इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग १)
बस. नीट लिहूयात ह्यावर म्हणून कित्येक दिवस थांबलो. पण तशी बांधणी/रचना करताच येत नाहीये.
जी काही रोचक माहिती मी मिळवलिये तीही विस्कळित. आता पुन्हा त्याचं कंपायलेशन करण्यापेक्षा जसं आहे तसच तुमच्यासमोर ठेवतोय. प्लीईईईज गोड मानून घ्या. आणि जमेल तशी भर घाला.
हे मी का लिहितोय?
ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हे तीन धर्म ह्या तीन संस्कृती पूर्णतः वेगळ्या नव्हेत. एका बद्दल वाचताना सहजच त्याचं दुसऱ्याबद्दलचं साम्य डोकावून जायचं. ह्याचं कारण त्यांच्या (जवळ जवळ) एक समान मूलभूत श्रद्धा (कट्टर एकेश्वरवाद वगैरे), त्यांची प्राचीन घटना वर्णने, त्यांच्या वेशभूषा वगैरे. मराठ्यांचा , आमच्या शिवरायांचा इतिहास वाचताना नेहमी प्रश्न पडायचा की हे
परकीय सुलतान आले कुठुन? एखादी मूर्ती, मंदीर दिसताच ह्यांच्यातले बहुतांश असे पिसाळल्यासारखे तोड्-फोड का करत सुटायचे? नक्की त्यांना ह्यापासुन काय प्रॉब्लेम होता? औरंगजेब संगीत द्वेष्टा का होता? का त्यानं जझिया लावला?
मराठ्यांना विरोध केवळ राजकिय कारणाकरता न राहता त्याला धार्मिक रंग कसा चढला?
किंवा उदा:- Ten Commandments चित्रपट बघताना बऱ्याचदा यहुद्यांच्या नेत्यांचे कपडे बघून आजच्या अरब पोषाखाची आठवण होई.
इब्राहिम-अब्राहम, दाउद-डेविड, सोलोमन-सुलेमान ही नावे पुनः पुनः त्यांच्या mythology मध्ये, धर्मग्रंथात येत.
म्हणजेच हे तीनही पूर्णतः वेगळे नव्हेत आणि अगदीच समानही नाहीत.
ते एकाच तत्त्वज्ञानाचा वारसा मात्र जरुर सांगतात -- वारसा अब्राहमाचा, वारसा मूसा(मोझेस), इसा(येशू) आणि प्रेषित महंमदाचा.
अब्राहम-इब्राहिम, दाउद-डेविड, सोलोमन-सुलेमान ह्या त्यांच्या पुराणपुरुषांच्या लोककथा थोड्याफार फरकानं तीनही धर्मात येतात.
O.O.P.S. च्या भाषेत Islam inherits Christian principles, Christanity inherits Jewish principles.
यहुदी धर्माचं extension आहे christanity आणि ख्रिश्चनांचं extension आहे इस्लाम.
हे आहेत Abrahamic धर्म. (आपण "इब्राहिमी " म्हणूयात. )
तर, कुतूहलापोटी एकातून दुसरी दुसरीतून तिसरी अशी लिंक लागत गेली आणि आता आहे ती माहिती मांडावीशी वाटतेय, विस्कळित का असेना. मराठी जालावर ह्याबद्दल फारसं काही दिसलं नाही. निदान माझी ही खर्डेघाशी काही जाणकारांना लिहायला उद्युक्त करेल, उचकावेल आणि प्रतिसादातून अधिक माहिती येत राहिल अशी आशा आहे.
१. मध्य पूर्व म्हणजे नक्की कुठे आहे बुवा? --मध्यपूर्वेचा भूगोल.
--जगाचा नकाशा तुमच्यासमोर आहे असं समजून सांगायचं म्हटलं तर भारताच्या...... पश्चिमेकडून बघत गेल्यास( थोडीशी उत्तर बाजूही पकडून ) हे देश दिसतात-
पाकिस्तान (पूर्वीचा वैदिककालीन आणि वैदिकपूर्व सप्त सिंधूचा प्रदेश ) त्याच्या पश्चिम-उत्तरेला अफगाण( पूर्वीचा "शकुनी"चा गांधार आणि आर्य प्रभावाखालील प्रथम अनार्य "पुश्तू" जमातीचा ), पाकच्या दक्षिण पश्चिमेला इराण ( आधीचा पर्शिया, आपले पारशी बांधव इस्लामिक आक्रमणानंतर इथूनच भारतात आश्रय घेते झाले. ), इराण च्या पश्चिमेला इराक आणि पर्शियन/अरेबिक खाडी, खाडी ओलांडताच आकारानं छोटेसे कुवैत, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि त्यांना लागूनच आकारानं भला मोठा इस्लामची जन्म भूमी सौदी अरब.
ह्या सौदी च्या दक्षिणेला आहे ओमान आणि यमन हे देश आणि अरबी समुद्राची किनारपट्टी. हाच अरबी समुद्र ओलांडून अरब व्यापारी पश्चिम भारतच्या बंदरांवर येत(बहुदा सूरत, कालिकत वगैरे) आणि देबल बंदर( आजचं पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची) तर आख्ख्या आशियातलं महत्त्वाचं व्यापारी बंदर होतं.
तर ह्या सौदीच्या पश्चिमेला थेट आफ्रिका खंडाचं उत्तर टोकच येतं. म्हणजे एका लायनीत(पूर्वेकडून पश्चिमेकडे) सौदी, इजिप्त, लिबिया, अल्जिरिया, मोरोक्को हे उत्तर आफ्रिकन देश येतात.
ह्यापैकी सौदी आणि इजिप्त हे एकमेकाला लागून असले तरी त्यांची भूसीमा अत्यल्प आहे.
त्या दोघांच्या मध्ये आहे तांबडा समुद्र.
ह्या दोन्ही देशांच्यावर(नकाशात) आहेत चिमुकले पण धगधगते देशः-
इस्त्राईल, पॅलेस्टाइन, जॉर्डन, लेबानॉन.
ह्या देशांच्या वर(उत्तरेला) आहे इतिहासप्रसिद्ध, ज्यावर अतिप्राचीन काळापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनेक भीषण लढाया लढल्या गेल्या तो Meditterian sea किंवा भूमध्य समुद्र.
२. असं काय खास आहे बुवा ह्या समुद्राच्या जागेत? ह्याच्या तर जवळ जवळ सर्वच बाजूनं जमीन आहे.
--म्हणून तर तो खास आहे. ह्या समुद्राच्या प्रत्येक काठावर जुन्या काळापासून अनेक विध संस्कृती नांदल्या आहेत.
भांडल्या आहेत. आणि बहुतांश नामशेष झाल्या आहेत. अहो जागतिक जल-मार्ग व्यापार जरा आठवून बघा म्हणजे ह्याचं माहात्म्य लक्षात येईल. ह्याच्या वरती/उत्तरेला युरोपिअन देश आहेत(पूर्वीचे ग्रीको-रोमन साम्राज्य (स्पेन, पोर्तुगाल, इटाली, ग्रीस वगैरे प्रमुख. ) ख्रिश्चनबहुल ), ह्याच्या दक्षिणेला आफ्रिकन देश आहेत (इजिप्त, लिबिया, अल्जिरिया, मोरोक्को-- मुस्लिम बहुल). ह्याच्या पूर्वेला आशियाई देश आहेत इस्राइल, पॅलेस्टाइन, टर्की/तुर्कस्थान (टर्की ह्या trans-continental देशाचा आशियातला भाग)
इथं उल्लेख केलेल्या प्रत्येक देशात स्वतःची अशी एक संस्कृती होती( काहींची आजही आहे), प्रत्येकाची खास अशी पोषाखाची पद्धती होती, खान-पान, भाषा, धार्मिक-संकल्पना ठासून भरल्या होत्या.
अवांतरः- ह्याच समुद्रात क्रीट बेटे आहेत ग्रीस जवळ, जी जिंकण्यासाठी हिटलरने जीवाचा आटापिटा केला आणि ती लढाई त्याला नंतर महागात पडली.
३. संस्कृती होती म्हणताय, मग कुठकुठल्या होत्या बरं ह्या संस्कृती?
४. ह्यांचा धर्मग्रंथ कुठला?
५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
६. कुठल्या मोठ्या लढाया/घटना झाल्या मध्यपूर्वेत?
प्रश्न ३ ते ६ आपण पाहू पुढल्या भागात.
टीपः- पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे मध्य-पूर्वेत येतात की नाही नक्की सांगता येत नाही.
पाकिस्तान सरकारला मात्र ते स्वतः मध्य-पूर्वेतील महत्त्वाचे राष्ट्र आहे असं दाखवलेलं आवडतं. जुन्या संदर्भ ग्रंथात मात्र पाक-अफगाणचा उल्लेख मध्य-पूर्व म्हणून क्वचितच येतो.
क्रमशः.....
Comments
उपयुक्त नकाशा
इथे बघता येइल्:-
समुद्रात क्रीट बेटे आहेत ग्रीस जवळ
क्रीट बेटांवरुन आठवली स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नाची गो ष्ट. ती ईथे पहा
केदार
चांगली सुरवात
चांगली सुरवात. पुढचे भाग देखील लवकर येउंदेत...
मध्य पूर्व म्हणजे नक्की कुठे आहे बुवा? --मध्यपूर्वेचा भूगोल.
मध्यपूर्व ही ब्रिटीशांसाठी आहे, आपल्यासाठी "मध्य-पश्चिम" ;). पण त्यातील गमतीचा भाग सोडला तरी त्यास अमेरिकन्स बर्याचदा "Near East" असे म्हणतात.
(विकी)
इथल्या व्याख्येप्रमाणे, The Middle East (or West Asia) sits where Africa, Asia and Europe meet. The countries of the Middle East are all part of Asia, but for clarity reasons we geographically show them here as a separate landmass.
विकीवरील माहितीप्रमाणे, बूश सरकारने "Greater Middle East" हा नवीन शब्द तयार केला आणि त्यात पाकीस्तान, अफगाणिस्तान आणि काही इतर मध्यआशियाई (सेंट्रल एशिया) मुस्लीम राष्ट्रांची त्यात वर्गवारी केली.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
छान
चांगली सुरुवात. पण हा भाग त्रोटक वाटला. जरा मोठे भाग येऊद्यात.
जगातील बहुसंख्य धर्म हे एक तर मध्यपूर्वेत निर्माण झालेत (यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम) किंवा भारतीय उपखंडात निर्माण झालेत (हिंदू, जैन, बौद्ध).
येशू ख्रिस्त जसा चित्रांतून दाखवला जातो (युरोपीय) तसा नसून पॅलेस्टीनी व्यक्तीसारखा दिसत असावा काय, अशा आशयाचा एक गमतीशीर कौल मी पूर्वी दुसर्या एका संस्थळावर टाकला होता, त्याची आठवण झाली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ब्लॅक हिस्ट्री मंथ
येशू ख्रिस्त जसा चित्रांतून दाखवला जातो (युरोपीय) तसा नसून पॅलेस्टीनी व्यक्तीसारखा दिसत असावा काय,
अमेरिकेत फेब्रूवारीत ब्लॅक हिस्ट्री मंथ असतो. विद्यापिठात असताना आमच्या इथल्या अफ्रिकन-अमेरिकेन सेंटरने सर्वत्र माहितीपूर्ण पोस्टर्स लावली होती. त्यात थोर व्यक्तीमत्वे दाखवताना येशू ख्रिस्त पण दाखवला होता. तेंव्हा आधी आश्चर्य वाटले पण नंतर लॉजिक समजले. पण नंतर पुढे गेल्यावर त्यात गौतम बुद्ध पण दाखवलेला बघितला आणि "मी एकदम बुचकळ्यातच पडलो" :-)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
येणार्या लेखांबद्दल उत्सुकता करणारा हा लेख आहे. या लेखात मात्र फारसे नवीन सापडले नाही.
लेखात धर्माबद्दल काही प्रवाद मांडले आहेत. पण ते प्रवाद त्या त्या धर्माच्या लोकांना मान्य असतील असे वाटत नाही. एकमेका जवळ असल्याने बरीचशी मिथके एकत्र बाळगून होते असे म्हणता येईल.
वेगवेगळ्या धर्माच्या लेखकांमधे जी तेढ होती तिचे स्वरूप वांशिक/टोळीजन्य चढाओढीचे देखिल होते. तुम्ही दिलेले ऊप्सचे विवरण निश्चितपणे अमान्य करता येण्यासारखे आहे.
भारतातील प्रश्नांचा मागोवा या प्रदेशातील इतिहासात असेलही पण त्याची व्याप्ती लेखात अपेक्षा केली तेवढी निश्चित नाही.
त्यांची प्राचीन घटना वर्णने, त्यांच्या वेशभूषा वगैरे. मराठ्यांचा , आमच्या शिवरायांचा इतिहास वाचताना नेहमी प्रश्न पडायचा की हे
परकीय सुलतान आले कुठुन? एखादी मूर्ती, मंदीर दिसताच ह्यांच्यातले बहुतांश असे पिसाळल्यासारखे तोड्-फोड का करत सुटायचे? नक्की त्यांना ह्यापासुन काय प्रॉब्लेम होता? औरंगजेब संगीत द्वेष्टा का होता? का त्यानं जझिया लावला?
मराठ्यांना विरोध केवळ राजकिय कारणाकरता न राहता त्याला धार्मिक रंग कसा चढला?
तुम्ही विचारलेले प्रश्न हे बरेचसे संशयास्पद आहे आणि ज्याला लिडींग प्रश्न म्हणावेत तसे आहेत. म्हणजे प्रश्नातच आरोप सामिल झाला आहे. हे प्रश्नातील आरोप सिद्ध करणे बरेचसे जड जाते. काही ऐतिहासिक घटनांचे सार्वत्रिकरण तुम्ही करता आहात असे वाटले.
तुम्ही सांगितलेल्या देशांमधे मध्यपूर्वेतील देशांचा समावेश आहे. पण मध्य आशियातील देशांचा समावेश नाही. तुमच्या वरील प्रश्नातील कित्येक 'सुलतान' मध्यपूर्वे ऐवजी मध्य आशियातून आले आहेत. (मोगल).
प्रमोद
आभार आणि खुलासा....
येणार्या लेखांबद्दल उत्सुकता करणारा हा लेख आहे. या लेखात मात्र फारसे नवीन सापडले नाही.
--आभार. अधिक सकस् लिहायचा प्रयत्न करीन्.
लेखात धर्माबद्दल काही प्रवाद मांडले आहेत. पण ते प्रवाद त्या त्या धर्माच्या लोकांना मान्य असतील असे वाटत नाही. एकमेका जवळ असल्याने बरीचशी मिथके एकत्र बाळगून होते असे म्हणता येईल.
वेगवेगळ्या धर्माच्या लेखकांमधे जी तेढ होती तिचे स्वरूप वांशिक/टोळीजन्य चढाओढीचे देखिल होते. तुम्ही दिलेले ऊप्सचे विवरण निश्चितपणे अमान्य करता येण्यासारखे आहे.
खाली थत्तेचाचांनी अचुक शब्दात वर्णन् केलय. तरी माझे दोन् शब्दः-
ख्रिश्चनांच्या न्यु टेस्टामेंट मध्ये पुनः पुनः मोझेसचा गौरवपूर्ण् उल्लेख केलाय्.
येशुचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्याच्या आगमनाबद्दल् मोझेसनीच कसं सांगुन ठेवलय् हे लिहिलय्. येशु हा जणु मोझेसच कसा आहे,त्याच्या वंशावळितला कसा आहे, हे सांगायचा प्रयत्ना आहे.
.
.
.
.
.आणि अगदि तस्सच कुराण मध्ये महंमदाला मोझेस व येशू ह्यांचा आध्यात्मिक् वारसा कसा लाभलाय हे सांगितलय.
अगदि महंमदाला देवाज्ञा देतानाही देवानं स्वतःचा उल्लेख केलाय तो असा:-
".... मी तोच एकच सत्य परमेश्वर् आहे .माझा साक्ष्त्कार अब्राहमाला झालाय. मी तोच आहे ज्यानी जळत्या झुडुपातुन मोझेसला उपदेश केलाय्. "
बायबल व कुराण वाचल्यास् हे नक्की जाणवेल्. हा धार्मिक संकल्पनांचा वारसाच आहे. ऊप्स सारखा इनहेरिटन्सच आहे असं पुन्हा म्हणु इच्छितो.
मुळात बायबलचे दोन भाग आहेत्. ज्याला सर्व ख्रिश्चन आद्य धर्म ग्रंथ मानतात.
ओल्ड् टेस्टामेंट व न्यू टेस्टामेंट.(जुना व नवा करार.)
त्यापैकी ओल्ड् टेस्टामेंट येशुच्या जीवनाचा काहीही फारसा उल्लेख् नाही. ते येशु-पूर्व काळातील आहे. नवीन करार मात्र मुख्यतः येशु व त्याच्या कार्याबद्दल् आहे.
भारतातील प्रश्नांचा मागोवा या प्रदेशातील इतिहासात असेलही पण त्याची व्याप्ती लेखात अपेक्षा केली तेवढी निश्चित नाही.
नाही नाही. भारतातील प्रश्नांचा समग्र मागोवा ह्यात आहे असं मला अजिबात् म्हणायचं नाही.
तसं काही ध्वनित् होत् असल्यास् काहितरी गल्लत झाली असावी लिहिण्यात. मी माझ विधान असं re-phrase करतो:-
इस्लामिक आक्रमकांनी मंदिरं फोडली हे मी आजवर् वाचत आलोय्.(अगदि पाठ्यक्रमातही) आणि त्यातले कित्येक् सुल्तान अभिमानानं बुत्-शिकन मूर्तिभंजक म्हणवायचे.
आता, मूर्ति-भंजक म्हणवुन् घेण्यात अभिमानास्पद काय् आहे हेच मला कळेना सुरुवातिला(विजयी म्हणवुन् घेणं समजु शकतो). नंतर कळलं की मूर्ती-भंजक् म्हणजे हे धार्मिक उपाधी असल्यासारखं मानलं जाण्याचा तो काळ् होता.
पण् मग् पुढचा प्रश्नः- अशी धार्मिक उपाधी देणारा धर्म कुठला/कुठले बुवा? म्हणुन कुतुहलानं ही माहिती मिळाली.
आजच्या परिस्थितीचा तोच एकमेव मागोवा आहे असं मला मुळिच म्हणायचं नाहिये.
तुम्ही विचारलेले प्रश्न हे बरेचसे संशयास्पद आहे आणि ज्याला लिडींग प्रश्न म्हणावेत तसे आहेत. म्हणजे प्रश्नातच आरोप सामिल झाला आहे. हे प्रश्नातील आरोप सिद्ध करणे बरेचसे जड जाते. काही ऐतिहासिक घटनांचे सार्वत्रिकरण तुम्ही करता आहात असे वाटले.
ह्यात काय संशयास्पद् आहे कळलं नाही. कित्येक् मुस्लिम राज्यकर्त्यांनी धार्मिक् स्थळं फोडली ही वस्तुस्थिती अगदि शालेय् इतिहासातही आहे.
औरंगजेबानं जझिया लावला हे सत्य आहे.(चूक् की बरोबर् ते मी म्हणत नाहिये.)
सार्वत्रिकरण करायला काही मी सगळेच मुस्लिम् शासक सदैव धर्मांध् होते असं म्हटलं नाहिये.
तुम्ही सांगितलेल्या देशांमधे मध्यपूर्वेतील देशांचा समावेश आहे. पण मध्य आशियातील देशांचा समावेश नाही. तुमच्या वरील प्रश्नातील कित्येक 'सुलतान' मध्यपूर्वे ऐवजी मध्य आशियातून आले आहेत. (मोगल).
साहेब, पण् ते मध्य्-पूर्वेतील् इस्लामिक् स्कूल् ऑफ् थॉट घेउन् आलेत् ना.
बाकी हे तीन धर्म पूर्णतः एकमेकांपासुन् वेगळे आहेत असं मानणं हेच एक् मिथक् आहे. भारतीय जनतेत मध्य पूर्वेबद्दल् फारशी माहिती नसल्यानं असं होउ शकतं.
मी पुन्हा म्हणु इच्छितो :-१. प्रत्येक मूळ् इस्लामिक धर्म ग्रंथ ख्रिश्चन आणि ज्यू तत्वज्ञ्यानाचा अभिमानानं वारसा सांगत् आलाय.
२.प्रत्येक् मूळ् ख्रिश्चन धर्म ग्रंथ ज्युं तत्वज्ञ्यानाचा वारसा अभिमानानं सांगत आलाय.
एकमेका जवळ असल्याने बरीचशी मिथके एकत्र बाळगून होते असे म्हणता येईल
अहो साहेब, त्या भूभागात पारशी, हिटाइट्स्,फिनिशियन्, मेसापोटेमियन्,असीरियन,प्राचीन मूर्तीपूजक पिर्यामिडवाले इजिप्शियन् ह्यासारख्या संस्कृती किंवा धर्म होतेच की.
त्यांची मिथकं/सिद्धांत कसे जुळत् नाहित् मग्?
कारण एकच्. हे सर्व एक तर् बहुदेवता उपासक् होते. किंवा निसर्ग(अग्नि) पूजक्(पारश्यांसारखे) होते. ह्यांना स्वतःचा असा निश्चित अंतिम् ग्रंथ नव्हता.(अपवाद पारशी)
हे कुणीही गर्वानं/अभिमानानं म्हणत नसत की "आम्ही अब्राहमाचे वंशज् आहोत्.". आज तिथला प्रत्येक् ज्यू-ख्रिश्चन्-मुस्लिम अभिमानानं हे म्हणतो.
अब्राहमाला आपला मूळ् पुरुष् मानतो. परमेश्वर एकच आहे ह्यावर त्याची श्रद्धा असते. आणि परमेश्वर् आहेच ह्यावरही त्याची श्रद्धा असते.
तुम्हाला जर हे मिथक् वाटत असेल तर् सहज् Abrahamic religions म्हणुन् गुगलुन् बघा. शेकडो-हजारो अभ्यासकांचे लाखो लेख आणी इतर् साहित्य मिळेल आपल्याला.
तस्मात्, त्यांचे परस्पर् संबंध् हे मिथक् किंवा कविकल्पना नाही. निदान हे धर्म तरी तसे मानत नाहित्. आपण मानत असाल तर् मी अधिक काही लिहु शकत नाही.
बाकी लिखाण् वाचलत, प्रतिक्रिया दिलित्, ह्याबद्दल् मनःपूर्वक् आभार्.
आप्लाच मनोबा.
जझिया
मुस्लिमांच्या पहिल्या राज्यापासूनच भारतात जझिया असावा. अकबराने तो काढून टाकला होता. जहांगीर आणि शहाजहाननेही तो लावला नाही. मात्र औरंगझेबाने तो पुन्हा लावला.
असो.
मनोबा, लेखमालिकेला शुभेच्छा पण विषय असा निवडलात की अनेक प्रश्न उपस्थित होणारच तेव्हा उत्तरे देताना लोकांवर शंका घेऊ नका. प्रामाणिकपणे निरसन करा.
पुढला भाग लवकर टाक.
रोचक विषय
श्री. मन यांनी एका अतिशय रोचक विषयावर लेखमाला सुरू केली आहे. त्याबद्दल प्रथम त्यांना मन:पूर्वक धन्यवाद.
माझ्याकडचे आंतरजाल काल प्रथम अतिशय मंदगतीने व नंतर अजिबातच कार्यरत नसल्याने मी हा लेख आज फक्त घाईघाईने चाळला आहे. बारकाईने वाचून नंतर प्रतिसाद दे ईन.
माझी श्री. मन यांना एकच विनंती की त्यांनी भावनेच्या भरात एकदम विधाने केली नाहीत तर जास्त योग्य ठरेल. उदाहरणार्थ सुलतानांबद्दलचा उल्लेख फक्त काही टक्के सुलतानांच्या बाबतीत बरोबर आहे. बाकीचे बरेचसे सुलतान हिंदुस्थानातीलल धर्म परिवर्तन केलेले किंवा बाटलेले होते असे म्हणता येते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
रोचक विषय, विस्कळित मांडणी वगैरे
माझा वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रस्तुत लेखमालेचा विषय फारच रोचक आणि विस्तृत सुद्धा आहे. एवढ्या विस्तृत विषयावर लिहावयाचे तर मांडणी घट्ट बांधलेली असली पाहिजे असे वाटते. विस्कळितपणे विचार मांडल्यास लेखकाला जे सांगायचे आहे ते वाचकांपर्यत प्रभावी रित्या पोचवता येत नाही.
आता मूळ लेखातील काही मुद्दे. लेखकाने नंतर दिलेल्या प्रतिसादातून दिलेले खुलासे कदाचित मला बरोबर लिंक करता न आल्याने पुनरावृत्तीचा धोका संभवतो.
1.लेख विषय मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग असा दिलेला आहे. म्हणजे काय? हा मथळा जरा गोंधळात टाकणारा वाटतो आहे. मध्यपूर्व आणि इतर जग यांच्यातील संबंध कसे बदलत गेले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की मध्यपूर्वेत जन्माला आलेल्या या तीन धर्मांची इतर जगाबरोबर कशी इंटरॅक्शन होत गेली हे दाखवण्याचा लेखक प्रयत्न करणार आहे हे समजले नाही.
2. मराठ्यांचा , आमच्या शिवरायांचा इतिहास वाचताना नेहमी प्रश्न पडायचा की हे
परकीय सुलतान आले कुठुन? एखादी मूर्ती, मंदीर दिसताच ह्यांच्यातले बहुतांश असे पिसाळल्यासारखे तोड्-फोड का करत सुटायचे? नक्की त्यांना ह्यापासुन काय प्रॉब्लेम होता? औरंगजेब संगीत द्वेष्टा का होता? का त्यानं जझिया लावला?
मराठ्यांना विरोध केवळ राजकिय कारणाकरता न राहता त्याला धार्मिक रंग कसा चढला? मध्यपूर्वेतील धर्मांच्या चर्चेत मराठे, शिवाजी, औरंगजेब हे कोठून आले?
3. ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हे तीन धर्म ह्या तीन संस्कृती पूर्णतः वेगळ्या नव्हेत. प्रस्तुत लेख धर्मांसंबधी आहे की संस्कृतींबद्दल? धर्म आणि संस्कृती या गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. भारतातील इस्लामपंथीयांची संस्कृती, मध्यपूर्वेतील इस्लामपंथीयांची संस्कृती व आफ्रिकेतील इस्लामपंथीयांची संस्कृती भिन्न भिन्न आहेत. संस्कृती ही त्या प्रदेशाप्रमाणे बदलत असते.
4.किंवा उदा:- Ten Commandments चित्रपट बघताना बऱ्याचदा यहुद्यांच्या नेत्यांचे कपडे बघून आजच्या अरब पोषाखाची आठवण होई. चित्रपटात दाखवलेली वेषभूषा पंधराशे वर्षांपूर्वी लोक परिधान करत असत असे समजणे जरा धाडसाचेच वाटते आहे. वेशभूषा हा संस्कृतीचा भाग असतो. त्यामुळे मध्यपूर्वेत थोड्याफार फरकाने सर्व धर्मपंथीय एकसारखीच वेशभूषा करणार.
5.या लेखात मध्यपूर्व म्हणजे कोणता भाग? व या भागाची वैशिष्ट्ये काय हे सांगण्याचा प्रयत्न चांगला आहे. विषयात रस निर्माण करण्याच्या दृष्टीने ही शैली आवडली.
चुका काढण्यासाठी हा प्रतिसाद देण्याचा माझा प्रयत्न नाही. पुढचे भाग एका फ्रेमवर्कमधे व घट्ट बांधलेले आले तर जास्त आवडेल.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
बरोबर आहे.
1.लेख विषय मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग असा दिलेला आहे. म्हणजे काय? हा मथळा जरा गोंधळात टाकणारा वाटतो आहे. मध्यपूर्व आणि इतर जग यांच्यातील संबंध कसे बदलत गेले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की मध्यपूर्वेत जन्माला आलेल्या या तीन धर्मांची इतर जगाबरोबर कशी इंटरॅक्शन होत गेली हे दाखवण्याचा लेखक प्रयत्न करणार आहे हे समजले नाही.
मथळा काय द्यावा सुचत नव्हता. "इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा " हे जास्ती सयुक्तिक राहिलं असतं असं वाटतं.
पुढील भागापासुन हेच नाव घ्याय्च्या विचारात आहे.
2. मराठ्यांचा , आमच्या शिवरायांचा इतिहास वाचताना नेहमी प्रश्न पडायचा की हे
परकीय सुलतान आले कुठुन? एखादी मूर्ती, मंदीर दिसताच ह्यांच्यातले बहुतांश असे पिसाळल्यासारखे तोड्-फोड का करत सुटायचे? नक्की त्यांना ह्यापासुन काय प्रॉब्लेम होता? औरंगजेब संगीत द्वेष्टा का होता? का त्यानं जझिया लावला?
मराठ्यांना विरोध केवळ राजकिय कारणाकरता न राहता त्याला धार्मिक रंग कसा चढला? मध्यपूर्वेतील धर्मांच्या चर्चेत मराठे, शिवाजी, औरंगजेब हे कोठून आले?
मराठे, शिवाजी आणि औरंगजेब हे मध्यपूर्वेच्या चर्चेत नाहित. ते केवळ प्रस्तावनेत आहेत. किंवा, मला इब्राहिमींबद्दल प्राथमिक का असेना माहिती कशासाठी वाचाविशी वाटली ह्याचं कारण म्हणुन् आहेत.
3. ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम हे तीन धर्म ह्या तीन संस्कृती पूर्णतः वेगळ्या नव्हेत. प्रस्तुत लेख धर्मांसंबधी आहे की संस्कृतींबद्दल? धर्म आणि संस्कृती या गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. भारतातील इस्लामपंथीयांची संस्कृती, मध्यपूर्वेतील इस्लामपंथीयांची संस्कृती व आफ्रिकेतील इस्लामपंथीयांची संस्कृती भिन्न भिन्न आहेत. संस्कृती ही त्या प्रदेशाप्रमाणे बदलत असते.
धर्म- संस्कृती शब्द वापरण्यात गल्लत झाली खरी.
5.या लेखात मध्यपूर्व म्हणजे कोणता भाग? व या भागाची वैशिष्ट्ये काय हे सांगण्याचा प्रयत्न चांगला आहे. विषयात रस निर्माण करण्याच्या दृष्टीने ही शैली आवडली.
चुका काढण्यासाठी हा प्रतिसाद देण्याचा माझा प्रयत्न नाही. पुढचे भाग एका फ्रेमवर्कमधे व घट्ट बांधलेले आले तर जास्त आवडेल.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
थँक्स.
अहो तुम्ही चुका काढल्यात असं म्हणण्यापेक्षा "तुम्ही उपयुक्त दुरुस्त्या सुचवल्यात" असं मी म्हणेन.
बाकी विस्कळित पणाचं वैशिष्ट्य(दोष म्हणवत नाही ;-) ) आहेच. पण त्यासाठीच मूळ लेखात हे सुद्धा लिहिलयः-
"....माझी ही खर्डेघाशी काही जाणकारांना लिहायला उद्युक्त करेल, उचकावेल आणि प्रतिसादातून अधिक माहिती येत राहिल अशी आशा आहे."
आणि बर्याच प्रमाणात ती अपेक्षा खरी ठरतिये.(तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद बघुन्)
आपलाच मनोबा.
लिहित रहा
एखाद्या गोष्टीकडे वळण्यासाठी इतर अनेक अवांतर गोष्टी कारणीभूत होऊ शकतात. मन यांच्या प्रस्तावनेत विस्कळीतपणा असला तरी अनपेक्षितपणा नाही. उपक्रमावर "छान, लेख आवडला, मला हे माहितच नव्हतं" स्वरूपाच्या प्रतिक्रिया खूप कमी येतील याची "मन" यांना जाणीव असावी. याचबरोबर, चर्चेतून बरेच काही शिकता येते, दुरुस्त करता येते, नवे संदर्भ (लीडस्) मिळतात याची जाणीव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे.
मन यांनी पुढला भाग लवकर टाकावा ही विनंती पण त्यासोबत लेखाची चौकट ठरवून मुद्देसूद लिहावे म्हणजे गोंधळ होणार नाही.
लेखाचे मूळ
तत्पर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
'बहुतांश सुलतान' 'दिसेल त्या मूर्तीस' तोडणारे होते' असे वाटल्याने तुम्ही हा अभ्यास सुरू केला असे वाटते. यातील 'बहुतांश' आणि 'दिसेल त्या मूर्तीवर' या दोन्हीवर आक्षेप घेता येतो. अगदी गझनीच्या मोहमदाने देखील दिसेल ती मूर्ती तोडली नाही असे म्हणण्यास जागा आहे. औरंगजेबाने तर मूर्तीभंजना खूपच कमी प्रमाणात केली असावी. मुस्लिम सुलतान हे जुलमी नव्हते किंवा त्यांनी अत्याचार केले नाहीत असे मला म्हणायचे नाही. देवस्थानांना लुटून त्यांची संपत्ती हस्तगत करणे हे कित्येक राजे (सर्व धर्माचे) करत होते. मुस्लिम राजे त्यातलेच.
काही मुस्लिम राजांनी मूर्तीभंजना केली जुलुमी रितीने धर्मपरिवर्तन केले हे अमान्य नाही. पण हेच 'बहुतांश' मुस्लिम राजांनी केले हे म्हणणे धाडसाचे ठरेल. काही मुस्लिम राज्यकर्ते स्वतःला बुतशिकन म्हणवून घेत होते हे तुमचे म्हणणे मान्य आहे. पण हेच बहुतांशांकरता मान्य नाही.
भारतातील जिझिया कराबाबत माझी माहिती सिमीत आहे. औरंगजेबाच्या पूर्वीच्या मुस्लिम संस्थानांनी तो लावला फक्त अकबर-शहाजहान काळात तो नव्हता असे प्रियाली म्हणतात ते बरोबर असावे.
अहो साहेब, त्या भूभागात पारशी, हिटाइट्स्,फिनिशियन्, मेसापोटेमियन्,असीरियन,प्राचीन मूर्तीपूजक पिर्यामिडवाले इजिप्शियन् ह्यासारख्या संस्कृती किंवा धर्म होतेच की.
त्यांची मिथकं/सिद्धांत कसे जुळत् नाहित् मग्?
यातील हिटाईटस कधीच लोप पावले होते. (ख्रिश्चन व मुस्लिमधर्म स्थापनेच्या वेळी). हीच गोष्ट फिनिशियन,आणि पिर्यामिडवाल्यांबद्दल यांच्या बद्दल म्हणता येते. मेसोपोटेमियन हे ख्रिश्चन धर्मस्थापनेच्या वेळी होते पण मोहमदाच्यावेळी मात्र नव्हते. पारशी लोक या सर्वांपासून दूर आणि बहुदा संख्येने फारसे नसावेत. असीरियन लोकांचा प्रभाव या दोन्ही धर्मांवर झाला असावा. पण याबाबत माझा फारसा अभ्यास नाही.
इस्लाम धर्माच्या वेळी मुख्यतः अरब संस्कृती होती त्यानंतर ज्यु लोक आणि शेवटी ख्रिश्नन लोक. यातील अरब संस्कृतीचा प्रभाव इस्लामीक मिथकात दिसतो. अल्ला, मक्का, हज, काबा ह्या चारही गोष्टी मुस्लिम धर्मातील मुख्य गोष्टी. या चारींचा इस्लामपूर्व अरब संस्कृतीचा जवळचा संबंध आहे. तर ज्यु आणि ख्रिश्चन धर्माशी नाही. त्यामानाने ख्रिश्नन आणि ज्युडाइज्म यांचा जवळचा संबंध आहे. ख्रिश्चन धर्माने जुना करार मानला आहे. पण त्या दोघात त्याबद्दल वाद नाही हे म्हणणे चुकीचे ठरेल.
कारण एकच्. हे सर्व एक तर् बहुदेवता उपासक् होते. किंवा निसर्ग(अग्नि) पूजक्(पारश्यांसारखे) होते. ह्यांना स्वतःचा असा निश्चित अंतिम् ग्रंथ नव्हता.(अपवाद पारशी)
हे कुणीही गर्वानं/अभिमानानं म्हणत नसत की "आम्ही अब्राहमाचे वंशज् आहोत्.". आज तिथला प्रत्येक् ज्यू-ख्रिश्चन्-मुस्लिम अभिमानानं हे म्हणतो.
अब्राहमाला आपला मूळ् पुरुष् मानतो. परमेश्वर एकच आहे ह्यावर त्याची श्रद्धा असते. आणि परमेश्वर् आहेच ह्यावरही त्याची श्रद्धा असते.
हे तीन धर्म एकेश्वरवादी आहेत (भारतातही असे हिंदू धर्मसंप्रदाय आहेत.) तिघांनाही अंतिम धर्मग्रंथ आहेत (वेगवेगळे). बाकीच्यांना नसावेत. हे आपले म्हणणे मान्य. 'अब्राहमचे वंशज' अशी वांशिक अभिमानाची गोष्ट ज्यु लोकच देऊ शकतील.
त्यांचे परस्पर् संबंध् हे मिथक् किंवा कविकल्पना नाही. निदान हे धर्म तरी तसे मानत नाहित्. आपण मानत असाल तर् मी अधिक काही लिहु शकत नाही.
असे वाचताना मला तुम्हाला राग आला आहे असे वाटले. या तिनही धर्मांचे एकमेकाशी संबंध नाहीत असे मला कधीच म्हणायचे नव्हते. फक्त ऊपस मांडणीला विरोध दाखवला. गैरसमज नसावा.
तुम्ही यानिमित्ताने अभ्यास करता आहात आणि यामुळे मला काही नवीन वाचायला मिळेल याबद्दल आभार.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
प्रमोद
अवांतर - (भारतातील) मुस्लिम सुलतान
सहमत आहे.
परंतु, भारतीय इतिहासाच्या संदर्भात सुलतान ही उपाधी गझनीच्या महंमदाला लावता येत नाही. गझनीच्या महंमदानंतर बर्याच काळानंतर आलेल्या महंमद घुरीचा "गुलाम" कुतबुद्दिन ऐबक हा भारतीय इतिहासातला पहिला सुलतान. ही सल्तनत बाबराच्या आक्रमणापर्यंत टिकली. (पानिपतची पहिली लढाई - इब्राहिम लोदीचा पाडाव). या सल्तनतीमध्ये निरनिराळी घराणी होऊन गेली असली (गुलाम, खिल्जी, तुघलक, लोदी) तरीही एकाच प्रकारची पॉलिटी असल्याने या सगळ्याच कालखंडाला सल्तनत म्हणतात.
हे आपले अवांतर. गझनीच्या महंमदाचा उल्लेख मुस्लिम सुल्तानांच्या संदर्भात आला म्हणून आठवले. सरसकट कुठल्याही मुसलमान राजाला/ आक्रमकाला सुल्तान म्हणता येत नाही. उदा. मुघल राज्यकर्त्यांना सुल्तान म्हणत नाहीत. (टिपू नावाचा एक शासक स्वतःला सुल्तान म्हणवून घेत असे, पण त्याच्यापुरताच. त्याच्या वडीलांना सुल्तान म्हणत नाहीत/ नव्हते.) बाकी विषय रोचक आहे.
सुल्तान, बेग, आमीर, खलिफा, शाह, खान आणि गाझी
मुसलमान शासकांत काही उपाध्या आणि पदव्या लावल्या जातात. त्या अशाप्रकारे
सुल्तानः सुल्तान हा शरायाच्या कायद्यांप्रमाणे राज्य करणारा शासक. तो स्वतः धर्मगुरू नसतो परंतु धर्मानुसार राज्य करतो.
बेगः बेग या तुर्की शब्दाचा अर्थ प्रमुख (मुखिया, chieftain) असा आहे.
आमीरः आमीर ही सरदारांसाठी सन्मानपूर्वक वापरण्यात येणारी पदवी आहे. आमीर ही पदवी लावणारी स्वतः शासक नसून शासकाचे मुख्य वजीर, सेनापती वगैरे असतात.
खलिफा: खलिफा म्हणजे शासक, सम्राट. इराक वगैरेमध्ये वापरण्यात येणारी पदवी. खलिफा हा धार्मिक नेताही असतो.
शाहः शाह हे पर्शियन नाव. "क्षेत्र-क्षत्र" या शब्दांचा अपभ्रंश. इराणमधल्या शासकाला शाह असे संबोधले जाते. मुघलांनी ते वापरले. (शेहनशाह - राजांचा राजा)
खानः मूळ मंगोल शब्द. मंगोल टोळी प्रमुख, राजा वगैरेंसाठी वापरण्यात येणारी उपाधी.
गाझी: धर्मासाठी प्राणपणाने लढणार्या मुसलमान योद्ध्याला गाझी म्हटले जाते. अनेक सुल्तान, खलिफा वगैरे आपल्या नावासोबत गाझी ही उपाधी लावत. गाझी ही अतिशय मानाची पदवी समजली जाते. हेमूला ठार केलेस तर तू गाझी होशील आणि तुझा मान वाढेल असे बैरामखानाने अकबराचे ब्रेनवॉशिंग केले होते. :-)
---
वरील संज्ञा अतिशय ढोबळ शब्दांत वर्णन केल्या आहेत. त्यांचे धार्मिक संदर्भ वगैरे दिलेले नाहीत.
शाह, आमीर
अजून थोडे अवांतर -
शाह, अर्थात राजा, ही पदवी मध्ययुगात व्यापार्यांनाही (अनधिकृतरीत्या) मिळाली. तसेही ते श्रेष्ठी - शेठ होतेच, पण समाजाचा एक मोठा आधार म्हणून त्यांना योग्य तो मानही मिळत असे, विशेषत: गुजरातसारख्या व्यापारी प्रदेशात. आजही अनेक गुजराती बांधव हे (शाह) आडनाव लावतात. (संदर्भ - मला वाटते, नानी पालखीवालांनी एका लेखात लिहिले आहे - नीट आठवत नाही.)
आपल्याकडील हंबीर आणि राजपुतान्यातील हम्मीर ही नांवे आमीर वरुनच आलेली आहेत.
शाह वि. शहा.
आजकालच्या मुस्लिमांत शहा हे आडनांव भिक्षेकरी असलेल्या एका शेड्युल्ड कास्टसाठी आहे. फकीर नसलेले, (म्हणजे लग्न इ. करुन) पण भिक्षेवर उपजीविका करणारे, असे काहिसे यांचे मूळ रूप असावे. हे आडनाव शहा असे लिहितात. शाह असे नाहे.
बरेच मराठी गुजराती (काही पिढ्यांपासून महाराष्ट्रात स्थायिक असे) लोक पूर्वी शहा असे आडनांव लावीत/लिहित असत, ते आजकाल शा भिमजीभाइ स्टाईलने शाह् असे लिहू लागले आहेत.
खलिफा
थोडी सुधारणा.
खलिफा म्हणजे त्यामागून येणारा. (सक्सेसर) मोहमद पैगंबरानंतर येणारे सर्वोच्च धर्मगुरु व राजे यांना ही पदवी लावत. भारतात खिलाफत चळवळ झाली त्यात तुर्कस्थानातील खलिफा संपल्याच्या निषेधार्थ ती होती.
प्रमोद
+१
+१. मला टंकायचा कंटाळा आला होता म्हणून वर धार्मिक संदर्भ म्हणत टाळले. ;-)
मामेलक
महंमद घुरीचा "गुलाम" कुतबुद्दिन ऐबक हा भारतीय इतिहासातला पहिला सुलतान.
गुलामवंशासाठी मामेलक हा शब्द आहे. ह्या सुलतानांना बगदादच्या खलिफाकडून राज्य करण्याची औपचारिक परवानगी मिळवावी लागत असे वाचल्याचे आठवते.
तरीही एकाच प्रकारची पॉलिटी
म्हणजे कशा प्रकारची?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मामेलूक, गुलाम, इलबारी
बरोबर आहे. मामेलक/ मामेलूक याचा अर्थच मुळात गुलाम आहे. त्यामुळे गुलाम हाही शब्द वापरात आहे. तसेच इलबारी हाही शब्द आपल्याला आढळेल. इतिहासाच्या अनेक पुस्तकांत हे सगळे शब्द वापरलेले आहेत. इंग्रजीमध्ये देखील मामेलूक आणि स्लेव्ह असे दोन्ही शब्द वापरलेले दिसतात.
(आशा आहे, की आपण हा प्रश्न सिन्सिअरली विचारला आहे. परीक्षा घेण्यासाठी किंवा आपले मत तसे नाही म्हणून विचारला आहे, असे नसावे. आपले मत वेगळे असल्यास कृपया तसे स्पष्ट करावे.)
एकाच प्रकारची पॉलिटी याचा अर्थ असा नाही की त्यांची एखादी लिखित घटना वगैरे होती. तुम्ही म्हणताय तसे खलिफाचे सॅंक्शन त्यांच्यासाठी आवश्यक (नसले तरी काडीचाही फरक पडत नव्हता हा भाग वेगळा. केवळ प्रतिष्ठेच्या कल्पनेपाई ते आवश्यक असावे) होतेच. पण ते त्यांचे वेगळेपण नाही. गुलाम घराण्यापासून ते लोदींपर्यंत सगळी मंडळी ही “चहलगनी” होती. तुर्क होती. एकाच परंपरेतील होती. सत्तापालट होत होता. एका घराण्यातून सत्ता दुसऱ्या घराण्यात जात होती. पण एकाच – बाहेरुन पाहता एकाच- सेटमध्ये आतल्या आत सत्ताबदल होत होता. बाबराने हल्ला केला, आणि इब्राहिम लोदीला परास्त करुन दिल्ली घेतली तेंव्हा बाबराला पुढला सुलतान असे मानले गेले नाही. सल्तनत संपली. या अर्थाने एकाच प्रकारची पॉलिटी होती. त्यातही सुल्तानानुसार बदल घडत होतेच. उदा. अल्लाउद्दिन खिल्जी हा खलिफाला मुळीच मानत नसे.
(डिस्क्लेमर! काही वर्षांपासून इतिहास वाचनाची लिंक तुटली आहे. तपशिलात चुका होऊ शकतात.)
सहज विचारले
तरीही एकाच प्रकारची पॉलिटी
तुमच्यामते ऐबकापासून लोदीपर्यंत समान धागा कुठला एवढे जाणून घ्यायचे होते. उदा. अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक ह्यांच्या कारकीर्दीत कुठल्या गोष्टी तुम्हाला समान आढळतात? मग ते महसूल प्रशासन असू शकते. ह्यावरून आठवले: अल्लाउद्दीन खिलजी हा चांगला प्रशासक होता. तो सैनिकांना पगार सैनिकांना रोख पगार देत असे. त्याने आवश्यक धान्यांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलली होती.
तुम्ही म्हणताय तसे खलिफाचे सॅंक्शन त्यांच्यासाठी आवश्यक (नसले तरी काडीचाही फरक पडत नव्हता हा भाग वेगळा. केवळ प्रतिष्ठेच्या कल्पनेपाई ते आवश्यक असावे) होतेच.
नक्कीच. मी आपली ओघाओघात माहिती दिली. माझ्या आठवणीनुसार 'तुर्कान-ए-चहलगनी' म्हणजे हा तुर्की वंशाच्या चाळीस सरदारांचा गट होता. लोदी बहुधा पश्तू वंशाचे होते आणि खिलजी तुर्की-अफगाणी वंशाचे.
हे लोक जरी तुर्की असले तरी ते फारसी सण, प्रथा मानीत असत. नवरोज़च (नववर्षाचा) सण साजरा करीत असत असे कुठे तरी वाचल्याचे आठवते. ह्यावरून हे आठवले की युरोपातल्या उमरावांच्या घराण्यातल्या, राजघराण्यातल्या व्यक्तींना फ्रेंच भाषा येणे आवश्यक असे.
माझीही इतिहासवाचनाची सवय इतिहासजमा झाली आहे. त्यामुळे भरपूर डिस्काउंट द्यावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
چهل - चाळीस - चीहील
फार्सीत ४०= (चाळीस)= चीहील
गन= बहुवचन दाखवणारा प्रत्यय (बच्चा - बच्चागन)
चहलगन चाळीसजण
(माझ्या आठवणीनुसार 'तुर्कान-ए-चहलगनी' म्हणजे हा तुर्की वंशाच्या चाळीस सरदारांचा गट होता. संदर्भात)
पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!
त्रिसमुद्रतुरंगपीततोय
फार्सीत ४०= (चाळीस)= चीहील
गन= बहुवचन दाखवणारा प्रत्यय (बच्चा - बच्चागन)
बरोबर. गन हा बहुधा जनचा कॉग्नेट शब्द असावा.
त्रिसमुद्रतुरंगपीततोय आहे का? मला वाटते कुठल्या तरी सातवाहनाला म्हणत असत. थोडे इकडे होईल तुरंगाचे. पण तुरंग तिथे आहे हे नक्की. ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायचे बहुधा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
त्रिसमुद्रतोयपीतवाहन
शालिवाहनासाठी काढलेले प्रंशसोद्गार आहेत असे वाटते. त्याच्या आईने गौतमीने ते कोरून घेतले होते. उपक्रमावरच मागे चर्चा झाली होती.
अधिक माहिती येथे बघा.
होय.
परंतु, भारतीय इतिहासाच्या संदर्भात सुलतान ही उपाधी गझनीच्या महंमदाला लावता येत नाही.
मान्य. पण त्याच्यामुळं माझ्या कुतुहलाला एक् निमित्त मिळालं. कारण त्यानं(ही) मूर्ती फोडल्याचं मी वाचलं.
गझनीच्या महंमदानंतर बर्याच काळानंतर आलेल्या महंमद घुरीचा "गुलाम" कुतबुद्दिन ऐबक हा भारतीय इतिहासातला पहिला सुलतान.
मान्य.
मनोबा
एकच परंपरा
>>एकमेका जवळ असल्याने बरीचशी मिथके एकत्र बाळगून होते असे म्हणता येईल.
बहुतेक तसे नाही. आपण एकाच परंपरेचे पाईक असल्याची भावना असते. ख्रिस्ती लोक मोझेसला प्रेषित मानतात. तसेच मुसलमान मोझेस आणि जीझस यांना प्रेषित मानतात. महंमद हा शेवटचा प्रेषित असून त्याने ईश्वराचे म्हणणे काय हे फायनल सांगितले आहे असा मुसलमानांचा दावा असतो.
(नंतर आलेले आधीच्याचे प्रेषितत्व मान्य करतात. आधीचे नंतरच्यांचे मानत नाहीत असे वाटते. म्हणजे महंमद प्रेषित होता असे ख्रिस्ती मानत नसावेत. आणि ख्रिस्त प्रेषित होता असे ज्यू मानत नसावेत).
नितिन थत्ते
+१००
ख्रिस्ती लोक मोझेसला प्रेषित मानतात. तसेच मुसलमान मोझेस आणि जीझस यांना प्रेषित मानतात. महंमद हा शेवटचा प्रेषित असून त्याने ईश्वराचे म्हणणे काय हे फायनल सांगितले आहे असा मुसलमानांचा दावा असतो.
+१
(नंतर आलेले आधीच्याचे प्रेषितत्व मान्य करतात. आधीचे नंतरच्यांचे मानत नाहीत असे वाटते. म्हणजे महंमद प्रेषित होता असे ख्रिस्ती मानत नसावेत. आणि ख्रिस्त प्रेषित होता असे ज्यू मानत नसावेत).
+१००
सर्वात लेटेष्ट (इस्लामच्याही नंतर) आलेले "अहमदिया " पंथाचे लोक २० व्या शतकातील पंजाबातल्या मियाँ अहमद ह्यांना (महंमदानंतरचा) प्रेषित् मानतात.
बहुतांश् इतर मुस्लिम तसे मानत नाहित आणि म्हणुन त्यांना "वाट चुकलेले मुस्लिम्" समजतात. पाकमध्ये त्यांचा प्रचंड छळ सुरु असल्याच वाचलय.
आवाका
लेखाचा विषय उत्कंठावर्धक असला तरी प्रचंड आवाक्याचा विषय आहे. संस्कृतींचा उदय मध्य आशिया आणि मध्यपूर्व आशियात मेसोपोटेमिया, फोनिशिया, असिरिया, इजिप्त वगैरे प्राचीन संस्कृतीचा परामर्श या लेखमालिकेत होणार नसावा असे ज्यू-ख्रिश्चन-मुस्लिम या धर्मांपासून सुरुवात केल्याने वाटते. दुसर्या शब्दांत या मालिकेत वरील प्रदेशाचा इतिहास इ.स.पूर्व २०००-१५०० पासून पुढे सुरू होत आहे असे मानता येईल का? या उत्तरामुळे लेखमालिकेची चौकट समजण्यास मदत होईल.
हम्म....
लेख मालेत मध्यपूर्वेची आणि जगाची माहिती लिहायची आहे इब्राहिमी चष्म्यातून.
बायबल् इस पूर्व २००० पकडल्यास ती वेळ येते मोझेस च्या आसपासची. पण त्यापूर्वी अति लघु रुपात् का होइना हा मोझेस् कोण्?
कशासाठी भांडला एवढ्या राजसत्तेशी? त्यानं सोडावलेले गुलाम कोण् होते? गुलामित कुठुन आले? इथपासुन ते Theory Of Genesis, Adam- Eve ह्यापासुन ते नोहाज् आर्क वाला नोहा - यशया- डेविद् ( यरुशलेम वसवणारा)-सोलोमन ह्यावर एकेक पान टाकाव म्हणतोय.
म्हणजे, भारताच्या पंतप्रधानांच्या सी व्ही मध्ये नाही का २-३ पानात प्रमुख घटना आणी यश ह्यांचे उल्लेख असतात, अगदि तसच्.
ऍडम्- इव्ह् ते मोझेस इथपर्यंत एक्-दोन् पानं,
मोझेस वर एक् दोन् पानं, (जीवनातल्या ठळक घटना) सामावणं अपेक्षित आहे.
त्यानंतर "सोडोमी" हा शब्द आंग्ल भाषेत् कसा आला? ज्यूंची तीन टेम्पल्स नष्ट कशी झाली ते ख्रिस्त हा पुढचा भाग.
( बायबल् मधील् मोझेस् आणि जीझस हे शब्द् काढुन् टाकल्यावर् येणार्या संकीर्ण पण ठळक घटना. )
ख्रिस्त जन्म्, ख्रिस्त कार्य् ( थोडक्यात् न्यु टेस्तामेंट् ( अगदि वादग्रस्त/दुर्लक्षित् गॉस्पेल् ऑफ् जुडास सुद्धा पकडुया)) ह्यावर २-४ पानं
आणि मग ख्रिस्त ते पैगंबर् असा प्रवास्. इस्लामच्या नजरेतून्.
त्यानंतर् प्रेषित महंमदाचं कार्य. महंमदानंतर "साहाबांचा" काळ, अबु बक्र् ते अलि इत्का काळ्( म्ध्य पूर्वेत् इस्लामी वर्चस्व येइपर्यंतचा) ह्यावर् ४-५ पानं असं अपेक्षित् आहे.
खूपच संक्षिप्त लिहावं लागतय हे मात्र खरं.
काही दुरुस्त्या ह्या फॉर्म्याटमध्ये असल्यास जरुर् सांगा.
आपलाच मनोबा.
शंका
"बायबल् इस पूर्व २००० पकडल्यास.."
बायबल हे इसवीसनपूर्व कसे असेल? :)
बाकी लेखमाला वाचण्यास मीपण उत्सुक आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आवाक्यामुळे विस्कळित
"बायबल ईसपूर्व २००० काळतले" हा शब्दप्रयोग थोडासा गोंधळात पाडणारा आहे.
बायबलचा जुना करार ईसवीसनापूर्वी काही हजार वर्षांसाठी संकलित होत होते. मोशे (ईसपूर्व हजारएक वर्षे) या ऐतिहासिक-कल्पित घटनांनी घटित पात्रानंतर अन्य लोकांनी हिब्रू बायबलमध्ये भर घातली.
नवा करार (येशूबद्दल आणि त्याच्या शिष्यांबद्दल माहिती) ही ईस ~३०० सुमारास संकलित झाला.
म्हणजे आज ज्याला बायबल म्हणतात त्याचे भाग ईसपूर्व २००० ते ईसपश्चात् ३०० असे काहीसे म्हणावे. "बायबल ईसपूर्व २००० काळातले" असा उल्लेख टाळला असता, तर बरे झाले असते.
वाटल्यास "बायबलच्या ईसवी आणि हिब्रू भागांचे अंतर्गत संदर्भ जुळवले तर मोशे हा येशूपूर्वी १०००-२००० वर्षांपूर्वी होऊन गेला" असे काही म्हणता आले असते.
- - -
तुमचा प्रस्तावित आवाका बराच विस्कळित वाटतो.
म्हणजे मोशेचे या तीन धर्मांत महत्त्व अनन्यसाधारण आहे - त्याला समाजशास्त्रीय, ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, लोककथा-शास्त्र (फोक्लोरिक्स्) या सर्व अंगांनी महत्त्व आहे.
त्या मानाने "सोडोमी शब्द इंग्रजीमध्ये कसा आला" हा तौलनिक भाषा-इतिहासातला तपशील क्षुल्लक आहे. (बायबलचे इंग्रजी भाषांतर होऊन तो इंग्रजीभाषकांचा प्रमुख धर्मग्रंथ झाला. तर त्यातील सर्व शब्द हे इंग्रजीमध्ये येणार नाहीत तर काय?)
ख्रिस्तजन्म आणि ख्रिस्तकार्य हे त्या मानाने नवीन असल्यामुळे त्यातील ऐतिहासिक आणि भाकडकथांच्या मिश्रणाचा अभ्यास मूसाच्या कथांपेक्षा वेगळा होईल, असे वाटते.
प्रेषित महंमदाचे कार्य आणि लढाया यांचा अभ्यास ख्रिस्ताच्या कार्यापेक्षा वेगळेच समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे बहुधा वेगळीच अभ्यासपद्धती घेऊन येईल.
- - -
इस्लामच्या धर्मसंस्थापना, युद्धासह धर्मप्रसार, धर्माचा समाजव्यवस्थेवर परिणाम... वगैरे विषयांकडे भारतीय/मराठी दृष्टीने बघत नरहर कुरुंदकर यांनी निबंध लिहिलेले आहेत. त्यांच्या "जागर" या संग्रहात उपलब्ध आहेत.
त्यांचे निष्कर्ष माना वा ना माना, लेखातील प्रवाह आणि उपविषयांची मांडणी निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल.
लेखनाचा विषयविस्तार काटेकोर (मग तो आवाका मोठा का असेना), आणि त्यातील उपविषयांची नेटकी मांडणी केल्यास वाचकांची मोठीच सोय होते.
तुमच्या या स्तुत्य अभ्यास-उपक्रमामध्ये मांडणीचे मनावर घ्यावे ही मैत्रीपूर्ण विनंती.
चांगला विषय आहे
उत्कंठावर्धक चर्चा. वाचतोय .
- टारेशु मोझेस मोहोम्मदुद्दिन
तूर्तास
आर्य प्रभावाखालील प्रथम अनार्य "पुश्तू" जमातीचा
आर्य ही भाषाशास्त्रीय संज्ञा (लिंग्विस्टिक टर्म) आहे. तिला वंशाशी जोडणे चुकीचे आहे. हिटलरने तेच केले. अनेक, किंबहुना बहुसंख्य, हिंदुत्ववादीही तीच चूक किंवा खोडसाळपणा करतात.
आपली सत्ता वाढविण्यासाठी धर्माचा वापर सगळ्याच धर्माच्या राजांनी केला आहे. बेवडे राजे सोयीनुसार जिहाद पुकारत असत. बाबराची कथा प्रसिद्ध आहे. दारू पिता पिता कसे त्याने चषक फोडले आणि जिहाद पुकारला वगैरे वगैरे. तूर्तास एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
डांबीस
बाबर डांबीस होता. ;-)
तसे बाबर आणि हुमायूं (आणि औरंगजेब सोडल्यास बाकीचेही) कट्टर नव्हतेच. जिहाद बिहाद या फक्त वल्गना.
पुश्तु --अनार्य वगैरे
ह्याबद्दल इथे मला अधिक् लिहायचं नाहिये. लेखाचा उद्देश जास्तिकरुन इब्राहिमी प्रथा-परंपरा ,श्रद्धा ,लोककथा आणि घटना ह्याबद्दल् लिहायचा आहे.
(तो उल्लेख फक्त भारतीय चष्म्यातुन् मध्यपूर्व् कुणिकडे येते आणि तिथे प्राचीन काळात काय काय् होतं ह्याचा पुसटसा उल्लेख करण्यासाठी आहे. वाचकाला फक्त दिल्लीपासुन् ते पश्चिमेला मोरोक्को पर्यंत नकाशावरील हवाइ सैर् घडवुन आणणे इतकाच त्या माहितीचा मुख्य उद्देश् आहे. )
आणि ह्या उल्लेखाबद्दल् मी प्रथम वाचलं ते वेदकालीन दाशराज्ञ्य् युद्धाच्या संदर्भात.(बहुदा लोकमान्यांच्या "आर्क्टिक होम् ऑफ् वेदाज्" चे मराठी भाषांतर आहे त्यातच. ) नक्की कुठे ते आठवत नाहिये.
पण जवळ् जवळ् तशीच माहिती इथेही आहे.
आर्य-अनार्य ह्याबद्दल इथे अधिक लिहु शकत नाही. आपली माहिती जर खात्रीपूर्वक बरोबर् असेल तर उपक्रम पंतांना आपण मूळ लेखात योग्य ते बदल करायला सुचवुयात का?
मला प्रकाशित झालेल्या लेखाचं संपादन् करता येत् नाहिये.
आपलाच मनोबा.
आर्य
आर्य हा शब्द कोणताही वंश किंवा एक जन समुह न दर्शवता एक संस्कृती दर्शवतो. यज्ञाद्वारे केलेली पूजा किंवा आराधना हे या संस्कृतीचे एक मुख्य वैशिष्ट्य मानता येईल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
अब्राहम आणि ब्रह्मा
माझ्या ओळखीच्या एका बांग्लादेशी कट्टर मुसलमानाने अब्राहम आणि ब्रह्मा एकच असे मला सांगितले होते त्याची आठवण झाली. अब्राहमाच्या स्पेलिंगामधला सुरुवातीचा 'ए' शेवटी जावून ब्रह्मा झाला असे त्याचे म्हणणे होते. असो.
याहुन भन्नाट भन्नाट दावे उपलब्ध आहेत.
फक्त् ते उलट बाजुने आहेत.
अधिक माहितीसाठे बंदी येण्यापूर्वीच सनातन प्रभात परिवार, पु ना ओक आणि प वि वर्तक ह्या मंडळींना संपर्क करणे.
--मनोबा
माहितीपूर्ण, रुचिपूर्ण ...
विषय माहितीपूर्ण, रुचिपूर्ण आहे.
भारताच्या दृष्टीने मध्य-पूर्व म्हणजे पश्चिम आशिया. अमेरिकेच्या दृष्टीने तो मध्य-पूर्व.
गेल्याच्या गेल्या पिढीतील थोर विद्वान अ. ज. करंदीकर यांचा एक ग्रंथ आहे. `महाभारताचा उगम पश्चिम आशियात` हे सूत्र घेऊन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्याचे नेमके नाव आत्ता आठवत नाही (हे नाव मी कटाक्षाने लक्षात ठेवतो आणि कटाक्षानेच विसरून जातो!!!) ; पण आज घरी पाहतो आणि त्याचे नाव उद्या सांगतो. अतिशय रोचक (आणि किचकटही!!!) असा तो ग्रंथ आहे. पुस्तकांच्या नव्या-जुन्या बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नाही.
एकूण, विषय चांगलाच रंगणार आहे हा. शुभेच्छा.
नाव आठवले...
अ. ज. करंदीकरांच्या ग्रंथाचे नाव आठवले - महाभारताची पार्श्वभूमी : पश्चिम आशिया
विशेष अभिनंदन.
घरी जाऊन अमुक संदर्भ तपासून लिहितो/लिहिते असे अनेक उल्लेख उपक्रमावर सापडतात. १३४ क्र. च्या ट्रॅकर पानापासून इथपर्यंतच्या उलट वाटचालीत तुमचा पहिला दाखला सापडला जिथे संदर्भ तपासून आठवणीने उत्तर लिहिलेले सापडले.
अभिनंदन व धन्यवाद. ग्रंथ रोचक (इंटरेस्टिंग) असावा. शक्यतो मिळवून वाचण्याच्या यादीत नोंदविलेला आहे.