अब्दुल कलाम

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर वेगवेगळ्या धाग्यांमधे चर्चा सुरु आहे. त्या चर्चांना थोडी एकसंधता मिळावी म्हणून हा चर्चा विषय.
झालेल्या चर्चेवरून उत्सुकता ताणल्याने थोडी नेट-माहिती वाचली. तत्पूर्वी माझे या विषयावर काही मत होते. ते आता थोडे सुधारल्याचे जाणवते. या चर्चेनंतरही ते सुधारले जावे अशी अपेक्षा धरतो.
चर्चेदरम्यान भारताच्या वैज्ञानिक जगताबद्दल माझी सर्वमान्य नसलेली मते येतील. कोणाला राग आला तर आधिच माफी मागतो.

पहिल्यांदा त्यांचा थोडक्यात जीवन परिचय. जन्म १९३१. शिक्षण बी.एस.सी (फिजिक्स) आणि नंतर एरॉनिटकल इंजिनियरिंग मधे डिप्लोमा. (माहिती बायोग्राफी अब्दुल कलाम असा शोध घेतल्यावर मिळालेली.) डॉक्टरेट बहुदा नसावी. ३० विश्वविद्यालयातून ऑनररी डॉक्टरेट (त्या शिक्षणात गणता येत नाही.) सहसा ऑनररी डॉक्टरेट असल्यावर डॉ असे पूर्वपद लावत नाहीत. त्यानंतर इस्रोमधे मोठा कार्यकाल. एस.एल.वी ३ या भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपकाच्या डायरेक्टरपदी काम. त्यानंतर डीआरडीओ मधे प्रक्षेपणास्त्रांवर काम. त्यात त्यांचा अग्नी व पृथ्वी या दोन क्षेपणास्त्राच्या निर्मितीत आघाडीचा सहभाग होता. हे झाल्यावर दुसर्‍या अणुस्फोटाच्या चाचण्यांमधे सहभाग. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड. या दरम्यान भारताच्या भविष्यकाळासंबंधी भाषणे व लिखाण. विंग्ज ऑफ फायर या लोकप्रिय पुस्तकाची निर्मिती. आणि ठिकठिकाणी विद्यार्थी वर्गाला आणि इतरांनाही उत्साहीत करणारी भाषणे दिली.

भारतात वैज्ञानिक ज्यांना म्हटले जाते त्यात तंत्रवैज्ञानझी (इंजिनियर/टेक्नॉलॉजिस्ट) असतात. अब्दुल कलाम हे देखील तंत्रवैज्ञानिक. त्यामुळे त्यांचे शोधनिबंध फारसे मिळाले नाहीत तर नवल वाटले नाही. मुख्यतः त्यांचे शोधनिबंध मटेरियल सायन्स, कॉम्पोजिटसवर दिसले ते देखील १९७०-८० मधील. त्यांची मुख्य जाणकारी ही अवकाशयान-क्षेपणास्त्र या विषयातली. त्यांना अणुतंत्रज्ञानाचा अनुभव नव्हता. त्यामुळे अणुचाचण्यातील सहभाग हा महत्वाचा मानू नये असे मला वाटले. त्यांच्यामुळे (मुख्यतः भाषणांनी) प्रभावित झालेल्या खूपशा लोकांना मी पाहिले आहे. उल्हसित करणारे भाषण असे त्याचे वर्णन असायचे. भाषणाचा मतितार्थ मात्र फारसा सांगता येत नसे. त्यांचे मुख्य कर्तृत्व एस.एल.वी ३ हे धरले पाहिजे. पृथ्वी व अग्नी या दोन्ही क्षेपणास्त्रात फारसे यश नसावे असे मानण्याला जागा आहे. अजूनही यातील बहुतेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या चालू आहेत.

या तिन्ही (अवकाशयान, क्षेपणास्त्र आणि अणू चाचणी २) गोष्टीमधे त्यांचे वैयक्तिक योगदान किती हे बाहेरील माणसाला कळणे कठीण आहे. त्यांच्या इतर वागणूकीवरून थोडाफार अंदाज बांधला जाऊ शकतो. तिनही संस्थात वैयक्तिक जाणकारी ऐवजी इतर गुणांमुळे बढती व संधी भरपूर मिळते अशा वदंता आहेत. त्यामुळे फक्त मोठ्या पदावर पोचले म्हणून मोठी कामगिरी असे मानण्यास कारण नाही. त्यांच्या बाबतीतचे मोठे उदाहरण म्हणजे अणुचानण्या २ साठी त्यांची नियुक्ति. ही नियुक्ति एक प्रशासक म्हणून जास्त असावी असे वाटणे साहजिक आहे. याशिवाय इतर कारणे ही असू शकतीलच.

इस्रो, डीआरडीओ आणि बार्क (बी.ए.आर.सी.) ही भारतातील प्रमुख नावाजलेली संशोधनकेंद्रे मानली जातात. बर्‍याच वेळा ह्या तिन्ही ठिकाणी 'पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञान' विकसित झाले असे म्हटले जाते. ते तितकेसे खरे नाही. (जसे बार्क मधील अणूभट्या या कॅनडातून आल्या होत्या.) संशोधनाची जेवढी जाहिरात होते तसे परिक्षण फेल्युअर्सचे होत नाही. भारताचा थोरियम प्रकल्प हा त्यातला. प्र्क्षेपणास्त्रांचा भारतीय सेनेतला सहभाग कमी आहे. त्यात फारसे उत्साहवर्धक चित्र नाही असे माझे मत आहे.

अब्दुल कलाम हे उत्तम वक्ते असावेत. (त्यांचे भाषण मी ऐकले नाही.) त्यात करमणूक होत असावी. पण यावरून त्यांना जोकर म्हणणे योग्य की नाही हे माहित नाही. पण कोणी म्हटले तर मला फारसे वाईट वाटणार नाही. त्यांच्या वक्तव्यात भंपकपणा जाणवतो. हे इतरत्र व्यक्त झालेले मत मला मान्य आहे. विशेषतः अणूचाचण्यातील त्यांचा सहभाग मांडण्यात (व त्याला त्यांचा पाठिंबा असण्यात) हा मला विशेष जाणवला. राजकीय हातमिळवणी करणे वगैरेंचे त्यांना वावगे नसावे.

चर्चे साठी खालील बाबतीत मते यावीत असे वाटते.

ते अणूशास्त्रज्ञ म्हणून नावाजले जाणे योग्य आहे का?
पृथ्वी व अग्नी ही क्षेपणास्त्रे यशस्वी आहेत का?
ते भंपक आहेत का?
ते जोकर आहेत का?

प्रमोद

Comments

गफलत

शहानिशा म्हणजे काय हो ?

कलामांबाबत इथे हे जे काही चालू आहे ते आणी तुम्ही आई-वडिलांच्या वर्तनाबाबत जे करता ते सेम आहे का ?

---------------------
-धनंजय कुलकर्णी

गफलत नाही

धनंजय, माझ्या प्रतिसादात गफलत काय आहे हे मला व्यवस्थित समजलेले नाही. माझ्या आई-वडिलांना कुठलेही समाजप्रतिनिधित्वाचे पद भूषवलेले नाही. लांबूनही तसा प्रयत्न केलेला नाही. माझी चिकित्सा हा पूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न आहे.

कलामांबाबत इथे हे जे काही चालू आहे ते आणी तुम्ही आई-वडिलांच्या वर्तनाबाबत जे करता ते सेम आहे का ?

या प्रश्नात कलामांच्या चारित्र्यहननाची काही मोहीम सुरू आहे असे तुम्हाला वाटते असे मला जाणवले. याउलट मला प्रमोद यांच्या लेखातून-प्रतिसादांतून नविन माहिती मिळाली. यात चारित्र्यहननाचा प्रयत्न नसून त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेची शहानिशा करण्याचा प्रयत्न आहे. कलाम हे एक आवडावे असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याविषयी आदर असण्याची विविध कारणे प्रत्येकाकडे असतील. मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. पण त्यांच्या कार्याची-व्यक्तिमत्त्वाची येथे किंवा उपक्रमावर अन्यत्र केलेली शहानिशा-मते ही चारित्र्यहनन या पूर्वग्रहातून आलेली नाहीत, असे मला वाटते. तुम्हाला तसे का जाणवले याविषयी कुतूहल वाटते.

धन्यवाद.

ख.व. मधे बोलूच.

मला शहानिशा , चिखलफेक आणि कुतूहलासाठी केलेली चर्चा (विचार विमर्षे) ह्यात फरक हवा होता.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ...

महाराष्ट्रात अनेक एन.जी.ओज आहेत. पण समाजकार्य म्हटले की आजही आपल्याला आमटे/बंग आठवतात. कितीतरी आय सर्जन्स गावोगाव आहेत. तरीही तात्याराव लहाने 'स्पेशल' असतात. आपापल्या कामात निपुण असणारे कित्येक शास्त्रज्ञ असतील. पण नाव कलामांचेच होते.
असे का होते?
त्यांचा 'पी आर' चांगला असतो, म्हणून?

नाही.
काही माणसांच्या कामालाच मुळात हा 'मानवी चेहरा' असतो. तसा तो कलामांच्या कामालाही आहे. ते जे काही करतात त्यापैकी बरेच काही केले नसते तरी त्यांची मिळकत फारशी बदलली नसती. तरीही त्यांनी हे का केले याला 'करूणा' याखेरीज उत्तर नाही. त्यांना काहीही गरज नव्हती विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची. त्यांना गरज नव्हती तरूणांना महासत्तेची स्वप्न दाखवण्याची. राष्ट्रपती असतांना आणि नसतांनाही सामान्य भारतीय माणसाशी पत्र/ईमेल रूपाने संवाद चालू ठेवण्याचीही गरज नव्हती. आणि अपंगाना चालण्याला सोपे पडावे म्हणून अग्नि मिसाईलच्या पार्टसपासून वजनाने हलके कॅलिपर्स बनवण्याचा उपद्व्याप करायची तर अजिबातच गरज नव्हती.
कलामांच्या बायोडेटाचे डिसेक्शन करतांना हे दिसणार नाही कदाचित. आणि जे दिसत नाही त्यावर विश्वास न ठेवण्याची इथे रित असली तरी या देशातल्या अनेकांना हे दिसले आणि अनुभवायला मिळाले त्याला काय करणार?

रिटेंनी ती पिंक टाकली कारण त्यांना कलामांना मिळणारी प्रसिद्धी (प्रतिभा पाटील इ.च्या तुलनेत)जास्त/ अवास्तव आहे असे वाटले आणि त्यामुळे त्यांचे चारित्र्यहनन प्राधान्याने करावे असा त्यांचा आग्रह दिसला. ती पिंक जेवढी घृणास्पद वाटत नव्हती तेवढे त्या पिंकेला मॉडर्न आर्ट म्हणत सावरून घेण्याचा प्रयत्न करणारे लेख आणि प्रतिसाद हीन दर्जाचे वाटतात.

व्यक्तिपूजा थांबवा

महाराष्ट्रात अनेक एन.जी.ओज आहेत. पण समाजकार्य म्हटले की आजही आपल्याला आमटे/बंग आठवतात. कितीतरी आय सर्जन्स गावोगाव आहेत. तरीही तात्याराव लहाने 'स्पेशल' असतात. आपापल्या कामात निपुण असणारे कित्येक शास्त्रज्ञ असतील. पण नाव कलामांचेच होते.
असे का होते?
त्यांचा 'पी आर' चांगला असतो, म्हणून?

काही केसेसमध्ये 'पीआर' चांगला आहे हेही कारण महत्त्वाचे असते. बाबा आमटे ह्यांनी मोठे काम केले ह्यात वादच नाही. पण त्यांचा पीआर चांगला होता हेही खरेच आहे. तात्याराव लहानेंच्या बाबतीत तसे नाही. (त्यांना मी ओळखतो.) कलामांच्याबाबतीतही पीआर हा गुणही महत्त्वाचा ठरतो. ह्या नव्या जगात पीआर, नेटवर्किंग महत्त्वाचे आहेच.

काही माणसांच्या कामालाच मुळात हा 'मानवी चेहरा' असतो. तसा तो कलामांच्या कामालाही आहे. ते जे काही करतात त्यापैकी बरेच काही केले नसते तरी त्यांची मिळकत फारशी बदलली नसती. तरीही त्यांनी हे का केले याला 'करूणा' याखेरीज उत्तर नाही.
त्यांना काहीही गरज नव्हती विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची. त्यांना गरज नव्हती तरूणांना महासत्तेची स्वप्न दाखवण्याची.

एक्स्ट्रीम उदाहरण देतो. तुमची ती 'करुणा' नसेल त्याच्याकडे पण हिटलरलाही मानवी चेहरा होता. त्यानेही स्वप्ने दाखवली. मोदींनाही आहे. तेही स्वप्ने दाखवत असतात.

राष्ट्रपती असतांना आणि नसतांनाही सामान्य भारतीय माणसाशी पत्र/ईमेल रूपाने संवाद चालू ठेवण्याचीही गरज नव्हती. आणि अपंगाना चालण्याला सोपे पडावे म्हणून अग्नि मिसाईलच्या पार्टसपासून वजनाने हलके कॅलिपर्स बनवण्याचा उपद्व्याप करायची तर अजिबातच गरज नव्हती.

मुद्दा काय आहे तुमचा? ह्या लोकांच्या कार्याची, वावराची चिकित्सा होऊ नये का? पुन्हा तेच. दहावी बारावीच्या निबंधातली वाक्ये कशासाठी?

रिटेंनी ती पिंक टाकली कारण त्यांना कलामांना मिळणारी प्रसिद्धी (प्रतिभा पाटील इ.च्या तुलनेत)जास्त/ अवास्तव आहे असे वाटले आणि त्यामुळे त्यांचे चारित्र्यहनन प्राधान्याने करावे असा त्यांचा आग्रह दिसला. ती पिंक जेवढी घृणास्पद वाटत नव्हती तेवढे त्या पिंकेला मॉडर्न आर्ट म्हणत सावरून घेण्याचा प्रयत्न करणारे लेख आणि प्रतिसाद हीन दर्जाचे वाटतात.

तुमच्या भावना समजू शकतो. पण प्रतिसादात जागोजागी पेरलेली दहावी बारावीच्या निबंधातली वाक्ये तुमच्याकडून अपेक्षित नव्हती.

व्यक्तिपूजा थांबवा. तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

व्यक्तीनिंदासुद्धा थांबवाच !

"..पण त्यांचा पीआर चांगला होता हेही खरेच आहे"

बाबा आमटेंचा आणि कलामांचा 'पीआर' कसा काम करतो यावर एखादा लेख येऊ द्या बरे ! (कदाचित तुम्ही लहानेंना जितके ओळखता तितके यांना ओळखत नसाल..)

हिटलरच्या कामाचा 'मानवी चेहरा' कोणता? मोदींचे यश म्हणत असाल तर तो त्यांच्या नेतृत्वनिपुणतेचा भाग आहे. याशिवाय मोदींनी आऊट ऑफ द बॉक्स काय काम केले आहे? (हे उपहासाने लिहिलेले नाही. खरंच जाणून घ्यायचे आहे.)

मुद्दा काय आहे तुमचा? ह्या लोकांच्या कार्याची, वावराची चिकित्सा होऊ नये का?

'तू जोकर आहेस' ही चिकित्सा नाही. याला हेटाळणी म्हणतात.

दहावी बारावीच्या निबंधातली वाक्ये कशासाठी?

'प्रसाधनगृहात' शोभणारी वाक्ये चालतात. त्यांना डिफेन्डही केले जाते. मग निबंधातली वाक्ये का नकोत? ;)

व्यक्तिपूजा थांबलीच पाहिजे याच्याशी अर्थातच सहमत आहे. त्यामुळेच रिटे यांच्या अभ्यासाबद्दल, ज्ञानाबद्दल, व्यासंगाबद्दल अत्यंत आदर असूनही मी त्यांच्या विधानाचा निषेध करतो.

नक्कीच

हिटलरच्या कामाचा 'मानवी चेहरा' कोणता? मोदींचे यश म्हणत असाल तर तो त्यांच्या नेतृत्वनिपुणतेचा भाग आहे. याशिवाय मोदींनी आऊट ऑफ द बॉक्स काय काम केले आहे? (हे उपहासाने लिहिलेले नाही. खरंच जाणून घ्यायचे आहे.)

त्यावर लिहिता येईल की. पण सवडीने.

'तू जोकर आहेस' ही चिकित्सा नाही. याला हेटाळणी म्हणतात.

जोकर म्हटलेले पटत नाही हे मी तिथे आणि खरडवहीत आधी लिहिले आहेच.

'प्रसाधनगृहात' शोभणारी वाक्ये चालतात. त्यांना डिफेन्डही केले जाते. मग निबंधातली वाक्ये का नकोत? ;)

हाहाहा. ह्यात मुद्दा आहे. पण भावनेचा भर बरा नाही असे वाटते.

व्यक्तिपूजा थांबलीच पाहिजे याच्याशी अर्थातच सहमत आहे. त्यामुळेच रिटे यांच्या अभ्यासाबद्दल, ज्ञानाबद्दल, व्यासंगाबद्दल अत्यंत आदर असूनही मी त्यांच्या विधानाचा निषेध करतो.

नक्कीच. कलाम ह्यांच्याबद्दल जेवढे वाटते तेवढे गांधीच्या बाबतीत लोकांना वाटत नाही हे मात्र खरेच. गांधीना कुणी पुसत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

व्यक्तीपुजा थांबवा ??

अच्छा, मग दगडपुजा सुरू करावी असं म्हणन आहे काय ?

माझ्या मते दगडातल्या देवाची पुजा करण्यापेक्षा उच्च माणसांची पुजा केलेलीच बरी.
भारतात आदर्श ठेवण्यालायक बोटावर मोजण्याइतकी माणसे शिल्लक असताना त्यांच्यावर सुद्धा चिकलफेक चालू आहे. खेद वाटतो.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

ट्याब्लॉइड ऑफ इंडिया

पृथ्वी व अग्नी या दोन्ही क्षेपणास्त्रात फारसे यश नसावे असे मानण्याला जागा आहे. अजूनही यातील बहुतेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या चालू आहेत.

याच्या पुष्ट्यर्थ ट्याब्लॉइड ऑफ इंडियाचा दुवा फारच कमकुवत वाटतो. क्षेपणास्त्र प्रकल्प यशस्वी झाला आहे असेही अनेक दुवे सापडतात. मात्र अशा दुव्यांना 'संशोधनाची जाहिरात' म्हटल्यास इलाज नाही.

Only the U.S., Russia, France, Israel and India have the capability to put in place a ballistic missile defence shield. China is still developing it. It conducted an anti-ballistic missile test on January 11, 2010.

दुसरे असे की भारतीय सेनेतील क्षेपणास्त्रांची नेमकी संख्या, त्यांचे फायदे-तोटे ही सर्व माहिती गोपनीय सदराखाली येत असल्याने ती कुठेही सहजासहजी उपलब्ध असेल असे वाटत नाही. (आपल्याला आतली माहिती असल्यास सांगावे.) त्यामुळे प्रकल्प किती यशस्वी झाला याचे काटेकोर मूल्यमापन कुठेही प्रसिद्ध होईल अशी शक्यता फार कमी वाटते.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

अधिक माहिती

माझ्या माहितीत थोडी खाजगी माहिती होती. पण अशा माहितीला निर्णायक म्हणता येणार नाही. तुमचे दुवे पाहिले आणि तेही निर्णायक नाहीत. टाईम्सची माहिती देखिल तशीच.
त्यामुळे तुमच्याशी सहमती दर्शवतो.

प्रमोद

रिकामटेकडा यांची जबाबदारी

रिकामटेकडा यांनी कलाम हे जोकर असल्याचे एक पिलू सोडून दिले आणि तीन चर्चा सुरू झाल्या. कलाम हे जोकर आहेत अथवा नाहीत याचे पुरावे इतरांनी देण्याऐवजी रिकामटेकडा यांनी द्यावेत असे वाटते.

प्रेरणादायी की भंपक?

अब्दुल कलामांचं वैज्ञानिक म्हणून कर्तृत्व किती उल्लेखनीय आहे याविषयी उहापोह करायला मी समर्थ नाही; कलामांच्या लिखाणाचा आणि विचारांचाही मी फार सखोल अभ्यास केलेला नाही. वरवर पाहता तरी बुद्धिमान वाटणाऱ्या अनेक लोकांकडून त्यांचे संदर्भ 'प्रेरणादायी' म्हणून येतात, त्यामुळे त्यांची काही भाषणं, काही पुस्तकांतले उतारे आणि सुटे उपदेश फक्त वाचले आहेत. ते वाचून झालेलं माझं मत व्यक्त करतो. 'अभ्यास कमी पडतो आहे' असं म्हणायला इथले वाचक समर्थ आहेतच.

उदाहरणादाखल अब्दुल कलाम यांची काही उद्धृतं इथे वाचता येतील.

ज्यांना साधारणतः 'फील-गुड' म्हणता येईल अशा प्रकारची ही विधानं आहेत: तुमची मोहीम साध्य होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे; जलद गतीनं साध्य होणाऱ्या कृत्रिम आनंदापेक्षा अधिक सघन कशाच्यातरी मागे जा; करिअर असो किंवा एव्हरेस्ट, वरपर्यंत पोहोचायला सामर्थ्य हवं; आपण आपल्या ‘आज’ची आहुती दिली तर आपली मुलं अधिक चांगला ‘उद्या’ पाहतील वगैरे वगैरे...

अशा प्रकारची सुभाषितवजा विधानं प्रसवायला (तीही एकविसाव्या शतकात) फार प्रज्ञा किंवा कष्ट लागतात असं मला तरी वाटत नाही. ‘सकाळ’चा सर्वसाधारण वाचक जर प्रातिनिधिक मानला तर अशी विधानं बहुधा डोक्यावर घेतली जातात असंही सहज दिसतं.

‘आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वरानं आपल्या मनांत आणि व्यक्तित्वांत अचाट सामर्थ्य आणि क्षमता साठवल्या आहेत. प्रार्थनेतून त्या विकसित होतात.’ अशा पद्धतीची विधानं पाहिली तर आस्था-संस्कार वगैरे पारमार्थिक वाहिन्यांवर अहोरात्र जे दळण चालू असतं त्याचीच आठवण येते. एकंदर हा सगळा प्रकार भक्तगण गोळा करण्यासाठी असावा असंही वाटू लागतं; आणि तसे ते गोळा झालेले दिसतातही. म्हणजे आपलं ध्येय त्यांना साध्य झालं असावं असं वाटतं. आता यातून लोकांना जगण्याची प्रेरणा मिळत असेल तर त्यात आपण का पडा, असं म्हणून त्याकडे दुर्लक्षदेखील करता येईल.

मग माझ्यापुरता तरी प्रश्न असा उपस्थित होतो की अशा प्रकारचे ‘विचार’ मांडणाऱ्या व्यक्तीला मी एकविसाव्या शतकातला गहन विचारवंत मानावं, किरकोळ विक्रीचे उच्चांक गाठणार्‍या 'सेल्फ-हेल्प' पुस्तकांचा यशस्वी लेखक मानावं की भंपक बुवा/बाबांच्या पंक्तीत नेऊन बसवावं? माझ्यापुरता निर्णय मी घेतलेला आहे. तुमचा घेण्याला तुम्ही समर्थ असालच.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

प्रवास

आधी म्हटल्याप्रमाणे हा सर्व प्रकार रोचक आहे. कसा ते सांगण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करतो. अब्दुल कलाम माझे हिरो वगैरे नाहीत. मी त्यांची पुस्तकेही वाचलेली नाहीत. त्यांचे जे लिखाण वाचले आहे त्यावरून ते काही लोकांना प्रेरणादायी वाटू शकते असे दिसते. मात्र ते भंपक वाटत नाही अशा अर्थाने की ते जे लिहीतात त्यावर त्यांचा विश्वास असला पाहिजे. भंपकतेमध्ये जो आव आणणे अपेक्षित असते तो इथे आहे असे वाटत नाही. मला त्यांचे विचार नाइव्ह वाटतात, भंपक वाटत नाहीत. अर्थात हे सापेक्ष असू शकते याची जाणीव आहे.

पण याहून रोचक इथे जो प्रवास झाला तो आहे. सुरूवात कलाम आणि साई बाबा यांच्या फोटोने. तो फोटो देण्याचे कारण कळले नाही. त्या फोटोवरून फारसे काही सिद्धही होत नाही. ते एखाद्या कार्यक्रमात भेटले असतील. मग त्यांना जोकर म्हटले. का, कोणत्या अर्थाने ते ज्यांनी म्हटले तेच जाणोत, त्यांनी हे स्पष्ट करण्याची तसदी घेतली नाही. त्यात फारसा दम नाही हे लक्षात आल्यावर मग ते खरेच वैज्ञानिक होते का, त्यांची पीएचडी आहे का, क्षेपणास्त्र कार्यक्रमात त्यांचा खरेच सहभाग होता का, तो खरेच यशस्वी झाला का असे प्रश्न यायला लागले. हे सर्व पाहून काही करून कलाम यांना कोणतेतरी हलके विशेषण दिलेच पाहिजे असा हेतू आहे असे वाटते.

शांतता.. मध्ये बेणारे बाईंच्या जागी कलाम उभे आहेत असा क्षणभर भास झाला. ;)

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

साई कैसा चलरेला है

सुरूवात कलाम आणि साई बाबा यांच्या फोटोने. तो फोटो देण्याचे कारण कळले नाही. त्या फोटोवरून फारसे काही सिद्धही होत नाही. ते एखाद्या कार्यक्रमात भेटले असतील.

कलाम बाबांना हॅपी बर्डे म्हणायला निमंत्रणावरून खास पुट्टपर्थीला आले होते. तेव्हाचा हा फोटो आहे. "अरे साई तू इधर! कलामभाई तू किधर? और साई कैसा चलरेला है" अशी ती भेट नक्कीच नव्हती.

शांतता.. मध्ये बेणारे बाईंच्या जागी कलाम उभे आहेत असा क्षणभर भास झाला. ;)

तुमचे वाचन दिसते आहे. पण बे.बाई आणि कलाम ह्या दोहोंत काय साम्य आहे बरे? केशभूषेचे? की असो....

असो. कलामांचे जाऊ द्या. पण होमीपदी हे एक भंपकशास्त्र आहे असे काही जण म्हणतात. तुमचे त्यावर काय मत आहे तेवढे सांगा. तुमच्यावर असल्या प्रश्नाचा काहीच फरक पडत नसतो हे माहीत असल्याने विचारतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुख्य

असो. कलामांचे जाऊ द्या.

चर्चेचा मुख्य मुद्दा कलाम असताना ते कसे जाऊ द्या? मुद्दे नसतील तर तसे सांगा.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

पुन्हा एकदा

सुरूवात कलाम आणि साई बाबा यांच्या फोटोने. तो फोटो देण्याचे कारण कळले नाही. त्या फोटोवरून फारसे काही सिद्धही होत नाही. ते एखाद्या कार्यक्रमात भेटले असतील.

कलाम बाबांना हॅपी बर्डे म्हणायला निमंत्रणावरून खास पुट्टपर्थीला आले होते. तेव्हाचा हा फोटो आहे. "अरे साई तू इधर! कलामभाई तू किधर? और साई कैसा चलरेला है" अशी ती भेट नक्कीच नव्हती.

शांतता.. मध्ये बेणारे बाईंच्या जागी कलाम उभे आहेत असा क्षणभर भास झाला. ;)

तुमचे वाचन दिसते आहे. पण बे.बाई आणि कलाम ह्या दोहोंत काय साम्य आहे बरे? केशभूषेचे? की असो....

हे नीट वाचा. आणि पळवाट न काढता शक्य झाल्यास उत्तर द्या.

असो. कलामांचे जाऊ द्या. पण होमीपदी हे एक भंपकशास्त्र आहे असे काही जण म्हणतात. तुमचे त्यावर काय मत आहे तेवढे सांगा. तुमच्यावर असल्या प्रश्नाचा काहीच फरक पडत नसतो हे माहीत असल्याने विचारतो आहे.

ह्याचे उत्तर ऑप्शनल आहे असे समजा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कॉन्स्पिरसी थियरी

हा कॉन्स्पिरसी थियरीचा भाग नाही असे माझ्यापुरते सांगतो.
पण ज्याला कॉन्स्पिरेटर म्हणून गणले जाते त्याच्या इन्काराने काहीच सिद्ध होत नसावे :)
प्रमोद

 
^ वर