मराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही!
नमस्कार,
मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.
नवीन मराठी संगीताच्या इंटरनेटवरील प्रभावी प्रसारासाठी सध्या "मानबिंदू म्युझिक शॉपी" हा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे.
माहितीजालावर असलेल्या प्रत्येक मराठी ब्लॉग/संकेतस्थळावर नवीन मराठी संगीत सहज उपलब्ध व्हावे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे; तसच संगीताच्या ऑनलाईन् विक्रीतून संकेतस्थळ/ब्लॉग चालविणा-या व्यक्तीला उत्पन्नही मिळावे हे या प्रकल्पाचे मूळ उद्दीष्ट आहे. "मानबिंदू म्युझिक शॉपी" तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर सुरू करण्यासाठी कु_ठ_ल्या_ही तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसून फक्त आम्ही दिलेल्या ४-५ ओळी तुमच्या संकेतस्थळावर कॉपी पेस्ट करणे अभिप्रेत आहे! ब्लॉगसाठी तर हे काम फक्त ३ क्लिक्स मध्ये फत्ते होते!
याबद्दल सविस्तर माहिती http://shopee.maanbindu.com येथे दिलेलीच आहे. तरीही या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन आणि आपणही ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यास आम्हाला मदत करावी असे मी आवाहन करतो!
धन्यवाद
य़ोगेश
Comments
विषय उपक्रमाच्या धोरणात बसत नाही.
कल्पना चांगली असली तरी हा विषय उपक्रमाच्या धोरणात बसत नाही. म्हणूनच सुजाण वाचकांनी प्रतिसाद दिलेले नाहीत. मात्र ज्याअर्थी हे निवेदन अजूनही येथे आहे त्याअर्थी ते उपक्रमरावांच्या नजरेस पडले नसावे अथवा त्यांना विषयाबाबत/धागाकर्त्याबाबत सॉफ्ट कॉर्नर असावा असे वाटते.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
माझ्यासाठी महत्वाचे!
सुजाण वाचकांनी ते वाचले आहे हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे!
उपक्रमरावांचे माझ्यबद्दल काय मत आहे याची मला कल्पना नाही! पण् धोरणामध्ये नसतानादेखील एक चांगला अपवाद म्हणूनही जर हा धागा सुरू ठेवला असेल तर मी त्यांचा शतशः आभारी अहे :)
..कदाचित हा लेख वाचल्यावर तुम्हालाही माझ्याबद्दल् सॉफ्टकॉर्नर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
योगेश पितळे
www.facebook.com/maanbindu
साशंक
याबद्दल साशंक आहे. नवीन संकेतस्थळ सुरू केल्यावर त्याची जाहिरात उपक्रमावर होऊ शकते. याची इतरही उदाहरणे आहेत.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
उपक्रम प्रशासकांना विनंती
माझी उपक्रम प्रशासकांनाही नम्र विनंती आहे की मराठी संगीताच्या प्रसारासाठी उपक्रमवरही मानबिंदू म्युझिक शॉपी करण्याबाबत विचार करावा; जेणेकरून नवीन मराठी संगीत अधिकाधिक मराठी लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल!
धन्यवाद
योगेश पितळे