हे रामदेव नक्की कोण?
रामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत. भ्रामरी, कपालभाती, अनुलोम, विलोम आदी प्राणायमप्रकारांबद्दल माहिती आणि प्रात्यक्षिके देत असत. हे योगशिक्षक नंतर हळूहळू इतिहासतज्ज्ञ झाले आणि इतिहासावरही बोलायला लागले.(गौरवशाली इतिहास ते ब्रिटिशांची गुलामगिरी वगैरे वगैरे...) कालांतराने ते भाषाशास्त्राचे किती गाढे अभ्यासक आहेत हे त्यांच्या भाषणातून कळू लागले. ( म्हणजे संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे वगैरे वगैरे...)
तसे ते सुरवातीपासूनच ऍलोपथीला विरोध करायचे. (म्हणजे हे रोग म्हणजे फार्मा कंपन्यांचे कटकारस्थान. प्राणायाम केल्याने सगळे रोग छूमंतर होतात वगैरे वगैर). ते अर्थशास्त्री झाल्याचेही हल्लीच निदर्शनास आले आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून अनेक उपाय सुचवत असतात. [म्हणजे काळे धन भारतात आणणे किती सोपे आहे आणि सरकारची इच्छाशक्तीच नाही. विदेशी (किंवा बहुराष्ट्रीय) कंपन्याची उत्पादने विकत घेऊ नका. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीयांना लुटताहेत वगैर वगैरे...]
कधी कधी वेळ मिळाला तर शिक्षणतज्ज्ञही असतात. (म्हणजे मॅकोलेपासून सुरवात...) ह्याशिवाय बाबाजी एक यशस्वी उद्योजकही आहेत. त्यांचे एक बिझनेस एम्पायरच आहे. पातंजली ह्या छापाखाली आयुर्वैदिक औषधांपासून, जामज्यूस ते सौंदर्यप्रसाधने अशी पातंजलीची प्रॉडक्ट रेंज आहे.
पातंजली उत्पादने |
आयुर्वेदाचा, योगाभ्यासाचा ते प्रचार करीत असतातच. पण भारताला रोगमुक्त, सुदृढ करण्याचा वसा घेतलेल्या बाबाजींना आता राजकारणात शिरून भारताला अधिक समृद्धशाली, वैभवशाली करायचे वेध लागले आहेत.
असो. तर प्रश्न पडतो की बाबा योगशिक्षक आहेत, की भाषाशास्त्री आहेत, की अर्थशास्त्री आहेत, की शिक्षणतज्ज्ञ आहेत, की समाजसेवक आहेत की दुकानदार आहेत की राजकारणी? बाबा रामदेव आहेत तरी कोण? कुणी सांगेल का? (बाबांकडे तरी ह्या प्रश्नाचे उत्तर आहे काय?) उपक्रमी सांगतील अशी अपेक्षा आहे.
आणि असेच प्रश्न इतर बाबांबद्दल पडत असल्यास तेही सांगावे.
Comments
प्रश्न
रामदेवबाबांकडे पाहून आम्हाला एक खात्री मात्र पटली आहे.
डोळ्यांच्या विशिष्ट विकारावर योग आणि आयुर्वेद यांच्याकडे उपाय नाही.
बाकी त्यांनी आता राजकीय पक्षही काढला आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर बोलण्याचा अधिकार त्यांना "ऑपॉप" प्राप्त झाला आहे.
नितिन थत्ते
'तो' डोळ्यांचा विकार नाही.
तो फेशियल पॅरॅलिसिसचा परिणाम आहे. मराठीत पक्षाघात, वारे जाणे, लकवा मारणे इ.इ.
येथून साभार -
He says he was struck by paralysis when he was two-and-a-half years old, which he cured through yoga. He also says he was a fat child, and his knees would knock.
रामदेवबाबांचं काहीही असू दे.. पण.
हा प्रतिसाद खूपच खालच्या लेव्हलचा वाटला. असं माझं मत आहे.
पहिलाच प्रतिसाद, त्यात लेखासंबंधी काहीच् नाही पण् व्यंगाचा उल्लेख मात्र प्रथम..पटलं नाही.
लेखातील बहुतेक मुद्द्यांशी सहमत. म्हणजे रामदेवबाबांनी त्यांच्या फिल्ड च्या बाहेरच्या क्षेत्रात कॉमेंट करणं खटकतं (पण ते तर सर्वत्रच होत. मराठी संस्थळं, अगदी उपक्रम सुद्धा, सुद्धा याला अपवाद नाहीत.) पण त्यांनी एम्पायर तयार करणं नाही खटकतं. तो त्यांचा बिझनेस आहे. कुणी सांगावं त्यांच्या एम्पायर मधल्या मिटींग मधे ते सुटाबुटात जात असतील्.
मुळीच नाही
आरोग्याविषयी आचरट दावे करणार्यांना व्यंग असल्यास त्यांची शारिरीक व्यंगाविषयी टिंगल योग्यच आहे.
हो..
करा की..ते तुम्हाला योग्य वाटत असेल. मी तुमच्या लेव्हलवर येऊ शकत नाही.
मला नाही योग्य वाटल म्हणून तसं नमूद केलं. उपक्रमावर सध्या असं मत व्यक्त करायला पण बंदी आहे का? तसं असल्यास उपक्रमपंतांनी सांगावं.
ठीकच!
तुमची (बौद्धिक) लेव्हल मला खालची वाटते.
तुम्हाल थत्ते यांचे मत योग्य वाटले नाही म्हणून तुम्ही तसे नमूद केलेत, मला तुमचे मत अयोग्य वाटले ते मी नमूद केले.
थोडीशी असहमती
थत्तेंनी विकाराविषयी लिहिले आहे, व्यंगाविषयी नाही. रामदेवबाबा एड्सपासून सर्व विकार दूर करण्याचा दावा करतात तेव्हा त्यांना स्वतःचा विकार दूर का करता येत नाही हा प्रश्न मला योग्य वाटतो.
नक्कीच जावे परंतु मग इतर वेळेस ते दाढी वाढवून आणि भगवी वस्त्रे धारण करून संन्याशाचा आव आणतात तेव्हा ती लोकांची फसवणूक आहे असे मानावे लागेल.
"..इतर वेळेस ते दाढी वाढवून आणि भगवी वस्त्रे धारण करून संन्याशाच
..
का बरं असं?
त्यांचं प्रॉडक्ट विकताना त्यांना जो ड्रेस् योग्य वाटला असेल तो त्यांनी घातला.
अश्या पद्धतीची फसवणूक तर् आपण सगळीकडेच बघत आहोत.
औषधाची, टूथपेस्टची जाहिरात करणारा पांढरा कोट, स्टेथोस्कोप घालून बोलत असतो. अमेरिकेत तर या औषधांच्या इन्फोमर्शियल्सने तर वीट् येतो. तिथे तर खाली कॅप्शन्स पण येतात ("इनॅक्टेड बाय पेड आर्टीस्ट्स".. डिप्रेशन वरची ऍड् बघा)
६-पॅकवाला बॉडीबिल्डर जेव्हा झुंबानाचाची ऍड करतो तेव्हा आपण विचार करतो का? कि फक्त नाचल्यामुळे एव्हढे मसल्स कसे होतील्?
"रामदेवबाबाची आसनं बघा, फायदा झाला तर् करत रहा, न झाला तर् सोडून् द्या." इतकी आणि इतकीच किंमत देवून् आपण पुढे का जात नाही? इट्स अ प्रॉडक्ट 'टेक इट् ऑर लिव्ह ईट्". तो भगवी वस्त्र् घालतो, संन्याशाचा आव आणतो, लोकांची फसवणूक करतो.. या काथ्याकुटाचं प्रयोजन् काय्? आणि तेही फक्त त्याच्याच बाबतीत! शॅम्पू, टूथपेस्टच्या जाहिरातीत हमखास एक् व्यक्ती पांढरा कोट घालून् लॅबमधून् बाहेर् येऊन् बोलते.. त्याच्या विरुद्ध कधी फसवणूकीचा दावा केला जात नाही? त्याच्या बद्द्ल कधी लेख येत् नाही?
लेखात रामदेवबाबाची नाही त्या विषयात भाष्य करण्याच्या सवयीवर जो आक्षेप घेतला गेला आहे त्याला सहमत आहेच.
नट-योगी, खट-योगी
त्याचं कारण असं की ज्याने संन्यास धर्माचा स्वीकार केला आहे त्याच्यासाठी इतर ऐहिक गोष्टी वर्ज्य आहेत. रामदेवबाबा या धर्माचे पालन करतात असे वाटते. तसे असल्यास त्यांनी सूटबुटात जाहीराती करणे आक्षेपार्ह आहे. तसे करायचे असल्यास त्यांना संन्यासधर्माचा त्याग करणे भाग आहे. त्यांनी तो तसा करावा. माझे काहीच म्हणणे नाही परंतु इथे तर धर्माची कास धरायची आणि मग दुसरीकडे स्वतःसाठी सर्व क्षम्य आहे असा आव आणू नये.*
असे म्हटलेले नाही. जर ते संन्यासी आहेत तर इतर ऐहिक गोष्टींची अपेक्षा ठेवणे हा त्या संन्यासाश्रमाचा अपमान आहे. त्यांनी शिक्षक या नात्याने योग नक्की शिकवावे काहीच म्हणणे नाही. प्रॉडक्ट्स निर्माण केली तरी काही म्हणणे नाही पण अतिरेकी दावे करून खोटे बोलणे, फायदा मिळवणे* किंवा फायद्यासाठी सुटाबुटात वावरणे हे अयोग्य आहे.
कारण ती व्यक्ती नट असते. अमिताभ आणि शशी कपूर भगवी वस्त्रे धारण करून नाच करतात तेव्हा त्यांना कोणी ते कायमचे संन्यासी आहेत असे म्हणत नाही. त्यांचा नाच झाला की ते वस्त्रे उतरवून मूळ स्वरूपात येतात. रामदेवबाबांचे तसे नसावे.
* ते असे करतात असे म्हणायचे नाही, असे झाले तर अयोग्य आहे एवढेच.
ते संन्यासी आहेत् असा
त्यांनी दावा केला आहे का?
मी खरच ऐकला नाही आहे. तुम्ही तो ऐकला असल्यास नक्कीच् त्यांचा भोंदूपणा आहे. पण तसा काही त्यांचा दावा नसेल तर् "भगवे कपडे घालून्" आसनं शिकवतात आणि त्यामुळे संन्यासी असल्याचा भास होतो आणि फसवणूक होते हे पटत नाही. ज्या लोकांची अशी फसवणूक होत् असेल् तर् त्यांची टुथपेस्टच्या ऍड बघून् सुद्धा होत असेल. ती लोकं त्याच लायकीची आहेत् असं म्हणलं पाहिजे.
माझ्या मते मी मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे.
असे कसे?
त्यांनी दावा करणे म्हणजे काय? जर गोष्ट सर्वश्रुत असेल तर त्यांनी दावा करण्याची गरज आहे काय? जसे त्यांचा डोळा लवतो म्हणजे त्यांना काही व्यंग आहे याचा दावा त्यांनी केला असे तुम्ही सांगू शकता का? त्यांचा डोळा लवतो यात त्यांची बदमाशी नसून विकार/ व्यंग आहे तसेच त्यांनी संन्यास स्वीकारला आहे हे सर्वश्रुत आहे. याबाबत येथे वाचावे.
ही त्यांची ऑफिशिअल साइट.
धन्यवाद.
ब्रह्मचर्य आणि खडतर तपश्चर्या
साईटवर असे दिसते की रामदेवबाबानी लहान वयातच ब्रह्मचर्य आणि खडतर तपश्चर्येचा मार्ग निवडला (सेलिबसी अँड ऍस्सेटिझम). म्हणजे लौकिकार्थाने "संन्यासी" मार्ग.
प्रॉडक्ट विकतानाचा एक ड्रेस :)
वरून खालचा फोटो आठवला;)
नागा वेषभूषेतल्या बाबांना बघून मजा आली. बाबा राजकारण्यांसारखे, नेत्यांसारखे भ्रष्टाचारी आहेत असे म्हणायचे नव्हतेच. त्यांच्या चारित्र्यावर अद्याप कुणी शिंतोडे उडवलेले नाहीत. फक्त त्यांची वेगवेगळ्या विषयांवरील भाष्ये त्यांच्या सर्वज्ञतेची निःसंशय ग्वाही देत नाहीत असे बरेचदा वाटते. त्यांनी त्यांच्या टीममधले तज्ज्ञ बदलायला हवेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सर्वे गुणा: काञ्चनम् आश्रयन्ते
आता बाबा योगशिक्षक आहेत, भाषाशास्त्री आहेत, अर्थशास्त्री आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, समाजसेवक आहेत आणि यशस्वी उद्योजकही आहेत.
काही दिवसांनी राजकारणीही असू शकतील.
कारण-
सर्वे गुणा: काञ्चनम् आश्रयन्ते |
जास्त माहित नाहि पण -
४ वर्षाखालि मी त्यांना संस्कार ह्या वाहिनीवर पहिले. बरीच योगासने त्यांनी करून दाखवली.
मी ते करायला लागलो. खासकरून मी कपालभाती दररोज करू लागलो.
मला तब्बल १ वर्ष सर्दी झाली नाही(खर सांगतोय) (मला वर्षातून कमीत कमी १०-१५ वेळा सर्दी होते)
नंतर आय-टी त लागल्यापासून ते सर्व सुटले .... असो....
जय रामदेवबाबा... (मला तर फायदाच झाला)
माझ्यासाठी रामदेवबाबा हे एक योगी आहेत. आणि काय हो एक माणूस बरच काही असू शकतो ना.. मग कशाला एका भल्या
माणसाची निंदा करताय ?
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
श्वास
>>मला तब्बल १ वर्ष सर्दी झाली नाही(खर सांगतोय) (मला वर्षातून कमीत कमी १०-१५ वेळा सर्दी होते)
मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मी कपालभाती इअत्यादी करु लागल्या नंतर त्रास जवळ जवळ् नाहीसा झाला.
यांना
हिंदू धर्माचे थोर प्रसारक आणि हरेकृष्ण मिशन चे संस्थापक प्रभुपाद स्वामींनी सांगितलेला संदेश येथे कामी यावा.
"अतिविद्वानांना दुरूनच नमस्कार करावा. तेथे तुम्हाला कोणतीही मदत होणार नाही हे ध्यात ठेवा. बोलणारे कार्य करत नसतात. त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा तुमच्या कामाला लागा." यामुळे आज हिंदू धर्माचे कार्य १०८ देशात उभे राहिले. रशिया सारख्या ठिकाणी सुमारे लाखावर लोक हिंदू झाले. आफ्रिकेतले लोकही हिंदू झाले.
हा प्रतिसाद मुळ धाग्याला नाही. किंवा त्या धाग्याला प्रतिसाद देण्या इतकी त्याची लायकी नाही.
(मी इस्कॉन ची कार्यकर्तीनाही पन त्यांच्या कामाचा आदर बाळगते.)
शिवानी
छे
कपालभातीचा सर्दीवर उपयोग झाला ही चांगली गोष्ट आहे. कपालभातीने कॅन्सर बरा होतो का हो?
छे. आम्ही कुठे केलीय निंदा. आम्हाला अप्रूप आहे ते नक्की कोण आहेत ह्याचे. ते योगी आहेत म्हणजे काय बरे? कृपया सांगावे. म्हणजे त्यांच्याकडे योगजदृष्टी आहे की असामान्य योगबल आहे?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कॅन्सर
>>कपालभातीचा सर्दीवर उपयोग झाला ही चांगली गोष्ट आहे. कपालभातीने कॅन्सर बरा होतो का हो?
नाही. जर कोणी तसे सांगत असेल तर ते खोटे आहे.
कॅन्सर
>>कपालभातीचा सर्दीवर उपयोग झाला ही चांगली गोष्ट आहे. कपालभातीने कॅन्सर बरा होतो का हो?
कॅन्सर बरा होने म्हणजे काय हो ?
शरीराची फायटींग पॉवर वाढणे. योगासनांनी / प्राणायामाने ती वाढते हे नक्की होते :)
डायरेक्ट कॅन्सर बरा नाही होणार पण मदत नक्कीच होइल.
>>असो. तर प्रश्न पडतो की बाबा योगशिक्षक आहेत, की भाषाशास्त्री आहेत, की अर्थशास्त्री आहेत, की शिक्षणतज्ज्ञ आहेत, की समाजसेवक >>आहेत की दुकानदार आहेत की राजकारणी? बाबा रामदेव आहेत तरी कोण? कुणी सांगेल का? (बाबांकडे तरी ह्या प्रश्नाचे उत्तर आहे काय?) >>उपक्रमी सांगतील अशी अपेक्षा
ह्याला आम्ही निंदा म्हणतो :(
अर्थात मी काही राम्देवबाबांचा चाहता नाही... पण त्यानींकाही वाइट केले नाही हे नक्की आणि आमच्या गावात (कन्हेरवाडी)
येथे बरीच लोकं प्राणायाम वगैरे करू लागली आहेत. काहीच न करण्यापेक्षा हे नक्कीच बर आहे :)
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
कपालभाती
कपालभाती करतांना आपण आपल्या शरीरातील सर्व रोग, विकार आदींना आपणश्वासाबरोबर बाहेर टाकत आहोत अशी कल्पना करा आणि शेकडो वेळा त्यांना जोरजोरात बाहेर टाका म्हणजे ते बाहेर निघून जातील असे बाबा सांगतात. हे मी टीव्ही आणि सीडीवर पाहिले आहे. माझ्या एका जवळच्या आप्ताने तसे करायला सुरुवात केल्यानंतर त्यांचे आधीचे किरकोळ विकार गेले की नाही ते समजले नाही पण पूर्वी नसलेला उच्च दाबाचा जास्त धोकादायक विकार सुरू झाला.
अनुलोम विलोम यासारखे हळूहळू करण्याचे प्राणायाम करून फुफ्फुसाची क्षमता वाढवण्याने तसेच शरीरातील प्रत्येक पेशीला प्राणवायूचा जास्त पुरवठा केल्याने शरीराचे स्वास्थ्य वाढते यात शंका नाही, पण कपालभातीसारखा झटके देण्याचा व्यायाम केल्यामुळे नाजुक इंद्रियांना इजा पोचण्याची शक्यता असते असे माझे मत अनेक अनुभवी लोकांशी विचार विनिमय केल्यानंतर झाले आहे.
ज्या लोकांना असा त्रास होतो त्यांनी कपालभाती योग्य प्रकारे केली नसेल असे बहुधा सांगितले जाईल, पण कोणती काळजी घ्यायला हवी ते बाबांच्या सांगण्यात मला तरी दिसले नाही.
थोडक्यात केवळ बाबांच्या सांगण्यावरून योग्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या देखरेखीशिवाय प्राणायाम करण्यात धोका आहे.
माझ्या जवळील सी डी मधे...
माझ्या जवळील रामदेव बाबांच्या ( प्राणायाम व योगासने दोन्ही च्या )सीडीज मधे त्यांनी वेगवेगळ्या प्राणायाम व योगासनांबद्दल -कोणी करावे/ करू नये अथवा काय काळजी घेउन करावे, कमीत कमी वा जास्तीत जास्त किती करावे, कोणत्या विकारासाठी कोणता प्राणायाम/ योगासने फायदेशीर आहेत हे अगदी तपशीलवार सांगीतले आहे. मी त्यातील काही प्राणायाम व योगासने नियमीतपणे :) करण्याचा प्रयत्न करतो. अगदे रोज जरी नाही तरी आठवड्यात सरासरी चार दिवस करणे जमते. मला तेव्हड्याचाही खूप फायदा झाला आहे. बाकी चालू द्या.
माझ्याकडेही
माझ्या विसीडीमध्येही हे प्रयोग कोणी करावे, किती वेळ करावे याचे मार्गदर्शन आहे.
हो, हे सर्वच प्रकारच्या कठीण व्यायामांसाठी लागू आहे. बर्याचदा वाचून किंवा टीव्हीवर वगैरे बघून कल्पना येत नाही.
उद्योजक / व्यावसायिक
आपल्या व्य्वसायासाठी (उद्योगांसाठी :) ) युरोपात नवे बेट विकत घेणारे हे बाबा मुख्यतः उद्योजक आहेत असे माझे मत आहे.
बाकी, ईश आपटे यांचे मत वाचायला उत्सुक आहे
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
असामान्य योगबल
सहमत आहे.
विशेषतः पृथ्वी त्रिकोणी दिसण्याइतके असामान्य योगबल रामदेव बाबांनी प्राप्त केले आहे का हेही जाणून घ्यायला आवडेल.
(मी सेकंड की थर्ड इअरला असताना एकदा असे योगबल मला २-३ तासांसाठी प्राप्त झाले होते असे अंधुक आठवते. त्यानंतर झाल्याचे स्मरत नाही).
नितिन थत्ते
योगबल
>>मी सेकंड की थर्ड इअरला असताना एकदा असे योगबल मला २-३ तासांसाठी प्राप्त झाले होते असे अंधुक आठवते.
काळी कॉफी घेतल्याने ते योगबल गेले का?
:) ह. घ्या.
बम भोले!
अफूगांजा आदी पदार्थांचे सेवन केल्यासही अशी योगजदृष्टी किंवा असामान्य योगबल प्राप्त होते असे ऐकून आहे. (लेविटेशनबिविटेशन) पण ही किमया मद्य किंवा मद्यार्कात नाही असे म्हणतात. योगीपुरुष अफीमची किंवा गांजेकस असतात असा अंदाज आम्ही त्यावरून बांधला होता. असो. बम भोले!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सचिन पण उद्योगपतीच का मग ?
सचिन (तेंडल्या) ने पण कुठेतरी छोटं बेट घेतल्याचं मधे आइकला होतं.
तो पण उद्योजक आहे की काय ?
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
फरक
सचिनने आपल्या व्य्वसायासाठी बेट घेतले असल्यास तो उद्योजकही आहे.
अर्थात त्याच्या इतर कृती त्याचा उद्योग चालावा म्हणून केल्यासारख्या वाटत नसल्याने तो प्रामुख्याने उद्योजक आहे असे मी म्हणणार नाही.
मात्र बाबा रामदेव यांनी बेट तिथे आयुर्वेदिक चिकित्सापद्धतीने औषधे बनविणे, प्रशिक्षण केंद्र चालविणे वगैरे व्यावसायिक कामांसाठी विकत घेतले आहे.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
हम्म !
अच्छा .
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
उद्योजक सचिन
सचिनचे रेस्टॉरंट आहे मुंबई विभागात ना? तो उद्योजक पूर्वीपासूनच आहे.
बंद
मुलुंडचे बंद करण्यात आले होते ना?
बंगलोरचे, कुलाब्याचे चालू आहे की नाही ते माहिती नाही.
--
पुण्यात जहीर खानचे रेस्टॉरंट आहे ते भंगार आहे/होते. भिंतींवर जळमटे होती आणि टेबलाखालून झुरळे निघत होती असा अनुभव आहे.
कुलाब्यातले
कुलाब्यातले चालू असावे असे वाटते कारण नुकतीच मी विश्वचषकानिमित्त तेथे पार्टी दिली गेल्याची बातमी ऐकली.
चालू किंवा बंद - सचिन उद्योजक आहे हे नक्की. बंद पडली असतील रेस्टॉरंटे तर बुडीत खात्यातला उद्योजक आहे असे म्हणता येईल. :-)
झेडकेज
कोंढव्यात आहे हे बहुतेक. झुरळस् अका कॉक्रोचेस् म्हणून झेडकेज् नाव दिले असावे. ;-)
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
प्राणायाम व रामदेवबाबा
मला प्राणायाम शिकण्याची बरीच इच्छा होती. रामदेवबाबांची एक व्हिडिओ सीडी मी आणली व त्या वरून प्राणायाम करायला शिकलो. जर कोणाला शिकण्याची इच्छा असली तर ही सीडी बघण्यासारखी आहे. प्राणायामाचा एकूण बराच फायदा मला झाला. पुण्यातील एका दैनिकाने पुरस्कृत केलेले मेकॅनिकल इंजिनियर जर स्वत:ला डॉक्टर म्हणून घेऊ शकतात व आयुर्वेदिक औषधे विकण्याचा धंदा करू शकतात तर रामदेवबाबांनी तो का करू नये?
मध्यंतरी सरकारी विभागांनी त्यांची बरीच चौकशी केली असे ऐकिवात आहे. परंतु त्यांनी कोणतीही अवैध कृत्य केल्याचे आढळले नाही. एकंदरीत माणूस भडक माथ्याचा पण ठीकठाक वाटतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
रोग निर्माण करणारे व्हायरसेस एखाद्याच्याच शरीरातच का शिरतात
अर्धांगवायू पूर्ण बरा करण्याचे कुठले उपाय सध्याच्या वैद्यकशास्त्राला(अलोपेथी) माहिती आहेत हे जरा सांगावे. कॅन्सर होण्याचे जर कारणच आजच्या अलोपेथीला माहिती नाही, तर त्यावर औषधे देणे ही फसवणूक ठरत नाही काय ? परंपरेचा द्वेष करणार्यांनी, रोग निर्माण करणारे व्हायरसेस एखाद्याच्याच शरीरातच का शिरतात ह्याचा शोध घ्यावा व नंतर योग-आयुर्वेद्-ज्योतिष ह्यातील दोष काढत बसावे.
Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!
त्रिकालज्ञानी व्हायरस
अगदी अगदी! व्हायरसाच्या प्रचंड बुद्धीमत्तेमुळे तसेच त्यांच्या भूतभविष्यादी ओळखण्याच्या ज्ञानामुळे पापी लोक (या जन्मातील नसतील तर पूर्वजन्मातील पापी) ते चटकन ओळखून काढतात आणि फक्त त्यांच्याच अंगात प्रवेश करतात असा मला काल दृष्टांत झाला.
कँसरवर औषधे अलोपेथीमधे दीली जातात ?
शक्यच नाही तो प्रकार आयूर्वेद, होमीओपथीमधे होत् असेल, अलोपेथीमधे नाही. अलोपेथीमधे कँसर शरीरावेगळा करणे(शस्त्रक्रीयेने) वा सरळ आहे तीथेच जाळून टाकणे (रेडीएशन व केमो) एव्हडेच करते. हा रोग समूळ बरा करणेसाठी अलोपेथीमधे औषधे अस्तीत्वात नाहीत.
आक्षेपार्ह काय ?
रामदेव बाबा जे करत आहेत त्यात अक्षेपार्ह काय आहे ते समजत नाही. त्यांच्या सुचना /सल्ले अमलात आणणार्यांचा समाजाला काय त्रास.
भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचे अनुयायी (ज्याना कार्यकर्ते म्हणतात्) त्यांचा समाजाला खुप त्रास् आहे. त्यांच्या बाबतची जनजागृती ज्यास्त् योग्य आहे.
उत्तर तुम्हीच दिले
"हे रामदेव नक्की कोण?
ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच चांगले दिले आहे. माणूस चतुरस्त्र आहे. बहूआयामी आहे. एकाच माणसामधे इतके गुण असणे हे क्रेडीटेबल आहे.
पुण्यातील अनेक ऍलोपथी डॉक्टर नेहमीच्या ऍलोपथी गोळ्ञाबरोबर आयुर्वेदीक औषधेही देतात. - त्यांनाही ऍलोपथीचे "सामर्थ्य" कळले आहे.
पतंजलीचे च्यवनप्राश उत्तम असते. लहान मुलेही आवडीने खातात. रात्री उष्ण दुधाबरोबर घेतले की, ओमेझ <> घेण्याची गरज राहत नाही.
बाकी काय बुद्धीजीवींना कशातही चांगले दिसत नाही- उणीवा काढल्या की, आपल्याला ह्यातले काहीतरी जास्त कळले आहे असा आव आणता येतो.
बुद्धीजीवी ?
बाकी काय बुद्धीजीवींना कशातही चांगले दिसत नाही- उणीवा काढल्या की, आपल्याला ह्यातले काहीतरी जास्त कळले आहे असा आव आणता येतो.
अगदी बरोबर. ह्यातल्या काहीनी अण्णांच्या आंदोलनलाही नाके मुरडली होती.
अण्णा
अण्णा हजारेंचा इतिहास फारसा उत्साहवर्धक नाही. त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातले अनेक लोक ब्लॅकमेलर्स म्हणून कुप्रसिद्ध आहेत. स्वतः अण्णांनीही सरकारचे ब्लॅकमेलिंगच केले आहे. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे नक्की काय हे समजले नाही. फेसबुकवर फक्त 'लाईक' करणे म्हणजे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा असा अर्थ होतो का?
लाइक करणे
--फेसबुकवर फक्त 'लाईक' करणे म्हणजे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा असा अर्थ होतो का?
ह्या प्रश्नाचे उत्तर एखादा राजकारणी मस्त देऊ शकेल. जी लोकं एक्झिट पोलवरही काहीतरी न्युज जनरेट करतात, त्यांना हा मसाला मस्त लागतो.
मतप्रदर्शन करणे जर दिल्लीत जाऊन करणे शक्य नसेल तर लाइक करणे केव्हाही आवडेल.
घरबसल्या
हो. आरामात गादीवर घरबसल्या किंवा ऑफिसात एसीमध्ये बसून आंदोलनात सहभागी होण्याची मजाच निराळी.
पद्धतीचे नियम ?
सहभागी होण्याच्या पद्धतीचे नियम ठरलेले नाहीत.
तेच तर
नाक मुरडणे ही देखील सहभागी होण्याची एक पद्धत असावी.
असावी पण...
असावी पण तीच योग्य आहे असे समजण्याची नसावी.
असहमत
ज्याअर्थी एखादी व्यक्ती विशिष्ट पद्धतीचा पुरस्कार करू लागते तेव्हा 'त्यातल्या त्यात तीच पद्धती योग्य असावी' असे त्याने मान्य केलेले असते. एखादी पद्धत योग्य नसेल तरीही तिचा पुरस्कार करण्याची प्रथा सेन्सिबल नसावी असे वाटते.
नियम नाही.
--असे त्याने मान्य केलेले असते.
हा नियम नाही.
--एखादी पद्धत योग्य नसेल तरीही तिचा पुरस्कार करण्याची प्रथा सेन्सिबल नसावी असे वाटते.
हा तुमचा विचार आहे, इतरांना तसेच् वाटावे असे होत नाही.
वैचारिक गोंधळ
ईश आपटे यांच्या प्रतिसादावरून त्यांचा बराच वैचारिक गोंधळ उडाला असावा असे वाटते. मी डॉक्टर नाही किंवा मायक्रोबायॉलॉजिस्ट नाही परंतु सामान्य ज्ञानाने त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देता येते का? याचा प्रयत्न करतो.
1.रोग निर्माण करणारे व्हायरसेस एखाद्याच्याच शरीरातच का शिरतात
भाविक लोक जसे मानतात की ईश्वर सगळीकडे आहे त्याच धर्तीवर असे म्हणता येईल की सर्व प्रकारचे व्हायरस सगळीकडे असतातच. मग एखादाच माणूस या व्हायरसचा का शिकार होतो? याला दोन कारणे आहेत. एकतर त्या माणसाची त्या व्हायरसबद्दलची प्रतिकारशक्ती मंद असते. त्यामुळे शरीरातील रोग नष्ट करणार्या पेशी या व्हायरसचा समूळ नायनाट करू शकत नाहीत. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे हे व्हायरस शरीराच्या एका विशिष्ट अवयवातच आपला प्रभाव दाखवू शकतात. उदाहरणार्थ सर्दीचा व्हायरस श्वसन संस्थेत शिरला तरच सर्दी होते. तो तळाहातावर असला तर सर्दी होत नाही. तुम्ही हाताने सारखे नाक खाजवत असलात तर सर्दी होण्याची शक्यता जास्त असते.
2. कॅन्सर होण्याचे जर कारणच आजच्या अलोपेथीला माहिती नाही, तर त्यावर औषधे देणे ही फसवणूक ठरत नाही काय ?
कॅ न्सर होणे म्हणजे शरीरातील एखाद्या अवयवातील पेशींनी अनियंत्रित पणे स्वत:ची प्रत बनवणे सुरू करणे. गर्भावस्थेपासून प्रत्येक मानवी जीवपेशी हे करत असते. शरीराची वाढ एकदा पूर्ण झाली की हे कार्य थांबते. कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या एखाद्या अवयवातच असे का होते हे अलोपाथी काय पण कोणत्याच चिकित्सा पद्धतीला समजलेले नाही. मात्र काही औषधे एका विशिष्ट कॅन्सरवर प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ सरव्हायकल कॅन्सर किंवा ल्युकेमिया यावर प्रभावी औषधे मिळाली आहेत. ही औषधे घेणे यात फसवणूक काय आहे?
3.अर्धांगवायू पूर्ण बरा करण्याचे कुठले उपाय सध्याच्या वैद्यकशास्त्राला(अलोपेथी) माहिती आहेत हे जरा सांगावे.
मेंदूतील काही पेशींना होणारा रक्त पुरवठा व पर्यायाने होणारा प्राणवायूचा पुरवठा जर काही कारणाने खंडित झाला ( रक्त वाहिनी फुटणे किंवा त्यात गाठ निर्माण होणे) तर अर्धांगवायूचा झटका येतो. यात मेंदूतील काही पेशी निकामी होतात. या पेशी पूर्ण निकामी किंवा मृत होण्याच्या आधी (झटका आल्याच्या काही तासात) जर एक विशिष्ट औषध रोग्याला दिले गेले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. औषध देण्यात दिरंगाई झाली तर मात्र या पेशी निकामी होतातच. अशा वेळी मेंदूच्या इतर पेशी या मृत पेशींचे कार्य पुढे चालवू शकतात. मात्र यासाठी रोग्याचे वय कमी व बराच काल (2/3 वर्षे) लागू शकतात
कोणत्याही रोगावर जी औषध योजना परिणामकारक ठरते ती वापरली पाहिजे. अलोपाथी, प्रयोगाने केलेले निरिक्षण, यावर आधारित असल्याने ती जास्त शास्त्रीय आहे. होमिओपथी किंवा आयुर्वेद हे केवळ अनुभव सिद्ध आहेत. त्यामुळे त्या तितक्याशा शास्त्रीय नसल्या तरी काही रोगांवर अतिशय रामबाण ठरू शकतात हे मला मान्य आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.