भारतीय भाषांतील डिक्शनरी

इंग्रजीतून ५ भारतीय भाषांमध्ये एखादा शब्द (किंवा पूर्ण परिच्छेद) भाषांतरित करता येईल असा उपक्रम इथे पाहता येईल.

http://saraswaticlasses.net/yubnub/language.html

हिंदी, तेलुगू, तमीळ, गुजराती व बंगाली भाषांतराचे एस.एम.एस. देखील मिळवता येतील. त्यासाठी 9266592665 नंबरवर खाली दिलेली कमांड टाईप करून पाठवावी लागेल.

@yubnub hind kanchipuram guest house = कांचीपुरम गेस्ट हाउस

@yubnub telug kanchipuram guest house = కాంచీపురం గెస్ట్ హౌస్

@yubnub beng kanchipuram guest house = kanchipuram অতিথিশালা

वर दिलेल्या कमांडमध्ये तमीळ साठी tami आणि गुजरातीसाठी guja असा बदल करून घ्यावा लागेल. यासाठी गुगलचा ए.पी.आय. वापरला आहे. त्यात मराठी व कन्नडसारख्या इतर भारतीय भाषा (दुर्दैवाने) नाहीत.

डिक्शनरीसाठी यापेक्षा सरस सेवा उपलब्ध आहेत याची मला कल्पना आहे. पण वीकांताला काहीच करण्यासारखे नसल्यामुळे वेळ सत्कारणी लागावा म्हणून सहज केलेला हा उपक्रम!

Comments

मराठी

यात मराठी का नाही?

मराठी

यात मराठीला स्थान नाही हे दूर्दैव.

सहकार्याचा हात

कन्नड भाषेचा ए.पी.आय. देखील गुगलमध्ये उपलब्ध आहे. नजरचुकीने ही भाषा राहून गेली होती. ती देखील आता यात सामील झाल्याने वर दिलेल्या दुव्यावर ६ भाषांतील डिक्शनरी उपलब्ध आहे.
गुगल ट्रानस्लेट एकूण ६४ भाषात उपलब्ध आहे.
http://translate.google.com

पण त्यात मराठी नाही याचे बरेच अर्थ निघतात. भाषांतर करण्यासाठी तज्ञ सहकार्य करत नाहीत हे कारण खरे असेल तर उपक्रमी काही मदत करू शकतात. खाली दिलेल्या पानावर जाऊन जास्तीत जास्त भाषांतरे गुगलच्या साईटवर अपलोड करणे हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणता येईल.

http://translate.google.com/toolkit/list?hl=en#translations/active

भाषेच्या बाबतीत संघर्षापेक्षा सहकार्याचा हात जास्त महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

भाषांतर आणि लिप्यंतर

"thank you" टाईप करून तेलगु भाषांतर केले. त्यानंतर तेलगु लिपीचे देवनागरीत लिप्यंतर घडवून काही शब्द शिकता आले.

दोन - रेंडु
तीन - मूडु
चार - नालुगु
पाच - अयिदु
आभार - धन्यवादालु
लिप्यंतरासाठी फायरफॉक्सचे गिरगिट हे अवजार वापरले.
http://tinyurl.com/girgit

लिप्यंतराविषयी अधिक चर्चा उपक्रमावरच येथे पाहता येईल.
http://mr.upakram.org/node/367#comment-7536

उपक्रमावरील याच विषयावरील चर्चा "गुगल आणि मराठी भाषांतर" येथे वाचता येईल.
http://mr.upakram.org/node/1618

मराठीमित्र

मला मराठी मित्र आवडले. मला वाटते अशी उत्पादने तयार केली तर मराठीचा प्रसार, प्रचार आणि वापर वाढेल.

 
^ वर