अंधश्रद्धा निर्मूलनाचा नवा कायदा

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली नवीन विधेयक मांडण्याच्या विचारात आहे त्याबद्दल एक लेख आजच्या लोकप्रभेत वाचला. लेखातील काही ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

यापूर्वीही सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्र जादूटोणा, अनिष्ट आणि अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २००५ हे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात विविध पक्षांच्या तीव्र आक्षेपांमुळे मंजूर होऊ शकले नव्हते.

या विधेयकामुळे आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावरच गदा येणार असल्याचे वारकरी संप्रदाय, मुस्लीम, ख्रिश्चन तसेच जैन समाजातील विविध धर्मगुरूंचे म्हणणे आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची एकादशीला पूजा करून महाराष्ट्रात पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करणारे मुख्यमंत्री हे श्रद्धा जोपासतात की अंधश्रद्धा? सरकार या अधिवेशनात आणू पाहत असलेल्या विधेयकाचा विचार करता मुख्यमंत्री पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करीत असल्यामुळे अंधश्रद्धा जोपासतात म्हणून त्यांच्यावर खटला भरला तर.. असा सवालही वारकरी संप्रदायातील मान्यवरांकडून करण्यात येत आहे.

भारताच्या संविधानात सर्वधर्मसमभाव असे म्हटलेले आहे. त्यामुळे हा कायदा सर्व धर्माना लागू होणार का, असा सवाल त्यावेळी विधान परिषदेत आपण केला होता, असे सांगून रावते म्हणाले, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी हा कायदा मुस्लीम समाजाला लागू होणार नाही, असे उत्तर त्यावेळी दिले होते.

अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने तसेच समाजातील लोकांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक शोषण करून नुकसान करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदूबाबांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अतिंद्रिय किंवा अमानुष शक्ती किंवा चमत्कार करून भूतपिशाच्च यांच्या नावाने समाजात रुजविलेल्या अनिष्ट व दुष्ट प्रथांचा व अघोरी रूढींचा मुकाबला करून समूळ उच्चाटन करण्यासाठी व समाजात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी हे विधेयक’ आणण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही, असे कोणताही धार्मिक विधी व धार्मिक कृत्य अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू राहणार नाही, नेमक्या याच कलमाला सर्वाचा आक्षेप आहे.

या कायद्यासंदर्भात उपक्रमींना काय वाटते ते जाणून घ्यायचे आहे.

  1. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नवीन कायद्याची गरज आहे का? असे कायदे खरेच अंमलात आणता येतील का? इतर देशांत असा कायदा आहे का?
  2. काहींच्या मते आयपीसी कलम ३०२, ३९९, २९९, ५०८, ४९७ व ४१७ हे कायदे नरबळी, भोंदूगिरी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्षम आहेत. परंतु काही लोकांना हिंदू संस्कृतीचाच दुस्वास असल्याकारणामुळे नरबळी, भुते, अघोरी विद्या हे शब्द पुढे करून जुनेच विधेयक नव्या नावाने मांडण्यात येत आहे. हे तुम्हाला पटते का?
  3. पंढरपूरच्या विठ्ठलाची एकादशीला पूजा करून महाराष्ट्रात पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करणारे मुख्यमंत्री हे श्रद्धा जोपासतात की अंधश्रद्धा? की ही राजकारणाची गरज?
  4. अघोरी उपाय, भुते-खेते यावरील उपाय यावर बंदी घातली तर मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्रामध्ये भूतप्रेत संमंधादी नष्ट करण्याचा उल्लेख आहे, त्यामुळे त्याच्या विक्री व प्रसारावर सरकार बंदी घालणार का असा प्रश्न लेखात विचारला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
  5. असे कायदे केवळ हिंदू धर्मीयांच्या भावनांशी खेळ करण्यासाठीच निर्माण केले जातात का?
  6. या कायद्यातील "कलम १३" वर उठलेला वाद रोचक आहे तो १३ हा आकडा अशुभ मानला गेल्याने तर नव्हे? हॅहॅहॅ!
  • मूळ कायद्यातील कलमे मिळाली नाहीत. कोणाकडे असल्यास प्रतिसादातून द्यावीत.
  • वरचे काही प्रश्न लेखातून जसेच्या तसे उचलले आहेत.

Comments

माझे मत

>> 3.पंढरपूरच्या विठ्ठलाची एकादशीला पूजा करून महाराष्ट्रात पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करणारे मुख्यमंत्री हे श्रद्धा जोपासतात की अंधश्रद्धा? की ही राजकारणाची गरज? >>
जर ही बातमी खरी असेल तर अशी पूजा हा मूर्खपणा आहे. घरात काय ते अवडंबर माजवा ना. सार्वजनिक प्रदर्शन कशाला तुमच्या श्रद्धेचे?

>> 4.अघोरी उपाय, भुते-खेते यावरील उपाय यावर बंदी घातली तर मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्रामध्ये भूतप्रेत संमंधादी नष्ट करण्याचा उल्लेख आहे, त्यामुळे त्याच्या विक्री व प्रसारावर सरकार बंदी घालणार का असा प्रश्न लेखात विचारला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? >>
मारुती स्तोत्रे, रामरक्षा स्तोत्रे त्या त्या काळात (जेव्हा विज्ञानाचा विशेष प्रसार नव्हता) लिहीली गेली आहेत. ती तो काळ लक्षात घेऊनच वाचावयास पाहीजे जसे - अन्य कचवचांमध्ये वाघांपासून रक्षण्, युद्धात संरक्षण, शस्त्रास्त्रांपासून संरक्षण् आदि गोष्टी येतात् ज्यांचा उपयोग नसतो.
हेच काय परंतु - मुलगा व्हावा अशी फलशृती सांगणारी स्तोत्रे आहेत (बहुसंख्य) म्हणून त्यांच्यावर लगेच "स्त्रियांविरोधी" म्हणून बंदी आणायची का? त्या स्तोत्रांना काहीच कलात्मक, भाषिक सौंदर्यात्मक मूल्य नाही का?
तर सू़ज्ञ्यपणा हाच ठरेल की तो काळ लक्षात घेऊन बंदीचा आततायी निर्णय घेतला जाऊ नये.

>> 5.असे कायदे केवळ हिंदू धर्मीयांच्या भावनांशी खेळ करण्यासाठीच निर्माण केले जातात का?>>
असे वाटत नाही.

माणूसप्राणी असेपर्यंत

तूर्तास: माणूसप्राणी ह्या जगात असेपर्यंत अंधश्रद्धा दूर होणे शक्य नाही. शतकी चर्चा व्हायला हवी. पण कुठे आहेत प्रकाशराव?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चालणार नाही!

जिथे चांगलं असतं तिथे वाईटही असतं, सुष्ट असतं - तिथे दुष्टही असतं, देव असला तर सैतानही असायला हवा आणि भुतेखेतेही असायला हवीत.

धार्मिक स्वातंत्र्यावरच गदा येणार असल्याचे वारकरी संप्रदाय, मुस्लीम, ख्रिश्चन तसेच जैन समाजातील विविध धर्मगुरूंचे म्हणणे आहे.

तथाकथित सुष्ट शक्तींसाठी इतके लोक विरोधात उभे राहिले पण दुष्ट शक्तींसाठी कोणी उभं राहिल्याचं दिसत नाही. अरेरे! :-( किती हा घोर अन्याय अघोरांवर! हे चालून जाऊ नये. सर्वांना समान संधी मिळावी.

फक्त भुताखेतांवर हा असला अन्याय केला जाऊ नये अशी मनःपूर्वक इच्छा.

(भूतदयाळू) प्रियाली.

बायदवे,

ते पाठीत हूक अडकवून रथ ओढणारे, अंगावर फटके मारून घेणारे (कोणत्याही धर्मातील), आगीवरून चालणारे, करवा चौथच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तोंडात पाण्याचा थेंब वगैरे न घेणारे शारिरीक बाधा होते याला संमती देतात काय? की लेखात म्हटल्याप्रमाणे त्रयस्थाने केलेली तक्रारही ग्राह्य धरता येईल. मला तरी यातले काही प्रकार बघून त्रास होतो.

वर धला म्हणाल्याप्रमाणे, माणूसप्राणी ह्या जगात असेपर्यंत अंधश्रद्धा दूर होणे शक्य नाही. कुठे आहेत यना? ;-) ह. घेणे.

बाकी, शतकवीर रिटे हल्ली इतरत्र बॅटिंग करत असावे.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानेच करणे आवश्यक आहे काय?

लोकप्रभामधील लेख वाचला.

अंधश्रद्धा आणि विधि-न्याय संस्था ह्यांचे नाते चौरस आणि वर्तुळासारखे आहे. कितीहि गणिती प्रयत्न केला तरी एकाचे दुसर्‍यात परिवर्तन करू शकणारे प्रमेय मांडता येत नाही तद्वत् अंधश्रद्धाविरोधाचा कायदा कसाहि लिहिला तरी तो अव्याप्ति अथवा अतिव्याप्ति ह्या दोषांपासून मुक्त राहणार नाही. अव्याप्ति अथवा अतिव्याप्ति आली की त्यामागे असमाधान आणि संघर्षहि आला. हे विकतचे दुखणे घेण्याची काहीहि आवश्यकता नाही. समाजप्रबोधनाच्या मार्गाने जे होऊ शकेल ते जरूर करावे पण त्यापलीकडे जाऊन शासनाने आणि पर्यायाने समाजाने अधिक काही करू नये - विशेषतः कायद्याच्या मार्गाने. थोडीफार पापे, काही दुष्टकर्मे समाजात केव्हाहि असणारच, सर्व गुन्हे संपले, सर्व गुन्हेगार नष्ट झाले असे कधीच होणार नाही. हा एकप्रकारचा सस्पेन्स अकाउंट आपण कायमच बाळगत असतो त्यातच अंधश्रद्धेवर पोट भरणारे काही जण असतील असा pragmatic विचार करून जे सहज शक्य आहे अशा अन्य गोष्टी साधण्यावर शासनाने आपली शक्ति केंद्रित करावी. अशा सहजसाध्य ध्येयांचा कसलाहि तुडवडा सद्यपरिस्थितीत नाही.

झारच्या रशियापासून आणि १९२०-३०मधल्या अमेरिकेपासून ते आपल्याकडल्या दारूबंदीपर्यंत अनेक ठिकाणी दारूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कायद्याचा रस्ता चोखाळला गेला आणि प्रत्येक वेळी तो प्रयत्न pragmatic नसल्याने तोंडघशी पडला आणि त्यातून the cure is worse than the disease असा अनुभव आला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याचे तेच होईल अशी भीति वाटते.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०५, २०११.

अवश्य करावा

असा कायदा अवश्य करावा. जो कोणी करेल त्याला दृष्ट लागू नये म्हणून मी मीठ-मोहरी, लिंबू वगैरेनी ओवाळण्याची व्यवस्था करेन.

बाकी, "माणूसप्राणी जगात असेपर्यंत अंधश्रद्धा रहाणार" याचा अर्थ, "अंधश्रद्धा ही माणसात असते". मग "अंधश्रद्ध नसलेल्यांना" काय म्हणायचे? देव-दानव-भूत-खेत हे शब्द देखील त्यांच्या संदर्भात बाद आहेत असे गृहीत धरतो. ;)

मराठी मसुदा सापडला नाही.

आधीच्या मसुद्यात अंधश्रद्धा कशाला म्हणायचे याविषयी स्पष्टीकरण नव्हते. नव्या विधेयकात परिशिष्ट जोडून त्यांची यादी दिली आहे. ती पाहता मारुती स्तोत्र म्हणणे, पंढरपूरची वारी करणे हे (शासनाने दखल घ्यावी अश्या)अंधश्रद्धेत येत नाही. हिंजास, वारकरी संप्रदाय यांचा विरोध जुना मसुदा वाचून + नवा मसुदा न वाचताच असावा.

1. to perform Karni, Bhanamati,
2. to perform magical rites in the name of supernatural power,
3. to offer ash, talisman, charms etc. for the purpose of exorcism and to drive out evil spirits or ghosts,
4. to claim possession of supernatural powers and to advertise this claim,
5. to defame, disgrace the names of erstwhile Saints/ Gods, by claiming to be there reincarnation and thus cheating the gullible and God-fearing simple folks.
6. to claim to be possessed by divine power or evil power and then perform miracles in the name of such powers.
7. to punish and to beat mentally ill patients in the belief that they are possessed by evil spirits.
8. to perform Aghori rites.
9. to perform so called black magic and spread fear in society.
10. to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.
11. to oppose scientific medical treatment and to coerce to adopt Aghori treatment.
12. to sell or deal in so-called magic stones, talisman, bracelets, charms.
13. to become possessed by supernatural powers and then pretend to give answers to any questions in this mental state.
14. to sacrifice innocent animals for the appeasement of gods or spirits.
15. to dispense magical remedies for curing rabies and snake bites.
16. to dispense medical remedies with claims of assured fertility.

क्र २ वगळता यात काही आक्षेपार्ह दिसत नाही . क्र २ चे उपाय केले जात आहेत म्हणून दुसरे रॅशनल उपाय टाळत नाहीत तोपर्यंत. क्र १ खरेतर मारुती स्तोत्र म्हणण्याइतकीच निरुपद्रवी समजायला हरकत नाही. [यात होमेपदी, नॅचुरोपथी, चुंबकचिकित्सा आदि आधुनिक श्रद्धांचा समावेश नाही याबद्दल महाराष्ट्र शासनाचा निषेध). क्र. १३ मध्ये टु बिकम पझेस्ड अशा शब्दप्रयोगाऐवजी टु प्रिटेण्ड टु बिकम पझेस्ड असा शब्दप्रयोग हवा.

.
.
.
.

नितिन थत्ते

ढोबळ

यादी बद्दल आभार. काहि शंका

1. to perform Karni, Bhanamati,

कोणत्या कृतीस करणी/भानामती म्हटले जाते? नाहितर उद्या मारुती स्तोस्त्र हा करणीचा प्रकार आहे कळल्यास गहजब उडायचा ;)

2. to perform magical rites in the name of supernatural power,

वादग्रस्त आहे .. सहमत

5. to defame, disgrace the names of erstwhile Saints/ Gods, by claiming to be there reincarnation and thus cheating the gullible and God-fearing simple folks.

येथे 'गॉड' ची काय व्याख्या केली आहे हे पाहणे रोचक ठरावे

8. to perform Aghori rites.
9. to perform so called black magic and spread fear in society.
10. to perform "Gopal Santan Vidhi" to beget a male offspring.

प्रश्न १ प्रमाणेच. या सगळ्याच्या व्याख्या आहेत का?

असो शंका जवळजवळ प्रत्येक मुद्यावर आहेत (ते इथे विचारून उपयोगही नाही ;) ). एकुणात हा मसुदा अगदीच 'ढोबळ' वाटला. अधिक 'तपशीलात' मांडण्याची गरज आहे.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मारुती स्तोत्र म्हणणे करणी भानामतीत धरले जाणार नाही

मसुद्याच्या स्पिरिटवरून असं वाटतं आहे की श्रद्धेचा धंदा करणं हे रोखण्यासाठी हे विधेयक आहे.

मूळ कायद्याचं नावही बदललं गेलं आहे.

नितिन थत्ते

मारुती स्तोत्र

मारुती स्तोत्र म्हटल्याने भुताखेतांना पळवता येते असे सांगितले जाते त्यामुळे ते रोज म्हणावे याला अंधश्रद्धा का म्हणता येणार नाही?

श्रद्धा आणि दखल

श्रद्धा* म्हणता येईलच; पण सरकार त्यात दखल देणार नाही. पण मी "भूतप्रेतसमंधादि रोगव्याधी समस्तही" मारुती स्तोत्राचे पठण करून घालवून देते असा दावा तुम्ही केलात तर दखल देईल (असे वाटते).

*श्रद्धा या शब्दासोबत अंध हा उपसर्ग म्हणजे द्विरुक्ती असल्याने श्रद्धा इतकेच लिहिले आहे.

नितिन थत्ते

त्रास

दाव्याचा लोकांना शारीरिक त्रास झाला तरच दाखल देईल असे वाटते, नुसता दावा करणे गैर नसावे.

मानसिक त्रास

दाव्याचा लोकांना शारीरिक त्रास झाला तरच दाखल देईल असे वाटते, नुसता दावा करणे गैर नसावे.

कायद्यात मानसिक आणि आर्थिक त्रासाबद्दलही लिहिलेले आहे. :-) एखाद्या ज्योतिषाने रोज स्त्रोत्र पठण करा सांगितले आणि फी देऊनही फायदा झाला नाही तर दावा करता येईल का?

प्रति:

कायद्यात मानसिक आणि आर्थिक त्रासाबद्दलही लिहिलेले आहे. :-)

दखलपात्र मानसिक त्रास!!! (कॉलिंग रिटे). :)

एखाद्या ज्योतिषाने रोज स्त्रोत्र पठण करा सांगितले आणि फी देऊनही फायदा झाला नाही तर दावा करता येईल का?

वेव्हर(न-जबाबदारी पत्र) लिहून घेतले नसेल आणि लिखित दावा असेल तर कायद्याने दाखल घेता येत असावी. पण मूळ भूत गेले असून हे नवीन भूत आहे तेंव्हा ह्याची फी वेगळी घ्यावी लागेल असा दावा ज्योतिषी करू शकतोच :)

अनिष्ट

हा कायदा मूळ अनिष्ट व अघोरी प्रथा विरुद्ध असलेला कायदा आहे काही लोक त्याला धार्मिक स्वातंत्र्यावर गदा मानतात. या विषयी आपल्याला इथे माहिती मिळू शकेल.
बाकी धला म्हणतात तसे हा शतकानु शतके चघळला जाणारा विषय आहे.
प्रकाश घाटपांडे

उत्तरे

१.अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नवीन कायद्याची गरज आहे का? असे कायदे खरेच अंमलात आणता येतील का? इतर देशांत असा कायदा आहे का?
असेलही, शक्य, माहीत नाही.
२.काहींच्या मते आयपीसी कलम ३०२, ३९९, २९९, ५०८, ४९७ व ४१७ हे कायदे नरबळी, भोंदूगिरी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्षम आहेत. परंतु काही लोकांना हिंदू संस्कृतीचाच दुस्वास असल्याकारणामुळे नरबळी, भुते, अघोरी विद्या हे शब्द पुढे करून जुनेच विधेयक नव्या नावाने मांडण्यात येत आहे. हे तुम्हाला पटते का?
शक्य/कदाचित तो मुद्दा नसावा देखिल.
३.पंढरपूरच्या विठ्ठलाची एकादशीला पूजा करून महाराष्ट्रात पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करणारे मुख्यमंत्री हे श्रद्धा जोपासतात की अंधश्रद्धा? की ही राजकारणाची गरज?
दोन्ही असण्याची शक्यता आहे.
४.अघोरी उपाय, भुते-खेते यावरील उपाय यावर बंदी घातली तर मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्रामध्ये भूतप्रेत संमंधादी नष्ट करण्याचा उल्लेख आहे, त्यामुळे त्याच्या विक्री व प्रसारावर सरकार बंदी घालणार का असा प्रश्न लेखात विचारला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
सरकार बंदी घालणार का? ह्याचे उत्तर सरकारच देउ शकेल.
६.असे कायदे केवळ हिंदू धर्मीयांच्या भावनांशी खेळ करण्यासाठीच निर्माण केले जातात का?
नाही.
७.या कायद्यातील "कलम १३" वर उठलेला वाद रोचक आहे तो १३ हा आकडा अशुभ मानला गेल्याने तर नव्हे? हॅहॅहॅ!
नाही.

कायद्याने प्रश्न खरंच सुटतात कां?

मला स्वतःला तरी अंधश्रद्धा कोणती? श्रद्धा कोणती? हेच कळत नाही. आणी म्हणून मी वरील प्रश्नांची थेट उत्तरे देवू शकत नाही.

कारण आयुश्यात बर्‍याचदा ज्या श्रद्धा मनात बाळगून कृती केल्या त्या श्रद्धेवर आधारीत कृती फसल्या आहेत, सफल झालेल्या नाहीत. (नोकरी लागणे, प्रमोशन मिळणे, लग्न होणे ह्या सर्वसाधारण इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करणं, देव-धर्म करून पाहिले. पण हवे तसे, हवे तितके मिळाले नाही.)श्रद्धेतून केलेल्या कृती कां फसल्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर असे समजले की, 'जे हवे ते प्राप्त करण्यासाठीची जी कृती करत होतो' ती कृती 'करण्याची पद्धत' चूकीची होती.

आपल्या समाजात अजूनही बरीच मंडळी, समाजात प्रचलीत असलेल्या धर्मासंबंधित धारणांचा अवलंब आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असतात. ह्या कृती तीन प्रकारच्या असू शकतात.-
१) निरर्थक
२) स्वतःला त्रास करून घेणार्‍या
३) इतरांना त्रास घडवणार्‍या
यांतील पहिल्या दोन गोश्टींना कायद्याच्या दृश्टीने नियंत्रीत करण्याचा प्रयत्न करणे हे व्यक्तीगत आयुश्यात लुडबुड करणारे वाटते.फक्त 'कृती करण्याची शेवटच्या पद्धती मध्ये दोश असल्यामुळे केवळ त्यावरच नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जायला हवा.
वरील दोन पर्यांयासाठी 'लोकशिक्शणाच्या माध्यमातून जनतेला शिक्शीत केले जायला हवे' असे वाटते.

एकच

>>मला स्वतःला तरी अंधश्रद्धा कोणती? श्रद्धा कोणती? हेच कळत नाही. आणी म्हणून मी वरील प्रश्नांची थेट उत्तरे देवू शकत नाही.

दोन्ही एकच असते. श्रद्धाळू असलेल्या हुच्चभ्रूंनी बुद्धीभेद करण्यासाठी हे दोन शब्द बनवले आणि ते वेगळे आहेत असे भासवले. ;-)

नितिन थत्ते

आर्मी

लॅंग्वेज इज अ डायलेक्ट विथ अॅन आर्मी असं म्हणतात, तसं काहीसं असावं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सीमारेषा

श्री.धूमकेतू यानी अपेक्षिल्याप्रमाणे अगदी कलमवार लिहिण्याची आवश्यकता नसली, तरी सर्वसाधारणतः मला असे जरूर वाटते की, दहावी बारावीच्या परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्याने सकाळी आईवडिलांना [मग ते व्याख्येनुसार अडाणी असले तरी] मनोभावे नमस्कार केला तर तो श्रद्धेचा भाग होईल, पण हाच मुलगा पुढे जाऊन 'आई मला पास कर' म्हणत अंबाबाईच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत बसला तर तो निश्चितच अंधश्रद्धेचा भाग आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलासमोर हात जोडून राज्यात चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली म्हणजे त्याना अंधश्रद्धेच्या एस्.टी.त बसवून सातार्‍याला दाभोळकरांच्याकडे पाठविण्यात अर्थ नाही. हां...पण तिकडून 'वर्षा' वर आल्यानंतर मग पाऊस पडला नाही म्हणून यज्ञ घालून देवाच्या नावाने त्यात चितळ्यांकडील हंडाभर तूप ओतत बसले तर मात्र ते मुख्यमंत्रीपदावर बसण्यास अपात्र मानले जावेत.

श्रद्धा काय किंवा अंधश्रद्धा काय, याबद्दल समाजातील सर्वच थरातील लोकांची मते या टोकापासून त्या टोकापर्यंतची असू शकतात. तो आपल्यावर हजारो वर्षापासून आलेल्या संस्काराचाच भाग आहे. 'मुलीचे लग्न कोणत्या ना कोणत्या कारणाने जमत नाही' म्हणून अगदी सुशिक्षित समजल्या जाणार्‍या मातापित्यांनी काही अंधश्रद्धा मानल्या गेलेल्या बाबी करणे (त्याचा उहापोह इथे करणे ठीक नाही) एक त्रयस्थ या नात्याने तुम्ही आम्ही समजू शकू. पण त्याचवेळी अगदी एम्.एस्सी. झालेली ती मुलगीदेखील प्रत्येक संकष्टीला गणपतीपुळ्याला जाऊन अनवाणी ती एक-दीड किलोमीटरची मंदिर प्रदक्षिणा [अगदी पावसातसुद्धा] घालून पत्रिकेत जो कुठला शनी येऊन बसला आहे त्याची गच्छंती होवो असे मागणे मागते, त्यावेळी माझ्या दृष्टीने जरी ती अंधश्रद्धा असली तरी हतबलतेने स्वीकारावी असे म्हणणे भाग आहे.

शासन कितीही आणि कसलेही कायदे आणू देत, लोकभ्रम ही 'जन्मजात देणगी' आहे आणि ती कोणत्याही स्थितीत राहीलच, यात संदेह नाही.

निष्कर्ष

कृती करण्यात अडथळा आणणारी श्रद्धा त्याज्य.

मुख्यमंत्र्यांनी पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करायला हरकत नाही पण "यंदा मी पावसासाठी विठोबाला गार्‍हाणे घातले आहे त्यामुळे क्लाऊड सीडींग करायची गरज* नाही" असे मुख्यमंत्री म्हणाले तर ते गैर आणि दखलपात्र आहे.

*केवळ उदाहरण म्हणून दिले आहे. गरज आहे का नाही, त्याचा फायदा होईल का नाही याबाबत इथे काही म्हणत नाही.

किंवा बाळ पलंगावरून खाली पडून रडत आहे पण वाचत असलेली पोथी वाचून पूर्ण होईपर्यंत जागचे उठायचे नाही ही श्रद्धा त्याज्य.

नितिन थत्ते

गोरा कुंभार

"किंवा बाळ पलंगावरून खाली पडून रडत आहे पण वाचत असलेली पोथी वाचून पूर्ण होईपर्यंत जागचे उठायचे नाही ही श्रद्धा त्याज्य."

~ अगदी समर्पक उदाहरण. याच न्यायाने चिखल तुडवित तुडवित विठोबाच्या भजनात दंग असलेल्या गोरा कुंभाराने तिथे रांगत आलेल्या आपल्या छोट्या हरीला पायाखाली चिरडून टाकले, याचेही 'देवाचे महात्म्य किंवा करणी' नावाखाली समर्थन करणे अमान्य केल्यास करणार्‍याला 'अश्रद्ध' म्हणू नये.

 
^ वर