अब्दुल कलाम
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर वेगवेगळ्या धाग्यांमधे चर्चा सुरु आहे. त्या चर्चांना थोडी एकसंधता मिळावी म्हणून हा चर्चा विषय.
झालेल्या चर्चेवरून उत्सुकता ताणल्याने थोडी नेट-माहिती वाचली. तत्पूर्वी माझे या विषयावर काही मत होते. ते आता थोडे सुधारल्याचे जाणवते. या चर्चेनंतरही ते सुधारले जावे अशी अपेक्षा धरतो.
चर्चेदरम्यान भारताच्या वैज्ञानिक जगताबद्दल माझी सर्वमान्य नसलेली मते येतील. कोणाला राग आला तर आधिच माफी मागतो.
पहिल्यांदा त्यांचा थोडक्यात जीवन परिचय. जन्म १९३१. शिक्षण बी.एस.सी (फिजिक्स) आणि नंतर एरॉनिटकल इंजिनियरिंग मधे डिप्लोमा. (माहिती बायोग्राफी अब्दुल कलाम असा शोध घेतल्यावर मिळालेली.) डॉक्टरेट बहुदा नसावी. ३० विश्वविद्यालयातून ऑनररी डॉक्टरेट (त्या शिक्षणात गणता येत नाही.) सहसा ऑनररी डॉक्टरेट असल्यावर डॉ असे पूर्वपद लावत नाहीत. त्यानंतर इस्रोमधे मोठा कार्यकाल. एस.एल.वी ३ या भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपकाच्या डायरेक्टरपदी काम. त्यानंतर डीआरडीओ मधे प्रक्षेपणास्त्रांवर काम. त्यात त्यांचा अग्नी व पृथ्वी या दोन क्षेपणास्त्राच्या निर्मितीत आघाडीचा सहभाग होता. हे झाल्यावर दुसर्या अणुस्फोटाच्या चाचण्यांमधे सहभाग. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड. या दरम्यान भारताच्या भविष्यकाळासंबंधी भाषणे व लिखाण. विंग्ज ऑफ फायर या लोकप्रिय पुस्तकाची निर्मिती. आणि ठिकठिकाणी विद्यार्थी वर्गाला आणि इतरांनाही उत्साहीत करणारी भाषणे दिली.
भारतात वैज्ञानिक ज्यांना म्हटले जाते त्यात तंत्रवैज्ञानझी (इंजिनियर/टेक्नॉलॉजिस्ट) असतात. अब्दुल कलाम हे देखील तंत्रवैज्ञानिक. त्यामुळे त्यांचे शोधनिबंध फारसे मिळाले नाहीत तर नवल वाटले नाही. मुख्यतः त्यांचे शोधनिबंध मटेरियल सायन्स, कॉम्पोजिटसवर दिसले ते देखील १९७०-८० मधील. त्यांची मुख्य जाणकारी ही अवकाशयान-क्षेपणास्त्र या विषयातली. त्यांना अणुतंत्रज्ञानाचा अनुभव नव्हता. त्यामुळे अणुचाचण्यातील सहभाग हा महत्वाचा मानू नये असे मला वाटले. त्यांच्यामुळे (मुख्यतः भाषणांनी) प्रभावित झालेल्या खूपशा लोकांना मी पाहिले आहे. उल्हसित करणारे भाषण असे त्याचे वर्णन असायचे. भाषणाचा मतितार्थ मात्र फारसा सांगता येत नसे. त्यांचे मुख्य कर्तृत्व एस.एल.वी ३ हे धरले पाहिजे. पृथ्वी व अग्नी या दोन्ही क्षेपणास्त्रात फारसे यश नसावे असे मानण्याला जागा आहे. अजूनही यातील बहुतेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या चालू आहेत.
या तिन्ही (अवकाशयान, क्षेपणास्त्र आणि अणू चाचणी २) गोष्टीमधे त्यांचे वैयक्तिक योगदान किती हे बाहेरील माणसाला कळणे कठीण आहे. त्यांच्या इतर वागणूकीवरून थोडाफार अंदाज बांधला जाऊ शकतो. तिनही संस्थात वैयक्तिक जाणकारी ऐवजी इतर गुणांमुळे बढती व संधी भरपूर मिळते अशा वदंता आहेत. त्यामुळे फक्त मोठ्या पदावर पोचले म्हणून मोठी कामगिरी असे मानण्यास कारण नाही. त्यांच्या बाबतीतचे मोठे उदाहरण म्हणजे अणुचानण्या २ साठी त्यांची नियुक्ति. ही नियुक्ति एक प्रशासक म्हणून जास्त असावी असे वाटणे साहजिक आहे. याशिवाय इतर कारणे ही असू शकतीलच.
इस्रो, डीआरडीओ आणि बार्क (बी.ए.आर.सी.) ही भारतातील प्रमुख नावाजलेली संशोधनकेंद्रे मानली जातात. बर्याच वेळा ह्या तिन्ही ठिकाणी 'पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञान' विकसित झाले असे म्हटले जाते. ते तितकेसे खरे नाही. (जसे बार्क मधील अणूभट्या या कॅनडातून आल्या होत्या.) संशोधनाची जेवढी जाहिरात होते तसे परिक्षण फेल्युअर्सचे होत नाही. भारताचा थोरियम प्रकल्प हा त्यातला. प्र्क्षेपणास्त्रांचा भारतीय सेनेतला सहभाग कमी आहे. त्यात फारसे उत्साहवर्धक चित्र नाही असे माझे मत आहे.
अब्दुल कलाम हे उत्तम वक्ते असावेत. (त्यांचे भाषण मी ऐकले नाही.) त्यात करमणूक होत असावी. पण यावरून त्यांना जोकर म्हणणे योग्य की नाही हे माहित नाही. पण कोणी म्हटले तर मला फारसे वाईट वाटणार नाही. त्यांच्या वक्तव्यात भंपकपणा जाणवतो. हे इतरत्र व्यक्त झालेले मत मला मान्य आहे. विशेषतः अणूचाचण्यातील त्यांचा सहभाग मांडण्यात (व त्याला त्यांचा पाठिंबा असण्यात) हा मला विशेष जाणवला. राजकीय हातमिळवणी करणे वगैरेंचे त्यांना वावगे नसावे.
चर्चे साठी खालील बाबतीत मते यावीत असे वाटते.
ते अणूशास्त्रज्ञ म्हणून नावाजले जाणे योग्य आहे का?
पृथ्वी व अग्नी ही क्षेपणास्त्रे यशस्वी आहेत का?
ते भंपक आहेत का?
ते जोकर आहेत का?
प्रमोद
Comments
माझे मत
कलामांच्या काळात, म्हणजे साधारण १९५०च्या आसपास भारतात एरोनॉटीकल/एरोस्पेसमध्ये डॉक्टरेट करता येत होती का?
एमआयटी, मद्रासचे एरोस्पेस डिपार्टमेंट ४९ मध्ये सुरु झालेले दिसते. म्हणजे त्या सुमारास डॉक्टरेट असण्याची शक्यता नाही. त्या वेळी भारतातही एरोस्पेसमध्ये डॉक्टरेट फार ठिकाणी उपलब्ध नसावीच. एरोस्पेस फिल्ड भारतात तेव्हा इतकी एस्टॅब्लिश्डही नव्हती त्यामुळे भारताबाहेर जाउन् एअरोस्पेस मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी(मी स्वतः नुकताच याच फिल्डमध्ये उच्चशिक्षणासाठी आलो असल्याने अजुनही परिस्थिती वाईटच् आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे) मार्गदर्शन-शिष्यवृत्ती वगैरेंचीही वानवा असेल, त्यात कलामांची आर्थिक परिस्थितीही अनुकुल नव्हती असे दिसते.
भारताच्या विमान-तंत्रज्ञानामधील अपयशाची मालिका फार मोठी आहे. मी स्वतः 'फेम्ड' एलसीएवर् किरकोळ काम केले आहे, परिस्थिती निराशाजनकच आहे. अजुनही कित्येक मेकॅनिकल इंजिनीअर लोकांना ट्रेनिंग देउन एरोस्पेस इंजिनीअर केले जात आहे वगैरे.
पण, कलाम जर त्या संस्थेत असण्यार्या तंत्रज्ञांमधील एक निष्णात नव्हते तर त्यांची अशी बढती का झाली असावी? बहुतेक जागा त्यांनी लोकांमध्ये पॉप्युलॅरीटी मिळवण्याच्या आधी मिळवलेल्या आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून (त्या क्षेत्रात निपुण नसतानाही) नेमणुक होण्यासही काही सबळ कारण असावे असे वाटते.
कोणीही कोणालाही काहीही म्हटल्याने मला काहीही वाटत नाही वा फरक पडत नाही. पण जसे अंधश्रद्धेला विरोध करतो तसेच अपप्रचाराला/'माझ्या मते' चुकीच्या मताला, ज्याचा प्रसार/प्रचार होऊ नये असे वाटते अशा मताला तितकाच विरोध करतो.
मला कधी असे जाणवलेले नाही, पण् त्यांचे वक्तव्य मी फार ऐकले वाचलेले नाही. अग्निपंख सोडता मी काही वाचलेले आठवत् नाही. अग्निपंख पुस्तकातुन लोकांना स्फुर्ती मिळत असेल तर मला आश्चर्य वाटणार् नाही.
कुठेतरी, ते काहीतरी भंपक कविता करतात वगैरे वाचले. ते काही कवी नाहीत, ते उत्तम कवी असल्याचा दावा त्यांनी केला आहे काय् स्फूर्तीदायक कविता करण्याचा त्यांचा छंद दिसतो, लोकांच्या प्रतिसादाकडे पाहून् त्यांना बर्यापैकी यश आले असावे असे दिसते. एखाद्याला "वेडात मराठी वीर दौडले" भंपक वाटू शकेल, लिहणाराही भंपक वाटू शकेल पण् त्याने अनेकांना स्फुर्ती मिळत आहे ना? देशप्रेम आणि कार्यशीलतेला यामुळे सुयोग्य चालना मिळत असेल तर मी याला भंपक म्हणणार नाही, उलट यशच म्हणेन.
भंपक म्हणजे माझ्यामते "आपण लै भारी" असा आव आणणारे. मला कलामांनी असा आव आणल्याचे पाहिल्याचे वा वाचल्याचे स्मरत नाही.
(उलट कलाम आपले बुट नोकरांनी उचलुन आणु नयेत वगैरे आग्रह ठेवायचे असे वाचल्याचे स्मरते, हा एखाद्याल भंपकपणा वाटेल पण मला तो गुण कौतुकास्पदच वाटतो) मला ते भंपक वाटत नाहीत.
त्यांच्या केशभुषेची चेष्टा होत आली आहे, पण् ते जोकर नाहीत.
-Nile
धन्यवाद
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमच्या प्रतिसादाशी मी बहुतांशाने सहमत आहे. त्यांना डॉक्टरेट मिळण्याची त्यावेळी शक्यता नव्हती.
त्यांच्या पूर्वसुरीत सतीश धवन आणि विक्रम साराभाई हे दोघेही डॉक्टरेट मिळवलेले होते. आताच बघतो आहे की कस्तुरीरंगन यांना सुद्धा डॉक्टरेट मिळाली आहे. एम जीके मेनन, यु आर राव यांना देखील पीएच डी आहे.
यातील काही त्यांच्या बरोबरीचे.
भारतीय विमान-तंत्रज्ञानाबद्दल आपण जे लिहिले आहे ते योग्यच आहे. सरकारी पद्धतीत योग्यतेनुसार पद, पैसा वा बढती मिळणे बरेचदा कठीण असते. त्यामुळे माणसे मिळणे कठीण त्यात मिळालेली माणसे टिकवून धरणे कठीण असे झाल्यासारखे वाटते. हा मुद्दा मात्र या चर्चा विषयाशाला थोडासा अवांतर होतो आहे.
कोणीही कोणालाही काहीही म्हटल्याने मला काहीही वाटत नाही वा फरक पडत नाही. पण जसे अंधश्रद्धेला विरोध करतो तसेच अपप्रचाराला/'माझ्या मते' चुकीच्या मताला, ज्याचा प्रसार/प्रचार होऊ नये असे वाटते अशा मताला तितकाच विरोध करतो.
सहमत
प्रमोद
पीजे
ए पीजे अब्दुल कलाम या नावातच पीजे असल्याने त्यांना जोकर म्हणता येईल.
नक्की माहित नाही..
नक्की माहित् नाही पण भारतरत्न निवड संस्था एवढीही खराब नाही की काहिच न करता कुणालाही भारतरत्न देयील.
आणि रॉकेट लॉन्च ला अपयश येणे यापेक्षा तो प्रयत्न करणे फार महत्वाचे वाटते. शून्यातून पुढे येताना अपयश हे येणारच.
संपादकांना विनंती : १. (भारतरत्न) अब्दुल कलामांचे नाव टंकताना आधी भारतरत्न लिहीने आवश्यक आहे.
२. "भारतरन्त हे जोकर आहेत का ? " अशा प्रकारच्या चर्चा येथून काढून टाकाव्यात.
उद्या शिवाजी महाराज नंतर अजून कोणी हे जोकर आहेत की नाहीत अशा चर्चा सूरू होतील.
भारतरत्न कलामांमुळे असंख्य भारतीयांमधे स्फुर्ती निर्माण झाली आहे आणि होत आहे.
पेपर टाकणार्या मुलापासून ते भारतरत्न हा प्रवास "जोकर" म्हणन्यालायक नक्कीच नसावा.
"चर्चा करून निर्णय घ्या" अशा फिलॉसॉफ्या सर्वच विषयावर लागू होतील असे नाही. अशा फिलॉसॉफी चा त्रिवार निषेध.
भारतरत्न कलाम हे माझे (आणि अनेक उपक्रमींचे ) प्रेरणास्थान आहेत.
अशी अर्धवट माहितीचा लेख करून त्यावर चर्चा करायला सांगणे म्हणजे भारतरत्नांवर शक घेणेच होय.
संपादकांना तिव्र विनंती की ही चर्चा त्वरीत थांबवावी. अशा चर्चा आमच्या वैयक्तीक जीवनात आघात आणत आहेत. आमच्या प्रेरणास्थानाला
धक्का पोहोचत आहे.
सत्य असत्य पडताळायची वेळ भारतरत्न कलामांवर यावी ते पण फक्त कुणी त्याना एका चर्चेत कमी टंकले यामुळे....
छे.... निषेध अशा चर्चांचा आणि संस्थळाचा जिथे अशा चर्चांना वाव दिला जातो.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
भारतरत्न
नक्की माहित् नाही पण भारतरत्न निवड संस्था एवढीही खराब नाही की काहिच न करता कुणालाही भारतरत्न देयील.
बर्याच अंशी सहमत. निवडसंस्थेविषयी फारशी माहिती मात्र नाही.
तुमचा राग मी समजू शकतो. माझ्यामुळे आल्याने माफ करा.
(भारतरत्न) अब्दुल कलामांचे नाव टंकताना आधी भारतरत्न लिहीने आवश्यक आहे.
'भारतरत्न' ही उपाधी नाही. भारतीय घटनेच्या कलम १८ प्रमाणे कुठलीही उपाधी देण्यास घेण्यास मनाई आहे. अधिक माहिती
अशी प्रथा हल्ली पडू लागली आहे. पण ती सार्वत्रिक नाही. आणि चुकीची पण आहे.
भारत सरकार पद्वश्री, पद्वभूषण, पद्वविभूषण, भारतरत्न असे पुरस्कार देते त्या उपाध्या नाहीत.
अशी अर्धवट माहितीचा लेख करून त्यावर चर्चा करायला सांगणे म्हणजे भारतरत्नांवर शक घेणेच होय.
माहिती अर्धवट आहे हे खरेच आहे. मला असे वाटले की त्यात या निमित्ताने भर पडेल. तसेच चुकीची असेल तर सुधारता येईल.
प्रमोद
क्षमस्व ..
मला तुम्हाला वैयक्तीक काहिच म्हणायचे नाही आहे. परंतू अशा चर्चांमुळे लोकांचा विश्वास उडतो. कोणाला प्रेरणास्थान द्याव हेच
कळेनासं होतं. अस वाटत की पुढे चालून उपक्रमी हे सुद्धा प्रूव करतील की न्युटन / आइन्स्टाइन हे सुद्धा भंपक आहेत.
आमच्याकडे एवढा वेळ नसतो की प्रेरणास्थान ठरवताना त्या व्यक्तीचा पुर्ण इतीहास तपासावां.
असो , हे नक्की की तुम्ही ही चर्चा फक्त रिटेंनी कुठेतरी त्याना जोकर म्हणले म्हणून सुरू केली आहे.
--------------------
-धनंजय कुलकर्णी
शक्य.
न्यूटन ने परीस/अमृताचा झरा वगैरे शोधायचा प्रयत्न केला होता म्हणे. श्रद्धा असावी त्याची...असते एकेकाची.
मग?
होय 'शोधण्याचा' प्रयत्न केला होता. त्यावर श्रद्धा ठेवली नव्हती
??
अच्छा, पण त्याची श्रद्धा नव्हती हे तुम्ही खात्रीने कसे सांगू शकता बा?
भंपक तुलना
न्यूटन-आइनस्टाइन ह्या ग्रेट वैज्ञानिकांशी कलाम ह्यांची तुलना करणे हा भंपक प्रकार नाही वाटत का? न्यूटन-आइनस्टाइन राष्ट्रपतिपदी नव्हते. दोघांनी क्रांतिकारक असे मूलभूत संशोधन केले. ह्याउप्परही न्यूटन-आइनस्टाइनने काही भंपक गोष्टी केल्या असल्यास त्यावर प्रकाश पाडला तर कुणी बोंबलणार नाही. तुम्ही पाडा की प्रकाश.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
तुलना?
वरल्या वाक्यात धक्का यांनी कलामांची तुलना न्यूटन आइनस्टाईनशी केल्याचे दिसले नाही. त्यांनी उपक्रमींबाबत भाष्य केले आहे.
तुलना नाही केली...
तुलना नव्हे.
इथे हे सुद्धा घडेल अस म्हणायच आहे मला.
असो. भा.र. कलाम ह्यांच्या बद्दल काहिही सिद्ध करायची गरज नाही आहे. तसे केलेच तर त्यांचा थोरपणा कमीच होईल.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
अपवाद
नक्की माहित् नाही पण भारतरत्न निवड संस्था एवढीही खराब नाही की काहिच न करता कुणालाही भारतरत्न देयील.
एम जी रामचंद्र यांना भारतरत्न दिले गेले तेंव्हा भारतरत्न निवडसंस्था वगैरे खरेच अस्तित्वात असेल का, की निवडणूक संस्था आहे, असे वाटले होते.
बाकी चालूंदेत.
रोचक
एकूणात सर्व प्रकारच रोचक आहे. एका माणसाच्या मतावरून इतक्या चर्चा व्हाव्यात आणि इतका वेळ वाया जावा इतके ते मत महत्वाचे आहे का? माझ्या मते नाही. मात्र असे न झाल्यास चर्चा करणार कशावर हा ही प्रश्न येतोच.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
सौदा
मत नक्कीच महत्त्वाचे नव्हते पण बालीश वाटल्याने अगदीच सोडून द्यावे असेही नव्हते. मागे अशाचप्रकारे विवेकानंदांविषयी जे वक्तव्य केले गेले त्यालाही मी निषेध नोंदवला होता. यावेळीही नोंदवला एवढेच.
नंतर मात्र चर्चा वाढली कारण नंतर इथे "सौदा" सुरू झाला.
"वेल! १०० नाही मग ५० ला घेता का?"च्या सुरावर "जोकर नाहीत, भंपक तरी वाटतात का?" मग आपल्याला सौदा पटल्याच्या सुरात काहीजण येऊन "बरं! बरं! ५० ला चालेल." असे म्हणतात तसे "बरं! बरं! भंपक आहेत." अशा सुरात खरेदी करायला तयार झाले इतकेच. ;-) आणि ही चर्चा म्हणजे ५० चा भाव योग्य असला तरी छापील किंमत १०० च्या खाली नसतीच हे पटवण्याचा प्रयत्न. ;-) नंतर "आम्ही छापील किंमत देऊनच खरेदी केली हो!" असे म्हणणारे महाभाग सापडतात तसे इथेही छापील किंमतीची ऐडिया बाय करणारे महाभाग असतीलच.
हा हा हा
हा हा हा. भारी॓! तुलना आवडली. सहस्त्रबुद्ध्यांच्या नेहमीच्या लेखांच्या तुलनेत हा म्हणजे पानी कम आहे या आशयाशी सहमत.
-Nile
पानी कम
का बरे? तुमच्या श्रद्धास्थानावर हल्ला झाला म्हणून का? :)
प्रतिसादात दम नाही
कारण लेखाचा विषयच पानी कम स्टाईल आहे, तो काही आयडींना शोभतही असेल पण् सहस्त्रबुद्ध्यांची वाटचाल पाहुन त्यांच्या भात्यातल्या बाणांबद्दलची अपेक्षा उंचावली होती.
बाकी कलाम माझे श्रद्धास्थान आहे हा निष्कर्ष कसा काढलात् ब्वॉ? तुमच्याच विचारसरणीला अनुसरुन तुम्हाला असा प्रतिसाद द्यावा लागण्याचे कारण् तुमच्या श्रद्धेवर किंवा श्रद्धास्थानावर हल्ला झाला की काय?
-Nile
आलं लक्षात
बरं बरं...
सौदा
माझ्या मते जोकरपणा आणि भंपकपणा हे वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत. त्यात जोकरचे १०० आणि भंपकचे त्याहून कमी (५०) हे मला पटत नाही. भंपकपणात अप्रामाणिकतेचा सहभाग असतो. तर जोकरमधे कमी बुद्धिमत्तेचा. यात डावे उजवे कसे करणार? मी लिहिताना हा सौदा माझ्या मनात नव्हता. तो या चर्चेच्या निमित्ताने का जाणवतो हे कळले नाही.
प्रमोद
सबसेट?
इतकं साधं गणित असल्याचे वाटत नाही. जोकर किंवा विदूषक हा प्राणी असामान्य बुद्धीमत्तेचाही असू शकतो परंतु आपल्या (आचरट) चाळ्यांनी तो इतरांना कमी बुद्धीमत्तेची झलक दाखवून किंवा तसा संभ्रम निर्माण करून इतरांना हसवू शकतो आणि सोबत काहीतरी साध्यही करू शकतो. लालूंनी ही किमया साधलेली आहे. जेव्हा या चाळ्यांनी एखाद्याचे हसू होते तेव्हाही आपण त्याला जोकर म्हणतो. भंपकपणा करताना किंवा एखाद्याचा भंपकपणा लक्षात आल्यावर अशाच प्रकारे एखाद्याचे हसू होण्याचा संभव असतो. असे नेहमीच होईल असे नाही तेव्हा जोकर=भंपक असे गणित नसावे पण भंपकपणाला जोकरपणाचा सबसेट म्हणता येईल. १०० - ५०*.
असो.
जगातील सुमारे ६०% आस्तिक लोक** इतरांना देव आहे, तो परिणाम दाखवतो असे ठासून सांगतात किंवा फळ मिळण्याची आशा असल्याचे सांगतात. अनेक उदाहरणे देतात. अनुभव सांगतात आणि अतिशय प्रामाणिकपणे सांगतात. तरीही, विवेकवादी लोक त्यावर विश्वास ठेवत नाही. "देव नाहीच" यावर ते ठाम राहतात.
कलाम जोकर आहेत असे सांगणारा एकही मुद्दा अद्याप आलेला नाही. इतरांच्या प्रतिसादांत नाही किंवा आपल्या लेखातही नाही तरीही "अब्दुल कलाम हे उत्तम वक्ते असावेत. (त्यांचे भाषण मी ऐकले नाही.) त्यात करमणूक होत असावी. पण यावरून त्यांना जोकर म्हणणे योग्य की नाही हे माहित नाही. " हे माहित नसण्याचा नेमका हेतू लक्षात न आल्याने चर्चेत संदेह निर्माण झाले आहेत.
----------
*१००-५० हे उदाहरण आहे. ते १००-८०, १००-६० किंवा १००-४० भरले तरी हरकत नाही.
* *आकडा अंदाजपंचे आहे. कमी-जास्त भरल्यास हरकत नाही. अगदीच १०% वगैरे भरणार नाही असे वाटते.
फार् पूर्वी अग्निपंख वाचलय.
ते अणूशास्त्रज्ञ म्हणून नावाजले जाणे योग्य आहे का?
ते अणुशास्त्रज्ञ आहेत असा दावा त्यांनी स्वतःही केलेला नाही.आग्निपंखमध्ये एका ठिकाणी त्यांनी त्यांच्यावरील प्रशासकीय/म्यानेजमेंटमधील जबाबदारीचा स्पष्ट उल्लेख केलाय.
ते त्या अणुसंशोधन कार्यक्रमात असताना त्यांच्यातील एका वरिष्ठाने त्यांचे गुण हेरुन त्यांना बढती दिली. व सांगितल की "इतर छोट्या छोट्या गोष्टींचा तपशील सहकार्यांवर सोडलात तरी चालेल. इथे काम करणारे तज्ञ/स्पेशालिष्ट आहेत. तु तुझं लक्ष मुख्यतः कार्यक्रम/प्रोजेक्ट च्या उर्वरीत भागाकडे ठेव, त्याच्या प्रशासकीय भागाकडे राहु दे.
जसे की ह्या वेगवेगळ्या तज्ञ लोकात सुसंवाद असणं गरजेच आहे, कार्यक्रमाच्या रूपरेखेवर सुसूत्रीकरणावर ध्यान देणं जरुरीचं आहे. त्याशिवाय हा प्रोजेक्ट् दिलेल्या अवधीत व ठराविक रकमेतच पूर्ण झाला तर इतर मोठ्या प्रोजेक्टसना अधिक आर्थिक पाठबळ मिळेल. "
हे त्यांनी लख्खपणे आणि थेट अग्निपंख मध्ये दिलय. त्यांच्या बॉसचं नाव् विसरलो. ते त्यांचे प्रेरणास्थान वगैरे होते म्हणे.
ह्या आख्ख्या जबाबदारीत कुठेही अणुतंत्रज्ञानातील सखोल ज्ञानी/तज्ञ आहेत हे ध्वनित होत नाही. उत्तम ऍडमिनोस्ट्रेटर/प्रशासक मात्र नक्कीच असावेत, म्हणुन बढती मिळाली.
अजुन एकः-
मागे एक् दीड वर्षापूर्वी(भारत-अमेरिका अणुकरार होण्याच्या काळात) वृत्तपत्रांमध्ये इस्रो, भाभा संशोधन केंद्र वगैरे ठिकाणच्या शास्त्रज्ञात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.
भारताला अजुनही अनेक अणुचाचण्यांची गरज् कशी आहे हे ते शास्त्रज्ञ शंख करुन सांगत होते. भारताचा अणुकार्यक्रम् आणि आण्विक सिद्धता पाश्चात्त्यांच्या तुलनेतच काय, तर् चीन-पाक ह्यांच्याही तुलनेत बाल्यावस्थेत आहे असं काहिसं ते म्हणत होते. त्यांचा प्रतिवाद करत कलामांनी हा करार तितकासा वाइट नाही वगैरे विधानं केली.
दुसर्या गटाने मग् थेट त्यांच्या त्या विषयातील ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उभं केलं.
नंतर एका रात्रीतच एकाएकी हा वाद मिडियातुन गायब झाला. कुणी म्हटलं वाद संपला. कुणी म्हटलं वाद् घालणारे संपले(किंवा यथाशक्ती सुमडी सुमडीत भारतीय सत्ताधार्यांकडुन किंवा अमेरिकेकडुन संपवले जातील ).कुणी म्हटलं त्या करारातल्या अटी भारताला अनुकुल करण्यासाठी भारत सरकारनच(किंवा इस्रो, भाभा संशोधन् केंद्र वगैरेंनी) ठरवुन हा "प्लॉट" घडवुन आणला. खरं खोटं ठाउक नाही, पण वाद अणू पोटात शिरुन गुप्त व्हावा तसा झाला.
यातुन एक नक्कीच कळलं की स्वतः कलाम थेट दावा करत नसले, तरी अणु कार्यक्रमाबद्दल अधिकारवाणीनं बोलतात.
पृथ्वी व अग्नी ही क्षेपणास्त्रे यशस्वी आहेत का?
कल्पना नाही. माहित नाही. पण त्याच्या तुलनेत चीनकडे कितीतरी अधिक क्षेपणास्त्र सज्जता आहे. भारत त्याच्या जवळपासही नाही.
तुलनात्मकदृष्ट्या, सैन्यशक्तित बरोबरीसाधण्याइतकाच निकष असेल तर, पृथ्वी व अग्नी यशस्वी नाहित*. पण निकष इतरही असावेत असं वाटतं.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्तक दिनाला मात्र ही क्षेपणास्त्र का ह्यांची कुठलीतरी भावंडं सैन्याच्या परेडमध्ये डौलानं मिरवली जातात.
ते भंपक आहेत का?
का बुवा? असं का म्हणताय? म्हणजे, माध्यमं त्यांचा डिंडिम जरा अतिच वाजवताहेत हे खरही असेल. पण उगाच हा माणुस भंपक/जोकर आहे असं कशाला म्हणा?
म्हणणार्यांचं स्वतःच्या क्षेत्रातलं कर्तृत्व काय? कलामांचं त्यांच्या क्षेत्रात आहे त्याइतकं तरी आहे काय? स्वतः सुमार कारकुनी/मजुरी व्यवसाय करायचा आणि बेछूट विधानं ठोकायची ही अशी फ्याशन आंतरजालावर होउ लागली का काय अशी भीती वाटते.
देशाचा राष्ट्रपिता लुच्चा/आड्मूठ होता. सावरकर एककल्ली होते, खुनशी आणि अधुनमधुन बिनडोकही होते. क्रांतिकारक काय तावातावात स्वतःचा विनाश करणारे आततायी तरुण होते. एक छत्रपती सोडले तर कुणाचीच सालटी काढायचं आणि त्याला नालायक ठरवायचं ह्यांनी (म सं) सोडलं नाही. भरीला भर शिवाजी "तुमचे का आमचे" असाही वाद आडुन आडुन सुरु असतोच. असली विधानं कशी काय् केली जाउ शकतात ह्याचं आश्चर्य वाटतं. चुकुन कधी मधी सचिन कमी धावांवर् बाद झाला की लगेच "कल-तक्" का कुणाचा तरी "क्रिकेट एक्सपर्ट" म्हणुन साबा करीम, अतुल वासन, साइराज बहुतुले,निखिल चोप्रा ही मंडळी "सचिनच्या ब्याटिंगमधील तांत्रिक दोष " ह्यावर मोठंमोठ्या गप्पा झोडत सचिनला अक्कल शिकवतात तसच वाटलं.
ते जोकर आहेत का?
नक्कीच नाहित. त्यांचं कुठलही लिखाण वाचताना(अग्निपंख, त्यांची तरुणांना जाहिर आवाहनं आणि भाषणं ह्यांचा) कंटाळा मलाही येतो. कशाचा पायपोस कशात आहे तेही समजत नाही. मध्यम वर्ग उगाच त्यांना "अणु-मानव" ,"मिसाइल मॅन" म्हणत अनावश्यक तारिफ करत सुटतो, हे ही पटत नाही.
पण म्हणुन त्यांना जोकर सुद्धा म्हणवत नाही.
--मनोबा
* संदर्भः आउटलूक नियतकालिकालिचा स्वातंत्र्यदिन विशेषांक व वेळोवेळी ऐकलेली दबक्या आवाजातील सैन्याधिकार्यांची चर्चा, संरक्षण मंत्र्यांचा गर्भित इशारा.
सतिश धवन
अग्निपंख खूप पूर्वी वाचलं होतं. पण हे सतिश धवन असावेत.
अभिजित यादव
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
अग्निपंख
उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
त्यांनी लिहिलेली पुस्तके मी वाचली नव्हती. तुम्ही लिहिलेल्या माहितीमुळे माझ्या माहितीत भर पडली आहे.
कल्पना नाही. माहित नाही. पण त्याच्या तुलनेत चीनकडे कितीतरी अधिक क्षेपणास्त्र सज्जता आहे. भारत त्याच्या जवळपासही नाही.
चीनपेक्षा मला जाणवले ते म्हणजे उत्तर कोरिया कडे (आणि त्यामुळे पाकिस्तान कडे) यापेक्षा किंवा याच दर्जाची क्षेपणास्त्रे आहेत. याशिवाय इराणही या क्षेत्रात वेगाने पुढे जात असल्याचे जाणवते.
म्हणणार्यांचं स्वतःच्या क्षेत्रातलं कर्तृत्व काय? कलामांचं त्यांच्या क्षेत्रात आहे त्याइतकं तरी आहे काय? स्वतः सुमार कारकुनी/मजुरी व्यवसाय करायचा आणि बेछूट विधानं ठोकायची ही अशी फ्याशन आंतरजालावर होउ लागली का काय अशी भीती वाटते.
म्हणणार्यांचा दर्जा काढणे हे अयोग्य नाही. पण कमी दर्जाच्या माणसांनी जास्त दर्जाच्या माणसांची परिक्षणे करू नयेत हे म्हणणे चुकीचे वाटते. बरेचदा अशी परिक्षणे (उदा. मुरली बॉल फेकतो.) मोलाची असतात.
प्रमोद
माझे मत
"नावाजले जाणे" दुय्यम, पण त्यांच्या अणू-ज्ञाना बद्दल माझे जे ज्ञान आहे त्याप्रमाणे तरी ते किमान शास्त्रज्ञ आहेत हे नक्की.
काही चाचण्या अयशस्वी झाल्या ही काही क्षेपणास्त्राच्या यशस्वीपणाची चाचणी नाही, बाकी क्षेपणास्त्राबद्दल विशेष ज्ञान नसल्याने अधिक सांगणे आवघड.
प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकजणच काही अर्थी भंपक असू शकतो.
जोकर बऱ्यापैकी नियमितपणे हसविणारा असतो, तसे त्यांचाकडे बघून होत नाही. उगाच का जोकरची व्याख्या बदला.
निराशा
चर्चाप्रस्ताव निराशाजनक आहे. प्रमोद सहस्रबुद्धे यांची उपक्रमावरली वाटचाल अशी नव्हती पण चुकीच्या गोष्टींवर पांघरूण घालण्याच्या प्रयासात जर त्यांचा वेळ वाया होणार असेल तर खेदजनक आहे.
मला वाटेल. मागे एकदा यनांवर कुणीतरी साहित्य चोरीचा आरोप केला होता तेव्हाही मी जाहीर खेद नोंदवला होता. चुकीच्या गोष्टींचा खेद वाटत नसेल तर भंपकपणा सर्वत्र नांदतो का काय अशी शंका येते. इथेही कलामांना जोकर म्हटल्यावर लोकांनी तेच केले. कलामांना जोकर म्हणणे योग्य का अयोग्य ही काही न उमगणारी गोष्ट नाही तरीही स्वतःला विवेकवादी समजणार्यांना कलामांना जोकर म्हणणे हे योग्यायोग्य आहे हे माहित नाही हे विधान पटले नाही.
लोकांना भविष्याकडे बघण्यासाठी एक बाबा हवा असतो. त्यात कलामांचा जोकरपणा किंवा भंपकपणा सिद्ध होत नाही.
ती वापरात असतील तर यशस्वी. वापरात नसतील काही चाचण्या फसल्या असतील परंतु तरीही प्रोग्रॅम सुरू ठेवायचे निश्चित झाले असेल तरी यशस्वी.
ते आपल्या सर्वांसारखेच आहेत.
त्यांच्या सर्कशीचे नाव, प्रसिद्धी, त्यांची हशा घेणारी भूमिका, उत्पन्न वगैरे कळवा. मत नोंदवता येईल. वरचा लेख पुरेसा वाटला नाही.
एकंदरीत बाकीचे काही नाही तरी ही चर्चा नक्कीच भंपक आहे. वर धक्का यांनी म्हटले तरीही तिला काढून टाकायची गरज नाही पण मनावर घ्यायचीही गरज नाही. सहस्रबुद्धे हे अतिशय चांगले लेखन करू शकतात. हे त्यातले लेखन नव्हे.
उद्या कलाम म्हणजे जोकर म्हणजे विदूषक असे त्यांना म्हणायचे नसेल. जोकर गम/पेस्ट/ खळणीचा ते संदर्भ देत होते अशी चर्चा आली नाही म्हणजे मिळवली. ;-)
चूक आणि बरोबर
मुळात इथे चूक काय आणि बरोबर काय हे कसे ठरवता येईल?
तो साहित्य चोरीचा आरोप होता. आणि तो चुकीचा होता हे सप्रमाण सिद्ध करता येण्यासारखे होते. इथे कलामांवर कुणी आरोप केलेला नाही. त्यांच्याबद्दल मते मांडली आहेत. एखाद्या मताबाबत आपण फारतर नाराजी व्यक्त करू शकतो किंवा त्या मताचा निषेध करू शकतो.
कमीजास्त प्रमाणात सगळी माणसे भंपक असतात किंवा भंपकपणा करीत असतात असे तुम्हाला कदाचित तुम्हाला म्हणायचे असावे. ह्याबाबतीत वेगळी चर्चा करता येईल. पण सगळीच माणसे सार्वजनिक नसतात. राष्ट्रपती नसतात. त्यामुळे स्कॅनरखाली नसतात. कलामांची अनेक भाषणे, वक्तव्ये उपलब्ध आहेत. ती वाचून टीकाटिप्पणी होणारच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चूक/बरोबर.
कलामांना जोकर म्हणणे हे बरोबर कसे ते सिद्ध करणारा पुरावा अद्यापही आलेला नाही तेव्हा एखाद्या माणसाबद्दल तोंड सोडून बोलणे हे मला चुकीचे वाटते.
तोंड सोडून वाट्टेल ते बोलणे हा प्रकार येथे आहे. त्यात बिनबुडाचे आरोपही आले आणि अतिरेकी, वाह्यात मतेही आली. या मतांबद्दल नाराजीच लोकांनी व्यक्त केलीत. तुम्हीही केलीत आणि मीही केली. विषय तिथेच संपायला हवा होता पण तसे झाले नाही. जोकर नाही तर मग भंपक तरी...
सगळी माणसे सार्वजनिक नसतात. उपक्रमी सार्वजनिक आहेत म्हणून आपल्यासारखे असे म्हटले. उपक्रमींचा भंपकपणाही दिसला म्हणूनच टिप्पणीही केली. कलामांच्या भाषणांवर टीकाटिप्पणी करणे हा या चर्चेचा विषय नाही आणि तेवढा या चर्चेचा जीवही नाही. ती वेगळी चर्चा करावी.
ही चर्चा बहुधा जोकर म्हणून विकत घेता येत नाही तर भंपक म्हणून तरी खरेदी करा यावर आहे असे वाटते. चू. भू. दे. घे.
सभेतला संचार
तोंड सोडून बोलणे हा मुद्दा आहे. सभेतला संचार कसा असायला हवा (किंवा सभ्य म्हणजे काय?) ह्यावर वेगळी चर्चा व्हायला हवी.
उपक्रमावर राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रसिद्ध नटनट्या, प्रसिद्ध खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्ती वावरत असल्यास माहीत नाही.
मला असे वाटले नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सार्वजनिक
सार्वजनिक होण्यासाठी फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रसिद्ध नटनट्या, प्रसिद्ध खेळाडू होण्याची गरज नाही. बाजूच्या "प्रसिद्ध" संकेतस्थळाचा वापरही आपण टीका टिप्पणीसाठी करतोच ना. तेही उपक्रमाचे नाव टीकेटीप्पणीसाठी वापरतात. किंबहुना, उपक्रमींचे नाव आणि त्यांच्या सह्याही वापरतात. ;-) तेव्हा उपक्रमी, त्यांची वक्तव्ये हे सार्वजनिकच ठरावे.
अर्थातच, उपक्रमाच्या धोरणानुसार उपक्रमींवर वैयक्तिक रोखाची टीका केलेली चालत नाही.
कै च्या कै
उपक्रमावर लिहितो म्हणून आपण भारताच्या राष्ट्रपतींच्या पंक्तित बसण्याइतके सार्वजनिक होतो का? आपण सगळेच भंपक आहोत, सगळेच सार्वजनिक आहोत, सगळेच फ्रॉड आहोत असा दावा करता येईल पण त्याची डीग्री किती आहे हे नको का लक्षात घ्यायला. उपक्रमावर भंपक मते मांडणे आणि राष्ट्रपती पदावरुन भंपक भाषणे देणे /फ्रॉड बाबांबरोबर फोटो काढणे ह्या दोन्हीचा इफेक्ट एकंच असतो का?
कलाम ह्यांना जोकर म्हंटल्याला तुमचा आक्षेप आहे. पण मग सत्यसाईला फ्रॉड म्हंटल्याला का नाही? सत्यसाई हे सुद्धा लाखो भारतीयांचे (कलाम चाचा इन्क्लुडींग) श्रद्धास्थान आहेत. अशा प्रसिद्ध महापुरुषाला फ्रॉड किंवा इतर जी काही शेलकी विशेषणे वापरली आहेत त्यावर तुमचा आक्षेप का नाही? कलाम चाचा तुमचे आवडते म्हणून त्यांना काही म्हणायचे नाही पण सत्यसाई तुमच्या फेवरीट लिष्टवर नाही म्हणून झोडपलेले चालते असे काही आहे का?
कै च्या कैच
असे मी म्हटलेले नाही. उलट सार्वजनिक होण्यासाठी फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रसिद्ध नटनट्या, प्रसिद्ध खेळाडू होण्याची गरज नाही असे मी म्हटले आहे.
मी तरी सर्वांना एका पंक्तित बसवले नाही. वेगवेगळ्या पंक्तीप्रमाणे त्यांना बसवण्यास मला प्रत्यवाय नाही. कमी जास्त सार्वजनिकपणा मला मान्य आहे.
सत्यसाईंचा फ्रॉड विभूतीपासून त्यांच्या संस्थेतील घोळ हे प्रसिद्ध आहे. त्यांनी हातातून घड्याळे काढणे वगैरे सारखे चमत्कार त्यांना फ्रॉड म्हणवू शकतात. कलामांचा जोकरपणा अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यांना जोकर म्हटल्याला तुम्हीही आक्षेप घेतल्याचे आठवले आणि सत्यसाईंना फ्रॉड म्हटल्याला तुमचाही आक्षेप नव्हता. तेव्हा तुम्ही-आम्ही एकाच होडीत.
कलाम चाचा माझे आवडते आहेत असे ही मी म्हटलेले नाही तेव्हा या वाक्याला अर्थ नाही.
विवेकवाद्यांनी विवेकाने विचार करावा ही विनंती.
खुलासा: मी वर यनांवरील आरोपांवर आक्षेप घेतला होता. मागे विवेकानंदांना निर्बुद्ध का काहीसे म्हणण्याला आक्षेप घेतला होता. यना चच्चा आणि विवेकानंद चच्चा माझे आवडते नाहीत हे ही येथेच सांगते.
प्रति
धन्यवाद
प्रसिद्ध असणे म्हणजे 'सिद्ध' होणे का? सत्यसाईबाबांचा फ्रॉडपणा कुठे सिद्ध झाला आहे हे कृपया दाखवुन द्या.
मी कुठेही ह्यावर आक्षेप घेतलेला नाही. माझे सध्याचे मत 'जोकर' असे नाही, इतकेच म्हंटले आहे. कुणाचे तसे असल्यास माझा त्यावर आक्षेप नाही. 'माझा आक्षेप आहे' हा निष्कर्ष तुम्ही कसा काय बॉ काढलात?
ते वाक्य नाही तो प्रश्न आहे. तुम्ही तसे म्हंटलेले नाही म्हणूनच प्रश्न विचारला आहे.
साद
प्रसिद्ध असणे म्हणजे सिद्ध होणे असे नसले तरी सत्यसाईबाबाच काय दुसरी कोणतीही व्यक्ती हातातून विभूती काढत नाही हा कॉमन सेन्स आहे. बाबांचा फ्रॉडपणा सिद्ध करण्याचे उद्योगही झालेले आहेत. पी. सी. सरकार ज्यु. यांनी ते समर्थपणे केल्याचे आठवते.
ठीक. मी अगदी मागची चर्चा जाऊन तपासली नव्हती म्हणून आक्षेप हा शब्द मागे घेते.
ठीक. कलामचाचा हे तुमचे आवडते आहेत हे विधान आहे. प्रश्न पुढे येतो तरीही मी इनफ खुलासा केला आहे. अगदी यना आणि विवेकानंदांच्या बाबतीतही. यापुढे कलाम, यना आणि विवेकानंद आणि कदाचित पुढे कधी चुकून तुमची बाजू घेण्याची वेळ आली तरी तुम्हीही माझे आवडते चच्चा नाही हा ही खुलासा करून टाकते. - ह. घ्या.
अभ्यास
अभ्यास वाढवा हो डार्क मॅटर साहेब.. थोडासा गुगल-युट्युब शोध घेतलात तर दिसेल तुम्हाला.
-Nile
हं
युट्युब विडियो म्हणजे 'सिद्ध' झाल्याचा पुरावा असतो काय? ते फ्रॉड आहेत तर त्यांच्यावर कुठल्या न्यायालयात कुठल्या कलमा अंतर्गत शिक्षा झाली ते दाखवुन द्या.
अहं
गरज नाही. एखादी व्यक्ती फ्रॉड आहे का हे कळायला दरवेळेला कलमांतर्गत शिक्षाच व्हायला हवी ही पूर्वअट असण्याची गरज आहे हे सिद्ध करा बरं आधी.
याबद्दलचे युट्युब व्हिडिओ बघुन कॉमनसेन्स असलेल्या व्यक्तीला सत्यसाईबाबा फ्रॉड आहेत हे ज्ञान व्हावे.
-Nile
काँमनसेन्स
कॉमनसेन्स वर आले का आता सगळे. बरं बरं!
तोच कॉमनसेन्स कलामचाचांना लावायचा नाही हां खरं!! ह्यालाच श्रद्धा म्हणतात.
नेहमीचं
आम्ही वरती लिहलेला प्रतिसाद वाचलेला दिसत नाही वाटतं? यालाच दुसर्याबद्दल् अंधश्रद्धा ठेवणे म्हणतात.
आम्ही कॉमनसेन्सवर नेहमीच असतो, हे ही कुठल्या कोर्टात सिद्ध करावे लागणार का आता?
-Nile
प्रतिसाद
मोकळेपणाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चर्चाप्रस्ताव निराशाजनक आहे. प्रमोद सहस्रबुद्धे यांची उपक्रमावरली वाटचाल अशी नव्हती पण चुकीच्या गोष्टींवर पांघरूण घालण्याच्या प्रयासात जर त्यांचा वेळ वाया होणार असेल तर खेदजनक आहे.
असे होते. दरवेळेला चांगलेच दिले जाऊ शकत नाही. (अवांतर. आतापर्यंत इथे फार काही चांगले लिहिले असे वाटत नाही.)
मला वाटेल. मागे एकदा यनांवर कुणीतरी साहित्य चोरीचा आरोप केला होता तेव्हाही मी जाहीर खेद नोंदवला होता. चुकीच्या गोष्टींचा खेद वाटत नसेल तर भंपकपणा सर्वत्र नांदतो का काय अशी शंका येते. इथेही कलामांना जोकर म्हटल्यावर लोकांनी तेच केले. कलामांना जोकर म्हणणे योग्य का अयोग्य ही काही न उमगणारी गोष्ट नाही तरीही स्वतःला विवेकवादी समजणार्यांना कलामांना जोकर म्हणणे हे योग्यायोग्य आहे हे माहित नाही हे विधान पटले नाही.
एकंदरीत बाकीचे काही नाही तरी ही चर्चा नक्कीच भंपक आहे. वर धक्का यांनी म्हटले तरीही तिला काढून टाकायची गरज नाही पण मनावर घ्यायचीही गरज नाही. सहस्रबुद्धे हे अतिशय चांगले लेखन करू शकतात. हे त्यातले लेखन नव्हे.
जोकर म्हणण्यात हसवणारा ह्या सकारात्मक दृष्टिकोनापेक्षा कमी बुद्धिमत्तेचा या नकारात्मक अर्थाचा भास होतो. रिटेंच्या मूळ वाक्यात साईबाबांबरोबर जाणारा कमी बुद्धिमत्तेचा (दरबारातला इडियट) (म्हणून जोकर) असा भास मला जाणवला.
सत्यसाईबाबांच्या भक्तात हुशार,जाणकार, नावाजलेला कुणी असेल तर त्यात अब्दुल कलामांचे नाव वरचे येते. सत्य साईबाबांचे फ्रॉड कॅमेराबद्ध आहे. तसेच पी.सी सरकार् (ज्युनियर) यांनीही सांगितले आहे. अब्दुल कलामांसारख्याना हे माहित नसणे वा माहित असल्यावरही बाबांचे भक्त होणे यात कुठेतरी कमी बुद्धिमत्तेचा वास येतो.
या विषयावर लिहिणार्यांनी केवळ त्यांच्या लौकिक कर्तबगारीवर विश्वास ठेऊन निषेध केला. पण मूळ प्रश्नाचा निचरा केला नाही. मी माझ्या परीने शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो या पारड्यात का त्या पारड्यात असा अंतिम निर्णयात्मक आला नाही. इतरांकडून मदत मिळेल ही अपेक्षा आहे. (मिळते आहे.)
यनांवरील आरोप चुकीचा होता. त्यामुळे त्या प्रतिसादाशी या गोष्टीचा संबंध नाही. तसेच कुठलीतरी व्यक्ति चर्चाकरण्याच्या पलिकडची आहे असे काही इतर धाग्यातील इतर (तुमच्या नव्हे) प्रतिसादातून जाणवले. हे मला पटत नाही. माझ्या मते अशी चर्चा नाकारणे यात अप्रगल्भता दिसते.
प्रमोद
???
"अब्दुल कलामांसारख्याना हे माहित नसणे वा माहित असल्यावरही बाबांचे भक्त होणे यात कुठेतरी कमी बुद्धिमत्तेचा वास येतो"
अब्दुल कलाम हे बाबांचे भक्त आहेत असं त्या फोटोवरून सिद्ध होत नाही आणि तसं कुठे वाचनातही आल्याचं स्मरत नाही. हे छायाचित्र कुठल्यातरी कार्यक्रमात घेतल्याचं स्पष्ट आहे. अशावेळी जवळ कोणी ज्येष्ठ व्यक्ती असल्यास अभिवादन करणे हि आपली संस्कृती आहे. कलामांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले असते तर "भक्त आहेत" असं मानण्याला जागा होती पण तसेही दिसत नाही. सबब त्यांना "जोकर" म्हणण्यासाठी तो सबळ पुरावा होऊ शकत नाही. आणखी काही पुरावे असतील तर द्या नाहीतर अशील आणि वकील दोघांनाही नाईलाजाने "फ्रॉड बरोबर जोकर फुकट" असेच म्हणावे लागेल.
हे खरेच
तुम्ही बोलता त्यामधे तथ्य असू शकते. अधिक माहिती मिळवली पाहिजे.
सत्यसाईबाबा यांचे कार्यक्रम बहुदा त्यांच्या पुढाकारात होत असतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी दोघेही चुकून भेटले असे वाटत नाही. अर्थात सत्यसाईबाबांच्या कार्यक्रमाला गेले म्हणजे अब्दुल कलाम भक्त होत नाही हे देखिल खरे.
प्रमोद
+१
आणि सत्य साई यांनी बरीच चांगली कामे केली आहेत (धर्म्शाळा, रूग्नालये, शाळा बांधने इ. साठी पैसा पुरवणे (पैसा ट्रस्टातीलच असेल.))
कलाम म्हणतात : -
I admire Bhagwan Satya Sai Baba for his selfless work and contributions to the welfare of the people by providing drinking water for the rural population, free healthcare facilities for the rural poor and free higher education.
(दुवा)
असो, सत्य साई बद्दल आपुलकी दर्शवत नाही आहे इथे.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
प्रतिसाद
हा प्रतिसाद मी आधी पाहिलाच नव्हता. असो.
नाही हो. जोकर कमी बुद्धीमत्तेचा नसतो हे मी वर म्हटले आहेच. हास्यास्पद किंवा हसू आणणारा मनुष्य याच दृष्टीने इतरांनी पाहिले असावे असे वाटते. (निदान मी तरी). कमी बुद्धीमत्तेच्या माणसासाठी ढ, हलका, मठ्ठ असे शब्द बाहेर येतात तर जोकर हा हसू आणणार्या व्यक्तीसाठी.
ते बाबांचे भक्त आहेत का? त्यांच्या सामाजिक कार्याचा त्यांनी गौरव केल्याचे आठवते. त्यावरून ते भंपक असतील (म्हणजे बाबांचे कार्य फ्रॉड नसेलही पण त्यांचे चमत्कार वगैरे माहित असताना देखील वाहवा करणे वगैरे) पण ते भक्त आहेत का?
नाही तसे नसावे कारण कलामांनी जोकरपणा केल्याचे माहित नाही. शोधून सापडले नाही तेव्हा तुम्हीच पुरावे द्या अशी मागणी करण्यात आली. मूळ प्रश्न हा प्रश्नच नव्हता. उगीच उभे केलेले भूत त्याचा निचरा काय करायचा?
जशाप्रकारे यनांवरील आरोप चुकीचा आहे त्याच प्रकारे अनावश्यकरित्या एखाद्याला शेलक्या विशेषणांनी जाहीर मंचावर संबोधणे, विशेषतः तसे सिद्ध करण्यास कोणताही पुरावा नसताना - हे देखील चुकीचेच आहे.
चर्चा नाकारण्यात अनेकदा प्रगल्भता असते असेही मला वाटते पण तो वेगळा विषय आणि वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळी स्ट्रॅटेजी वापरावी लागते म्हणून पण ते इथे नको.
जोकर
मला वाटते बुद्धिमान जोकर ही कॉम्प्लिमेंट आहे. (गुड सेन्स ऑफ ह्युमर) या उलट जोकर नावाची व्यक्ति (जोकर म्हटले की मला सर्कशीतला आठवतो) आपल्या बावळटपणाने विनोद निर्मित करत असतो. बहुतांशाने हा बावळटपणा व्यावसायिक असतो. मात्र याच बावळटपणाला जोकर म्हणून शिविगत उल्लेख केला जातो.
रिकामटेकडा यांनी त्यांचा जोकर म्हणून का उल्लेख केला आणि काय अर्थाने केला हे मला माहित नाही. त्यांच्या वतीने मी पुरावे देण्याचा प्रश्न देखिल मनात आला नाही. कदाचित तुम्ही माझ्याकडून पुरावे मागितले नसतील.
माझ्या मनात या विषयावर वाचण्याचे आले. थोडे फार वाचले. ते इतरांना सांगितले. त्यांची मते आजमावली. एवढेच काय ते फलित.
अब्दुल कलाम बाबांचे भक्त आहेत हे फोटोवरून सिद्ध होत नाही. (दुसर्या प्रतिसादात याबद्दल लिहिले आहे.) इतर कुठले पुरावे माहित नाहीत. आता सत्यसाईबाबांचे देहावसान झाल्यावर कदाचित अधिक माहिती मिळू शकेल.
प्रमोद
माझी उत्तरे
नाही. पण लोकांचा असा समज झाला आहे खरा.
पृथ्वी व अग्नी ही क्षेपणास्त्रे यशस्वी आहेत का?
ह्या दोन्ही क्षेपणास्त्रांना संमिश्र यश मिळालेले आहे असे दिसते.
मोठ्या अधिकारपदावरच्या अनेकांना मला प्रत्येक विषयावर बोलण्याची, भाष्ये करण्याची पदसिद्ध अधिकारवाणी आली आहे असे वाटत असते. त्यांना आव आणत काँडिसेंड करण्याची सवयही लागते. (काही जण अधिकारपदावर नसतानाही असे करू शकतात.) विनम्रताही ते अफोर्ड करू शकतात. आणि भारतीयांना मोठ्या अधिकारपदावरच्या (मोठ्या डिग्र्या, गोरी चमडी, मोठी युनिवर्सिटी वगैरे वगैरेंचाही ह्यात समावेश करता येईल) लोकांसमोर नतमस्तक होणे आवडते.
नाही. जोकर वाटत नाहीत. ते अमरसिंहछाप शेरमारू नाहीत. किंवा लालूसारखी नौटंकीही करीत नाहीत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दोन पैसे
मी कलामांची भाषणे ऐकलेली नाहीत. त्यांचे लेखन वाचलेले नाही. त्यांच्याविषयीचे माझे मत हे निव्वळ माध्यमांतून वाचलेल्या/ पाहीलेल्या माहितीवर आधारीत आहे.
ते अणुशास्त्रज्ञ म्हणून नावाजले जाणे अयोग्य आहे पण हा आपल्याकडील प्रसारमाध्यमांचा दोष असावा. कलाम यांनी अणुशास्त्रज्ञ असल्याचा दावा केला असल्यास ते अप्रामाणिक आहे.
या क्षेपणास्त्रांचे यश सापेक्ष आहे. अमेरिका, चीन यांच्या क्षेपणास्त्रांशी तुलना करता ही क्षेपणास्त्रे अयशस्वी असावीत. पण इतर काही देशांच्या तुलनेत या क्षेत्रात भारताची कामगिरी यशस्वी असू शकेल. भारतातील उपलब्ध तंत्रज्ञान पाहता ही क्षेपणास्त्रे यशस्वी आहेत का याबद्दल मला माहिती नाही.
हे सापेक्ष आहे. सत्यसाईबाबाबरोबर मांडीला मांडी लावून बसणे, नावाआधी डॉ अशी उपाधी लावणे मला पटत नाही. पण त्यावरून कलामांना भंपक म्हणावे इतपत माझी भंपकपणाची व्याख्या रुंद नाही.
सापेक्ष पण मला तसे वाटत नाही. इतर कोणाला वाटल्यास त्याचा निषेध नोंदवावासाही वाटत नाही.
आपल्याकडे अनेक गोष्टींबाबत नको इतका आदर निर्माण केला जातो. शहानिशा केली जात नाही. प्रमोद यांचा लेख तशी शहानिशा केली जावी याविषयी आहे असे मला वाटते.
+१
पूर्ण सहमत! योग्य सारांश मांडला आहे.
शहानिशा ?
अच्छा!
तर तुम्ही खालील व्यक्तींची शहानिशा कराल काय ?
१. सुभाषचंद्र बोस.
२. लोकमान्य टिळक
३. शिवाजी राजे.
३. आपले आई वडील
४. भगतसिंग ... इ.
नाही कराल तर का नाही कराल ?
---------------------
-धनंजय कुलकर्णी
होय
अर्थात. बोस, टिळक, भगतसिंग आणि शिवाजी यांच्या कर्तृत्त्वाची शहानिशा केली जावी असेच मी म्हणेन. बोस यांना हिटलरच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करून स्वातंत्र्यासाठी त्याची सोबत का कराविशी वाटली? हे मला महत्त्वाचे वाटते. टिळकांची सार्वजनिक गणेशोत्सव निर्माण करण्यामागची प्रेरणा काय असावी याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटते. वोल्पर्ट इत्यादींचे लेखन वाचून यामागे काही मुस्लिमविरोधी प्रेरणा असावी असे मला वाटते. शिवाजीबाबत सुरतेच्या लूटेसंदर्भात मला नेहमीच प्रश्न पडतो. भगतसिंगांच्या त्यागामागील प्रेरणा-त्यांची तत्कालीन समाजाविषयी मते ही मला नेहमीच जाणून घ्याविशी वाटतात. या सर्व प्रभृतींविषयी मला आदर आहे व या प्रश्नांच्या उत्तराने त्यात फारसा फरक पडणार नाही. त्यांच्याविषयी-त्यांच्या कार्याविषयी शहानिशा केली जावी असेच मला वाटते. सर्व व्यक्तिंनी परिपूर्ण असावे असे मला कधीच वाटले नाही. या प्रभृतींविषयी कुतूहल असण्याची कारणे माझ्या माणूस स्वतःच्या म्हणून मर्यांदांशी संबंधित आहेत.
माझ्या आई-वडिलांच्या वर्तनाबाबत मी नेहमीच शहानिशा करत आलो आहे. त्यांच्या निर्णयामागील भुमिका समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यापैकी कोणीही आम्ही भावंडे सोडून इतरांना उपदेश केलेला नाही. त्यांच्या मर्यादांची मला पूर्ण जाणीव आहे तसेच त्यांनी ओलांडलेल्या मर्यादांचीही.