सत्यसाईबाबांची तब्येत

बाबा आणि कलाम
बाबा आणि कलाम

पुट्टपार्थीच्या सत्यसाईबाबांची प्रकृती अनेक दिवसांपासून अत्यवस्थ असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. हे सत्यसाईबाबा शिरडीवाल्या साईबाबांचे अवतार आहेत असे समजले जाते. बाबांकडे चमत्कारी शक्ती आहेत असेही त्यांचे भक्त मानतात. ते त्यांच्या मुखकमलातून अंगठ्याबिंगठ्या काढत असतात. राखबिख तर चिल्लर. ह्या अशा चमत्कारी बाबांची तब्येत कशी काय बिघडू शकते? ह्याचे उत्तर कोणाकडे आहे काय? बाबा एवढे चमत्कारी असताना त्यांना इस्पितळे काढण्याची गरज काय होती बरे? ते आपल्या असामान्य चमत्कारी शक्तीने लोकांना आणि स्वतःला बिनाऑपरेशन शर्तिया टकाटक बरे करू शकत नाहीत का?

बर स्वतः साईबाबांनी ते इसवीसन २०२२ पर्यंत जगतील असे स्वतःबद्दल सांगितले आहे. हे सारे स्पष्ट असताना त्यांना उपचाराची गरज काय?

कृपया मते मांडावी.

अवांतर: बाबांनी म्हैसूर भागात माझा पुनर्जन्म होईल आणि येत्या अवतारात मला प्रेमसाईबाबा म्हणून ओळखले जाईल असे म्हटले आहे. असो. बाबांना दीर्घायुरारोग्य चिंतून मला तुम्हाला विचारावेसे वाटते की प्रेमसाईबाबा हे नावे तुम्हाला कसे वाटते बरे. तुम्हाला कुठले नाव आवडले असते?

Comments

संपादक मंडळ

'जोकर' ह्या उल्लेखा विषयी बहुसंख्य उपक्रमींनी नाराजी दर्शवुनही तो प्रतिसाद उडवला नाही ह्याबद्दल इथल्या संपादक मंडळाचे अभिनंदन. अमान्य असलेले मतही लोकांना मांडण्याची शक्य तितकी संधी दिली पाहिजे ह्याचा परीपाठ इथे दिला आहे. समाजाची गुंतागुंत अभ्यासणार्‍या दुसर्‍या एका स्थळावर हे वाक्य काही तासंही टिकू शकले नसते. हे ह्या निमित्ताने नमुद करावेसे वाटले.

बरोबर

"अमान्य असलेले मतही लोकांना मांडण्याची शक्य तितकी संधी दिली पाहिजे ह्याचा परीपाठ इथे दिला आहे..."

मला वाटते ईश आपटे यांचा उत्क्रांतीवादावरचा लेख (त्याला झालेल्या विरोधासह) टिकला, तेव्हाही असाच परिपाठ दिला गेला होता.
उपक्रम व्यवस्थापनाचे अभिनंदन.

आज 'जोकर' ला मान्यता मिळाली. उद्या कदाचित फाट्यावरही मारले जाईल आणि बा-भा युक्त शब्दांनाही चंचुप्रवेश मिळेल. एकंदर प्रगल्भतेकडे होणारी वाटचाल मनाला सुखावणारी आहे, यात शंका नाही.

बरोबर/चुक

पहिले उदाहरण बरोबर. दुसरे चुक! शिव्या/अपशब्द ह्यांना स्थान देणे आणि विरोधी विचारांना मांडू देणे हे एकाच पारड्यात तोलता का तुम्ही?

विचार?

'अब्दुल कलाम जोकर आहेत' हा विचार आहे असे म्हणायचे आहे का?

हा केवळ विचार नाही

'अब्दुल कलाम जोकर आहेत' हा "प्रगल्भ" विचार आहे. आणि तो जोकर नसलेल्या व्यक्तींनी मांडलेला आणि उचलून धरलेला आहे. आपल्याला ही प्रगल्भता सोसवत नसेल तर आपण अप्रगल्भ संस्थळांवर जाऊन लुडबूड करू शकता.

थोडेफार बरोबर

'अब्दुल कलाम जोकर आहेत' हा "प्रगल्भ" विचार आहे.

हा विचार कसा आहे ते माहीत नाही पण तसे मत मांडण्याचे स्वातंत्र्य या संकेतस्थळावर नाकारलेले नाही.

आपल्याला ही प्रगल्भता सोसवत नसेल तर आपण अप्रगल्भ संस्थळांवर जाऊन लुडबूड करू शकता.

सहमत.

असहमत

विरोधी मते मांडणे आणी शिव्या वगैरे यात फरक करायला हवा.

पांढर्‍या कागदावर्

पांढर्‍या कागदावर् छोटासा जरी काळा डाग् दिसला तरी कागद् शुभ्र् आहे याकडे लक्ष् न् देता डाग् काळा आहे याकडेच् लक्ष् देण्याचा विद्वान मंडळींचा प्रयत्न् पाहून् विशेष् काही वाटले नाही. थोरामोठ्यांवर् टीका केली की प्रसिद्धी मिळते यामुळेही असेल् कदाचित्. 'सामना' सारख्या वर्तमानपत्रांमध्ये शिवराळ् भाषेत् लिहून् येणारे लेख् आणि विद्वत्तेच्या बुरख्याआड् दडून् केलेली टीका यांची लायकी साधारणतः एकच् असावी असे मानण्यास् जागा आहे.
काहीजणांना द्गडातला देव् दिसतो तर् काहीजणांना देवामधला दगड् दिसतो असे एक् वाक्य् मध्यंतरी एका प्रगल्भ् संस्थळावर् वाचले होते त्याची आठवण् झाली.

चिकित्सा करू नये?

पांढर्‍या कागदावर् छोटासा जरी काळा डाग् दिसला तरी कागद् शुभ्र् आहे याकडे लक्ष् न् देता डाग् काळा आहे याकडेच् लक्ष् देण्याचा विद्वान मंडळींचा प्रयत्न् पाहून् विशेष् काही वाटले नाही.

काळ्या डागाची चिकित्सा करू नये असे तुम्हाला म्हणायचे नाही काय? एखादा छोटासा काळा डाग मोठ्या दोषाची, रोगाची ग्वाही देणारा असू शकतो.

काहीजणांना द्गडातला देव् दिसतो तर् काहीजणांना देवामधला दगड् दिसतो असे एक् वाक्य् मध्यंतरी एका प्रगल्भ् संस्थळावर् वाचले होते त्याची आठवण् झाली.

क्लीशे. तुमची व्यक्तिपूजा चालू द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चिकित्सा की छिद्रान्वेषीपणा ?

काळ्या डागाची चिकित्सा करू नये असे तुम्हाला म्हणायचे नाही काय? एखादा छोटासा काळा डाग मोठ्या दोषाची, रोगाची ग्वाही देणारा असू शकतो.
मुळामधे कोणताही आक्षेप नोंदवण्याआधी त्या आक्षेपाची चिकित्सा संबंधित व्यक्तीने स्वतः करुन् पाहावी. त्या व्यक्तीने ती केली नसेल तर ती इतरांना करावी लागते.

तुमची व्यक्तिपूजा चालू द्या.
चांगल्या माणसास चांगले म्हणणे ही व्यक्तिपूजा नाही.

चिकित्सा की छिद्रान्वेषीपणा

काळ्या डागाची चिकित्सा करू नये असे तुम्हाला म्हणायचे नाही काय? एखादा छोटासा काळा डाग मोठ्या दोषाची, रोगाची ग्वाही देणारा असू शकतो.
कोणताही आक्षेप् नोंदवण्याआधी संबंधित व्यक्तीने त्या आक्षेपाचीदेखील चिकित्सा करायची असते. संबंधित् व्यक्तीने हे भान बाळगले नाही. सबब येथे दोष आक्षेप नोंदवणार्‍या व्यक्तीचा आहे.

क्लीशे. तुमची व्यक्तिपूजा चालू द्या.
चांगल्या माणसाला चांगले म्हणणे याला काही लोक व्यक्तिपूजा मानतात.

देव्हारा

पांढर्‍या कागदावर् छोटासा जरी काळा डाग् दिसला तरी कागद् शुभ्र् आहे याकडे लक्ष् न् देता डाग् काळा आहे याकडेच् लक्ष् देण्याचा विद्वान मंडळींचा प्रयत्न् पाहून् विशेष् काही वाटले नाही.

एकदा कागद देव्हार्‍यात ठेवला की कसाही डाग असला तरी तो छोटाच दिसतो. देव्हार्‍यातुन कागद बाहेर काढा मग बाकिची पुटं चढलेलीही दिसतील. त्यासाठी विद्वान असण्याची गरज नाही.

काहीजणांना द्गडातला देव् दिसतो तर् काहीजणांना देवामधला दगड् दिसतो असे एक् वाक्य् मध्यंतरी एका प्रगल्भ् संस्थळावर् वाचले होते त्याची आठवण् झाली.

ह्यावर इथे तरी टाळ्या खेचता येणार नाहीत. त्यासाठी आळश्यांचा राजा म्हणतात तसे आपण अप्रगल्भ संस्थळांवर जाऊन लुडबूड करू शकता.

भाट् आणि नंदीबैल

ह्यावर इथे तरी टाळ्या खेचता येणार नाहीत. त्यासाठी आळश्यांचा राजा म्हणतात तसे आपण अप्रगल्भ संस्थळांवर जाऊन लुडबूड करू शकता.
स्वयंघोषित् प्रगल्भ् माणसांची दया येते.

एकदा कागद देव्हार्‍यात ठेवला की कसाही डाग असला तरी तो छोटाच दिसतो. देव्हार्‍यातुन कागद बाहेर काढा मग बाकिची पुटं चढलेलीही दिसतील. त्यासाठी विद्वान असण्याची गरज नाही.
अप्रगल्भतेचा आरोप होण्याच्या भीतीने अशा प्रकारच्या वाक्यांना माना डोलावणारे भाट आणि नंदीबैल या वाक्यावर् जरुर् टाळ्या वाजवतील्.

खीक्

स्वयंघोषित् प्रगल्भ् माणसांची दया येते

कोण बरे ते स्वयंघोषित प्रगल्भ?

अप्रगल्भतेचा आरोप होण्याच्या भीतीने अशा प्रकारच्या वाक्यांना माना डोलावणारे भाट आणि नंदीबैल या वाक्यावर् जरुर् टाळ्या वाजवतील्.

हॅहॅहॅ!

अप्रूप

ह्या धाग्याला आलेल्या विचारवंतांच्या प्रगल्भतेबद्दलच्या प्रतिसादांनी खूप अप्रूप वाटले. ह्या सगळ्या हुशार बुद्धीमान माणसांना उपक्रमावर इतका वेळ घालवायला कसे काय जमते बुवा असा प्रश्न पडला.

सत्यसाईबाबांच्या निधनाने सचिन दुःखी

सचिनच्या नावाने खडे फोडायला आता सुरुवात होणार!

:)

आजारी होते म्हणून त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला होता, आता ते मृत्यू पावले तर त्याने निर्णय बदलला आहे आणि तो येत्या सामन्यात खेळणार आहे.
--
प्रस्तावः पुढील अकरा वर्षे (प्रेसाबांचा एंब्रियो बनण्याच्या तीन महिने आधीपर्यंत) ससाबांचा आत्मा सचिनमध्येच पाहुणा राहणार असल्याचे जाहीर करावे. वन स्टॉप दोन देवांची भक्ती करण्याची लोकांची सोय होईल, पैसे आणि वेळेत ५०% बचत होईल. तसे करायचे असेल तर केस तितके वाढवायला त्याला किती काळ लागेल?

चाप्टर संपला

राजकारण्यांनी पोसलेला आणि त्यांना पोसणारा फ्रॉड बाबा अखेर संपला.

असेच एक धुरंधर राजकारणी :

^ वर