सत्यमेव जयते, घरगुती हिंसा आणि उपक्रम

मध्यंतरी उपक्रमावर एक प्रतिसाद नजरेस पडला. तो ताबडतोब वाचला नव्हता त्यामुळे त्यातील संपादित भागाबद्दल विशेष माहिती नाही. तो प्रतिसाद वाचल्यावर मला आश्चर्य वाटले की संकेतस्थळावर जाहीर लिहिलेल्या प्रतिसादावर कोणाही उपक्रमीने आक्षेप घेतला नाही. मीही घेतला नाही. वाचला आणि पुढे चालता झालो.

आज सत्यमेव जयतेमधील घरगुती हिंसेवरील एपिसोड पाहिल्यावर पुन्हा या प्रतिसादाने डोक्यात उचल खाल्ली. स्वतःच्या कॉम्प्युटरसमोर बसून, अंगाला तोशीस लावण्याची गरज नसताना, गुन्ह्याची कबूली देणार्‍या या प्रतिसादावर आपण कोणीही नाराजी दाखवली नाही. प्रत्यक्ष आयुष्यात आपला नातेवाईक, मित्र, शेजारी असा गुन्हा करत असताना आपण कशी काय मदत करणार?

आम्ही इतके मुर्दाड झालो आहोत की आम्हाला फरक पडत नाही?

माझे उत्तर देतो नाहीतर थत्तेचाचा मला जाब विचारतील. मी या प्रतिसादावर आक्षेप घेतला नाही हे मी योग्य केले नाही. या चर्चेद्वारे मी तो आक्षेप घेत आहे. उपरोक्त सदस्यांनी आईने सांगितले म्हणून नव्हे तर घरगुती हिंसा करणे मुळात चुकीचे हे हे पटवून घ्यावे असे आवाहन मी करतो.

हा चर्चाप्रस्ताव उपक्रमाच्या धोरणांत बसत नसेल तर उडवून देण्यापेक्षा त्यात बदल करावा असे संपादकांना विनंती आहे. आज दिवसभर माझ्या मनाला या प्रतिसादाने फार त्रास दिला आणि तो त्रास खरा आहे.

Comments

'रिंग द बेल'

सत्यमेव जयते बघत नाही मात्र घरगुती हिंसेवर 'रिंग द बेल' च्या निमित्ताने उपक्रमावर एक चर्चा झाल्याचे आठवते.
दुवा शोधुन बघतो
धम्मकलाडू यांनी ती चर्चा आता वर काढली आहे.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

धरून झोडपायला हवे

नवरा-बायकोच्या खाजगी बाबींत नाक सार्वजनिक नाक कशाला खुपसायचे असा उदात्त विचार अनेकांना थांबवतो. इतरांना काही देणेघेणे नसते. मात्र किमान संकेतस्थळावर कुणी घरेलू हिंसेच समर्थन करत असेल तर तिथे इतरांनी धरून झोडपायला (शाब्दिक झोडपणे अभिप्रेत आहे) हवे, असे माझे मत आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जाऊ द्या हो लाडोबा!

तुम्हाला इथे यांना धरून झोडपावे वाटत आहे.
तिथे हे बिचारे त्यांचा रोजच मार खात असतील म्हणून इथे शेर असल्याचे दाखविण्यासाठी तसे खोटे नाटे लिहीत असतील.

***

मी कार्यक्रम पाहिलेला नाही, पण यासंदर्भात (घरातील हिंसाचार), आमच्या दिवंगत मोठ्या बंधूंचे विचार खरेच उद्बोधक आहेत.
अवांतर म्हणजे, हे बंधू अत्यंत गरम डोक्याचे व कमावलेल्या शरीराचे. पेशाने शिक्षक. गावात / रस्त्यावर कुठे 'डोमेस्टिक व्हायोलन्स' दिसला की कुठलाही विचार न करता जाऊन त्या नवरोबाची कणिक तिंबणे हा त्यांचा शिरस्ता होता.

तर,
पोरगी सासरी मार खाते, प्रसंगी जाळूनही घेते, याला जबाबदार तिचा बाप आई व माहेर मग समाज अन शेवटी सासर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. सासरी वाईट वागणूक मिळायला लागते, तेव्हा ती मुलगी आपल्या घरी नक्कीच तक्रार सांगते. तिलाच वेगवेगळ्या कारणांनी समजूतीने घेण्याचा सल्ला, अगदी तुझ्या बहिणी उजवायच्या आहेत पासून, तुला परणून दिली, तेंव्हाच तू इकडच्या घराला मेलीस पर्यंत सगळे काही सांगितले जाते.

मुलगी म्हणून तिचे शिक्षणही यथातथाच केलेले असते. वेगळी निघून गेली तर स्वतःच्या पायावर उभे राहून कमावून खाईल अशी क्षमता अन धमकच आईबापांनी शिकविलेली नाही. ही स्वतः काडीमोड घेऊन आली, तरी 'टाकून दिलेली' बाई म्हणून ती कुणाच्या आधाराने रहाणार? पुन्हा तिच्या एकटेपणाचा अन् विना-मंगळसूत्राच्या गळ्याचा गैरफायदा लुटण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथलेच लांडगे टपून बसलेले.

यामुळे ती मुलगी नाईलाजाने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करते, अन एक दिवस मरून जाते...

आधी खूप भांडलो होतो बंधूंशी असे भडक विचार मांडल्याबद्दल, पण कधीकधी त्यातलं तथ्य टोचणी लावून जातं.

पूर्ण सहमत.

यामुळे ती मुलगी नाईलाजाने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करते, अन एक दिवस मरून जाते...

तुमच्या बंधूंच्या विचारांशी पूर्ण सहमत आहे.

माझा स्वतंत्र प्रतिसाद नंतर देईनच. तसा सध्या तो तुम्ही बेल वाजवली का? मध्ये वाचता येईल.

तूर्तास, धूमकेतूंच्या खेदामध्ये +१.

+१

+१

नवर्‍याकडून मार खाऊन घेणार्‍या आणि त्याने मोठा आवाज काढला की गोगलगाय बनणार्‍या बायकांना इतर कोणाचा सपोर्ट नसतो हे बरोबर आणि त्यांच्या नवर्‍यांना वठणीवर आणणारे कोणी नसते हे ही बरोबर म्हणूनच विचारतो आहे की इतक्या धडधडीत गुन्ह्यावर इथे नाराजी का व्यक्त झाली नाही?

इतक्या धडधडीत गुन्ह्यावर इथे नाराजी का व्यक्त झाली नाही?

धूमकेतूजी,
माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसादात असल्याने हा प्रश्न मला विचारला आहे असे समजून, मी व्यक्तीशः श्री. रावले यांच्या 'त्या' विधानाला उद्देशून 'जाऊ द्या हो लाडोबा..' अशी प्रतिक्रिया लिहीण्याचे कारण म्हणजे, मी या सदस्यांना अजिबात ओळखत नाही. ते व्यक्तीगत जीवनात खरेच असे करतात किंवा कसे याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्यांचेविषयी व्यक्तिगत रोखाने बोलणे उपक्रमाच्या नियमांत बसेल की नाही ते मला ठाऊक नाही. मी तसा लै ज्युनियर हाय.
सबब, 'घरी मार खात असतील म्हणून इथे शेर बनून असले प्रतिसाद टंकत असतील' इतकी टिपण्णी करून गप्प बसलो :)

+१

'घरी मार खात असतील म्हणून इथे शेर बनून असले प्रतिसाद टंकत असतील'

यात तथ्य असू शकेल. ;-)

तुमच्यासाठी नव्हते

मी तो प्रश्न प्रियालीताईंना विचारला कारण त्या स्वतः महिला आहेत म्हणुन. त्यांचा दुसरा प्रतिसाद खाली वाचल्यावर मूळ प्रतिसादातून् काय संपादित झाले असावे याचा सुगावा लागला.

आक्षेप

चर्चाप्रस्तावात माझे नाव का घेतले आहे?

नितिन थत्ते

कारण

माझ्या मागच्या चर्चेत "धूमकेतूंना काय वाटते ते कळू द्या" असे तुम्ही लिहिले होते ते लक्षात ठेवून या चर्चेत आवर्जून माझे मत कळवले. त्यावेळी तुमचा प्रश्न डोक्यात होता म्हणून नाव घेतले. ते आदराने घेतले आहे.

हिंसा

शारीरिक, शाब्दिक, वैचारीक आणि भावनिक हिंसेची मात्रा कमी करण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे, प्रबोधन कौटुंबिक आणि शालेय स्तरावर झाल्यास ते जास्त परिणामकारक ठरेल असे वाटते, अर्थातच ह्यानंतरही होणार्‍या हिंसेसाठी कायदा व सुव्यवस्था असणे गरजेचे आहे.

संबंध तोडायला हवेत.

घरगुती हिंसाचारावर येथे माझा प्रतिसाद आहे. ही केस प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडलेली असल्याने आणि माझ्या इमारतीतील सर्वांनी एकजुटीने या कुटुंबाचा निषेध केल्याने एक दुर्घटना टळली असे मला वाटते.

सदर कुटुंबाला त्यांची सून घरात येईपर्यंत लोक "देवमाणसे" समजत. जेव्हा मारहाणीची कुणकुण लागली तेव्हाही लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते पण मग डोळ्यांदेखत घटना घडू लागल्या तेव्हा सर्व एकत्र झाले. पोलीस आणि समाजसेवक, संस्था वगैरेंची मदत घेऊन ही बाब लोकांनी सोडवली.

परंतु गोष्ट इथेच थांबली नाही. आज या घटनेला ३० वर्षे उलटून गेली. या कुटुंबाला लोकांनी वाळीत टाकलेले आहे. ते अद्याप इमारतीत राहतात. मयताला जाणे हा एक उपचार सोडून लोक त्यांच्याकडे जात नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनीही संबंध कमी केले आहेत. या कुटुंबाला दिवाभिताप्रमाणे राहावे लागते. त्यांच्या अत्याचाराची पूर्ण किंमत समाजाने चुकवली आहे.

आता प्रश्न राहिला सदर सदस्याचा. त्यांना त्यांची चूक लक्षात येईपर्यंत, आणि येवढीच नव्हे तर इतत्रही (कविता महाजन आणि सत्वशीला सामंत यांच्यावरील टिप्पण्या) त्यांचे लेखन शिष्टाचाराला सोडून असते हे लक्षात आल्याने त्यांच्या कोणत्याही विधानावर मी प्रतिसाद देणार नाही हे मी आधीच ठरवले होते.

ज्या व्यक्तीला घरातल्या बाईचा आदर राखता येत नाही त्याच्यापासून इतर "माणसांनी" दूरच राहिलेले बरे.

आम्ही इतके मुर्दाड झालो आहोत की आम्हाला फरक पडत नाही?

मला असं वाटत नाही. आपण सर्व स्वार्थी आहोत आणि स्वार्थापोटी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो असे वाटते.

धन्यवाद

हा प्रतिसाद आत्ता वाचला. उपक्रम प्रशासनाने यावर उपाय योजना करावी असे माझे मत आहे.

स्त्रीची भूमिका

एका सर्वेक्षणात भारतातील (सर्वेक्षण केलेल्यांपैकी) पन्नास टक्क्यांहून अधिक स्त्रिया अशा मारहाणीचे समर्थन करतात असे वाचले होते. आता यावर काय बोलणार कपाळ!
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

असे काय करता, सन्जोपराव

अहो,
पशू शूद्र और नारी.. सब ताडन के अधिकारी
आपल्या पवित्र ग्रंथांत पूर्वीच्या काळांपासून असे लिहूनच ठेवले आहे!

गर्हणीय

घरगुती हिंसा ही गर्हणीय आहेच. तिचे समर्थन तितकेच निंदाजनक.

पण कधीकधी काही स्त्रिया १० वर्षापूर्वीचे ऊकरून वाद घलून कौटुंबिक जीवन ढवळून टाकतात, रात्री नवर्‍याला वाद घालून, भंडावून झोपू देत नाहीत, अक्षरक्षः हिस्टेरीकल वागतात , मानसोपचारतद्न्याकडे नेऊ म्हटले तर "मी वेडी वाटले का?" असा प्रतिवाद करतात, सळो की पळो करून सोडतात हे देखील अक्षम्य गुन्हेच आहेत. शरीरीक हिंसा दिसते, पुरावा राहतो, मेंटल ऍब्युझ दिसत नाही पण मुलांना , घरच्यांना त्रास हा होतोच.

दोन्ही प्रकार तितकेच निंदनीय / दोन्ही प्रकारात मानसोपचाराची आवश्यकता वाटते.

फरक आहे

पण कधीकधी काही स्त्रिया १० वर्षापूर्वीचे ऊकरून वाद घलून कौटुंबिक जीवन ढवळून टाकतात, रात्री नवर्‍याला वाद घालून, भंडावून झोपू देत नाहीत, अक्षरक्षः हिस्टेरीकल वागतात , मानसोपचारतद्न्याकडे नेऊ म्हटले तर "मी वेडी वाटले का?" असा प्रतिवाद करतात, सळो की पळो करून सोडतात हे देखील अक्षम्य गुन्हेच आहेत. शरीरीक हिंसा दिसते, पुरावा राहतो, मेंटल ऍब्युझ दिसत नाही पण मुलांना , घरच्यांना त्रास हा होतोच.

शुचे, या गोष्टींत फरक आहे. वरील वागणे हे स्त्रियांचे वैशिष्ट्य असते अशातला भाग नाही. असे वागणारे पुरुषही असतात आणि नक्कीच ही मानसिक रोगाची नांदी आहे.

वरील कार्यक्रम, लिंगश्रेष्ठत्वाबद्दल आहे.

स्त्रिया जास्त करून

प्रियाली माझ्या पहाण्यात कदाचित फक्त बायका असतील म्हणून मी लिहीले. पण बरेचदा पुरुष वाचाळपणा करत नाहीत असा अनुभव आहे. बायका खूप "क्रेझीली हिस्टेरीकल" होतात. रडतात काय, लोळण काय घेतात, शिव्या-शाप, उणीदुणी म्हणजे एकंदर वाचिक भर जास्त. सहसा "हार्मोनल इम्बॅलन्स्" मध्ये असे होऊ शकत असेल. पण माझ्या पहाण्यात स्त्रिया असल्याने मी तो मुद्दा मांडला.

जर पुरुषांमध्ये देखील हे प्रकार आढळत असतील तर ..... मुद्दा मागे घेते.

हाहा!

प्रियाली माझ्या पहाण्यात कदाचित फक्त बायका असतील म्हणून मी लिहीले. पण बरेचदा पुरुष वाचाळपणा करत नाहीत असा अनुभव आहे. बायका खूप "क्रेझीली हिस्टेरीकल" होतात. रडतात काय, लोळण काय घेतात, शिव्या-शाप, उणीदुणी म्हणजे एकंदर वाचिक भर जास्त. सहसा "हार्मोनल इम्बॅलन्स्" मध्ये असे होऊ शकत असेल. पण माझ्या पहाण्यात स्त्रिया असल्याने मी तो मुद्दा मांडला.

इथे उपक्रमावर असे प्रकार कोण करते विचारून बघ ;-) तुझे मत चुटकीनिशी बदलेल. ;-) (सर्वांनी ह. घ्या)

स्त्रिया आणि पुरुष यांच्यात वेगळेपणा आढळू शकतो यांत "हार्मोनल इम्बॅलन्स" वगैरे बाजूला ठेवले तरी पुरुषांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. 'पुरुषांनी रडू नये' अशी आपली मानसिकता असल्याने ते सहसा रडारड करणार नाहीतच. या कार्यक्रमात एका व्यक्तीने सांगितलेले उदाहरण बोलके आहे. अनेक घरांत जेथे मारहाण होत नाही तिथेही "नवरा दोन-चार दिवस घराबाहेर गेला तर घरातल्यांना हायसे वाटते." अशी उदाहरणे मी आजूबाजूला अनेकदा पाहिली आहेत.

पुरुषांच्या केसमध्ये आवाज चढवून बोलणे, धमक्या देणे (एक देईन मुस्कटात वगैरे असे तोंडी), शिव्या देणे, उठून निघून जाणे, साफ दुर्लक्ष करणे, आदळ आपट करणे, स्वयंपाक नीट झाला नसेल तर ताटच्या ताट भिरकावून देणारे एक गृहस्थ आमच्या येथे राहत. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील फक्त फरक एवढाच असतो की बाई करते तेव्हा "काय वाह्यात बाई आहे" आणि पुरूष करतो तेव्हा "तो पुरुषी सत्ता गाजवणारच" असे म्हटले जात असे. (भूतकाळात लिहिते कारण निदान असे म्हणणे तरी आता कमी होऊ लागले असेल अशी आशा आहे.)

बायका खूप "क्रेझीली हिस्टेरीकल" होतात.

मारहाण करणारा नवरा क्रेझीली हिस्टेरिकलच झालेला असतो. अचानक उपटतो ढिशँव करून देतो असे नसावे. आधी बरीच तूतूमीमी झाली, धमक्या मिळाल्या, आदळआपट झाली, बायकोच्या माहेरच्यांचा उद्धार करून झाला, तिच्या चारित्र्यावर शंका घेऊन झाली की मग फटका मिळतो. वर धूमकेतूंनी ज्या प्रतिसादाकडे बोट दाखवले आहे त्यातही म्हटले आहे की "मी आता फक्त शिव्या देतो."

एक सिनॅरीओ

प्रियाली मला नीट् सांगता येत नाही (जे की मला कधीच येत नाही कारण कितपत खाजगी ठेवायचं आणि कितपत व्यक्त व्हायचं हा संभ्रम) पण रावले यांची बाजू नाही घ्यायची पण त्यांनी मांडलेला सिनॅरीओ आहे - की कोणीतरी अतिशय जिद्दीपणा करते आहे.

माझ्या ओळखीतील एक स्त्री नवर्‍याचे डोके दिवसभर खायची, लोळण घ्यायची, महीनोंमहीने अश्रूपात चालू असे, रात्री झोपलेल्या नवर्‍याल चापट् मारून उठवून परत तेच तेच भूतकाळातील चूका ऐकायला लावायची ज्याबद्दल काहीही करता येणे शक्य नव्हते बरं मानसोपचारतद्न्याकडे जाऊ म्हटले तर अडून बसायची. मुले केवीलवाणी होत असत, भेदरून जात असत. अशा बाईशी कसे डील करायचे? नरक बरा असे घर करून ठेवले होते तिच्या मानसिक त्रासाने. नवरा तिच्या नकळत रडायचा मुले वडील रडताना बघून अधिक घाबरून जात. आई मानसिक आजाराने दुरावलेली , वडील हतबल.

मी असे म्हणत नाही की घरगुती हिंसेने प्रश्न सुटला असता पण् अशा वेळी नवर्‍याचा तोल गेला असता तर चूक कोणाची? अशा वेळी हात उगारला काय खून होऊ शकतो. कारण् मोनोटोनस आवाजातील रडकथा, त्या बाईचा रडका आवाज महीनोंमहीने त्या घरात गूंजत होता.... दिवस काय अन रात्र काय. घरातल्यांना झोप नाही ती नाहीच.

मी रजा घेते, बाहेर जायचे आहे. कमी जास्त बोलले असेन तर माफ करा.

असं कशाला म्हणतेस?

प्रियाली मला नीट् सांगता येत नाही (जे की मला कधीच येत नाही कारण कितपत खाजगी ठेवायचं आणि कितपत व्यक्त व्हायचं हा संभ्रम)

तू काय सांगते आहेस ते मला चांगलं कळलं आहे.

कमी जास्त बोलले असेन तर माफ करा.

असं कशाला म्हणतेस? तू बोल की खुशाल.

तू म्हणतेस त्या बाईला मानसिक प्रश्न असतील हे खरेच आणि तिला आवरणे कठीण झाले असावे हेही खरे पण मला सांग तिला मारून प्रश्न सुटणार होता का? जर प्रश्न सुटणार नसेल तर तिला मारहाण करत राहावी का? तोल एखादेवेळेस जातो, जाऊ शकतो. तिला आवरण्यासाठी एखादेवेळी हात उगारला असेल पण अपघात वेगळा आणि गुन्हा वेगळा. अपघात झाला असेल तर पुन्हा पुन्हा मारहाण होत नाही आणि अशा मारहाणीचे समर्थन कोणी जाहीर संकेतस्थळावर येऊनही करत नाही.

शुचिताई

ब्माझ्या ओळखीतील एक स्त्री नवर्‍याचे डोके दिवसभर खायची, लोळण घ्यायची, महीनोंमहीने अश्रूपात चालू असे, रात्री झोपलेल्या नवर्‍याल चापट् मारून उठवून परत तेच तेच भूतकाळातील चूका ऐकायला लावायची ज्याबद्दल काहीही करता येणे शक्य नव्हते बरं मानसोपचारतद्न्याकडे जाऊ म्हटले तर अडून बसायची. मुले केवीलवाणी होत असत, भेदरून जात असत. अशा बाईशी कसे डील करायचे? नरक बरा असे घर करून ठेवले होते तिच्या मानसिक त्रासाने. नवरा तिच्या नकळत रडायचा मुले वडील रडताना बघून अधिक घाबरून जात. आई मानसिक आजाराने दुरावलेली , वडील हतबल.


शुचिताई, तुम्ही दिलेला सिनारिओ वाचुन वाईट वाटलं पण रावलेंच्या केसमध्ये असे दिसत नाही. ते म्हणतात त्यांचे वडिलही आईला मारत. त्यांनी बायकांना मारणं हा पुरुषांचा जन्मसिद्ध अधिकार मानलेला दिसतो. दोन्ही केसेस वेगळ्या आहेत.

हम्म

>स्वतःच्या कॉम्प्युटरसमोर बसून, अंगाला तोशीस लावण्याची गरज नसताना, गुन्ह्याची कबूली देणार्‍या या प्रतिसादावर आपण कोणीही नाराजी >दाखवली नाही. प्रत्यक्ष आयुष्यात आपला नातेवाईक, मित्र, शेजारी असा गुन्हा करत असताना आपण कशी काय मदत करणार?

रावले यांचे प्रतिसाद मला कधीच वाचावेसे वाटत नाहीत आणि ८०% वेळा मी ते वाचतही नाही. मात्र हा प्रतिसाद वाचूनही उलट लिहीले नव्हते. ते बायकोला मारत होते ही कबुली खरी धरली तेव्हा मला धक्काच बसला. रावले यांनी आईच्या शपथेला मानून बायकोवर हात उगारणे थांबवले ही खरी गोष्ट धरली तर बरे केले. पण त्याला नाराजी दाखवली नाही हे खरे. माणसाला आपली आपण अक्कल आली तर बरे असते, ती रावले यांना आपली आपण आली नाही म्हणून दु:ख करायचे, का आईमुळे का होईना त्यांनी मारणे सोडले ह्याबद्दल आनंद व्यक्त करायचा हे कळले नाही.

नुसता आरडाओरडा, शिव्या देणे हे संकेतस्थळावरच्या बर्‍याचजणांना नवीन नसावे. परक्या किंवा आपल्या कोणाही माणसावर शक्यतो ओरडू नये, किंवा शिव्या दिल्यासारखे, आरोप केल्यासारखे बोलू नये हे झाले साधारण माणसांचे वागणे.
हे बोलणे माझ्यावर कधीतरी शेकेल याचा धोका स्विकारून विचारते की इंटरनेटावरच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला नाराजी दाखवणे हाच एक व्यवसाय उपक्रमींना उरला आहे का? आणि असला तर तो सर्वांनीच सर्वच बाबतीत अंमलात आणला पाहिजे असे नाही का? असो.

प्रत्यक्ष आयुष्यात आपला मित्र, शेजारी, नातेवाईक असा गुन्हा करताना अशा त्रासातून जाणार्‍या लोकांना मदत करण्यासाठी, किंवा अशांना शिक्षा घडवून आणण्यासाठी काहीच प्रश्न येऊ नये.

गुन्हा. केवळ चूक नाही.

हे बोलणे माझ्यावर कधीतरी शेकेल याचा धोका स्विकारून विचारते की इंटरनेटावरच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला नाराजी दाखवणे हाच एक व्यवसाय उपक्रमींना उरला आहे का? आणि असला तर तो सर्वांनीच सर्वच बाबतीत अंमलात आणला पाहिजे असे नाही का? असो.

आपले म्हणणे कळले नाही चित्राताई. मी इथे भारतीय दंड विधानाप्रमाणे जो गुन्हा गणला जातो त्या घरगुती हिंसाचाराबद्दल लिहिले आहे. तो दंडपात्र गुन्हा आहे. केवळ चूक नाही. इंटरनेटवरच्या चुकांविषयी लिहा आणि त्यावर नाराजी दाखवा असे मी लिहिलेले नाही. मी दंडपात्र गुन्ह्याविषयी चर्चा टाकली आहे आणि चर्चा तेवढ्यापुरतीच ठेवली आहे. आतापर्यंत जे प्रतिसाद आले त्यातील एकालाही असे वाटले नाही. इंटरनेट वरल्या चुका तुम्हाला दाखवायच्या तर दाखवा पण ही चर्चा विचित्र दिशेने नेऊ नका ही विनंती करतो.

इंटरनेटवर अनेक गुन्हे घडले असतील. मी उपक्रमी म्हणून उपक्रमावरील् गुन्ह्याच्या कबुलीबद्दल बोलतो आहे.

आपल्या उर्वरित प्रतिसादासाठी आभारी आहे.

पटले नाही

>मी दंडपात्र गुन्ह्याविषयी चर्चा टाकली आहे आणि चर्चा तेवढ्यापुरतीच ठेवली आहे. आतापर्यंत जे प्रतिसाद आले त्यातील एकालाही असे वाटले नाही. >इंटरनेट वरल्या चुका तुम्हाला दाखवायच्या तर दाखवा पण ही चर्चा विचित्र दिशेने नेऊ नका ही विनंती करतो.

चूक होते आहे असे वाटते. कोणाला वाटले नाही तर मला वाटू नये हा मुद्दा मान्य नाही.
चर्चा विचित्र दिशेला नेत नाही तुम्ही म्हणता तर. पण केवळ या चर्चेत. इतर ठिकाणी चर्चेला वेगळे वळण लावण्याचा माझा उपक्रमी म्हणून हक्क शाबूत ठेवला आहे :)

>मी उपक्रमी म्हणून उपक्रमावरील गुन्ह्याच्या कबुलीबद्दल बोलतो आहे.
होय, बायकोला मारले असले तर तो गुन्हा आहे. पूर्वी केलेला गुन्हाही कोर्टात दखलपात्र आहे. मात्र तो कोर्टात सादर झालेला नाही. एका इंटरनेटवरील व्यक्तीने बोलता बोलता दिली असली तर कबुली दिली आहे. आता मारत नाही म्हणूनही सांगितले आहे. गप्प बसतो म्हणूनही सांगितले आहे. ह्यातील कशावर किती विश्वास ठेवायचा माहिती नाही.

स्त्रीलाच काय घरातल्या अज्ञ मुलांना फटके मारण्याची पद्धत पूर्वी बर्‍याच प्रमाणावर होती. आपल्या मागील पिढीतील अनेकजण असे आहेत की जे मुलांना फटके मारत. अशांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत का? कृपया यात मी कोणालाही मारण्याचे समर्थन करत नाही हे लक्षात घ्यावे. आज ते तसे करत नाहीत असे म्हणतात. हे ज्यांना त्रास झाला अशांसाठी पुरेसे आहे का? ज्यांना त्रास झाला नाही पण ह्या वागण्याबद्दल कळले त्यांना पुरेसे आहे का? आणि नसले तर पुरेसे का नाही? नक्की अशा व्यक्तीला समाजातून उठवण्याची भाषा व्हावी का? अशी व्यक्ती स्वतःत बदल घडवून आणण्यास सक्षम असली आणि बदलांची गरज तिला कशामुळे तरी कळली तर अशा व्यक्तीला किती वेळा आणि किती लोकांनी कसे बोलावे?

माझे बोलणे प्रतिगाम्यांच्या बाजूचे वाटणार नाही अशी अपेक्षा आहे. असो.

चर्चा भरकटवताय

>>चूक होते आहे असे वाटते. कोणाला वाटले नाही तर मला वाटू नये हा मुद्दा मान्य नाही.
चर्चा विचित्र दिशेला नेत नाही तुम्ही म्हणता तर. पण केवळ या चर्चेत. इतर ठिकाणी चर्चेला वेगळे वळण लावण्याचा माझा उपक्रमी म्हणून हक्क शाबूत ठेवला आहे :)

इंटरनेटवरच्या चुका हा शब्द मी चर्चेत वापरला नाही. तुम्ही तो वापरलात. तुम्हाला जे वाटेल ते वाटू द्या पण जे नाहीच ते कशाला जाहीर लिहिताय? तुम्ही दुसर्‍या चर्चेत हैदोस घाला. ते लेखक बघून घेतील. मी माझ्या चर्चेपुरतं बोलतोय.

>>स्त्रीलाच काय घरातल्या अज्ञ मुलांना फटके मारण्याची पद्धत पूर्वी बर्‍याच प्रमाणावर होती. आपल्या मागील पिढीतील अनेकजण असे आहेत की जे मुलांना फटके मारत. अशांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत का?

मागील पिढ्या मारहाण करत तेव्हा घरगुती हिंसेचा कायदा होता काय? या तुमच्या वरच्या प्रश्नांवर तुम्हीच विचार करून बघा उत्तर मिळेल. मुलांना, बायकोला आणि नवर्‍याला चापटी मारणे हा आजही गुन्हा नाही आपण हिंसाचाराबद्दल बोलतो आहे.

>>त्रास झाला नाही पण ह्या वागण्याबद्दल कळले त्यांना पुरेसे आहे का? आणि नसले तर पुरेसे का नाही? नक्की अशा व्यक्तीला समाजातून उठवण्याची भाषा व्हावी का?

चित्राताई, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? इथे मी कोणाला समाजातून उठवण्याची भाषा केली काय? नाराजी व्यक्त करणे म्हणजे समाजातून उठवणे असते काय? आधी इंटरनेटच्या चुका आणि आता समाजातून उठवणे. मी तुमच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करतो. तुम्ही समाजातून उठणार नाही अशी आशा करतो.

तुम्ही सोबत काही पूर्वग्रह आणि पूर्वानुभावाचे गाठोडे आणले असेल तर मला सहानुभूती वाटते इतकेच म्हणेन.

>>माझे बोलणे प्रतिगाम्यांच्या बाजूचे वाटणार नाही अशी अपेक्षा आहे.

तुमचे बोलणे वाचून प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हाही तुम्ही काही करणार नाही. गोंधळ घालत रहाल असे वाटते आहे. तेव्हा रजा घेतो.

शैली आणि विचार

> तुम्ही दुसर्‍या चर्चेत हैदोस घाला. ते लेखक बघून घेतील. मी माझ्या चर्चेपुरतं बोलतोय.
>तुमचे बोलणे वाचून प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हाही तुम्ही काही करणार नाही. गोंधळ घालत रहाल असे वाटते आहे. तेव्हा रजा घेतो.

पर्सनल (खाजगी) आरोप आणि शंका. अमान्य, आणि गरजेचे त्याहून नाहीत.

>मुलांना, बायकोला आणि नवर्‍याला चापटी मारणे हा आजही गुन्हा नाही आपण हिंसाचाराबद्दल बोलतो आहे.

माझ्या मते अत्यंत चूक. अज्ञ मुलांना कळत नसताना त्यांना शिस्त लावण्यासाठीही मार देणे हाही गुन्हाच आहे. वरच्या उदाहरणात बायको ऐकत नाही म्हणूनच अनेकदा मार दिला जात असावा असे दिसते. असो. गुन्ह्याला मी गुन्हाच म्हणते. फक्त इथे आपण काय करायचे ह्याबद्दल बोलत होतो. उठसूठ नाराजी व्यक्त करत राहायची तर उपक्रमींना तो व्यवसायच होईल असा माझा समज आहे.

>तुम्ही समाजातून उठणार नाही अशी आशा करतो.
मला काही होत नाही. तुम्ही काळजी करू नका.

शिवाय तुम्ही जुन्या गुन्ह्याबद्दल बोलत आहात. आता ते शिव्या घालतात आणि गप्प बसतात. यावरही नाराजी व्यक्त करावी? शिव्या घालणे हाही गुन्हा आहे, गुन्ह्याच्या बॉर्डरलाईनला आहे इ. इ. म्हणता येईल.
हैदोस, गोंधळ हे शब्द वापरून तुम्ही चर्चेला नवीन वेगळे वळण लावले आहेत असे म्हणेन.

दंडविधानाप्रमाणे गुन्हा

रजा घेणार होतो पण तुमचे गैरसमज दूर करेन म्हणतो.

पर्सनल (खाजगी) आरोप आणि शंका. अमान्य, आणि गरजेचे त्याहून नाहीत.

शंका मान्य. आरोप नाही. घ्यायचे तर घ्या नाहीतर सोडून द्या.

माझ्या मते अत्यंत चूक. अज्ञ मुलांना कळत नसताना त्यांना शिस्त लावण्यासाठीही मार देणे हाही गुन्हाच आहे. वरच्या उदाहरणात बायको ऐकत नाही म्हणूनच अनेकदा मार दिला जात असावा असे दिसते. असो. गुन्ह्याला मी गुन्हाच म्हणते.

मी काय बोललो चित्राताई. चापटी मारणे आणि मार देणे या शब्दांत फरक आहे हे तरी मान्य करा.

शिवाय तुम्ही जुन्या गुन्ह्याबद्दल बोलत आहात. आता ते शिव्या घालतात आणि गप्प बसतात. यावरही नाराजी व्यक्त करावी? शिव्या घालणे हाही गुन्हा आहे, गुन्ह्याच्या बॉर्डरलाईनला आहे इ. इ. म्हणता येईल.

गुन्हा जुना की नवा हा प्रॉब्लेम नाही. त्या प्रतिसादाकडे बघा. बायकांना गुदगुल्याच करायच्या का? मी तर मारायचो. आता आईमुळे गप्प बसतो. शिव्या घालतो असे म्हणाले आहेत रावले. याचा अर्थ मारण्याला त्यांचे समर्थन आहे, नाराजी त्याबद्दल व्यक्त करायची आहे. शिव्या घालणे गुन्हा असला तरी शिवी प्रूव करावी लागेल. शिवीचे वळ उठत नाहीत आणि हाडं तुटत नाहीत. मी गुन्ह्याच्या बॉर्डरलाइनबद्दल बोलत नाही. गुन्ह्याबद्दलच बोलतो आहे.

उठसूठ नाराजी व्यक्त करत राहायची तर उपक्रमींना तो व्यवसायच होईल असा माझा समज आहे.

हा तुमचा आक्षेप थोडा भारी वाटतो. उठसूठ नाराजी व्यक्त करायला इथे सर्व उपक्रमी घरात बायकांना मारतात आणि संकेतस्थळावर येऊन ते प्रसिद्ध करतात काय? उठसूठ म्हणजे काय? रावलेंसारखी व्यक्ती नेहमी या गुन्ह्याला प्रसिद्धी देत असेल तर त्यांना समज देऊन ते कायमचे थांबवायला हवे किंवा जेव्हा चूक दिसेल तेव्हा दाखवून द्यायला हवी असे माझे मत आहे. यापुढे रावलेंच्या अश्या वक्तव्यांचा मी पाठपुरावा करेन.

हैदोस, गोंधळ हे शब्द वापरून तुम्ही चर्चेला नवीन वेगळे वळण लावले आहेत असे म्हणेन.

इंटरनेटवरील चुका, मी वेगळे वळण लावेन, समाजातून उठवणे या विधानांना तुम्ही सुरुवात केली नसती तर मी हे शब्द वापरले नसते. तुम्हाला शब्द आवडले नसल्यास माफी मागतो.

ठीक

>यापुढे रावलेंच्या अश्या वक्तव्यांचा मी पाठपुरावा करेन.

तो जरूर करा. मीही करेन.

>याचा अर्थ मारण्याला त्यांचे समर्थन आहे, नाराजी त्याबद्दल व्यक्त करायची आहे.
ठीक, असाही अर्थ लागू शकतो. पण तुमच्या चर्चाप्रस्तावात "स्वतःच्या कॉम्प्युटरसमोर बसून, अंगाला तोशीस लावण्याची गरज नसताना, गुन्ह्याची कबूली देणार्‍या या प्रतिसादावर आपण कोणीही नाराजी दाखवली नाही." ह्यावरून गुन्ह्याच्या कबुलीवरून नाराजी दाखवावी असा अर्थ प्रतीत होतो आहे.

तुम्हाला नाराजी व्यक्त करायची तर जरूर करा. मात्र ज्यांनी ज्यांनी ती जाहीरपणे केली नाही त्यांनी त्यांनी अपराधी वाटून घ्यावे, +१ आणि 'मम' करावे हा नवीन पायंडा मला मान्य नाही.

धम्मकलाडूंच्या विधानाचा अर्थ मी गप्प रहा असे म्हणते आहे आणि म्हणून गुन्हेगार आहे असा असला तर तोही मला मान्य नाही.

अति अवांतर -
ज्यावरून हे सुरू झाले तो चर्चाप्रस्ताव मलाही विशेष कळला नव्हता. तो दुसर्‍या चर्चेतून उचललेल्या प्रतिसादांतून तयार झाला होता हे नंतर कळले. ते काही असले तरी बोलण्याची जबाबदारी ही ज्याने वाक्य बोलले आहे त्याचीच असते.
http://mr.upakram.org/node/3734#comment-64183 येथे "का 'सत्कार' कसा करावा यामागे पोलिस आणि न्यायाधिशांवर विश्वास नाही म्हणून लोकांनी कायदा हातात घेणे अपेक्षित आहे, 'चालू शकेल', हे मला कळलेले नाही. " अशा बाबतीत सत्कार करणे या शब्दाचा अर्थ तोंडाला काळे फासणे, चप्पल फेकून मारणे ते थोबाडीत मारणे इथपर्यंत काहीही असू शकतो. ह्या माझ्या प्रश्नाला कविता ताईंनी उत्तर दिले नव्हते. याचा अर्थ असे अपेक्षित आहे असे समजून मी नाराजी व्यक्त केली तर चालेल का?

धन्यवाद

>>तो जरूर करा. मीही करेन

धन्यवाद.

>>तुमच्या चर्चाप्रस्तावात "स्वतःच्या कॉम्प्युटरसमोर बसून, अंगाला तोशीस लावण्याची गरज नसताना, गुन्ह्याची कबूली देणार्‍या या प्रतिसादावर आपण कोणीही नाराजी दाखवली नाही." ह्यावरून गुन्ह्याच्या कबुलीवरून नाराजी दाखवावी असा अर्थ प्रतीत होतो आहे.

मी फार चांगला लेखक नाही. मला जमेल तसे लिहितो पण "कबूली देणार्‍या प्रतिसादावर नाराजी" आणि "कबुलीवरून नाराजी" यांचा अर्थ वेगळा होतो. मी कबुलीवरून नाराजी लिहिलेले नाही.

>>ज्यांनी ज्यांनी ती जाहीरपणे केली नाही त्यांनी त्यांनी अपराधी वाटून घ्यावे, +१ आणि 'मम' करावे हा नवीन पायंडा मला मान्य नाही.

तसा कोणताही पायंडा पाडावा असे मी सुचवलेले नाही. नाराजी व्यक्त का केली नाही यावर आश्चर्य प्रकट केले आणि शंका घेतली.

तुमच्या अवांतराला मी उत्तर देणे लागत नाही पण इतके बोललो आहे तर "दोन पैसे" अधिकचे. कविता महाजनांनी उत्तरे दिली नाही यावर तुम्ही नाराजी वर दाखवलीतच. यापुढे त्यांच्या फेसबुकवर जाऊन, इमेल करून नाराजी व्यक्त करू शकता. खबरदार यांच्या चर्चेत काही लोकांनी ती केली होती. त्यात् तुम्हीही होता. मी ज्या संकेतस्थळांवर वावरतो तिथे अनेकदा 'हा प्रतिसाद काढा, हा लेख काढा, निषेध व्यक्त करतो' असे अनेक सदस्य म्हणतात. परंतु उत्तर न देणे, अश्लील लिहिणे, धोरणांना सोडून लिहिणे हे भारतीय दंडविधानानुसार गुन्हे असतीलच असे नाही. मला केवळ गुन्ह्यांच्या निषेधात इंटरेस्ट आहे आणि इतरत्र निषेध आणि नाराजी व्यक्त करणार्‍या सदस्यांनी येथे नाराजी का व्यक्त केली नाही हे विचारण्याचा हक्कही आहे. बाकीच्यांना जे करायचं ते करायला ते मोकळे आहेत.

तेच ते

>कबूली देणार्‍या प्रतिसादावर नाराजी" आणि "कबुलीवरून नाराजी" यांचा अर्थ वेगळा होतो.
गुन्ह्याची कबूली देणार्‍या या प्रतिसादावर ह्यात गुन्ह्याची यात पूर्वीचा गुन्हा झाला आहे त्याबद्दल नाराजी असा अर्थही प्रतीत होतो आहे असे म्हणायचे होते. हे कळले नसल्यास ठीक आहे. सोडून देते.

>परंतु उत्तर न देणे, अश्लील लिहिणे, धोरणांना सोडून लिहिणे हे भारतीय दंडविधानानुसार गुन्हे असतीलच असे नाही.
उत्तर न देणे हा गुन्हा आहे असे मी सुचवले हे कोठे दिसले? धोरणांना सोडून लिहीले हा गुन्हा आहे असे मी म्हटले आहे? अश्लील लिहीण्याबद्दल मी गुन्हा म्हटलेले नाही (असल्यास मला कल्पना नाही , पण नसावा असे वाटते).

>कविता महाजनांनी उत्तरे दिली नाही यावर तुम्ही नाराजी वर दाखवलीतच.
त्यांनी उत्तरे दिली नाहीत असे मी म्हटलेले नाही. तर मी विचारलेल्या स्पेसिफिक प्रश्नाचे स्पेसिफिक उत्तर मिळाले नाही.

>नाराजी व्यक्त करणार्‍या सदस्यांनी येथे नाराजी का व्यक्त केली नाही हे विचारण्याचा हक्कही आहे.
त्याच न्यायाने मी जर मागील गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त केली, रडारड केली, तर मला बॅगेज आहे असे म्हणण्याचा 'हक्क' वापरू शकता, पण त्यात दम नाही.

असो, जरा विराम घेते, बाकीच्यांना बोलू दे.

गौण आहे

>>>>कबूली देणार्‍या प्रतिसादावर नाराजी" आणि "कबुलीवरून नाराजी" यांचा अर्थ वेगळा होतो.
गुन्ह्याची कबूली देणार्‍या या प्रतिसादावर ह्यात गुन्ह्याची यात पूर्वीचा गुन्हा झाला आहे त्याबद्दल नाराजी असा अर्थही प्रतीत होतो आहे असे म्हणायचे होते. हे कळले नसल्यास ठीक आहे. सोडून देते.

>परंतु उत्तर न देणे, अश्लील लिहिणे, धोरणांना सोडून लिहिणे हे भारतीय दंडविधानानुसार गुन्हे असतीलच असे नाही.
उत्तर न देणे हा गुन्हा आहे असे मी सुचवले हे कोठे दिसले? धोरणांना सोडून लिहीले हा गुन्हा आहे असे मी म्हटले आहे? अश्लील लिहीण्याबद्दल मी गुन्हा म्हटलेले नाही (असल्यास मला कल्पना नाही , पण नसावा असे वाटते).

>कविता महाजनांनी उत्तरे दिली नाही यावर तुम्ही नाराजी वर दाखवलीतच.
त्यांनी उत्तरे दिली नाहीत असे मी म्हटलेले नाही. तर मी विचारलेल्या स्पेसिफिक प्रश्नाचे स्पेसिफिक उत्तर मिळाले नाही. <<<<

वरला संवाद अतिअवांतर असल्याने त्यावर बोलून माझी चर्चा भरकटवण्यास तुम्हाला हातभार लावत नाही पण एकच सांगतो - तुम्ही सुचवले, तुम्ही म्हटले असे मी माझ्या प्रतिसादात लिहिलेले नाही. पुन्हा जरूर वाचा.

>>मी जर मागील गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त केली, रडारड केली, तर मला बॅगेज आहे असे म्हणण्याचा 'हक्क' वापरू शकता, पण त्यात दम नाही.

दम नाही हे गौण आहे. अंडरलाइन केलेली वाक्ये तुम्ही स्वतःच लिहिलित हे बरे झाले. तुम्ही इतर गोष्टी मध्ये आणून काय दाखवू पाहत होता हे मला कळल् नाही पण तुमचे शब्द आणि शुचिताईंचा प्रतिसाद मिळताजुळता असावा अशी शंका आली होती. यापुढे तुमच्याशी बोलताना विशेष काळजी घेईन. वर काही कमीजास्त बोललो असेन तर माफी मागतो.

रजा घेतो.

पुरे आता!

पुरे आता! उगीच सुतावरून स्वर्ग गाठणे होत असावे.

वेगळे वळण

पत्नीचा छळ करणे, तिला मारहाण करणे हे दखलपात्र गुन्हे आहेत असे वाटते. पैशांसाठी लुबाडणे, ठगणे हा देखील भारतीय दंडविधानानुसार दखलपात्र गुन्हा असावा असे वाटते. चूभूद्याघ्या. आणि असे करताना कुणी दिसला तर मला बेल वाजविण्याचा अधिकार आहे. नव्हे ते माझे कर्तव्य आहे. गप्प बसणे, बसवणे किंवा त्यासाठी उद्युक्त करणे गुन्ह्यापेक्षा कमी नाही.

मात्र एखाद्या वादविवादात विचारांवर टीका करणे, त्यासाठी उपहासाची, उपरोधाची मदत घेणे हा काही गुन्हा नाही. एखाद्याचे मत मला पटले नाही, हास्यास्पद वाटले तर तसे सांगण्याचा मला अधिकार आहे.आणि कुणाचा व्यवसाय नाराजी व्यक्त करणे असल्यास त्यामुळे कुणाचे नुकसान व्हायला नको. मग विरोधी पक्षाने काय करावे? असो. टिंगलटवाळी, खिल्ली, उपरोध, उपहास ही सगळे विरोधाची अस्त्रे आहेत. आक्रंदणे हेही एक शस्त्रच आहे. पण कुणाचे ह्यावर सध्या काही बोलणार नाही.

आणि शिवीचे म्हणाल तर आधी दिलेली शिवी शिवी आहे हे सिद्ध करावे लागेल. तुम्ही ज्याला शिवी म्हणता ती इतरांसाठी अतिशय किरकोळ टीका असू शकते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वाक्य अयोग्य ठिकाणी

"पण त्याला नाराजी दाखवली नाही हे खरे. " हे वाक्य चुकीच्या ठिकाणी पडले आहे. ते "मात्र हा प्रतिसाद वाचूनही उलट लिहीले नव्हते." यानंतर लगेच हवे.

उपक्रमींनी का करावे?

इंटरनेट युजरने त्या युजरबद्दल लिहिलेली माहिती खरी की खोटी हे कसे ठरवावे? मी रावले यांना मारहाण करताना पाहिले नाही. एकही प्रत्यक्षदर्शी माझ्या परिचयाचा नाही. (किंबहुना त्यांचे खरेच लग्न झाले आहे का हे ही माहित नाही) अशावेळी त्यांनी त्यांचा मुद्दा पटवण्यासाठी त्यांच्या जालीय आयडीने काहिहि लिहिलं तर एका मर्यादेबाहेर उपक्रमींनी काहि करावे असे वाटत नाही.

अर्थात, रावले यांनी ही माहिती आधीही दिल्याचे आठवते (प्रतिसाद शोधण्यात इंटरेस्ट नाही). त्यावेळी उपक्रमींनी नाराजी व्यक्त केल्याचे आठवते. आता दर वेळी तेच ते लिहिण्यात काय हशील असे समजून मी तरी गप्प बसलो. (इतर अनेकांचेही तसेच कारण असावे असा अंदाज आहे)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

अच्छा!

>>इंटरनेट युजरने त्या युजरबद्दल लिहिलेली माहिती खरी की खोटी हे कसे ठरवावे? मी रावले यांना मारहाण करताना पाहिले नाही. एकही प्रत्यक्षदर्शी माझ्या परिचयाचा नाही.

यनावाला आणि शरद यांना पाहिले आहे काय? त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेला होता काय? नसेल तर उठून अभिनंदन कसे केले? या संकेतस्थळावर जे लिहिलं जातं त्याचा जबाबदार तो मनुष्य असतो.

>>अर्थात, रावले यांनी ही माहिती आधीही दिल्याचे आठवते (प्रतिसाद शोधण्यात इंटरेस्ट नाही). त्यावेळी उपक्रमींनी नाराजी व्यक्त केल्याचे आठवते. आता दर वेळी तेच ते लिहिण्यात काय हशील असे समजून मी तरी गप्प बसलो. (इतर अनेकांचेही तसेच कारण असावे असा अंदाज आहे)

असे झाले असल्यास मला त्याची कल्पना नाही.

गैरलागू

यनावाला आणि शरद यांना पाहिले आहे काय?

मी पाहिले नसले तरी त्यांना प्रत्यक्ष पाहणार्‍या व्यक्ती माझ्या परिचयात आहेत

त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेला होता काय?

पुस्तक प्रकाशित झालेले प्रकाशनाला न जाताही वेरीफाय करता येते

नसेल तर उठून अभिनंदन कसे केले?

हा प्रतिसाद देऊन अभिनंदन केले. किंबहुना गेलो नाही म्हणूनच इथे अभिनंदन केले. नाहितर तिथेच नसते का केले?

या संकेतस्थळावर जे लिहिलं जातं त्याचा जबाबदार तो मनुष्य असतो.

बरं मग? मी म्हटले आहे अश्या वक्तव्यांवर (जे वेरीफाय करणे जवळजवळ अशक्य आहे) एका मर्यादेबाहेर उपक्रमींनी काहि करावे असे मला वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे. जर कोणी उपक्रमी काहि करत असेल तर त्याला आडकाठी नाही (ती मी करूच शकत नाही).

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

मर्यादेबाहेर

>> पुस्तक प्रकाशित झालेले प्रकाशनाला न जाताही वेरीफाय करता येते

पण प्रतिसाद वेरिफाय करायच्या आधीच दिलात तो शरदनी लिहिलय ते खरं मानून हो की नाही? मग रावलेंचे खरे का मानायचे नाही?

>>बरं मग? मी म्हटले आहे अश्या वक्तव्यांवर (जे वेरीफाय करणे जवळजवळ अशक्य आहे) एका मर्यादेबाहेर उपक्रमींनी काहि करावे असे मला वाटत नाही.

मर्यादेबाहेर काही करा असे मी म्हणालो का चर्चेत कुठे? नाराजी व्यक्त करणे हे मर्यादेबाहेर आहे का?

लेखनसीमा

पण प्रतिसाद वेरिफाय करायच्या आधीच दिलात तो शरदनी लिहिलय ते खरं मानून हो की नाही?

नाही. मी प्रतिसाद वेरीफाय करून दिला.

मग रावलेंचे खरे का मानायचे नाही?

मी चर्चेत कुठे म्हटले आहे खरे मानु नका? मी म्हटले आहे ते खरे आहे की नाही हे मला माहित नाही.

मर्यादेबाहेर काही करा असे मी म्हणालो का चर्चेत कुठे? नाराजी व्यक्त करणे हे मर्यादेबाहेर आहे का?

नाराजी व्यक्त करणे मर्यादेबाहेर आहे असे मी म्हणालो का चर्चेत कुठे?

असो या फुकाच्या प्रश्नोत्तरांना फारसा अर्थ नाही. मी मुळ विषयावर माझे मत दिले आहे व विचारणा केलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. आता एकुणच या चर्चेची गाडी अन्य रुळांवर जात आहे असा माझा समज झाला आहे. तेव्हा या विषयावर माझ्याकडून इती लेखनसीमा

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

सत्यमेव जयते, घरगुती हिंसा आणि उपक्रम : एक अवांतर.

सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ उपक्रमींची माफी मागून..

एकंदरच चर्चा वाचून, व चर्चेला लागणारी (आड)वळणे, बिटविन द लाईन्स लिहिलेले इ. जे दिसले, तसेच क्ष वर्षांपूर्वी काय झाले, अन् मग त्यावेळी तुझ्या माहेरचे ते कसे वागले, अन् तुमच्या घरात् हे असेच असते असले संदर्भ, जसे नवराबायकोच्या भांडणात उकरून काढून उगाळले जातात, तशीच इथे उपक्रमावर 'घरगुती (शाब्दिक) हिंसा' सुरू आहे असे माझे एकंदर मत बनले आहे.

तेंव्हा चर्चेचे शीर्षक तरी अत्यंत "Apt" आहे असे म्हणावे लागेल..

लोकहो!

आता प्लीज आवरा...

(घरात नव्याने रहायला आलेला, घरचाच बनू इच्छिणारा) आडकित्ता

हाहाहा!

मस्त! :-)

+१

:))
मस्त +१

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

क्ष वर्षांपूर्वी काय झाले

क्ष वर्षांपूर्वी काय झाले हा उपक्रमींचा आवडता छंद दिसतो. तुम्ही ड्युप्लिकेट आयडीच असे समजून हिंसाचार करायला इथल्या बायकाही पुढे असतात. माझी खरडवही बघा. सर्व संशय दूर होतील.

>>तेंव्हा चर्चेचे शीर्षक तरी अत्यंत "Apt" आहे असे म्हणावे लागेल..

मी चर्चा सुरु करताना माझ्या मनात "घरगुती हिंसा आणि उपक्रम" असा विचार नव्हता.

दादा,

माफी वरच मागितली आहे..
माझा प्रतिसाद कुणालाच व्यक्तिशः उद्देशून नव्हता, तुम्हालाही नाही. 'बाय चान्स' जे दिसले, त्यात थोडी विनोदी झाक दिसली, त्याबद्दल निरिक्षण नोंदविले आहे. पुनः एकदा क्षमस्व!

सुज्ञ सदस्यांनी आवरते घ्यावे

सुज्ञ सदस्यांनी आवरते घ्यावे, ही विनंती. म्हणजे मग मला थोडी लुडबुड करायला अवसर मिळेल.

जरूर करा

तुमचीच कमी होती. :-)

 
^ वर