प्रेमात पुरुष मागासलेला!

‘धुंवाधार’ प्रेम करणं पुरुषाला अजूनही उत्तमप्रकारे जमत नाहीच. प्रेम असं केलं पाहिजे की ज्याची मनावरही अन् तनावरही खोल जखम व्हायला पाहिजे. ती ठसठसणारी किंवा भळभळत राहणारी असली पाहिजे. तेच खरे प्रेम. नाहीतर आज प्रेम केलं, उद्या तिनं झिडकारलं, परवा ती दुसऱ्याचबरोबर नांदू लागली हे काही पुरुषाच्या दृष्टीने चांगले घडत नाहीये बरं का! आजकाल कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित राहणारी असंख्य डिव्होर्सची प्रकरणे कशाची द्योतके आहेत? प्रेम करण्यात पुरुष खूपच मागासलेला आहे असेच म्हणावे लागेल. जो एका स्त्रीला हवं ते प्रेम भरभरून देऊ शकत नाही तो कुठेतरी कमी पडतो आहे हे निश्चित.
पूर्वी असं नव्हतं का? होतं. परंतु त्याकाळी स्त्रीची उघड बोलण्याची शक्ती जागृत झालेली नव्हती. स्त्री शक्ती वगैरे फंडा त्यावेळी अस्तित्वात नव्हता. मूग गिळून गप्प बसणे हा सर्वमान्य तोडगा होता. स्त्रीची तृप्ती कशात आहे हे तिलाच स्वतःला कळत नव्हते, जरी कळाले तरी ते मिळवायचे कसे यावर मोठी बंधने होती. आज परिस्थिती बदलली आहे. मुक्ततेचे वारे घेऊन ललना अधिकच समंजस तितक्याच टोकदार झालेल्या आहेत. मानव प्राणी म्हणून आपल्यालाही हवे ते मिळविण्याचा अधिकार असल्याचे समुपदेशाकापुढे ठासून सांगण्यात आजची स्त्री तरबेज झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक विवाह टिकवून धरण्यापेक्षा जुने मोडून नवे ते हवे हवे म्हणत विभक्त होण्याचा घाट पुरुषापेक्षा स्त्रीकडूनच अधिक घातला जातो. वैवाहिक जीवनात कुठली उणीव राहिली हे पुरुषाला अजूनही कळलेले नसते. तो बापुडा माझं काय चुकलं? असंच घोकीत राहतो. तिची चीडचीड तो थंडावू शकत नाही हेच त्यामागील कारण होय. कितीही हाल अपेष्टा काबाडकष्ट सोसण्याची तिची तयारी असते जेव्हा तो तिच्यावर मुक्तहस्ते प्रेमाचा वर्षाव करू शकेल, जेव्हा ती त्याच्याकडून मिळणाऱ्या तुडुंब प्रेमाने भारीत होऊन बेहोशीची मजा लुटून निश्चिंत राहत असेल अन् जेव्हा तो तिला पुरुनही उरत असेल!
म्हणूनच आजचा भारतीय पुरुष प्रेम करण्याकामी फारच मागासलेला आहे असे खेद पूर्वक म्हणावे लागते. एका सर्वेक्षणानुसार भारतातील फक्त दहाच टक्के स्त्रियांना सुखाची जाणीव झालेली असते. इतर नव्वद टक्के स्त्रिया अजूनही अनभिज्ञ राहून ढगात जाणाऱ्या गोळ्या झेलीत आयुष्य कंठतात. त्यांना खरे प्रेम कधीच मिळालेले नसते, त्यामुळे त्या कंबरदुखी, पाठदुखी, चिडचिड, त्रागा, राग, द्वेष, अनुत्साह, नैराश्य अशी लक्षणे व्यक्त करीत राहतात. यामागे अतृप्तता हे प्रमुख कारण असले तरी पुरुष त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून माझ्यात काहीच कमी नाही असे खोटे खोटे भासवीत जातो. खरे तर स्त्रीची सुख\पूर्ती कशात आहे हे काही त्याला कळलेले नसतेच. त्याचा कार्यभाग संपला की तो दूर होणेच पसंद करतो. शिखरावर चढाई करतांना मध्यातूनच माघार घेतल्याने अस्मानसे गिरे सारखी अवस्था अधुऱ्या स्त्रीची होऊन जाते. तिची तगमग दुसरा पुरुष मिळविण्याच्या मार्गाने नकळत होत जाते. आणि यात गैर ते काहीच नाही. तू नही तो और सही असा कायदा स्त्रीसुद्धा पुरुषाला सुनावू लागली आहे. आजकाल प्रत्येक ऑफिसमधून झडणारी अफेअर्सची चर्चासत्रे कशाचे लक्षण आहे? भारतात एकही कार्यालय असे नाही की जिथे अशा घरवाले बाहरवाले प्रकार नसतो. मग आता खरी पुरुषाने स्वतःतील प्रेम करण्याबाबतचे न्यूनत्व धुंडाळण्याची वेळ आलेली आहे.
आंधळा कारभार...
‘भारतीय पुरुष सध्या अंधारात चाचपडत जगतो आहे, त्याला अजूनही खरे कामविश्व कळलेले नाही. याबाबत त्याचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झालेली आहे...’ हे काही माझे वैयक्तिक मत नव्हे, गेल्या काही महिन्यात (डिसें.२०११) सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीत ‘लैंगिक शिक्षण देणारं कुटुंब’ या लेख-मालिकेत लेखक हुजूर- राजन खान या ‘गहन’ विषयाबद्दल सडेतोड भाष्य करतांना दिसत होते.
लैंगिकतेबद्दल आपली रूढ झालेली छुपी पद्धत त्यांना बिलकुल आवडली नाही. सेक्स हा विषय जीवनाचे अविभाज्य ‘अंग’ असतांना त्याबाबत कमालीची गुप्तता पाळणे, त्याबद्दल जाहीरपणे लिहिणे-बोलणे, त्याविषयीचे मतप्रदर्शन त्याज्य समजणे फार चुकीचे आहे, असे ते म्हणतात. एका सर्वेक्षणानुसार भारतातील केवळ दहा टक्के स्त्रियांनाच कामतृप्तीचा अनुभव येत असतो. इतरजणी मुग गिळून गप्प राहतात. काहींना तर तृप्ती म्हणजे काय हे आयुष्यभर उमजलेले नसते. केवळ एका यांत्रिक क्रियेचा भाग म्हणून त्या लैंगिक संबंध पार पडतात. ज्यांना हे जाणवते पण पुरुषाकडून मिळत नाही त्या मात्र ‘आहे त्यात समाधान’ मानत संसार कडेला लावतात. खरे तर या अंधारातल्या क्रिया उजेडात आणून निदान नवरा-बायकांनी तरी चर्चेला घ्याव्यात, त्यातील अधिक-उणे व्यक्त करावे, जाणून घ्यावे, त्रुटी दूर करून निश्चिंत व्हावं असाच त्या लेख मालिकेमागील उद्देश होता. कुटुंबात या विषयी उघड चर्चा व्हावी असे त्यांचे प्रांजळ मत होते. हे सद्य परिस्थितीत शक्य नसले तरी काळाची गरज म्हणून येत्या काही दशकांत चर्चेला घेतले गेले तर त्यात वावगे असे काहीच समजू नये.
उदाहरणादाखल काही रुढी-परंपरा उधृक्त कराव्याशा वाटतात.-
काही आदिवासी जमातींमध्ये आपल्याला आवडलेल्या मुलीला मुलगा पळवून नेतो. त्यावेळी ते दोघेच स्वतःचे जीवन स्वतःच कंठत असतात. एकटेच राहतात, शिकार करतात, खातात, पितात, मौजमजा करतात. त्या दोघांचे पटले (अनेक अर्थांनी) तर ती मुलगी त्याच्या सोबत राहते. अन्यथा तिला त्या मुलाला अव्हेरण्याचा अधिकार असतो. म्हणजे तिला पाहिजे ते सुख मिळवून देण्यासाठी तो तिला पळवून नेण्याआधीच तयारीत असतो. जोवर त्याला स्वतःविषयी दृढ विश्वास वाटत नाही तोवर तो पोरगी पळवून नेण्याची भाषाच करू शकणार नसतो. अन् त्याच्यात योग्य ‘धमक’ असेल तरच ती त्याचसोबत राहण्याचा हट्ट धरते. तो जर तिला ‘सुखा’त ठेवू शकला नाही तर त्याला दुसरी मुलगी शोधावी लागते. इतके होऊनही त्या जमातीत अशा अनेक ठिकाणी फिरून आलेल्या मुलींना व्हर्जिनिटीचा प्रश्नांकित शिक्का मारुन टाळले जात नाही हे विशेष. आजच्या हायटेक पिढीत हा मुद्दा जास्त चर्चिला जात असला तरी पुरुषाला ‘त्या’तलं काय येतं, ‘त्या’वेळी तो कसं वागतो? असे प्रश्न विचारात घेतले जातच नाहीत. खरे तर त्याच्याच वयाच्या एखाद्या मध्यस्थाला पुढे घालून त्याचं लैंगिक वर्तन जाणून घेणे अतिमहत्त्वाचे असते, जे की वधूपक्षाकडून सोईस्कररीत्या टाळले जाते.
काही जमातींतील मोठी माणसे आपल्या वयात आलेल्या मुलांना मुद्दामहून प्राण्यांचा समागम प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजावून सांगतात. त्यामुळे त्यांना त्या क्रीयेविषयी अजिबात लाज वाटत नाही वा त्या गोष्टीचे दडपण येत नाही. शिवाय अशा क्रियेचा मोठीच माणसे परिचय करून देत असल्याने बाऊ करण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो. प्रत्यक्ष क्रीडेच्यावेळी त्यांची लैंगिक भूक यथोचित शमत असेल यात शंका नसावी. आपण सुशिक्षित मात्र अशा दृश्यांपासून मुलांना चार हात दूर ठेवतो, ते वाईट कसे आहे याचे चरित्र गात राहतो आणि केवळ तेच म्हणजे जीवन नाही हेही बिंबवत जातो. खरे तर त्याच्याशिवाय जगणे पूर्ण होत नाही. परंतु आपल्या अशा दडपून टाकण्याच्या वृत्तीमुळे होतं काय की कुतूहलापोटी नको त्या मार्गाने स्त्री-पुरुष संबंधाची चित्रे वा ब्ल्यू फिल्म्स तरुणांकडून पाहिल्या जातात. त्यात दाखविलेला उत्तानपणा, भडकपणा अन् तासनतास चालणारा ‘डोंबारकी’चा प्रकार खरा वाटू लागतो. प्रत्यक्षात असे काहीच नसते. स्त्रीला तृप्ती मिळवून देणे ही वेगळीच ‘कामकला’ आहे. ती ‘अनुभवानेच’ शिकून घेण्याचा शाप आजच्या भारतीयाला मिळालेला आहे. स्त्रीच्या कामतृप्तीबद्दल योग्य ते मार्गदर्शन कोणीच करीत नाही. जे काही सांगितले जाते ते अतिशयोक्त किंवा अशास्त्रीय असे असते. मुळात हे लैंगिक संवेदनेचे ज्ञान पालकांनीच देणे क्रमप्राप्त असतांना ते कानावर हात ठेवतात, बाजूला होतात. ‘तू अन् तुझे लैंगिक जीवन. तुझे तूच निस्तर.’ असे म्हणत काखा वर करून मोकळे होतात. अशावेळी बाहेरच्या जगाकडून अयोग्य ज्ञान पदरात पाडून घेण्याकडे मुलांचा कल वाढतो. आणि ट्रिपलएक्स मध्ये दाखवतात तसेच प्रात्यक्षिक करायला गेल्यावर नववधू भडकणार नाही तर काय हो? कदाचित किंचाळत पळेलही किंवा नवऱ्याला काहीच ‘जमत’ नाही म्हणून माहेरी गेलेली थेट कोर्टातच भेटेल!
आणखी एक गोष्ट राजन खान यांनी नमूद केलीय की भारतीयांचे लग्न फारच उशिरा होते. पैसा ही बिनीची वस्तू बनल्याने अथवा करियर हा शब्द प्राधान्याने अमलात आणण्याच्या धडपडीपायी आजचा तरूण आपल्या तारुण्यसुलभ भावना अक्षरशः दडपून टाकीत चालला आहे. ज्यावेळी त्याचं करियर पार पडतं त्यावेळी त्याने आयुष्याची तीस वर्षे मोजलेली असतात अन् त्यामुळे ‘वयात आल्या’नंतरची पंधरा वर्षे सक्तीचे ब्रह्मचर्य (फार फार तर ‘आपला हात...’ असे व्रत) पाळलेले असते. रोज उफाळणार्यात लाटा थोपविलेल्या असतात, लैंगिक संवेदना गोठविण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण असं काही अनैतिक करणं म्हणजे व्यभिचार होय, अशी व्याख्या त्याच्या डोक्यात फिट्ट रुतलेली असते. लग्नापूर्वी संबंध येऊ देऊच नये हा संस्कार वादाचा मुद्दा ठरावा, इतका पोकळ बनत चालला आहे. भारतीयाला कामक्षयाची व्याधी जडलीय हे कुणी मान्यच करायला कबूल नाहीत. आपला कार्यभाग उरकला की संपली क्रीडा असा पुरुषी वर्चस्वाचा मानदंड स्वीकारला गेला आहे. स्त्रीचे स्खलन झाले आहे की नाही, तिला या यांत्रिक क्रियेतून लैंगिक समाधान मिळाले आहे की नाही किंवा ती अशा अपूर्ण संबंधामुळे त्रासली आहे काय? याचे ना कधी चिंतन होते ना कधी विचारपूस केली जाते. वाढत्या वयामुळे येणारे शैथिल्य कोणीच रोखू शकत नसते. त्यावर मात कशी करायची याचे शास्त्र जाणून घेण्याऐवजी तरूण मुले व्हायेग्रा सारख्या धोकादायक गोळ्यांना बळी पडतात. हार्डकोरच्या लालसेपोटी स्त्रीवर प्रेमाचा वर्षाव करणे, तिच्या शृंगाराला दाद देणे, तिला समजून घेत यथास्थित परमोच्च बिंदू गाठून देणे हे साफ विसरत चालला आहे.
योग्य वयात लग्न झाले की तारुण्याचा उन्माद यशस्वीरित्या शमवता येतो. उशीर होत गेला की संवेदना बधीर होत जातात, उत्साह बोथट होत जातो. वयात आल्यावर जे हवं असतं, शरीराकडून ज्याची वारंवार विचारणा होत असते तेच तरुणांना मिळत नाही. मग ते त्यांना पटेल त्या वाटेने जात राहतात, चुकीच्या पद्धतीने भावना मोकळ्या करीत राहतात किंवा गैरमार्गाने भूक भागवित जातात. शास्त्रोक्त ज्ञानाची गरज असतांना काहीतरी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन वागावे लागते, त्या अवैज्ञानिक कृती पडताळून पहाव्याशा वाटतात. मग जे चुकीचे आहे तेच बरोबर वाटून त्या पद्धतीचा अवलंब करीत वैवाहिक जीवन सुरु होते अन् काहीच अनुभव नसलेल्या ड्रायव्हरला अवघड घाट पार करण्यास सांगावे तशी गत त्या नवशिक्याची होऊन जाते. यावरून पाहिल्या रात्रीचा ‘गलीतगात्र’ अनुभव अनेकांना अजूनही जसाच्या तसा आठवू लागेल. शारीर ज्ञानाची गरज असतांना कोणतंही नवं जोडपं या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतांना आढळत नाहीत वा एखाद्या तज्ञाचा सल्ला घेत नाहीत. ‘ज्यांचं बेडवर जमतं त्यांचं उभ्या आयुष्यात चांगलं जमतं’ ही उक्ती तर प्रत्येकाला माहितीच असली पाहिजे.
पण आपल्या समाजाची शोकांतिका हीच की या अत्यावश्यक लैंगिकतेला अश्लीलतेच्या झापाखाली डालून ठेवले जात असते. कितीतरी लैंगिक समस्यांनी ग्रस्त असलेले पुरुष खरोखर ‘तसे’ नसतातच. फक्त त्यांचे वर्तन कुठेतरी चुकत आलेले असते. तसे पाहता आपण भारतीय लोक या विषयांत बहुत पारंगत होतो असे प्राचीन ग्रंथांवरून लक्षात येईल. खजुराहोची लेणी असो व वात्सायनातले संस्कृत श्लोक यावरून कोणेएके काळी आपला समाज कामक्रीडेत खूपच प्रगत होता असे म्हणता येईल. त्याकाळी आपले राजे महाराजेच नव्हे तर सामान्य पुरुषदेखील दोन-दोन तीन-तीन बायका करून ‘मजेत’ जगत होता. बहुपत्नीत्व त्यावेळी मान्य होतं. आता मात्र या सर्वावर बंदी का आलीये न कळे. की खरेच पुरुषाला अनेक व्यवधाने असल्याने या प्रमुख कारभारात पारंगत होण्याची त्याला आवश्यकता वाटत नाहीये. की हायब्रीड खाण्याने वा निकृष्ट फास्टफूड सेवन करण्याने त्याच्यातील ‘क्षमता’ कमी होत चाललीय? जरा विचार करता असे लक्षात येईल की त्या काळी एकटा पुरुष अनेक पत्नींना यशस्वीरीत्या सांभाळू शकत होता पण आजकाल त्याला एकाच बायकोला ‘सुखा’त ठेवता येत नाही, लग्नाच्या काही महिन्यांतच ती घटस्फोटाची भाषा करू लागते, यातून कोणता निष्कर्ष निघतो?
वृत्तपत्रे व मासिकांच्या (विशेषतः महिलांसाठीची मासिके) पानोपानी कामोत्तेजक गोळ्यांच्या, तेलाच्या अन् विविध लैंगिक आजारांवर मात करण्यासाठीच्या वाढलेल्या जाहिराती कशामुळे अवतरल्यात? काहीतरी समस्या निर्माण झालीय म्हणूनच ना? याला बळी पडणारे पुरुष खरोखरच यशस्वी ठरतात का? कारण अशा भोंदू वैद्यांकडे चोरीछिपेच जावे लागते. पाच-दहा हज्जाराला खड्डा बसतो. गुण कसा येईल? कारण तुम्हांला मूळचे शास्त्रीय ज्ञानच अवगत नाहीये, तुम्हांला कोणताही आजार नसून तुमची फक्त ‘भीड चेपली’ आहे. तुम्ही उगाचच या क्रियेला अश्लीलतेचे लेबल लावून अंधाऱ्या पोतडीत गुंडाळल्याने खऱ्या ज्ञानापासून तुम्ही वंचित राहिला आहात. मुख्य म्हणजे जिथे स्त्रीलाच आपले ‘शारीर’ नीटसे उमजलेले नसते, स्वतःचा ‘जी स्पॉट’ माहितीच नसतो तिथे पुरुषाला ‘आंधळा कारभार’ करीत राहणे क्रमप्राप्त ठरले आहे. आणि हेच आंधळं प्रेम करणं त्याच्या ‘मागासलेपणाचं’ अभिलक्षण म्हटलं पाहिजे. यावर मात करून जे सुशिक्षित झाले ते सर्वार्थाने सुखी झाले...

Comments

निर्भेळ आणि भेळ

*मानव प्राणी म्हणून आपल्यालाही हवे ते मिळविण्याचा अधिकार असल्याचे समुपदेशाकापुढे ठासून सांगण्यात आजची स्त्री तरबेज झाली आहे.
*एका सर्वेक्षणानुसार भारतातील फक्त दहाच टक्के स्त्रियांना सुखाची जाणीव झालेली असते.
*त्याचा कार्यभाग संपला की तो दूर होणेच पसंद करतो.

डॉक्टर, एकंदरीत तुमची प्रेमाची व्याख्या काय असावी याबद्दलचा आमचा अंदाज चुकीचा नसावा ह्यासाठी वरील वाक्ये उद्धृत केली आहेत. असो.
तुम्ही म्हणता तश्य़ा स्रियांच्या अपेक्षा वाढल्या आहेतच (त्या रास्तच आहेत)
आणि पूरूष बिच्चारे अजूनही जून्या काळातच चाचपडत आहेत.

शेवटी काही जूनी जळमटे झिडकारल्यावाचून निर्भेळ (तशी मिसळ / भेळही चवदारच असते म्हणा.) सुख घेणे शक्य नाहीच.

कोण शहाणं? कोण मुर्ख?

बर्‍याच दिवसांनी चांगला व बोल्ड लेख उपक्रमावर वाचायला मिळाला. डॉक्टरसाहेब तुम्हाला धन्यवाद!

प्रेम म्हणजे फक्त कामक्रिडा असते कां? असा प्रश्न पुढे आला कि उत्तर मिळते - नाही.
प्रेम हि कामक्रिडेसाठीची सुरवात असते. व प्रेमापेक्शाही कर्तव्य श्रेश्ठ असे मी मानतो.

मला लग्नाआधी ज्या मुली आवडल्या त्यांना मी आवडलो नव्हतो. ज्यांना मी आवडलो होतो त्या मला आवडल्या नव्हत्या. व 'जीच्यावर प्रेम करेन तिच्याशीच प्रणय करेन', असे मनात ठरवले होते. त्यामुळे अनेक वर्श (संधी मिळूनही) खातं काही उघडलंच नाही.

कचेरीतील एका तसला अनुभव असलेल्या एका सहकार्‍याच्या मदतीने प्रणयाचा पहिला अनुभव 'बाहेर जावून' 'पाचसौ रुपया एक घंटा' ह्या दराने व कालमर्यादेत एका गलिच्छ ठिकाणी घेतला. त्या अनुभवाने मला तर अगदी विरक्तीच आली होती. (ये दुनिया, ये मैहफिल, मेरे 'काम' कि नही...!)

अडतीसाव्या वर्शी, घरच्यांच्या - 'जातीतलीच पाहिजे' ह्या अटीनुसार लग्न केलं. बायकोचं वय त्यावेळी सदतीस वर्श. मधुचंद्राला केरळला गेलो असताना दुसर्‍या दिवशीच माझ्या 'पत्नीने घटस्फोट पाहीजे' चा लकडा लावला. माझ्या पत्नीला देखिल इतक्या वर्शात 'मनानं एकटं' रहायची सवय लागली होती/ अजूनही आहे.

'प्रेम सहवासातून उत्पन्न होतं, कर्तव्याचे पालन करीत गेल्यास ते फोफावत.' ह्या आशेवर मी संसार करीत आहे.

भारतीय पुरुश प्रेमात मागासलेला आहे कि नाही हे मला माहित नाही. पण भारतीय स्त्रीया तरी प्रेमात पुढारलेल्या आहेत कां? - असे मी विचारेन. घटस्फोटाचं वा बाहेरख्यालीपणाचे वाढंत प्रमाण हे दुसर्‍या अंगाने भारतीय स्त्रीयादेखील मुर्ख, बुद्धू आहेत हेच सुचवतात नां?

'स्त्रीशी कसं वागायचं?' हे एक स्त्रीच, नव्हे 'एक अनुभवी स्त्रीच' नवख्या पुरुशाला व्यवस्थित सांगु शकेल. फक्त तो व्यवहार 'पैश्यावर' आधारलेला नसावा. या आधी मी यासंबंधातील एक प्रतिसाद 'मीमराठीवर' दिला होता तोच इथे परत चिकटवतो.

-

पहीला टप्पा :
लैगिंकतेबाबत माहीती देणं/मिळवणं.
हा विशय तरुण वयात येणार्‍यांना 'शरीरशास्त्र + तेजोवलय शास्त्र' यांची सरमिसळ करून शिकवता येईल.
मुख्य उद्देश "लहान मुलां-मुलींच्या निरागसतेला कोणताही ओरखडा न लावता/लागू देता त्यांना माहीती देणं." हा ठेवावा लागेल.

मुलं-मुली सद्न्यान झाल्यानंतर....?
सायकलबद्द्ल (लैंगिकतेबद्दल) माहीती देणं वेगळं,
सायकल चालवायची कशी? (लैगिंगतेच्या उर्मीतून येणार्‍यां भाव-भावनांना हाताळायचे कसे?) हे वेगळं!
'सायकल चालवायची कशी?' (कामक्रिडा) हे मात्र प्रत्यक्षच शिकवावे लागेल.

दुसरा टप्पा : कोणत्याही 'कृती' ला काहीतरी 'कारण' असते, असावे लागते.
म्हणूनच प्रणयाचा उंबरठा कोणत्या 'कारणासाठी' ओलांडायचा?
- नैसर्गिक उर्मीतून वा गरजेतून
- कुटुंब व्यवस्थेसाठी (कारण त्यातून मिळणार्‍या सुरक्षिततेसाठी)
- समाजात राहतो तेव्हा बहुतेक जण जे करतात म्हणून तेच करावे म्हणून.

----
विशयाचा एक पैलू :
अध्यात्मिक द्न्यानाचे - ब्राह्मणांचे युग येऊन गेले, तलवारीचे - क्शत्रियांचे युग ही येवून गेले, जागतिक व्यापार केंद्र W.T.C. पडले आणि वैश्यांचे युग ही संपले, आता आले आहे - शुद्रांचे युग.
शुद्रांचे मुख्य गुण:-
'कोणासाठी तरी काम करीत राहणे' ,
'एखाद्या विद्येत पारंगत होवून स्वत:चे मन रिझवणे' .
शुद्रांचा मुख्य अवगुण: 'क्षणिक आनंद देणार्‍या एखाद्या क्रियेत अडकून पडणे, त्यातून बाहेर येता न येणे.'

मर्यादा:
सुखप्राप्ती साठी व दु:ख टाळण्यासाठी त्या-त्या युगात त्या-त्या युगाचे नियम पाळून राहणे मानवाला बंधनकारक आहे.

----
विशयाचा दुसरा पैलू:
प्रणयात समर्पण कसे करायचे? जोडिदाराला कशा प्रकारे समर्पित करायला लावायचे?
ह्या टप्प्यावर दोघंही अनाडी असून चालत नाही. एकाला अनुभव असावाच लागेल. मग 'अनुभव असावा' असे म्हटले तर, 'तो आधि कोणाला असायला हवा?'
(गृहित अटः फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन'- 'जसं मिळालं तसं दिलं')
नक्कीच, 'तो पुरुशाला असायला हवा?' पण मग, 'पुरुशाला प्रणयाचा अनुभव द्यायचा झाला तो कोण देवू शकेल?' तर मग नक्कीच, 'ती अनुभवी स्त्री असावी लागेल!'

पण मग, 'त्या स्त्रीला, जेव्हा ती निरागस व कुमारीका असेल तेव्हा त्या वेळी तिला कोण अनुभव देईल?'

-----
पर्यायी उत्तर:
हे प्राणयिक शिक्षण एकाच जातीतील निरोगी, सदृढ व निरोगी विवाहीत स्त्रीकडून त्याच जातीतील वयात येणार्‍या/ आलेल्या 'सद्न्यान व निरोगी' तरूणास त्याच्या पालकांच्याच प्रयत्नाने, पुढाकाराने मिळाले तर....!

अशी परंपरा चालू झाली तर काही वरर्शातच कोणती जातीचे पुरुश 'किती समजूतदार व शहाणे' आहेत?,
तसेच कोणत्या जातीतील स्त्री 'धीट व संभाषण कलेत चतूर' आहे ते स्पष्ट होवू शकेल.

असणारच मागासलेला

वरील लेखात जे काही लिहिलं आहे ते प्रेमाबद्दल आहे असा समज दूर होईल तेव्हा पुरूष प्रगतीकडे पहिले पाऊल टाकतील. तेव्हा कळ काढा... हे ही दिवस जातील.

समाजात मुलींची संख्या कमी होत आहे. मुलांना लग्नासाठी मुलीला हुंडा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे आणि काही महाभाग अजूनही बहुपत्नीत्व भूषवायची लालसा बाळगत आहेत त्यांनी आपले प्रबोधन करून घ्यावे आणि समाजासोबत चालावे म्हणजे मागे राहिल्यासारखे वाटणार नाही.

पालकांची जबाबदारी

काही विचारांशी सहमत.

हे थोडं खाण्याच्या आवडी सारखं आहे, पाल्याला मुलभूत खाण्याचे/चवीचे ज्ञान देणे, आहार-भाव विकसित करणे ही पालकाची जबाबदारी आहे, पण पालकांच्या अनु/उपस्थितीत पाल्य खाण्यावर नियंत्रण ठेवतो की नाही ह्याचा त्रास पालकांना म्हणावा तितका होत नाही, पण हेच गणित पाल्याच्या लैंगिक-जिवनाला उपयोगी ठरत नाही, बरेचसे पालक दिशादर्शन तर करत नाहीच पण दुर्लक्षच करतात, ह्याला कारण बहुदा पालकांची स्वतःची लैगिकतेबद्दल असणारी गोंधळलेली(अनकम्फर्टेबल) अवस्था असू शकेल.

शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे, तसेच पालकांनी समयोचित संवाद साधणे गरजेचे आहे.

वरवर बोल्ड .. कोरडा उपदेशात्मक

लेख वरवर बोल्ड वाटला तरी तितका नाहिये. अश्या प्रकारचे लेखन अनेकदा वृत्तपत्रात येते. हे लेखन (कोरडे) उपदेशपर म्हणून चांगले आहे पण त्यातून वाचकाच्या हाती ठोस काहिच लागत नाही. कोणतीही नवी -शास्त्रीय माहिती मिळत नाही.

एक उदा. देतो

ती ‘अनुभवानेच’ शिकून घेण्याचा शाप आजच्या भारतीयाला मिळालेला आहे. स्त्रीच्या कामतृप्तीबद्दल योग्य ते मार्गदर्शन कोणीच करीत नाही.

ही (म्हणजे स्त्रीयांची /पुरुषांची कामतृप्ती) कशी करावी याबद्दल शास्त्रीय माहितीपर लेखन आलं तर त्याला उपयुक्त म्हणता यावं. अर्थात, तसं लेखन केल्यावर नाके मुरडली जातील हे निश्चित (अगदी इथे उपक्रमावरही!)

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

भारताबद्दल कल्पना नाही

पण अमेरिकेत 'सायन्स' नामक वाहिनीवर या विषयावर दोन तासांचा कार्यक्रम पाहिलेला होता. कार्यकारणभाव समजून घेण्यासाठी केलेल्या काही रोचक प्रयोगांची त्यात माहिती होती. बहुदा तेव्हा रेकॉर्ड करून ठेवला होता. ते रेकॉर्डींग अजून उडवलं नसेल तर त्या कार्यक्रमातल्या माहितीसंदर्भात काही लिहू शकेन.

उघड लिहिणे अशक्य!

असं उघड उघड लिखाण येथे करता येणं अशक्य आहे. पुस्तकांची काही नावे सुचवितो, प्रत्येक पुरुषाने एकदातरी वाचावित अशी शास्त्रीय माहिती त्यात मिळेल.
१) कामसत्य- डॉ.रमेश पोतदार (एम्.डी.)/डॉ.सौ.उमा पोतदार(एम्.बी.बी.एस्)
२) प्रणय कौशल्य कसे मिळवावे?- डॉ.विवेक पाटील
३) निरामय कामजीवन- डॉ.विठ्ठल प्रभू.(एम्.बी.बी.एस्.,एफ्.सी.जी.पी.,एफ्.आय्.सी.)
४) मैक केरिज् ह्युमन सेक्श्युयालिटी
५)वर्कशॉप ऑन ह्युमन सेक्श्युयालिटी इन फॅमिली लाईफ- फॅमिली प्लॅनिंग असोशिएशन ऑफ इंडिया- बॉम्बे.
इ.इ.

चांगली माहिती.

चांगली माहिती.

बाकी ही माहिती पुरुषांसाठीच आहे हे बघुन मौज वाटली.
स्त्रियांनी वाचावीत अशीही पुस्तके सुचवावीत, इथे स्त्री सदस्याही आहेत.

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

व्वा....

थेट लिस्ट दिलीत.
इच्छुकांना अगदि व्यवस्थित शास्त्रीय माहिती मिळेल अशी आशा आहे.
संयत शब्दांत, शास्त्रीय माहिती म्हणून किंवा वैचारिक लेख/प्रवाद् म्हणून मांडणी केल्यास ह्या "विषया"चेही संस्थळांना वावडे नसावे.
एक माझ्यातर्फे सुचवणी अशी की असा एखादा लेख लिहून पहावा, पटला नाहिच तर उडवायला स्थळाचे चालक् समर्थ आहेतच. तेवढी मनाची तयारी ठेवावी.दिलेले शेरे व मते हे लेखापुरतेच आहेत हे लक्षात घेतले की त्रासही होणार नाही. लेख तगल्यास उलट अधिक चांगल्या प्रकारे चर्चा होइल, प्रकाश पडेल.
तुम्ही लेख टाकाच. सर्वांनाच सदैव सर्वच पुस्तके उप्लब्ध असतील असे शक्य नाही. महत्वाचे ठळक मुद्दे जरी मांडले गेले तरी पुरे.(उदाहरणास्तव इथल्याच कित्येक गाजलेल्या जुन्या चर्चा आहेत, विशेषतः इतिहासासंदर्भात. सर्वांनीच काही बखरी वाचलेल्या नाहित की मूळ स्रोतास हात लावलेला नाही.)

--मनोबा

प्रीस्क्रीपशन

लेखातील मते हि सद्ध्याच्या प्रचलित मतांवर म्हणजे पाश्चात्य विचारांवर बेतलेली आहेत. म्हणजे बायकांना खुश करा, त्यांना काय हवे ते जाणून घ्या, गोळ्या खा, यंत्रे वापरून इंद्रिये लांब करा इत्यादी, इत्यादी. ही भोगवादी विचारपद्धती आहे. स्त्री पुरूश ही दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

स्त्री-पुरुशापेक्शा मानवी समाज श्रेश्ठ!

मी सध्या भारतीय विचारपद्धतीला धार्जिणे असलेले एक पुस्तक वाचत आहे. त्यातील काही मते मला पटली व मी ती स्विकारली आहेत. त्या पुस्तकातील मैथुनासंबंधितचे काही परीच्छेद येथे जसे च्या तसे मांडत आहे. -

पुस्तक : मनाचे व्यवस्थापन
लेखक : संजय पंडित
पान क्रमांक: 245-246
हे जे काही घडतं ते निसर्गनियमानुसार घडत असतं. निसर्गच अशा अनामिक अबोध हूरहूर लावणार्‍या मोहक संवेदना (मेंदूत) निर्माण करतो. जसं भय जाणवतं तसंच मैथुनाची भावना पण जाणवायला लागते. पण भय जाणवताना कुठे कळतं की ही भावना आतून आहे व ती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्तरातून जाणवते. तसचं भयाची संवेदना समजून न घेतल्यामुळे कसे दुश्परिणाम होतात, फोबिया सारख्या मानसिक विकृतींना बळी पडतात, तसंच इथेही होतं. मात्र मैथुनाची संवेदना सुखद आकर्शणाच्या स्वरूपात जाणवते. आपण या (सुखद) अशा संवेदनात फसत जातो, त्यांच्या मागे भरकटत जातो. या भावना हेच सत्य, जणू ईश्वराचा कृपाप्रसाद असं वाटतं. (थँक्स टू हिंदी सिनेमा - हे माझं मत)

त्या उमलत्या वयात या संवेदना अनोख्या गूढ अदभूत असतात. प्रथमच आलेल्या असतात. त्यावेळी अशा भावनात कामवासनेचा लवलेश नसतो पण पुढची वळणं तीच असतात. त्या संवेदनांचा, भावनांचा जन्म निसर्गाने मैथून व्हावं या साठीच केलेला असतो. निसर्गाच्या स्वत:च्या अस्तित्वासाठी ते आवश्यक आहे.

अशा उमलत्या वयातील जीवांना त्या वयातच स्पश्ट कल्पना द्यायला हवी की हे काय आहे, कशासाठी आहे.

---

डॉक्टर साहेब, तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात पण उपक्रम वर प्रतिसाद देताना देखील तुम्ही रोग्याला सांगताना हि औशद घ्या, असे सांगत औशधांची नांवे प्रीस्क्रायब करून देता तशी पुस्तकांची नांवे प्रीस्क्रायब केली आहेत. तुमच्या कडे माहिती असेल, तुम्ही ती पुस्तके वाचली असतील तर तुम्हाला त्यात काय समजले ते येथे जरुर द्यायला हवे होते.

दुरुस्ती....

काही दुरुस्ती कराव्याशा वाटताहेत....

म्हणजे बायकांना खुश करा, त्यांना काय हवे ते जाणून घ्या,
हे पाश्चात्त्य कसे? ह्या सर्व गोष्टी तर आपल्याकडील कित्येक ग्रंथात सांगितलेल्या आहेतच की. अगदि शरीरशास्त्राच्या भाषेतच वात्सायनाच्या कामसूत्रातही आहेत अन् काहिसे रोमँटिक/शृंगारिक काव्यात कालिदासातही आहेच की.

गोळ्या खा, यंत्रे वापरून इंद्रिये लांब करा इत्यादी, इत्यादी.
हे सुद्धा आपल्याकडे आहेच की. भरपूर अमुक् अमुक् खा, तमुक खा म्हणजे काहीतरी भरपूर वाढेल असे काहितरी कुजबुजण्याच्या स्वरांत् बोलले जाते. सोबतच परंपरेने आलेल्या ह्या बाबतीतील् अंधश्रद्धा आहेतच. काही उपचारही आहेत; बैलाचे शिंग अन् घोड्याचे शिश्न घेउन, त्याचे चाटण बनवून् घेतल्यास भलताच "इफेक्ट" येतो अन् भरपूर मोठे होते अशा कल्पना आहेतच की. आयुर्वेदात "वाजीकरण" नावाची क्रिया फार चर्चिली जाते, आपण ऐकली असेलच.
पार वृद्ध व्यक्तिला भरपूर पौष्टिक खाउ पिउ घालून् अन् उपचार करून जवळपास् पुन्हा तरूण बनवता येते अशी काहिशी कल्पना आहे. पण अजूनतरी थेट तसे काहीही झाल्याचे ऐकिवात नाही. तरी बालाजी तांबे त्याचा फॅमिली डॉक्टर मध्ये उल्लेख करीतच राहतात. थोडक्यात, विदेशी म्हटाली गेलेली फ्याडे आपल्या संस्कृतीच्या उगमापासूनच आहेत, अगदि विदेशी लोक नव्हते तेव्हापासून.

स्त्री-पुरुशापेक्शा मानवी समाज श्रेश्ठ!

हा स्वतंत्र चर्चा विषय् आहे. मेंढी,घोडा,सिंह जसे कळपात,समूहात राहतात, तसाच काहिसा मानव समाजशील् प्राणी आहे. तो वाघासारखा एकेकटा फिरत नाही.
मग वरील् वाक्याचा अर्थ काय् घ्यायचा?

--मनोबा

समाजमान्यता म्हणजे मेंदूचा आदेश!


म्हणजे बायकांना खुश करा, त्यांना काय हवे ते जाणून घ्या

प्राचिन भारतात समाजात किती टक्का लोक लिहीता-वाचता येणारे होते? त्यामुळे वात्सायनाने हे लिहीले आहे, कालिदासाने हे लिहीले होते असं सांगत त्या गोश्टींचं सामान्य जनतेवर विशेशत: वयात येणार्‍या तरुण वर्गावर बोम्बारडींग नक्कीच होत नसावं. मुंबईतील वर्तमान पत्रे, सांजदैनिके विशेशतः इंग्रजी हेच काम करीत आहेत.

वैद्यकशास्त्राकडून औशध उपलब्ध असणं हि वेगळी गोश्ट आहे व हे 'एवढेच सत्य आहे, महत्त्वपूर्ण आहे' असं भासवत भूलवणे वेगळी गोश्ट आहे. अशी सामान्य जनतेची मास स्केलवर भूलवण्याचे प्रकार पूर्वी असते तर कुटुंबपद्धती, एकत्र कुटुंबपद्धती प्राचिन भारतातच नश्ट झाली असती. उलट भारतात फक्त टोळ्या, कबिले उरल्या असत्या.

स्त्री-पुरुशापेक्शा मानवी समाज श्रेश्ठ!

'जास्तीच जास्त जोडीदारांसोबत कामतृप्तीचा आनंद उपभोगावा नव्हे भोगावा' , हि केवळ पुरुशांचीच इच्छा असते कां? स्त्रीयांची नसते कां? मी स्वत: माझ्या आधीच्या एका कंपनीत असताना (दहा-अकरा वर्शापूर्वी) तिथे विवाहित स्त्रीया खुल्लमखुल्ला 'एकसे मेरा क्या होगा?' असे गप्पा मारताना सहज बोलून जायच्या, हे व (ह्याहून ग्रेट विचार) ऐकून चाट पडायचो.
'व्यक्ती पेक्शा समाज हित श्रेश्ठ' असे मी म्हटले आहे. जाहिरपणे स्त्रीयांचा अपमान होणे योग्य नाही. पण पुरुशांनी स्वत:हून जाहिरपणे स्त्री-पुरुश संबंधाबाबत स्वत:चा ह्या लेखाने अप्रत्यक्शपणे सुचवलेल्याप्रमाणे अपमान करणे देखील योग्य नसते. गरज दोघांना असते. कानात खाज आल्यावर बोटांनी खाजवले जाते. खाज शमल्यावर कानाला बरे वाटते. पण बोटाचं काय? त्याला काय मिळते? कान-बोट यांमधील दुवा मेंदू असतो, तसेच समाज हा स्त्री-पुरुशांमधील दुवा असतो. मेंदु जसा श्रेश्ठ, तसाच समाज श्रेश्ठ!

बोंबला....

मुद्दा काय् मांडायचाय तो आता समजतोय, पण शेवटून तिसरे आणि चौथे वाक्य, (जुनाच, पण नव्याने ऐकलेला)कान- बोट दृष्टांत अन ऑफिसमधील अनुभव म्हणजे खल्लासच की.
हॅट्स् ऑफ.

--मनोबा

 
^ वर