टिळक, रानडे आणि जातीबंधने

ज्ञानाची मक्तेदारी आणि गव्हाणीतील कुत्रा या मूळ चर्चेमधून टिळकांबद्दल सुरू झालेली चर्चा येथे हलवण्यात येत आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

जातीची बंधने न पाळल्याने लोकांना शिक्षा झाल्या आहेत. उदा. ख्रिश्चन मिशनर्‍यांबरोबर चहा प्यायल्याने (कदाचित् बिस्कीटेही खाल्ल्याने) लोकमान्य टिळक आणि रानड्यांना माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे लागले होते.

Comments

वर्ण व्यवस्था आणि भेद

कुरुंदकरांच्या मते वर्णव्यवस्था कागदोपत्रीच होती असे जरी मानले तरी मुळातच वर्ण ही संकल्पना चमत्कारीक आहे आणि मुख्य म्हणजे रूढार्थाने अस्पृश्य मानले गेलेले 'दलित' या चौकटीत् येत नाहीत. शूद्रांत सुतार, लोहार, सोनार, न्हावी इ. बारा बलुतेदार बसविले गेले. आंबेडकरांनी अस्पृश्यांना आधार देवून किमानपक्षी त्याना घटनेतील् तरतुदीद्वारा एका विशिष्ट आर्थिक पातळीवर वर येण्यास सक्षम बनविले, पण त्यांच्यातही "वर्णभेद" आहेच आहे. सरकारी राखीव कोट्यात १३% जागा 'एस.सी.' साठी आरक्षित असल्या तरी यातील १२% जागा एकट्या 'महार' वर्णाला मिळतात. प्रत्यक्षात ५९ सरकारी नोंदणीकृत शेड्युल्ड् कास्ट्स या एकट्या आपल्या राज्यात असल्याने आज चित्र असे दिसते आहे की सुमारे ५४ जातीचे (किरकोळ) नेते 'महार' ही जात आमच्यातून [१३% आरक्षणातून] वगळा अशी मागणी करीत आहेत. या नेत्यांच्या मते महार ही जात एस्.सी. मधील "ब्राह्मण" झाली आहे. यात तथ्यही आहेच आहे, कारण आजमितीला 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरां'चे पुतळे उभारून, सदैव त्यांच्या फोटोला हार घालण्यात अहमहमिका दाखविणारे महार आणि त्यांचे नेते रोटीबेटीचा प्रश्न आला की गटातील बाकीच्या ५८ उपजातीला दूरच ठेवतात, कारण स्पष्टच आहे. त्यांच्या मनीही कुठेतरी वर्णव्यवस्थेची बीजे आजही आहेत. [भांडी घासणार्‍या मांग जातीच्या बाईला सधन महाराच्या घरी भांड्यासाठी प्रवेश नाही, तर व्हल्लार जातीच्या सुशिक्षित युवकाला महाराच्या पतसंस्थेत नोकरी दिली जात नाही. या दोन्ही उपजाती शासनाच्या लेखी 'एस्.सी.' च आहेत.]

आपण लोकमान्य टिळकांचे 'जाती-बंधना' बद्दलचे उदाहरण दिले आहे. टिळकांनी माफी मागणे यात किमानपक्षी विस्मयकारक वाटण्याचे काहीच कारण नाही. टिळकांची राजकीय जडणघडण/विचार/भूमिका कितीही 'रॅडिकल' असली तरी सामाजिक आणि धार्मिक अंगणी ते कायम 'कॉन्झर्वेटिव्ह'च राहिले होते. ज्यावेळी सनातन्यांनी 'मिशनर्‍यांसमवेत तुम्ही चहा आणि बिस्किटे खाल्ली आणि धर्म भ्रष्ट केला' असा हाकारा केला त्यावेळी बळवंतरावांतील वाघाने त्याविरुद्ध डरकाळी फोडलीच नाही, कारण उघड आहे....त्याना "आपण धर्मशिकवणीविरुद्ध वर्तन केले आहे" हे मनी मान्य होतेच.

सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली २४ मार्च १९१८ ला भरलेल्या 'ऑल इंडिया डीप्रेस्ड् क्लासेस् कॉन्फरन्स' मध्ये लोकमान्यांनी हिरिरीने 'समाजात रूजलेली अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे' असे प्रतिपादन केले. मात्र त्याचवेळी कॉन्फरन्समध्ये पास झालेल्या तशा ठरावावर सही करण्याचे नाकारले. कारण ? त्यांच्या मते सही करणारे नित्यनेमात अस्पृश्यता टाळू शकणार नाहीत. म्हणजे एका अर्थाने वर्णव्यवस्था नसेल पण जातीव्यवस्था राहिलीच् पाहिजे असे त्याना वाटत असावे, असाही तर्क त्या नकारातून निघू शकतो.

त्यामुळे टिळकांनी प्रायश्चित घेणे हा दोन्ही बाजूंच्या घटकांना विनातक्रार् मंजूर असलेली एक नित्य घटना होती, इतकेच.

थोडे अवांतर

वर टिळक रानड्यांचा दिलेला चहापाण्याचा प्रसंग चहाग्रामण्य म्हणून प्रसिद्ध आहे. तो कधीकाळी वाचल्याप्रमाणे थोडा वेगळा झाला होता:

रानडे आणि टिळक हे (आनंदीबाईंचे पती) गोपाळराव जोश्यांनी ठरवलेल्या पाद्र्याबरोबरील भेटीस गेले होते. तेथे पाद्र्याने चहा दिल्यावर रानडे सुधारक असल्याने त्यांनी तो घेतला आणि प्यायला. टिळकांनी तो घेण्यास आक्षेप घेतला. मग गोपाळरावंनी त्यांच्या भावास चहा टिळकांना देण्यास सांगितले. तो त्यांनी अर्थातच घेतला. पण त्या प्रसंगानंतर गोपाळरावांनीच ह्या दोन्ही नेत्यांनी पाद्र्याकडे (पाद्र्याच्या हाताने अथवा कसेही) चहा प्यायला आणि धर्माच्या विरोधात वर्तन केले म्हणून सांगितले. पुण्यातील ढुढ्ढाचार्यांनी दोघांना समन्स केले. रानड्यांनी तेथे (अथवा तेथे सांगितल्याप्रमाणे) माफी मागितली आणि स्वतःपुरती ग्रामण्यातून सुटका करून घेतली. टिळक अर्थातच माफी मागायला तयार नव्हते उलट शास्त्राधारीत वाद घातले. मग त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटूंबावर स्थानिक धर्ममार्तंडांनी बहिष्कार घातला.

त्याच काळात त्यांच्या मुलाची श्रावणी होती. त्याला कोणी भटजी येयला तयार नव्हते. मग स्वतःला बाळंभट म्हणत, टिळकांनी स्वतःच ते कार्य केले. नंतर ते कामानिमित्त उत्तरेत गेले असताना, काशीस गेले आणि तेथे गंगेत उडी मारून सर्व ज्ञात-अज्ञात कर्मांमधील पापक्षालनासाठीचे प्रायश्चित्त घेतल्याचे कागदपत्र मिळवले आणि परत आले होते. नंतर त्यांना पुण्यातल्याच का पैठणच्या (आठवत नाही) पण अजून वरच्या धर्ममार्तंडांनी बोलावले. त्यावेळेस त्यांनी हे पत्रक दाखवले. अर्थातच त्यात चहाप्रसंगाचा उल्लेख नसल्याने आणि इगो दुखावल्याने ही मंडळी ऐकून घेण्यास तयार नव्हती.... पण लोकच टिळक कुटूंबाला बाजूस ठेवण्यापासून कंटाळले होते. मला वाटते त्याच काळात त्यांच्या मुलीचे लग्न होते. तेंव्हा हळूहळू असे किती दिवस करणार म्हणत लोकांनी या ग्रामण्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली आणि तथाकथीत ब्रम्हवृंद मुकाट्याने गप्प झाला.

म्हणजे एका अर्थाने वर्णव्यवस्था नसेल पण जातीव्यवस्था राहिलीच् पाहिजे असे त्याना वाटत असावे, असाही तर्क त्या नकारातून निघू शकतो.

टिळकांना सनातनी धर्ममार्तंड प्रच्छन्न सुधारक म्हणत. आणि आगरकर-टिळक वादापासून ते कायमच या ना त्या प्रकारे प्रकाशात येत राहीले आहे.

सुधारक

"तथाकथीत ब्रम्हवृंद मुकाट्याने गप्प झाला."

~ हे विधान थोडेसे धाडसाचे वाटते. टिळकांचे भारतीय राजकारणात (त्यांच्या हयातीत) जे काही स्थान असेल त्याच्याशी पुण्यातील ब्रह्मवृंदाला काही देणेघेणे असेल असे वाटत नाही. धर्ममार्तंडाना त्यांच्याविषयी (वा जनमानसातील त्यांच्या स्थानाविषयी) आदर असताच तर ते मिशनरी चहा प्रकरण त्यानी अजिबात धसास लावले नसते. टिळकांनीही उत्तरेत जाऊन का होईना ते तथाकथित प्रमाणपत्र मिळविणे ही एक प्रकारे ब्रह्मवृंदाच्या वर्चस्वाचीच निशाणी मानली पाहिजे.

सनातन्यांनी जास्त ओढून का धरले नसेल तर टिळक खुद्द हिंदू धर्मातील परंपरांचे कट्टे पुरस्कर्ते होते हे जगजाहीर होते. विधवाविवाहाला असणारा त्यांचा विरोध, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुलीचे लग्नाचे वय १० वरून १२ वर करण्याबाबत मांडलेल्या ठरावाला टिळकांकडून होणारा निक्षून विरोध, या गोष्टी सनातन्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविणार्‍याच होत्या. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या धर्मविषयक कारवायांना होणारा त्यांचा विरोध समजू शकतो पण पंडिता रमाबाई आणि त्यांच्या कार्यालाही विरोध करणे कोणत्याप्रकारे समर्थनीय ठरेल यावर टिळक अभ्यासकांत मतैक्य होणे नाही.

"टिळकांना सनातनी धर्ममार्तंड प्रच्छन्न सुधारक म्हणत...."
~ यात अतिशयोक्तीही नाही.

टिळक आणि सुधारणा

ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या धर्मविषयक कारवायांना होणारा त्यांचा विरोध समजू शकतो पण पंडिता रमाबाई आणि त्यांच्या कार्यालाही विरोध करणे कोणत्याप्रकारे समर्थनीय ठरेल यावर टिळक अभ्यासकांत मतैक्य होणे नाही.

टिळकांचा मिशनरीविरोध आणि रमाबाई विरोध एकाच प्रकारचे होते. रमाबाईंची स्वतःची ख्रिश्चन धर्मावर पूर्ण श्रद्धा होती आणि त्यांचा केडगावचा आश्रम जवळजवळ ख्रिश्चन मठच बनल्यातला होता आणि आश्रमातल्या मुलींनी ख्रिश्चन व्हावे म्हणून त्या active प्रयत्न करीत असत. बहुसंख्य पुणेकरांना हे पसंत असणे दुरापास्तच होते. अरुणा ढेरेलिखित रमाबाईंची मुलगी मनोरमा हिच्यावरचा एक लेख मी वाचला होता. त्यावरून माझा हा समज झाला आहे.

टिळकांची समाजसुधारणेविषय काय भूमिका होती हा स्वतन्त्र चर्चेचा विषय ठरू शकतो. त्यावर भरपूर लिखाणहि झालेले आहे. वरच्या टिप्पणीला मी तूर्तास एव्हढी पुरवणी जोडतो की की कोल्हापूर वेदोक्त प्रकरणात देखील टिळक सनातन्यांच्या बाजूलाच होते असे दिसते.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट १, २०११.

धार्मिक

"तथाकथीत ब्रम्हवृंद मुकाट्याने गप्प झाला.".... ~ हे विधान थोडेसे धाडसाचे वाटते. ...ते तथाकथित प्रमाणपत्र मिळविणे ही एक प्रकारे ब्रह्मवृंदाच्या वर्चस्वाचीच निशाणी मानली पाहिजे.

मी आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे माझ्या वाचनातील आठवणीप्रमाणे आधी ब्रम्हवृंदाच्या आदेशानुसार टिळकांवर लोकांचा बहीष्कार होता. लोकं जो पर्यंत तसे बहीष्कृत ठेवत होते तो पर्यंत या धर्ममार्तंडांचे चालू राहीले. लोकं जेंव्हा दुर्लक्षित करू लागले तेंव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यावाचून पर्याय राहीला नाही. रानड्यांच्या बाबतीत जसे ब्रम्हवृंदाने मान्य करून त्यांच्यावरील बहीष्कार मागे घेतला, तसा टिळकांवरचा कधी घेतल्याचे ऐकिवात नाही. कारण तसा घेणे म्हणजे माघार घ्यावी लागली हे मान्य करण्यासारखे होते.

टिळक स्वत:ला धार्मिकच समजत, सुधारक नाही. त्यांचे म्हणणे हे जनतेला विश्वासात घेऊन हळू हळू बदलण्याकडे होते. चहा ग्रामण्य वाद हा त्या अर्थाने आयती चालून आलेली संधी म्हणून त्यांनी वापरला आणि चर्चा घडवून आणली. काशीला जाऊन प्रमाणपत्रे घेणे आजही चालते त्यामुळे त्या तसेच त्यांनी घेतले. पण पंचहौद मिशनच्या संदर्भात घेतले नाही. त्यातून ते या धर्ममार्तंडांना उघड करू शकले आणि त्यांच्या कारवायांना किती महत्व देयचे ह्याचा जनतेला विचार करायला लावू शकले.

सनातन्यांनी जास्त ओढून का धरले नसेल तर टिळक खुद्द हिंदू धर्मातील परंपरांचे कट्टे पुरस्कर्ते होते हे जगजाहीर होते.

सनातन्यांमध्ये टिळक फार लोकप्रिय होते अशातला भाग नव्हता. म्हणूनच तर ते त्यांना प्रच्छन्न सुधारक म्हणत आणि तेच त्यांचे (टिळकांचे आणि उलट अर्थी रानड्यांचे) रुप उघड करण्यासाठी म्हणून पंचहौद मिशनचा प्रसंग घडवून आणला होता.

विधवाविवाहाला असणारा त्यांचा विरोध, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुलीचे लग्नाचे वय १० वरून १२ वर करण्याबाबत मांडलेल्या ठरावाला टिळकांकडून होणारा निक्षून विरोध, या गोष्टी सनातन्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविणार्‍याच होत्या.

विधवा विवाहाला विरोध होता का ते माहीत नाही, वाचल्याचे आठवत नाही. पण महर्षी कर्व्यांना त्यांनी सांगितल्याचे वाचल्याचे आठवते की, तुमचे काम महत्वाचे आहे, पण त्यात माझ्याकडून आत्ता मदत होऊ शकत नाही कारण माझे ध्येय (स्वातंत्र्य) वेगळे असल्याने लोकांना सांभाळणे महत्वाचे. मुलींचे वय १० वरून १२ वर करण्याचा पण जो विरोध होता तो ब्रिटीशांनी धर्मात ढवळाढवळ करण्यासंदर्भात होता. म्हणूनच स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांनी दहाव्या वर्षी केली नव्हती...

रमाबाईंच्या संदर्भात त्यांच्या मिशनरी कार्यामुळे टिळकांचा विरोध होता.

असो.

स्त्री शिक्षण आणि विधवापुनर्विवाह

विषयाची व्याप्ती कोणतीही असो, पण या चर्चेच्या ओघात अनाहुतपणे लोकमान्य टिळकांचे नाव आले आणि त्यावर उलटसुलट मतेही प्रदर्शित होत आहेत. १ ऑगस्टच्या निमित्ताने सारा देश त्याना भावांजली अर्पण करीत असताना त्या महामानवाच्या राजकीय आणि समाजाभिमुख मतांविषयी काही लिहू नये असा अलिखित संकेत असल्याने श्री.विकास यांच्या वरील प्रतिसादावर लागलीच भाष्य करणे मी योग्य मानले नव्हते; आणि आता जरी त्यांच्या मतांविषयी काही लिहिले तरी त्यांच्याबद्दल एक जहाल राजकारणी आणि प्रकांड पंडित या नात्याने माझ्या मनी जो आदर आहे तो तसूभरही कमी होत नाही, हे जाणीवपूर्वक इथे नोंदवित आहे. पण या निमित्ताने काही रोखठोक फॅक्ट्सही मांडल्या गेल्या तर अभ्यासकांच्या दृष्टीकोनातून त्या स्वागतार्ह मानल्या जाव्यात.

१. स्त्री शिक्षण : मुलीनी (म्हणजेच पर्यायाने स्त्रियांनी) शिक्षण घेण्याबद्दल त्यांची अगदी टोकाचे नसले तरी बर्‍याच अंशी प्रतिकूल मते होती. १६ मार्च १८८७ च्या "स्त्री शिक्षणाची दिशा" या केसरीतील अग्रलेखात टिळकांनी पुण्यात केवळ मुलींसाठी सुरू झालेल्या हायस्कूलबद्दल म्हटले होते की, मुलींसाठीच चालविल्या जाणार्‍या शाळेबाबत समाजातील धुरीणांनी ते कसे चालवावे याबाबत संस्थाचालकांनी मते मागविली नसल्याने नेमके तिथे ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे, त्याचे समाजावर विपरित परिणाम होतील. इतकेच नव्हे तर मुलांना जे शिक्षण अन्यत्र मिळते [म्हणजे शिकविले जाणारे विषय] तेच जर मुलींनाही द्यावे असे बिलकुल नाही. धर्मशास्त्रानुसार मुलींची जी कर्तव्ये आहेत त्याचेच शिक्षण त्याना शाळातून मिळाले पाहिजे.

२. केसरीतच त्यानंतर प्रकाशित झालेल्या दुसर्‍या अग्रलेखात [११ आक्टोबर १८८७] टिळक म्हणतात की, पुराणात स्त्रीयांना मिळाले असल्याची उदाहरणे आहेत हे मान्य; पण मुलींना मुलाप्रमाणेच शिक्षण मिळावे म्हणून शाळेत पाठविणे ही इंग्रजी शिक्षणाची नक्कल आहे. इंग्रजी शिक्षणामुळे आपल्याकडील मुली त्यांची "लाईफ स्टाईल" स्वीकारतील. आपली कुटुंबव्यवस्था इंग्रजापेक्षा भिन्न असल्याने त्याला अनुलक्षूनच आपली शिक्षणपद्धती असणे गरजेचे आहे. इंग्रजी मुली लग्ने लहान वयात लग्न करीत नाहीत आणि त्यामुळे त्या उपजिविकेसाठी आपल्या पालकांवर अवलंबून असत नाही. मुली तिकडील संसारासाठी अर्थार्जन करतात. मग अशा शिक्षणामुळे आपल्याकडील मुलीही अर्थार्जन करू लागल्या तर मग अशा शिक्षणाचा काय फायदा ? त्यापेक्षा योग्य रितीने संसार कसा करावा याचे शिक्षण आपल्या शाळांतून मुलींना मिळाले पाहिजे. असे जर होत नसेल तर मग अशा शिक्षणाचा समाजाला काय उपयोग ?

[पुढेही खूप लिहिता येईल. पण सध्या इतपतच पुरे. अभ्यासकांसाठी 'केसरी' आणि 'मराठा' चे हे आणि अन्य अंक पुण्याच्या केसरी कार्यालयात सहजासहजी उपलब्ध आहेत.]

विधवापुनर्विवाह : धर्मशास्त्रानुसार समाज कोणत्याही प्रकारच्या घटनेनुसार ढवळून निघणार नाही अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. रघुनाथराव जोशी यानी आईवडिलांच्या मर्जीविरूद्ध आपल्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह करून दिल्यावर आगरकरांनी त्या निर्णयावर रघुनाथरावांचे जाहीर अभिनंदन केले तर त्याचवेळी टिळकांनी जोशींच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांच्या मताशी आपली सहानुभूती व्यक्त करून 'मुलाना आईवडिलांना आपल्या निर्णयाने दु:खी करण्याचा कोणताही अधिकार नाही' असे प्रतिपादले. ही बाब विधवापुनर्विवाह संकल्पनेला त्यांचा विरोध होता हेच स्पष्ट करते. १८९३ मध्ये कर्व्यांनी विधवा गोदुबाई जोशी यांच्याशी विवाह केला. त्यावर 'केसरी' मध्ये टिळकांनी मत व्यक्त केले "कुणा एकाला समाज मताविरूध्द जाण्याचा हक्क नाही. या प्रश्नावर {विधवाविवाह} आम्ही सुधारकांच्या विरोधात आहोत. आईबाप जरी मूर्ख असले तरी अशा बाबतीत त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे. त्याचप्रमाणे समाजात एखाद्या गोष्टीबाबत असलेली समज विचारात घेऊन त्याचप्रमाणे नागरिकांनी आपले वर्तन ठेवले पाहिजे."

"...रमाबाईंच्या संदर्भात त्यांच्या मिशनरी कार्यामुळे टिळकांचा विरोध होता...."

~ हा एक वेगळा विषय होईल, पण त्याची व्याप्ती पाहता त्यावर इथे लिहिणे अप्रस्तुत होईल.

योग्यच आहे

श्री. अशोक यांनी टिळकांनी प्रायश्चित्त घेतल्याबद्दल त्यांना दोष दिला आहे. तसेच त्यांच्या इतरही सनातनी विचारांबद्दल लिहिले आहे. मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते (खरे तर वाटायला नको) की रानडे आणि टिळक मिशनर्‍यांबरोबर चहा बिस्कीटे घेतल्याबद्दल दोघांनीही प्रायश्चित्त घेतले, रानड्यांनी लगेच टिळकांनी काही काळानंतर काशीला जाऊन घेतले वगैरे. दोषी मात्र फक्त टिळक. रानड्यांनी संधी असूनही दुसरा विवाह विधवेशी केला नाही याबद्दल त्या काळात लोक त्यांना दोष देत याबद्दलही श्री. अशोक मौन धारण करून आहेत हे योग्यच आहे.

शेवटी रानडे "आपले" तर टिळक "त्या" लोकांपैकी, त्यामुळे त्यांनी टिळकांविरुद्ध लिहावे आणि रानड्यांबद्दल मौन धरावे हे योग्यच आहे.

अयोग्य आहे

श्री. विनायक गोरे यांनी वर लिहिलेला प्रतिसाद अयोग्य आहे.

रानडे हे गोरे यांच्यासाठी "आपले" एकारान्त कोकणस्थ ब्राह्मण तर टिळक "त्या" लोकांपैकी अकारान्त कोकणस्थ ब्राह्मण असायला हवेत. त्यांना रानड्यांबद्दल आपुलकी वाटायला हवी.

रानड्यांविषयी, उपक्रमाविषयी, यनावालांविषयी, धम्मकलाडूविषयी, नानावटींविषयी गोर्‍यांनी विनाकारण बदनामीकारक लिहू नये असे वाटते.

मी रानड्यांची बदनामी केली?

रानड्यांविषयी, उपक्रमाविषयी, यनावालांविषयी, धम्मकलाडूविषयी, नानावटींविषयी गोर्‍यांनी विनाकारण बदनामीकारक लिहू नये असे वाटते.

»

रानड्यांविषयी मी बदनामीकारक काय लिहिले बुवा? त्यांनी आणि टिळकांनी मिशनर्‍यांबरोबर चहा - बिस्कीटे घेतली, त्याबद्दल प्रायश्चित्ते घेतली ह्या खरोखरी घडलेल्या घटना आहेत. विकास आणि अशोक यांनीही त्याला दुजोरा दिलेला आहे. यात बदनामी काय आहे? बाकी सर्वांविषयी बघून घ्यायला ते सदस्य आणि प्रशासन समर्थ आहे.

गैरसमज

श्री.विनायकरावांचा काहीसा गैरसमज झाला असावा. गोपाळराव जोशींनी टिळक आणि रानडे या दोघांनाही "मिशनरी चहा" प्रकरणी प्रायश्चित घेतले पाहिजे असे सनातन्यांच्या मार्फत फर्माविले. दोघेही कितीही सुधारणावादी मताचे असले तरी १९ व्या शतकाचा तो उत्तरार्ध [त्यातही पुणे] ब्रह्मवृंदांच्या अधिपत्याखाली होता हे नाकारण्याचे कारण नसल्याने शिवाय त्याना [इथे दोघांनाही म्हणतो] राजकारण आणि समाजकारण करणे प्रथम प्राधान्याचे वाटत असल्याने प्रथम रानडे यानीच माफी मागितली आणि टिळकांनी जरी सुरूवातीला खळखळ केली तरी पुढे काशीस जाऊन धर्मशास्त्राप्रमाणे त्याबद्दल आंघोळ केलीच. अर्थात "गंगे" त डुबकी मारण्याचे काम अशाच धर्मरिती मुद्द्यावरून महर्षि कर्वे यानीही वाराणसी येथे जाऊन केले असल्याने त्या काळात तसा तो उपचार फार "आऊट ऑफ वे' होता असेही समजण्याचे कारण नाही.

माझ्या प्रतिक्रियेचा रोख 'टिळक आणि त्यांची स्त्री-शिक्षण' याच मुद्द्यावर प्रामुख्याने असल्याने न्या.रानडे यांच्या संदर्भात काही विचार इथे (अगोदरच अवांतर होत चाललेल्या चर्चेत) आणणे अप्रस्तुत वाटले. त्यांच्याबद्दल् 'मौन' धरून मला काय साध्य होणार ?

रमाबाईंशी झालेल्या त्यांच्या 'जरठ-बाला' विवाह घटनेशी हा धागा जोडणे ठीक नाही.

अवांतर

हे अवांतर वाढत चालले आहे, तरी लिहीत आहे. :-) कारण आपला (श्री. अशोक यांचा) तसा उद्देश नसला तरी, ह्यात कुठेतरी टिळकांबद्दल आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट लिहीले जात आहे असे वाटत आहे.

आधी देखील म्हणल्याप्रमाणे टिळकांचे प्रथम ध्येय स्वातंत्र्यप्राप्ती होते आणि जे काही सामाजीक बदल घडायला हवेत ते बाहेरील विशेष करून ब्रिटीश सरकारच्या अथवा मिशनरी दबावाखाली न होता आतून होणे महत्वाचे आहे असे त्यांचे मत होते. ते कुणाला पटोत अथवा न पटोत, त्यांनी कधी लपवले देखील नव्हते. म्हणूनच एकीकडे समाजसुधारणा करण्याच्या बाजूस असलेले टिळक जेंव्हा प्राधान्य देयची वेळ आली तेंव्हा स्वतःच्या (स्वतःसाठीच्या नाही) ध्येयप्राप्तीसाठीच्या मतांनाच आणि त्याला जिथे मदत होईल अशा गोष्टींनाच प्राधान्य देत होते. त्या मुद्याशी ते प्रामाणिक होते.

आपण आधीच्या प्रतिसादात म्हणालात, सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली २४ मार्च १९१८ ला भरलेल्या 'ऑल इंडिया डीप्रेस्ड् क्लासेस् कॉन्फरन्स' मध्ये लोकमान्यांनी हिरिरीने 'समाजात रूजलेली अस्पृश्यता नष्ट झालीच पाहिजे' असे प्रतिपादन केले. मात्र त्याचवेळी कॉन्फरन्समध्ये पास झालेल्या तशा ठरावावर सही करण्याचे नाकारले. कारण ? त्यांच्या मते सही करणारे नित्यनेमात अस्पृश्यता टाळू शकणार नाहीत. म्हणजे एका अर्थाने वर्णव्यवस्था नसेल पण जातीव्यवस्था राहिलीच् पाहिजे असे त्याना वाटत असावे, असाही तर्क त्या नकारातून निघू शकतो.

आता आपल्या या वरील वाक्यासंदर्भातच विचार करायचा झाला तर आंबेडकरांना जेंव्हा सयाजीरावांचे कारभारीच अस्पृश्य म्हणून त्रास देत होते, तेंव्हा गायकवाडांनी काय केले? त्या कारभार्‍याला काढले का आंबेडकरांना ते अस्पृश्य म्हणून साधे चहा नाकारणार्‍याला शिपायाला? नाही, त्यांनी आंबेडकरांचे कर्ज माफ केले आणि कुठेही जा म्हणून सांगितले... पण म्हणून सयाजीराव दुटप्पी ठरतात का अप्रामाणिक? माझ्या लेखी काहीच नाही कारण त्यांना कशाचा दूरगामी फायदा आहे याचा त्यांना विचार करायलाच लागला.

तेच चहाग्रामण्याबद्दल देखील लागू होते. टिळकांनी प्रत्यक्ष माफी मागितली नाही , हिंदूशास्त्राचे दाखले देत ब्रम्हवृंदास गप्प बसवले. असे असताना देखील आपण त्यांनी माफी मागितली म्हणत आहात तर रानड्यांनी माफी मागितली याकडे दुर्लक्ष करत आहात. आता जसे माझ्या लेखी टिळकांचे वर्तन त्यांच्या राजकारणास योग्य होते तसे कदाचीत काही अंशी रानड्यांचे देखील असावे असे येथे म्हणता येईल. कारण त्यांना त्यांचे राजकारण-समाजकारण करताना ही कटकट नको असेल म्हणून माफी मागून टाकली.

विधवा विवाहासंदर्भात देखील तेच दिसते. रानड्यांना वास्तवीक पहील्या पत्नीच्या निधनानंतर विवाह करायचा नव्हता. पण वडीलांच्या हट्टापायी पुर्नविवाह केलाच आणि तो देखील जरठ-बाला पद्धतीचा केला. टिळकांनी दुसरा विवह केला नाही की विधवा विवाह करणार्‍या व्यक्तींना वाळीत टाका म्हणून केसरीत लेख लिहीलेले नाहीत. त्यांचे अग्रलेख आणि वर्तन संपूर्ण पाहीले तर त्यांचे म्हणणे काय होते आणि त्यांना सनातनी प्रच्छन्न सुधारक का म्हणत हे समजेल.

असे अजून बरेच काही सांगता येईल. हवी असल्यास पुढची चर्चा खव अथवा वेगळ्या चर्चेद्वारी करता येईल.

अवांतर

अवांतर वाढत चालले आहे हे खरे. या अवांतराचा वेगळा धागा बनवता येईल का?

चहाग्रामण्य आणि प्रायश्चित्त याबाबत माझी काही मते नाहीत. टिळकांचे एकूण विचारविश्व पाहता त्यांनी प्रायश्चित्त घेणे साहजिक होते.

सामाजिक बदल आतून येणे म्हणजे काय? आगरकर, रानडे, राजा राममोहन रॉय, जोतिराव फुले आतले नव्हते काय? आतून बदल होण्याची वाट पाहिली नाही हे एका दृष्टीने बरेच आहे. अन्यथा हिंदू समाजाला 'इतर कसे बुरसटलेले आहेत' असे सांगण्याची संधी मिळाली नसती. [दुसर्‍या समाजाबाबत आपण सगळे "आतून बदल होण्याची" वाट पहायला का तयार नाही हा एक प्रश्नच आहे].

टिळकांचे प्रथम ध्येय स्वातंत्र्यप्राप्ती हे होते ही गोष्ट बरोबर आहे. परंतु समाजसुधारणा हे त्यांचे दुय्यम, तिय्यम किंवा कोणतेच ध्येय नव्हते. किंबहुना "स्वराज्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा चालतात" याच कारणासाठी* त्यांना स्वराज्य हवे होते असेच म्हणावे लागेल.

सनातनी लोक टिळकांना प्रच्छन्न सुधारक म्हणत असे ऐकलेले नाही. काही संदर्भ देता येईल का? त्यांना तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असत हे वाचलेले आहे.

अशोक पाटील म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल पंडित म्हणून असलेला आदर कमी होत नाही .
*सदरचे वाक्य टिळकांनी केसरीच्या अग्रलेखात लिहिलेले आहे. (आत्ता माझ्याकडे संदर्भ नाही). अशाच प्रकारची भावना सनातन्यांकडून सावरकरांच्या अनुभवास आली. सावरकरांनी आपल्या विज्ञाननिष्ठ निबंधात "आज पेशवाई असती तर" असा लेख लिहून त्या भावनेचा समाचार घेतला आहे.

अवांतरातले अवांतरः
>>एकीकडे समाजसुधारणा करण्याच्या बाजूस असलेले टिळक जेंव्हा प्राधान्य देयची वेळ आली तेंव्हा स्वतःच्या (स्वतःसाठीच्या नाही) ध्येयप्राप्तीसाठीच्या मतांनाच आणि त्याला जिथे मदत होईल अशा गोष्टींनाच प्राधान्य देत होते.

इतर कोणी स्वातंत्र्यलढ्यात मदत व्हावी म्हणून दुसर्‍या धर्मातल्या सनातन्यांशी नाते जोडायचा प्रयत्न केला ही घटना इतिहासात "प्रच्छन्न" टीकेची धनी झालेली आहे. ;-)

.
.
नितिन थत्ते

अजून पुढे

चहाग्रामण्य आणि प्रायश्चित्त याबाबत माझी काही मते नाहीत. टिळकांचे एकूण विचारविश्व पाहता त्यांनी प्रायश्चित्त घेणे साहजिक होते.

परत दिशाभूल करत आहात. चहाग्रामण्यासंदर्भात माफी आणि प्रायश्चित्त हे सुधारक रानड्यांनी घेतले, टिळकांनी नाही. टिळकांनी चहा कुणाच्याही हातून घेण्याने धर्म बुडत नाही असे म्हणत वाद घालत बहीष्काराला भिक घातली नाही. पुढे जेंव्हा ते (आधी सांगितल्याप्रमाणे) उत्तरेत होते तेंव्हा काशीला गंगेत ज्ञात-अज्ञात पापासाठी स्नान केले जी हिंदू धर्मियांमधे प्रथा आहे. त्यावेळेस अधिकच होती. पण ते स्नान चहाग्रामण्यासाठीचे प्रायश्चित्त म्हणून नव्हते. म्हणूनच माझा तुम्हाला प्रश्न आहे: न्यायमुर्ती असलेल्या सुधारणावादी रानड्यांनी माफी मागणे आणि धर्माचा हस्तक्षेप मान्य करणे ह्याबद्दल तुमचे मत काय आहे? ते एक सुधारणावादी म्हणून योग्य होते का?

परंतु समाजसुधारणा हे त्यांचे दुय्यम, तिय्यम किंवा कोणतेच ध्येय नव्हते. किंबहुना "स्वराज्य नाही म्हणून सुधारकांच्या गमजा चालतात" याच कारणासाठी* त्यांना स्वराज्य हवे होते असेच म्हणावे लागेल.

आपण उर्धृत केलेले वाक्य मी पहील्यांदाच ऐकले आहे. त्याचा संदर्भ दिला आणि तो देखील मागे-पुढे काय लिहीले आहे ते दाखवून तर बरे होईल, नाहीतर आपला काहीतरी गैरसमज आहे असे समजावेत. टिळकांना आधी म्हणल्याप्रमाणे समाजसुधारणा हवी होती पण ती आतून - उत्क्रांतीने आणि शिक्षणाने. बेळगावला १९०७ साली केलेल्या व्याख्यानातील त्यांची खालील वाक्ये बरेच काही बोलून जातात:

‘मला वाटते की, देशाच्या राजकीय, सामाजिकप्रभृती परिस्थितीचें आणि ती सुधारण्यासाठी ठरलेल्या सिद्धान्तप्राय उपायांचें ज्ञान मुलांना लहानपणापासूनच करून देणें अत्यंत आवश्यक झाले आहे. राजकीय सिद्धान्तांचें नि सामाजिक प्रेम यांचें विद्यार्थ्यास लहानपणापासूनच बाळकडू देणें (जसें अवश्य) तद्वतच जातीभेद, जातीद्वेष नि जातीमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेंही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळालें पाहिजे; जातीभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हें आमच्या विद्यार्थ्यांना समजलें पाहिजे.’
- लोकमान्य टिळक (बेळगावचें व्याख्यान, १९०७)

सनातनी लोक टिळकांना प्रच्छन्न सुधारक म्हणत असे ऐकलेले नाही.

कदाचीत तुम्ही केवळ तथाकथीत सुधारकांनी टिळकांविषयी काय लिहीले हेच ऐकले असावेत. ;) ह.घ्या. पण "प्रच्छन्न सुधारक" हा उल्लेख मी टिळकांच्या चरीत्रात वाचला आहे, मला वाटते गोविंद तळवळकरांनी लेनीन आणि टिळक अशी तुलना करणार्‍या "बाळ गंगाधर टिळक" म्हणून अतिशय माहितीपूर्ण पुस्तकात देखील लिहीले आहे. पण आत्ता तात्काळ जालावर शोधताना सावरकरांच्या जात्युच्छेदक निबंधात देखील त्याचा संदर्भ मिळाला.

इतर कोणी स्वातंत्र्यलढ्यात मदत व्हावी म्हणून दुसर्‍या धर्मातल्या सनातन्यांशी नाते जोडायचा प्रयत्न केला ही घटना इतिहासात "प्रच्छन्न" टीकेची धनी झालेली आहे. ;-)

वाक्य जरा डोक्यावरून गेले त्यामुळे स्पष्टीकरण येथे अथवा खरडीत करावे... म्हणून, त्या (स्वातंत्र्यलढ्या) संदर्भात नाही पण असे प्रच्छन्न म्हणून हिणावणे हे प्रामाणिक बुद्धीवाद्याला जेंव्हा वरकरणी परस्परविरोधी भुमिका घेतली जाते, तेंव्हा अनुभवावे लागत असावे. याचे स्वातंत्र्यानंतरचे उदाहरण म्हणजे, नाखुष समाजवादी कम्युनिस्ट विचारसरणीच्या नरहर कुरंदकरांना "प्रच्छन्न हिंदूत्ववादी" म्हणत. :-)

+१

+१.
सहमत.

दुरूस्ती

मुळ प्रतिसादात दुरूस्ती करू शकत नसल्याने येथे लिहीत आहे:

नाखुष समाजवादी कम्युनिस्ट विचारसरणीच्या नरहर कुरंदकरांना "प्रच्छन्न हिंदूत्ववादी" म्हणत

वरील वाक्य खालील प्रमाणे वाचावे:

कम्युनिस्ट विचारसरणीच्या नरहर कुरंदकरांवर नाखुष असलेले समाजवादी, कुरंदकरांना "प्रच्छन्न हिंदूत्ववादी" म्हणत

योग्य नव्हते

>>न्यायमुर्ती असलेल्या सुधारणावादी रानड्यांनी माफी मागणे आणि धर्माचा हस्तक्षेप मान्य करणे ह्याबद्दल तुमचे मत काय आहे? ते एक सुधारणावादी म्हणून योग्य होते का?

नाही. योग्य नव्हते.

नितिन थत्ते

सुधारक टिळक

केळकरांच्या टिळक चरित्रामध्ये टिळक त्या काळच्या शास्त्री पंडितांशी सुधारणांबद्दल शास्त्रार्थ करीत असत असे वाचले आहे. म्हणजे नव्या सुधारणांना मनुस्मृती किंवा तत्सम ग्रंथांमध्ये काही आधार आहे म्हणून समाजाने त्या स्वीकाराव्यात. या बाबतीत त्यांचे आणि शास्त्री पंडितांचे वाद झाले आहेत. कदाचित् यामुळेच जुने शास्त्री पंडित टिळकांना सुधारक म्हणत असावेत.

टिळकांनी वाद सुधारणा स्वीकाराव्या या बाजूने घातले नाही

असे नसावे. ज्यावेळी सुधारकांनी उशिरा लग्न करणे हे धर्मशास्त्राविरुद्ध नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा टिळकांनी तो खोडून काढला.

अवांतर: याच दुव्यावर त्याच पानावर खाली डॉ. भांडारकर टिळकांना "ज्यांना वेदांमध्ये वाफेचे इंजिन आणि तारायंत्र सापडते अशा लोकांपैकी" असे म्हटले आहे. शिवाय टिळक आजच्या रूढीचा शास्त्रांतला आधार शोधण्यासाठी जुन्या लिखाणातल्या परिच्छेदाचा व्याकरण आणि प्रोप्रायटी यांना फाट्यावर मारून विपर्यास करतात असे डॉ भांडारकरांनी म्हटले आहे.

नितिन थत्ते

उत्तर

असे नसावे. ज्यावेळी सुधारकांनी उशिरा लग्न करणे हे धर्मशास्त्राविरुद्ध नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा टिळकांनी तो खोडून काढला
केळकर लिखित टिळक चरित्र पुन्हा वाचावे लागेल.

अवांतर: याच दुव्यावर त्याच पानावर खाली डॉ. भांडारकर टिळकांना "ज्यांना वेदांमध्ये वाफेचे इंजिन आणि तारायंत्र सापडते अशा लोकांपैकी" असे म्हटले आहे.

विष्णुशात्री चिपळूणकरांनी निबंधमालेत "वेदांमध्ये आगगाड्या, विमाने आहेत" अश्या विचारांना "दयानंदी संप्रदाय" म्हटले आहे. वेदांमध्ये हे सर्व आहे हा विचार पहिल्याने स्वामी दयानंदांनी मांडला. टिळकांना (आणि चिपळूणकरांना) दयानंदांबद्दल फारशी आस्था नव्हती, त्यामुळे दयानंदांचे हे (उघड उघड मूर्ख वाटणारे) मत खरोखर टिळक स्वीकारतील असे वाटत नाही. भांडारकरांचे जाऊ द्या, टिळकांच्या लेखनात खरोखर असे काही संदर्भ आहेत का?

सनातनी

प्रचलित माहितीप्रमाणे तरी टिळक बहुतांशी सनातनी होते उदा. सोवळे, जाती/वर्ण व्यवस्था वगैरेस त्यांची मान्यता असल्याचे ऐकिवात आले आहे. ह्याच मुद्द्यांवरून त्यांचे व आगरकरांचे पटत नसे हे देखील वाचले आहे.

प्राधान्य

ह्याच मुद्द्यांवरून त्यांचे व आगरकरांचे पटत नसे हे देखील वाचले आहे.

टिळकांचे आणि आगरकरांचे वाद हे तत्कालीन परीस्थितीत प्राधान्य/प्रायॉरीटी कशाला द्यावी या संदर्भात झाले होते. सुधारणा नकोत असे टिळकांचे मत नव्हते अथवा स्वातंत्र्य नको असे आगरकरांचे देखील मत नसावे/नव्हते.

सहमत

सहमत, फक्त सुधारणेच्या काही मुद्द्यांवर काही काळासाठी टिळक आणि अगरकारांमध्ये वाद होते, नंतर तो वाद तुम्ही म्हणल्याप्रमाणे मुख्यत्वे आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावर होता असे दिसते.

शीर्षक अमान्य

दुसर्‍या धाग्यामधून काही प्रतिसाद इथे हलवून नवीन धागा काढला हे बरेच झाले. मात्र शीर्षक दिशाभूल करणारे आहे. माझा टिळक आणि रानड्यांना प्रायश्चित्त घ्यावे लागल्याचा दाखला हा जातीची बंधने तोडली तर काय होते हे दाखवण्यापुरताच होता. श्री. अशोक यांनी त्यापुढे टिळकांचे सनातनी विचार (ससंदर्भ) उद्धृत करून टिळक सनातनी की सुधारक या वळणावर चर्चा नेली आणि श्री. विकास यांनी त्यांचा प्रतिवाद केला. मला टिळक सनातनी की सुधारक या विषयावर चर्चा करण्यात स्वारस्य नाही. त्यामुळे

१. या चर्चेचे जनकत्व श्री. अशोक पाटील यांना द्यावे.

किंवा २. चर्चा माझ्या नावाने कायम ठेवायची असल्यास "टिळक, रानडे आणि जातीबंधने" असे शीर्षक बदलावे.

नवीन धागा

नवीन धागा सुरू केल्याबद्दल संपादकांचे मनःपूर्वक आभार. आता इथे त्या विषयावर मोकळेपणाने लिहिता येईल.

@ श्री.विनायकराव ~ मी तसा इथे नवा असलो तरी या आठवड्यात "उपक्रम" वरील जे जे लेख वाचले [प्रत्यक्ष भाग घेतला ना घेतला असला तरी] त्यावरून एक बाब निश्चितच समोर येते की, सर्वच सदस्य प्रगल्भ आहेत आणि त्याना संशोधनात्मक लेखन/प्रतिसादात गम्य आहे [मते-मतांतरे असणे हे निकोप वृत्तीचेच लक्षण आहे]. सांगायचा मुद्दा असा की एखाद्या चर्चेचे जनकत्व कुणाकडे आहे यावर सदस्यांचे सहभागाबाबत मत ठरत नसावे. त्यामुळे चर्चा तुमच्या नावाने वा माझ्या वा अन्य सदस्याच्या नावाने सुरू झाली (वा ना झाली) तरी तारू योग्य त्याच प्रवासाला लागेल.

२. लेखाचे शीर्षक बदलण्याबाबत आपण आग्रही आहात असे दिसते. पण त्याबाबत संपादक मंडळ निर्णय घेतील.

असो. [हा प्रतिसाद श्री.गोरे यांच्या वरील मागणीपुरताच मर्यादित आहे.]

दोन पैसे

महाराष्ट्रात तुकारामांपासून सुरू झालेली सुधारणावादी परंपरा पेशवोत्तरीनंतर तर्खडकर बंधु, लोकहितवादी, रानडे, फुले, आगरकर, गोखले यांनी चालवली. या परंपरेत टिळकांचे स्थान कोठे आहे हे पाहिल्यास टिळक सुधारणावादी नक्कीच नव्हते हे लक्षात येते. टिळकांना स्वातंत्र्य नेमके कोणापासून, कशासाठी आणि कोणासाठी हवे होते याचा विचार केल्यास टिळकांची 'स्वातंत्र्य' ही संकल्पना फारच मर्यादीत असावी असे दिसते. ब्रिटिशांनी भारतीयांचे आर्थिक शोषण करू नये हे एका बाजूला ठसवायचे तर भारतातील अभिजनांनी बहूजनांचे केलेले शोषण दुर्लक्षायचे, स्त्रीस्वातंत्र्यासाठी काम करणार्‍या लोकांना विरोध करायचा हे सगळे टिळकांना हवे असलेले स्वातंत्र्य व्यापक नसावे असेच दर्शवते.

संदर्भ

ब्रिटिशांनी भारतीयांचे आर्थिक शोषण करू नये हे एका बाजूला ठसवायचे तर भारतातील अभिजनांनी बहूजनांचे केलेले शोषण दुर्लक्षायचे, स्त्रीस्वातंत्र्यासाठी काम करणार्‍या लोकांना विरोध करायचा हे सगळे टिळकांना हवे असलेले स्वातंत्र्य व्यापक नसावे असेच दर्शवते.

संदर्भ मिळेल का?

संदर्भ अपडेट

या निबंधात टिळकांचे पुढील उद्धरण मिळाले.

“Just as the government has no right to rob the sowcar (moneylender) and distribute his wealth among the poor, in the same way the government has no right to deprive the khot of his rightful income and distribute the money to the peasant. This is a question of rights and not of humanity” (quoted in Bhagwat and Pradhan, Lokamanya Tilak, p. 134).

.................
प्रेषक का (बुध, 08/03/2011 - 16:46)

नेमका कसला संदर्भ हवा आहे हे श्री विकास यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांना ब्रिटिशांना भारतीयांचे शोषण करू नये यासाठी संदर्भ् नको असावा असे गृहीत धरून पुढील स्पष्टीकरण (संदर्भ देण्यासाठी टिळकांचे लेखन माझ्यापाशी नाही) देत आहे. जेव्हा ब्रिटिश सरकारने खोतांचे हक्क मर्यादीत करण्याचे ठरवले होते तेव्हा टिळकांनी खोत करत असलेविल्या (शेतमजुरांच्या) शोषणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून खोतांना पाठींबा दर्शवला. कर्व्यांच्या शाळेत घर चांगले सांभाळण्याचे (विज्ञान, गणिताचे नव्हे) शिक्षण दिले जावे याबाबत टिळकांची आग्रही भुमिका होती. आता या दोनही विधानांच्या समर्थनार्थ टिळकांची विधाने शोधून त्याचे संदर्भ देऊ शकत नाही. पण जालावर शोध घेऊन देण्याचा प्रयत्न करतो.

धन्यवाद + पुढे

संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद! त्याच पुस्तकात त्याच वाक्यात आधी म्हणल्याप्रमाणे, A Bombay Government move to restrain transfer of peasant lands to moneylenders in 1901 was bitterly opposed by Tilak as well as Gokhale... अर्थात मवाळ गोखल्यांनी पण विरोध केला हे सांगायचे राहीले होते.

आता टिळकांच्या वाक्याचे अधिक विश्लेषण करूया. ते म्हणतात की, "the government has no right to deprive the khot of his rightful income and distribute the money to the peasant."

आता हे तुम्ही दिलेल्या पुस्तकात जरी वाक्य असले तरी ते ज्या मूळ पुस्तकातून घेतले आहे त्याचा मागचा पुढचा संदर्भ माहीत नाही. असे म्हणण्याचे कारण असे की सुमित सरकार यांच्या या लेखनात बाकी महाराष्ट्र-बंगाल तुलना दिसली. हा मूळ विषय नसावा.

टिळक काही कम्युनिस्ट अथवा डाव्या विचारसरणीचे नव्हते. शिवाय ते वकील देखील होते. त्यामुळे जे हक्काने आले आहे ते कितीही उदात्त कारण सांगत सरकारने घेतले तरी ते अयोग्यच आहे या मताचे असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. उद्या भारतात घरात कामाला येणार्‍या मोलकरीणी, ड्रायवर्स, माळी यांची पिळवणूक होत आहे असे म्हणत जर सरकार हस्तक्षेप करू लागले तर चालेल का?

त्या वाक्यात टिळकांनी शेतमजूरांना हक्क-न्याय मिळायला नको अशा अर्थाने, (पक्षी: शोषण करण्याला प्रोत्साहन देणारे/शोषणाचे समर्थन करणारे) काही लिहीलेले नाही. तसे पाहीले तर त्यावेळेपासून काँग्रेसचळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर काँग्रेस पक्षामधे सभासद म्हणून जमिनदार किती आहेत आणि शेतमजूर किती आहेत ह्याचे संशोधन केल्यास कोणाचे काय मत होते हे समजायला हरकत नाही.

त्या शिवाय अजून एक महत्वाचा मुद्दा असा की प्रत्येक खोताने/जमिनदाराने शेतमजुरांवर अन्याय केला हे चुकीचे गृहीतक. या संदर्भात गांधीजींचे मत पण बघण्यासारखे आहे:

I do not believe that the capitalists and the landlords are all exploiters by an inherent necessity or that there is a basic or irreconcilable antagonism between their interests and those of the masses. All exploitation is based on co-operation, willing or forced, of the exploited. However mush we may detest admitting it, the fact remains that there would be no exploitation if people refuse to obey the exploiter. But self comes in and we hug the chains that bind us. This must cease. What is needed is not the extinction of landlords and capitalists, but a transformation of the existing relationship between them and the masses into something healthier and purer....Do I not think that the time has come when congress should take a definite stand for the rights of the masses irrespective of the interests of the capitalists and the landlords? No. We, the so-called friends of the masses will only dig our and their graves if we took that stand.... संदर्भ

मला वाटते शोषण, शोषीत, शेतमजूर, जमिनदारी हे सगळे शब्दप्रयोग वर्गलढा अर्थात कम्युनिझमच्या प्रभावातून आलेले आहेत. गांधीजींच्या देखील हे लक्षात आल्याने त्यांनी त्याला त्यांच्या शब्दात विरोधच केला आहे:

Let us not be obsessed with catch-words and seductive slogans imported from the West. Have we not our distinct Eastern tradition? Are we not capable of finding our own solution to the question of capital and labour? What is the system of Varnashrama but a means of harmonizing the difference between high and low, as well as between capital and labour? All that comes from the West on this subject is tarred with the brush of violence.

असो.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

गोखले आणि टिळक

या चर्चेची व्याप्ती गोखले वगैरे सर्वच व्यक्तिंबाबत आहे काय? गोखल्यांचे नाव जाणूनबुजून टाळलेले नाही. निबंधात स्पष्टपणे दोहोंचाही उल्लेख आहे पण उद्धरण फक्त टिळकांचे आहे. गोखल्यांच्या विरोधाविषयी मला पुर्वी (या निबंधाआधी) माहिती नव्हती तसेच त्यांच्या यासंदर्भातल्या भुमिकेविषयीही. पण टिळकांच्या विरोधाबाबत होती. टिळकांचे तेवढेच उद्धरण उपलब्ध झाल्याने तितकेच दिलेले आहे.

सुमित सरकार यांनी त्या निबंधात मांडलेल्या मतांशी मी पूर्णपणे सहमत नाही. त्यांचे मत असे की गोखले व टिळक दोन्ही खोती असलेल्या कुटूंबातून असल्याने त्यांनी या खोतांचे हक्क सुरक्षित रहावेत म्हणून जमिनीच्या हस्तांतरणास विरोध दर्शवला. या मर्यादीत स्पष्टीकरणाशी मी सहमत नाही. टिळक व गोखले या दोघांच्याही विरोधामागे काही निश्चित वैचारिक भुमिका असावी हे मला मान्य आहे.

टिळकांना ब्रिटिश सरकारचा हस्तक्षेप खोत व शेतमजूर यांच्या संबंधात नसावा असे वाटत असण्यात काही गैर नाही. ब्रिटिश व भारतीय यांच्या आर्थिक संबंधात 'बळकावलेपणा' किंवा 'अन्याय' टिळकांना जाणवतो. तेथे ब्रिटिश आक्रमकाने भारतीयांच्या हक्कावर गदा आणू नये हे त्यांना समजते. पण खोताच्या अनेक पिढ्यांपुर्वी त्याच्या पूर्वजांनी लाटलेल्या जमिनीवर ती कसणार्‍या शेतमजूरांचा काही हक्क आहे, हे टिळकांनी दुर्लक्षिलेले आहे एवढेच मला म्हणायचे आहे. गोखल्यांचा विरोध कुठल्या प्रकारचा होता हे माहीत नाही. माहीत नसल्याने मी गोखल्यांना सूट देतो आहे असे कृपया समजू नये.

अवांतर:

गांधीजींच्या देखील हे लक्षात आल्याने त्यांनी त्याला त्यांच्या शब्दात विरोधच केला आहे:

गांधीजींची आर्थिक विषयांविषयी मते पूर्णपणे भंपक आहेत असे माझे मत आहे.

मला वाटते शोषण, शोषीत, शेतमजूर, जमिनदारी हे सगळे शब्दप्रयोग वर्गलढा अर्थात कम्युनिझमच्या प्रभावातून आलेले आहेत.

मार्क्सच्या आधी शेतमजूर, जमिनदारी हे शब्द आणि त्यांच्या संबंधातील शोषण अस्तित्त्वात नव्हते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?

व्याप्ती

या चर्चेची व्याप्ती गोखले वगैरे सर्वच व्यक्तिंबाबत आहे काय?

आपल्या मुळ प्रतिसादात आपण लिहीता:

"महाराष्ट्रात तुकारामांपासून सुरू झालेली सुधारणावादी परंपरा पेशवोत्तरीनंतर तर्खडकर बंधु, लोकहितवादी, रानडे, फुले, आगरकर, गोखले यांनी चालवली. या परंपरेत टिळकांचे स्थान कोठे आहे हे पाहिल्यास टिळक सुधारणावादी नक्कीच नव्हते हे लक्षात येते."

सुधारणावादी सांगताना गोखल्यांना सुधारणावादींच्या पंगतीत बसवता, तेंव्हा व्याप्ती बरीच मोठी असते आणि टिळक कसे सुधारणावादी नव्हते हे सांगण्यासाठी त्यांनी शोषणाकडे दुर्लक्ष केले हे सांगत मात्र गोखल्यांनी पण त्याच संदर्भात टिळकांचीच भुमिका घेतली हे सांगायचे टाळत व्याप्ती विचारता... काय उत्तर देयचे? आपण जाणूनबुजून केलेत का नाही?

सुमित सरकार यांनी त्या निबंधात मांडलेल्या मतांशी मी पूर्णपणे सहमत नाही.

सुमित सरकार यांचा निबंध म्हणजे कम्युनिस्ट जाग्रती समिती वाटला... उद्या जर मला हिंदूंच्या बाजूने लिहायचे असेल तर हिंदू जागृती समितीवरील संदर्भ दिले तर काय वाटेल, तसेच असले संदर्भ बघितल्यावर वाटते. असो, हे माझे व्यक्तिगत मत आहे.

बाकी अधिक नंतर...

बरोबर

सुधारणावादी सांगताना गोखल्यांना सुधारणावादींच्या पंगतीत बसवता, तेंव्हा व्याप्ती बरीच मोठी असते आणि टिळक कसे सुधारणावादी नव्हते हे सांगण्यासाठी त्यांनी शोषणाकडे दुर्लक्ष केले हे सांगत मात्र गोखल्यांनी पण त्याच संदर्भात टिळकांचीच भुमिका घेतली हे सांगायचे टाळत व्याप्ती विचारता... काय उत्तर देयचे? आपण जाणूनबुजून केलेत का नाही?

हो जाणूनबुजूनच केले. टिळक आणि गोखले यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत असे मला वाटते. मी टिळकांनी सुरू केलेल्या संस्थेत महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि पदव्युत्तर शिक्षण गोखल्यांनी स्थापन केलेल्या संस्थेत घेतले. टिळकांच्या संस्थेत वसतिगृहातील सुविधा चांगल्या नव्हत्या म्हणून टिळकांविषयी मला विशेष आकस आहे तर गोखल्यांच्या संस्थेतील वसतिगृह चांगले असल्याने गोखल्यांविषयी विशेष प्रेम आहे. त्यामुळे गोखल्यांनी सुधारकाचे काहीच काम केलेले नसतांना त्यांना सुधारक म्हणून नावाजण्यात तर टिळकांसारख्या समाजसुधारकास सनातनी किंवा संकुचित म्हणून नावे ठेवण्यात माझे वैयक्तिक राग-लोभ आहेत.

सुमित सरकार यांचा निबंध म्हणजे कम्युनिस्ट जाग्रती समिती वाटला... उद्या जर मला हिंदूंच्या बाजूने लिहायचे असेल तर हिंदू जागृती समितीवरील संदर्भ दिले तर काय वाटेल, तसेच असले संदर्भ बघितल्यावर वाटते.

त्या पुस्तकातील फक्त उद्धरण वापरलेले आहे, तेही दुसर्‍या पुस्तकातून पृष्ठक्रमांकासहीत आहे म्हणून मी त्या पुस्तकाचा संदर्भ दिला असा खोटा कांगावा मी करणार नाही. लोकांनी डाव्यांचेच विचार वाचावेत असे माझे मत असल्याने मुद्दामच त्या निबंधाचा दुवा दिला. असो.

धन्यवाद

कांगावा न करता, केलेल्या प्रांजळ आणि प्रामाणिक खुलाश्याबद्दल धन्यवाद. :-)

?

"का" यांनी टिळकांच्या संस्थेचे वसतीगृह आणि गोखल्यांच्या संस्थेचे वसतीगृह याम्ची केलेली तुलना औपरोधिक असावी असा संशय आहे. म्हणजे त्या कारणासाठी ते गोखल्यांची बाजू घेतात हे खरे नसावे.

नितिन थत्ते

:-)

"का" यांनी टिळकांच्या संस्थेचे वसतीगृह आणि गोखल्यांच्या संस्थेचे वसतीगृह याम्ची केलेली तुलना औपरोधिक असावी असा संशय आहे. म्हणजे त्या कारणासाठी ते गोखल्यांची बाजू घेतात हे खरे नसावे.

विचार करा, अजून ५०-१०० वर्षांनी टिळकांवरून चर्चा कशा झाल्या यावर चर्चा होत असेल आणि कोणी केवळ "का" यांचे केवळ वरील वाक्य उर्धृत करून निष्कर्ष काढला की त्यांनी मुद्दामून गोखल्यांची बाजू घेतली. तर त्यात काय अयोग्य आहे? टिळकांचे असेच संदर्भहीन संदर्भ देत त्यांच्यावरचे निष्कर्ष आपण नाही का काढत? ;)

सुधारणावादी आणि टिळक

हे तर अमान्य करण्याचे काहीच कारण नाही की, कर्वे, टिळक, गोखले, रानडे, चिपळूणकर, लोकाहितवादी देशमुख आदींच्या काळातील पुण्यावर पेशवाई विचारसरणीची पक्की पकड होती. पेशवे संस्कृतीला वर्णाश्रम मान्य होताच आणि त्यावर आधारित जातिव्यवस्थाही. पुण्याच्या [त्यावेळेच्या] सामाजिक जडणघडणीचे रूप तपासले तर अशीही उदाहरणे सापडतील जिथे ब्राह्मणाने ९ वर्षाची आपली मुलगी अजून 'अविवाहित' ठेवली असली तर मामलेदाराला त्या गृहप्रमुखाविरूद्ध कारवाई करावी लागे. जातिव्यवस्थेबद्दल तर किती लिहावे तितके कमीच. दोन शूद्र जरी समोरासमोर आले तर त्यानी ब्राह्मणरितीप्रमाणे एकमेकाला 'नमस्कार' करायचा नाही, त्यांच्याप्रमाणे धोतरही नेसायची नाही. तो अधिकार ब्राह्मणांचा. पुढे तर्खडखर बंधूनी, भाऊ महाजन प्रभृतीनी १८३५ च्या आसपास अशा जटील स्थितीविरूद्ध आपल्या लिखाणातून आवाज उठविले. मला वाटते पुण्यात 'सुधारक' विचारसरणीचा तोच पाया मानावा लागेल. गोपाळ हरी देशमुख आणि जोतिबा फुले यानी १८४० नंतर तेवत ठेवलेल्या या सुधारणावादी पिकाला रानडे, आगरकर आणि गोखले आदीनी सक्रीय पाठिंबा दिला. तो किती आणि कसा याबाबत इथे 'उपक्रमा' वर खोलात जाण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. इतपत वाचन इथल्या सन्मानयीय सदस्यांचे आहेच हे जाणवते.

देशमुख आणि रानडे यानीच मुलींच्या शिक्षणाचा धोशा लावला होता. सरकार दरबारी रानड्यांचे त्यांच्या पदामुळे वजन होतेच, त्यामुळे त्यांच्यातर्फे केल्या गेलेल्या अपीलची योग्य ठिकाणी नोंद होण्यास मदतच झाली. मेरी कारपेन्टर या इंग्लिश विदुषीच्या सक्रीय साहाय्याने १८७० च्या आगेमागे मुलींच्या स्वतंत्र शिक्षणाबाबत सुधारकानी प्रयत्न केला. राज्यातील परंपरावादी स्थिती पाहता पुण्यासारख्या शहरात पालकांनी "स्त्री शिक्षणा"बाबत तोंडे वेंगाडली तिथे अन्य गावांची काय कथा ! पण त्याचवेळी बंगाल प्रांताने मुलींच्या शिक्षण व्यवस्थेत आघाडी घेतल्याचे दिसून येत होते. त्यातच इकडे खुद्द पुण्यात स्वत:ला राष्ट्रवादी समजणारी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यानी 'अशा सुधारणा म्हणजे राष्ट्रीय तत्वाची हानी' असल्याचे म्हणण्यास सुरूवात केली. जातिविरहित समाजरचना म्हणजे एकप्रकारे राष्ट्राची हानीच होय असेही विचार त्यानी स्पष्टपणे आपल्या लिखाणातून जाहीर केले. चिपळूणकर आणि टिळकांनी त्यांचे इंग्रजी दैनिक 'मराठा' च्या २४ ऑगस्ट १८८४ च्या अंकात तर लोकहितवादी आणि फुले याना ‘as traitors to the nation’ असे थेट संबोधिले आहे. चिपळूणकर तर 'ब्राह्मण हेच ज्ञानसंपत्तीचे कस्टोडिअन आहेत' असे म्हणत. त्यांच्या आणि तिसरे साथीदार व्ही.एन्. मंडलिक यांच्या अकाली मृत्युनंतर सुधारकांविरूद्ध लढण्याची पूर्णतया जबाबदारी टिळकांच्यावरच आली यात नवल नाही.

मुलींच्या शिक्षणाला त्यांचा किती विरोध होता हे वर पहिल्या प्रतिसादात आलेच आहे; पण अन्य जातीच्या मुलानांही ते इंग्रजी धर्तीचे शिक्षण देण्याविरूद्धच होते. त्यांच्या मते 'इतिहास, भूगोल, गणित, आणि तत्वज्ञान यासारखे विषय कुणब्याच्या पोरांना शिकविण्यात काय अर्थ नाही. त्याना फक्त शेतीची पारंपारिक कामे कशी करावीत याचेच शिक्षण शाळेतून देणे आवश्यक आहे. त्यामुळे उच्चवर्णियांना शिकविण्यात येणारे विषय वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट लागू करू नयेत. रानडे, आगरकर यांनी उचलून धरलेल्या 'सक्तीचे शिक्षण सर्वाना' या संकल्पनेला "मराठा" मधूनच विरोध करताना टिळकानी विचार मांडले आहेत की, "या राज्यातील् सर्वच जनता सरकारला टॅक्स देत नाही, त्यामुळे जे देतात तेच ठरवू शकतात की सरकारने जमा झालेला पैसा कुठे आणि कसा खर्च करावा." ("मराठा" १५ मे १८८१ लेख : ‘Our System of Education – A Defect and a Cure’). आता इथे टिळकांच्या या मतानुसार जे टॅक्स देतात ते केवळ ब्राह्मणच होते आणि न देणारी म्हणजे कुणबी आणि शूद्र. मग त्या टॅक्सपेअर्सच्या पैशावर या दोन घटकांनी इंग्रजीच काय पण मराठी शिक्षणही मिळणे हे शास्त्रानुसार पापच.

कुणब्यांना कुठल्या तरी पद्धतीचे शिक्षण मिळावे इतपत कबुली देणार्‍या टिळकांनी स्पष्टपणे महार-मांगांच्या शिक्षण प्रवेशालाचा विरोध केला होता. "मराठा" च्या २६ मार्च १८८२ च्या अंकात ‘Admission of Mahar boys into Government Schools’ या लेखात त्यानी रानडे प्रभृतींवर टीकेची झोड उडविताना या संदर्भात 'ब्रिटिश शिक्षणाधिकारीही मवाळ धोरण स्वीकारत असल्याचे आरोप केले आहेत.

असो. तूर्तास इतके पुरे.

गाडी

गाडी फारच मजेशीर पद्धतीने पुढे जात आहे...

मुळ विषय काय?

जातीची बंधने न पाळल्याने लोकांना शिक्षा झाल्या आहेत. उदा. ख्रिश्चन मिशनर्‍यांबरोबर चहा प्यायल्याने (कदाचित् बिस्कीटेही खाल्ल्याने) लोकमान्य टिळक आणि रानड्यांना माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे लागले होते.

त्यासंदर्भात त्या लेखकाच्या / प्रतिसादकर्त्याच्या म्हणण्यानुसार चर्चेचे शिर्षक काय? टिळक, रानडे आणि जातीबंधने

त्यावर आपण पहील्या प्रतिसादात काय लिहीता?

टिळकांची राजकीय जडणघडण/विचार/भूमिका कितीही 'रॅडिकल' असली तरी सामाजिक आणि धार्मिक अंगणी ते कायम 'कॉन्झर्वेटिव्ह'च राहिले होते. ज्यावेळी सनातन्यांनी 'मिशनर्‍यांसमवेत तुम्ही चहा आणि बिस्किटे खाल्ली आणि धर्म भ्रष्ट केला' असा हाकारा केला त्यावेळी बळवंतरावांतील वाघाने त्याविरुद्ध डरकाळी फोडलीच नाही, कारण उघड आहे....त्याना "आपण धर्मशिकवणीविरुद्ध वर्तन केले आहे" हे मनी मान्य होतेच.

त्याला उत्तर दिले आणि माफी टिळकांनी नाही तर सुधारणावादी रानड्यांनी मागितली असे म्हणले असता काय पुढे काय म्हणता?

सनातन्यांनी जास्त ओढून का धरले नसेल तर टिळक खुद्द हिंदू धर्मातील परंपरांचे कट्टे पुरस्कर्ते होते हे जगजाहीर होते. विधवाविवाहाला असणारा त्यांचा विरोध, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुलीचे लग्नाचे वय १० वरून १२ वर करण्याबाबत मांडलेल्या ठरावाला टिळकांकडून होणारा निक्षून विरोध, या गोष्टी सनातन्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविणार्‍याच होत्या. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या धर्मविषयक कारवायांना होणारा त्यांचा विरोध समजू शकतो पण पंडिता रमाबाई आणि त्यांच्या कार्यालाही विरोध करणे कोणत्याप्रकारे समर्थनीय ठरेल यावर टिळक अभ्यासकांत मतैक्य होणे नाही.

त्यालाही प्रतिवाद केला तेंव्हा मग गाडी पुढे स्त्री शिक्षण, विधवा विवाहाकडे वळू लागली, अर्थात नंतर स्वतःचा (चर्चेचा नाही) रोख हा "टिळक आणि त्यांची स्त्री-शिक्षण" याकडे आहे असे म्हणत. त्या (आधीच्या प्रतिसादां) संदर्भात उत्तर दिले आणि मला देखील ज्यांच्या बद्दल आदर आहे अशा आणि आपणच (श्री. अशोक) उर्धृत केलेल्या सयाजीरावांचे आणि रानड्यांचे वर्तन हे स्वतः सांगत असलेल्या समाजसुधारणा स्वाचरणात आणताना कसे होते हे सांगितल्यावर त्याकडे दुर्लक्ष झाले.

आता परत नव्याने प्रतिसाद देताना सुरवात काय तर:

पेशवे संस्कृतीला वर्णाश्रम मान्य होताच आणि त्यावर आधारित जातिव्यवस्थाही. पुण्याच्या [त्यावेळेच्या] सामाजिक जडणघडणीचे रूप तपासले तर अशीही उदाहरणे सापडतील जिथे ब्राह्मणाने ९ वर्षाची आपली मुलगी अजून 'अविवाहित' ठेवली असली तर मामलेदाराला त्या गृहप्रमुखाविरूद्ध कारवाई करावी लागे.

उत्तम आहे...

बाकी आपण फक्त परीमला राव यांच्या पुस्तकातील/पेपरातील संदर्भ वाचलेत का हा निव्वळ योगायोग आहे?

योग्यच प्रतिसाद

'टिळक सनातनी की सुधारणावादी' असे ह्या चर्चेचे शीर्षक होते. लेखकाच्या विनंतीनुसार ते 'टिळक, रानडे आणि जातीबंधने' करण्यात आले. त्यामुळे आधीच्या शीर्षकानुसार तुमचा प्रतिसाद योग्यच आहे. असो. तुमच्या प्रतिसादांतून फार चांगली माहिती इथल्या वाचकांना मिळते आहे. त्याकाळी रानडेगटाला विरोध करायचा ही टिळकगटाची गरजही असावी. त्यांना स्वातंत्र्य हवे असले तरी चातुर्वर्ण्यही हवे होतेच. त्यामुळे अजूनही हिंदुत्ववाद्यांना चातुर्वर्ण्याचे असे किंवा तसे समर्थन करणारे टिळक अधिक जवळचे वाटतात असे दिसते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

+१ सहमत

प्रमोद

वाद नको

ठीक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत वाटा असणार्‍या व्यक्तींच्या सर्वच कार्याकडे फक्त दैवत्वाच्या दृष्टीने पाहत गेले तर मग त्यांच्या कोणत्याही मताला पॉझिटिव्ह मान देणे गरजेचे आहे असा एकूण आपला सूर दिसतो.

मी इथे तसा नवीन असल्याने कोणत्या विषयावर कोणत्या पातळीपर्यंत लिहावे [मग ते स्वयंअभ्यासाचे असो वा तुम्ही म्हणता तसे परिमला राव तत्सम रेफरन्सेसच्या साह्याने असो] याचे कदाचित मला भान राहिले नसेल.

असो.

तुलनात्मक

राष्ट्राच्या जडणघडणीत वाटा असणार्‍या व्यक्तींच्या सर्वच कार्याकडे फक्त दैवत्वाच्या दृष्टीने पाहत गेले तर मग त्यांच्या कोणत्याही मताला पॉझिटिव्ह मान देणे गरजेचे आहे असा एकूण आपला सूर दिसतो.

हे कशावरून ठरवले? मी तर टिळक-रानड्यांबद्दल केवळ तुलनात्मक मते मांडली आहेत. दैवत्व हा शब्द आपण आणत आहात मी नाही. पण त्याच बरोबर रानडे-गायकवाड-शाहू महाराज आदींना आपणच देव मानत आहात का असे वाटले.

मी इथे तसा नवीन असल्याने कोणत्या विषयावर कोणत्या पातळीपर्यंत लिहावे [मग ते स्वयंअभ्यासाचे असो वा तुम्ही म्हणता तसे परिमला राव तत्सम रेफरन्सेसच्या साह्याने असो] याचे कदाचित मला भान राहिले नसेल.

ओक्के!

असो.

वा! व्वा!

चर्चा अथपासून इतिपर्यंत वाचली. यापूर्वी मराठी संकेतस्थळांवर अशाप्रकारची चर्चा फक्त गांधीजींवर होत असे. लोक सरसावून संदर्भ देऊन गांधीजी कुठे कुठे चुकले ते दाखवून देत. आता टिळकांचीही वर्णी लागलेली दिसते.

चालू द्या!

चर्चा

प्रियालीताईंचा वरील प्रतिसाद वाचून वाईट वाटले.

तरी देखील

तरी देखील, याचर्चेत देखील (बरोबर-चूक म्हणून नाही, पण) गांधीजी आलेत बरं का! :-)

टिळकद्वेष्टे कुठले!

यापूर्वी मराठी संकेतस्थळांवर अशाप्रकारची चर्चा फक्त गांधीजींवर होत असे. लोक सरसावून संदर्भ देऊन गांधीजी कुठे कुठे चुकले ते दाखवून देत. आता टिळकांचीही वर्णी लागलेली दिसते.
काही जण कुठल्याही प्रकारे, बहुधा खोडसाळपणे, गांधीजींना चर्चेत सामील करून घेत असत. आता त्याच लोकांना टिळकांची वर्णी लागलेली बघून त्रास होतो आहे की काय? टिळकद्वेष्टे कुठले!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नक्की काय् म्हणायचे आहे ?

ज्यावेळी सनातन्यांनी 'मिशनर्‍यांसमवेत तुम्ही चहा आणि बिस्किटे खाल्ली आणि धर्म भ्रष्ट केला' असा हाकारा केला त्यावेळी बळवंतरावांतील वाघाने त्याविरुद्ध डरकाळी फोडलीच नाही, कारण उघड आहे....त्याना "आपण धर्मशिकवणीविरुद्ध वर्तन केले आहे" हे मनी मान्य होतेच.
त्यांना हे मनातून् मान्य् होतेच् हे मान्य् करण्यासाठी काही पुरावा आहे काय् ?
बैलाच्या हॄदयाचे स्वहस्ते विच्छेदन करणेसुद्धा तत्कालीन् धर्मशिकवणीच्या विरोधीच् होते. तरी ते वर्तन् करताना त्यांना काहीच् आक्षेपार्ह् वाटले नाही. आणि ही घट्ना ग्रामण्य प्रकरणाच्या कित्येक् वर्षे आधी घडलेली आहे.
आणि डरकाळीच् फोडण्याचा संदर्भ् घ्यायचा असेल् तर् अनेक् वेळेला कडवा विरोध करण्याची इच्छा असूनदेखील् निव्वळ प्रॅक्टिकली शक्य नाही किंवा राजकारणाच्या दृष्टीने अयोग्य ठरेल या कारणासाठी लोकमान्य् टिळक मूग् गिळून् गप्प बसले आहेत. म्हणून् ताबडतोन् त्यांना ते विशिष्ट् धोरण् मान्य् होते असा अर्थ् काढणार् काय् ?

म्हणजे एका अर्थाने वर्णव्यवस्था नसेल पण जातीव्यवस्था राहिलीच् पाहिजे असे त्याना वाटत असावे, असाही तर्क त्या नकारातून निघू शकतो.
तसे स्वतःच्या कल्पनांनी अनेक् अर्थ् काढता येतील्. पण एका 'ब्राम्हण्' देवाचा उत्सव लोकमान्य् टिळकांनी अशा पद्धतीने नावारुपाला आणला की प्रत्येक जातीच्या आम मराठी माणसाने तो उत्सव आपला सर्वात मोठा उत्सव म्हणून् स्वीकारला. ही एकच् गोष्ट त्यांचे धोरण् काय् होते हे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे.

 
^ वर