हिंदू: जगण्याचा एक संमृद्द मार्ग

हिंदू: जगण्याचा एक संमृद्द मार्ग
भाग- १. हिंदू आणि हिंदूत्व
लेखक: जयेश मेस्त्री

आपला भारत देश हा अध्यात्म प्रधान संस्कृती असलेला एकमेव प्राचीन देश आहे. इ.स.पू. १०००० वर्षे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. त्यापूर्वीही इथे एक समृद्द, सुसंस्कृत, सुसंघटीत समाज धर्माचरण करत होता. अमेरिका युरोपला ५०० वर्षांपूर्वी माहीत झाली. पण युरोपचाही इतिहास ३ हजार वर्षांपेक्षा जुना नाही. आज जे धर्म स्वतःला देवाचा एकमेव धर्म म्हणवून घेतात आणि धर्माच्या नावावर अश्लाघ्य कृत्य करतात, त्यांचा २००० हजार वर्षांपूर्वी मागमूसही नव्हता. इ.स.पू. ८००० ते इ.स. १५०० पर्यंतच्या प्रचंड कालखंडात जगभरातील बहुतेक सर्व देशात हिंदू संस्कृतिचा प्रभाव होता.

ज्या वेळी भारत देशात श्रेष्ठ प्रतीचे तत्वज्ञान आणि अध्यात्माचा विकास होत होता, त्यावेळी पाश्चात्य देश अप्रगत अवस्थेत होते. हिंदू धर्मात अनेक पंथ, जाती, पोटजाती यांचा समावेश आहे. परंतु आता आहे तसा पूर्वी ह्यांच्यात द्वेष नव्हता. हिंदू धर्मात मुर्तिपुजेला फ़ार महत्व आहे. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर भगवंताची सुंदर मु्र्ति हवी असते. म्हणून मुर्तिपुजा ही आवश्यक आहे. मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे. मुळात हिंदूंचे अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. पण इतर धर्म हे मानत नाही आणि मर्तिभंजनासाठी प्रवृत्त होतात. ह्यासारखे दुसरे अज्ञान नाही. ह्यासारखे दुसरे पाप नाही.

इतर धर्म आणि हिंदू धर्म ह्याच्यात अंतर काय?
हिंदू धर्म ही पायवाट आहे तर इतर धर्म हे रस्ते आहेत. पायवाट कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तसेच हिंदु धर्माचे आहे तो कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तो फ़ार पुरातन आहे, सनातन आहे आणि म्हणूनच ईश्वरनिर्मीत आहे. त्या उलट रस्ता हा तयार करावा लागतो. तो कुणी तयार केला, त्याचे नाव माहीत असते. इतर धर्मांचे धर्मगुरु आहेत. त्यामुळे ते धर्म केव्हा स्थापन झाले, ते कुणी स्थापन केले याची माहिती सहज उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रस्ता हा लांबचा पल्ला असतो. पायवाटेचे तसे नसते. पायवाटेने जाताना अंतर कमी होते व लवकर जाता येते. थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदू धर्म हा भगवंताकडे जाण्याची पायवाट (short-cut ) आहे. आपला हिंदू धर्म समजण्यासाठी पात्रतेची जरुरी आहे. ज्याची पात्रता नाही तो हिंदू होऊ शकत नाही. हिंदू असणे हे सौभाग्याचे आहे. आपण हिंदू आहोत कारण गेल्या जन्मी आपण फ़ार मोठे पुण्यकर्म केले होते. आणि म्हणूनच आपण ह्या जन्मी हिंदू म्हणून जन्माला आलो. आपल्या धर्मानुसार परमेश्वर अवतरतात ही फ़ार मोठी बाब आहे. इतर देशात देवाचे प्रेषीत/ अनुयायी जन्माला येतात. पण आपल्या हिंदूस्थानात साक्षात भगवंत अवतरतात. केवढे पुण्यवान आहोत आपण? भगवंत अवतरतात आणि स्वतः भगवंत गीता सांगतात. गीतेबद्दल टीळकांनी सुंदर शब्द वापरलेला आहे "संसारशास्त्र". ते म्हणतात गीतेमद्दे संन्यासमार्ग सांगितलेला नसून ईश्वरावर श्रद्धा ठेवून निष्काम बुद्धीने अखंड कर्ते होण्यास सांगितले आहे.... अखंड हिंदूस्थानचे अखंड कर्ते.

इतर धर्मात अनुयायी जन्माला येतात तेही अनानुभवी असतात. म्हणून त्यांच्यात अंधानुकरण जास्त दिसून येते. असे धर्म स्थितिशील राहतात. आहे त्याच स्थितित राहतात. त्यांच्यात हिंसा, असहिष्णूता सहज दिसून येते. उलटपक्षी हिंदूधर्म सहीष्णू आहे. संग्रामसिंह चौधरी "भारताचा इतिहास" या पुस्तकात लिहितात की ’हिंदूस्थानी संस्कृतीस विचारस्वातंत्र्य आणि सहिष्णूता हे हिंदू अध्यात्माचे योगदान आहे. ह्याचे मूळ ऋग्वेदात आहे.’ आणि म्हणूनच नेहमी हिंदूत्ववादी असावे. हिंदू आणि हिंदूत्व म्हणजे काय?
सावरकरांनी हिंदूची अप्रतीम व्याख्या सांगितलेली आहे.

"आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका .
पितृभूः पुण्यभूश्वैव स वै हिंदूरिती स्मृतः"
म्हणजे सिंधूनदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भूभात राहणारा जो, या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानेल तो हिंदू असे समजावे.

आज बर्‍याच लोकांना हिंदू असण्याचे वाईट वाटते, असुरक्षीत वाटते. हिंदू हा शब्द उच्चारताच काहींना पोटदुखी होते, जुलाब होतात. भगवा आतंकवाद यासारखे शब्द अस्तित्वात नसतानाही उच्चारले जातात. आज टी.व्ही, फ़िल्म्स यामुळे मुले बिघडत चालली आहेत. बर्‍याचशा पुढारलेल्या स्त्रीया आज स्वताला पुरुषांपासून मुक्त समजतात. स्त्रीमुक्ती चळवळ म्हणे. चळवळ कसली?.... वळवळ म्हणा. अश्लील कपडे घालणे, सीगारेट, मद्दपान करणे, फ़्री-सेक्स ही तुमची स्त्रीमुक्ती चळवळ का? पूर्वी हिंदूस्थानात पर-स्त्री ही मातेसमान मानली जायची. आता पर-स्त्री ही वेश्ये-समान मानली जाते. अहो रस्त्याने चालणार्‍या स्त्रीकडे कोण चांगल्या नजरेने पाहतो? सांगा ना? अशा लोकांना चाबकाने फ़ोडून काढलं पाहिजे. हे सर्व कशामुळे होतं? धर्मशिक्षणाच्या अभावामुळे. हिंदू धर्म कर्मठ आहे. पण काळ बदललाय. हिंदूनी कर्मठ असण्यापेक्षा कर्मनिष्ट असावे. एक ध्यानात ठेवावे, धर्मामुळे नव्हे तर धर्म अजिबात सुटल्यामुळे आपली अधोगती झाली आहे.

बरेचसे लोक विचारतात की what is a defination of hindu and hinduism? मला त्यांना सांगायचे आहे की hindu means human and hinduism means humanism. हिंदू म्हणजे माणूस (आर्य) आणि हिंदूत्व म्हणजे माणूसकी. माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे म्हणजेच हिंदूत्वावादी असणे. आज मला स्वताचा अभिमान वाटतो कारण मी या विशाल आणि भगवंत निर्मित हिंदू संस्कृतीत जन्माला आलो. सर्वांनाच याचे अभिमान वाटले पाहिजे. हिंदूमय होणे म्हणजे भगवंतमय होणे, गीतामय होणे. "बुद्धी स्थिर ठेवून प्राप्त परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य कोणते ते ओळखणे आणि रागलोभ बाजूला ठेवून अनन्यभावाने त्यानुसार आचरण करणे म्हणजे गीतामय होणे" असे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आपापसातले रागलोभ बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र यावे आणि त्यानुसार आचरण करावे. या जगाला जर विनाशापासून मुक्त करावयाचे असेल तर "हिंदू" हाच एक पर्याय आहे. जगाच्या प्रत्येक समस्येवर "हिंदू" हेच एक औषध आहे. कारण हिंदू आणि फ़क्त हिंदूच जगण्याचा समृद्ध मार्ग आहे. (कुणीतरी हे भालचंद्र नेमाडेंना सांगावे, ही विनंती)

धन्यवाद......

लेखक: जयेश मेस्त्री
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com.

लेखनविषय: दुवे:

Comments

हिंदू मना बन दगड

आज हिंदू धर्मावर इतर धर्मीयांचे संकट आहेच. पण तितकेच किंवा त्याहूनही अधिक स्वकीयांचे संकट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीत एका पोलीस संमेलनात ’भारतात भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे आणि तो कमी धोकादायक नाही.’ असे विधान केले. भालचंद्र नेमाडेंनी तर ’हिंदू: जगण्याची एक समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली. त्यात त्यांनी हिंदूद्वेष्टे विधाने केली आहेत. यावरून अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या. अर्थातच हिंदूंनी हवा तसा विरोध केला नाही. नेमाडे काय आणि चिदंबरम काय, दोघेही हिंदूच. हे हिंदूंचे दुर्दैव. आपलेच लोक आपल्या धर्मावर टिका करतात. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टिका करत नाही. कारण ते संघटित आहेत, आक्रमक आहेत. हिंदू हे अतिसहिष्णू आहेत. गृहमंत्र्यांनी जर "हिरवा आतंकवाद" असे म्हटले असते, तर ह्या हिरव्यांनी त्यांची लूंगी उचलून त्यांच्यावर कोणता प्रसंग आणला असता? याची परिपूर्ण जाणीव चिदंबरम यांना होती. म्हणूनच त्यांना भगव्या आतंकवादाचा साक्षात्कार झाला असावा, असो.

ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना बायबल आणि कुराण हे बाळकडू म्हणून पाजले जाते. तसे हिंदूंमध्ये होत नाही. हिंदूंना मुळात धर्मशिक्षणच मिळत नाही. म्हणूनच आज हिंदूंमध्ये ब्राम्हण द्वेष वाढत चालला आहे. काही स्वघोशीत ईतिहास संशोधक जन्माला येत आहेत. त्यांनी तर ब्राम्हणांना धारेवरच धरले आहे. मग दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसतात. समर्थ रामदास शिवरायांना कधी भेटलेच नसतात. ते औरंगझेबाचे हेर असतात. अशा काही भूलथापा हे नव-ईतिहास संशोधक मारत अहेत. रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव हे दोन्ही महापुरुष ब्राम्हण होते. म्हणूनच त्यांच्यावर असले आरोप होत आहेत. या ईतिहास संशोधकांना इतकेच सांगायचे आहे की त्यांनी भारताच्या ईतिहासाचा सखोल आभ्यास करावा. परकिय आक्रमणांनी हिंदूस्तानात सर्वात जास्त कत्तल ब्राम्हणांची केली. कारण त्यांना ठाऊक होते की ब्राम्हण हे हिंदू धर्माचे तारक आहेत. आज महाराष्ट्राच्या एक टक्का लोकसंख्या सुद्धा ब्राम्हण समाज राहीला नाही. ही हिंदूंची शोकांतिका आहे. इथे इतकेच सांगावासे वाटते की आर्य चाणक्यांपासून ते सावरकरांपर्यंत देशासाठी त्याग करणारे ब्राम्हण होते.

गांधी-नेहरू कुटूंबांनी हिंदूस्तानची सूत्रे हातात घेतली आणि हिंदूस्तानचा इंडिया कधी झाला कळलेच नाही. आज हिंदूंवर पक्षपाती असण्याचा आरोप होत आहे. भारताचा राष्ट्रपती मुसलमान होतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुसलमान होतो आणि तरीसुद्धा हिंदू हे पक्षपाती कसे? कधी विचार करून पहा, "बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले" अहो विचार काय स्वप्न सुद्धा पडणार नाही. जगात चार प्रमुख धर्मांचे लोक राहतात. ख्रिश्चन हे पहील्या क्रमांकावर असून त्यांची अनेक राष्ट्रे आहेत. मुस्लिम हे दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांचीही अनेक राष्ट्रे आहेत. बौद्ध हे तिसर्‍या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे सुद्धा काही देश आहेत. हिंदू हे चौथ्या क्रमांकावर असूनही त्यांचा एकही देश ह्या भूतलावर नाही. होय, आपण इंडियात राहतो, हिंदूस्तानात नव्हे. हे प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवले पाहीजे.

जगातील बावन्न मुस्लिम राष्ट्रांपैकी असे एकही राष्ट्र नाही जे हज यात्रेसाठी विशेष सवलती देते. पण भारतात मुस्लिमांना अनेक सवलती आहेत. १९४७च्या फाळणीनंतर पाकिस्तानात २४ टक्के असलेले हिंदू आज केवळ १ टक्का उरले आहेत. बांगलादेशात ३० टक्के असलेले हिंदू आज फक्त ७ टक्के इतकेच आहेत. याउलट भारतात मुस्लिमांची संख्या वाढतच आहे. कसाब आणि अफ़जल गुरुला सरकार पोसत आहे आणि एकिकडे हिंदू धर्माभिमानी साध्वी प्रग्न्यासिंग यांचा छळ होत आहे. बदोद्दात रस्ता रुंदीकरण्यासाठी बारा मंदिरे पाडली. तोपर्यंत सर्वे शांत होते. पण दोन दर्गे पाडायला जाताच दंगे उसळले. तरीसुद्धा आम्ही हिंदू पक्षपाती कसे हो? कारण आम्ही सहीष्णू आहोत म्हणून?

हिंदूंमध्ये अनेक जाती असल्यामुळे ते संघटीत होऊ शकत नाही. ही परधर्मीयांनी मारलेली थाप आहे आणि आपण ती वस्तुस्थिती मानत आलो अहोत. लक्षात ठेवा मुस्लिमांमध्ये ६४० जाती आहेत आणि ख्रिश्चनांमध्ये २४२ पंथ आहेत. तर मग हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत, अशी बोंब का? ख्रिस्ती धर्मात जाती नाहीत, अशी म्हणणारी मदर टेरेसा, जाती-निहाय आरक्षण मागासवर्गीय ख्रिस्त्यांना मिळावा म्हणून उपोषणाला बसली होती. हा इतर धर्मीयांचा डाव आपण ओळखला पाहीजे.

जगाच्या ईतिहासात हिंदूंनी आपला धर्म कधीच कुणावर लादला नाही. जग जिंकण्याचाही अट्टाहास कधी केला नाही. हिंदू धर्म पसरावा म्हणून मिशनरी, मदरसे उभारले नाहीत. जो कुणी हिंदू नाही तो काफ़र आहे, असे कधीच मानले नाही. उलटपक्षी त्याला आपला बंधूच मानले आहे. त्याचे स्वागतच केले आहे. हिंदूंच्या सहिष्णूतेचा इतर धर्मीयांनी नेहमीच फायदा घेतला आहे. हिंदूंचा छळ केला आहे. यावर एकच अमोघ उपाय "हिंदू संघटन".

इथे विंदा करंदीकरांची एक कवीता आठवते " माझ्या मना बन दगड". करंदीकरांच्या कवीतेतलं मन हे जणू हिंदू मन आहे असे वाटते. खरेच हिंदूंना आता कणखर व्हायलाच हवे. विंदा करंदीकरांच्या शैलित सांगायचे झाले तर, हिंदू मना बन दगड.......हिंदू मना बन दगड.......

लेखक: जयेश मेस्त्री

संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com

प्लीज, डोन्ट बीकम 'दगड!'

हे काय? एका लेखावर दुसरा लेख फुकट!, तोही पत्त्यासकट. स्वतःच स्वतः ची थट्टा करून घ्यायला तुम्हाला आवडते कां? खाली नातेवाईकांची नावे, सगळ्यांसकट लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटो देखील द्यायचे होते.

हिंदू मना बन दगड

भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम हे हिन्दु नसून ख्रिश्चन आहेत.
-वामन देशमुख

कधीपासून?

भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम हे हिन्दु नसून ख्रिश्चन आहेत.

कधीपासून?

कधीपासून?

ते कन्व्हर्ट झाल्यापासुन!
वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

एक सुचवतो

या संकेतस्थळावरचा वाचकवर्ग हा हिंदुद्वेष्टा आहे. इथे तुम्हाला फार उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतील असे वाटत नाही. झाल्यास खिल्लीच होण्याची शक्यता आहे. तुमचा हा लेख वैचारिकदृष्ट्या फारच प्रगल्भ आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतील अशा प्रगल्भ संकेतस्थळांवर हा लेख प्रकाशित करावा असे सुचवावेसे वाटते. तिथे तुमची लेखनप्रतिभा बहरून येईल आणि लिहिण्याचे सार्थक होईल. शुभेच्छा आणि धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गप्पगार

गप्प रहायचे ठरवले आहे .

- गद्दाफी

उपक्रमवर स्वागत!

उपक्रमवर स्वागत!

तुम्ही खरेखुरे अध्यात्मिक वृत्तीचे असाल तर यापुढील लेखनात उत्स्फुर्ततेवर भर द्या. लिखाण हृदयातून येवू द्या. कुठूनतरी वाचलेलं लिहीलं तर ते पोपटपंची केल्या सारखे वाटते. 'शेवटचा परीच्छेद' सोडला तर बाकीचे लिखाण ठिक होते. सध्याच्या काळात सामान्यजनांना अनेक अडी-अडचणीमधून स्वतःचे रक्शण करणे कठीण वाटतेय, तिथे...

हिंदू मना बन दगड

हिंदू मना बन दगड
लेखक : जयेश मेस्त्री

आज हिंदू धर्मावर इतर धर्मीयांचे संकट आहेच. पण तितकेच किंवा त्याहूनही अधिक स्वकीयांचे संकट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीत एका पोलीस संमेलनात ’भारतात भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे आणि तो कमी धोकादायक नाही.’ असे विधान केले. भालचंद्र नेमाडेंनी तर ’हिंदू: जगण्याची एक समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली. त्यात त्यांनी हिंदूद्वेष्टे विधाने केली आहेत. यावरून अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या. अर्थातच हिंदूंनी हवा तसा विरोध केला नाही. नेमाडे काय आणि चिदंबरम काय, दोघेही हिंदूच. हे हिंदूंचे दुर्दैव. आपलेच लोक आपल्या धर्मावर टिका करतात. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टिका करत नाही. कारण ते संघटित आहेत, आक्रमक आहेत. हिंदू हे अतिसहिष्णू आहेत. गृहमंत्र्यांनी जर "हिरवा आतंकवाद" असे म्हटले असते, तर ह्या हिरव्यांनी त्यांची लूंगी उचलून त्यांच्यावर कोणता प्रसंग आणला असता? याची परिपूर्ण जाणीव चिदंबरम यांना होती. म्हणूनच त्यांना भगव्या आतंकवादाचा साक्षात्कार झाला असावा, असो.

ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना बायबल आणि कुराण हे बाळकडू म्हणून पाजले जाते. तसे हिंदूंमध्ये होत नाही. हिंदूंना मुळात धर्मशिक्षणच मिळत नाही. म्हणूनच आज हिंदूंमध्ये ब्राम्हण द्वेष वाढत चालला आहे. काही स्वघोशीत ईतिहास संशोधक जन्माला येत आहेत. त्यांनी तर ब्राम्हणांना धारेवरच धरले आहे. मग दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसतात. समर्थ रामदास शिवरायांना कधी भेटलेच नसतात. ते औरंगझेबाचे हेर असतात. अशा काही भूलथापा हे नव-ईतिहास संशोधक मारत अहेत. रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव हे दोन्ही महापुरुष ब्राम्हण होते. म्हणूनच त्यांच्यावर असले आरोप होत आहेत. या ईतिहास संशोधकांना इतकेच सांगायचे आहे की त्यांनी भारताच्या ईतिहासाचा सखोल आभ्यास करावा. परकिय आक्रमणांनी हिंदूस्तानात सर्वात जास्त कत्तल ब्राम्हणांची केली. कारण त्यांना ठाऊक होते की ब्राम्हण हे हिंदू धर्माचे तारक आहेत. आज महाराष्ट्राच्या एक टक्का लोकसंख्या सुद्धा ब्राम्हण समाज राहीला नाही. ही हिंदूंची शोकांतिका आहे. इथे इतकेच सांगावासे वाटते की आर्य चाणक्यांपासून ते सावरकरांपर्यंत देशासाठी त्याग करणारे ब्राम्हण होते.

गांधी-नेहरू कुटूंबांनी हिंदूस्तानची सूत्रे हातात घेतली आणि हिंदूस्तानचा इंडिया कधी झाला कळलेच नाही. आज हिंदूंवर पक्षपाती असण्याचा आरोप होत आहे. भारताचा राष्ट्रपती मुसलमान होतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुसलमान होतो आणि तरीसुद्धा हिंदू हे पक्षपाती कसे? कधी विचार करून पहा, "बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले" अहो विचार काय स्वप्न सुद्धा पडणार नाही. जगात चार प्रमुख धर्मांचे लोक राहतात. ख्रिश्चन हे पहील्या क्रमांकावर असून त्यांची अनेक राष्ट्रे आहेत. मुस्लिम हे दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांचीही अनेक राष्ट्रे आहेत. बौद्ध हे तिसर्‍या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे सुद्धा काही देश आहेत. हिंदू हे चौथ्या क्रमांकावर असूनही त्यांचा एकही देश ह्या भूतलावर नाही. होय, आपण इंडियात राहतो, हिंदूस्तानात नव्हे. हे प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवले पाहीजे.

जगातील बावन्न मुस्लिम राष्ट्रांपैकी असे एकही राष्ट्र नाही जे हज यात्रेसाठी विशेष सवलती देते. पण भारतात मुस्लिमांना अनेक सवलती आहेत. १९४७च्या फाळणीनंतर पाकिस्तानात २४ टक्के असलेले हिंदू आज केवळ १ टक्का उरले आहेत. बांगलादेशात ३० टक्के असलेले हिंदू आज फक्त ७ टक्के इतकेच आहेत. याउलट भारतात मुस्लिमांची संख्या वाढतच आहे. कसाब आणि अफ़जल गुरुला सरकार पोसत आहे आणि एकिकडे हिंदू धर्माभिमानी साध्वी प्रग्न्यासिंग यांचा छळ होत आहे. बदोद्दात रस्ता रुंदीकरण्यासाठी बारा मंदिरे पाडली. तोपर्यंत सर्वे शांत होते. पण दोन दर्गे पाडायला जाताच दंगे उसळले. तरीसुद्धा आम्ही हिंदू पक्षपाती कसे हो? कारण आम्ही सहीष्णू आहोत म्हणून?

हिंदूंमध्ये अनेक जाती असल्यामुळे ते संघटीत होऊ शकत नाही. ही परधर्मीयांनी मारलेली थाप आहे आणि आपण ती वस्तुस्थिती मानत आलो अहोत. लक्षात ठेवा मुस्लिमांमध्ये ६४० जाती आहेत आणि ख्रिश्चनांमध्ये २४२ पंथ आहेत. तर मग हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत, अशी बोंब का? ख्रिस्ती धर्मात जाती नाहीत, अशी म्हणणारी मदर टेरेसा, जाती-निहाय आरक्षण मागासवर्गीय ख्रिस्त्यांना मिळावा म्हणून उपोषणाला बसली होती. हा इतर धर्मीयांचा डाव आपण ओळखला पाहीजे.

जगाच्या ईतिहासात हिंदूंनी आपला धर्म कधीच कुणावर लादला नाही. जग जिंकण्याचाही अट्टाहास कधी केला नाही. हिंदू धर्म पसरावा म्हणून मिशनरी, मदरसे उभारले नाहीत. जो कुणी हिंदू नाही तो काफ़र आहे, असे कधीच मानले नाही. उलटपक्षी त्याला आपला बंधूच मानले आहे. त्याचे स्वागतच केले आहे. हिंदूंच्या सहिष्णूतेचा इतर धर्मीयांनी नेहमीच फायदा घेतला आहे. हिंदूंचा छळ केला आहे. यावर एकच अमोघ उपाय "हिंदू संघटन".

इथे विंदा करंदीकरांची एक कवीता आठवते " माझ्या मना बन दगड". करंदीकरांच्या कवीतेतलं मन हे जणू हिंदू मन आहे असे वाटते. खरेच हिंदूंना आता कणखर व्हायलाच हवे. विंदा करंदीकरांच्या शैलित सांगायचे झाले तर, हिंदू मना बन दगड.......हिंदू मना बन दगड.......

लेखक: जयेश मेस्त्री

संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com

अरी ओ फलनवा!

अरी ओ फलनवा! ई का करत हो?

व्हॅलेन्टाईन नावाचं भूत

व्हॅलेन्टाईन नावाचं भूत
लेखक: जयेश मेस्त्री

"प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं"
शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.
सध्या व्हॅलेन्टाईन डे च्या नावाने प्रेमवीरांच्या प्रेमाला प्रचंड महापूर आला आहे. प. पु. संत व्हॅलेन्टाईन हे ह्या प्रेमवीरांचे प्रेमगुरु. १४ फ़ेबृवारी हा त्यांचा प्रेमदिवस. म्हणजेच संत व्हॅलेन्टाईन ह्यांची पुण्यतिथी. आता हा व्हॅलेन्टाईन कोण होता हे ह्या प्रेमवीरांच्या बापाच्या बापालाही माहित नसेल. पण आम्हाला पाश्चात्यांची नक्कल करायची सवय लागली आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे करीत आहोत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगीतलं होतं की "इंग्रजांना आधि मनातून काढा, मग भावनेतून आणि नंतर भारतातून काढा". आपण इंग्रजांना भारतातून काढलं पण मनातून मात्र काढू शकलो नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर कॉंन्व्हेंट शाळांना ऊत आला. कॉंन्व्हेंट या शब्दाचा अर्थ ( a residence of community of fathers and nuns) असा होतो. अर्थातच कॉंन्व्हेंट स्कूल या शब्दाचा अर्थ ( a school run by fathers and nuns) असा होतो. आपण आपल्या मुलांना कॉंन्व्हेंट शाळेत (इंग्लिश मिडियम) घालतो, ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. पण आपण आपल्याच हातांनी आपल्या मुलांचं भवितव्य बिघडवत आहोत. ही जाणिव आपल्याला होत नाही. आणि कधि होईल अशी आशा सुद्दा नाही. कॉंन्व्हेंट शाळांच्या पडद्दा-आडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार होत आहे. त्यातूनच हे "डे" साजरे करण्याचे दळभद्री प्रकार सुरु झाले. आणि व्हॅलेन्टाईन नावाचं भूत आमच्या मानगुटीवर बसलं.
हा व्हॅलेन्टाईन कोण होता ह्याची माहिती प्रवचन भास्कर डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित "राष्ट्रजागर"मध्ये वाचली. ती येथे देत आहे.
"ख्रिस्ती धर्म वाढण्याचा तो काळ. त्या काळात ’हीदन’ व ’पेगन’ लोकांना हाल हाल करुन मारले आणि बाटवले. हे लोक मुर्तीपुजक व निसर्गपुजक होते. इसवी सनाच्या तिस‍र्‍या शतकात रोमन सम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. या काळात ’क्लॉडियस दुसरा’ हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्दे व बाहेरील आक्रमणे चालू होती. म्हणून त्या देशाला तरूणांची सैन्यात भरती करण्याची आवश्यकता वाटू लागली. पण तरूणांचे सैन्य भरतीचे प्रमाण खुपच कमी होते. हे सर्व प्रेम अथवा लग्न ह्यामुळे होत असावे, ज्या वेळी राष्ट्राला सैन्याची गरज होती त्यावेळी सगळेजण भौतिक सुखात लोळत होते. म्हणून राजाने लग्नावर बंदी घातली. राष्ट्रभिमानी राजाविरुद्द जनमत एकवटावे यासाठी व्हॅलेन्टाईन आणि मेरियस यांनी बंदी झुगारुन तरुणांची लग्ने लावली. हा उघडपणे राष्ट्रद्रोह होता. यामुळे राजाने त्यांना पकडले आणि शिरच्छेदाची शिक्षा सुनावली. या राष्ट्रद्रोही व्हॅलेन्टाईनने तुरुंगाधिकाराच्या मुलीला सुद्दा नादी लावले. मरण्यापूर्वी लिहिलेल्या पत्राखाली त्याने love from your valantine असे लिहिले होते म्हणे. १४ फ़ेबृवारी २७० मद्दे त्याचा शिरच्छेद केला. पुढे ब‍र्‍याच काळानंतर व्हॅटिकनने त्याला संतपद दिले. १४ फ़ेबृवारी हा "ज्युनो" नामक रोमन देव-देवतांच्या राणिचा गौरव दिवस होता. तोच ह्या ख्रिस्ती आक्रमकांनी ’व्हॅलेन्टाईन डे’ ठरवून रोमन मुर्तींचा विध्वंस केला, मुर्तिपुजक व निसर्गपुजकांना ठार मारले, बाटवले, स्त्रीयांवर बलात्कार केले, त्यांची नग्न धिंड काढली." तर हे होते व्हॅलेन्टाईनचे चरित्र. अहो अशा लोकांमद्दे प्रेमभावना कशी असू शकते? आणि हा असला व्हॅलेन्टाईन प्रेमाचा प्रतिक कसा असू शकतो? व्हॅलेन्टाईन प्रेमसंत आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे प्रेम विक्षिप्त आहे.
अशुद्द बीजापोटी फ़ळे कडवट रानटी. जर बीज अशुद्द असेल तर फ़ळे कडवट आणि रानटीच असणार. मॅकोलेने सांगितले होते की "Give them your education and see within the period of thirty years they will forget themselves". आज खरच आपण स्वताला विसरलो आहोत. आपल्याला जे शिक्षणाचं बीज पेरलं गेलं तेच मुळात अशुद्द होतं. अहो, आज इंग्लंडमधील तीन युनिवर्सिटींनी व्यवस्थापन शास्त्रातील आदर्श ग्रंथ म्हणून रामदास स्वामींच्या दासबोधाला आपल्या आभ्यासक्रमात लावला आहे. आणि आपण मात्र आपला वेळ "रोज डे" "व्हॅलेन्टाईन डे" असल्या फ़ालतु गोष्टींवर घालवत आहोत. वाईट तितुके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले, अशी आपली स्थिती झाली आहे.
एकदा वाराणसीच्या कुंभ मेळ्यात काही विदेशी आले होते. त्यांनी हिंदुंना विचारले "तुम्ही चपला का नाही घातल्या?" त्यावर हिंदु म्हणाले "देवळात जाताना चपला घालायच्या नसतात". त्या विदेशींनीही चपला घातल्या नव्हत्या. तेव्हा हिंदुंनी विदेशींना तोच प्रश्न विचारला. यावर विदेशी म्हणाले "आम्ही भारत देशालाच देवळासमान मानतो. म्हणून आम्ही आमच्या चपला आमच्या देशातच काढून आलो अहोत." अहो जर विदेशी लोक आपल्या देशाला देवालय मानतात, तर मग आपण आपल्या देशाचं मद्दालय का केलं आहे? नुकतंच ख्रिस्ती नवीन वर्ष साजरं झालं. ३१ डिसेंबरच्या रात्री किती दारुच्या बाटल्या फ़ुटल्या? सरकारनेच परवानगी दिल्यावर म्हणायलाच नको. पण दारु लागतेच कशाला? आपण जर सुखात आणि दुःखात स्वताच्या पायावर ऊभे राहू शकलो नाही तर कसले पुरुष आपण? षंढच नव्हे का? असो, तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे.
प्रभू रामचंद्रांच्या जन्मापूर्वी रामनामाचा जप केला आणि वाल्या कोळ्याचे रुपांतर वाल्मिकी ऋषिंमद्दे झाले, ही आपली संस्कृती आहे. अहो, हिंदुधर्म हा मोदकासारखा आहे. बाहेरुन चाटल्यावर त्याचा गोडावा नाही कळायचा. गाभा‍र्‍यातील रस खाल्यावर कळतं, किती गोड आहे ते. माझ्या तरुण बांधवांना आणि भगिनींना एव्हढीच हात जोडून विनंती आहे की त्यांनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवावा, हिंदु संस्कृतिचा आदर्श ठेवावा आणि व्हॅलेन्टाईन नावाचं भूत आपल्या मानगुटीवरून कायमचं उतरवून टाकावं. ज्यांना हा लेख वाचून शहाणपण आलं असेल त्यांना अभिनंदन आणि ज्यांना अजूनही शहाणपण सुचलेलं नाही त्यांना "हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे".
धन्यवाद..........

लेखक: जयेश मेस्त्री
संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com

विनंती

तुमचा हा लेख वैचारिकदृष्ट्या फार प्रगल्भ आहे. या संकेतस्थळावरचा वाचकवर्ग तुमच्या लेखासाठी अजून पुरेसा तयार नाही. इथे तुम्हाला फार उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतील असे वाटत नाही. झाल्यास खिल्लीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतील अशा प्रगल्भ संकेतस्थळांवर तुम्ही हा लेख प्रकाशित करावा असे सुचवावेसे वाटते. तिथे तुमची लेखनप्रतिभा बहरून येईल आणि लिहिण्याचे सार्थक होईल. शुभेच्छा आणि धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उपक्रमींचा हिन्दूद्वेष?

या संकेतस्थळावरचा वाचकवर्ग हा हिंदुद्वेष्टा आहे.

उपक्रमाच्या वाचकवर्गाला हिंदुद्वेष्टा म्हणून हिणवणे मला प्रस्तुत वाटत नाही. मला वाटते धादांतवादी, बुद्धीवादी व चार्वाकवादी ही विशेषणे अधिक योग्य ठरतील. बऱ्याच वेळा अतिरेकी विज्ञानवादी भूमिकेचा टोप चढवून आत्यंतिक तर्कटपणाची खुमखुमी जिरवून घेणेदेखील चालते. कदाचित त्यापायी धार्मिक भावनांचा आदर करणारे काही लेखकांच्या वैचारिक झुंडशाहीमुळे काहीसे गप्पदेखील राहात असतील. पण त्यावरून एका विशिष्ट धर्माची हेटाळणी करण्याची प्रवृत्ती संपूर्ण वाचकवर्गात आहे असे म्हणणे बहुतांश वाचकवर्गावर अन्यायकारक होईल.

इथे तुम्हाला फार उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतील असे वाटत नाही. झाल्यास खिल्लीच होण्याची शक्यता आहे.

लेखकाचा एकंदरीत लेखनाचा आवेश व टोकाच्या विधानांना पुष्टी न देता सर्वज्ञानिकाच्या आवेशात भिरकावून देण्याची लेखकाची पद्धत बघितली तर वरील भाष्य पटण्यास जड जाऊ नये. मात्र तसे झाल्यास त्यामागे धर्मद्वेषाची पार्श्वभूमी नसून उपक्रमींची गंभीर विचारसरणी व सखोल वैचारिक बैठक त्यास कारणीभूत ठरेल असे वाटते.

तुमचा हा लेख वैचारिकदृष्ट्या फारच प्रगल्भ आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतील अशा प्रगल्भ संकेतस्थळांवर हा लेख प्रकाशित करावा असे सुचवावेसे वाटते. तिथे तुमची लेखनप्रतिभा बहरून येईल आणि लिहिण्याचे सार्थक होईल.

प्रगल्भ हा शब्द आपण काहीशा तिरकस अर्थाने वापरल्याचे जाणवल्यावाचून राहिले नाही. प्रगल्भतेबाबत, मागच्या लेखात मी लिहिल्याप्रमाणे, अजूनही अभ्यासाला जागा आहे. उपक्रमावर भरपूर प्रतिसाद मिळणार नाहीत हेही पटत नाही. ईश आपटेंच्या दोन लेखांना मिळालेली प्रतिसादसंख्या (६७ व १२७) पहाता त्यात काही तथ्य नाही असेच म्हणणे भाग पडते.

(अवांतर - उपक्रम हिंदुत्वद्वेष्टे आहे का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काय निकष वापरावे असा प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे.)

शंका

उपक्रमाच्या वाचकवर्गाला हिंदुद्वेष्टा म्हणून हिणवणे मला प्रस्तुत वाटत नाही.

ते 'हिणवणे' होते हे नक्की?

धार्मिक भावनांचा आदर करणारे काही लेखकांच्या वैचारिक झुंडशाहीमुळे काहीसे गप्पदेखील राहात असतील.

The silence of the good is worse than the violence of the bad? :)

त्यावरून एका विशिष्ट धर्माची हेटाळणी करण्याची प्रवृत्ती संपूर्ण वाचकवर्गात आहे असे म्हणणे बहुतांश वाचकवर्गावर अन्यायकारक होईल.

'संपूर्ण' हा शब्द त्यांनी वापरला नव्हता, वाचक'वर्गा'ची प्रातिनिधिक भूमिका प्रतिपादिली आहे असे वाटते.

त्यामागे धर्मद्वेषाची पार्श्वभूमी नसून उपक्रमींची गंभीर विचारसरणी व सखोल वैचारिक बैठक त्यास कारणीभूत ठरेल असे वाटते.

गंभीर विचारसरणी व सखोल वैचारिक बैठक यांचा परिपाक धर्माविषयी ममत्व वाटण्यात होतो?

ईश आपटेंच्या दोन लेखांना मिळालेली प्रतिसादसंख्या (६७ व १२७) पहाता त्यात काही तथ्य नाही असेच म्हणणे भाग पडते.

त्यांपैकी किती प्रतिसाद अवांतर, व्यक्तिगत, हिशोब चुकते करण्यासाठी किंवा इतर कारणांनी द्वेषमूलक, हेटाळणीपूर्वक/खोडसाळ, इ. होते ते मोजलेत काय?

उपक्रम हिंदुत्वद्वेष्टे आहे का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काय निकष वापरावे असा प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे.

धाग्याची वाट बघतो आहे. आधी हिंदुत्वाची व्याख्या केलीत तर सर्वेक्षणास उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे असे म्हटल्यास त्यास फारसा आक्षेप घेता येणार नाही असे मला वाटते.

हिंदुद्वेष्टा

धादांतवादी, बुद्धीवादी व चार्वाकवादी अशी विशेषणे असणार्‍यांना सहसा धर्म ह्या प्रकारा विषयी फारशी ऍफिनीटी नसते. त्यामुळे हिंदुद्वेष्टे संबोधल्यास ते हिणवले जातीलच असे नाही. बाकी हा प्रतिसाद तेवढाच 'खाजगीवाले' हा टोप चढवुन का दिला समजले नाही.

आवरा!!!!

आवरा यांना!

+१

त्यांचे सारे लेख उडवावे ही विनंती.

नको

त्यांचे सारे लेख उडवावे ही विनंती.

रिटे, जगणे अवघड होत चालले आहे. त्यात निखळ विनोदाचे कारंजे अपवादानेच फुलत असतात. का त्यांना बूच लावता?

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

असहमत

लेखकाचे काही गैरसमज व काही अज्ञान आहे. त्यांवर उत्तर द्यायचं की नाही हे प्रत्येकाला ठरवता येईल. विशिष्ट विचारप्रणाली आपल्या विचारांपेक्षा वेगळी आहे म्हणून तिचं तोंड दाबून टाकणं योग्य नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ठीक

तुम्हा लोकांना मॅसोकिजम आवडतो काय?
परंतु, कृपया नियम पहा:
इतर माध्यमांतून किंवा इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेले साहित्य उपक्रमवर जसेच्या तसे प्रकाशित करता येणार नाही याची नोंद घ्यावी संदर्भ (पूर्वी अशी सूट होती की सहा महिन्यांनंतर साहित्य प्रकाशित करता येईल.)
आणि हे पहा:

त्यांचा दूरध्वनी क्रमांक येथेही आहे. पहिल्या दुव्यातील वर्णन/छायाचित्रापेक्षा तेथील छायाचित्रे आणि व्यवसाय वेगळ्या व्यक्तीचे वाटतात.

नियम?

कुठला नियम? साईटवर असण्यासाठी प्रत्येक सदस्य ज्याला मान्यता देतो ते साइटचे नियम डिस्क्लेमर व प्रायव्हसी पॉलिसी यांतच आहेत.

By clicking on the check box next to "Accept Terms & Conditions of Use", you agree and consent to the conditions mentioned above, and those mentioned in Disclaimer and Privacy policy.

या साइटवर कुठल्यातरी आयडीने काहीतरी पोस्ट केल्याने तो नियम कसा होतो?

The fact that a particular message is posted on or transmitted using this web site does not mean that Upakram management has endorsed that message in any way or verified the accuracy, completeness or usefulness of any message.

काहीतरी तांत्रिक खुसपटं काढून आपल्या मताविरुद्धचे विचार दाबून टाकण्याविषयी मी बोलतही नाहीये. तुमची तांत्रिक खुसपटं तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहेत हे आधी सिद्ध करा. मग इतरांनी अनेक ठिकाणी एकच लेख पोस्ट केलेला तुम्हाला माहीत असताना तुम्ही तक्रार केली नाहीत याविषयी बोलू.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हं

या साइटवर कुठल्यातरी आयडीने काहीतरी पोस्ट केल्याने तो नियम कसा होतो?

तुमची तांत्रिक खुसपटं तांत्रिकदृष्ट्या भक्कम आहेत हे आधी सिद्ध करा.

या 'कुठल्यातरी' आयडीचे सदस्यनाम उपक्रम हेच आहे आणि सदस्यक्रमांक २ आहे, त्यांनी मालकीहक्काच्या आविर्भावात अनेकदा लेखन केलेले आहे आणि त्या दाव्याला कोणीही आक्षेप घेतलेला नाही, इ. माहितीला तुम्ही किती महत्व द्याल ते मला माहिती नाही. परंतु, तुम्ही स्वतःही त्या आयडीला एक खरड दिली होतीत (आता ती खरड उडलेली आहे). त्या खरडीत तुम्ही त्या आयडीचा उपक्रम या संकेतस्थळावरील मालकीहक्क मान्य केला होतात.

मग इतरांनी अनेक ठिकाणी एकच लेख पोस्ट केलेला तुम्हाला माहीत असताना तुम्ही तक्रार केली नाहीत याविषयी बोलू.

कृष्णमूर्ती यांच्याविषयीच्या लेखांविरुद्ध मी तक्रार केली होती आणि ते लेख उडविण्यात आलेले आहेत. रणजित चितळे यांच्या काही लेखांविरुद्धही मी तक्रार केलेली आहे. इतर कोणत्याही पुनःप्रकाशित लेखाविरुद्ध तुम्ही तक्रार केली आणि त्यास मी विरोध केला असे काही उदाहरण आहे काय?

The fact that a particular message is posted on or transmitted using this web site does not mean that Upakram management has endorsed that message in any way or verified the accuracy, completeness or usefulness of any message.

तर?

  1. प्रतिवादही करण्याची लायकी नसलेले त्याज्य लेखन असा काही प्रवर्ग असतो की नाही?
  2. वरील प्रकारचे डिस्क्लेमर कोर्टात टिकत नाहीत.

संबंध समजला नाही.

# वरील प्रकारचे डिस्क्लेमर कोर्टात टिकत नाहीत.

१. उपक्रम न्यायालय आहे काय?
२. असल्यास कोणते कायदे उपक्रमावर "चालतात"?
३. वरचं न्यायालय अनेकदा खालच्या न्यायालयाचे निर्णय फिरवते.
४. संसद सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय चुकीचे ठरतील असे कायदे बनवू शकते.

खुलासे

उपक्रम न्यायालय आहे काय?

नाही, परंतु तो डिस्क्लेमर अतार्किक असल्याची शक्यता विचारात घ्यावी म्हणून न्यायालयांचे उदाहरण दिले. न्याय ही तर्काशी निगडितच बाब आहे असे वाटते.

असल्यास कोणते कायदे उपक्रमावर "चालतात"?

वरील उत्तरामुळे हा प्रश्न रद्द. (तसेही, संबंध समजला नव्हताच.)

वरचं न्यायालय अनेकदा खालच्या न्यायालयाचे निर्णय फिरवते.

वरील उत्तरामुळे हा प्रश्न रद्द. (तसेही, संबंध समजला नव्हताच.)

संसद सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय चुकीचे ठरतील असे कायदे बनवू शकते.

तर? तसा डिस्क्लेमर देणार्‍या संस्थळांना सर्व खटल्यांपासून वैधानिक संरक्षण मिळवून देण्याची कुवत तुमच्यात आहे काय? अबेटमेंट (मदत करणे) या अपराधाखाली संस्थळांवर खटले होतातच. म्हणजे, सध्याच्या कायद्यांनुसार (जे संसदेलाही आवडतात) संस्थळांवरील सर्व मजकुरास संस्थळांची अनुमती/समर्थन गृहीत धरली जाते.
बाकी, जेम्स लेनविषयीच्या धाग्यावरील चर्चेत तुमच्या टोळक्याने याच मुद्यावर नेमका उलटा पवित्रा घेतला होता हे विसरलात काय?

संदर्भ?

>> न्याय ही तर्काशी निगडितच बाब आहे असे वाटते. <<
संदर्भ?

खुलासा

व्यक्तींच्या स्वार्थांची योग्यायोग्यता तर्काने ठरविणे म्हणजेच न्याय नव्हे काय?

असहमत

न्याय ही तर्काशी निगडितच बाब आहे असे वाटते.

असहमत. फारतर फार 'निकाल' हा (तत्कालिन) तर्काशी निगडितच बाब आहे असे म्हणता यावे.
आता न्यायालयातील निकाल न्याय असेलच असे नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असहमत

न्यायालयात मिळालेला निकाल ज्यांना अतार्किक वाटतो त्यांना "न्याय मिळाला नाही" असे वाटते त्याअर्थी न्याय या संकल्पनेत तर्कसंगतपणा अपेक्षित असतो.

अपेक्षित!

बरोबर अपेक्षित असतो.. निकालात न्याय किंवा तर्क असेलच असे नाही .
अपेक्षा काय कसलीही करता तेते. ;)

थोडक्यात असे म्हणायचे होते काय न्याय ही संकल्पना व्यक्ती-सापेक्ष असते. न्यायालय देते तो नियमांनूसार निकाल! न्याय नव्हे!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

+१

न्यायालय देते तो नियमांनूसार निकाल! न्याय नव्हे!

सौ. निकेता मेहता ह्यांच्या बहुजटिल आणि बहुचर्चित भांडणामध्ये न्यायालयामध्ये निकालपत्रवाचनसमयी 'ह्या निकालाने मेहता दाम्पत्त्यांस न्याय मिळणार काय' हा मुद्दा उठविला गेला होता, त्यावेळेस मा. न्यायमूर्तींनी "...परंतु आम्ही न्यायप्रक्रियेस अभिप्रेत असलेप्रमाणे केवळ निकाल देतांहोत, त्यास न्याय ह्मणावयाचे की नाही हे समाजाने ठरवावयाचे आहे" असेच आम्हांस सांगितले होते.

तात्पर्यः न्याय आणि तर्क ह्या भिन्न वस्तु एकमेकांत असतीलच असे नाही.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

टोळकं

बाकी, जेम्स लेनविषयीच्या धाग्यावरील चर्चेत तुमच्या टोळक्याने याच मुद्यावर नेमका उलटा पवित्रा घेतला होता हे विसरलात काय?

हाहाहा.. पण आम्ही विसरलेलो नाही हा. आजकाल प्रगल्भ स्थळावर उगीचच लुडबुड सुरू असली तरी ह्यांची मुळे कुठे आहेत ते आम्हाला माहित आहे :)

सामंजस्य...

हा हा हा... आविर्भावावरून सत्यता ठरवायची झाली तर ईश आपटे व प्रस्तुत लेखक यांना सर्वज्ञानी म्हणावं लागेल. तुमच्या आक्षेपांवर माझा एवढाच आक्षेप आहे की कायद्याच्या काहीतरी त्रुटी सांगून तुम्हाला न आवडणारं लेखन उडवायला सांगत आहात. सरळ सांगा ना, की मला हे आवडत नाही म्हणून उडवावं...दुटप्पीपणा नको. कायद्याच्या खुसपटींचा आधार घेऊन काहीतरी तांत्रिक आक्षेप घेणं आपल्याला शोभा देत नाही.

2.वरील प्रकारचे डिस्क्लेमर कोर्टात टिकत नाहीत

यावर 'कुठचं कोर्ट?' वगैरे गेम थिअरीवर आधारित प्रतिसाद टाकण्याचा मोह झाला होता... :)

1.प्रतिवादही करण्याची लायकी नसलेले त्याज्य लेखन असा काही प्रवर्ग असतो की नाही?

प्रतिवाद न करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आपल्या विचारांपेक्षा वेगळं लेखन उडवून टाका म्हणणं हे एकाधिकारशाहीचं लक्षण आहे. सामंजस्य बाळगा एवढंच म्हणणं आहे.

मला सांगायचं तेवढं सांगून झालं. पुढची चर्चा करायचीच असेल (मला फारसा रस नाही) तर खरडवहीत.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चीटींग!

आविर्भावावरून सत्यता ठरवायची झाली तर ईश आपटे व प्रस्तुत लेखक यांना सर्वज्ञानी म्हणावं लागेल.

तुम्ही स्वत: उपक्रम या आयडीची संस्थळावरील मालकी मान्य केली होतीत!

तुमच्या आक्षेपांवर माझा एवढाच आक्षेप आहे की कायद्याच्या काहीतरी त्रुटी सांगून तुम्हाला न आवडणारं लेखन उडवायला सांगत आहात.

वॉटेवर हॅपन्ड टू "काहीतरी तांत्रिक खुसपटं काढून आपल्या मताविरुद्धचे विचार दाबून टाकण्याविषयी मी बोलतही नाहीये."!
बाकीचे सारे आरोप मी उत्तरित केले आहेत काय?

सरळ सांगा ना, की मला हे आवडत नाही म्हणून उडवावं...दुटप्पीपणा नको.

तो माझा हक्क नाही ना! आवडत नाही हे मी मान्यच करतो आहे परंतु संस्थळाकडून इतकीच अपेक्षा की त्यांनी त्यांचे स्वतःच जाहीर केलेले नियम पाळावेत (आणि मला अपेक्षित मुस्कटदाबी करावी ;) ).

यावर 'कुठचं कोर्ट?' वगैरे गेम थिअरीवर आधारित प्रतिसाद टाकण्याचा मोह झाला होता... :)

समजले नाही.

मला सांगायचं तेवढं सांगून झालं. पुढची चर्चा करायचीच असेल (मला फारसा रस नाही) तर खरडवहीत.

'मुझेभी कुछ कहना हय' असे तुम्हाला अपेक्षित नव्हते? ते मी प्रतिसादात का देऊ नये? यापुढची चर्चा खरडवहीत करणे मला मान्य आहे.

छान करमणूक झाली

>>आपण आपल्या मुलांना कॉंन्व्हेंट शाळेत (इंग्लिश मिडियम) घालतो, ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. पण आपण आपल्याच हातांनी आपल्या मुलांचं भवितव्य बिघडवत आहोत. ही जाणिव आपल्याला होत नाही. आणि कधि होईल अशी आशा सुद्दा नाही. कॉंन्व्हेंट शाळांच्या पडद्दा-आडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार होत आहे.

तुम्ही लिहिल्यावर एक मनातल्या मनात सर्वे केला. ठाण्यात इंग्रजी माध्यमाच्या १००पेक्षा जास्त शाळा असाव्यात. त्यात कॉन्वेण्ट-ख्रिस्ती धर्मसमुदायाने चालवलेल्या १० सुद्धा नाहीत.

ठाण्यात कॉन्वेण्ट शाळेत जाण्याचं मुळीच फ्याड नाही.
व्हॅलेण्टाईन डे चे फ्याड सुद्धा कॉन्व्हेण्ट "शाळां"तून आले नाही.

प्रवचन भास्करांनी सांगितलेल्या कथेत व्हॅलेण्टाईन हा प्रेमाचा उद्गाताच असलेला दिसतो. त्याला संतपद देणार्‍या ख्रिश्चनांनी केलेले अत्याचार व्हॅलेण्टाईनच्या नावावर का बरे वर्ग केले आहेत? व्हॅलेण्टाईनने अत्याचार केल्याचे कथेतून दिसत नाही त्यामुळे "हा असला व्हॅलेन्टाईन प्रेमाचा प्रतिक कसा असू शकतो? व्हॅलेन्टाईन प्रेमसंत आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे प्रेम विक्षिप्त आहे" हा दावा टिकण्यासारखा नाही.

बाकी मेकॉलेच्या नसलेल्या पद्धतीचं शिक्षण सदर धागाप्रस्तावकाला मिळालेले दिसते. कोणती बरे ही शाळा?

>>इंग्लंडमधील तीन युनिवर्सिटींनी व्यवस्थापन शास्त्रातील आदर्श ग्रंथ म्हणून रामदास स्वामींच्या दासबोधाला आपल्या आभ्यासक्रमात लावला आहे.

याचे संदर्भ देता आले तर बरे होईल. कोणत्या विद्यापीठांनी हा आदर्श ग्रंथ म्हणून अभ्यासक्रमात लावला आहे? आणि मग त्यांनी ड्रकर, कोट्लर, गाल्ब्रेथ यांना मोडीत काढले आहे का?

अवांतर : व्हॅलेण्टाईन डे हा धार्मिक उत्सव मुळीच नाही. तो एक मार्केटिंग इव्हेण्ट आहे. अक्षय तृतीयेला सोनं घ्यायचं असतं हे जसं मार्केटिंग आहे तसंच व्हॅलेण्टाईन डे चं आहे.

अतिअवांतर: नववर्षदिन त्या दिवशी साजरा करण्याऐवजी आदल्या रात्री साजरी करण्याच्या पद्धतीचे अनुकरण करण्याच्या नादात संस्कृतीरक्षकांतर्फे हल्ली गुढीपाडव्याची पूर्वसंध्या साजरी केली जाते. ती हिंदू संस्कृतीत अशुभ समजल्या जाणार्‍या अमावास्येच्या रात्री.

(अतिअतिअवांतर : टिळक, आगरकर, हेडगेवार, गोळवलकर, सावरकर हे सगळे मेकॉलेच्याच शिक्षणपद्धतीत शिकले असावे.)

नितिन थत्ते

नितिन थत्ते

:)

आजकाल येसो लिखे पे मोहे का बोलना कुछ समजत नै.
कहा कहा से उपक्रम पे लोग लिखबे आतहींगे कुछ समजत नै.

-दिलीप बिरुटे

सहमत

जयेश मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.

ये क्या हो रहा है?

वरचे प्रतिसाद पाहून अंमळ गंमत वाटली. माझे मत लिहिण्यापूर्वी एक गोष्ट

हा धागा ज्याने आडवा पसरून वर्टिकल स्क्रोल बरोबर हॉरिझाँटल स्क्रोल करण्याची सदस्यांना शिक्षा केली आहे त्यांच्यावरही प्रतिबंध लावा. ;-) ह. घ्या.

जयेश मेस्त्री नावाचा कुणीतरी मनुष्य (बहुधा मनुष्यच असावा. नसल्यास चू. भू. दे. घे.) उपक्रमावर अवतरतो. धडाक्यात ८-१० लेख टाकतो आणि गायब होतो आणि उरलेले सदस्य आपापला प्रगल्भपणा दाखवण्यात वेळ घालवतात.

खाजगीवाल्यांच्या बुरख्याखाली दडल्याने उपक्रमाच्या वाचकवर्गाला कुणी गंभीरपणे हिंदुद्वेष्टे म्हणत असेल असे वाटत असल्यास कठीण आहे. उरला प्रश्न उपक्रम प्रगल्भ असण्याचा. त्यात नेमकी काय शंका आहे? वरच्या लेखावर काहीही न बोलता आपली मते ठासून मांडणारी, वाद घालणारी आणि त्यावर पक्की राहणारी मंडळी प्रगल्भच म्हणायला हवीत ना! मग ते रिकामटेकडा असो, खाजगीवाले किंवा घासकडवी.

ईश आपटेंच्या दोन लेखांना मिळालेली प्रतिसादसंख्या (६७ व १२७) पहाता त्यात काही तथ्य नाही असेच म्हणणे भाग पडते.

प्रतिसादांच्या संख्येने प्रगल्भता मोजणे इतरांना पटले आहे असे खाजगीवाले यांना कोणी बरे सांगितले? त्यांचे मत आणि वरील लेखातील मत हे सारखेच चुकीचे आहे. असो. उपक्रम प्रशासनाने या चर्चेतील प्रतिसादांचा वेगळा धागा करावा नाहीतर कुणीतरी पंचाक्षरी आयडी त्याचे भांडवल करून वरल्या लेखाला ३०+ प्रतिसाद आले असा लेख लिहायचा. ;-)

@ रिटे

त्यांचे सारे लेख उडवावे ही विनंती.

लेख उडवण्यापेक्षा दुर्लक्ष करणे सोपे असते. ते करता आले नाही की ही अशी मंडळी फोफावतात आणि त्यांच्या सोबतीने काही इतरही. अर्थातच, मेस्त्रींनी केलेला प्रकार उपक्रम प्रशासनाने रोखला ते बरे झाले.

@ घासकडवी

विशिष्ट विचारप्रणाली आपल्या विचारांपेक्षा वेगळी आहे म्हणून तिचं तोंड दाबून टाकणं योग्य नाही.

+१ सहमत आहे पण ही तर सर्वच मराठी संकेतस्थळांची "मोडस ऑपरेंडी" आहे. केस् बाय केस फक्त पात्रे बदलतात आणि संकेतस्थळे बदलतात एवढाच काय तो फरक.

असो. सांगण्याचा मुद्दा हाच की मूळ विषयावर फार कमी लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. हे प्रतिसाद संपादित व्हावेत (माझ्या या प्रतिसादासकट) किंवा इतरत्र हलवले जावेत.

स्क्रोल

राजेश यांनी ...क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष... अशी चीटची पांढरी माळ लावली आहे.
थोड्याथोड्या क्ष नंतर 'झीरो विड्थ नॉन जॉईनर' (&zwnj;) टंकल्यास हॉरिझाँटल स्क्रोल होणार नाही.

हेहेहे!

थांकु! माझ्या लक्षात आले नाही ते.

कुणी आहे का रे तिकडे! राजेशना प्रतिबंधित करा!! ;-) (सर्वांनी ह. घ्या.)

क्षमस्व

गैरसोयीबद्दल क्षमस्व. पण मला असं का व्हावं हे कळलं नाही. एकतर माझ्या स्क्रीनवर (घरचा कॉंप्युटर व कंपनीचा लॅपटॉप दोन्हींच्या) व्यवस्थित दिसतं आहे. पूर्वपरिक्षणात काहीच गडबड दिसली नाही.

दुसरं म्हणजे जेव्हा मी काळ्या अक्षरातली मराठी अक्षरं टंकतो तेव्हा कितीही मोठा परिच्छेद असला तरी असं होत नाही. त्या क्षंच्या मध्ये अधूनमधून स्पेस टाकल्यावर हा प्रश्न उद्भवणार नाही का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हो!

त्या क्षंच्या मध्ये अधूनमधून स्पेस टाकल्यावर हा प्रश्न उद्भवणार नाही का?

हो! अध्ये मध्ये स्पेस टाका किंवा एंटर दाबा की तो एकच शब्द बनून आडवा पसरत जाणार नाही.

एकतर माझ्या स्क्रीनवर (घरचा कॉंप्युटर व कंपनीचा लॅपटॉप दोन्हींच्या) व्यवस्थित दिसतं आहे.

आता बदलून देण्यात आलं आहे पण आयईवर खूप त्रासदायक झाले होते पूर्वी.

क्षमस्व वगैरे काही नाही हो, होतं असं कधीतरी. मुद्दाम केलेलं नसतं हे जाणून असतात सर्व. मोठ्या आकारांची चित्रं टाकली तरी असा प्रॉब्लेम होतो. माझ्याही आधी लक्षात आले नाही.

ठणठणपाल??

ठणठणपाल ह्यांनी जर परत लिहायचं ठरवलं तर ते असंच काहीसं लिहितील असं वाटतं.

'पीएसएलव्ही- सी 16' व्यंकटेश्‍वराच्या चरणी

शेवटी हे सगळे विद्न्यानवादी / विचारवंत इथे येऊन कितीही पुरोगामी असल्याचा दावा करत असले तरी शेवटी हेच करत असावेत. त्या शक्तिची महती त्यांना माहिती असते. मला कित्येक डॉक्टर माहिती आहेत की, जे दवाखान्याचे दार ओलांडताच आधी देवाच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील कामे करतात.
हिंदू धर्म श्रेष्ठ विचारपद्धत जगाला देतो.

शेम

What they do, is simply stick their fingers in their ears and say "la la la". They KNOW what's true because it's in their holy book. ... The most extreme case is the geologist Kurt Wise who has a PhD in geology from Harvard and said, "If all the evidence in the universe pointed towards an old earth, I would be the first to admit it but I would still be a young earth creationist because that is what holy scripture teaches me". You cannot argue with a mind like that. A mind like that seems to me ... is ... well, ... a disgrace to the human species. - Richard Dawkins

पार्ट ऑफं नथिंग

यु क्यानॉट आर्ग्यु विथ् द माइंडस् द्याट बिलिव्ह डॉकीन्स् आयदर्... अ माइंड द्याट इज पार्ट ऑफं नथिंग.

बरोबर

हे बरोबर आहे.
जगाने हिंदू विचार पद्धती स्विकारली तर उत्तम होइल. शांतता नांदेल. जग भकास होण्यापेक्षा खरा विकास होईल.

शिवा

हिंदू:

हिंदू:

महाराष्ट्र टाईम्स् मध्ये मला खालील काही माहीती आवडली होती. लेखक श्री अभ्यंकर (बहुतेक).

हिंदू:

' धृ ' म्हणजे धारण करणे. या धातूपासून धर्म शब्द बनला आहे.

ऋग्वेदात ' धर्म ' शब्द सुमारे 56 वेळा आला आहे. काही ठिकाणी नाम तर , काही ठिकाणी तो विशेषण आहे. ' पोषण करणे ', ' नैतिक नियम ', ' आचार ' वा ' यज्ञ ' अशा अर्थाने धर्म शब्द वेदात उपयोजिलेला आहे.

अथर्ववेद म्हणतो ,

' ऋत , सत्य , तप , राष्ट्र , श्रम , धर्म , कर्म , भूत , भविष्य , वीर्य , लक्ष्मी आणि बल हे सारे गुण धर्मात सामावले आहेत. ' ( अ. वे. 11.7.17)

तैत्तिरीय उपनिषद् ( 1.11) ' सत्यं वद। धर्मं चर। ' असा आदेश देते.

धर्म शब्दाचा अर्थ ' वर्णाश्रमविहित कर्म वा कर्तव्य ' असाच आहे. याज्ञवल्क्यस्मृति आणि गीताही धर्माचा हाच अर्थ प्रतिपादन करतात. भगवान् श्रीकृष्ण सांगतात ,

' स्वे स्वे कर्मण्यभिरत: संसिद्धिं लभते नर:।

' आपल्या (स्वाभाविक) कर्मात निरत असलेल्या पुरुषाला भगवत्प्राप्तिरूप परम सिद्धीचा लाभ होतो.

' धर्म ' संज्ञेचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. तो religion प्रमाणे संकुचित नाही.

' वेद , स्मृतिसूत्रादी धर्मशास्त्रे , शिष्टांचा किंवा सज्जनांचा आचार , ज्याच्याविषयी विकल्प असेल अशा धर्मानुष्ठानात स्वत:ला जे प्रिय वाटेल ते आणि उत्तम संकल्पातून निर्माण झालेला व शास्त्राविरुद्ध नसलेला काम (इच्छा) हे धर्माचे पाच मूलाधार होत. '

व्यासांनी धर्माचे लक्षण असे सांगितले आहे ,

हिंदू धर्माची व्याख्या स्वा. सावरकरांनी केली आहे , ती अशी-

' सिंधू नदीपासून हिंदू समुदापर्यंत पसरलेली ही भारतभूमी ज्याला , पितृभू म्हणजे वाडवडिलांची भूमी आणि पुण्यभूमी वाटते तो हिंदू होय. '

लोकमान्य टिळक म्हणतात ,

' वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी , साधनांची अनेकता आणि उपास्य कोणते असावे याविषयी स्वातंत्र्य असणे हे हिंदू धर्माचे लक्षण होय. '

विनोबा भावे यांनी केलेली हिंदू धर्माची व्याख्या लक्षणीय आहे-

' वर्णाश्रमव्यवस्थेवर निष्ठा असलेला , गोभक्त , श्रुतींचा मातेप्रमाणे सन्मान करणारा , देवमूतीर्ंची अप्रतिष्ठा न करणारा , सर्व धर्मांचा आदर करणारा , पुनर्जन्माला मानणारा , मोक्षाची आकांक्षा असलेला , सर्व भूतमात्रांना अनुकूल असणारा आणि हिंसेमुळे ज्याचे चित्त दु:खी होते- तो हिंदू होय. '

धर्मो रक्षति रक्षितः ।

जय श्री राम,
धृतराष्ट्राने कितीही कुशल मंत्रयुद्ध खेळले असेल, पण अर्जुनाने कृष्णाचेच ऐकले.
तुम्हीही अधर्मी लोकांचे न ऐकता आपली धर्माची उपासना सुरु ठेवावी, उपासनेचे अध्यात्माचे अधिष्ठान टिकवावे.
अहो, राम सर्वांना आवडायचा, अगदी रावणाचा सख्खा भाउ, धर्मनिष्ठ, संयमी, योगी, बिभिषणालाही राम पुज्य वाटत होता; पण रावणाच्या मनात मात्र काट्याप्रमाणे सलत होता, कारण त्याला धर्म आवडत नव्हता, त्याला मर्यादा आवडत नव्हत्या, योग आवडत नव्हता, तर केवळ अधर्म, कुत्र्याप्रमाणे स्वैर आचरण आणि भोगच आवडत होता.
यावरूनच धर्म कोणाला आवडतो आणि कोणाला खुपतो ते आपल्याला सहज समजते.

 
^ वर