उत्क्रांतिवादखण्डन आणि डायनोसोरचे मिथक

एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते . ह्या दोन शतकातील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर डार्विनचा उत्क्रांतिवाद ! अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना व इतर पुरोगामी संघटना ही अन्धश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील काय ? आपण पाहू ही अन्धश्रध्दा कशी ठरते ते . सर्वसामान्याना ह्याचा परिचय माकडापासून माणूस झाला ह्या वाक्याने असतो . ह्या सिध्दान्ताचे मुख्य तत्व असे " जे सक्षम आहेत ते वाचतात व जे वाचतात ते उत्क्रान्त होतात " ह्या सिध्दान्तामध्येच मोठा तर्कदोष आहे . कसा ते आता पाहू .
अ हा ब वर आधारित आहे व पुन्हा ब हा अ वर आधारित आहे ह्या प्रकाराला अन्योन्याश्रयदोष असे तर्कशास्त्रात म्हंटले जाते. हाच दोष उत्क्रान्तिवादाच्या मुख्य सिध्दान्ता मध्ये आहे . प्रकृतिच्या (नेचरच्या) संकटातून वाचणारे कोण ? तर जे सक्षम आहेत . आणि सक्षम कोण आहेत तर जे प्रकृतिच्या (नैसर्गिक) संकटातून वाचले आहेत . ह्या एकमेकांवर आधारित व्याख्या ना कोण सक्षम आहेत हे सांगतात ना कोण नक्की वाचले आहेत हे सांगतात . अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त ह्या सिध्दान्तावर पुढचा सारा डोलारा उभा आहे.आता ह्यातील उपसिध्दान्त म्हणजे , सुरुवातीला जलचर व वृक्ष होते, नंतर ते जमिनीवर आले . मासा पक्षी बनला हा त्याच सिध्दान्ताचा निष्कर्ष . कारण काय ? तर प्राकृतिक संकटामुळे त्याने स्वत:मध्ये अनुकुलन केले व उडण्यासाठी पंख व श्वासांसाठी नाक विकसित केले. हे कधी केले तर कोट्यवधी वर्षांपूर्वी . तेव्हा झाले ना मग आता का होत नाही ? पाण्यातुन बाहेर काढलेला मासा पक्षी बनत नाही तर मृत्यु पावतो . ह्याला उत्तर काय ? तर असे अनुकुलन होण्याची प्रक्रिया कोट्यावधी वर्षांची आहे. ह्याचाच अर्थ हे अनुकुलन कसे होते हे कुणीच शास्त्रज्ञ प्रयोगाने सिध्द करू शकणार नाही .
आता ह्यांच्याच म्हणण्यानुसार शार्क , मगरी , झुरळ इ. सर्वात प्राचीन प्राणी आहेत . मग ह्या जाति उत्क्रान्त न होता , तशाच का टिकून आहेत ? उत्तर नाही. आता ह्या पैकी काही मगरी, शार्क ह्यांचींच उत्क्रान्ति कशी झाली ? सांगता येत नाही . ंमासा व पक्षी ह्यांच्यामधील प्राणी का अस्तित्त्वात नाही ? उत्तर नाही . जी एक दोन जीवाश्मे ह्या मधल्या प्राण्याबाबत दाखवली जातात ती संशयास्पद आहेत . निर्विवाद नाहीत (जीवशास्त्रज्ञाना विचारा)
हाच प्रकार माकडाच्या एका जातिपासुन माणूस बनला ह्या मध्ये आहे. मधल्या जातिच अस्तित्वात नाहीत. एकूण विचार करता ह्याला शास्त्रीय सिध्दान्त म्हणणे हा विनोद होइल. लाखो-कोटि वर्षांची प्रक्रिया दाखवली की प्रयोग व पुरावा दोन्हीची आवश्यकता समाप्त होते . सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनिर्मिति आणि उत्क्रान्तिची मुख्य कारणे योगायोग आहेत . पृथ्वीवरच पाणी का निर्माण झाले ? कारण सुर्यापासुनचे विशिष्ट अंतर . अमिनो असिड मधले नायट्रोजन संयुग कशामुळे ? तर योगायोग. एकपेशीय बहुपेशीय कसे बनले ? संरंक्षणासाठी. पण हा सरंक्षणाचा विचार मेंदु नसताना कसा आला? उत्तर नाही .. एकुण एक सर्व प्रक्रिया ठराविक क्रमाने घडणाऱ्या योगायोगांवर अवलंबून आहे . हे काय विज्ञान झाले ?? ...............आता तुम्ही म्हणाल हे जर एवढे तर्कदुषित आहे, तर ही थेअरी एवढी प्रसिध्द का ?????????? त्याचे कारण दिसणारी समानता !!
मासे व पक्षी , चिंपांझी व माणूस ह्यांच्या गुणसूत्रांत समानता दिसते ह्याचा अर्थ असा नव्हे की एक दुसऱ्यापासून बनला . कुठला ही सबळ पुरावा व तर्कशास्त्रीय आधार नसताना वैज्ञानिकांना ह्या समानतेच्या आधारावर उत्क्रांतिच्या सिध्दांतावर पोचावे असे का वाटले ? कारण त्यांना विश्वनिर्मितीचा दुसरा प्राचीन सिध्दान्त लवकरात लवकर निकालात काढायचा होता .त्यासाठी मग हिमयुग , अश्मयुग , डायनोसोर युग इ. मिथ्या कल्पना बनवण्यात आला. त्याना मिथ्या अशासाठी म्हणत आहे कारण त्यांना कोणताही तर्कशास्त्रीय आधार नाही व प्रत्यक्षजन्य पुरावा नाही.
डायनोसोर युगासंबंधी थोड इथे सांगितल पाहिजे . ह्या विचित्र प्राण्याचे संपूर्ण सांगाडे कुठेही सापडलेले नाहीत . मोठी हाडे व हाडांची रचना सापडलेली आहे जी दुसऱ्या अज्ञात प्राण्यांची ही असु शकते . कल्पनेने वैज्ञानिकांनी हा प्राचीन प्राणी कसा असेल ह्या विषय़ी अंदाज बांधले आहेत. हा प्राणी कसा नष्ट झाला , कोणा कडेच सबळ थेअरी नाही. उल्कापाताने नष्ट झाला वगैरे कल्पना आहेत. निसर्गात नेहमी समतोल दिसुन येतो . डायनोसोर सारखा असंतुलित प्राणि जर पृथ्वीवर असता तर इथले सारे जीवनच धोक्यात आले असते . साहजिकच माणूस त्यावेळी उत्क्रांत झाला नसता . हेच नेमके ह्या वैज्ञानिकाना व तत्ववेत्यांना हवे होते. डायनोसोर ची थेअरी मांडली की आपोआप उत्क्रांतिवादाला आधार मिळतो व समाजाच्या मनातील विश्वनिर्मितिच्या अन्य श्रध्दा सहज हद्द्पार करता येतात.
जलचर, उभयचर, वृक्ष, माकडे , माणसे , कीटक, पक्षी ह्यांच्यातील जनुकीय समानते वरुन एक दुसऱ्यापासून उत्पन्न झाला अशा निष्कर्षापेक्षा , हे सर्व एकाचवेळी उत्पन्न झाले असा सिध्दान्त फार पूर्वी पासून मानव समाजाने श्रध्देने धरुन ठेवला आहे. हा समाज म्हण्जे पृथ्वीवरील धार्मिक लोकांचा समाज होय. धार्मिकलोक हे उपयोजित विज्ञानाबरोबर तर्कशास्त्र व तत्वज्ञान ह्यांचाही विचार करायचे . आजचे वैज्ञानिक निव्वळ उपयोजित विज्ञानावर विसंबून तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करतात . त्यामुळे दोघांचे निष्कर्ष वेगवेगळे येतात . आपण उदाहरण घेऊन समाजावुन घेऊ.
अणु हा जड आहे हे सर्वांना मान्य आहे. अनेक अणु एकत्र येऊन त्यांच्यापासुन प्रथम अमिनो असिड व नंतर एकपेशीय जीव निर्माण होण्याचे कारण काय ? आधुनिक विज्ञान सांगते योगायोग !!! आता योगायोग व्हायला काही कारण ? दुसरा योगायोग जे चुकीचे उत्तर ठरेल . कारण त्याने अनवस्था हा तर्कदोष निर्माण होतो. अनवस्था म्हणजे कधीही न संपणारी कारणपरंपरा . अनएन्डिग लूप . त्यामुळे हा सिध्दान्त चुकीचा ठरतो.
तर्कशास्त्रात कारणे दोन प्रकारची असतात . उपादान आणि निमित्त ! उपादान कारण म्हणजे, कारण स्वत:च कार्यात रूपांतरित होणे . उदा. दुधाचे दही बनणे. निमित्त कारण म्हणजे , जे कारण अलिप्त व अंतिम आहे त्याला कोणते ही अन्य कारण असता कामा नये. अणु किंवा डीनए हे जर उपादान कारण असतील तर, रुपांतरणानंतर उत्क्रांति थांबली पाहिजे .पण वैज्ञानिकांच्यामते उत्क्रांति अजुनही सुरुच आहे . त्यामुळे अणु हे विश्वनिर्मितिचे उपादान कारण होऊ शकत नाही. मग साहजिकच विश्वनिर्मितेचे कारण निमित्त व तटस्थ असले पाहीजे. हे निमित्त कारण वैज्ञानिक कधी ही मान्य करत नाहीत . कारण ह्या तर्काने त्यांच्या काल्पनिक उत्क्रान्तिवादाचे खण्डन होते व हा तर्क सरळ सरळ ईश्वराकडे घेऊन जातो .

लेखनविषय: दुवे:

Comments

हीहीही

एकतर त्यांनी डार्विनचा उत्क्रांतिवाद वाचला नाही, किंवा ते असहमत आहेत असा सरळ सरळ होतो.

झकास!

जे सक्षम आहेत ते वाचतात व जे वाचतात ते उत्क्रान्त होतात

वाच हा धातू आपण धोक्यापासून वाच(वाचवा वाचवा मधला)
पुस्तक पुढे वाच
यापैकी कसा वापरता?

पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!

प्रत्येक गुन्हेगार काहीना काही पुरावा ठेवून जातो.

'जे सक्शम आहे ते (जीवनाच्या शर्यतीत) टिकतात. व जे टिकतात ते उत्क्रांत होतात.' असे वाक्य हवे होते.
मला देखिल वाचताना असे वाटले की, जे 'वाचतात' ते 'उत्क्रांत होतात.' म्हणजे 'जे पुस्तकं वाचतं नाहीत, ते उत्क्रांत होत नाहीत, कि काय?' ह्या विचारातूनच मी खालील प्रतिसाद दिला आहे.

-----------------------------------------------------
जो डर गया, समझो वो मर गया - श्री. गब्बर सिंग यांचा सिद्धांत

ब्लॉग वाचला

ब्लॉग वाचला.

मला वाटते "त्रिकोणी पृथ्वी" वगैरे प्रकार वाचले, त्यावरून येथे "शब्दांचे अर्थ काय" याबाबत फारच प्राथमिक शब्दांपासून जावे लागेल.

"त्रिकोण"च्या वेगळ्या कुठल्या अर्थाने आणि वेगळ्या कुठल्या संदर्भात पृथ्वी त्रिकोणी असेलही. (पण मग लेखक श्री. आपटे यांनीसुद्धा ओळखावे, की त्यांच्यापेक्षा वेगळ्या अर्थाने - म्हणजे सामान्य उपयोगातल्या अर्थाने - उत्क्रांतिवाद तर्कसंगत आहे, आणि डायनोसॉर ही मिथके नव्हेत.)

ज्यांच्यापाशी वेळ आहे, त्यांनी असा संवाद साधणे योग्यच आहे. परंतु वेळेअभावी मी नम्रपणे रजा घेतो.

भांग

अमित गोस्वामींनी ही उत्क्रांतीवादावर आक्षेप घेतलेले आहेत. पण भांग न घेता.;-)
मराठीमाणूस

एकच वस्तू दोन किंवा अनेक स्वरुपात असू शकते

धनंजय ह्यांना...
एकच वस्तू दोन किंवा अनेक स्वरुपात असू शकते ...ही प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक होते.. पृथ्वी संबंधीच्या लेखावर चर्चा करण्याचे हे स्थळ नाही..पण एवढेच जाता जाता सांगतो.. सर्फेस टेन्शन , प्ल्न्क्स अनसर्टिनटि थेअरी , गुरुत्वाकर्षण विषयी नवे संशोधन ह्या विषयांशी आपला परिचय असणे आवश्यक आहे...

उडला तर...

उडणारे मासे इथे सापडतील.
http://dsc.discovery.com/videos/life-flying-fish-fly.html
बुडणारे पक्षी इथे.... ( पेंग्विन तर आहेतच. हे वेगळे आहेत.)
http://www.youtube.com/watch?v=quwebVjAEJA

"एकच वस्तू दोन किंवा अनेक स्वरुपात असू शकते ...ही प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक होते.. पृथ्वी संबंधीच्या लेखावर चर्चा करण्याचे हे स्थळ नाही..पण एवढेच जाता जाता सांगतो.. सर्फेस टेन्शन , प्ल्न्क्स अनसर्टिनटि थेअरी , गुरुत्वाकर्षण विषयी नवे संशोधन ह्या विषयांशी आपला परिचय असणे आवश्यक आहे..."

...
एक गोष्ट दोन स्वरूपात असते, पण हे क्वांटम पातळीचे सत्य नाही का? निसर्ग वेगवेगळ्या पातळ्यांवर वेग वेगळ्या घटना दर्शवितो असे म्हणता येईल. विज्ञान काय किंवा तर्कशास्त्र काय, निसर्ग त्यांच्या नियमानुसारच चालतो असे म्हणणे कितपत खरे ठरेल?

मराठीमाणूस

मी सहमत आहे ते माशांपासून पक्षी ऊत्क्रांत झाले या संकल्पनेशी.

तसही मासा व पक्षी ह्यांच्यामधील प्राणी का अस्तित्त्वात नाही ?

हाच प्रकार माकडाच्या एका जातिपासुन माणूस बनला ह्या मध्ये आहे. मधल्या जातिच अस्तित्वात नाहीत

या वाक्याला फारसा अर्थ नाही कारण ऊद्या सर्व वाघ नामशेष झाले व फक्त चीत्र, वर्णन, शील्प (अथवा सध्याच्या प्रगतीनूसार व्हीडीओ) वगैरे रूपातच उरले(?) तर काही हजार (खर तर लाख) वर्षानी हा दावा करण्यात काही अर्थ राहणार नाही की हे वाघ मूळात कधी अस्तीत्वातच न्हवते तर ती केवळ एक् कंप्योटर जनरेटेड फॅंटसी होती ......... कोणतीही गोश्ट नामशेष होण्याला अथवा अस्तीत्व संपण्याला बरीच कारणे असतात. आणी आज वाघ नाहीसे होण्याला दूर्दैवाने मानवाचे सामर्थ्यच कारणीभूत आहे.. म्हणजेच पून्हा सर्वायवल ऑफ फीटेस्ट, बळी तो कान पीळी वगैरे....वगैरे.... अशा परीस्थीतीत बरेच आले आणी गेले...... एक महीन्यापूर्वी कोणी कल्पना केली नसती की जपान मधे या माहीन्यात काही वीभागांत "post-apocalyptic world" सारखी परीस्थीती नीर्माण होइल. सर्वायवल ऑफ फीटेस्ट हे सत्यच आहे पण कोणत्या परीस्थीतीत कोण सर्वात् फीट असतो याचा अचूक अंदाज कोणत्याही सजीवाच्या सध्याच्या सामर्थ्यावर ठरवता येइलच असे नाही पण म्हणूजे अर्थातच ही थीअरी चूक ठरते असे नाही.

उपक्रमवर स्वागत!

उपक्रमवर स्वागत!

जेवढी माहिती आहे त्यानुसार, डार्विन हा पुस्तकं वाचून तर्क करणारा नव्हता. तो जीवशास्त्राचा अभ्यासक होता. त्या अभ्यासातून जे निश्कर्श त्याने काढले त्यातून 'डार्विनचा सिद्धांत' पुढे आला. केवळ पुस्तकं वाचून, तर्क करण्यातून शास्त्र विकसित होत नसते. प्रयोग, परीक्शणे, व त्या सगळ्यांची लिखाणातून मांडणी करणे. ह्यातूनच शास्त्र - विद्न्यान - विकसित होते.

विचाराला कृतीची, नव्हे 'शिस्तबद्ध कृतीची' जोड असेल, त्या सगळ्याची 'शब्दबद्ध मांडणी उपलब्ध करता येत असेल' (व ते सगळे नियतीच्या महायोजनेत समाविश्ट असेल) तर त्यास जग-मान्यता मिळू शकते, मिळते.

आपल्या पुढील लेखाच्या प्रतिक्शेत!

:)

किती हा रिकामा वेळ ? :) फक्त रिकामटेकडा ह्यांनी प्रांजळपणे तसा आयडी घेतलाय. बाकीचे .... :)

- गद्दाफी

बदल आणि नैसर्गिक निवड

सक्षम असलेला टिकतो आणि टिकतो तो उत्क्रांत होतो, ह्या वाक्यातून सक्षम प्राणी परिस्थिती पाहून स्वत:त ठरवून बदल घडवतो आणि उत्क्रांत होतो, असा अर्थ गृहीत धरू नये. नेमका संदर्भ आठवत नाही, पण कोणत्याश्या पुस्तकात वाचलेले एक उदाहरण देते.

एका जंगलामध्ये एका किड्याच्या दोन जाती आहेत. एका जातीचा रंग दुसर्‍या जातीपेक्षा उजळ आहे. त्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात सापडणार्‍या वृक्षांचे बुंधे फिक्या रंगाचे आहेत. हे किडे उडणारे किडे आहेत. भक्षकांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी उडून जाणे वगैरे पर्याय दोन्ही जातीतील किडे अवलंबतात. मात्र फिक्या जातीतल्या किड्यांना स्वत:ला वाचवण्यासाठी एक अधिक डिफेन्स उपलब्ध आहे. फिक्या रंगांच्या बुंध्यांवर फिक्या रंगाच्या जातीचे किडे बसले तर त्यांचा रंग बुंध्याशी मिळताजुळता झाल्याने पक्ष्यांना ते किडे सहजी दिसत नाहीत आणि त्यामुळे फिक्या रंगाची जात गडद रंगाच्या जातीच्या तुलनेत जास्त प्रमाणात आढळते. गडद रंगाच्या जातीतल्या किड्यांना हा कॉमुफ्लाजचा फायदा मिळत नाही. त्यांना त्यांच्या इतर डिफेन्सेसवर अवलंबून राहावे लागते.

आता ह्या जंगलामधील पर्वत हा सुप्त ज्वालामुखी आहे. एक दिवस अचानक ह्या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि सर्वत्र उडालेली राख झाडांच्या बुंध्यांवरही बसते. ही राख गडद रंगाची आहे. आता फिक्या जातीतील किड्यांना कॉमुफ्लाजचा फायदा मिळेनासा होतो आणि गडद जातीला तो अचानक मिळू लागतो. पर्यायाने फिक्या जातीतील किडे मोठ्या प्रमाणात मारले जातात आणि गडद किडे तेवढे मरत नाहीत. पर्यायाने गडद किड्यांची पैदास जास्त प्रमाणात होते आणि त्यांचा वंश पुढे चालू राहतो आणि गडदपणा पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहतो.

आता ह्या दोन्ही जातीत रंगातील फरक सोडला तर इतर कोणताही फरक नाही. तरीही गडद किड्यांचा वंश आपोआप वाढतो कारण त्या परिस्थितीत त्यांची नैसर्गिकरित्या निवड होते. आता ह्याच गडद वंशातील किड्यांमध्ये जनुकीय दोषामुळे समजा दोन जाती निर्माण झाल्या आणि दोषयुक्त जात टिकेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांचा वंश टिकेल, जनुकीय दोष नसलेली जात नष्ट होईल. अश्याप्रकारे ह्या किड्यांमध्ये उत्क्रांती झाली. ती परिस्थितीशी ठरवून जुळवून घेतल्याने नव्हे तर त्या परिस्थितीत काही कारणाने टिकू शकल्यामुळे. सक्षमता म्हणजे स्नायूबळ नव्हे वा मोठा आकारही नव्हे. सक्षमता कोणात आहे हे परिस्थिती ठरवते.

हो

हो, इंग्लंड नामक जंगलात हा प्रकार झाला होता असे वाचण्यात आले.

इंग्लंड नामक जंगलात हा प्रकार झाला होता असे वाचण्यात आले.

फिरंग्याच्या जंगलात औद्योगिक क्रांतिच्या काजळी मुळे घडले. ज्वालामु़खीमुळे नाही.

पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!

असेच म्हणतो.

असेच म्हणतो.
तरी, फिरंग्यांच्या देशाला जंगल म्हणत असाल तर औद्योगिक क्रांतीला ज्वालामुखी म्हणता येईल.

'परीस्थिती कशी असावी?' हे कोण ठरवते?

मी प्रस्तुत लेखात कोणते वाक्य यायला हवे होते ते लिहीले होते. त्या वाक्यात 'सक्शम असणे' म्हणजे प्राप्त परीस्थितीला एखादा जीव सामोरा जावून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतो असाच घेतला होता. (इंग्रजी - केपेबल टू सर्वायव्ह ) कोणताही जीव व त्याची वंशवेल टिकेल किंवा नाही हे कोणीच सांगू शकत नाही. अशा वेळी देव, निसर्ग ह्या संकल्पनांचा उल्लेख करावा लागतो.
एक खरे की डार्विनने अभ्यास करून जीव शास्त्राबद्दलच आपला सिद्धांत मांडला आहे. परंतु हिंदू धर्मग्रंथांमध्ये उत्क्रांतीबाबत जलचर, उभयचर, भूचर यांच्या पुढे विचार केला गेला आहे. बहुधा तो वैचारीक बदलांबाबत ही असावा. राशी नक्शत्रांच्या बाबतीतही तीच प्रतीके आपल्या नजरेसमोर येत आपल्याला गोंधळवतात. त्यातील कन्या राशी, तुळा राशी हे वेगळेच संकेत देतात. आता बघुया पाश्चात्य मंडळी त्याबाबतीत ही काही शोध लावतात का?, वा कोणता सिद्धांत मांडतात का ते?
त्यांचे सिद्धांत अभ्यासक्रमातून पाठ करणे, एवढेच आपले काम आहे.

नैसर्गिक निवड हा योगायोग नव्हे तर दुसरे काय???

नैसर्गिक निवड हा योगायोग नव्हे तर दुसरे काय??? .....परिस्थिती म्हणजे ही योगायोगच ना ???? ही कुठल्या गणितिय समीकरणाने सिध्द होते ??

मते मला पुर्णपणे जवळची

ह्या लेखातील मते मला पुर्णपणे जवळची वाटतात कारण मलाही डार्वीनच्या सिद्धांताबद्द्ल शंका आहेत.

दुर्योधन हा महाभारतातील मोठा दानी

हे फक्त अन् फक्त त्याची वंशावळ लिहून 'सिद्ध करणार्‍या' आयडीची आठवण इश्श.आपटे यांची ही आपटी वाचून झाली..

 
^ वर