गुगल आणि मराठी भाषांतर

गुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही!
देवनागरीच असली तरी नाही!

पण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे.
http://www.google.com/intl/hi/help/faq_translation.html#newlangs
या दुव्यावर पाहिले असता,
आप अनुवाद के लिए अतिरिक्त भाषाओं को समर्थन कब देंगे?
असा प्रश्न दिसला. त्याचे उत्तर खालील प्रमाणे;

हम दूसरी भाषाओं को समर्थन देने के लिए कार्य कर रहे हैं और जैसे ही स्वचालित अनुवाद हमारे मानकों पर खरा उतरेगा, हम उन्हें प्रस्तुत कर देंगे. यह कहना कठिन है कि इसमें कितना समय लगेगा, क्योंकि समस्या जटिल है और हर भाषा खुद अपनी खास चुनौतियाँ प्रस्तुत करती है.

नए सिस्टम विकसित करने के लिए, हमें भारी मात्रा में द्विभाषी पाठों की आवश्यकता है. अगर आपके पास भारी मात्रा में ऐसे द्विभाषी पाठ हैं जिसका आप योगदान करना चाहते हैं, तो कृपया हमें बताएँ.
मग, आता आपण मराठी माणसांनीच यांना मदत केली पहिजे असे वाटले.
त्या मदती साठी आपले नाव नोंदवा
http://www.google.com/intl/hi/help/faq_translation.html#newlangs
या दुव्यावर जाऊन
Suggest a feature or give feedback
हा पर्याय निवडा
Suggestions and Feedback
मध्ये जाऊन मराठी भाषेसाठी विचारणा करा आणि भाषांतर तसेच मराठीच्या इतर मदतीसाठी आपली इच्छा आहे असे लिहा.

* संतापः
पुणे विद्यापीठाचा (व इतरही )मराठी विभाग झक मारत बसला आहे का? अशी शंका मनात आल्याशिवाय राहिली नाही!

Comments

खरी बात

अहो गुंडोपंत, गुगलला खरी इच्छा असेल् तर् ४-५ मराठी माणसांना नोकर्‍या देणं सहज शक्य आहे. ते हा खटाटोप् करत् नाहीत कारण् अजून् मराठीसाठी काम करून् नफा मिळेल याची त्याना खात्री नाही.

आपण काही

आपणच काही केले तर काही घडेल ना?
नफ्याचे नंतर पाहता येईल, पण अनेक मराठी ब्लॉग्स वर आज गुगलच्या ऍड्स् दिसतातच ना?

आज एक गुगल सारखी संस्था इतर भाषात भाषांतराची सुवीधा देते आहे. हे सगळे फुकट आहे. हीच सुवीधा मराठीतही देवू शकेल अशी आशा आहे.
मग आपण कमीत कमी आपण मराठीसाठी काम करायला तयार आहोत अशी इच्छा तर दाखवू या...?

मागितले तर मिळेल ना...?
दे रे हरी खाटल्या वरी करत बसलो तर उपाशीच मरू...

आपला
गुंडोपंत

सहमत आहे !

आपण कमीत कमी आपण मराठीसाठी काम करायला तयार आहोत अशी इच्छा तर दाखवू या...?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत नाही

आपणच काही केले तर काही घडेल ना?

हो याच्याशी मी सहमत् आहे. पण् ते करण्याबाबत् तुम्ही जे सुचवले आहे त्याच्याशी नाही.

खाली शंतनू यांचा "जी.पी.एल. लायसन्स" हा प्रतिसाद पहा. गुगलला फु़कट् मदत् करण्याऐवजी मराठीत् मुक्तस्रोतप्रणालीसाठी जे जे काही प्रयत्न् चालू आहे त्यांना मदत (वेळेची, प्रचाराची, पैश्याची - जी जमेल ती) करावी अशा मताचा मी आहे. गुगलनेही अनेक् प्रकल्प् मुक्तस्रोत म्हणून् घोषीत् केले आहे त्यानाही मदत् करण्यास हरकत् नाही.

फीडब्याक दिला आहे

गुंड्याभाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे फीडब्याक दिला आहे. बघू काय होते ते. मराठी विभागच कशाला आम्ही सगळेच झोपलो आहोत :)

+१

+१

धन्यवाद!

धन्यवाद!
आशा आहे, झोपेतून जागे होवू या!

आपला
गुंडोपंत

पुणे विद्यापीठाचा काय संबंध?

यात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.

आपल्या मराठी विकीपीडियावर मराठी लेख किती आहेत आणि असलेले कशा दर्जाचे आहेत हे इथल्या जवळजवळ सर्वच लोकांना माहित आहे. इंग्रजी विकीवरचे लेख (माझ्यामते) सर्वसामान्य लोक लिहतात.(केंब्रिज/आक्सफर्ड मधले झंटलमन आणि मडमा लिहीतही असतील. नाही असे नाही!) तर आता या चर्चाप्रस्तावाशी संबंधित आहे की माहित नाही पण माझा असा प्रश्न आहे की मराठी माणसं कुठे गरदडली आहेत/झक मारत बसली आहेत?

-सौरभ.

==================

वा! उत्तम विनंती!

यात पुणे विद्यापीठाचा झक मारण्याचा कसा संबंध लागतो हे गुंडोपंत यांनी माझ्यासाठी स्पष्ट करुन सांगावे अशी विनंती आहे.

सांगतो ना, अगदी सु-स्पष्ट करुन सांगतो.
अहो, झक मारण्याचाच नाही, अजून जे काय मारता येईल ते मारण्याची वेळ आली आहे या मराठीच्या विभागांची.

का बरं?
कारण मराठी भाषेची प्रगती होईल असे पाहणे, हे विद्यापीठांचे काम आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी भाषेसाठी करून घ्यायचा आहे. त्यासाठी गुगल ला त्यांचे नाव चटकन सूचायला हवे आहे. - गुगललाच कशाला, मलाही मराठीची कोणतीही मदत लागली तर विद्यापीठाच्या संकेत स्थळावरच जावेसे वाटले पाहिजे.

कारण नवीन तंत्रज्ञान व त्याचा उपयोग करून मराठी भाषेला काही मदत करणं हे यांचे काम आहे. आपण जे काही कर सरकार ला देतो त्यातला पैसा वापरून कुलगुरु त्यांच्या वातानुकुल हपीसात टैम्स आफ इंड्या वाचत बसतात. जमेल तसे कुणाला वर आणायचे आणि कुणाला खाली दाबायचे याचे राजकारण करतात.

मग त्यांनी काय करायचे आहे?

कुलगुरूंनी खरी दिशा द्यायची आहे विद्यापीठाला.
कुलगुरूंनी विद्यापीठाचे कार्य दूरदर्शीपणे हाताळायचे आहे.
कुलगुरूंनी आपल्या विद्यापीठाचा रिसर्च जागतिक कसा होईल, हे पाहायचे आहे.
* आपले विद्यापीठ जागतिक स्पर्धेत कुठे आहे आजमावायचे आहे. त्या स्पर्धेत आपण सर्वात पुढे असुन आपला ठसा उमटेल हे पाहायचे आहे.
*सर्व कुलगुरूंनी इ.स. २०२० मध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठे कमीत कमी २०% जागतिक विद्यार्थी पैसे भरून शिकायला येतील अशी वेळ आणायची आहे.
त्यासाठी धोरणीपणे निर्णय घ्यायचे आहेत. जगाला बदलत्या परिस्थितीत पुढे कोणते अभ्यासक्रम योग्य ठरतील हे पाहून ते आखुन घ्यायचे आहेत. ते आधुनिक कसे राहतील हे पाहायचे आहे.
ते अभ्यासक्रम सर्वोत्कृष्ठ दर्जानेच चालतील/चालवले जातील याची ऑडिट यंत्रणा उभारायची आहे.

इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी संधान साधायचे आहे. त्यांचे विद्यार्थी आपल्या कडे मराठी शिकायला येतील हे पाहायचे आहे. त्यासाठी मराठीतले काम व त्याचा उपयोग याचा जागतिक प्रचार करायचा आहे. किती चीनी, जपानी, कोरियन, मलेशियन विद्यापीठांशी आपल्या विद्यापीठांचे उत्तम संबंध आहेत?

आज एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी किमान ५ लाख रुपये फी देतो. विद्यापीठात दर वर्षी ६०,००० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आले तर किती पैसा वाहील?

* त्या पैशातून अजून सुवीधा आणि मराठी समाजाला/भाषेला पुढे काय उपयुक्त राहील यांची साद घायची आहे. ते धोरण कसे पुर्ण करायचे हे पाहायचे आहे. शासनाला त्यांच्या उच्च शिक्षण धोरणात आपल्या बाजूला वळवायचे आहे.

(पण कसे करणार? साधे महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ कसे असावे, अजून ५ वर्षांनी कसे असले पाहिजे, याचा एक प्रोजेक्टही विद्यापीठाकडे नाही. ते तर लांबचे झाले, पुणे विद्यापीठाची साईट पाहा आणि इतर कोणत्याही आंतरराष्त्रीय विद्यापीठाची साईत पाहा - लगेच जाणवेल झक का व कशी मारते आहे ते! - इतर विद्यापीठांचे नावही नको - ते अजून झोपेतच आहेत!)

यातले काही दूरवर तरी घडतांना दिसते आहे का??

उरले मराठी चे विभाग आणि त्यांचे प्रमुख- यांनी तर जीवच द्यावा चमचाभर पाण्यात.
कोणत्या विद्यापीठाच्या मराठी विभागाने आजवर मराठी भाषेच्या संगणकीकरणात आपला हातभार लावला आहे?
* किती डॉक्टरेट चे रिसर्च थेसिस मराठी भाषा आणि संगणकीकरण यावर आले आहेत? युनिकोड व मराठी भाषा यावर कधी काम केले पाहिजे, हा साधा विचारही आला नाही.

किती प्राध्यापकांना मराठी संकेतस्थळे माहिती आहेत हा फार मोठा प्रश्न आहे. - ज्यांना आजचे मराठी भाषेचे स्वरूपच काही माहिती नाही ते उद्याचे भविष्याच्या काय योजना बनवणार?

* गेल्या ५ वर्षात मराठी भाषेच्या संदर्भात किती रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत?
* मराठी भाषा व इतर भाषांचे आक्रमण कसे थोपवता येईल आणि सहकार्य कसे वाढीस लागेल यावर काय काम झाले आहे?
* मराठी इतर भाषिकांना सुलभतेने शिकता यावी यासाठी किती विभांगांनी काय प्रयत्न केले आहेत? हे त्यांचे काम नाही का?
* मराठीच्या चांगल्या प्रसिद्धीसाठी मराठी विभागांनी काय धोरण राबवले आहे?
* इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना भाषिक गोडी लावण्यासाठी काय करता येईल ही पाहिले का कधी? - आजवर जे काही मराठी भाषेच्या संगणक प्रगति विषयक घडले आहे, त्यात संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांचाच सहभाग आहे ही गोष्ट जाहिर आहे. त्याचा योग्य उपयोग नको करून घ्यायला?
* मराठी शाळांचे भविष्य सुखरूप कसे राहील यावर काही काम? - (कसे करणार? यांचीच मुले सेंट झेवियर्स ला शिकतात हो!)

हे सोडा!
* पुणे, शिवाजी, उत्तर महाराष्ट्र आणि दिल्ली या विद्यापीठांतील मराठी विभागांचे, पुढील १० वर्षात मराठीसाठी काय करणार याचे काही धोरण तरी जागेवर आहे का?

वरील सर्व मुद्द्यांवर काम करणे हे या मंडळींचे कर्तव्य नाही का?
सरकार आणि पर्यायाने आपणही त्यांना विभागिय राजकारण करण्यसाठी पैसा पुरवतो का?

जर जे आवश्यक आहे ते कामच करत नाहीत तर कशाला हवेत ही लोकं समाजाला?

असे ते दिव्य एचओडी, प्राध्यापक आणि त्यांचे संत साहित्या वरचे थेसिस - इंद्रायणीत बुडा आणि बुडवा त्यांना!

सौरभदा,
आता मला सांगा, यातले काही घडते आहे का? नाही काहीच दिसत नाही, कधे ऐकलेही नाही!
का? कारण आम्ही झक मारतो आहोत!

आता कळले ?

आपला
संतापलेला
गुंडोपंत

पंत, म्हणने पटते राव !

आमच्या विद्यापीठात नुकतेच तसे प्रयत्न सुरु झाले आहेत. प्राचीन साहित्य स्कॅन करुन सेव्ह केले आहे. मात्र ऑनलाइन वाचकांना ते वाचायला मिळाले पाहिजेत. त्याबाबतीत मात्र उदासिनता आहेच.मराठी विषयाचे प्रबंध युनिकोडमधे असावेत हा मुद्दा मला वयक्तिक पटतो.

किती प्राध्यापकांना मराठी संकेतस्थळे माहिती आहेत हा फार मोठा प्रश्न आहे. - ज्यांना आजचे मराठी भाषेचे स्वरूपच काही माहिती नाही ते उद्याचे भविष्याच्या काय योजना बनवणार?

आमच्या अख्ख्या औरंगाबाद जिल्ह्यात आम्ही एकमेव प्राध्यापक असू की, जे मराठी संस्थळावर (वाचन करीत)पडलेले असतात :)
बाकीचे फक्त इंटरनेटवर लै माहिती मिळते, या निमित्ताने कधी तरी जालावर भटकत असतील असे वाटते, तेही अपवादाने आणि कामाच्या निमित्ताने !

बाकी राहिलेले मुद्यांचे समर्थन / विरोध सायंकाळी निवांत करीन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्म्....

पंत, तुम्ही विद्यापीठाने काय करायला हवे हे इतरच बरेचसे सांगितले आहे. पण प्रश्न गुगल भाषांतराचा आहे. यातही विद्यापीठाने काही केले तर चांगलेच आहे. पण तुम्ही तडकाफडकी विद्यापीठ, त्यातही मराठी विभाग शिवाय झक मारत बसणे इ. निष्कर्ष कसे काढले यासाठी मी स्पष्टीकरण मागितले होते.
विद्यापीठाला दोष देऊन काय उपयोग? कदाचित विद्यापीठाने याकामी एखादी समिती नेमावी, मग सदस्यांनी काम करुन मराठी भाषांतर सुविधा मिळवून द्यावी असे तुम्हाला वाटत असावे.
अशी भाषांतराची सुविधा हवी असेल तर जास्तीत जास्त मराठी लोकांनाच काहीतरी करावे लागणार आहे. उगाच विद्यापीठ, महाराष्ट्र सरकारची वाट बघत बसल्यावर मग संपलेच सगळे!

सौरभ.

=================

मराठी विकिवर २२००० लेख आहेत

मराठी विकिवर २२०००+ लेख आहेत.
यासोबतच आता आपला विकि ५७व्या स्थानावर पोचला आहे हे ही लक्षात घ्या!

ही संख्या अगदी वाईट नाही.

आपला
गुंडोपंत

प्रतिसाद दिला आहे

गुंडोपंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद दिला आहे. पाहू काय होते ते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

+१
गुंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

+१

प्रतिक्रिया/फीडबॅक दिला आहे.

प्रतिसाद दिला.

प्रतिसाद दिला आहे. पण मला वाटते प्रतिसाद हजारोंच्या संख्येत पोहचले तर् कार्यवाही होऊ शकेल.

||वाछितो विजयी होईबा||

काय करता येईल?

हो अगदी बरोबर आहे. पण जास्त विचारणा व्हाव्यात या साठी काय करता येईल?
आपला
गुंडोपंत

हम्म!

गमभनकार ओंकार याने गमभनची शुद्धलेखन सुविधा सुरु करण्याबाबत मदतीची अपेक्षा केली असता त्याला शब्द देऊन गेल्या वर्षभरात एकाही नव्या शब्दाची भर घातलेली नसली तरी त्याच प्रकल्पात अद्यापही गुंतलेली आहे.(????????????) ;-) इथे मदत करण्याची इच्छा असली तरी ते झेपणे अवघड वाटते.

मागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे

अगदी मदत नाही केली तरी येथे मागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे ताई...
तेंव्हा नाव नोंदवा हो!

आपला
गुंडोपंत

केले.

अगदी मदत नाही केली तरी येथे मागणी नोंदवणे महत्त्वाचे आहे ताई...

बरं केले. :-)

केल्याने होत आहे....

मराठी विकिवर बरेच चांगले लेख आहेत. काही दुवे देते, जरूर वाचा.

महाराष्ट्र
मुंबई
शिवाजी महाराज
भीमसेन जोशी
भारतीय रेल्वे
पानिपतची तिसरी लढाई

मराठी विकिवर चांगले लेख यावेत यासाठी तुम्हीही प्रयत्न करा.

मी पण प्रतिसाद दिला

गुगलच्या साईटवर जाऊन मी पण मराठी भाषांतराबद्दल विचारणा केली आहे आणि मदतीचा प्रतिसाद दिला आहे. बघूया पुढे काय होते ते. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हेच खरे.

बाकी पुणे विद्यापीठाने काय करायला हवे याबद्दलचे गुंडोपंतांचे विचार अतिशय मार्गदर्शक आहेत. मात्र हे विचार योग्य त्या संस्थांजवळ / व्यक्तींजवळ पोहोचले पाहिजेत तरच त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता निर्माण होईल.

चिनार

कुणाला पाठवू या?

काही माहिती द्या ना.
कुणाला आणि कसे पाठवू या?

तुम्ही लोकसत्ता अथवा सकाळ पेपर ला देवू शकता का हे?
(म्हणजे योग्य ते संपादन करून हो!)
आपला
गुंडोपंत

राज्य मराठी विकास संस्था

थोडेफार काम राज्य मराठी विकास संस्था

करते आहे. पण ते इतके धीमेपणाने चालले आहे की विचारता सोय नाही.
तरी अशी संस्था आहे आणि ती काही तरी काम करते आहे हेच दिलासादायक वाटते.

संस्थेच्या स्थळावर पुस्तकसूची अप्रतिम आहे.
इतिहासाच्या अभ्यासकांना हा खजिनाच वाटेल.

असो, गुगल ला यांची आठवण यायला हरकत नव्हती.

तसेच संस्थेकडे स्वयंसेवक म्हणून काम करण्याचीही सोय असायला हवी असे वाटले.
आपला
गुंडोपंत

नोंदणी

ही माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद, पंत. वरील दुव्यावर जाऊन मदतीसाठी नावनोंदणी आणि मराठीसाठी विचारणा केली आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

जी.पी.एल. लायसन्स

गुगलला सहकार्य करण्यात काहीच गैर नाही. पण शेवटी गुगल ही देखील शेअरहोल्डर्सची मालकी असलेली एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या विदागाराचा सोर्स ते कधिही ओपन करणार नाहीत ही त्यातली मेख लक्षात घेतली पाहिजे. गुगलच्या मानाने ओंकार जोशी अथवा त्याच्यासारख्या इतरांचे प्रयत्न नगण्य म्हणता येतील. पण ओंकार करीत असलेली निर्मिती ही LGPL License खाली वितरीत होते आणि गुगल तसे करीत नाही हा मुलभूत फरक भविष्यात निर्णायक ठरेल. ओंकारचे सोफ्टवेअर / विदागार मला हवे तसे वापरता येते, संगणकावर, वेबवर कसेही जोडता येते, त्यात हवा तसा बदल करून फुकट वापरण्याचा कायदेशीर परवाना मला मिळतो, हे पाहिल्यावर मी अशा गोष्टीसाठी वर्षानुवर्षे थांबण्यास तयार आहे.
'राव गेले पंत आले' या न्यायाने मायक्रोसोफ्ट काय किंवा गुगल काय हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थात 'दगडापे़क्षा वीट मऊ' या न्यायाने गुगलचा वेग (दिशा) मायक्रोसोफ्टपेक्षा नक्कीच चांगला आहे. पण एल.जी.पी.एल. लायसन्स खाली वितरीत होणारा कोणताही लहानसा प्रयत्न देखील माझ्यासाठी खूप मोठा आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले.

सहमत

लाखाचे बोललात्. १००% सहमत

मग मी यामुळेच तर वैतागलो आहे.

माझ्या मुळ प्रस्तावात मी महाराष्ट्रातल्या मराठीसाठी काम करणार्‍या प्रमुख संस्था म्हणून पुणे विद्यापीठावर उगाच राग काढतो आहे असे वाटले की काय?
त्याचा तपशील येथे आहेच.
http://mr.upakram.org/node/1618#comment-26772
त्यांचे काम नाही का हे? त्यांनी पण दिशा द्यावी ना प्रकल्पांना?
हे मुख्य आधारस्तंभ आहेत. या विद्यापीठाकडे जगातले मराठीचे प्रमुख माहितीचे खजिने आहेत. हे बसलेत त्यांना रद्दीत दाबून! राज्य मराठी संस्थाही काही करू शकली नाही तेथे गुगल शिवाय कुणी येतंय का सांगा? असा प्रकल्प करावा हे ही सुचत नाही त्यांना???

ओपन लायसंसचे तुम्ही म्हणता ते १००% पटतंय!

पण मराठी भाषेचा स्वार्थ कसा साधावा? जो कुणी काही भाषेसाठी करतांना दिसेल त्याला प्रोत्साहन देणे याशिवाय काय सुचते?

आपला
गुंडोपंत

माफ करा मी सहमत् नाही

तुमच्या मतांशी मी सहमत् नाही. कारण् या सगळ्याचे कारण् म्हणजे विद्यापीठाची आर्थीक् परिस्थिती चांगली नाही (इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या तुलनेत्). इतर विद्यापीठात असे संशोधन् का चालते कारण् त्याना उद्योगधंद्याकडून् / उद्योगपतींकडून् देणग्या (Endowment) मिळतात्. त्या केंव्हा मिळतात् जेंव्हा त्यात त्याना कुठे तरी नफा/फायदा/(Influence) दिसतो तेंव्हा. अमेरिकेतल्या एखाद्या मोठ्या विद्यापीठाचा लॅटीन् भाषा शिकवणारा विभाग् पहा आणि दिसेल् की तिथे परिस्थिती पुणे विद्यापीठापेक्षा वेगळी नाही. आणि या उलट मुंबई आय आय टि चा संगणक विभाग पहा. कुठल्याही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इतकीच साधने तिथे आहेत.
जो पर्यंत् मराठीत् धंदा/नफा दिसत् नाही किंवा एखादा मराठी उद्योगपती मराठीसाठी देणग्या देत् नाही तो पर्यंत् ही तफावत दिसेल्. (म्हणजे नुसते गप्प बसून् वाट पहा असे मला म्हणायचे नाही. पण् नुसते स्वय्ंसेवी प्रयत्न् करण्याऐवजी मराठी उद्योगाला / उद्योगपतीना चालना मिळेल अशा प्रयत्नाना मदत् केली पाहिजे).

एक उदा देतो. अमेरिकेत आजकाल् भारतीयांसाठी भरपूर् इंग्रजी प्रकाशने आहेत् ज्यात् ICICI/CITIBANK यांच्या NRI मंडळीना उद्देशून् भरपुर् जाहिराती असतात्. पण् बृहन् महाराष्ट्र मंडळाचे वृत्त, एकता अशा मराठी प्रकाशनांना कुणीच् या जाहिराती देत् नाही. एकता ला बरेच दिवस् फारतर् जाई काजळ् यांची जाहिरात मिळायची. कारण् या मंडळींच्या मते मराठी माणसाकडे पैसे नसतात् किंवा तो खर्च करत नाही. आणि अशा बॅंकांचे NRI ला ग्राहकसेवा देणारे बहुतेक् अमराठी असतात्. मी महाराष्ट्रात् गेलो कि माझ्या बॅंकेत् मुद्दाम् मराठीत् बोलतो. समोरचा अमराठी असला तरी. अमेरिकेत् मराठी NRI किती भरपुर् आहेत् त्याना Target करा आवर्जून् सांगतो. बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला पैसे खर्च् करून् जातो. तिथल्या उद्योजकांकडून् सेवा किंवा वस्तू खरेदी करतो.

मी काही फार् थोर् करतो असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण् ज्यातून् मराठि उद्योगाला फायदा होणार् आहे असे काहितरी करुया असे मी म्हणत् होतो. म्हणजे एकदा मराठीमधे फायदा आहे हे कळाले की आपोआप् मराठी भाषेला प्रोत्साहन् मिळेल्.

पाठवला फीडबॅक.

चांगली कल्पना आहे. जर इंग्रजी पुस्तक वाचताना गूगल वरून् डायरेक्ट मराठीत अर्थ कळला शब्दाचा तर किती मजा येईल. मी गुंडोपंतानी सुचवलेल्या मार्गाचा अवलंब् केला आहे.
पुण्याचे पेशवे

 
^ वर