टिपू सुलतान नव्हे टिपू सैतान
टिपू सुलतान नव्हे टिपू सैतान
लेखक: जयेश मेस्त्री
स्वामी विवेकानंद म्हणत "स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो. पण त्यासाठी आपण तयार झालो आहोत काय? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे." स्वामी विवेकानंदांचा हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या लायकीचे आहोत काय? मानसिक गुलामच आहोत आपण. परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो. म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल? त्याला स्वतासाठी, देशासाठी काहीच करता आले नाही म्हणून त्याच्याच गुरुने (ऍरिस्टॉटलने) त्याला विष पाजून मारून टाकले. आपले हिंदू तर इतके भोळे आहेत की आपल्या चित्रपटात ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक आणि जोधा-अकबर या चित्रपटात तर अकबर हा चक्क हिरो (नायक) दखवला आहे. अहो, आत्ताचे ताजमहल म्हणजे पूर्वीचे तेजोमहल नावाचे शिव मंदिर होते आणि अकबर हा कुणी सज्जन नव्हता तर इतर मुस्लिम बादशहांप्रमाणे तो सुद्दा राक्षसी धर्मवेडाने आणि हिंदूद्वेषाने पछाडलेला होता. महाराणा प्रताप यांच्यासारख्या अनेक हिंदूराजांचे स्वातंत्र्य हिरावून, हिंदूधर्माचा मानभंग करण्यासाठी "हिंदूराजांनी आपल्या मुली मला दिल्या पाहिजेत, माझ्या जनानखान्यात कोंबल्या पाहिजेत" अशी जाहीरपणे अत्याचारी प्रतिज्ञा करणारा खल अकबर हा आमच्या चित्रपटाचा नायक असतो. किती भाबडे आहोत आपण. भाबडे की नालायक? नालायकच..... हिंदूंचा भाबडेपणा तर ह्याच्याही पुढे गेला आहे. छत्रपति शिवाजी महाराज हे हिंदूंचं दैवत. कलियुगात असा राजा जन्माला आलाच नाही अशी हिंदूंची श्रद्धा. असे असूनही आमचे निधर्मी (मुर्ख) हिंदू टिपू सुलतानला म्हैसूरचा शिवाजी म्हणतात. शिवाजी?... कुठे हा टिपू आणि कुठे आमचे शिवछत्रपति. कुठे सुभेदाराच्या लावण्यवती स्त्रीला आईची उपमा देणारे, तिला साडी-चोळी देऊन तिची आदरपूर्वक पाठवणी करणारे जाणता राजा शिवाजी आणि कूथे शेकडो हिंदू स्त्रीयांचे शील भंग करणारा टिपू सैतान. अहो कुठे आमचे ते श्रीमंत योगी आणि कुठे हा भिक्कारडा भोगी. टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी तुलना करणे म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान करणे होय. शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी टिपू सुलतानचा अत्याचारी, रक्तरंजित इतिहास तुम्हा वाचकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
हैदरअली हा म्हैसूरच्या हिंदू राजाच्या सैन्यातील अधिकारी होता. परंतु त्याने त्या हिंदू राजाचा घात करुन राजसत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याच्यासारखाच पराक्रमी आणि क्रूर पुत्र टिपू ह्याच्या हाती म्हैसूरचे हिंदू संस्थान आले. सत्ता हाती येताच टिपूने सर्व काफ़रांना (हिंदूंना) मुसलमान करुन टाकीन अशी पतिज्ञा भर सभेत घेतली. त्याने गावोगावच्या मुसलमानांना लेखी कळवले की "झाडून सार्या हिंदू स्त्री-पुरुषांना मुस्लिम धर्माची दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने हिंदू होणार नाही त्यांना बलात्काराने मुसलमान करा किंवा हिंदू पुरुषांना ठार मारा व स्त्रीयांना मुसलमान बांधवांत वाटून टाका". पुढे टिपूने मलबारमद्दे एक लक्ष हिंदूंना बाटवले. कर्नाटकमधील मराठ्यांच्या राज्यावर त्याने स्वारी केली. तेथील हिंदू स्त्री-पुरुषांना टिपूच्या अत्याचारी आक्रमणास तोंड देणे अशक्य असल्यामुळे, मुस्लिम सैन्याच्या तावडीत सापडण्या-आधीच, कृष्णा, युंगभद्रेसारख्या नद्दांतून लहानग्या मुलांसोबत उडया घेउन जीव दिले. काही जण तर आगीत उडया टाकून भस्मसात झाले. पण बाटून मुसलमान झाले नाहीत. केवढा हा स्वधर्माचा अभिमान?... एके दिवशी तर टिपूने २४ तासांच्या आत ५० सहस्त्र हिंदू बाटवले. "कुठल्याही मुस्लिम सुलतानाला हे महाकृत्य करवले नसेल पण अल्लाच्या कृपेने ईस्लामच्या प्रचारचे आणि काफ़रांच्या नाशाचे हे महाकृत्य मी केले, याचा मला अभिमान वाटतो" असे म्हणत टिपूने ब्रम्हानंद व्यक्त केला.
खास हिंदूंच्या नायनाटासाठी काही कडव्या मुसलमानांची टोळी टिपूने उभारली. त्या टोळीला तो "आपल्या मुलांचे सैन्य" असे लाडाने संबोधत असे. हिंदू स्त्री-पुरुषांना बलात्काराने बाटवण्यात, हिंदूंची लुटालूट करण्यात, त्यांचे घरे जाळून टाकण्यात, त्यांना सपासप कापून काढण्यात, टिपूच्या "लाडक्या सैन्यातले" जे मुस्लिम सैनिक विशेष पराक्रम करतील त्यांना प्रत्येकी पारितोषिक म्हणून हिंदू स्त्रीयांतील तरूण तरूण नि सुंदर मुली म्हणजेच आपल्या हिंदूंच्या आया-बहिणींना निवडून त्यांच्यात वाटून देण्यात येत.
टिपू सुलतानच्या ह्या इस्लामी प्रचारमुळे सारे इस्लामी जग भारावून गेले होते. त्याला "सुलतान", "गाझीइस्लामचा कर्मवीर", ह्या पदव्या देश-विदेशातील मुसलमानांकडून आणि थेट तुर्कस्थानच्या खलिफ़ाकडून मिळाल्या. टिपूला ब्राम्हणांचा अधिक राग होता. कारण ब्राम्हण वर्ग हिंदूसमाजात स्वत्वाचा आणि हिंदूत्वाचा ज्वलंत अभिमान संचारण्याचे कार्य करीत असत. अशाच एका भावे नावाच्या ब्राम्हण संस्थानिक असलेल्या नगरगुंदवर टिपूने चाल केली. टिपूच्या सैन्यासमोर भावेंचे सैन्य टिकू शकले नाही. टिपूने भावे आणि त्यांचे सहकारी पेठे ह्यांना बेड्या ठोकल्या. सर्व राजस्त्रीयांची टिपूने जी विटंबना केली तिचे वर्णन करताना माझे ह्रदय यातनांनी फ़ाटून जाते आहे. त्या राजस्त्रीयांतील ज्या सुंदर स्त्रीया होत्या त्यांचा विकृतपणे छळ करण्यात आला आणि सगळ्यांदेखत सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामद्दे जी अतिसुंदर स्त्री होती तिला ऐयाशीसाठी टिपूने स्वताच्या जनानखान्यात डांबले. आपल्या सुना-लेकींची ही क्लिष्ट नि अमानूष विटंबना, तिच्या डोळ्यांदेखत चाललेली पाहून पेठयांच्या वृद्ध मातेने दुःसह होऊन प्राण त्यागले.
इतकं महाभारत घडूनही हिंदूस्थानी इतिहासात टिपूला डोक्यावर बसवण्याइतकं त्याने आमच्यासाठी केलंय काय? माझ्या हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, ह्यापुढे टिपू सुलतान आणि त्याच्यासारख्या अत्याचारींचा उदोउदो होऊ देउ नका. टिपू सुलतानला महाराजांची उपमा देऊ नका. कारण टिपू सुलतान नव्हता तर टिपू सैतान होता.
लेखक: जयेश मेस्त्री
संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com
Comments
एक बारीक शंका
टिपूची राजधानी श्रीरंगपट्टण येथे होती. ल्याच्या राजवाड्याच्या जवळच श्रीरंगनाथस्वामींचे खूप पुरातन देवालय आहे. या दोन्ही वास्तू आजसुद्धा पहायला मिळतात. सैतान टिपूला काफिरांच्या या देवालयाचा विध्वंस करण्याची सैतानी इच्छा का झाली नाही?
कॉपी
का हो. सहा सोनेरी पानेमधला जवळ जवळ सगळाच्या सगळा उतारा तुम्ही इथे उतरवला आहे. तो काढून् टाकला तर तुमचा लेख आत्ता आहे त्याच्या १/४ सुद्धा उरणार नाही.
स्वामी विवेकानंद म्हणत "स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो"
असे ते खरोखरंच म्हणाले होते का? कारण हे अगदी बालिश विधान आहे.
अहो, आत्ताचे ताजमहल म्हणजे पूर्वीचे तेजोमहल नावाचे शिव मंदिर होते
तुम्ही पु.ना. ओक यांचे लिखाण वाचता का ?
म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल?
अगदी अगदी. यापुढे मी तुम्हाला जगज्जेता म्हणणार.
कॉपी ?
जयेश मेस्त्री
अहो अप्पा,
तुम्ही स्वामी विवेकानंद, स्वां. सावरकर, सु.ग. शेवडे, लोकमान्य टिळक, सच्चिदानंद शेवडे, संजय राऊत, (अजून किती नावे घेऊ)वाचले आहेत काय?
तुमच्यासारख्या लोकांना "सहा सोनेरी पाने" कळणार नाही. कारण ते सावरकरांनी लिहीलेलं आहे.
मजकूर संपादित.
मूळ आक्षेपाचे काय?
तुम्ही विषयाला बगल देत् आहात. ते लिखाण् जसच्या तस उतरवून् काढलं आहे. निदान् ते मान्य करा.
मूळ आक्षेप?
जयेश मेस्त्री
हो मी त्या बाइंच लिखाण वाचल आहे. खूप छान मिहितात. अहो पण इतिहास वाचून थांबायचं नसतं. त्यावर विचार करायचा असतो. भारताचा इतिहास इंग्रजांनी लिहीला. आपण तो खरा मानातचा? का? भारताच्या इतिहासावर टिका करायची, पाश्चात्यांनी लिहीलेल्या इतिहासावरून. आणि मी कॉपी करत नाही. हवं असेल तर माझे ईतर लेख वाचा. आज मराठी सॄष्टी सारख्या चांगल्या साईट्वर माझे लेख् प्रकाशित झाले आहेत. तुम्ही वाचू शकता. मी कॉपी करतो असं तुम्ही कशावरून म्हणू शकता? तुम्ही सहा सोनेरी पाने वाचले आहे का? जर वाचले नसेल तर वाचा आणि मला सांगा कि मी कॉपी करतो म्हणून. मला माझी पात्रता काय आहे हे सांगण्याची गरज वाटत नाही. पण इतकेच सांगतो की सावरकरांच्या आशिर्वादाने लिहायला घेतले. लोकांना खरा इतिहास कळावा म्हणून. अहो सावकरांसारख्या स्वां सैनिकावर टिका होते. तिथे मी कोण आहे? मला कुणाशीही वाद घालायचा नाही. पण भारताची ही स्थिति पाहिली की अश्रू अनावर होतात. माझ्या भारतमातेसाठी मला टिका काय़ तर मरणही आले तरी ते हासत झेलीन. असो... थोडा भाऊक झालो.. धन्यवाद लेख वाचल्याबद्दल आणि माझी थट्टा केल्या बद्दल. देवाचा आशिर्वाद सदैव तुम्हाला लाभो ही सदिच्छा
पुरावा
आणि मी कॉपी करत नाही. हवं असेल तर माझे ईतर लेख वाचा.
सोनेरी पान पाचवे (पूर्वार्ध)
प्रकरण सातवे - हिंदूप्रपीडक क्रूरकर्मा टिपू सुलतान
पान क्र. ६५ - ते पान क्र. ८४
येथून तुम्ही सदर लेखातला बहुतांश भाग उतरवून काढला आहे हे उघड् झालेच आहे. हे पुस्तक www.savarkar.org येथे पूर्वी उपलब्ध होते. आताही असू शकेल पण असेलच् याची खात्री देऊ शकत् नाही.
आज मराठी सॄष्टी सारख्या चांगल्या साईट्वर माझे लेख् प्रकाशित झाले आहेत.
अभिनंदन
हवं असेल तर माझे ईतर लेख वाचा.
ते मग बघू. त्याआधी तुम्हाला लेखनचौर्याचा आरोप मान्य आहे का ते सांगा. तुम्ही कॉपी पेस्ट केलंत् हा अपराध नाही. ते स्वतःच्या नावाने खपवलंत हा अपराध आहे.
उपक्रम हे प्रगल्भ संस्थळ आहे असे स्वतःच्याच मस्तीत वावरणार्या इथल्या काही सदस्यांनी वारंवार ऐकवले होते. त्यांची आठवण या लेखाच्या निमित्ताने झाली.
पण भारताची ही स्थिति पाहिली की अश्रू अनावर होतात. माझ्या भारतमातेसाठी मला टिका काय़ तर मरणही आले तरी ते हासत झेलीन.
बेस्ट ऑफ लक
:)
थ्री इडियटस् या चित्रपटात सहस्रबुद्धे दुबेचे अभिनंदन करतो असा एक प्रसंग आहे तो स्मरला.
--
सहा सोनेरी पाने (भाग १) आणि सहा सोनेरी पाने (भाग २) अजूनही तेथे उपलब्ध आहेत.
बेस्ट ऑफ लक?
जयेश मेस्त्री
धन्यवाद आभारी आहे.. आक्षेप कळला... मी आधीच् म्हटलं होतं की मी सोनेरी पानामधून् लिहीलं आहे.
उघड केल्याबद्दल आभारी आहे... आणि फक्त सोनेरि पानेच् कशाला तर सामना, सनातन प्रभात्, सगळ्याच गोष्टी उघड करा. कारण त्या पलिकडे तुम्ही काही करु शकत नाही...मी तुम्हाला पाठवलेल्या वैयक्तीक मेसेज तुम्ही सर्वांसमोर् ठेवला. याचाही आभारी आहे.. तुम्ही केलेले सगळेच आरोप् मी फेटाळत नाही. पण् ह्याचा अर्थ् असा नाही की मी कॉपी केली. संदर्भ दिला.. तुम्हाला चोर वाटत असेन तर ठीक आहे.. करा चर्चा करा. माझे लेख उड्वून टाका... पण् खरं सांगा मंडळींनो तुम्हाला आक्षेप कशाचा आहे? कॉपीचा की टिपू सैतान होता याचा....
खोटारडे आहात
तुम्ही नाही दिला, जोगळेकरांनी दिला आणि तुमची चोरी उघडी पाडली.
अहो राव
जयेश मेस्त्री
चोरी अघड् पडली? अहो राव तुमचा आक्षेप कशावर आहे? मी चोर आहे त्याच्यावर की इतिहास् खोटा आहे त्यावर?
:)
दोन्ही! तुम्ही चोरीही केलीत आणि जे चोरलेत ते लेखन सत्य इतिहासही नाही.
मी चोर आहे... लेखन असत्य आहे
जयेश मेस्त्री
धन्यवाद ... वाद संपला.. निर्णय झाला... मी चोर आहे... लेखन असत्य आहे... तुम्ही जिंकला मी हरलो...
वाचनसूचना
मी मेस्त्रींचा http://akhandhindusthanmahasabha.blogspot.com/2011/04/s.html हा लेख वाचावा अशी सूचना करतो. हिरव्या आतंकवादामुळे काश्मीरमधल्या स्त्रियांना तिशीतच मेनोपॉज येतो वगैरे गोष्टी त्यात आहेत. हा नक्कीच ओरिजिनल विचार असावा असं वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
बंडल
मी आधीच चुकून धागा वाचला होता. यापुढे मेस्त्रींच्या ब्लॉगवर न जाण्याचा निर्णय घेतला. वेळ घालवण्यासाठी इतर बरी साधने आहेत.
मी इतरांनाही आवाहन करेन की वेळ न घालवावा पण जर मेस्त्री साधकबाधक चर्चा करण्यास तयार असतील तर माझे काही म्हणणे नाही. तसे ब्लॉगवरील फोटो बघता जयेश मेस्त्री हे तरुण व्यक्ती दिसतात. अशा तरुण व्यक्तींनी अखंड हिंदुस्तान वगैरे सारख्या बंडलबाजीत गुरफटणे खेदजनक आहे.
मेनोपॉज
हिरव्या आतंकवादामुळे काश्मीरमधल्या स्त्रियांना तिशीतच मेनोपॉज येतो वगैरे गोष्टी त्यात आहेत
वा, फारच ओरिजिनल विचार. मूळ ब्लॉग वाचण्याइतपत मानसिक तयारी झालेली नाही,पण वरील विधानाला मेस्त्रींचा आक्षेप का, हे कळाले नाही. लवकर रजोनिवृत्ती तर कमी मुले, कमी मुले तर हिरव्या आतंकवादाची कमी पैदास हे समीकरण मेस्त्रींना पटत नाही काय? की हे असे फक्त काश्मिरी हिंदू स्त्रियांनाच होते असे त्यांचे म्हणणे आहे?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
दुवा
नाव पहिल्यांदा ऐकलं, दुवा मिळू शकेल काय?
एल् ओ एल्...
ह. ह. पु. वा.
||वाछितो विजयी होईबा||
बंडलबाजी
या बंडलबाजीपासून सुटका करण्यासाठी उपक्रम प्रशासन काही करेल काय?
प्रतिसाद
उपक्रमावर लिहिताना योग्य संदर्भ वापरून अभ्यासपूर्ण लेखन करावे ही विनंती. व्यक्तिगत रोखाची वाक्ये, सनसनाटीखेज लेखन यांना उपक्रमावर स्थान नाही याची कृपया नोंद घ्यावी.
सध्या काही प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत.
- संपादन मंडळ.
हेच
>>उपक्रमावर लिहिताना योग्य संदर्भ वापरून अभ्यासपूर्ण लेखन करावे ही विनंती
हेच म्हणतो आम्ही. तुमच्या लेखातील प्रत्येक वाक्याला संदर्भ हवा आहे.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
वाटत नाही
अशा अभिव्यक्तीला पाठिंबा दिल्यास उपक्रम प्रगल्भतावाले बनेल!
हे चित्र पहा आणि हे चित्र पहा.
प्रयत्न करणे
प्रयत्न करणे माझ्या हाती आहे ते मी करेनच. ;-) बाकी चालू द्या!
मराठी लोकांमध्ये टिपू हे कुत्र्याचे नाव आहे..
मराठी लोकांमध्ये टिपू हे कुत्र्याचे नाव ठेवतात, इतके माहीत आहे.
मला एक प्रश्न पडतो. नरगुंदचे संस्थानिक भावे आणि त्यांच्या घरातील स्त्रियांची टिपूने विटंबना केल्यानंतर पेशवे, सरदार पटवर्धन आदी पराक्रमी लोकांनी त्याचा सूड कसा नाही घेतला? टिपूविरुद्धच्या संयुक्त मोहिमेत मराठ्यांनी निजाम आणि इंग्रजांना साह्य केले खरे, पण टिपू आणि त्याचा बाप हैदर याला आधी वेळोवेळी जिवंत राहाण्याची आणि थोडा मुलूख किंवा खंडणी घेऊन तह करण्याची संधी कुणी दिली?
सूड घेतला.
जयेश मेस्त्री
सूड घेतला.
पुढे जाऊन मराठ्यांनी आणि इंग्रजांनी टिपूचा नायनाट केला. मरण्यापूर्वी स्वताचे जीव वाचवण्यासाठी त्याने मंदीरांना अनूदान दिले, इतकेच काय तर तो धार्मीक रथाच्या पूढे जाउन उभा रहायचा. पण शेवटी मराठ्यांनी त्याचा खात्मा केला.
टिपू कुत्रा
टिपू या शब्दाचा(किंवा तत्सम शब्दाचा) अर्थ कन्नडामध्ये वाघ असा होतो असे खूप पूर्वी कुठेतरी वाचले होते.(सेतुमाधव रावांच्या 'जीवनसेतु'मध्ये?)
टिपू वाघ नसावा
कन्नडमध्ये वाघाला नक्कीच टिपू म्हणत नाहीत. एखाद्या स्थानिक भाषेत म्हणत असतील तर कल्पना नाही. टिपू सुलतानाचे खरे नाव टिपू नाही. ते बहुधा लाडाने किंवा आदराने हाक मारायचे नाव असावे. टिपूला "टायगर ऑफ मैसूर" असेही म्हणत असल्याने टिपू=टायगर आणि कुत्र्याची नावे वाघ्या वगैरे त्यावरून टिपू असेही पडले असणे शक्य आहे.
आंतरजालावर शोध घेता टिपूचा खुलासा या लेखात दिसला. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहिलेली नाही.
कन्नडमध्ये
कन्नडमध्ये वाघाला "हुली" तर् कुत्र्याला "नाइ" असे म्हणतात.
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
टिपूला मारला म्हणजे सूड नव्हे..
एकट्या टिपूला मारले म्हणजे सूड घेतला, असे होत नाही.
टिपूने केवळ मंदिरेच लुटली नव्हती तर वैष्णव स्वामींचे मठही लुटले होते. अशाच एका मठातून त्याला पूर्ण सोन्याचा पलंग मिळाल्याचे वाचनात आले.
प्रश्न आहे तो टिपूच्या संपत्तीचा आणि त्याने बाटवलेल्या सर्वसामान्यांचा. टिपूला मारल्यानंतर त्याच्या अंगावरचे अत्यंत मौल्यवान अलंकार, पागोट्यात लपवलेले हिरे आणि रत्नजडित तलवार ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज सोजिरांनी लुटली होती. या मोहिमेतून मराठ्यांच्या हाती काय लागले कुणास ठाऊक?
बाटवलेल्या लोकांना स्वधर्मात घेण्याकडे आपल्या राज्यकर्त्यांनी आणि धर्मपंडितांनी लक्ष दिले असते तर तीनशे वर्षांहून अधिक काळ एकच बोंब मारत बसण्याची वेळ आपल्यावर आली नसती. पंधराव्या शतकापासून पोर्तुगीज मिशनर्यांनी गोवा, वसई, दीव-दमण येथे जे केले तेच आज थोड्याफार फरकाने ईशान्य भारतातील राज्यांत होत आहे.
मेस्त्री साहेब मन फार उद्विग्न होतं हो. काय उपाय असेल या स्थितीत?
हिंदू एकजूट
जयेश मेस्त्री
एकच अमोघ उपाय "हिंदू एकजूट". आपण हिंदू विखूरलेलो आहोत. एक्त्र यायला पाहीजे. याल?
उपक्रमाने विचार करावा.
जयेश मेस्त्रीसारख्या लेखकांना उपक्रमावर स्थान असावे की नाही याचा उपक्रमाने कृपया विचार करावा ही विनंती.
विवेकानंद असे म्हणत असतील तर त्यांचे वाक्य अतिशय अर्थहीन आहे.
अर्थातच. जे जग सिकंदरला माहित होते त्याचा तो जेता होता.
अरेरे! काय ही भाकड कथा. बा ऍरिस्टॉटला जयेश मेस्त्रींना माफ कर!
ताजमहाल आणि अकबर यांचा कोणताही परस्परसंबंध नाही. जोधा अकबर हा अकबराच्या जीवनावरील चित्रपट असल्याने त्याचा नायक अकबर असणार. महाराणाप्रताप या चित्रपटात अकबर खलनायक असू शकतो याची नोंद लेखकाने घ्यावी.
आमच्या मुलीशी लग्न कर असे सांगत अंबेरचे राजेच गेले होते अकबराकडे. तसे करू नकोस असाच सल्ला दिला होता त्याच्या मुल्ला मौलवींनी पण अनेकवेळा लाळघोटेपणा केल्यावर अकबर लग्नाला तयार झाला आणि लग्न केल्यावर त्यातले फायदे त्याच्या नजरेला आले. यात त्याचा शहाणपणा दिसतो.
भाकड कथा. शेवटचे वाक्य उपक्रमींना ऐकवण्याऐवजी २-३रीतल्या पोरांना ऐकवावे.
अजातशत्रूने आपल्या बापाचा खून केला. अशोकाने आपल्या मोठ्या आणि इतर भावांचा काटा काढला. पुश्यमित्र शुंगाने मौर्य राजाला घाताने मारून हिंदु राज्य आणले. राणा कुंभाला त्याच्या मुलांनीच मारले. राघोबादादांनी काट करून नारायणरावांना मारले. आपले राज्य आपण टिकवायचे असते. इतरांनी घात केला म्हणून ओरडण्यात अर्थ नसतो.
एक लक्षांना बाटवल्यावर पुढे काय झाले? टिपू कंटाळला की तेवढेच हिंदू होते?
टीपूने अनेक अत्याचार केले असावेत. शक्य आहे. धार्मिक धोरणांबाबत त्याची आणि महाराजांची तुलना करूच नये. किंबहुना, कोणी केली बरे? याचा खुलासा लेखात होतच नाही.
असो.
अशा लेखांना उपक्रमावर प्रकाशित करू नये अशी विनंती. उगीच वेळ वाया जातो सर्वांचा.
:)
नको, चैल्ड अब्यूजची शक्यता आहे.
टोल्ड यू सो!
मागे घेते
मान्य. मी वाक्य मागे घेते. लहान मुलांच्या मनावर असले काहीतरी ऐकून वाईट परिणाम नकोत.
पुरस्कार
श्री श्री जयेश मेस्त्री, (गिरिश केणी चाळ, पन्नालाल घोश मार्ग, सुहास टेरेसच्या बाजूला, राजनपाडा, मालाड (प). मुंबई- ४०००६४.) यांना इतिहासभूषण पुरस्कार द्यावा अशी शिफारस करण्याच्या विचारात असताना हा प्रतिसाद पाहिला. माझी शिफारस मी मागे घेतो. प्रियाली यांना सहनशील रत्न असा पुरस्कार देण्यात यावा. ज्या सहनशक्तीने त्यांनी हा लेख वाचून मुद्दे (असल्यास) ध्यानी घेतले आहेत, आणि कोणताही त्रागा न करता त्यांचे खंडन केले आहे (करण्याचा निष्काम प्रयत्न केला आहे), ते पाहता केवळ सहनशक्तीचेच नव्हे, तर त्यांच्या "अन्य विचारांनाही आदर देण्याच्या" भूमीकेचे दर्शन झालेले आहे. कौतुक वाटते.
(ऑन अ सिरियस नोट- )
याला सहमती द्यावी की असहमती समजत नाही. उगीच वेळ वाया जातो याच्याशी सहमत. इतिहासाची आवड असते. वाचायचा मोह आवरत नाही. बंडलबाजी असते. त्याचा रागही येतो. दुर्लक्षही करवत नाही. पण एका बाजूने मनोरंजनही होते, आणि इतिहासाच्या अभ्यासाचे मोलही समजते. चांगल्या लेखांना काँट्रास्ट थोडा हवाच ना!
@मेस्त्री साहेब - विवेकानंदांना कशाला बदनाम करताय? "आपल्याला स्वातंत्र्य एका दिवसात मिळू शकले असते (पण आपण लायक व्हायला हवे इत्यादि इत्यादि)" असे तुम्हीच म्हणा ना. इतके सगळे बोलताय, त्यात अजून हे.
प्रकाशित का करू नये...
अधोरेखिताशी सहमती आहेच परंतु प्रकाशित करू नये असे मला लिहावे लागले याचे एक कारण मेस्त्रींनी लोकांवर केलेली अनावश्यक टीकाटिप्पणी. एखादेवेळी झालेली टीका टिप्पणी दुर्लक्ष करता येते किंवा संपादक ते उडवून लावतात. येथेही लावले होते परंतु मेस्त्री यांचा कल लोकांचे म्हणणे समजून न घेण्याचा वाटतो त्यामुळे कितीही डोकेफोड करून समजावले तरी ते समजून घेतील अशी शक्यता निदान मला तरी वाटली नाही.
दुसरा मुद्दा असा की ज्याप्रमाणे त्यांनी विवेकानंदांचा वर वापर केला त्याचप्रकारे ते सावरकरांची सोनेरी पाने वाचून आपल्याला इतिहासाची गोडी लागली (कदाचित ते खरेही असेल) आणि इतरांना ते पुस्तक वाचण्याचा सल्ला देतात परंतु स्वतः संदर्भ देताना ते पुस्तक तपासतही नाहीत असे दिसते. ऍरिस्टॉटलला अलेक्झांडरचा खुनी ठरवण्याचे प्रयोजन मला कळले नाही. तशी एक हल्कीशी वदंता होती पण त्याचे कारण वेगळे होते आणि त्यात कोणतेही तथ्य नव्हते. ग्रीसमध्ये बसलेल्या ऍरिस्टॉटलला आशियातल्या अलेक्झांडरवर लक्ष ठेवून त्याच्यासाठी ग्रीसवरून आशियापर्यंत विष वगैरे पाठवायचे कारण नव्हते ही साधी गोष्ट आहे.
असे काही सावरकरांनी सांगितल्याचेही मला आठवत नव्हते तरीही मी पुस्तक उघडून संदर्भ चाळून पाहिला. अलेक्झांडरबद्दल बर्यापैकी वाचून जी माहिती माझ्याकडे आहे तिच माहिती सावरकरांकडेही आहे असेच दिसले - शरीरावरील जखमा, दगदग आणि अतिमद्यसेवनाने आजारी पडून अलेक्झांडर मेला.
एकतर दूषित इतिहास आणि श्रेष्ठींची नावे घेऊन चुकीची माहिती देणे आणि इतरांचे वेळ त्यापायी वाया घालवणे यासाठी उपक्रमाचा वापर होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे.
हेहेहे! पुरस्कार घेऊन काय करू पण जर समोरची व्यक्ती इतरांचे म्हणणे समजावून घेऊन साधक बाधक चर्चा करायला तयार असेल तर मी कष्ट घेऊन समजावून द्यायला तयार आहे. वरील प्रतिसादात मी फारसे कष्टही घेतले नाहीत आणि सहनही केले नाही. ;-)
निषेध
स्वधर्माचा अभिमान नसलेल्या पन्नास हजार - सॉरी - सहस्र हिंदूंचा कडक निषेध!
हर हर शिव शिव
हिंदू समाज इतका रसातळाला जात असताना (तो इतका रसातळाला गेला की शेवटी नेमाड्यांना त्या नावाची एक कादंबरी लिहावी लागली! त्याने तर तो अधिकच रसातळाला गेला, असे म्हणतात! असो.) 'स्मार्टबॉय' मेस्त्रींसारख्या ( असे मी म्हणत नाही, ते स्वतःच त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यात म्हणतात. बर्याचशा गोष्टी मेस्त्री स्वतःच म्हणत असतात!) हिंदू एकजुटीसाठी तळहातावर शिरकमल घेण्याची तयारी असलेल्या आणि अश्रू अनावर झालेल्या नरपुंगवाची संभावना केवळ व्यंग आणि विनोद या टवाळ अस्त्रांनी केली जाते, हे बघून योगप्रभूंसारखे माझे मनही उद्विग्न झाले. या जगात शहाण्यांची कुणाला कदर नाही हेच खरे. मेस्त्री, हताश होऊ नका. हत्तीने आपल्या चालेने चालावे. जोवर तुमच्यासारख्यांचे रक्त हिंदुत्वाच्या कडव्या (की कडवट? राज ठाकरेंना विचारले पाहिजे!) गर्जना करत हिंदुस्थानच्या कोट्यवधी हिंदुंच्या नसांतून, धमन्यांतून आणि केशवाहिन्यांतून उसळ्या, धडका मारत आहे, तोवर अखंड हिंदुस्थाचे स्वप्न साकार करण्याच्या स्वप्नापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही. जय भवानी! जय शिवाजी!
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
धन्स
श्री. धागाकर्ते यांना सहस्रवेळा धन्स!!
या सप्ताहांती कोणता सिनेमा पाहावा याचा विचार करत होतो. पण लेखकमहोदयांनी अजून २ दिवस पुरेल एवढा टाईमपास उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्स!!
ता. क.: लेख वाचत असताना लेखकाच्या नावाने अनेक ९६कुळी शब्द ओठांवर आले पण बोटांवर आले नाहीत. उपक्रम त्याची परवानगी देईल काय? फक्त एकदाच!! प्रॉमिस! ;-)
||वाछितो विजयी होईबा||
जयेश मेस्त्री आगे बढो
"जयेश मेस्त्री आगे बढो| हम तुम्हारे साथ है|", "संगठनमें शक्ती है|"
स्वा. सावरकरांनाही ज्या ऐतिहासिक गोष्टींचा 'शोध' लागला नव्हता त्या गोष्टी खणून काढून येथे प्रस्तुत केल्याबद्दल आपले अभिनंदन.
'ऐतिहासिक सत्य' असे काही नसतेच नाहीतरी.
***
अवांतर -
आपल्याला झालेली भगवी कावीळ लवकर बरी होवो ही आई जगदंबेचरणी प्रार्थना.
हा हा हा
सहा सोनेरी पानांमधील वाक्य योग्य नामनिर्देशाशिवाय जशीच्या तशी लिहिली आहेत. इतक्या प्रसिद्ध पुस्तकातील मजकूर कॉपी करताना तरी नामनिर्देश करायचात :प्
बाकी याच टिपूसुलतानाने शेकडो हिंदूना बाटवले मात्र त्यांना पुन्हा हिंदू व्हायचे असताना त्यांच्या पुनर्प्रवेशासाठी अटकेपार गेलेल्याच काय पण इतरही एकाही हिंदू राजाने पुढाकार घेतला नाही हे खरं का?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
भाकरी का करपली?
भारतवर्षावर परकीयांनीच आक्रमणे केली का? का केली?( गांधारादि प्रांत एकेकाळी भारतवर्षाचा हिस्सा होते का?) भारतवर्षातील राजे-महाराजे सतत पराभूत का झाले? त्यांना केवळ परकीयांशी लढावे लागे की ते आपापसातही लढत असत? भारतवर्ष ज्ञात इतिहासापैकी किती काळ एकछत्री होता? भारतवर्षात धर्मांतरे कधीपासून सुरू झाली? तेव्हापासूनच का? शेकडो-हजारो-लाखो लोक अचानक/एकाएकी का बाटले? तेव्हढेच का बाटले? इतर अब्जावधी का बाटले नाहीत?त्यामागे तात्कालिक किंवा सार्वकालिक असे काही फायदे होते का? भारतवर्षाचा आधी र्हास आणि नंतर पाडाव की आधी फॉल् आणि मग डीक्लाइन्? आधी अधोगती झाली असेल तर तशी ती का झाली? आधी विनाश झाला असेल तर उन्नतीच्या शिखरावर असताना तो का झाला? इ. इ.
इति ब्रह्मजिज्ञासा....
उद्देश?
परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो.
कारण या परकियांनी लिहीलेल्या इतिहासातून इथल्या इतिहासकारांच्या अनेक लांडयालबाडया उघडकीस आल्या आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज हे हिंदूंचं दैवत.
या दैवताच्या पूजारीपदावर बैठक जमवण्याचा धंदा कृपया कोणी करु नये.
शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी टिपू सुलतानचा अत्याचारी, रक्तरंजित इतिहास तुम्हा वाचकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
पोटापाण्यासाठी जे केले जाते ते सर्व प्रामाणिकच असते.
टिपूला ब्राम्हणांचा अधिक राग होता. कारण ब्राम्हण वर्ग हिंदूसमाजात स्वत्वाचा आणि हिंदूत्वाचा ज्वलंत अभिमान संचारण्याचे कार्य करीत असत.
हा ही पोटापाण्याचाच धंदा होता.
एकूण टिपू सुलतान अत्याचारी असेलही पण त्याच्या अत्याचाराचा पाढा वाचतांना शिवाजी महाराजांचा आधार घेण्याचा नेमका उद्देश काय?
लोकांना भडकवायचे ठरवल्यावर उठसुठ लिंबूलोणच्या सारखे शिवाजी तोंडी लावायला फक्त घ्यायचे. बाकी सगळे काय ते महाराष्ट्र जाणतो.
टिपू
टिपूचे खरे नाव टिपू नाही हे खरेच आहे. जुन्या काळच्या शालेय पुस्तकांतून सुद्धा फतेह् अली हेच मूळ नाव म्हणून दिलेले असे. आपण म्हटल्याप्रमाणे टिपू हे गौरवार्थी लाडके नाव असावे. आपण दिलेला दुवा माहितीपूर्ण आहे. पाकिस्तानी विद्वानांच्या लिखाणामधे इंडोआर्यन् रूट्स् नाकारण्याची एक प्रवृत्ती अधेमधे डोके वर काढताना दिसते. तेव्हा पडताळणी करणेच योग्य दिसते. टिपू या शब्दाला कन्नडमधे काही अर्थ आहे किंवा कसे हेही पडताळण्यायोग्य.
पाकिस्तानी विद्वान
प्रतिसाद थोडासा अवांतर होईल परंतु
माझ्या ऐकीव माहितीनुसार पाकिस्तानात पूर्वी (निदान २०-२५ वर्षांपूर्वी तरी) केवळ ब्रिटिश व नंतरचा इतिहासच शिकवला जाई. वैदिक पाळेमुळे वगैरेंपासून लोकांना लांब ठेवले जाई. उलट, नंतरच्या काळात ही कट्टरता थोडी कमी झाली असे मी ऐकले होते. अर्थातच, अद्यापही मुबलक विद्वान इंडोआर्यन् रूट्स् नाकारण्याची एक प्रवृत्ती ठेवून जगत असल्यास त्यात आश्चर्य वाटत नाही. :-)
कराची बंदर
कराची बंदराला मुहम्मद बिन कासिम पोर्ट असे नाव देण्यामागे इंडोआर्यन रूट्स मुद्दाम विसरण्याचा प्रयत्न करणे या शिवाय दुसरा काय हेतू शकतो?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
गड्डाफी
पाकिस्तानी शाळांत इतिहास महंमद बिन कासीमपासून शिकवला जातो. तत्पूर्वीचा (गैर्-मुस्लिम) इतिहास शिकवलाच जात नाही.
लाहोरच्या क्रिकेट स्टेडियमला गड्डाफीचे नाव दिले आहे! (लिबियाचा आणि क्रिकेटचा काय संबंध?)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
क्षम्य
तेही एकवेळ समजण्यासारखे आहे. आपल्याकडे नाही का वानखेडे आणि चिन्नस्वामी स्टेडियम् आहेत? न्हाव्याशेव्यातले बंदर हे जवाहरलाल नेहरू बंदर,मुंबईतले मुख्य रेल् उगमस्थानक हे छत्रपती शिवाजी टर्मिनस्? त्यांनी अजूनपर्यंततरी लाहौर,कराची,बहावलपुर,सियालकोट,पेशावर,इ. शहरांची नावे बदललेली नाहीत. तिथे अस्मितेचा मुद्दा आणलेला नाही. पण मुद्दा तो नाही. मुद्दा इतिहास किंवा कुठल्याही संशोधनातल्या प्रामाणिकपणाचा आहे,सत्यान्वेषणाचा आहे.
अवांतर
आपल्याकडे नाही का वानखेडे आणि चिन्नस्वामी स्टेडियम् आहेत?
चिन्नास्वामीचे ठाऊक नाही पण श्रीयुत शेषराव वानखेडे हे (स्टेडियम बांधतेवेळेस) मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव होते (मंत्रीदेखिल होते, पण तो भाग वेगळा).
खेरीज, नेहरू, शिवाजी इत्यादी मंडळी भारतीयच आहेत. पाकीस्तानला गडाफीऐवजी जीना (किंवा इतर कोणी पाकीस्तानी) यांचे नाव देता आले असते!
त्यांनी अजूनपर्यंततरी लाहौर,कराची,बहावलपुर,सियालकोट,पेशावर,इ. शहरांची नावे बदललेली नाहीत
त्यांनी लायलपूरचे फैसलाबाद केले आहेच. (नक्श लायलपुरींची आठवण आली)
असो, आता हे फारच अवांतर होत चालले आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लायलपूर, ऍबटाबाद
लायलपूर, ऍबटाबाद ही शहरांची नावे इंग्रजी अधिकाऱ्यांच्या नावांवर आधारित आहेत. त्यांच्या नावाचा इतिहास प्राचीन नाही. नक्श लायलपुरीची अजूनही आपल्यात आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आणखी अवान्तर -ब्रिटिश नावे
स्वातन्त्र्यपूर्व काळात अविभक्त हिंदुस्तानात अनेक स्थानांना ब्रिटिश नावे होती आणि त्यांपैकी काही अजूनहि टिकून आहेत. त्यावर पुढेमागे केव्हातरी लिहीन. आज पाकिस्तान-बांगलादेशातील ही नावे पहा-
ऍबटाबाद - हझारा विभागातील ऍबटाबाद जिल्ह्याचे मुख्य स्थान. मे. जेम्स ऍबट (१२ मार्च १८०७ - ६ ऑक्टोबर १८९६) ह्यांनी ह्या गावाची स्थापना केली आणि १८४९-५३ ह्या काळात ते त्याचे डेप्युटी कमिशनर (म्हणजे आपल्याकडचे कलेक्टर) होते.
कॅंपबेलपूर (१९७८पासून अटक सिटी) - गावाचे संस्थापक सर कॉलिन कॅंपबेल ह्यांच्या नावावरून.
फोर्ट सॅंडेमन (१९७६ पासून झोब शहर). रॉबर्ट सॅंडेमन (१८३५-९२) ह्या ब्रिटिश लष्करी अधिकार्याच्या नावावरून. बलुचिस्तानला शांत करून ब्रिटिश इंडियामध्ये सामील करण्याचे कार्य त्यांनी केले.
जाकोबाबाद. संस्थापक ज. जॉन जेकब (१८१२-१८५८) ह्यांचे नाव ह्या गावास दिले आहे. अविभाजित हिंदुस्तानातील सर्वात गरम जागा अशी ह्याची ख्याति होती.
लायलपूर (आताचे फैसलाबाद) सर जेम्स लायल (१८३८-१९१६), ले. गवर्नर पंजाब (१८८७-१८९२) ह्यांच्या नावावरून.
मॉंटगोमेरी (१९६७पासून साहिवाल) हे नाव सर रॉबर्ट मॉंटगोमेरी, ले. गवर्नर, पंजाब (१८५९-६५) ह्यांच्या नावावरून.
कॉक्स बज़ार (Cox's Bazar), बांगलादेश हे जिल्ह्याचे स्थान कॅ. हायरम कॉक्स ह्यांच्या नावावरून स्थापन झाले आहे. १८व्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मदेशाने आराकान जिंकून घेतल्यावर तेथीक स्थानिक मोघ वस्ती निर्वासित होऊन बंगालकडे वळली. कॉक्स ह्यांनी त्या निर्वासितांसाठी हे गाव वसविले.
चारफासन, भोला जिल्हा, बांगलादेश. नदीच्या मुखात गाळामुळे निर्माण झालेल्या बेटाला ’चार’ असे म्हणतात. भोला जिल्ह्यातील अशा एका चारला जे.एच.फॅशन, जिल्हा मॅजिस्ट्रेट, बकरगंज ह्यांचे नाव लागून त्याला आता चारफासन म्हणतात.
मॉरेलगंज, बांगलादेश. कुथी बारी ही इस्टेट मॉरेल कुटुंबाच्या मालकीची होती. त्यावरून त्या गावास हे नाव पडले आहे.
मॅक्लिऑडगंज, डलहौजी
हिमाचल प्रदेशातले डलहौजी हे गाव गर्वनर जनरल लोर्ड डलहौजीच्या नावावरून. हिमाचल प्रदेशातलेच आणखी एक गाव मॅक्लिऑडगंज हे डॉनल्ड मॅक्लिऑड ह्या पंजाबच्या ले. गवर्नराच्या नावावरून.
अवांतरात आणखी अवांतर:
मुघलांच्या काळात काही शहरांना विशेषणे दिल्याचे आढळते. उदाहरणार्थ बनारसला दारुल क़ज़ा, जुन्नरला दारुल खैर, औरंगाबादला खुजस्ता बुनियाद, हैदराबाद (दख्खन) ला फरख़ंदा बुनियाद वगैरे वगैरे.
ही चर्चा हळूहळू ही नावांची रंजक होते आहे. संपादकांनी शक्य झाल्यास ही चर्चा वेगळी करावी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"