गणितवादखंडन व काल्पनिक संख्यांचे मिथ्य

एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते. ह्या तीन सहस्रकांतील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर सर्वत्र बोकाळलेला गणितवाद! अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना व इतर पुरोगामी संघटना ही अन्धश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील काय? आपण पाहू ही अन्धश्रध्दा कशी ठरते ते. सर्वसामान्याना गणिताचा परिचय २ + २ = ४ ह्या सूत्राद्वारे येतो. ह्या सिध्दान्ताचे मुख्य तत्व असे "दोन या संख्येमध्ये तीच संख्या मिळवली की चार ही नवीन संख्या तयार होते " ह्या सिध्दान्तामध्येच मोठा तर्कदोष आहे. कसा ते आता पाहू.

अ हा ब वर आधारित आहे व पुन्हा ब हा अ वर आधारित आहे ह्या प्रकाराला अन्योन्याश्रयदोष असे तर्कशास्त्रात म्हंटले जाते. हाच दोष गणितवादाच्या मुख्य सिध्दान्ता मध्ये आहे. दोन म्हणजे नक्की किती? तर जे स्वतःत मिळवल्यावर चार होतात ते. आणि चार म्हणजे किती, तर जे दोनमध्ये दोन मिळवल्यावर तयार होतात ते. ह्या एकमेकांवर आधारित व्याख्या ना दोन म्हणजे नक्की किती आहेत हे सांगतात ना चार म्हणजे किती आहेत हे सांगतात. अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त ह्या सिध्दान्तावर पुढचा सारा डोलारा उभा आहे. आता ह्यातील उपसिध्दान्त म्हणजे , सुरुवातीला बेरीज होती, व नंतर त्यापासून गुणाकार व वर्ग या संकल्पना निर्माण होतात. दोनाचा वर्ग चार हा त्याच सिध्दान्ताचा निष्कर्ष. कारण काय ? तर म्हणे दोनच्या बाबतीत दुप्पट आणि वर्ग समानच. हे दोनच्या बाबतीत होतं तर इतर संख्यांच्या बाबतीत का होत नाही? समान संख्यांची बेरीज केली की दुप्पट होते, वर्ग नाही. ह्याला उत्तर काय? तर फक्त दोनच्या बाबतीत बेरीज आणि गुणाकार हे सारखंच ठरतं - दोन हा अपवाद आहे. ह्याचाच अर्थ हे बेरजेचं वर्गात रूपांतर कसे होते हे कुणीच गणितज्ञ प्रयोगाने सिध्द करू शकणार नाही.

आता ह्यांच्याच म्हणण्यानुसार शून्य व एक हे अत्यंत मूलभूत आकडे आहेत. कुठच्याही संख्येत शून्य मिळवल्यावर तीच संख्या का येते? उत्तर नाही. एकने कुठच्याही संख्येला गुणलं तर तीच संख्या का मिळते? सांगता येत नाही. शून्य व एक यांच्यामध्ये पूर्णांक संख्या का अस्तित्त्वात नाही? उत्तर नाही. मधले जे अपूर्णांक म्हणून म्हटले जातात ते संशयास्पद आहेत. निर्विवाद नाहीत (गणितज्ञाना इर्रॅशनल संख्यांविषयी विचारा - त्यांना अपूर्णांक ठरवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले)

हाच प्रकार तीन या आकड्यानंतर चार येतो ह्या मध्ये आहे. मधल्या संख्याच अस्तित्वात नाहीत. एकूण विचार करता ह्याला शास्त्रीय सिध्दान्त म्हणणे हा विनोद होइल. मध्ये खरंतर अनंत अपूर्णांक आहेत असा नुसता दावा केला की प्रयोग व पुरावा दोन्हीची आवश्यकता समाप्त होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कुठच्याही आकड्यानंतर येणारा आकडा हा निव्वळ संख्याक्रमाने येतो. सोळानंतर सतरा का येतात? कारण संख्याक्रम. मुळात सोळा हा पंधरानंतर येतो ते कशामुळे ? तर पुन्हा संख्याक्रम. दहाने गुणल्यावर त्या आकड्यावर शून्यच का येतं? गुणाकाराच्या प्रक्रियेमुळे. पण ही गुणाकाराची प्रक्रिया आली कुठून? उत्तर नाही .. एकुण एक सर्व आकडे ठराविक संख्याक्रमावर अवलंबून आहे. हे काय गणित झाले ?? ...............आता तुम्ही म्हणाल हे जर एवढे तर्कदुषित आहे, तर ही थेअरी एवढी प्रसिध्द का ?????????? त्याचे कारण दिसणारी समानता !!

मासे व पक्षी, चिंपांझी व माणूस ह्यांच्या टोळक्यांच्या संख्यांमध्ये समानता दिसते ह्याचा अर्थ असा नव्हे की दोन्ही गटांना एकाच वेळी मोजता येईल. कुठलाही सबळ पुरावा व तर्कशास्त्रीय आधार नसताना वैज्ञानिकांना ह्या समानतेच्या आधारावर गणितवादावर पोचावे असे का वाटले ? कारण त्यांना योगबलाने मिळणाऱ्या दिव्यदृष्टीचा दुसरा प्राचीन सिध्दान्त लवकरात लवकर निकालात काढायचा होता. त्यासाठी मग सेट थिअरी, नंबर थिअरी, काल्पनिक संख्या इ. मिथ्या कल्पना बनवण्यात आला. त्याना मिथ्या अशासाठी म्हणत आहे कारण त्यांना कोणताही तर्कशास्त्रीय आधार नाही व प्रत्यक्षजन्य पुरावा नाही.

काल्पनिक संख्यांसंबंधी थोडं इथे सांगितलं पाहिजे. या विचित्र संख्या कुठेही दिसून येत नाहीत. त्यांच्याद्वारे कसलीही मोजणी करता येत नाही. वर्गमूळात वजा संख्यांचे तर्क लढवले आहेत व त्यांना आय् म्हटले आहेत. पण त्याबाबतीतही एकमत नाही - वर्गमुळात वजा एक म्हणजे अधिक आय् हे सांगता येत नाही. कदाचित तो वजा आय् देखील असेल. कल्पनेने वैज्ञानिकांनी ह्या संख्या कशा असतील ह्या विषय़ी अंदाज बांधले आहेत. या संख्या संख्यारेषेवर कुठे असतात, याबद्दल कोणा कडेच सबळ थेअरी नाही. त्यासाठी क्लिष्ट प्रतल आहे अशीही कल्पना केली आहे. निसर्गात योगबलाने प्राप्त होणाऱ्या दृष्टी नसलेल्यांना नेहमी एक साधेपणा दिसुन येतो. वर्तुळं ही वर्तुळाकृती वाटतात, आणि ती मुळात त्रिकोणी आहेत हे लक्षात येत नाही. काल्पनिक संख्यांची कल्पना मांडली की या नसलेल्या गोष्टी दिसण्याचा दावा गणितज्ञांनाही करता येतो. साहजिकच विशेष योगबलप्राप्त दृष्टी असणाऱ्यांचं महत्त्व कमी होतं. हेच नेमके ह्या वैज्ञानिकाना व तत्ववेत्यांना हवे होते. काल्पनिक संख्यांचा उल्लेख केला की गणितवादाला आधार मिळतो व समाजाच्या मनातील त्रिकोणी पृथ्वीसारख्या मूलभूत श्रध्दा सहज हद्द्पार करता येतात.

जलचर, उभयचर, वृक्ष, माकडे , माणसे , कीटक, पक्षी ह्यांच्यातील सांख्यिक समानते वरुन एकाला मोजण्याच्या पद्धतीनेच दुसऱ्यालाही मोजता येईल अशा निष्कर्षापेक्षा, संख्या, गणितं यातून मिळणाऱ्या कोता दृष्टीकोन खोटा आहे असा सिद्धांत फार पूर्वीपासून मानवसमाजाने धरुन ठेवला आहे. हा समाज म्हण्जे पृथ्वीवरील दिव्यदृष्टी प्राप्त केलेल्या लोकांचा समाज होय. दिव्य दृष्टी प्राप्त झालेले लोक हे प्रत्यक्ष दृष्टीला दिसणाऱ्या सत्यापेक्षा पुराण्या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या वचनांचा देखील विचार करायचे. आजचे वैज्ञानिक निव्वळ निरीक्षणांवर विसंबून ग्रंथांमध्ये काय लिहिलंय याकाडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दोघांचे निष्कर्ष वेगवेगळे येतात. आपण उदाहरण घेऊन समाजावुन घेऊ. पृथ्वीचे मूर्तरुप ही योगबलानुसार भिन्न भिन्न दिसते. सामान्य जीवांना ती चेंडू सारखी गोल प्रतीत होते, तर असामान्य योगबल असणाऱ्याना त्रिकोणाकृती दिसुन येते. सामान्य दृष्टीने ती आकाशात तरंगत आहे, तर योगज दृष्टीने ती सप्त द्वीपे व सप्त सागर ह्यांनी युक्त असुन भगवान शेषांनी आपल्या फणेवर धारण केली आहे.

शून्य ही सर्वात लहान संख्या आहे हे सर्वांना मान्य आहे. तरीही अनेक शून्य एकत्र येऊन त्यांच्यापासून इतर संख्या बनत नाही. प्रथम एक व नंतर दोन असं करत शंभर हा आकडा गाठण्याचं कारण काय ? आधुनिक गणित सांगते संख्याक्रम!!! आता संख्याक्रम असण्याला काही कारण? या संख्याक्रमाने मागे जात जाणं हे चुकीचं उत्तर ठरेल. कारण संख्या मागे मागे नेत नेल्या तरी त्या कधीच संपत नाहीत, कारण या अतिशहाण्या गणितज्ञांनीच ऋण संख्या तयार करून ठेवलेल्या आहेत. कितीही मागे गेलं तरी त्यापेक्षा लहान ऋण संख्या आहेतच! त्याने अनवस्था हा तर्कदोष निर्माण होतो. अनवस्था म्हणजे कधीही न संपणारी कारणपरंपरा. अनएन्डिग लूप. त्यामुळे हा सिध्दान्त चुकीचा ठरतो.

तर्कशास्त्रात कारणे दोन प्रकारची असतात. उपादान आणि निमित्त! उपादान कारण म्हणजे, कारण स्वत:च कार्यात रूपांतरित होणे . उदा. दुधाचे दही बनणे. निमित्त कारण म्हणजे, जे कारण अलिप्त व अंतिम आहे त्याला कोणते ही अन्य कारण असता कामा नये. शून्य किंवा एक हे जर उपादान कारण असतील तर, दोन निर्माण झाल्यानंतर बेरीज थांबली पाहिजे. पण गणितज्ञांच्यामते बेरीज चालूच राहाते व मोठ्या मोठ्या संख्या निर्माण होतच राहातात. अनंतापर्यंत! त्यामुळे काही मोजक्या मूलभूत संख्या हे ज्ञाननिर्मितीचे वा ज्ञानार्जनप्रक्रियेचे उपादान कारण होऊ शकत नाही. मग साहजिकच ज्ञाननिर्मितेचे कारण निमित्त व तटस्थ असले पाहीजे. हे निमित्त कारण गणितज्ञ कधी ही मान्य करत नाहीत. कारण ह्या तर्काने त्यांच्या काल्पनिक गणितवादाचे व पर्यायाने वैज्ञानिक दृष्टीकोनाचे खण्डन होते व हा तर्क सरळ सरळ सोमरस प्राशन करून प्राप्त केलेल्या योगसिद्ध दृष्टीकडे घेऊन जातो.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान. :)

उपक्रम चांगले चालू नये या इच्छेतून असे लेखन येत असावे असे मला वाटायला लागले आहे.
अशाने एक वाचक म्हणून आमचे हसे होते हो. छ्या, लेखन वाचणे ही लवकर सोडून द्यावे लागणार आहे.

अरे हो, गणितवाद आवडला. अजून एक विचारायचे होते की, जडवाद सिद्ध झाल्यावर लोक त्याच्या प्रवाहात गणितवादी बनतील काय ? कारण प्रमेय आणि प्रमाण या दोन गोष्टीमुळे गणितवाद विकसित होतो असे आम्हाला वाटते. आपले काय मत आहे. बाकी, प्रश्न विचारल्यावर उत्तरे देण्याच्या काही परंपरा,संकेत उपक्रमवर आहेत असे म्हणतात. त्यामुळे लेखक केवळ लेख टाकून पॉपकॉर्न खात बसणार नाही असेही आम्हाला वाटते.

-दिलीप बिरुटे

हाहा

पण उत्क्रांतीच्या वर्णनात अन्योन्याश्रय आणि अनवस्थिती असल्याची भावना कित्येक लोकांत असते.

हे गैरसमजामुळे आहे, हे तर आलेच. हे गैरसमज फारसे उपजू नयेत अशा प्रकारे शालेय पुस्तकांत उत्क्रांतीचे वर्णन करता येईल काय? याबद्दल वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग व्हावेत.

माझ्या शाळेतील पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची होती. त्यातील वर्णन मला तरी बरेच सुस्पष्ट वाटले होते. हे गैरसमज होण्यास तितकी जागा मला सापडली नव्हती. ती पुस्तके (किंवा नवीन अभ्यासक्रमातली पुस्तके) पुन्हा शोधून बघायला पाहिजेत. अन्य लोकांचे गैरसमज होतील असे काही संदिग्ध भाग आहेत काय? ते सुधारता येतील काय?

मजा आली

फार वर्षांपूर्वी जगातील सगळ्यात उपद्रवी आणि प्रदूषणकारी पदार्थ डाय-हायड्रोजन-मोनॉक्साईड अशा काहीशा नावाचा इंग्रजीतला लेख वाचला होता. (शोधला आणि जवळपास सापडला). त्या लेखाची आठवण आली.
वाचताना मजा आली.

एक राहिले. हे जरा गंभीरतेने. नुसत्या तर्कशास्त्रावर कुठलेच शास्त्र उभे राहू शकत नाही. तर्कशास्त्रात प्रत्यक्ष (एम्पिरिकल) घालावेच लागते.

प्रमोद

वरचा लेख लिहिणारा

उपक्रमावर लिहिताना शिव्यांचा वापर केला जाणार नाही, एकमेकांवर अनावश्यक टिका केली जाणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कडक उपाययोजना केली जाईल. - संपादन मंडळ.

कोता दृष्टिकोन

संपादन मंडळाच्या कोत्या दृष्टिकोनाला त्या शिव्या वाटल्या असतील. मंडळाला योगबलाने प्राप्त होणारी दिव्यदृष्टी असती तर कदाचित त्या शब्दांचे अर्थ वेगळेही वाटू शकले असते. आंधळ्यांच्या जगात डोळस मूर्ख ठरण्याची शक्यता असते, असं म्हणतात ते काही उगीच नसावं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

जबरा.. आवडले!

=)) =))

जाम आवडले. बाकी तो लेख आवडून/पटून हा लेख ज्यांना आवडला/पटला नाही त्यांना काय म्हणावे बरे? ;-) (हे खरे तर लिहणार नव्हतो, पण 'त्यांना' अन्यथा कळेल की नाही अशी शंका आल्याने लिहावे लागले.)

-Nile

सहमत

सहमत १०० %

+१

असेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हास्यास्पद लेख

असले लेख पाडण्यात 'तिकडचे' काही 'बाहुबली' पटाईत आहेत असे ऐकून होतो. ती बाधा इकडेही झाली म्हणावी की काय? बाकी करमणूक बरी झाली. धन्यवाद. चालू द्या...
(२ म्हणजे काय हे नक्की सांगता येते, त्यात २ मिळवायचे म्हणजे काय याचेही प्रात्यक्षिक करून बघता येते. तेव्हां दुसरे एखादे उदाहरण घेऊन आणखी एक लेख पाडा. पुलेशु )

धन्यवाद

हा लेख वाचून करमणूक झाली हे ऐकून आनंद झाला.

पण केवळ तेवढाच उद्देश नव्हता. काही गंभीर मुद्देही मांडायचे होते. २ + २ = ४ मध्ये २ ची व्याख्या करायची नसून बेरजेच्या प्रक्रियेचं वर्णन असतं. तो मुद्दा मूळ लेखात विसरला गेला हे थोड्याशा आडवळणाने दाखवून द्यायचं होतं. या उदाहरणात जसा तार्किक दोष नाही तसाच सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मध्येही नाही हे सांगायचं होतं.

दुसरं उदाहरण हवंच असेल तर पोहे चाळण्याचं देतो. 'पोहे चाळले की कोंडा खाली पडतो' या सत्य, तपासून बघण्यासारख्या वाक्याला 'हॅ, तुम्ही म्हणताय पोहे कुठचे तर चाळणीत शिल्लक रहातात ते, आणि चाळणीत शिल्लक काय रहातं तर ते पोहे. अशा एकमेकांवर अवलंबून असलेली व्याख्या करत आहात' असं काहीसं मूळ लेखात म्हटलं होतं.

असो. पण निदान तुमची करमणूक तरी झाली. तेवढंच यश मला रगड.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

वडाची साल

आकड्यांचे तर्कशास्त्र हे अमूर्त संकल्पनांचे आहे. ते लावून जगातल्या प्रत्येक गोष्टीची वाट लावता येईल. माझ्या मते आपटेंच्या लेखात काही तथ्य आहे. केवळ विडंबनाने ते नाहीसे होणार नाही.
मराठीमाणूस

तथ्य

काय तथ्य आहे ते सांगावे. नुसती विधाने करण्यात काय अर्थ आहे.

चन्द्रशेखर

तथ्य समजायला..

दिव्ययोगबल लागते. तुमच्याकडे ते नाही त्यामुळे तुम्हाला ते समजणार नाही असा शुद्ध तर्क मांडला जाईल.

बरोबर आहे

त्या लेखातील सगळेच मुद्दे नाकारता येणार नाहीत. वास्तविक त्यातले बरेच प्रश्न मलाही पडतात आणि त्याची उत्तरे कुठेही मिळाली नाहीत. काही मुद्दे मात्र अगदीच हास्यास्पद आहेत उदा. डायनोसॉरची हाडे. शेवटचा परिच्छेद नक्किच मान्य करण्याजोगा नाही. त्याऐवजी फारतर असे म्हणता येईल की या प्रश्नांची उत्तरे अजून सापडली नाहीत किंवा डार्विनचा सिद्धांत याचे स्पष्टीकरण देण्यास अपुरा आहे.

दुमत नाही

हा तर्क सरळ सरळ सोमरस प्राशन करून प्राप्त केलेल्या योगसिद्ध दृष्टीकडे घेऊन जातो.

या विषयी कोणाचे दुमत नाही. प्राशनास कारण कोण ठरते व निमित्तमात्र कोण ठरते हे महत्वाचे नसून प्राशन ही कृती महत्वाची आहे
आता काही लोकांच्या उक्ती आणि कृती यात अंतर असल्याने ते फसवत असल्याचा भास निर्माण होतो. काहींच्या मते हा भास उक्तिप्रधान आहे तर काहींच्या मते तो कृतिप्रधान आहे. असो एकेकाचे तर्क!
प्रकाश घाटपांडे

उत्तम लेख

उत्तम लेख. अनुभव सिद्ध अशा मूलभूत सिद्धांतांच्यात काहीतरी तृटी आहेत असे प्रतिपादन करून आपण आइनस्टाईनचे नवे अवतार आहोत असा अविर्भाव दाखवणारा शेवटी स्वत:चे कसे हसू करून घेतो. याची प्रचिती हा लेख वाचून येते. मूळ ज्या लेखाचे हे विडंबन आहे तत्सम लेख पुढे लिहिले जाणार नाहीत एवढीच आशा करणे शक्य आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मूळ् लेख

असे लेख लिहिले जावेत कारण त्यावर आलेल्या प्रतिसादांवरुन काही सदस्यांचा बौद्धिक आवाका समजतो.

हा मूळ लेख

कुठे आहे? अज्ञानाबद्दल क्षमा असावी
सापडला. घाई केल्याबद्दल क्षमा असावी.
हा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल

तथ्य

जीवाची निर्मिती हा ही उत्क्रांती चा भाग आहे का? तसे मानले तर जडा पासून चैतन्या ची निर्मिती होते ह्या दाव्याला गणिती, संख्याशास्त्रीयाच नव्हे तर शास्त्रीय पुरावा ही काहीही नाही. लाखो अब्ज वर्षे प्रीमोर्दीयाल सूप उकळत बसलात तरी त्यातून गुणसूत्रे आणि गुणसूत्रतून पुढची साखळी निर्माण होणे शक्य नाही. जडाचे स्वताहाच्या नियमनाचे गृहीत मानले तर तो सरळ चैतन्य वादच होतो. निर्मिती, उत्क्रांती आणि दैवी चमत्कार या संपूर्ण विषयावर अमेरिकेतले क्वान्तम शास्त्रज्ञ आणि अद्वैती श्री अमित गोस्वामी यांनी अत्यंत सुंदर पुस्तक लिहिले आहे. जगातले सर्व ज्ञान आपल्यालाच आहे आणि आपण म्हणतो ती पूर्व दिशा आहे असा भ्रम ज्यांना झालेला नाही, विद्ये बरोबरच विनय ही ज्यांच्या पाशी आहे आणि ज्ञान व विज्ञानाच्या मर्यादा ज्याना समजतात अशांना ते जरूर वाचता येईल.या स्थळावरच्या अनेक सदस्यांच्या भाषेवरून ते कुठल्यातरी विद्यापीठात प्राध्यापक वगैरे असावेत असे वाटते. त्यांना ही पुस्तके त्यांच्या वाचनालयात मिळू शकतील, किंवा मागवता येतील. माझ्या marathimanoos.com या वेब साईट तर्फे मी अनेक पुस्तके महाराष्ट्रात पाठवत असतो. मला कळवल्यास काही पुस्तके मी ही पाठवू शकेन.
मराठीमाणूस

असहमत

जडा पासून चैतन्या ची निर्मिती होते ह्या दाव्याला गणिती, संख्याशास्त्रीयाच नव्हे तर शास्त्रीय पुरावा ही काहीही नाही.

चैतन्य म्हणजे काय? आम्ही तसले काही मानतच नाही. सबब, "जडा पासून चैतन्या ची निर्मिती होते" असा आमचा दावाच नाही.

लाखो अब्ज वर्षे प्रीमोर्दीयाल सूप उकळत बसलात तरी त्यातून गुणसूत्रे आणि गुणसूत्रतून पुढची साखळी निर्माण होणे शक्य नाही.

असे सिद्ध करण्यासाठी तुम्ही आम्हाला आव्हान देऊन लाखो अब्ज (म्हणजे हजारो बिगबँग मोजावे लागतील, परंतु, इतकी खुसपटे काढण्यातून एक डाव सूट देतो) वर्षे वाट बघितलीत काय? अन्यथा, तुम्ही म्हणता तिलाच आम्ही पूर्व (किंवा पश्चिम, किंवा उत्तर, किंवा दक्षिण, किंवा आग्नेय, किंवा वायव्य, किंवा नैऋत्य, किंवा ईशान्य, किंवा अध, किंवा ऊर्ध्व, किंवा त्रिमितीपलिकडील कोणतीही) दिशा का मानावी?

विद्ये बरोबरच विनय ही ज्यांच्या पाशी आहे

"हरिण शिरावा पाशी" व्यतिरिक्त 'पाशी' हे सप्तमीरूप कोठेही वाचनात आले नव्हते. विद्या आणि विनय यांचा बायोडेटा (आवडते खाद्य, बलस्थाने, फिरण्याची ठिकाणे, सवयी, इ.) उपलब्ध झाल्यास त्यांच्यासाठीचा पाश डिझाईन करणे शक्य वाटते.

ज्ञान व विज्ञानाच्या मर्यादा

कोणत्या? आणि त्या अद्वैतालामात्र नाहीत काय? का नाहीत?

अशांना ते जरूर वाचता येईल.

"अशांना ते जरूर पटेल" असे विधान शक्य आहे. वाचता येण्यासाठी भाषाज्ञान आणि दृष्टी या दोनच गुणांची (आणि पुस्तकाचे सान्निध्य, प्रकाशयोजना, आसन, इ. परिसरीय सुविधांची) आवश्यकता असते.

या स्थळावरच्या अनेक सदस्यांच्या भाषेवरून ते कुठल्यातरी विद्यापीठात प्राध्यापक वगैरे असावेत असे वाटते.

"या स्थळावरच्या अनेक सदस्यांच्या भाषेवरून ते कुठल्याही विद्यापीठात प्राध्यापक वगैरे असूच शकत नाहीत असे वाटते" असा काहींचा दावा आहे असे वाटते. सबब, भाषेवरून व्यवसाय ओळखण्याच्या पद्धतीचा ऑड्स रेश्यो क्षीणच सापडेल असे वाटते.

मला कळवल्यास काही पुस्तके मी ही पाठवू शकेन.

फुकट की विकत? झैरातीची स्टैल आवडली.

सर्व ज्ञान आपल्यालाच आहे

जगातील सर्व ज्ञान कुणालाच नाही पण म्हणून ह्या गृहितकाचा फायदा घेऊन काहीही बरळणार्‍यांना ठोकलेच पाहिजे. विज्ञानाला अनेक गोष्टी उमजलेल्या नाहीत, पण म्हणून ह्या रिकाम्या जागा दैवी चमत्काराने भरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? सध्याच्या ज्ञानामधे मानव वंश कुठून आला ह्या वैज्ञानिक प्रश्नाचे उत्क्रांतीवादाइतके स्पष्ट स्पष्टीकरण दुसरे कोणतेही नाही. तुमच्याकडे किंवा गोस्वामींकडे कडे असल्यास त्यांनी हा सिद्धांत खोडून का काढलेला नाही?

जडापासून चैतन्याची निर्मितीह्री.

मराठीमाणूस यांनी हा लेख लिहिताना जी उर्जा वापरली ती त्यांनी खालेल्या अन्नातून निर्माण झाली असल्याची शक्यता वाटते. जडातून चैतन्य निर्मितीचे हे अगदी सोपे उदाहरण आहे. याच्या विरुद्ध म्हणजे चैतन्यापासून जड निर्मिती कशी शक्य आहे हे आइ न्स्टाईनच्या E=mc2 या समीकरणावरून कळते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

उत्क्रांती

पृथ्वीवर सापडणारी जीवसृष्टी ही कोणालाही थक्क करून टाकणारीच आहे. उडणारे, चालणारे, धावणारे, गाणारे, बोलणारे जीव कसे तयार झाले असतील हा प्रश्न बहुतेकांनाच पडतो. पण सजीवसृष्टीची निर्मिती कशी झाली याबाबत तर्कशुद्ध उत्तर एकच आहे ते म्हणजे उत्क्रांतीवादाने दिलेलं. बाकी सर्व उत्तरं मूळ प्रश्नाला बगल देतात. 'देवाने जीव निर्माण केले' हे उत्तर नसून पळवाट आहे कारण इतकी आश्चर्यकारक सृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेला देव कोणी निर्माण केला हा प्रश्न राहातोच.

तुम्हाला खरोखरच या विषयावर काही वाचायचं असेल तर मी उत्क्रांतीविषयक लेखमाला - सरलतेकडून क्लिष्टतेकडे - लिहिलेली आहे. ती वाचूनही हे प्रश्न राहिले तर पुढे चर्चा करता येईल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

फरक

जिवंत रिकामटेकडे आणि रिकामटेकड्या चे प्रेत यात जो फरक आहे तोच जड आणि चैतन्यात आहे.
आम्ही चीतान्या मानीतच नाही हे कोण बोलते आहे? आपण दगड आहोत असा रिकामतेक्ड्याचा दावा तर नाही?
भाषेवरून लोक कोण आहेत हे ओळखायचे किंवा नाही हा माझा प्रश्न आहे. तुमच्या टगेगिरी चा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही.
मी पुस्तके देतो ही खैरात नाही. विक्री ही नाही. सामाजिक जबाबदारी नावाची गोष्ट जगात असते असेही कधीतरी समजायला हरकत नाही.
मराठीमाणूस

फरक

जिवंत रिकामटेकडे आणि रिकामटेकड्या चे प्रेत यात जो फरक आहे तोच जड आणि चैतन्यात आहे.

ते सारे फरक 'जड' आहेत.

आम्ही चीतान्या मानीतच नाही हे कोण बोलते आहे? आपण दगड आहोत असा रिकामतेक्ड्याचा दावा तर नाही?

मी बोलत नसून टंकन करीत आहे.
नाही, दगड असल्याचा दावा मी केलेला नाही.

भाषेवरून लोक कोण आहेत हे ओळखायचे किंवा नाही हा माझा प्रश्न आहे.

प्रश्न माझा असल्याचा माझा दावाच नाही. प्रश्न तुमचाच आहे, उत्तर शोधण्यातही तुम्हालाच रस दिसतो. मी केवळ टिपण्णी केली होती. नको तर र्‍हायले!

तुमच्या टगेगिरी चा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही.

टगेगिरी म्हणजे काय बरे? मी ती नेमकी कोणत्या विधानाने केली?

सामाजिक जबाबदारी नावाची गोष्ट जगात असते असेही कधीतरी समजायला हरकत नाही.

फुकट की विकत?

गोस्वामी

तुमच्या अमित गोस्वामीला गुगलुन पाहिले. 'इंटलीजंट डिझाईन' गटातले हे महाशय दिसतात.म्हणजेच विज्ञानाचा खून पाडणारी मंडळी. तुमचे पुस्तक फुकटही वाचायची इच्छा नाही.

मध्यंतरी इथले एक सदस्य असाच चमत्कार वगैरे माल खपवायला प्राचार्य अद्वयानंद गळतगेंची पुस्तके वाचायला गळ घालायचे. तुमचे गोस्वामी आणि गळतगे हे एकाच माळेचे मणी

विज्ञानाचा खून

अमित गोस्वामी हे क्वान्तम फिजिक्स मधील शास्त्रज्ञ आहेत असे मी ऐकले होते. त्यांनी विज्ञानाचा खून कधी केला ते मला माहित नाही. पुस्तक न वाचताच डोक्यात राख घालून घेण्याची स्टाइल आवडली.
मराठीमाणूस

होय

ईंटलिजंट डिझाइन आणि गॉड हायपोथेसिस वगैरे प्रकार हा विज्ञानाचा खून आहे. राख डोक्यात घालण्याचा प्रश्नच नाही असल्या पुस्तकांवर डोकं फोडण्याआधी वाचकांना सावध करण्याचे काम मी फुकट करतो आहे. त्याला तुम्ही माझी सामाजिक जवाबदारी समजायला हरकत नाही.

अमित गोस्वामी हे क्वान्तम फिजिक्स मधील शास्त्रज्ञ आहेत असे मी ऐकले होते.

दीपक चोप्रा हेही एम.डी. डॉक्टर आहेत असे मी ऐकले आहे, पण म्हणून ते जे बोलतात ते सगळे विज्ञानाला धरुनच असते असे नाही बरंका!

+१

दीपक चोप्रा हेही एम डी डॉक्टर आहेत असे मी ऐकले आहे, पण म्हणून ते जे बोलतात ते सगळे विज्ञानाला धरुनच असते असे नाही बरंका!

अनिरुद्ध बापू आणि प्रवीण तोगडियासुद्धा ना?

क्वांटम फिजिक्सच्या नावाखाली धूळफेक

विश्वाच्या पसार्‍याचा माग काढणे पृथ्वीपासून दूर जाऊ लागल्यावर जसे कठीण आणि धूसर होऊ लागते तसेच सुक्षपातळीवर कणांची जडण घडण आणि त्यांचा अभ्यास करणे हे ही मानवाच्या आकलनच्या कक्षेतुन निसटू लागते. त्यामुळेच स्ट्रींग थिअरी, क्वांटम मेकॅनीक्स हे सिद्धांत पराकोटीचे क्लिष्ट आणि समजण्यास कठीण आहेत. आणि त्याचाच फायदा काही स्युडो-सायंटीस्ट लोकांकडून उठवला जातो. प्रा.गोस्वामी हे त्याचे उत्तम उदाहरण.

रिचर्ड फाईनमन ह्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, "I think I can safely say that nobody understands quantum mechanics." खुद्द फाईनम ह्यांची ही प्रांजळ कबुली तर सामान्य माणसाची अवस्थ काय होत असणार? (मराठीमाणूस ह्यांना पुस्तक वाचून मात्र क्वांटम सिद्धांत समजलेला दिसतो) वर उल्लेखलेले अमित गोस्वामी हे स्वत:ला क्वांटव ऍक्टीविस्ट म्हणवून घेतात आणि देव वगैरे कल्पना सिद्ध झाल्या आहेत अश्या आवेशाने पुस्तके लिहितात. हे दुसरे काही नसून क्वांटम फिजिक्सच्या नावाखाली केलेली धूळफेक आहे.

प्रामाण्य

खुद्द फाईनम ह्यांची ही प्रांजळ कबुली तर सामान्य माणसाची अवस्थ काय होत असणार?

फाइनमन प्रामाण्य व्हर्सिस गोस्वामी प्रामाण्य!

चालू द्यात.

(प्रांजळ सामान्य माणूस!)

बरोबर

होय..'नेचर' प्रामाण्य वि. 'सनातन प्रभात प्रामाण्य' किंवा विज्ञान प्रामाण्य वि. भोंदूबाजी प्रामाण्य. चालू आहेच. तुमची परवानगी कोण मागतंय?

प्रतिसाद

तुमची परवानगी कोण मागतंय?

असे लेख लिहिले जावेत कारण त्यावर आलेल्या प्रतिसादांवरुन काही सदस्यांचा बौद्धिक आवाका समजतो.

विज्ञान??

रिचर्ड फाईनमन ह्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, "I think I can safely say that nobody understands quantum mechanics." खुद्द फाईनम ह्यांची ही प्रांजळ कबुली तर सामान्य माणसाची अवस्थ काय होत असणार?

जे कोणालाच कळले नाही ते विज्ञान कसे बा? :)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

लेखन कसोटी

हा लेख उपक्रमाच्या लेखन कसोटीत बसतो का?

बसणे

इथून काढून टाकलेला नाही म्हणजे बसतंच असणार ना?

लॉजिक

हा, हे लॉजिक चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या दुस-या आयडीने वर्जीनल लेख- ज्याच्या मसाल्याचा वापर करुन वरील लेख लिहीला आहे तो- काढून टाका असे सांगितले होते म्हणून हा प्रश्न मला येथे विचारासा वाटला.

रडू नका

उगी उगी, चॉकोलेट हवं?

चॉकलेट

बीफ घातलेलं का? नाव कळलं तर देऊ तेही!

जोडी आली.

आली ढवळ्या-पवळ्याची जोडी.

आदळ आपट

मुद्दा सोडून चाललेली डर्त मटार आणि रिकाम टेकडी यांची आदळ आपट वाचून करमणूक झाली. डर्त मटार यांना माझे इतकेच सांगणे आहे कि भारताची टीम पुढच्या राउंड मध्ये पोचली आहे. रिकाम टेकडी यांच्या मुडद्याच्या पोटात चंद्रशेखर यांनी अणुस्फोट करावा म्हणजे E = mc वर्ग या सूत्रानुसार उर्जा निर्माण होवून रिकाम टेकडी हे टंकन करू लागतील.;-)
मराठीमाणूस

हॅहॅहॅ

भांग न पिता काय फक्त गोस्वामींनीच लिहायचे ? तुमच्या सारख्या भक्तमंडळींचे काय?

क्रॅकपॉट

तुमच्या अमित गोस्वामींसारखे विज्ञानाचा खून पाडणारे लोक घेऊन 'व्हाट द ब्लीप डू वी नो' नावाचा चित्रपट बनवलेला दिसला. ह्या चित्रपटात तुम्हाला अमित गोस्वामीं बरोबर एक गठ्ठा असे अजून स्युडो शास्त्रज्ञ भेटतील. पण हा चित्रपट पाहून झाला की, विकीवर दिलेल्या ह्या चित्रपटाच्या माहितीमधे 'Academic reaction' हा भाग मात्र जरूर वाचून पाहा. क्वांटम मेकॅनीक्सचा तिथे जो उहापोह केला आहे त्याचे उत्तर आहे का? तुमच्याकडे नाही हो गोस्वामींकडे.

:)

तुमचे लेखन वाचून thanthanpal या आयडीचे स्मरण झाले.

हे

हे काये? काइच समजल् नाही.
आपला
अण्णा

लेख फारसा आवडला नाही.

दहाने गुणल्यावर त्या आकड्यावर शून्यच का येतं? गुणाकाराच्या प्रक्रियेमुळे.

दहाने गुणल्यावर उत्तराच्या शेवटी शून्य येते हे आकडे लिहीण्याच्या पद्धतीमुळे होतं, गुणाकाराच्या प्रक्रियेमुळे नाही. उदा:
I * X = X
L * X = D

गणिताच्या अर्धवट माहितीमुळे, गणितीय लिपीची नीट माहिती करून न घेता लिहीलेला लेख आहे असे प्रतीत होत आहे.

दुरुस्ती

रोमन संख्यांमध्ये गुणाकारच नव्हता. उदा., १०००० ही संख्या M * X अशी लिहिता येईल असे त्यांना समजले नसावे. तिला MMMMMMMMMM अशी लिहिण्याची पद्धतच त्यांना सुचलेली होती.
दशमान (फॉर दॅट मॅटर, इतर कोणतीही मान पद्धत) पद्धतीचा वापर, किंवा अशा पद्धतींचा आधार असलेला 'शून्याचा शोध', हा वास्तविक 'दहाने गुणण्याचा* अंकपद्धतीत वापर करण्याचा' शोध होता.

* 'दहाने गुणणे' हे वर्णन कोणत्याही 'मान' पद्धतीत लागू असते, दहाने गुणले की मूळ संख्येच्या शेवटी एक शून्य जोडले जाणे सर्वच 'मान' पद्धतींमध्ये घडते.

तर्क?

रोमन संख्यांमध्ये गुणाकारच नव्हता. उदा., १०००० ही संख्या M * X अशी लिहिता येईल असे त्यांना समजले नसावे.

यामागचा तर्क (/पुरावा) समजू शकेल काय?

गुणाकार हे 'बेसिक' ऑपरेशन रोमनांना माहितच नसेल हे मलातरी थोडं अतर्क्य वाटत आहे.

संदर्भ

जॉर्ज गॅमॉवच्या वन टू थ्री इन्फिनिटी या पुस्तकात (पान २० वर) तसा उल्लेख आहे.

प्रश्न बदलत नाही

उद्धृत वाक्य
दशमान पद्धतीमध्ये दहाने गुणल्यावर त्या आकड्यावर शून्यच का येतं? गुणाकाराच्या प्रक्रियेमुळे.

रोमन लिपीबाबत मध्ये हेच विधान
'रोमन अंकलेखन पद्धतीत, दहाने गुणल्यावर कधी आयचा एक्स होतो, तर एक्सचा सी होतो, एलचा डी होतो. का? तर गुणाकाराच्या प्रक्रियेमुळे' असं मांडता येईल.

गणितीय लिपीच्या मागे त्रुटी दडवण्याचा प्रयत्न अयशस्वीच होणार. लिपींच्या क्लिष्टतेमुळे या सगळ्यातली निरर्थकता आणखीनच वाढत नाही का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर