सत्यसाईबाबांची तब्येत

बाबा आणि कलाम
बाबा आणि कलाम

पुट्टपार्थीच्या सत्यसाईबाबांची प्रकृती अनेक दिवसांपासून अत्यवस्थ असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. हे सत्यसाईबाबा शिरडीवाल्या साईबाबांचे अवतार आहेत असे समजले जाते. बाबांकडे चमत्कारी शक्ती आहेत असेही त्यांचे भक्त मानतात. ते त्यांच्या मुखकमलातून अंगठ्याबिंगठ्या काढत असतात. राखबिख तर चिल्लर. ह्या अशा चमत्कारी बाबांची तब्येत कशी काय बिघडू शकते? ह्याचे उत्तर कोणाकडे आहे काय? बाबा एवढे चमत्कारी असताना त्यांना इस्पितळे काढण्याची गरज काय होती बरे? ते आपल्या असामान्य चमत्कारी शक्तीने लोकांना आणि स्वतःला बिनाऑपरेशन शर्तिया टकाटक बरे करू शकत नाहीत का?

बर स्वतः साईबाबांनी ते इसवीसन २०२२ पर्यंत जगतील असे स्वतःबद्दल सांगितले आहे. हे सारे स्पष्ट असताना त्यांना उपचाराची गरज काय?

कृपया मते मांडावी.

अवांतर: बाबांनी म्हैसूर भागात माझा पुनर्जन्म होईल आणि येत्या अवतारात मला प्रेमसाईबाबा म्हणून ओळखले जाईल असे म्हटले आहे. असो. बाबांना दीर्घायुरारोग्य चिंतून मला तुम्हाला विचारावेसे वाटते की प्रेमसाईबाबा हे नावे तुम्हाला कसे वाटते बरे. तुम्हाला कुठले नाव आवडले असते?

Comments

साई

साई या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? मूळ साईबाबांना कोणा सिंधी माणसाने "आओ साई" असे म्हटल्याने त्यांना सर्व साईबाबा म्हणून ओळखू लागले असे म्हटले जाते. सिंध्यांमध्ये "साईभाजी" म्हणून एक मिश्रभाजीचा प्रकार असतो.

सत्य साईबाबा तेलगु असल्याने अनेक तेलगु लोक त्यांचे भक्त असल्याचे दिसते. त्यांच्यात मुलांची आणि मुलींची नावे साई ठेवल्याचे दिसते. उदा. काहीजणांचे नाव (फर्स्टनेम) "साई" असते तर काहीजण "साई" अशी नावामागे उपाधीही लावतात उदा. "किरण साई"

बरोबर

काहीजणांचे नाव (फर्स्टनेम) "साई" असते तर काहीजण "साई" अशी नावामागे उपाधीही लावतात उदा. "किरण साई"

बरोबर. मी सिंध्यांत नावामागे 'साई' उपाधी लावलेली ऐकली आहे. बहुधा राव, रावजी, रावसाहेब तसे सांई असावे.

मला साईबाबा हे शिरडीवाल्या साईबांच्या अवतारापेक्षा जिमी हेंड्रिक्स नावाच्या रॉकताऱ्याचे आणि गिटारपटूचे नातेवाईक वाटतात.

जिमी हेंड्रिक्स
जिमी हेंड्रिक्स

जिमी गिटारवाला जादूगार तर सच्चसाईबाबा....
असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

अरे ऑ धम्मक सॉंई .. सही बोला रे .. मला तर सनम बेवफा मधला प्राण आठवला ... तो तर कुठे साँई नाही लावायचा ? अम्मा साँई .. दुश्मन साँई .. .घोडा साँई ... दुध साँइ ..
त्यामुळे खरा सत्यसाईबाबा प्राण आहे . हा तर् झिपरु आण्णा ..जन्मात कधी कंगवा फिरवलाय का केसांत ?

- गद्दाफी साँई

एका रेस्तरों चे नाव

ठाण्यातल्या एका दुकानाचे नाव "साईध्यान" असे आहे. हा समास आम्ही शाळेत असताना विविध प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केला होता. उदा. "साई आहे ज्याचे ध्यान असा तो" किंवा "साई हेच ध्यान" किंवा "साई आणि ध्यान" वगैरे वगैरे.

ठाण्यातल्या एका रेस्तरोंचे नाव "साई प्रणय" असे आहे. याचे विवेचन करायला मजकडे शब्द नाहीत.

साई

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"साई" हा स्वामी शब्दाचा अपभ्रंश आहे.
साई = स्वामी = मालक,धनी "सबका मालिक एक."
.
अपभ्रंशात म चा व होतो. जसे :नाम--> नाव. ग्राम--> गाव .बरेचदा जोडाक्षरातील अर्धे अक्षर लोप पावते. कमल--> कंवल, कोमल--> कोवळं इ.
.
स्वामी--> सामी--> सांवी--> सांई--> साई

प्रतिसाद योग्य वाटत आहे.

स्वामीचं साई होतं असाव.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

सहाय्य

सहाय्य

साई या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?

हाच प्रश्न एका भाषाशास्त्रविषयक सभेत विचारला असता 'सहाय्य करणारा तो सहाय्यी / साई' असे उत्तर एका जाणकार व्यक्तीने दिल्याचे स्मरते. ह्या उपपत्तीवर आमचे आणि त्यांचे यथावकाश मतभेद झाले. श्री. यनावाला ह्यांनी दर्शविलेली उपपत्ती आम्हांस अधिक योग्य वाटते.

असो.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

सत्यसाईबाबांविरुद्धचा कट

कित्येक भक्तांचे असे म्हणणे आहे की सत्य साईबाबां सध्या ओलिसाचे जिणे जगत आहे. कोणाचा तरी असा डाव आहे की त्यांना मारून टाकायचे आणि मग त्यांच्या संस्थेच्या पैशावर राज्य करायचे.

सत्यसाईबाबा हे त्रिकालदर्शी पुरुष असल्याने असे होण्यात त्यांचा काही हेतू असण्याची शक्यता आहे. पण सध्यातरी हा हेतू बहुतेकांसाठी अगम्य आहे. वेळ येताच ज्याच्या त्याच्या शक्तिनुसार असे का घडते आहे याचा उलगडा होईल. येशु ख्रिस्ताला ज्यावेळी क्रुसावर चढवले त्यावेळी तिसर्‍या दिवशी परत उठण्यासाठी. कदाचित असा हेतू असेल. किंवा एखादे मूल तयार होण्याची वेळ आली असेल. आणि ती वेळ त्यांना चुकवायची नसेल. कदाचित अनेक भक्तांना गंभीर आजारातून बरे करण्याच्या शक्तिव्ययामुळे ते क्षीण झाले असतील, आणि आपल्या बलिदानातून पुढच्या दुनियेच्या उद्धार त्यांना गाठायचा असेल.

सत्यसाईबाबांना १४व्या वर्षी विंचू चावल्यानंतर आपण साईबाबा आहोत याचा साक्षात्कार झाला. वयाच्या सदतीसाव्या वर्षी (१९६३) ४ हृदयविकाराचे झटके आणि एक स्ट्रोक आल्यानंतर त्यांनी सांगितले की मी प्रेम-साईबाबा म्हणून जन्म घेणार आहे. सध्या त्यांच्या या योजनेत काही बदल झाला असल्यास माहिती नाही.

महाराष्ट्राचे एक संत श्री अनिरुद्ध बापू महाराज यांच्या बद्दल एक गोष्ट सांगणे इथे अनुचित होणार नाही. एका भक्ताने सांगितलेला हा किस्सा आहे. (मला वाटते की लोकप्रभेत हा आला होता.) मूळच्या साईबाबांनी एका माणसास आपल्याकाही वस्तु दिल्या होत्या. आणि सांगितले होते की मी त्या परत घेऊन जायला येईन. त्याप्रमाणे एकदा अनिरुद्ध बापू एकदा त्याच्या कडे आले आणि त्या वस्तू घेऊन गेले. यावरून हे स्पष्ट होते की एकाच वेळी अनेक अवतार घेण्याचे अद्भूत सामर्थ्य साईबाबांमधे असावे. सत्यसाईबाबा सर्वच बाबतीत त्यापुढे असल्याने पुढील काळात प्रेम, सवाई, भक्त इत्यादी अनेक महापुरुष आपल्याला पहायला मिळायला हरकत नसावी. कदाचित हे सर्व महापुरुष सत्यसाईबाबांनी ठेवायला दिलेल्या अंगठ्या, कंठे, बुक्के (बुक्का म्हणजे काळी पूड येथे मुष्टीचा संबंध नाही), राख, बढत्या, तिकिटे आदी सर्व परत घेतील तेव्हा कुठे अविश्वासूंचे डोळे उघडतील.

प्रमोद

आँ?| प्रेम साईबाबा

त्याप्रमाणे एकदा अनिरुद्ध बापू एकदा त्याच्या कडे आले आणि त्या वस्तू घेऊन गेले. यावरून हे स्पष्ट होते की एकाच वेळी अनेक अवतार घेण्याचे अद्भूत सामर्थ्य साईबाबांमधे असावे.

आँ! असे आहे होय. मी तर अनिरुद्धबापूंना कल्की अवतार समजत होते. म्हणजे, तसे त्यांच्या भक्तांना सांगताना आणि पटवून देताना प्रत्यक्ष ऐकले आहे. कल्की पांढर्‍या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन येईल अशी संकल्पना आहे. बापू पांढर्‍या शुभ्र मर्कमधून येत असावे इतकाच काय तो फरक.

-------
प्रेम साईबाबांवर विकीवर हा लेख दिसला.

तरीही!

मी तर अनिरुद्धबापूंना कल्की अवतार समजत होते.

इकडे नाही का, काही आयडी अनेक व्यक्तींमध्ये शेअर्ड असतात तर काही व्यक्ती अनेक डुप्लिकेट आयडी बनवितात! तसेच कधी अनेक अवतार एकत्र मिळून एकाच शरिरात जन्मलेले असतात तर कधी एकच अवतार एकाच वेळी अनेक शरिरांत जन्म घेतो ;)

अवतार

कालच 'अवतार' बघून माझ्या डोक्यात चक्र सुरू झाले होते. वरचा प्रतिसाद वाचून तर ते आणखिनच गरागरा फिरायला लागले ;)

सट्टा साईबाबा

एकाच वेळी अनेक अवतार घेण्याचे अद्भूत सामर्थ्य साईबाबांमधे असावे.

तुम्ही म्हटलंय ते खरंय. सट्टा साईबाबासट्टा साईबाबा ह्या नावाने साईबाबा पून्हा अवतरले आहेत.

सट्टा साईबाबा
सट्टा साईबाबा

भक्तांनो, बाबांच्या फोटोला नमस्कार करा.

हमाल मुलगा
(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)

साईराम

इथे दिलेला फोटो पाहून २०२० साली भारत महासत्ता होणार ह्याची खात्री पटली.

खोडसाळपणा

बाबा आणि डॉ. अब्दुल कलाम् यांचा एकत्रित् फोटो देण्यामागे काही आचरट हेतू असावा.

खोडसाळपणा

कुणाचा? बाबांचा की कलामांचा?

हेतू

त्याला पॅकेज डील असे म्हणतात. फ्रॉडबरोबर जोकर फुकट!

??

आता यातला फ्रॉड कोण आणि जोकर कोण? कलाम फ्रॉड आहेत असं कुठं वाचलेलं आठवत नाही म्हणजे त्यांना तुम्ही जोकर संबोधता असं दिसतंय. तसे कलाम त्यांच्या विषयातले जगप्रसिद्ध तज्ञ आहेत. तुम्ही त्यांना जोकर म्हणण्याएवढे भारी आहात काय? तुमचं नाव कुठं ऐकल्याचं स्मरत नाही. दुसर्‍या माणसाला काहीही म्हणा त्यांची पात्रता माहीत नाही. पण कलाम म्हणजे जोकर???

(हल्ली कुणीही आंडूपांडू संस्थळावर चार शब्द खरडून स्वतःला शहाणा/शहाणी समजतो/ते)

???

आणि सत्यसाई? तेही त्यांच्या विषयातील जगप्रसिद्ध तज्ञच आहेत. त्यांना 'फ्रॉड' संबोधल्याच्या निषेध का नाही?

इंटलेक्टची तहान

--(हल्ली कुणीही आंडूपांडू संस्थळावर चार शब्द खरडून स्वतःला शहाणा/शहाणी समजतो/ते)

मुंह की बात छिन ली आपने.
असा एखादा फोटो द्यायचा व त्याची यथेच्छ चेष्टा करायची हा इंटलेक्टची तहान भागवण्याचा एक भाग झाला आहे.

अंमळ मजेशीर

फ्रॉडबरोबर जोकर फुकट!

वरचा फोटो अंमळ मजेशीर आहे पण तो कलामांना जोकर म्हणण्याची मुभा देतो असे वाटत नाही. कलामांच्या ऐवजी जॉर्ज बुश, लालू, मायावती, अमरसिंह वगैरे कंपनी असती तर जोकर शब्द बरा दिसला असता असे माझे मत.

कलामांनी विदूषकी चाळे केल्याचे येथे दिसले नाही आणि इतरत्रही दिसले नाही तेव्हा कलामांना जोकर म्हटले असल्यास नाराजी व्यक्त करते.

+१

सहमत आहे/

जोकर म्हणण्याइतकी काय घोडचुक केली असावी कलामांनी असा विचार आला.

+१

हेच म्हणतो व माझा आक्षेप नोंदवतो.

+१

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१००

+१००

श्री. कलाम ह्यांस जोकर अथवा प्र्हाड् ह्यापैकी काहीही संबोधिणार्‍या प्रवृत्तीचा उघड निषेध.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

मजेशीर

लालू, जॉर्ज बुश इ. ह्यांच्याइतके विनोदी चाळे कलामांनी केले नसावेत ह्याबाबत सहमत आहे. पण वर दिलेला फोटो फारंच विनोदी आहे एवढं नक्की.

सहमत

वरचा फोटो अंमळ मजेशीर आहे पण तो कलामांना जोकर म्हणण्याची मुभा देतो असे वाटत नाही.

असेच वाटते. कलामचाचांची केशभूषाही मजेशीर असते. पण त्यांना जोकर म्हणणे पटत नाही. बाकी लालू, बुश आणि अमरसिंहाच्या बाबतीत सहमत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत.

कलामांनी विदूषकी चाळे केल्याचे येथे दिसले नाही आणि इतरत्रही दिसले नाही तेव्हा कलामांना जोकर म्हटले असल्यास नाराजी व्यक्त करते.

सहमत. कलामांना प्रत्यक्ष पहाण्याच्या योग आला होता. जोकर म्हणण्यासारखे त्यांच्यात काही आहे असे वाटत नाही.

-Nile

सहमत

--पण तो कलामांना जोकर म्हणण्याची मुभा देतो असे वाटत नाही.

१००% सहमत.

-१००.२.. निषेध

मी पण..मी पण..निषेध.

हा आमच्या डार्क नाईट च्या जोकर चा "पण" अपमान आहे.

निषेध ..

फ्रॉडबरोबर जोकर फुकट!... वाक्य बरूबर नाही रिटे.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

पीजे

एका विदुषकाने विद्वान व्यक्तिस् विदुषक संबोधावे यासारखा दुसरा निर्बुद्ध् विनोद् नसावा :)
जयेश

आचरट हेतू?

बाबा आणि डॉ. अब्दुल कलाम् यांचा एकत्रित् फोटो देण्यामागे काही आचरट हेतू असावा.

असे तुम्हाला का वाटावे बरे? कलाम ह्यांच्या नावाआधी भारतरत्न हा शब्द टाकायचा राहून गेला म्हणून का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समजून् घ्या

असे तुम्हाला का वाटावे बरे?
आचरट् गोष्टींना आचरट म्हणावे इतकंच एक्सप्लेनेशन् पुरेसं आहे.

मते .

>> बर स्वतः साईबाबांनी ते इसवीसन २०२२ पर्यंत जगतील असे स्वतःबद्दल सांगितले आहे. हे सारे स्पष्ट असताना त्यांना उपचाराची गरज काय?

उपचार करणार नाही असे नव्हते सांगीतले ना. उप्चार करून २०२२ पर्यन्त जगू अस त्याना म्हणायच होतं

>>अशा चमत्कारी बाबांची तब्येत कशी काय बिघडू शकते? ह्याचे उत्तर कोणाकडे आहे काय? बाबा एवढे चमत्कारी असताना त्यांना इस्पितळे
काढण्याची गरज काय होती बरे? ते आपल्या असामान्य चमत्कारी शक्तीने लोकांना आणि स्वतःला बिनाऑपरेशन शर्तिया टकाटक बरे करू शकत
नाहीत का?

नक्की माहित नाही पण असे आइकले होते की चमत्कार स्वतावर करून घेत येत् नाही वगैरे (म्हणजे स्वता:ची तब्येत वगैरे नीट करायला नाही वापरता येत.)
थोडक्यात सांगायचे म्हणजे इन्ग्रजीचा शिक्षक असला म्हणजे त्याला सगळे इन्ग्रजी शब्द पाठ नसतात :), तशातलाच प्रकार हा.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

जोक र हस्य

श्री साई, त्या उदी मागचे सत्य माहीत आहे बाबा. धन्यु!!!

कलाम

कलामांना जोकर म्हणावं की म्हणू नये याविषयी पुरेसं ठाम मत व्यक्त करण्याइतका अभ्यास नाही, पण एक किस्सा इथे आठवतो:
कलाम राष्ट्रपती असताना एका वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभाच्या प्रसंगी उपस्थित लहानथोरांना उद्देशून त्यांनी जे भाषण केलं होतं ते एकदा चुकून पाहिलं गेलं. माझी स्मृती दगा देत नसेल, तर त्या वर्षी मृणाल सेन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला होता आणि आनंद पटवर्धन यांच्या 'वॉर अँड पीस' या माहितीपटाला पुरस्कार होता. (त्यात भारताच्या अणुस्फोटांवर, एकंदर अणुधोरणावर आणि त्यांबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रियेवर प्रखर टीका आहे.) चित्रपटविषयक खूप जाण असल्यासारखं दाखवणारं, पण आशयहीन आणि निर्बुद्ध म्हणता येईल असं कलामांचं भाषण या पार्श्वभूमीवर तेव्हा खूप विनोदी वाटलं होतं. अशा पदावरच्या व्यक्तींना वाटेल त्या विषयावर भाषणं ठोकायला लागतात आणि ती कुणीतरी लिहून देतात, त्यामुळे सर्वस्वी दोष त्यांचाच असावा असं ठामपणे म्हणता येत नाही. प्रतिभा पाटलांचं याच सोहळ्यातलं काही वर्षांनंतरचं असं लिहून दिलेलं भाषणदेखील ऐकलं होतं. त्यातही आशय किंवा प्रज्ञा यांचा अभावच होता, पण 'मला खूप काहीतरी आशयगर्भ आणि अनोखं सांगायचंय' असा आवही नव्हता. कलामांच्या भाषणातला तो आव खास त्यांचा असावा असं तेव्हा वाटलं होतं. अवांतराबद्दल क्षमस्व.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

कलाम यांच्याविषयी

कलाम यांच्याविषयी एक सर्वश्रुत कलम आहे

"He is known as politician among scientists and a scientist among politicians"

दुवा

.

कलाम

कलाम यांच्या स्वभावावर प्रकाश टाकेल असा एक किस्सा प्रत्यक्ष अनुभवला आहे.

काही कामानिमित्त १९९७ च्या सुमारास भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात जाण्याचा योग आला होता. त्यावेळी तिथल्या विभागप्रमुखांचे आणि त्यांच्या कर्मचार्‍यांचे बोलणे ऐकले होते.

"ते अमुक तमुक तयार झाले आहे का? अब्दुल कलाम वॉण्ट्स् टु इनॉग्युरेट दॅट".
"ते अजून तयार नाही आणि त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. ते चालेलच याची काही गॅरण्टी नाही"
"असो. पण त्यांना उद्घाटन करायचे आहे. तेव्हा ते उद्घाटन करून घेऊ या".

मला बाकी गोष्टींबाबत काही वाटले नाही. "अब्दुल कलाम वॉण्ट्स टू" या वाक्याचे आश्चर्य वाटले. सहसा मोठ्या व्यक्तीने उद्घाटन करावे अशी विनंती छोटे लोक करतात आणि मोठे लोक ती मान्य किंवा अमान्य करतात". इकडे मी उद्घाटन करतो अशी 'स्वयंप्रेरित मागणी' दिसली. आणि त्यांच्या बोलण्यावरून असेही कळले की कलाम त्या अमुक तमुक गोष्टीशी, ते विकसित करणार्‍या विभागाशी कसल्याच प्रकारे संबंधित नव्हते.

नंतर त्यांचे इ स २०२०च्या व्हिजनबाबतचे पुस्तक वाचले. त्याने तर फारच भ्रमनिरास झाला.

नितिन थत्ते

!

सदर वाक्य कलामांच्या तोंडून ऐकले नसेल किंवा तशी किमान् खात्री नसेल् तर त्यावरून् निषकर्ष काढणे चुकिचे आहे. आपल्या लोकांचे इंग्रजी आणि नाव् वापरण्याची सवय् पाहता हे वाक्य त्या कर्मचार्याच्या मनाचे श्लोकच असावेत् अशी शक्यता मला वाटते.

-Nile

हेच् म्हणतो.

नाईल् यांच्याशी सहमत्. उगाचच् सुतावरुन् स्वर्ग् गाठण्याचे धंदे कशासाठी ?

होली काऊ

अब्दुल कलाम ही "होली काऊ" आहे का? त्यांच्याबाबत काही निगेटिव्ह बोलायचे नाही वगैरे?

नितिन थत्ते

+१

मला वाटतय अब्दुल कलामांना 'राष्ट्रपती' बनवण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या समर्थकांसाठी ते नक्कीच 'होली काऊ' आहेत. आपले पद जाऊ नये म्हणून मध्यंतरी कलामांनी जे बालहट्ट केले होते आणि त्यांची फडतुस पुस्तके ह्या दोन गोष्टींमुळे कलाम मला अजिबात थोर वगैरे काही वाटत नाहीत.

चोर

ह्या दोन गोष्टींमुळे कलाम मला अजिबात थोर वगैरे काही वाटत नाहीत.
असेल् असेल. कदाचित ते तुमच्यापेक्षा अप्रगल्भही असतील बुवा.
थोरांवर चोरापोरांनी टीका करणे हे प्रगल्भतेचे लक्षण् असेलसुद्धा.

थेट्

अब्दुल कलाम ही "होली काऊ" आहे का? त्यांच्याबाबत काही निगेटिव्ह बोलायचे नाही वगैरे?
छे. एक माणूस् दुसर्‍याबद्दल् काहीतरी वाईट् बोलत् होता. त्यावरुन् थेट् मत बनवणे आश्चर्यकारक् वाटले.

छे छे, आम्ही तर काऊ खातो सुद्धा

अब्दुल कलाम ही "होली काऊ" आहे का? त्यांच्याबाबत काही निगेटिव्ह बोलायचे नाही वगैरे?

तुम्हाला कोणालाही काहीही म्हणायचे स्वातंत्र्य असावे. तुम्ही काही म्हणल्याने मला काहीही फरक पडत नाही*.

पण तुमचे मत ज्यावर बनलेले आहे ते कारणच अत्यंत तकलादू आहे. इतर वेळा तुम्ही अत्यंत सबळ कारणं आणि पुरावे देता इथे मात्र अशा अत्यंत तकलादू अशा कारणावर तुम्ही जाहीर मत व्यक्त केल्याने गंमत वाटली इतकेच.
(फक्त बिजेपी बॅक्ड प्रेसिडेंशिअल कँडिडेट म्हणून् तुम्ही असा पुर्वग्रह बनवून् घेतला तर नसावा अशी एक् शंकाही मनात येऊन् गेली. ;-) )

*म्हणजे आमच्या भावना वगैरेंची काळजी नको.

-Nile

+१

+१

कॅण्डिडेट

मी जेव्हा हे ऐकून मत बनवले तेव्हा कलाम प्रेसिडेन्शिअल कॅण्डिडेट नव्हते आणि बीजेपी सत्तेवरही नव्हती.
खरेतर माझ्या मनात कलाम यांच्याबाबत आदरच होता. पण सदरचे बोलणे ऐकून तो कमी झाला (गेला मात्र नाही).

आदर खरा गेला त्यांचे २०२० पुस्तक वाचून.

धन्यवाद.

नितिन थत्ते

ओके

तुमचा प्रतिसाद वाचून तुमचे प्राथमिक कारण तो संवाद होता असे वाटले. सहसा वादात लोक "बेस्ट फूट फॉरवर्ड" करतात असेही मला वाटते. असो, सुधारीत मतानुसार वर दिलेले कारण अत्यंत तकलादू आहे हे मान्य आहे असे समजतो.

नंतर त्यांचे इ स २०२०च्या व्हिजनबाबतचे पुस्तक वाचले. त्याने तर फारच भ्रमनिरास झाला.

एखाद्याचे पुस्तक वाचून भ्रमनिरास होणे काही नविन गोष्ट नाही. अनेकोत्तम लेखकांपासून सुमार लेखकांबद्दल भ्रमनिरास होण्याची उदाहरणे ऐकली/वाचली/पाहिली आहेत.

-Nile

गुलाबी

सत्यसाईच्या पुट्टपार्थीच्या कंपनीचे नवे सीईओ कोण हा इन्फोसिसच्या मालकी धोरणापेक्षा जागतिक अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम करणारा प्रश्न असल्याने खरं तर हा विषय गुलाबी पेपरांच्या मुखपृष्ठावर हवा. हो की नाही?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

भारतीय अर्थव्यवस्था आणि साईबाबा

ही बातमी वाचा. रिझर्व बँकेचे गवर्नर डी. एस. राव, माजी गर्वनर वाय वी रेड्डी, कोटक ग्रूपचे उदय कोटक, आयसीआयसीआय बँकेचे कामत, कल्पना मोरपारिया आणि आदित्य पुरी, गुणित चढ्ढा, अजय श्रीनिवासन, मीरा संन्याल ही गुलाबी पत्रिकांना सुपरिचित असणारी मंडळी साईबाबांचे चरणामृत घेत असल्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था जरा सुस्थितीत आहे असे म्हणता येईल. हो ना?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर