कोलावेरी डी

तामिळ अभिनेता धनुष याचे ‘कोलावरी डी’ हे गीत सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते आहे. रजनिकांची मुलगी निर्मिती करत असलेल्या आगामी 3 या चित्रपटासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे. अर्धी इंग्रजी आणि काही तामिळ शब्द आणि ठेका धरायला लावणारी चाल इतकेच या गाण्याचे विशेष आहेत. खुद्द धनुष च्या मते या गाण्यातील शब्दांना फारसा काही अर्थ नाही. पण आतापर्यंत (८ दिवसात) या गाण्याला 90 लाख वेळा पाहण्यात आलेय. विशेष बाब म्हणजे कॉपीराईट कायद्याचा भंग करुन हे गाणे इंटरनेटवर लिक करण्यात आले होते. धनुष व चित्रपट ३ च्या टीमने अर्थात हा कायदेभंग करणा-याचे मनापासून आभार मानले आहेत. तामिळ चित्रपटातील गीत उत्तर भारतातही विक्रमी पद्धतीने हिट होण्याचे हे दूर्मिळ उदारहण आहे. यापूर्वी ‘आ आन्टे आमलापूरो’ अशा काही बोलांचे गीतही सगळीकडे ऐकायला मिळत होते. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘जिंदगी ना मिले दोबारा’ या चित्रपटातील सेनोरिटा या गिताचा बहूतांश भाग स्पॅनिश होता तरीही भारतात ते लोकप्रिय झाले. कोलावरी डी या गीताला हिट्स देणा-या नेटयुजर्स मध्ये चिन मधील लोकांचाही मोठा सहभाग आहे. संगीताला भाषा नसते त्यापेक्षा संगीताची भाषा वैश्विक असते यावर हे शिक्कामोर्तबच म्हणावे लागेल. हिंदी चित्रपटातील बरीच गाणी आता शब्द, काव्य यांच्याशी फारकत घेतांना दिसत आहेत हे ही या निमित्ताने लक्षात येते. हे गीत येथे ऐकता/पहाता येईल.

Comments

आजच

गेल्या आठवड्यात भाचीने गाणे पाठवले, ऐक म्हणाली. काय हे गाणे असा विचार करेपर्यंत ते संपलेही :) पण डोक्यात राहिले. कमीतकमी शब्द, वारंवार तेच तेच शब्द येणे, मधलेमधले टॅ, टॅ टॅ ट, यामुळेही गाणी चटकन डोक्यात बसतात का काय असे वाटते.

या गाण्यावरून एक उपक्रमी - राजेंद्र यांनी लिहीलेले वाचले.

http://rajkashana.blogspot.com/2011/11/why-this-kolaveri-kolaveri-kolave...

प्रतिसाद संपादित

सदस्यांची चौकशी करणार्‍या अवांतर प्रतिसादांसाठी कृपया खरडवही किंवा व्यनि सुविधेचा वापर करावा. - संपादन मंडळ

आवडले नाही

मी हे गाणे हल्लीच ऐकले. आताही याहू! उघडले तर त्यावर कोलावेरी डी. सर्व सोडून उपक्रमावरही कोलावेरी डी? ;-) परवा एकांकडे एम टिव्ही पाहण्यात आला. एका तासात तीन वेळा हे गाणे लागले.

गाण्याला अर्थपूर्ण शब्द नाहीत, संगीत सुमार आहे. एकच एक गोष्ट सारखी कानावर आदळत राहिली की ती बरी वाटू लागते (उदा. राणी मुखर्जीचा आवाज) असं काहीसं लोकांचं होत असावं की काय कोणजाणे किंवा रजनीकांतचा जावई असणं हीच मोठी पुण्याई असेल.

एकच एक गोष्ट सारखी कानावर

असेच काहीसे असू शकते... यु टयूब वरील एक प्रतिक्रिया पहा.
When you hear this song the first time.....you are like WTK? Why is this such a big hit.

You logout and then you realize the tune keeps playing in your mind......then you come back to play it again.....and again....and again....

Some of us accept that we like it......others are angry with themselves to be part of the bandwagon listening to this song ....

हे पोरी तू असं का केलंस? असा या गाण्यातून विचारलेला प्रश्न हा ही अनेक तरुणांच्या जिव्हाळ्याचा असू शकतो.


हे पोरी तू असं का केलंस? असा या गाण्यातून विचारलेला प्रश्न हा ही अनेक तरुणांच्या जिव्हाळ्याचा असू शकतो.हे पोरी तू असं का केलंस? असा या गाण्यातून विचारलेला प्रश्न हा ही अनेक तरुणांच्या जिव्हाळ्याचा असू शकतो.हे पोरी तू असं का केलंस? असा या गाण्यातून विचारलेला प्रश्न हा ही अनेक तरुणांच्या जिव्हाळ्याचा असू शकतो.हे पोरी तू असं का केलंस? असा या गाण्यातून विचारलेला प्रश्न हा ही अनेक तरुणांच्या जिव्हाळ्याचा असू शकतो.हे पोरी तू असं का केलंस? असा या गाण्यातून विचारलेला प्रश्न हा ही अनेक तरुणांच्या जिव्हाळ्याचा असू शकतो.

ढिंक चिका

मला तरी हे गाणे पुन्हा जाऊन ऐकायची इच्छा झाली नाही. उलट एका तासात तीनदा गाणे ऐकून आणि त्या धनुषचा तुपकट चेहरा बघून कंटाळले होते.

बाकी, जे वर प्रतिसादात लिहिले आहे ते कोलावेरी डीचेच होते असे नाही. ढिंक चिका वगैरे गाणीही सतत कानावर पडल्याने प्रसिद्ध होत असावीत.

ढिंक चिकाला निदान लाउड म्युझिक तरी आहे. बहुधा पोरासोरांना ते आवडत असावे(?) कोलावेरीची सर्वच बाबतीत बोंब आहे.

कोलावेरीच्या ऐवजी गोदावरी, आसावरी किंवा सरीवर सरी असते तरी गाणे प्रसिद्ध झाले असते. ;-)

+१

गाण्याला अर्थपूर्ण शब्द नाहीत, संगीत सुमार आहे

असेच म्हणतो. ह्यात काय इतके हिट होण्यासारखे कळले नाही. मागे संजय दत्तने 'ए शिवानी' गाणे म्हंटले होते तसला प्रकार वाटतो. (पण ते ह्याहुन बरेच चांगले होते.) त्यातल्या त्यात एक दोन सुंदर चेहरे दिसतात तितकाच काय तो दिलासा. पण तो गाणारा मनुष्य मात्र विडी कारखान्यातला कामगार वाटतो.

दिल को देखो

पण तो गाणारा मनुष्य मात्र विडी कारखान्यातला कामगार वाटतो.

विडी कारखान्यातल्या कामगारांनी किंवा त्यांच्यासारख्या द्राविडी चेहऱ्यांनी श्रुती हासनसारख्या गोऱ्या चिकण्या उच्चवर्णीय छोऱ्यांसोबत दिसू नये असे म्हणायचे आहे का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

नाही नाही, दक्षिणेत सुप्परस्टार होण्यासाठी असलेल्या मुख्य अटीची पूर्तता केली आहे असे म्हणायचे आहे.

कै च्या कैच

कै च्या कैच वाटले गाणे.
दोन् पाच वेळेस ऐकले, अजिबात् भावले नाही.
आणि चर्चाप्रस्ताव असा एकदम "सांस भी कभी बहू थी" च्या लांबीशी स्पर्धा करणारा का ठेवलाय?

--मनोबा

लान्बी

चर्चाप्रस्ताव असा एकदम "सांस भी कभी बहू थी" च्या लांबीशी स्पर्धा करणारा

हौ राव.... हे बाकी तुम्ही भारी ध्यानात आणून द्येलत.

गाणं

गाणं एकदाच ऐकलं आणि आवडलं, मग पुन्हा पुन्हा ऐकलं. आता 'गाणं का आवडलं?' हा वेगळा प्रश्न, त्याचं उत्तर अजून शोधतो आहे. (तसं मला "वेलकम टु द लॅंड ऑफ लुंगी" पण आवडलं होतं, इथे ऐका: http://www.youtube.com/watch?v=Qo4m-RzO6KI )

हे गाणं मला तमिळ मित्रांमुळे 'लिक' झाल्या झाल्या ऐकायला मिळालं, त्यामुळे गाण्याचं व्हायरल होणं हा आवडण्यातला निकष नव्हता. असो. काही प्रतिसाद वाचून "व्हाय धिस कोलावरी ...डी?" असं विचारावसं वाटतं! ;-)

-Nile

धन्यवाद

"वेलकम टु द लॅंड ऑफ लुंगी"

छान गाणं

मीसुद्धा त्यातलाच एक ..

मी सुद्धा हा त्यातलाच एक आहे ज्याला हे गाणं आवडलंय (चूकभूल द्यावी-घ्यावी).. अर्थात अब्रोड असल्याने माझ्यावर या गाण्याची जबरदस्ती तितकी होत नाही हे ही तितकंच खरंय..
कधी वेळ मिळेल तेंव्हा हे गाणं मी खास लावून ऐकतो.. अर्थात त्यात विरंगुळा असा नाही, पण एक मजा आहे हे मात्र खरंय..
जसं सर्वांनी म्हटलंय तसं, हे गाणं इतकं 'लोकप्रिय' होण्याचं कारण म्हणजे त्यातला शब्दांचा वापर, 'थोड्या-बहुत' प्रमाणात अर्थ आणि अर्थात त्याचं 'संगीत'..
अनेक वर्षांपूर्वी 'ओये ओये' हे ही गाणं असंच गाजलं होतं.. मग 'आती क्या खंडाला' वगैरे अशी अनेक उदाहरणे देता येतील..

धनुशने हे गाणं अवघ्या वीसेक मिनिटात लिहिलंय .. म्हणजे अर्थातच या गाण्यासाठी जास्त परिश्रम घेतले गेले नाहीत..
पण जर दोन-चार मित्र तुम्ही एकत्र जमलात आणि हे गाणं लावलं, तर नक्कीच सगळे या गाण्यावर ताल धरतील, हास्यविनोद करतील हे स्वानुभवाचे सांगणे.. :-)

नादस्वरम्.....

मला या गाण्यातले नादस्वरम् या दाक्षिणात्य सनई म्हणता येइल अशा वाद्याचे सूर आवडले.

समूहाची लोकशाही

मला या गाण्यातले नादस्वरम् या दाक्षिणात्य सनई म्हणता येइल अशा वाद्याचे सूर आवडले.

अच्छा तर ते फार टँटँटँ करणारे वाद्य नादस्वरम आहे का? मला ठेक्यामुळे आणि त्या वाद्यामुळे गाणे आवडले. पण एवढे हिट्ट होईल गाणे असे त्यात काय आहे कळत नाही. असो. समूहाची लोकशाही. दुसरे काय.

समूहाचा म्याटपणा, खुळचटपणा आणि समूहाची लोकशाही ह्यात फारसा फरक नाही म्हणा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आधी नाही

पहिल्यांदा ऐकले तेव्हा आवडले नव्हते तितके. दुसर्‍या-तिसर्‍यावेळीपासून आवडू लागले. आता अधूनमधून मजा म्हणून ऐकतो. छान वाटते.
मिहिर कुलकर्णी

आवडले बुवा !

आपल्याला तर हे गाणे जबरदस्त आवडले.

गाणे लोकप्रिय होण्यासाठी अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्वाचे आहे ते गाण्याचा विडीओ .

धनुष या माणसाचे अत्यंत सामान्य दिसणे, रजनीकांतचा जावई असणे, रजनीकांतची मुलगी कशी दिसते याची उत्सुकता , गाणे म्हणताना 'काय हे फालतू गाणे आहे राव' असे आविर्भाव चेहऱ्यावर असणे यामुळे बघणारा माणूस नकळत खिळून राहतो. श्रुती हसन हे एक अतिरिक्त आकर्षण आहेच.

शिवाय गाण्याचे संगीत व बोल आजकालच्या पिढीला साजेशे (कूल्) आहेत, त्यामुळे तिशीच्या आतील बहुतांश मंडळीना हे गाणे आवडेलच असे वाटते.

कोलावेरीच्या ऐवजी गोदावरी, आसावरी किंवा सरीवर सरी असते तरी गाणे प्रसिद्ध झाले असते. ;-)

गाणे आधीच प्रसिद्ध झालेले आहे त्यामुळे गोदावरी, आसावरी किंवा सरीवर सरी यांना दुसरा उद्योग शोधणे भाग आहे :-D

श्रुती

श्रुती लैच ग्वाड दिसून राह्यलीए राव! मराठी पोर आहे काही झालं तरी!! ;-)

-Nile

टायमिंग आणि सोशलनेटवर्कींग साईट्स

परवाच फेसबुकवर "मोस्ट लिसन्ड ऑडिओ: कोलावेरी डी आणि मोस्ट विव्ड विडिओ: साहेबांना झापड" असा कुणाचातरी स्टेटस वाचून आहे तरी काय भानगड म्हणून यु-ट्युबवर जाउन व्युव्डची संख्या चार-पाचनी वाढवुन आलो. :)
मलातर गाणं आवडलं बुवा. पण एव्हडं लोकप्रिय होण्यासारखं काय आहे ते कळलं नाही. मला वाटतं अशा गोष्टींसाठी टायमिंग खूप महत्वाचं असतं. आणि सोशल नेटवर्कींग साईट्समुळे गोष्टी लवकर पसरतात. या एक-दोन आठवड्यात दुसरं "हॅपनींग" घडलं असतं तर कदाचीत चित्र वेगळं असतं.

साहेबांना झापड - चमाट साँग

परवाच फेसबुकवर "मोस्ट लिसन्ड ऑडिओ: कोलावेरी डी आणि मोस्ट विव्ड विडिओ: साहेबांना झापड" असा कुणाचातरी स्टेटस वाचून आहे तरी काय भानगड म्हणून यु-ट्युबवर जाउन व्युव्डची संख्या चार-पाचनी वाढवुन आलो. :)

साहेबांना झापड चे गाणे वेगळे आहे. कोलावेरीच्या चालीवरच पण डुप्लिकेट. पण पाहायला जाम मजा आली राव ;)))

http://www.youtube.com/watch?v=uIhQm6gcUCw इथे पाहा.

गमतीदार कर्णपिशाच्च

गमतीदार कर्णपिशाच्च* आहे.

*थांबवायचा प्रयत्न केला तरी कानात गुणगुणत राहाते.

सहमत

कर्णपिशाच्च* आहे.

*थांबवायचा प्रयत्न केला तरी कानात गुणगुणत राहाते.

अजूनतरी वरील मताशी सहमत आहे.

मजेदार गाणं

मजेदार गाणं आहे. धनंजयने वापरलेला कर्णपिशाच्च हा शब्द भावला. अशी अनेक गाणी मला बिन्डोक आणि रटाळ पण आवश्यक कामं करताना आवडतात, गाण्याकडे फार लक्ष जात नाही आणि रटाळ कामांमुळे येणारी झापडही उडते.

उच्चभ्रूंना सर्वसामान्य(?) वकूबाची 'कोलावेरी डी', 'मुन्नी', 'रिक्षावाला' अशी गाणी (किंवा 'दबंग'सारखे चित्रपट काय) सामान्यांना आवडतात. सवंगपणा टाळून लोकप्रिय होणं तसं कठीणच, पण हस्तिदंती मनोर्‍यात स्वतःला कोंडून अल्पायुषी ठरण्याऐवजी उपक्रमावरही समूहाच्या शहाणपणाला भावतील असे धागे आणि नवनवे लेखक येताना पाहून आनंद होत आहे. नवनीत असलं तरी तेही वाशेळं* होतंच. उपक्रमाची लोकाभिमुखता पाहून मराठीचं संवर्द्धन होणार याबद्दल संशय नाही.

*शब्दासाठी श्रेयअव्हेर - राम पटवर्धन

इंग्रजीत अशा चालींना "इयरवर्म" शब्द

इंग्रजीत अशा चालींना "इयरवर्म" शब्द आहे.
(एखाद्या चालीला "इयरवर्म" म्हणणे ही प्रशंसा असते. पण "वर्म" शब्दात थोडा अगतिकपणा आहे.)

कर्णपिशाच्च हा जुनाच मराठी शब्द आहे :-) काही लोकांना असा भास होतो की कानात काहीतरी सारखे तेचतेच कुजबुजत आहे.

अति-अवांतर : (अशा एक बाईंना मी ओळखी-ओळखीतून लहानपणी भेटलेलो आहे. "आज या कानात गुणगुणते आहे, त्याबाजूला बसा ना" अशी विनंती त्यांनी केली, ते आठवते. त्यांचे कर्णपिशाच्च "ॐ नमः शिवाय" म्हणत असे. त्या वयात मला हे फार पुण्यमय वाटले. अनायासे अखंड नामजप होतो आहे. परंतु माझ्या आईने मग मला समजावून सांगितले, की या कर्णपिशाच्चाचा त्या बाईंना फार त्रास होतो, निद्रानाश होतो, मानसिक वेदना देणारे दुखणे आहे... अति-अति-अवांतर : माझ्या मते हा मानसिक रोग नसावा. कानाजवळच्या नसेची शारिरिक व्याधी असावी.)

गंमतीदार

ट्यून बनवल्यावर गाणे लिहिण्यापूर्वी ती ट्यून लक्षात राहणासाठी 'काहीतरी शब्द' लिहून ठेवतात तसे वाटले.

मून्न, व्हाइट्ट, नाइट्ट, ब्लॅक्क, ग्लास्स, आइस्स, लव्व असे शब्द ऐकायला गंमतीदार वाटतात.

फेसबुक नसते तर कोणाल हे गाणे असल्याचे कळलेही नसते, कळले असते तरी लक्षात राहिले नसते.

नितिन थत्ते

काहीतरी फालतू गाणे

लोकांची आवड आणि संगीतकारांची निवड अतिशय खालच्या थराला पोहोचली आहे. मराठीत पण गुप्ते नामक महाशय असली फालतू गाणी काढतात आणि स्वत:ला संगीतकार म्हणवून घेतात !

पण बाहेरच्या प्रांतातली असली गाणी ऐकली की मराठी संगीताचा आणि कवींचा अभिमान वाटायला लागतो. अशी गाणी अजून तरी इथे होत नाहीत हे आमचे भाग्य.

 
^ वर