उत्क्रांतिवादखण्डन आणि डायनोसोरचे मिथक
एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते . ह्या दोन शतकातील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर डार्विनचा उत्क्रांतिवाद ! अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना व इतर पुरोगामी संघटना ही अन्धश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील काय ? आपण पाहू ही अन्धश्रध्दा कशी ठरते ते . सर्वसामान्याना ह्याचा परिचय माकडापासून माणूस झाला ह्या वाक्याने असतो . ह्या सिध्दान्ताचे मुख्य तत्व असे " जे सक्षम आहेत ते वाचतात व जे वाचतात ते उत्क्रान्त होतात " ह्या सिध्दान्तामध्येच मोठा तर्कदोष आहे . कसा ते आता पाहू .
अ हा ब वर आधारित आहे व पुन्हा ब हा अ वर आधारित आहे ह्या प्रकाराला अन्योन्याश्रयदोष असे तर्कशास्त्रात म्हंटले जाते. हाच दोष उत्क्रान्तिवादाच्या मुख्य सिध्दान्ता मध्ये आहे . प्रकृतिच्या (नेचरच्या) संकटातून वाचणारे कोण ? तर जे सक्षम आहेत . आणि सक्षम कोण आहेत तर जे प्रकृतिच्या (नैसर्गिक) संकटातून वाचले आहेत . ह्या एकमेकांवर आधारित व्याख्या ना कोण सक्षम आहेत हे सांगतात ना कोण नक्की वाचले आहेत हे सांगतात . अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त ह्या सिध्दान्तावर पुढचा सारा डोलारा उभा आहे.आता ह्यातील उपसिध्दान्त म्हणजे , सुरुवातीला जलचर व वृक्ष होते, नंतर ते जमिनीवर आले . मासा पक्षी बनला हा त्याच सिध्दान्ताचा निष्कर्ष . कारण काय ? तर प्राकृतिक संकटामुळे त्याने स्वत:मध्ये अनुकुलन केले व उडण्यासाठी पंख व श्वासांसाठी नाक विकसित केले. हे कधी केले तर कोट्यवधी वर्षांपूर्वी . तेव्हा झाले ना मग आता का होत नाही ? पाण्यातुन बाहेर काढलेला मासा पक्षी बनत नाही तर मृत्यु पावतो . ह्याला उत्तर काय ? तर असे अनुकुलन होण्याची प्रक्रिया कोट्यावधी वर्षांची आहे. ह्याचाच अर्थ हे अनुकुलन कसे होते हे कुणीच शास्त्रज्ञ प्रयोगाने सिध्द करू शकणार नाही .
आता ह्यांच्याच म्हणण्यानुसार शार्क , मगरी , झुरळ इ. सर्वात प्राचीन प्राणी आहेत . मग ह्या जाति उत्क्रान्त न होता , तशाच का टिकून आहेत ? उत्तर नाही. आता ह्या पैकी काही मगरी, शार्क ह्यांचींच उत्क्रान्ति कशी झाली ? सांगता येत नाही . ंमासा व पक्षी ह्यांच्यामधील प्राणी का अस्तित्त्वात नाही ? उत्तर नाही . जी एक दोन जीवाश्मे ह्या मधल्या प्राण्याबाबत दाखवली जातात ती संशयास्पद आहेत . निर्विवाद नाहीत (जीवशास्त्रज्ञाना विचारा)
हाच प्रकार माकडाच्या एका जातिपासुन माणूस बनला ह्या मध्ये आहे. मधल्या जातिच अस्तित्वात नाहीत. एकूण विचार करता ह्याला शास्त्रीय सिध्दान्त म्हणणे हा विनोद होइल. लाखो-कोटि वर्षांची प्रक्रिया दाखवली की प्रयोग व पुरावा दोन्हीची आवश्यकता समाप्त होते . सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनिर्मिति आणि उत्क्रान्तिची मुख्य कारणे योगायोग आहेत . पृथ्वीवरच पाणी का निर्माण झाले ? कारण सुर्यापासुनचे विशिष्ट अंतर . अमिनो असिड मधले नायट्रोजन संयुग कशामुळे ? तर योगायोग. एकपेशीय बहुपेशीय कसे बनले ? संरंक्षणासाठी. पण हा सरंक्षणाचा विचार मेंदु नसताना कसा आला? उत्तर नाही .. एकुण एक सर्व प्रक्रिया ठराविक क्रमाने घडणाऱ्या योगायोगांवर अवलंबून आहे . हे काय विज्ञान झाले ?? ...............आता तुम्ही म्हणाल हे जर एवढे तर्कदुषित आहे, तर ही थेअरी एवढी प्रसिध्द का ?????????? त्याचे कारण दिसणारी समानता !!
मासे व पक्षी , चिंपांझी व माणूस ह्यांच्या गुणसूत्रांत समानता दिसते ह्याचा अर्थ असा नव्हे की एक दुसऱ्यापासून बनला . कुठला ही सबळ पुरावा व तर्कशास्त्रीय आधार नसताना वैज्ञानिकांना ह्या समानतेच्या आधारावर उत्क्रांतिच्या सिध्दांतावर पोचावे असे का वाटले ? कारण त्यांना विश्वनिर्मितीचा दुसरा प्राचीन सिध्दान्त लवकरात लवकर निकालात काढायचा होता .त्यासाठी मग हिमयुग , अश्मयुग , डायनोसोर युग इ. मिथ्या कल्पना बनवण्यात आला. त्याना मिथ्या अशासाठी म्हणत आहे कारण त्यांना कोणताही तर्कशास्त्रीय आधार नाही व प्रत्यक्षजन्य पुरावा नाही.
डायनोसोर युगासंबंधी थोड इथे सांगितल पाहिजे . ह्या विचित्र प्राण्याचे संपूर्ण सांगाडे कुठेही सापडलेले नाहीत . मोठी हाडे व हाडांची रचना सापडलेली आहे जी दुसऱ्या अज्ञात प्राण्यांची ही असु शकते . कल्पनेने वैज्ञानिकांनी हा प्राचीन प्राणी कसा असेल ह्या विषय़ी अंदाज बांधले आहेत. हा प्राणी कसा नष्ट झाला , कोणा कडेच सबळ थेअरी नाही. उल्कापाताने नष्ट झाला वगैरे कल्पना आहेत. निसर्गात नेहमी समतोल दिसुन येतो . डायनोसोर सारखा असंतुलित प्राणि जर पृथ्वीवर असता तर इथले सारे जीवनच धोक्यात आले असते . साहजिकच माणूस त्यावेळी उत्क्रांत झाला नसता . हेच नेमके ह्या वैज्ञानिकाना व तत्ववेत्यांना हवे होते. डायनोसोर ची थेअरी मांडली की आपोआप उत्क्रांतिवादाला आधार मिळतो व समाजाच्या मनातील विश्वनिर्मितिच्या अन्य श्रध्दा सहज हद्द्पार करता येतात.
जलचर, उभयचर, वृक्ष, माकडे , माणसे , कीटक, पक्षी ह्यांच्यातील जनुकीय समानते वरुन एक दुसऱ्यापासून उत्पन्न झाला अशा निष्कर्षापेक्षा , हे सर्व एकाचवेळी उत्पन्न झाले असा सिध्दान्त फार पूर्वी पासून मानव समाजाने श्रध्देने धरुन ठेवला आहे. हा समाज म्हण्जे पृथ्वीवरील धार्मिक लोकांचा समाज होय. धार्मिकलोक हे उपयोजित विज्ञानाबरोबर तर्कशास्त्र व तत्वज्ञान ह्यांचाही विचार करायचे . आजचे वैज्ञानिक निव्वळ उपयोजित विज्ञानावर विसंबून तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करतात . त्यामुळे दोघांचे निष्कर्ष वेगवेगळे येतात . आपण उदाहरण घेऊन समाजावुन घेऊ.
अणु हा जड आहे हे सर्वांना मान्य आहे. अनेक अणु एकत्र येऊन त्यांच्यापासुन प्रथम अमिनो असिड व नंतर एकपेशीय जीव निर्माण होण्याचे कारण काय ? आधुनिक विज्ञान सांगते योगायोग !!! आता योगायोग व्हायला काही कारण ? दुसरा योगायोग जे चुकीचे उत्तर ठरेल . कारण त्याने अनवस्था हा तर्कदोष निर्माण होतो. अनवस्था म्हणजे कधीही न संपणारी कारणपरंपरा . अनएन्डिग लूप . त्यामुळे हा सिध्दान्त चुकीचा ठरतो.
तर्कशास्त्रात कारणे दोन प्रकारची असतात . उपादान आणि निमित्त ! उपादान कारण म्हणजे, कारण स्वत:च कार्यात रूपांतरित होणे . उदा. दुधाचे दही बनणे. निमित्त कारण म्हणजे , जे कारण अलिप्त व अंतिम आहे त्याला कोणते ही अन्य कारण असता कामा नये. अणु किंवा डीनए हे जर उपादान कारण असतील तर, रुपांतरणानंतर उत्क्रांति थांबली पाहिजे .पण वैज्ञानिकांच्यामते उत्क्रांति अजुनही सुरुच आहे . त्यामुळे अणु हे विश्वनिर्मितिचे उपादान कारण होऊ शकत नाही. मग साहजिकच विश्वनिर्मितेचे कारण निमित्त व तटस्थ असले पाहीजे. हे निमित्त कारण वैज्ञानिक कधी ही मान्य करत नाहीत . कारण ह्या तर्काने त्यांच्या काल्पनिक उत्क्रान्तिवादाचे खण्डन होते व हा तर्क सरळ सरळ ईश्वराकडे घेऊन जातो .
Comments
संपादकांना विनंती
कृपया हा धागा अप्रकाशित करा.
(इतर सदस्यांनी शिफारस केल्याशिवाय) धागे कातण्याचा अधिकार सर्वच सदस्यांना मिळू नये असे मला वाटते.
का?
कृपया हा धागा अप्रकाशित करा.
का?
(इतर सदस्यांनी शिफारस केल्याशिवाय) धागे कातण्याचा अधिकार सर्वच सदस्यांना मिळू नये असे मला वाटते.
पुन्हा एकदा "का"?
आता मूळ् लेखाबद्दल :-
"आपादान् कारण, निमित्त्" वाला शेवटचा प्यारेग्राफ स्वामी विवेकानंदांच्या "भारतीय व्याख्याने" ह्या जाडजुड् भाषण् संग्रहातुन जश्शाला तस्सा घोकंपट्टी करुन वक्तृत्व स्पर्धेत धडाधड म्हणुन दाखवला होता, त्याची आठवण झाली.
मला कित्येकदा घासलेले उतारे अजाब्बात समजुन् न घेता निर्बुद्धपणाने तसेच् म्हणुन दाखवता येतात.
आपणही माझ्यासारखेच आहात काय?
मनोबा
मनोबा.......
मनोबा.......
उपादान आणि निमित्त कारण तसेच कार्यकारण भावाविषयी तत्ववेत्त्यांची मते यावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे... फक्त विनंति एवढीच ...की आपल्याला खालील तत्ववेत्त्यांच्या विचारांचा विस्तृत परिचय असावा.....
नागार्जुन(शून्यवाद्),गौडपाद(कार्यकारणभावाची चतुष्कोटि),सांख्यविचार....
अट आवडली :)
चर्चेसाठी असलेली अट आवडली.
-दिलीप बिरुटे
(वाचक)
><
'विज्ञान' हा विषय दिलेला असल्याने हा धागा वाचकांची दिशाभूल करत आहे, असा युक्तिवाद शक्य आहे.
अप्रकाशित करू नये...
रास्त प्रश्न विचारलेले आहेत. लेखकाचे काही गैरसमज व काही अज्ञान आहे. त्यांवर उत्तर द्यायचं की नाही हे प्रत्येकाला ठरवता येईल.
तूर्तास
हे वाचून 'शेक्सपियरचे लेखन त्याने केलेले नसून विलियम शेक्सपियर नावाच्या दुसऱ्याच कोणीतरी केलेले आहेत' ही उक्ती आठवली. यात नक्की कुठचा तर्कदोष आहे त्याचं नाव मला माहीत नाही. माझं संस्कृत खूप कच्चं आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
सहमत आहे.
सहमत आहे. लेख काढायची गरज नसावी परंतु होणार्या चर्चेत ईश आपटे यांचा सहभाग गरजेचा आहे.
तुर्तास
हेच म्हणतो. लेखकाने उपक्रमावर सक्रिय सहभाग दाखवल्यास खंडनाचे कष्ट घ्यायला हरकत नाही, म्हणुन् तुर्तास फक्त पोच.
-Nile
स्वागत आहे.
उपक्रम मराठी संस्थळावर स्वागत आहे.
-दिलीप बिरुटे
(उपक्रमी)
आभारी आहे ........
आभारी आहे ........
तूर्तास पोच, थोडे स्पष्टीकरण
तूर्तास पोच.
राजेश घासकडवी यांच्याशी सहमत.
- - -
शेवटच्या परिच्छेदांतील कठिण शब्दांबद्दल थोडे स्पष्टीकरण हवे आहे.
वरील लेखात सांख्य तत्त्वज्ञान किंवा नागार्जुनाचे तत्त्वज्ञान कुठे उल्लेखलेले आहे त्याबद्दल थोडे सांगावे. जर खुद्द लेखकाने उल्लेख केलेला असेल, तर ते परिच्छेद समजून घेण्यासाठी ही तत्त्वज्ञाने समजून घेण्यात काही हशील आहे.
"निमित्त कारण" या संकल्पनेचे एखादे उदाहरण सांगाल काय? "उपादान कारण" या संकल्पनेचे उदाहरण दिले आहे, ते समजले. असेच समजेलसे रोच्या व्यवहारातले उदाहरण दिले तर समजायला सोपे जाईल. "निमित्त कारण" याची व्याख्या तुम्ही दिलेली आहे - "अलिप्त व अंतिम". ही व्याख्या प्राचीन भारतीय दर्शनांपैकी कित्येक दर्शनांशी जुळत नाही. उदाहरणार्थ न्यायशास्त्रात - तसेच मीमांसेत, वेदांतात - मडक्याचे निमित्तकारण कुंभार आहे, असे उदाहरण मिळते. सांख्यात काही वेगळे होते, हे मला आजवर ठाऊक नव्हते. [सांख्यांचे मत वेगळे असेल, तर पडताळण्यासाठी सुयोग्य संदर्भ सांगा, आणि नेहमीच्या पाठ्यपुस्तकांपेक्षा तोच संदर्भ उजवा का, ते सांगावे.] पण कुंभार हा तर अंतिम आणि अलिप्त नसतो. म्हणजे तुमची विलक्षण व्याख्या - ती नागार्जुनाची आहे काय? संदर्भ द्यावा - ही बहुतेक प्राचीन भारतीय दर्शनांना सुद्धा मान्य नाही. जर तुमच्या मते प्राचीन उदाहरण "मडक्याचे निमित्त कारण = कुंभार" हे ठीक असेल, तर मग तुम्ही वापरता ते "अलिप्त" आणि "अंतिम" हे शब्द मला कळलेले नाहीत. कुंभार "अलिप्त" कसा, आणि "अंतिम" कसा, हे समजावून दिल्यास मला तुमच्या वापरातले "अलिप्त" आणि "अंतिम" हे शब्द समजू येतील.
वॉचमेकर
या धाग्यात चांगली चर्चा होऊ नये अशी माझी इच्छा होती. आता नाइलाज आहे.
मला कळलेले अर्थः
अलिप्त: कुंभाराचे मडक्यात रूपांतर होत नाही.
अंतिम: कुंभार गृहीत धरला की मडके बनण्यासाठी इतर काही परिस्थिती गृहितणे आवश्यक नसते, तो 'स्वेच्छेने' मडके बनवितो.
सहमत
सहमत
मजकूर संपादित.
सवय आहे
कोणा सोम्यागोम्याने* मुद्दाम कळ काढण्यासाठी लेख टाकले आणि लेख टाकून लेखक पॉपकॉर्न खात बसला तरी गंभीरपणे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याची उपक्रमींची रीत जुनीच हं! वाईट वाटून घेऊ नका.
* येथे वरील लेखकाला सोम्यागोम्या म्हटलेले नाही. ते नवीन असल्याने सर्वांच्या प्रतिसादांना उत्तरे देतील अशी आशा करू. ;-)
कुंभार हा मडक्याचे निमित्त कारण आहे
कुंभार हा मडक्याचे निमित्त कारण आहे .... इथे कुम्भाराचा दृष्टान्त कुम्भार माती,पाणी,चाक इ. साधनांचा वापर करुन मडके बनवतो पण तो स्वतः मडके बनत नाही हे समजाउन देण्यासाठी आहे. माती व मडके ह्यापेक्षा तो अलिप्त् आहे..व ह्या उदाहरणात कुम्भाराच्या कारणपरंपंरेचा कुठेही संबंध येत नाही.. त्यामुळे मडक्याच्या दृष्टीने कुम्भार अलिप्त व अंतिम कारण आहे असे म्हणता येऊ शकते..........
बहुपेशीय जीवांचे कारण एकपेशीय जीव...त्यांचे कारण अमिनो असिड ...त्याचे अणु..त्याचे इलेक्ट्रान्...त्याचे बिग बन्ग् ...असे न संपणारी कारण परंपरा निर्माण होते...त्याला अनवस्थादोष म्हणतात....कुठल्यातरी टप्प्यावर ..कार्यकारणभाव सोडावा लागून अलिप्त् निमित्त् कारणाचा विचार करावा लागतो....
सेश्वर सांख्यांनी असेच केले आहे...
उपयोजित शास्त्राला तर्कशास्त्राची संगत असली पाहिजे... शे़कोटी पेटवुन उष्णता आदिवासी ही मिळवतो...उष्णतेचे घटक काय्?...तिचे मापन काय ? ती कुठन आली ??? ती अणुपासुन आली का वीजेपासुन आली ? इ. प्रश्न महत्वाचे आहेत....त्याने संस्कृतिचा विकास होईल...पण...शास्त्र पूर्णतेस जाईल काय??
जे शास्त्र उष्णतेचा अंतिम उगम (कारण्) सांगू शकेल..तेच पूर्ण म्हणता ये़ईल.........
नागार्जूनाचे नाव मी कार्यकारणभावाची चर्चा करायची असल्यास पार्श्वभूमी म्हणून घेतले आहे..
काहींचा अशा गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे....
याच सदरात मोडणारा हाही लेख वाटतो. याच्या प्रतिवादासाठी संदर्भ शोधा, मुद्देसूद उत्तर द्या व शेवटी माझेच खरे याला तोंड द्या असे काहीही घडू शकते. डार्विनवाद किती खोटा आहे यासाठी ढिगाने पुस्तक लिहिली आहेत व त्या विकत घेवून वाचल्याही जातात. परंतु तज्ञांच्यासमोर त्यांचे arguments टिकू शकले नाहीत. वृथा वेळ व श्रम वाया घालण्यात अर्थ नाही असे मला वाटते.
कॉन्सपिरसी थीअरी ?
मूळ धागा हा उपरोल्लेखीत उदाहरणांप्रमाणे कॉन्सपिरसी थीअरी असू शकेल?
धागाकर्ते (अजूनतरी) गायब न झाल्याने बरे वाटले.
||वाछितो विजयी होईबा||
मालिका
लेखक महोदयांनी राजेश घासकडवी यांची सरलतेकडून क्लिष्टतेकडे ही मालिका प्रथम वाचावी. येथे त्या मालिकेचे दुवे मिळू शकतील.
ही मालिका वाचल्यावर उत्क्रांतीचे तत्त्व नेमके काय आहे आणि काय नाही याचा खुलासा होईल आणि ईश आपटे यांनी परिस्थितीशी जुळवणे - मासा - पाण्याबाहेर मरतो यांसारखी ढोबळ विधाने केली आहेत त्यातली गफलत त्यांच्याच लक्षात येईल.
मग चर्चा करण्यात काही हशील राहील.
(सर्क्युलर रेफरन्सच्या मुद्द्यावर चर्चा करायला हरकत नाही).
नितिन थत्ते
स्वागत आणि काही प्रश्न
येथे स्वागत.
धागा प्रचारकी नसावा, तळमळीतून लिहिला असावा असे मी समजतो. पण अजून खात्री नाही. (अवांतरः अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत डार्विन विषय भारतात फारसा बोलण्यासारखा नसतो.)
माझी तुम्हाला काही विनंत्या आहेत. विचार व्हावा. विषय मोठा आहे. नुसता ठेवावा की नाही यावर शंभरी गाठेल की काय असे वाटते.
उपक्रमवर या विषयी चांगले लेख आलेले आहेत. ते आपण पाहिले नसावेत. त्यांचे अवलोकन करावे. त्यातील मुद्यांचे खंडन केल्यास जास्त मजा येईल.
या लेखनासाठी तुम्ही कुठले संदर्भ वापरता याचा उल्लेख करावा.
अगदी साधे म्हणजे डार्विनचे कुठले पुस्तक वाचले आहे की ज्यातील मताचे तुम्ही खंडन करीत आहात. किंवा डार्विनसमर्थकांचे कुठले पुस्तक/लेख आपल्याला खंडनीय वाटतो. याची यादी द्यावी.
हे झाले की वाद घडायला थोडी सुसुत्रता येईल.
आपल्या लेखात याला प्रुरावा नाही त्याला पुरावा नाही, हे कसे झाले, या पद्धतीचे प्रश्न आहेत. हे पुरावे नाहीत असे गृहित धरले (मला यातले फारसे माहित नाही.) आणि कसे झाले हे देखिल माहिती नाही. असे धरून चालू. पण विरुद्ध पुरावे आहेत का याचा उलगडा झाला नाही. त्याच बरोबर लेखात उत्क्रांती नाहीतर व्युत्क्रांती अशी मांडणी नाही. अशी मांडणी असती दोन्हींची गृहितकांची संख्या आपण मोजू शकलो असतो. कुठली थियरी सयुक्तिक कमी खर्चिक (ऑकॅम वस्तरा) ठरवू शकलो असतो. तुमच्या कडे तशी व्युत्क्रांतीची छुपी मांडणी नसावी अशी मी अशा धरतो.
प्रमोद
प्रमोद ह्यांना
प्रमोद ह्यांना...
सिध्दान्त हे तर्कशास्त्राला धरुन असले पाहिजेत................
अनवस्था व अन्योन्याश्रय दोष असलेला सिध्दान्त मान्य होउ शकत नाही... कृपया उत्क्रान्तिवादामध्ये हे दोष आहेत ह्याचा आपण थोडा सावकाश विचार करावा......... खंडीभर पुस्तके जरी वरील दोषांनी युक्त असलेली असतील व ती नोबेल पुरस्कार प्राप्त लोकांनी लिहीली असतील तरीही ती मान्य होऊ शकणार नाहीत.....................
ईश यांना.....
अनवस्था व अन्योन्याश्रय हे मूळात दोष नाहीतच कारण त्यामधे मुनिममभवन कर्ता नाही......... तसेच मृत्यु अवश्यंभावी ठरवण्यासाठी अनवस्थेची गरज असते. त्यामूळे....... खंडीभर प्रतिसाद लिहिलेत तरी तुम्हाला आम्ही खुळ्यात काढणार नाही. ...
मुनिममभवन
डार्क मॅटर ह्यांना मुन्नीचा अगदी चपखल असा उल्लेख केला आहे. इथे मुन्नीशिवाय झंडूबामही कर्ता आहे हेही नमूद करावेसे वाटते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कर्ता
तुम्ही अजून गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. इथला कर्ता हा तौलिया (throw in the towel) आहे. जुन्या वस्त्रांचा(म्हणजे टॉवेलचा) त्याग करुन नवीन वस्त्रं धारण करुन आला आहे.
पुनर्जन्म की उत्क्रांती?
अच्छा असे आहे तर. तिकडे फेकलेल्या टावेलातून इकडे ही उत्क्रांती झाली आहे तर. आणि तसाही हिंदू धर्मात पुनर्जन्म आहेच की. गांभीर्याने घ्यायलाच हवे आता.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
विनंती
मी केलेल्या विनंत्या तुम्हाला मान्य नाही का?
कुठली वैज्ञानिक थियरी तुम्ही लिहिलेले दोष नसलेली आहे हे कळवावे. (ही अजून एक विनंती).
प्रमोद
कुठली ही थेअरी ही पूर्ण असावी व दोषरहित असावी हे आपल्याला मान्य
जगत् उत्पत्तिच्या कुठल्याही वैज्ञानिक थेअरीत वरील दोष येतात..हे दोष टाळून जर् तुम्हाला पुढे जायचे असेल तर मग तुमचा सांख्य विचारामध्ये प्रवेश होतो... कुठली ही थेअरी ही पूर्ण असावी व दोषरहित असावी हे आपल्याला मान्य आहे काय ????
अमान्य
माझ्या विनंत्यांना तुम्हाला मान्य आहेत का? याचे उत्तर अजून बाकी,
जगत् उत्पत्तिच्या कुठल्याही वैज्ञानिक थेअरीत वरील दोष येतात
म्हणजे जगत् उत्पत्तिविषयी कुठलीही वैज्ञानिक थियरी मांडूच नये. हे आधीच सांगितले असते तर बरे झाले असते. मग डायनासोरचा सांगादा मिळाला नाही, जीव कसा झाला, एकपेशियांचे बहुपेशिय कसे झाले हे माहित असणे नसणे निरर्थक होते. एवढा मोठा लेख लिहायच्या ऐवजी जगत् उत्पत्तेची कुठलीही थियरी सदोष असते. म्हणून उत्क्रांतीवाद सदोष आहे हे म्हणणे पुरेसे होते.
कुठली ही थेअरी ही पूर्ण असावी व दोषरहित असावी हे आपल्याला मान्य आहे काय ????
»
एकदम नाही. सर्व थियर्या टेंट्याटिव असाव्यात असे माझे मत आहे. म्हणजे काहीतरी संशोधन करता येते.
सगळे फुल आणि फायनल नसावे या मताचा मी आहे.
प्रमोद
प्रश्न
हा लेख या ब्लॉगवर देखील पूर्वप्रकाशीत केलेला दिसत आहे. तो ब्लॉग आपलाच आहे असे गृहीत धरत आहे पण आपण तसे खात्रीलायक सांगितले तर बरे होईल.
निमित्त कारण म्हणजे , जे कारण अलिप्त व अंतिम आहे त्याला कोणते ही अन्य कारण असता कामा नये.
"निमित्त कारण" = "Intelligent design" का? तसेच आपल्या वर उर्धृत केलेल्या वाक्यासंदर्भात काही संदर्भ द्यावात ही विनंती.
प्रकरण गंभीर आहे
ब्लॉगवर अतिशय मौलिक आणि मूलभूत असे संशोधन मांडलेले दिसते आहे. पृथ्वी त्रिकोणी आहे काय हा लेख चाळला. त्यातली एक चुणूक:
"अशाच प्रकारे पृथ्वीचे देवतारुप गाय आहे. गाय ज्याप्रमाणे दूध देऊन पोषण करते, त्याप्रमाणेच पृथ्वी अन्न देऊन पोषण करते. मनुष्याच्या जन्माला वीर्य कारणीभूत आहे व वीर्य अन्नापासून बनते. अन्न पृथ्वीपासून येते, त्यामुळे सर्व प्राणिमात्रंच्या जन्माला व्यापक अर्थाने पृथ्वी कारणीभूत आहे. पृथ्वी त्यामुळेच सर्वांची माता ठरते. गाय हे पृथ्वीचे देवतारुप असल्याने, गाय ही सर्वांची माता ठरते. सावरकरांनी म्हण्टल्याप्रमाणे ती केवल, बैलांची माता ठरत नाही. ती सर्व मनुष्य ,देवता आदि सर्वांची माता ठरते. म्हणूनच वैदिक धर्माने गाईला पूजनीय केले आहे. हे झाले पृथ्वीचे देवतारुप ! पृथ्वीचे मूर्तरुप ही योगबलानुसार भिन्न भिन्न दिसते. सामान्य जीवांना ती चेंडू सारखी गोल प्रतीत होते, तर असामान्य योगबल असणाऱ्याना त्रिकोणाकृती दिसुन येते. सामान्य दृष्टीने ती आकाशात तरंगत आहे, तर योगज दृष्टीने ती सप्त द्वीपे व सप्त सागर ह्यांनी युक्त असुन भगवान शेषांनी आपल्या फणेवर धारण केली आहे. हे समजण्यासाठी आपण थोडा प्राचीन वैदिक भूगोल बघू, हा बराच रहस्यमय आहे."
थोडक्यात हे प्रकरण गंभीर आहे. त्यांना कुणी खोडसाळ सोम्यागोम्या म्हणणे योग्य ठरणार नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
त्रिकोणी
>>पृथ्वी त्रिकोणी आहे काय हा लेख चाळला.
गूगल अर्थवरून पृथ्वीचे फोटो गोल दिसतात ब्वॉ !!!! डोळे तपासून घ्यायला हवेत तातडीने. :-(
(अर्थात ते फोटो खरंच सॅटेलाईटमधून काढलेले असतात की शिजवलेले असतात काय माहीत !!!)
नितिन थत्ते
डोळे तपासायची गरज नाही.
डोळे तपासायची गरज नाही. तुमच्याकडे (किंवा तुमच्या अभद्र सॅटेलाइटकडे) 'असामान्य योगबल' आहे का?
कदाचित
>>गूगल अर्थवरून पृथ्वीचे फोटो गोल दिसतात ब्वॉ
कदाचित गुगल अर्थच्या सॅटेलाईट कॅमेर्यांना "असामान्य योगबल" नसावे!
विकास ह्यांना..........
होय माझाच आहे.............
'स' का खाल्ला?
पण तिकडे तर लेखकाचे नाव सतिश असे लिहिले आहे. ईश आपटे = सतिश आपटे असेच काय?
काय प्रॉब्लेम आहे?
काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कशाला नव्या सदस्याला छळता? योगबलाने पृथ्वी त्रिकोणी दिसू लागते तसेच योगबलाने ईश आपटे हे सतीश आपटेही दिसू लागतील तेव्हा आधी योगबलाची प्राप्ती करा. ;-) उगीच नसत्या शंका नकोत. ;-)
प्रॉब्लेम....
माझा प्रॉब्लेम काय आहे हे सांगायची माझी तयारी आहे पण.......महामंडेश्वर बाल योगिनी ह्यांच्या विस्तृत विचारांचा आपल्याला परीचय आहे काय?... हे कळल्याशिवाय स्पष्टीकरण अशक्य आहे
उरलेला प्रश्न
उरलेल्या प्रश्नाचे उत्तर पण द्यावेत ही विनंती:
निमित्त कारण हे जाणिव असलेला कर्ता असणार हे उघड आहे...
कारणांच्या प्रकारांविषयीची वाक्ये एका विशिष्ट ग्रंथातील नाहीत.... आपण तर्कसंग्रह , सांख्यकारिका हे ग्रंथ वाचू शकता....
निमित्त कारण हे intellgent कर्ता असणार हे उघड आहे............ जाणीव ही एका पेक्षा अनेक पदार्थांची बनलेली असू शकत नाही.... मेंदू ही तिला निर्माण करत नाही.... ती कारण व कार्य यात फिरणार्या द्रव्यापेक्षा अलिप्त असते..........
ता.क.-उत्क्रांतिवादाचे खंडन ईश्वरनिर्मितिच्या सिध्दान्ताकडे नेते हा बर्याच लोकांचा पोटशूळ आहे...त्यांच्या उत्क्रांतिनुसार पोटात अनावश्यक असलेले अपेंडीक्स बहुदा त्यांना ईश्चरविरोधी बनवत असावे...
पटतंय बॉ.
सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो. आपण इथे सर्वच विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही,इथे कोणतीही रीत,पद्धत,वगैरे नाही.असे असतांना आपण दिलेली उत्तरे मला आवडत आहे. उगाच 'काही' सोम्या गोम्यांच्या (गोमी) प्रतिक्रियेचे दडपण घेऊ नका.
उत्क्रांतिवादाचे खंडन ईश्वरनिर्मितिच्या सिध्दान्ताकडे नेते हा बर्याच लोकांचा पोटशूळ आहे
करेक्ट हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. ब-याचदा नास्तिकवाद हा उथळ आहे असे म्हटले जाते त्याचे हेच कारण आहे की त्यांना कोणताच विचार मान्य करायचा नसतो. साधी गोष्ट आहे, जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले की लक्षात येते की, जगातील अनेक गोष्टींमधे एक उत्कृष्ट अशी व्यवस्था दिसून येते आणि ही व्यवस्था करणारा कोणी तरी असलाच पाहिजे. आपण जमेल तसे लिहित राहा. मला ग.ह. पाटलाची कविता डकवायचा मोह आवरत नाही.-
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश, सूर्य देतो
सुंदर चांदणे, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाती गाणे
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर, असशील
-दिलीप बिरुटे
:)
हे कधीकधी स्वतःलाच मदारी समजतात परंतु इतर वेळी चांगले नाचतात.
+१
उपक्रम चांगले चालू नये या इच्छेतून असे होत असावे. :-) ते करताना आपण स्वतःचे किती हसे करवून घेत आहोत हे जाणवत नाही याचा खेद वाटतो. :-(
+१
असेच. हेच तर मुद्दे आहेत :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हाच तर मुद्दा आहे...........
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांस...
हाच तर मुद्दा आहे........... आणि आभारी आहे प्रोत्साहनाबद्दल..............
गंभीर आक्षेप
ईश आपटे ह्यांनी उत्क्रांतिवादावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. पण डार्विनवाले प्रतिवाद करतील असे वाटत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश आपटे ह्यांचा लेख हे विडंबन वाटत असले तरी विडंबन नाही. ह्या लेखाने लेख नीट वाचू शकलेल्या शहाण्यासुरत्या वाचकांना मंदबुद्धीचे केल तर त्यात नवल ते काय ?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
असहमत
मला हे पटत नाही. माझ्या मते वरील लेख हा विडंबनच आहे. रिडक्शिओ अॅड अॅब्सर्डम करून विसंगती वाचकांवर बिंबवण्याची आगळीच तऱ्हा वाटते. नाहीतर लेखात इतकी बिनबुडाची वाक्यं येणंच शक्य नाही. शिवाय तर्कशास्त्राचा आधार घेण्याच्या मिषाने मुद्दामून तर्काची खिचडी करण्याचं प्रयोजनच काय असू शकतं? सगळं प्रकरण फारच तरल वाटतंय.
मूळ लेखाचा दुवा लेखकाने द्यावा ही विनंती. कदाचित उपक्रमींनी आपल्या कळफलकांना चालना देऊन, गूगल इंजिन थोडं तापवून तो शोधून काढावा अशी लेखकाची इच्छा असावी.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
तर्क
नुसता डार्विनच्या सिद्धांताला विरोध म्हणून विरोध करणार असाल तर हे थोडेसे निरर्थक वाटते, का ते सांगतो.
प्रेमीस असे आहे -
जनुकीय बदल होतात हे सिद्ध आहे, बदल हे परिस्थितीचा सामना करण्यासाठी किंवा जुळून घेण्यासाठी असतात हे हि सिद्ध आहे.
मुद्दा १. बदल होण्यासाठी शारीरिक इंटेलिजन्स असणे गरजेचे आहे, तो प्रत्येक सजीवात असतो हे सिद्ध आहे.
मुद्दा २. जर "बदल" होऊ शकतो हे सिद्ध आहे तर तो "किती" आणि "कसा" व्हावा हे निरीक्षणांतीच सिद्ध होऊ शकते, अन्यथा कोणताही ढोबळ तर्क बरोबर/चूक असूच शकतो.
मुद्दा ३. "उत्क्रांती" पेक्षा "बदल" असे म्हणूयात, बदल कायम होत असतो. निमित्त कारण/उपदान कारण शब्द छळ वाटतो, बदल हा कायम आहे, चैतन्य बदलत नाही, त्याचे बाह्य स्वरूप बदलते, त्या बदलला अंत नाही.
विश्वनिर्मितीचे कारण ब्रम्हदेवाला पडलेले स्वप्न किंवा एका स्फोटातून तयार झालेली सृष्टी हे दोन्हीही तेवढेच अगम्य वाटू शकतात.
कारण शोधण्याचे प्रयत्न करणे जास्त महत्वाचे, डार्विनला महत्व त्याच्या शोधण्याच्या मेहनतीमुळे आहे, उपलब्ध तर्काला पटू शकेल असे त्याने मांडले, तुमच्या तर्काला ते पटले नाही तर ते बरोबर नाही असे म्हणण्यापेक्षा/म्हटल्यानंतर बरोबर काय हे तर्कदृष्ट्या समजावणे देखील गरजेचे आहे.
तुम्ही काय नाही हे सांगत आहात, काय आहे ते देखील सांगावे हि विनंती.
सायन्समधील पदवी असणे हे सर्वद्न्य् असल्याचे लक्षण नव्हे
ह्या सिध्दान्ताचे मुख्य तत्व असे " जे सक्षम आहेत ते वाचतात व जे वाचतात ते उत्क्रान्त होतात " ह्या सिध्दान्तामध्येच मोठा तर्कदोष आहे . कसा ते आता पाहू .
अ हा ब वर आधारित आहे व पुन्हा ब हा अ वर आधारित आहे ह्या प्रकाराला अन्योन्याश्रयदोष असे तर्कशास्त्रात म्हंटले जाते. हाच दोष उत्क्रान्तिवादाच्या मुख्य सिध्दान्ता मध्ये आहे . प्रकृतिच्या (नेचरच्या) संकटातून वाचणारे कोण ? तर जे सक्षम आहेत . आणि सक्षम कोण आहेत तर जे प्रकृतिच्या (नैसर्गिक) संकटातून वाचले आहेत . ह्या एकमेकांवर आधारित व्याख्या ना कोण सक्षम आहेत हे सांगतात ना कोण नक्की वाचले आहेत हे सांगतात . अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त ह्या सिध्दान्तावर पुढचा सारा डोलारा उभा आहे
टीका करणार्यानी कृपया वरील उदाहरण नीट शांतपणे वाचावे.... आपण शाळेत जे जे शिकतो ते अंतिम सत्य असलेच पाहिजे असा काही नियम नाही...तसेच आपल्याकडे सायन्समधील पदवी असणे हे सर्वद्न्य् असल्याचे लक्षण नव्हे...............
विषाणू
औषधामुळे शरीरातील विषाणू मारतात, सगळेच मेले तर ठीक, जो वाचतो त्यामध्ये औषधाशी लढण्यासाठी आवश्यक जनुकीय बदल होतो/होऊ शकतो, तो संकटातून वाचून सक्षम होतो. सक्षम असतो/होतो म्हणून संकटातून वाचतो, किंवा नशीब थोर म्हणून वाचतो.
हे साधारणपणे तसेच नाही का?
हा हन्त् हन्त् .....
अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना व इतर पुरोगामी संघटना ही अन्धश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील काय ?
माझ्या शंका
१)अन्धश्रध्दा दूर् करण्याचा ठेका मेसर्स् "अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना" कडे दिला आहे का? ती त्यांचीच जबाबदारी आहे का? तुम्ही आम्ही केल्यास काय शिक्षा होते? रस्त्यातला दगड, स्त्रीला छेडणारा हात, चोर हे पाहून आमची हद्द येथे संपते म्हणता का?
२)माकडापासून माणूस झाला या वाक्याशी असणार्या आपल्या असहमतीशी -आम्ही सहमत आहोत, अजूनही माकडे बरीच शिल्लक आहेत, एकतर त्यांनी डार्विनचा उत्क्रांतिवाद वाचला नाही, किंवा ते असहमत आहेत असा सरळ सरळ होतो.
३)मासा पक्षी बनत नाही तर मृत्यु पावतो
सत्य त्रिवार सत्य, अन्यथा आज सकाळी आणलेला सुरमई पाण्यातून काढल्यावर कोंबडी झाला नसता काय्?( कोळ्णी पोल्ट्रीवाल्या झाल्या असत्या)
४) ह्या विचित्र प्राण्याचे संपूर्ण सांगाडे कुठेही सापडलेले नाहीत
सत्य त्रिवार सत्य, लोकहो डायनोसोर एक् तर बिन हाडाचा होता, (कालवासारखा) किंवा मानवाने पायासूप बनवून हाडे पचवली आहेत,
पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!
धन्यवाद
छान.