासारख्या देशात काही मोठी आडकाठी किंवा प्रश्न उपस्थित होत नाही हे पाहून समाधान वाटले.
सोनियाजींनी आयुष्यात घेतलेला दुसरा चांगला निर्णय आहे हा.
पहिला कुठचा?
अवांतरः अजूनही काँग्रेसच्या अशा सर्व खेळी फक्त सोनिया गांधी खेळू शकतात याचे आश्चर्य वाटते. पंतप्रधान मनमोहन सिंगांनी याबाबतीत लक्ष घालू नये याचेही आश्चर्य वाटते..
पहिला निर्णय कुणाचा?
पहिला निर्णय स्वतः पंतप्रधान न होता मनमोहन सिंग ह्यांना पुढे करण्याचा.
आज प्रतिभा पाटील यांना नामांकीत केल्याचा आनंद नक्कीच आहे पण आशा करतो की त्या पक्षातीत राहतील आणि मुख्य म्हणजे व्यक्तीनिष्ठ न राहता राष्ट्रनिष्ठ राहतील...कारण हे पहा:
त्याग?
आपल्या निपक्षपाती भूमिकेबद्दल प्रसिद्ध वृत्तपत्रांनी सोनियाजींच्या त्यागाची तुलना म. गांधींशी केली होते, हे आठवते.
त्याग वाटला नाही, तेव्हाही आणि आत्ताही. शिवाय ही तुलना मला वाटते मराठी वृत्तपत्रांपैकी लोकसत्ताच्या कुमार केतकर यांनी केली होती असे आठवते. कुमार केतकरांचे सोनिया प्रेम हे तसे बरेच प्रसिद्ध आहे आणि ते स्वतः निपक्षपाती असल्याचे काही पुरावे नाहीत..
परंतु जशी "हा निर्णय सी आय ए चा" ही शंका घेण्यास जागा आहे, तशीच "हा निर्णय सोनियाजींचा" अशीही.
सी आय ए म्हणजे कसे काय? हे मी पहिल्यानेच ऐकते आहे. सोनियाजींचाच निर्णय आहे, पण तो त्यागातून आला आहे असे सबळ पुरावे दिसले नाहीत.
अब्दुल कलाम
अब्दुल कलाम हे नात्याने महात्मा गांधींचे जावई आहेत. पण मुदत संपल्यावर काय करणार?
???!!!!
प्रकाश घाटपांडे
पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
प्रतिभाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरो ही शुभेच्छा! राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या बाबतीत गेल्या काही वर्षात भारत नशीबवान ठरला आहे. भारताचा भविष्यकाळही असाच उज्ज्वल राहो.
आपला
(शुभेच्छुक) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
अभिनंदन!/निरोप
प्रतिभाताईंचे अभिनंदन! समाजकार्य आणि राजकारण यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी असे वाटते. (प्रतिभाताईंची आजवरची कारकीर्द) येत्या निवडणूकीनंतर त्यांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे असे दिसते.
नव्या राष्ट्राध्यक्षांच्या आगमनाबरोबरच अब्दुल कलामांना निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्याला राष्ट्राध्यक्ष म्हणून लाभले हे आपले भाग्यच.
मराठीच?
प्रतिभा पाटील यांचे यजमान (देविसंग) काही पिढ्यांपूर्वी (?) राजस्थानात स्थायिक झालेले मूळचे मराठी आहेत असे समजते.
पण?
का बरं? म्हणजे नवरा मराठी/ अमराठी असल्याने काय फरक पडला ते कळलं नाही. :( (आणि फरक पडत असेल तर सोनियाचा नवरा विदेशी [की स्वदेशी?] आहे[होता], मग त्यांचे पारडे जड असावे.)
मराठी कुणाला म्हणावे
सर्वप्रथम प्रतिभाताईंचे हार्दिक अभिनंदन मराठी म्हणून नव्हे तर आता पर्यंतच्या इतिहासात प्रथमच एक महिला राष्ट्रप्रमुखपदी विराजमान होणार म्हणून !
आपण मराठी माणसे तशी खुपच भावनाप्रधान. आपल्या समाजातील कुणाला जर सन्मान प्राप्त होत असेल तर अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. परंतु "मराठी माणूस" कुणाला म्हणावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. सार्वजनिक क्षेत्रात अनेक मराठी व्यक्ति त्यांच्या कर्तृत्वाने सन्मान मिळवतात, परंतु मराठी म्हणून त्यांचे कौतुक करणे कितपत संयुक्तिक आहे.
उदा. रजनीकांत दक्षिणेचा सूपरस्टार आहे आणि तो मराठी आहे म्हणून त्याचे कौतुक करावे का? मागे एका मुलाखती मध्ये त्याने आता आपल्याला मराठी बोलणे जमत नसल्याचे मान्य केले. शेजारील राज्यांसोबत पाणी तंट्यामध्ये त्याने महाराष्ट्राची न्याय्य बाजूही घेतल्याचे ऎकीवात नाही.
त्याचं जाऊ द्या हो. बंगलोर मध्ये जेंव्हा भरदिवसा बेळगावच्या मराठी महापौरांना कानडी गुंडांनी काळे फासले तेंव्हा किती महनीय मराठी माणसांनी त्याचा निषेध केला.
मला वाटतं मराठी म्हणून कौतुक करताना संबंधित व्यक्तिने तिच्या पदाचा, सत्तेचा किंवा कौशल्याचा महाराष्ट्राच्या, मराठीच्या आणि अन्य मराठी माणसांच्या विकासात किती योगदान दिले याचा विचार व्हावा.
अनेक अशा अमराठी व्यक्ति आहेत ज्यांचा महाराष्ट्राच्या व मराठीच्या विकासात मोलाचा वाटा आहे.
- जयेश्
मराठी झेंडा
मराठी महिला राष्ट्राध्यक्ष झाल्यास मला आनंद होईल. काँग्रेसच्या काही राष्ट्रपतींचा (उदा. झैलसिंग) केवळ हाय कमांडची हांजी हांजी करणे हाच एकमेव बाणा असल्याने पुढे जाऊन काय होईल याची काळजी वाटते.
सोनिया गांधी यांनी प्रतिभा पाटील यांची घोषणा काहीशी नाईलाजाने केलेली दिसते आहे. तरीही चाणाक्ष चाल आहे हे नक्कीच. कोठूनही फेकले तरी पायावर पडायची कला मांजरांनी राजकारण्यांकडून शिकली आहे असे म्हणतात.
(मराठी) एकलव्य
मला वाटतं मराठी म्हणून कौतुक करताना संबंधित व्यक्तिने तिच्या पदाचा, सत्तेचा किंवा कौशल्याचा महाराष्ट्राच्या, मराठीच्या आणि अन्य मराठी माणसांच्या विकासात किती योगदान दिले याचा विचार व्हावा.
जयेश यांच्या या विचाराचे मी समर्थन करतो.
वहाणा...
आणिबाणीच्या काळातील वाचलेला किस्सा...
पोस्टल बिलाच्या वेळेस झैलसिंग नक्कीच बदलले होते पण ते "सौ चुहे मारकर.." पद्धतीने जेंव्हा त्यांची खूपच थट्टा काँग्रेसजन करायला लागले तेंव्हा...
फक्रुद्दीन अली अहमद (बाकी कसे होते माहीत नाही पण) यांना जर आणिबाणी जाहीर करण्याच्या सही मुळे म्हणत असाल तर त्या नंतर त्यांचे लगेचच ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आणि नंतरच्या काळात बी.डी. जत्ती हे हंगामी राष्ट्रपती म्हणून जनता सरकार येई पर्यंत राहीले. फक्रुद्दीन अली अहमद यांच्या निधनाबद्दल पण उलटसुलट वाचले होते, पण त्यातील सत्यासत्यता अजिबातच माहीत नसल्यामु़ळे ते येथे लिहीत नाही.
यो यो
लय भारी....
राष्ट्राध्यक्ष प्रतिभा पाटील ... वाह एकदम सॉलिड.
प्रतिभाताईंचे अभिनंदन ... (पण ...)
प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्राध्यक्षा पदाची अधिकृत उमेदवारी मिळाली हे चांगले झाले.
पण माझ्या मताप्रमाणे खुद्द श्रीमती सोनिया गांधी स्वतःच का ...?
१. त्या महिला आहेत.
२. काँग्रेस या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या एकमेवाद्वितीय अखिल भारतीय पक्षात त्यांनी अनेक वर्षे मोलाचे काम केले आहे.
३. त्यांना भारताच्या मंत्रीमंडळात कोणतेही स्थान नको आहे.
४. त्यांना भाजपा- राष्ट्रवादी सकट सार्या पक्षांचा एकमुखी पाठिंबा मिळाला असता.
५. या देशाची परराष्ट्र-सहिष्णुता जगासमोर आणखी ठळक झाली असती.
६. राष्ट्रपती केवळ रबर स्टँप असतो असे म्हणणे चूक ठरले असते.
७. भारतातील सामन्य जनतेला राष्ट्रपिता महात्मा गांधींची नातसून ;) राष्ट्राध्यक्षा झाली याचे समाधान मिळाले असते.
माझा अपेक्षाभंग झाला. असो.
हम्म्
कसे काय बुवा?
प्रकाश घाटपांडे
तुमाला म्हायीत न्हाई?
आवो, आसं काय करतायसा? ती इंदरामाय - जवारलाल नेरुंची मुल्गी आन गांधी बाबांची सून व्हती न्हवं (पाप बिचारी, कशी रानीवानी व्हती... ग्येली बिचारी ...) - तिचा त्यो राजीव गांधी प्वोरगा (पाप बिचारा, कसा सोन्याचा टुकडा व्हता वं !-लै वंगाळ झालं .. ).. तेची बायको हाय न्हवं का ही! म्हून म्हनतुया - अवो, ती गांधी बाबाची नातसून हाय!
सम्दं कळ्ळं काय? - अंगाश्शी!
संमिश्र भावना
खरं म्हणजे आत्ताचे राष्ट्रपती एवढे कर्तुत्ववान आहेत की ते सोडून जाणार याचेच दु:ख होतेय. शिवाय त्यांच्या नतर त्या पदासाठी जी नावे होती त्यामध्ये त्यांच्या तोडीचे नाव नव्हतेच.
राजकीय वलय नसलेली व्यक्ती राष्ट्रपती असावी असे वाटत होते, पण आता राष्ट्रपती ही काँग्रेस धार्जिणाच (धार्जिणीच ) आहे, आणि स्वत: सोनियाजींनीच त्यांची निवड केली म्हटल्यावर प्रश्नच मिटला !
परंतु, अर्थात मराठी महिला राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे, याचा अभिमान आहेच.
कुठलेही अधिकाराचे सरकारी पद न भूषविता सार्या देशावर सत्ता गाजवणार्या सोनियाजींना मानाचा मुजरा !
सोनिया गांधींचा मार्ग प्रशस्त...
"तुम्ही देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही" हे सांगण्याची हिंमत पुढच्या राष्ट्राध्यक्षांकडे असेल का?
अग्रलेख
म.टा.च्या अग्रलेखातील काही भागः
आणि हा सामन्याच्या अग्रलेखाचा दुवा: बिनदाताचा वाघ्या
भैरोसिंग शेखावतही...
... सोनियांना "तुम्ही देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाही" असे सांगणार नाहीत असे वाटते.
आपल्याला काय फरक पडतो?
राष्ट्रपती कुणीही का असेना, आपल्या दैनंदिन आयुष्यात काय फरक पडणार आहे? खेडोपाडी बारा बारा, सोळा सोळा तास सुरू असलेलं लोडशेडिंग त्यामुळे थोडंच कमी होणार आहे? सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार थांबणार आहे? कलामसाहेब होते म्हणून तरी आपल्याला काय असा फरक पडला?
तात्या.
सहमत ! पण ...
आम्हालाही असेच म्हणायचे होते !
पंतप्रधान कसे होता येईल ! यासाठी चे हे डावपेच आहेत,म्हणतात ? अर्थात पंतप्रधान कोणीही झाले तर फरक काय पडणार ? या विचाराशी आम्ही तेव्हाही सहमत असू. ! (शरद पवार पंतप्रधान झाले तर,उपक्रमीच्या वतीने मला बूके(फूलांचा गुच्छ्) घेऊन बारामतीला पाठवावे ही नम्र विनंती ;)
सरसेनापती तात्यासाहेब ठाकरे
राष्ट्रपतीपदी कोण बसेल ते बसो. देशाच्या जीवनावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही...
सामना संपादकीय (२५ जून २००७)
तात्यासाहेब की बाळासाहेब?
च्यामारी बाळासाहेबांना हल्ली तात्यासाहेब म्हणायला लागले की काय? ;)
आपला,
बाळासाहेब अभ्यंकर!
हा हा हा
(शरद पवार पंतप्रधान झाले तर,उपक्रमीच्या वतीने मला बूके(फूलांचा गुच्छ्) घेऊन बारामतीला पाठवावे ही नम्र विनंती ;)
शरद पवार पंतप्रधान झाले तर - हा आजचा खास विनोद!
-गुंडोपंत
प्रतिभाताई आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी?
दैनिक सकाळ दि २७ जून २००७ ची खालील बातमी वाचा
"प्रजापिता'चे दिवंगत संस्थापक माझ्याशी "बोलले' - प्रतिभा पाटील
माउंट अबू, ता. २६ - ""प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे संस्थापक (कै.) लेखराज माझ्याशी बोलले आणि "मोठी जबाबदारी' पेलण्यास तयार व्हा, असा आशीर्वाद त्यांनी मला दिला,'' असे विधान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांनी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा नव्याने वाद होण्याची शक्यता आहे. ....
या मुलाखतीत श्रीमती पाटील म्हणाल्या, ""प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या प्रमुख दादीजी हृदयमोहिनीजी यांना भेटण्यासाठी मी माऊंट अबू येथे गेले होते. त्या वेळी "ब्रह्मकुमारी'चे संस्थापक (कै.) लेखराज त्यांच्या अंगात आले. त्याच वेळी ते माझ्याशीही बोलले. ते मला म्हणाले, की "मोठी जबाबदारी' पेलण्यासाठी सज्ज हो! यामुळे मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते.''
लेखराज यांचे १९६९ मध्ये निधन झाले आहे.
आता डावे काय करणार?
प्रतिभा पाटील यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही बुरखा पद्धतीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनी पाटील अडचणीत आल्या होत्या. सत्यसाईबाबांचे भक्त असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या उमेदवारीला डाव्या पक्षांनी विरोध केला होता. त्याचमुळे कॉंग्रेसला प्रतिभा पाटील यांची निवड करावी लागली होती. त्यामुळे पाटील यांच्या या विधानावर डावे या भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.
प्रकाश घाटपांडे
पॉलीटीक्स मेक्स...
...या वाक्प्रचाराचा अर्थ समजला...
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची "मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व उद्धव ठाकरे. (बातमी ए-सकाळ)