सोळा संस्कार

हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) पुढील प्रमाणे आढळतात.

1. गर्भाधान
2. पुंसवन
3. अनवलोभन
4. सीमंतोन्नयन
5. जातकर्म
6. नामकरण
7. सूर्यावलोकन
8. निष्क्रमण
9. अन्नप्राशन
10. वर्धापन
11. चूडाकर्म
12. अक्षरारंभ
13. उपनयन
14. समावर्तन
15. विवाह
16. अंत्येष्टि

यातले काही प्रमुख संस्कार अजूनही पाळले जात असावेत.
या संस्कारांविषयी अधिक माहिती कुणी देऊ शकेल का?
हे संस्कार कसे आले असावेत?
यांचे महत्त्व काय असावे?

प्रत्येक संस्कार उलगडून सांगता येईल का?

Comments

अधिक माहिती

अधिक माहिती अर्थातच येथे आहे.

विद्यारंभ

माझ्या मुलीला बालवाडीत घातली होती तेव्हा तिच्या गुजराथी शिक्षीकेकडून पाटीवर पुढील श्लोक तिने लिहून आणला होता -

सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ॥

या श्लोकाने कदाचित अक्षरारंभ/ विद्यारंभ करत असावेत असा कयास आहे!

संस्कार

लेखात दिलेले संस्कार आता कालबाह्य झालेले असून त्याचे महत्व फक्त एक पुरातन चालरीत एवढेच राहिलेले आहे.
गर्भाधान हा संस्कार तर एक पूर्ण थोतांड आहे. काही भोंदू मंडळींनी या विषयात लोकांच्या मनात असलेला हळवेपणा ओळखून त्यातून पैसे मिळवण्यासाठी हे उद्योग सुरू केलेले आहेत. त्यांच्यावर खरे म्हणजे तर कायद्याने बंदी आणणे आवश्यक आहे.
अन्नप्राश्शन हे जगण्यासाठी आवश्यक असलेले कर्म आहे तो संस्कार कसा असू शकेल?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

उपायाशी असहमत

त्यांच्यावर खरे म्हणजे तर कायद्याने बंदी आणणे आवश्यक आहे.

बाकी एकुण भुमिकेशी सहमत असलो तरी त्यावरील या उपायाशी असहमत
उलट या व्यावसायिकांवर 'वैधानिक इशारा' देण्याची सक्ती करून अश्या व्यवसायांवर दुप्पट कर लाऊन तो नेटाने गोळा करून सरकारने आपली कमाई व सामान्यांवरचा कराचा बोजा हलका केला माहिजे :)
(उदा: नाडीवाल्यांबाबत. त्यांनाही या व्यवस्थेत विअज्ञानिक दृष्टा सिद्ध असे कोणतेही सत्य नसून आपल्या जबाबदारीवर नाडी बघावी असा इशारा व या (व अश्या तत्सम) व्यवसायावर सेवा कर + विक्री कर वगैरे दुप्पट लावले पाहिजेत)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

उपक्रमींपेक्षा सनातनींना विचारा

उपक्रमींपेक्षा सनातनींना मागितल्यास उत्तम.

त्यामुळे आपणांस ही माहिती

http://www.sanatan.org/
http://dainiksanatanprabhat.blogspot.com/

ह्या संकेतस्थळांवर अधिक चांगल्याप्रकारे मिळू शकेल असे वाटते. तिथे जाऊन विचारपूस करून बघा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ह्या संकेतस्थळांवर अधिक चांगल्याप्रकारे माहिती दिलेली आहे

बालसंस्कार.कॉम ह्या संकेत स्थळावर चांगली माहिती दिली आहे.

भागाकार

या संस्थळावर संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार असे म्हटले आहे.

गुणांचा गुणाकार समजण्यासारखे आहे पण दोषांचा भागाकार म्हणजे काय ते कळले नाही.

संस्थळावरील बहुतेक सर्व लेखन भयाणक विणोदी आहे.

नितिन थत्ते

गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार

जसे गुणाकारानी संख्येची किमंत वाढते(शून्या व्यतिरिक्त) तसेच भागाकारानी संख्येची किमंत कमी होईल असे म्हणायचे असावे.

सनातनधर्मी केकावली

सनातनधर्मियांचेच संकेतस्थळ आहे का हे? तोच भडकपणा, तिच बंडलबाजी ठासून भरली आहे तिथे.

केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्‍या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.

काहीहीहीही!

संकेतस्थळावरील वाढदिवस कसा साजरा कराल हा विडिओ अतिशय विनोदी आहे. केकचे दुष्परिणाम सांगणारी केकावली भयाणक विणोदी आहे. :-)

 
^ वर