टिपू सुलतान नव्हे टिपू सैतान

टिपू सुलतान नव्हे टिपू सैतान
लेखक: जयेश मेस्त्री

स्वामी विवेकानंद म्हणत "स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो. पण त्यासाठी आपण तयार झालो आहोत काय? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे." स्वामी विवेकानंदांचा हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या लायकीचे आहोत काय? मानसिक गुलामच आहोत आपण. परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो. म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल? त्याला स्वतासाठी, देशासाठी काहीच करता आले नाही म्हणून त्याच्याच गुरुने (ऍरिस्टॉटलने) त्याला विष पाजून मारून टाकले. आपले हिंदू तर इतके भोळे आहेत की आपल्या चित्रपटात ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक आणि जोधा-अकबर या चित्रपटात तर अकबर हा चक्क हिरो (नायक) दखवला आहे. अहो, आत्ताचे ताजमहल म्हणजे पूर्वीचे तेजोमहल नावाचे शिव मंदिर होते आणि अकबर हा कुणी सज्जन नव्हता तर इतर मुस्लिम बादशहांप्रमाणे तो सुद्दा राक्षसी धर्मवेडाने आणि हिंदूद्वेषाने पछाडलेला होता. महाराणा प्रताप यांच्यासारख्या अनेक हिंदूराजांचे स्वातंत्र्य हिरावून, हिंदूधर्माचा मानभंग करण्यासाठी "हिंदूराजांनी आपल्या मुली मला दिल्या पाहिजेत, माझ्या जनानखान्यात कोंबल्या पाहिजेत" अशी जाहीरपणे अत्याचारी प्रतिज्ञा करणारा खल अकबर हा आमच्या चित्रपटाचा नायक असतो. किती भाबडे आहोत आपण. भाबडे की नालायक? नालायकच..... हिंदूंचा भाबडेपणा तर ह्याच्याही पुढे गेला आहे. छत्रपति शिवाजी महाराज हे हिंदूंचं दैवत. कलियुगात असा राजा जन्माला आलाच नाही अशी हिंदूंची श्रद्धा. असे असूनही आमचे निधर्मी (मुर्ख) हिंदू टिपू सुलतानला म्हैसूरचा शिवाजी म्हणतात. शिवाजी?... कुठे हा टिपू आणि कुठे आमचे शिवछत्रपति. कुठे सुभेदाराच्या लावण्यवती स्त्रीला आईची उपमा देणारे, तिला साडी-चोळी देऊन तिची आदरपूर्वक पाठवणी करणारे जाणता राजा शिवाजी आणि कूथे शेकडो हिंदू स्त्रीयांचे शील भंग करणारा टिपू सैतान. अहो कुठे आमचे ते श्रीमंत योगी आणि कुठे हा भिक्कारडा भोगी. टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी तुलना करणे म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान करणे होय. शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी टिपू सुलतानचा अत्याचारी, रक्तरंजित इतिहास तुम्हा वाचकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
हैदरअली हा म्हैसूरच्या हिंदू राजाच्या सैन्यातील अधिकारी होता. परंतु त्याने त्या हिंदू राजाचा घात करुन राजसत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याच्यासारखाच पराक्रमी आणि क्रूर पुत्र टिपू ह्याच्या हाती म्हैसूरचे हिंदू संस्थान आले. सत्ता हाती येताच टिपूने सर्व काफ़रांना (हिंदूंना) मुसलमान करुन टाकीन अशी पतिज्ञा भर सभेत घेतली. त्याने गावोगावच्या मुसलमानांना लेखी कळवले की "झाडून सार्‍या हिंदू स्त्री-पुरुषांना मुस्लिम धर्माची दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने हिंदू होणार नाही त्यांना बलात्काराने मुसलमान करा किंवा हिंदू पुरुषांना ठार मारा व स्त्रीयांना मुसलमान बांधवांत वाटून टाका". पुढे टिपूने मलबारमद्दे एक लक्ष हिंदूंना बाटवले. कर्नाटकमधील मराठ्यांच्या राज्यावर त्याने स्वारी केली. तेथील हिंदू स्त्री-पुरुषांना टिपूच्या अत्याचारी आक्रमणास तोंड देणे अशक्य असल्यामुळे, मुस्लिम सैन्याच्या तावडीत सापडण्या-आधीच, कृष्णा, युंगभद्रेसारख्या नद्दांतून लहानग्या मुलांसोबत उडया घेउन जीव दिले. काही जण तर आगीत उडया टाकून भस्मसात झाले. पण बाटून मुसलमान झाले नाहीत. केवढा हा स्वधर्माचा अभिमान?... एके दिवशी तर टिपूने २४ तासांच्या आत ५० सहस्त्र हिंदू बाटवले. "कुठल्याही मुस्लिम सुलतानाला हे महाकृत्य करवले नसेल पण अल्लाच्या कृपेने ईस्लामच्या प्रचारचे आणि काफ़रांच्या नाशाचे हे महाकृत्य मी केले, याचा मला अभिमान वाटतो" असे म्हणत टिपूने ब्रम्हानंद व्यक्त केला.
खास हिंदूंच्या नायनाटासाठी काही कडव्या मुसलमानांची टोळी टिपूने उभारली. त्या टोळीला तो "आपल्या मुलांचे सैन्य" असे लाडाने संबोधत असे. हिंदू स्त्री-पुरुषांना बलात्काराने बाटवण्यात, हिंदूंची लुटालूट करण्यात, त्यांचे घरे जाळून टाकण्यात, त्यांना सपासप कापून काढण्यात, टिपूच्या "लाडक्या सैन्यातले" जे मुस्लिम सैनिक विशेष पराक्रम करतील त्यांना प्रत्येकी पारितोषिक म्हणून हिंदू स्त्रीयांतील तरूण तरूण नि सुंदर मुली म्हणजेच आपल्या हिंदूंच्या आया-बहिणींना निवडून त्यांच्यात वाटून देण्यात येत.
टिपू सुलतानच्या ह्या इस्लामी प्रचारमुळे सारे इस्लामी जग भारावून गेले होते. त्याला "सुलतान", "गाझीइस्लामचा कर्मवीर", ह्या पदव्या देश-विदेशातील मुसलमानांकडून आणि थेट तुर्कस्थानच्या खलिफ़ाकडून मिळाल्या. टिपूला ब्राम्हणांचा अधिक राग होता. कारण ब्राम्हण वर्ग हिंदूसमाजात स्वत्वाचा आणि हिंदूत्वाचा ज्वलंत अभिमान संचारण्याचे कार्य करीत असत. अशाच एका भावे नावाच्या ब्राम्हण संस्थानिक असलेल्या नगरगुंदवर टिपूने चाल केली. टिपूच्या सैन्यासमोर भावेंचे सैन्य टिकू शकले नाही. टिपूने भावे आणि त्यांचे सहकारी पेठे ह्यांना बेड्या ठोकल्या. सर्व राजस्त्रीयांची टिपूने जी विटंबना केली तिचे वर्णन करताना माझे ह्रदय यातनांनी फ़ाटून जाते आहे. त्या राजस्त्रीयांतील ज्या सुंदर स्त्रीया होत्या त्यांचा विकृतपणे छळ करण्यात आला आणि सगळ्यांदेखत सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामद्दे जी अतिसुंदर स्त्री होती तिला ऐयाशीसाठी टिपूने स्वताच्या जनानखान्यात डांबले. आपल्या सुना-लेकींची ही क्लिष्ट नि अमानूष विटंबना, तिच्या डोळ्यांदेखत चाललेली पाहून पेठयांच्या वृद्ध मातेने दुःसह होऊन प्राण त्यागले.
इतकं महाभारत घडूनही हिंदूस्थानी इतिहासात टिपूला डोक्यावर बसवण्याइतकं त्याने आमच्यासाठी केलंय काय? माझ्या हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, ह्यापुढे टिपू सुलतान आणि त्याच्यासारख्या अत्याचारींचा उदोउदो होऊ देउ नका. टिपू सुलतानला महाराजांची उपमा देऊ नका. कारण टिपू सुलतान नव्हता तर टिपू सैतान होता.

लेखक: जयेश मेस्त्री
संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com

लेखनविषय: दुवे:

Comments

समारोप

मी चोर आहे... लेखन असत्य आहे
प्रेषक जयेश मेस्त्री (शनि, 04/30/2011 - 17:52)

धन्यवाद ... वाद संपला.. निर्णय झाला... मी चोर आहे... लेखन असत्य आहे... तुम्ही जिंकला मी हरलो...
»

असा झालेला आवडला.
*णंतरचा उपसंहारही वाचणीय आहे*

 
^ वर