उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ह्याची खरंच गरज आहे का?
डार्क मॅटर
February 9, 2011 - 10:35 pm
नुकताच यूट्यूबवर हा विडियो पाहण्यात आला.
खरंच ह्याची गरज आहे का? अनिवासी भारतीयांना परदेशात त्यांचा असा आवाज असावा असे वाटते पण तो असा धर्मावर आधारीत असावा का?
ह्या विडियोतली एक मुलगी तर म्हणते भारतीय नसलेले पण हिंदू असणार्यांचे काय? (सावरकरांच्या 'हिंदू' ह्या व्याखेप्रमाणे ते भारताला पितृभू मानतात का?)
'सनातन प्रभात' चे हे एनाराय व्हर्जन तितकेच निंदनीय नाही का? मी तरी लगेच 'डीसलाईक' हे बटन दाबून आलो.
दुवे:
Comments
मूर्खपणा वाटतो
मी अनेक महीन्यांपूर्वी या ब्लॉगवर जी ए कुलकर्णींचे हे वाक्य वाचले होते की "सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलतो आहे ते नीट कळत नाही." . का माहीत नाही पण त्या वाक्याची वरील फीत पाहून आठवण झाली.
उठसूठ तुम्ही जर ऍडव्होकसी (उपदेशाचे डोस) लोकांना पाजायला निघालात तर लोक तुमच्यापासून पळून जातील. कोणाला रस आहे तुमचे ऐकण्यात आणि ते सुद्धा "धर्म" या विषयाइतकी वैयक्तिक माहीती ऐकण्यात? दैनंदिन जीवनातील सहनजसुंदरताच नष्ट होईल.
मला वर उधृत केलेली चित्रफीत आवडली नाही. या "निओफॅनेटीक" लोकांना वेळीच आळा घातला पाहीजे नाहीतर आपले डोके खातील असे वाटते.
सहमत
सहमत.
काही वर्षांपूर्वी मी शाखेत आणि बजरंग दलाच्या मीटिंगांना जायचो तिथल्या चर्चांची आणि बौद्धिकांची प्रकर्षाने आठवण झाली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चांगला विषय
याच विषयाशी संबंधित या चर्चेतील हा धागाही येथे सुरू होणे योग्य ठरेल असे वाटते.
अल्पसंख्यांक
अल्पसंख्यांकाना दिलासा देणारा आणि एकत्र बांधून ठेवणारा हा धर्मच असतो तेव्हा वरच्या चित्रफीतीत काही वेगळे आहे असे वाटले नाही.
बायदवे, दिवाळीच्या निमित्ताने मला अमेरिकेत आणखी एक पेड हॉलिडे मिळाला तर हवा आहे. सुट्ट्या अगदीच कमी असतात.
वेगळेपणा
एकमेकांना बांधून ठेवण्याच्या मर्यादा ओलांडून स्वतःच्या बॉसला , शेजार्यांना, इतरांना (पक्षी परदेशी लोकांना) दिवाळी, स्वस्तिकाचे महत्व पटवा आदिवर भर दिला आहे ते वेगळं वाटत नाही का?
नाही
नाही काहीही वेगळं नाही. अशी पद्धत अनेक वर्षे चालत आली आहे. हा स्वतःला सुरक्षित करण्याचा मार्ग आहे.
मला दिवाळीला सुट्टी हवी असेल तर मीही बॉसला दिवाळीचे महत्त्व पटवून द्यायला तयार आहे. शेवटी सुट्टी महत्त्वाची.
बाकी, इतिहासाच्या पुस्तकात खरेच हिंदुइजम कंसिडर्ड विमेन इन्फिरिअर टू मेन असे लिहिले आहे पण ते काही खोटे नाही, खरेच आहे. अक्षम्य अपराध म्हणजे चंद्रगुप्त मौर्याला Candragupta (Kuhn-druh-Goop-tuh) केले आहे. मी लेकीला सांगितलं आहे, 'जर का गुर्जींनी कंद्रगुप्त असा शब्द उच्चारला तर अजाबात ऐकून घ्यायचं नाही. ' ;-)
अक्षम्य काय?
त्यात अक्षम्य काय आहे? आमच्या इतिहासाच्या पाठ्य पुस्तकात टायटॅनिकचे टीटॅनीक केले होते, स्टीवन चे स्टीफन केले होते. अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील.
भारता बाहेरच्या लोकांना भारताचा इतिहास हा परकाच आहे ना? तेव्हा अश्या चुका होणारच.
हाहाहा!
आम्ही चुका करतो म्हणून त्यांच्या चुका चालवून घ्या? जे अक्षम्य आहे ते अक्षम्य आहे. चुका सुधारायला हव्यात.
बाकी, अबब! तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात टीटॅनिक होते? केट विन्स्लेटही असेल. मज्जा आहे बॉ!
मग सुधरवा ना. कुणी अडवले आहे?
तुमच्या हिशोबाने प्रत्येक चूक ही अक्षम्य असते का? किरकोळ चुका सगळेच करतात. उगाच 'अक्षम्य' वगैरे सुर लावण्यात काही अर्थ नाही इतकेच दाखवायचे होते.
टायटॅनीक बुडणे ही एक ऐतिहासिक घटना होती हे तथाकथित इतिहासप्रेमींना सांगावे लागावे म्हणजे अवघड आहे.
सुधरवेन हं!
तुम्ही कल्जी नका करू.
प्रत्येक ऐतिहासिक घटना इतिहासाच्या पुस्तकात नसते हेही इतिहासप्रेमींना ठाऊक असते.
असो. गूडनाईट!
गुडनाईट
इतिहासाचे पुस्तकही इतिहाप्रेमींना तोंडपाठ नसते. आम्ही कल्जी नाही करत पण तेवढं भारतात गेलात तर जुने पुस्तक काढून वाचा बरं नक्की इतकी विनंती.
शिपिंग चार्जेस
पुस्तके प्रेमींनाही तोंडपाठ नसतात आणि तथाकथित तज्ज्ञांनाही नसतात.
अहो तुम्ही इतिहास शिकला आणि मी इतिहास शिकले त्या काळात फरक असेल ना! टायटॅनिक सॉरी टिटॅनिक १९९७ ला आला. ;-) तेव्हा असं करा की पुस्तक तुम्ही पाठवून द्या. मी अवश्य वाचेन. पाहिजे असल्यास मी शिपिंग चार्जेसही देईन.
१९९७
पुस्तके कुणालाच तोंडपाठ नसतात हेच सांगायचे आहे. म्हणूनच तुम्हाला आठवत नसेल म्हणजे एखादा उल्लेख नाहीच असा अर्थ होत नाही.
बाकी तुम्हाला टायटॅनिक विषयी माहिती १९९७ च्या सिनेमातूनच मिळाली असावी असे वाटते. त्याशिवाय निव्वळ सिनेमा आणि केट विन्स्लेट इतक्याच विषयी तुमचे प्रतिसाद फिरत राहीले नसते. तसेही १९९७ मधे विकिपिडीया कुठे होते म्हणा?
असो.. डीकॅप्रीओ तुमचा तितका लाडका दिसत नाही.
१९८७
तोंडपाठ नसणे आणि उल्लेखाची आठवण न येणे यांचा संबंध नाही. टीटॅनिक वगैरे आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात नव्हते हे स्पष्ट आठवते. कल्जी नसावी.
मला टायटॅनिक १९८७ पासून माहित आहे आणि तेव्हाही विकीपीडीया नव्हते बरें! (पुस्तक: ओशन ट्रँगल, लेखक : बाळ भागवत, प्रकाशन: १९८७) आणि हे पुस्तक नक्कीच इतिहासासाठी अभ्यासाला नव्हते. :-)
नाही. महाबावळट मनुष्य वाटतो.
टायटॅनिक
टायटॅनिक बोट बुडणे यात ऐतिहासिक काय आहे? एक दुर्घटना एवढेच फार तर म्हणता ये ईल. महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई व कोकण मधल्या, जुन्या पिढीतील लोकांसाठी 'रामदास' ही बोट कोकणच्या किनार्याजवळ बुडणे या घटनेला टायटॅनिक बुडण्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने महत्व होते. हॉलीवूडने सिनेमा बनवला म्हणजे एखादी घटना ऐतिहासिक होत नसते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
अहो चंद्रशेखर
टायटॅनिक बुडण्यात ऐतिहासिक काही असण्यापेक्षा ती बुडली हे भारतीय इतिहासाच्या अभ्यासक्रमात आहे हे विनोदी आहे. टायटॅनिक सोडा हो, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्टीवन कोलबेरसुद्धा असावा (धम्मकलाडूंचा प्रतिसाद - पान २) असे त्यांचे म्हणणे असावे आणि तसे असेल तर भारतीय पाठ्यपुस्तकी इतिहास ज्ञानदाताई देशपांडे लिहितात असेही सांगण्यास डार्क मॅटर मागे पुढे बघणार नाहीत. आपण गंमत बघायची. असे गंभीर प्रतिसाद नाही द्यायचे.
बायदवे, तुमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात टायटॅनिक सॉरी! टिटॅनिक होती का? ;-)
होय ,टिटानिक् क्रमिक पुस्तकात होती.
टिटानिक् (पुस्तकात असेच छापलेले असे.)चा उल्लेख क्रमिक पुस्तकातून एके काळी नक्कीच असे पण बहुधा तो पदार्थविज्ञानाच्या अथवा भूगोलाच्या पुस्तकांमधे असावा.बर्फाची घनता पाण्यापेक्षा थोडीशीच कमी असल्याने तो जरी पाण्यावर तरंगला तरी त्याचा फार मोठा भाग(नऊ दशांश) पाण्याखाली असतो हे तथ्य स्पष्ट करताना हिमनगाचे उदाहरण दिलेले असे व अशाच एका महाप्रचंड हिमनगावर आदळून टिटानिक् ही त्या काळातली अत्याधुनिक आणि प्रासादतुल्य बोटही फुटली असे समर्पक उदाहरण असे.
भूगोलाच्या पुस्तकामधेसुद्धा उत्तरध्रुवीय प्रदेशातले मोठमोठे हिमखंड निखळून दक्षिणेकडे वाहात येतात व त्यामुळे तेथे(बहुधा शीत व उष्ण अशा दोन प्रवाहांचा संगम झाल्याने)नौकानयन कठिण बनते अशा काहीशा संदर्भात टिटानिक् चा उल्लेख असे ; असे अंधुक आठवते.चूभूदेघे. कोकणातल्या खडकाळ किनार्यांच्या सोदाहरण स्पष्टीकरणामधे रामदास आणि तुकाराम या बोटी बुडण्याचाही उल्लेख असे. झेपेलिन् या वायुयानाच्या अयशस्वी उड्डाणाचा उल्लेखही क्रमिक पुस्तकांमधे असे. ह्या धाग्याचा विषय आणि सुरुवात पाहून 'हे नेहमीचे हिंदू-अहिंदू प्रकरण आहे' असे समजून धागा पुढे वाचलाच नव्हता म्हणून प्रतिसादाला उशीर झाला.
ऐतिहासिक दुर्घटना
टायटॅनिक बुडणे ही ऐतिहासिक दुर्घटना नाही काय? कोणत्याही परिस्थीत बुडू शकणार नाही असा दावा केलेली अवाढव्य बोट पाहिल्याच सफरीमधे बुडाली ही घटना तुम्हाला ऐतिहासिक वाटत नाही का? हॉलॉवुडने सिनेमा बनवला म्हणून ऐतिहासीक होती की ही घटना ऐतिहासीक होती म्हणून हॉलीवुडला सिनेमा बनवावासा वाटला?
तुम्हाला ऐतिहासिक वाटो न वाटो टायटॅनीक सिनेमा येण्यापूर्वी आमच्या इतिहासाच्या पुस्तकात, "युरोपातली टीटॅनीक नावाची बोट अमेरिकेला जाताना बुडली" अश्या आशयाचे विधान सनावळी सकट होते. हे मला नक्की आठवते आहे. त्याचे कारण त्यात वापरलेला टीटॅनीक हा शब्दप्रयोग.
महत्त्व?
परदेशी लोकांना दिवाळीचे काय महत्त्व सांगणार? दिवाळीचे तसे महत्त्व तरी काय?
दिवाळी हा भारतातला मोठा सण आहे कारण खरीपाची पिके हाती आल्यावर सर्वांच्या हाती पैसा खेळतो. त्या पैशाने मौजमजा करायचा काळ म्हणजे दिवाळीचा सण. अन्यथा दिवाळीला काहीच महत्त्व नाही. सुगीचा हंगाम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येत असता तर आश्विन अमावास्येला कोणी हिंग लावून विचारले नसते. (दिवाळी श्रावण किंवा भाद्रपदातल्या अमावास्येला केली असती).
(अध्यात्मिक संस्कृतीच्या भारतीयांचा सर्वात मोठा सण 'पैशाची' पूजा करणाचा का बरे असतो?)
(स्वस्तिकाचे महत्त्व सांगणे म्हणजे स्वतःला नाझी घोषित करून घेण्याचा धोका).
नितिन थत्ते
आम्ही नाझी नाही
आम्ही नाझी नाही हे सांगण्याकरता स्वस्तिकाचे महत्त्व सांगावे लागते. पूर्वी आम्ही टेक्सासला राहत असता आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील काही भारतीयांकडून कळले होते की एका भारतीय बाईने दारासमोर स्वस्तिक काढल्याने, शेजारच्या बाईने पोलिसांना फोन करून बोलावले होते.
सुट्टी
विडोतील सुट्टीची मागणी ही पेड हॉलिडेसाठी नसून 'कॅज्युअल लीवसाठीचे पर्याप्त कारण' (cf. वासुदेव बळवंत फडके) अशा अर्थाने असेल, अशी शक्यता नाही काय?
--
पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दिवाळी दर ७२ वर्षांनी एक-एक दिवस उशिरा होते आहे.
अल्पसंख्यांक
हे कुणी ठरवले? मुळात धर्म न मानणारेकच अल्पसंख्यांक आहेत. त्यांना असल्या कोणत्याही दिलास्याची गरज नसते.
हो पण विकेंडच्या नावाखाली दर आठवड्याला २ सुट्ट्या देतात की. तसेही सदर विडियोतील लोकांचे हास्यास्पद विचार पाहून पेड हॉलीडे सोडा अमेरिकेने ह्यांच्या बुडावर लाथ मारली नाही म्हणजे मिळवली असे वाटते.
उगीच काहीतरी!
अमेरिकेत भारतीय स्वतःला अल्पसंख्यांक समजणे किंवा भारतात मुसलमान स्वतःला अल्पसंख्यांक समजणार्यांवर तो शेरा आहे. ओढून ताणून उगीचच नास्तिक कशाला कडमडायला हवेत मध्येच. सध्यातरी ते इतके अल्पसंख्य आहेत की त्यांची दखल घेण्याची गरज नाही. ;-) ह. घ्या. बरें!
मी पेड हॉलिडेबद्दल बोलते आहे.
कल्पनाविलास चांगला आहे पण जमणार नाही अमेरिकनांना. शेवटी नोकरांनाही खूश करावेच लागते. माझ्या आधीच्या क्लायंटकडे दिवाळीच्या दिवशी गोर्या मड्डमा हापिसात येऊन साड्या नेसत. दुर्दैवाने, मी फोटो डाउनलोड केले नव्हते नाहीतर टाकले असते.
कल्पनाविलास
तेच म्हणतोय मी. पेड हॉलीडेचा कल्पनाविलास चांगला आहे. पण जमणार नाही अमेरिकनांना.
जमेल
जमेल हं! निराशावादी नास्तिक बनू नका.
बरं..
निराशावादी आस्तिकांपेक्षा नक्कीच बरं आहे!
ओके
ठीक आहे व्हिडीओ. इतरांचे गैरसमज दूर करण्याकरता आपल्याला आहे ती माहीती देण्यात काही गैर वाटत नाही.
शेवटचा भाग पाच लोकांना पाठवा हा स्पॅम प्रकार मात्र आवडला नाही. :-)
गैर
गैर आहे असे मीही म्हंटलेले नाही. कायद्याच्या चौकटीत राहून जे काय करायचे ते करु देत. ते गैर ठरवणारे तुम्ही आम्ही कोण? मुद्दा असा आहे की तुम्हाला ह्याची गरज वाटते का? हा वेळेचा अपव्यव वाटत नाही का?
मग
जे गैर नाही किंवा कायद्याचे उल्लंघन करणारे नाही. आणी जर त्याच्या गरज असण्या-नसण्याची चर्चा करणे हा वेळेचा अपव्यय नसेल तर किमान अश्या चर्चांसाठी तो व्हिडिओ असणे गरजेचे ठरते , नाही का?
नाही
चर्चा करायला अजून बरेच विषय आहे. असल्या मूर्ख विडीयोंची अजिबात गरज नाही.
तरीही?
मग तरीही?
होय
होय म्हणूनच! नसला तर उत्तमच आहे..असला तर हाणायला पाहिजे. आता समजले का?
पाश्चात्य जन्मित(शब्द सुचवावा) भंजाळलेले स्वकीय.
अमेरिकेतील आपल्या बांधवाना असे काही करण्याची गरज आहे असे वाटत नाही पण वेळ जात नसेल तर काय हरकत आहे, तसे पाहता हिंदू धर्माबद्दल त्यांना महाराष्ट्र मंडळ वगैरेतून माहिती होऊ शकतेच, पण अगदी वयक्तिक स्तरावर प्रचार करणे म्हणजे धर्माचा वापर सुटीसाठी करणे आपण कसे कामचुकार नाही हे सिद्ध करून देण्यासारखे आहे. (ह. घे.)
बाकी, दिवाळीवरून आठवले - (काही ऐकीव माहिती) २ वर्षापूर्वी नेदरलंड मधील रोटरदाम(किंवा तत्सम) शहरात भारतीयांनी दिवाळी-मेळा साजरा करण्याचे ठरविले असता तेथील मेयर/टाऊन हॉल ने तब्बल ६०के युरो आयोजन-प्रीत्यर्थ देऊ केले. चांगलीच दिवाळी झाली, पण नंतर स्थानिक ख्रिशन लोकांनी दुसऱ्या धर्माला सहकार्य केल्याबद्दल निषेध केला व पुढील वर्षी हा मेळा एक छोट्या शाळेतील हॉल मध्ये झाला.(आमच्या पुण्यातील शाळेचा हॉल देखील ह्यापेक्षा मोठा आहे).
+१
हेच म्हणायचे आहे.
काहीच हरकत नाही.
ज्याला आहे त्याला आहे
अनिवासी भारतीयांना परदेशात त्यांचा असा आवाज असावा असे वाटते पण तो असा धर्मावर आधारीत असावा का?
जो पर्यंत धर्मावर बंदी नाही, जो पर्यंत लोकशाही असलेल्या देशांमधे धार्मिक स्वांतत्र्याचा नुसता आदरच केला जात नाही तर त्याला सांभाळले जाते, तो पर्यंत जे धार्मिक आहेत त्यांना स्वत:च्या धर्माविषयी इतरांच्या असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी जर एखादी संघटना असावी (पक्षी: तुमच्या शब्दात "आवाज असावा") असे वाटले, तर असुंदेत. अमेरिकेत तर फ्रिडम ऑफ रीलीजन हे पहील्या अमेंडमेंड मधे दिले आहे. ते अमेरिकेतच पाळले जात नाही तर अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट/परराष्ट्रखाते जगात पण पाळले जाते का नाही यावर दरवर्षी अहवाल तयार करत असतात...
मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला लोकशाहीची गरज वाटते का? जर लोकशाही मान्य नसेल तर मग तुम्हाला इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्याची गरज नाही असे तुम्ही म्हणू शकता. पण जर लोकशाहीची गरज मान्य असेल तर ज्यांना त्याची गरज वाटते त्यांना वाटूंदेत, ज्यांना वाटत नाही त्यांना न वाटूंदेत. फारतर तुम्ही इतरांचे विचार पटत नाहीत असे म्हणू शकता, पण तुम्ही तसे न म्हणता त्याची गरजच नाही असे म्हणता. थोडक्यात त्यांच्या गरजा तुम्हीच ठरवायला लागलात तर लोकशाहीचा नुसता बुरखाच आहे असे म्हणावे लागेल.
सावरकरांच्या 'हिंदू' ह्या व्याखेप्रमाणे ते भारताला पितृभू मानतात का?
मला कल्पना नाही. त्यातील कुणाला भेटलो तर नक्की विचारेन. पण ते कायद्याने नक्की हिंदू आहेत आणि अर्थातच त्यांच्या धर्मश्रद्धेनुसारपण.
@शुची: "सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलतो आहे ते नीट कळत नाही."
कसं बोललात! अगदी अशीच अवस्था येथे अंधश्रद्धानिर्मूलन / नास्तिकतेच्या संदर्भात होत आहे असे वाटते. :-)
@नितिन थत्ते: परदेशी लोकांना दिवाळीचे काय महत्त्व सांगणार? दिवाळीचे तसे महत्त्व तरी काय?
तुम्हाला नसेल कदाचीत पण ज्यांना असते त्यांना असते. उ.दा. अमेरिकन सिनेटला ते आहे. शिवाय ते एक व्यक्तीस्वातंत्र्य आहे. तुम्हाला ते स्वातंत्र्य म्हणून मान्य नसेल तर गोष्ट वेगळी... शिवाय गुजारात मधे ते नववर्ष देखील असते हे माहीत असेलच आपल्याला. त्यांना माहीत असते. आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात आणि व्हाईट हाऊस मधे देखील दिवाळी निमित्त मेजवानी दिली जाते. तो अल्पसंख्य असले तरी अमेरिकन रहीवाशांचा सण आहे आणि त्याचा देखील योग्य तो आदर राखला जातो. जगभरातील दिवाळी
@नितिन थत्ते: स्वस्तिकाचे महत्त्व सांगणे म्हणजे स्वतःला नाझी घोषित करून घेण्याचा धोका
तो धोका वाटावा म्हणजे काय आपण घाबरून रहायचे का? त्याच्या ऐवजी लोकशिक्षणाने समजून येते की याचा नाझींनी गैरवापर केला असला तरी वास्तवात ती हिंदूंची एक धर्मखूण आहे म्हणून. माझ्या अनेक ज्यू मित्र-मैत्रिणींना आता ते माहीत आहे आणि त्यांना जर ती आमच्या घरात दिसली तर काहीच गैर वाटत नाही...
@प्रियाली: बाकी, इतिहासाच्या पुस्तकात खरेच हिंदुइजम कंसिडर्ड विमेन इन्फिरिअर टू मेन असे लिहिले आहे पण ते काही खोटे नाही
सहमत आहे. कुठल्या इयत्तेत कसे शिकवले जाते याला येथील नियमांप्रमाणे महत्व आहे. त्यामुळे जर इतर धर्मांबद्दल शिकवताना त्याच वयातील मुलांना केवळ चांगले शिकवले जात असेल आणि हिंदू धर्माबद्दल शिकवताना मात्र केवळ नकारात्मक तर ते एकूण शैक्षणिक गाईडलाईन्स मधे बसत नाही. वरील चित्रफितीत ते कुठल्या संदर्भात आहे ते माहीत नाही.
@शुची: एकमेकांना बांधून ठेवण्याच्या मर्यादा ओलांडून स्वतःच्या बॉसला , शेजार्यांना, इतरांना (पक्षी परदेशी लोकांना) दिवाळी, स्वस्तिकाचे महत्व पटवा आदिवर भर दिला आहे ते वेगळं वाटत नाही का?
वर स्वस्तिकावरून नितिनना सांगितले आहेच. पण आपल्या सणांचे त्यांना देखील कुतुहल असते आणि त्यांना देखील त्याचा आनंद लुटायला आवडते असा अनुभव आहे. त्यात काही "गर्वसे कहो" हा आविर्भाव नाही आहे. आम्ही घरी जसे दिवाळीला बोलावतो तसेच थँक्सगिव्हींगलाही बोलवतो अथवा कुणाकडे जातो, तेच ख्रिसमस, हनुका, क्वांझा आणि इद संदर्भात. उलटे विशेष करून ख्रिश्चनांना दिवाळीला येताना आनंदच होतो. कारण घरी बनवलेले भारतीय जेवण खायला मिळते आणि प्रत्येकाला गिफ्ट देण्याची सक्ती नाही... आम्हाला मात्र ख्रिसमसला जाताना त्यांच्या पद्धतीप्रमाणे सर्वांना आहेर घेऊन जावा लागतो. :( ;)
@सहजः शेवटचा भाग पाच लोकांना पाठवा हा स्पॅम प्रकार मात्र आवडला नाही.
अंशतः सहमत. त्या व्हिडीओचा उद्देशच त्याच्या नावाप्रमाणे ऍडव्होकसी आहे. त्यामुळे तुम्हा-आम्हाला पटो अथवा न पटोत, ते तसेच म्हणणार. जो पर्यंत पाच जणांना पाठवले नाहीतर अमूक होईल आणि पाठवल्यास तमुक होईल असे म्हणत नाहीत तो पर्यंत काही फरक पडत नाही.
@आजूनकोणमी: पण नंतर स्थानिक ख्रिशन लोकांनी दुसऱ्या धर्माला सहकार्य केल्याबद्दल निषेध केला व पुढील वर्षी हा मेळा एक छोट्या शाळेतील हॉल मध्ये झाला.
शक्य आहे. कारण करदात्याचे पैसे वापरून दिवाळीला देणे चुकीचेच होते. येथे देखील बर्याचदा "हॉलीडे पार्टी" इतकेच म्हणत एकत्रित साजरी करतात. (एकत्रीत म्हणजे साधारण एकाच वेळेस ख्रिसमस, क्वांझा आणि हनुका येतात). त्यातही करदात्याचे पैसे उडवले जातील असे वागले जात नाही. (अपवाद नक्कीच असेल, पण माहीत नाही.)
खुलासा
>>@नितिन थत्ते: परदेशी लोकांना दिवाळीचे काय महत्त्व सांगणार? दिवाळीचे तसे महत्त्व तरी काय?
तुम्हाला नसेल कदाचीत पण ज्यांना असते त्यांना असते. उ.दा. अमेरिकन सिनेटला ते आहे.
दुसर्याचा सण माहिती करून घेणे किंवा आपणही तो साजरा करणे हे बरेच जण करतात. पण त्याचे महत्त्व एक सण इतकेच असते. आपण भारतात व्हॅलेण्टाईनडे साजरा करतो त्यासारखेच हे आहे. त्यासाठी मला त्या वॅलेण्टाइनची गोष्ट माहिती असायची गरज नाही. तशी कोणी मला सांगू लागला तर त्यात मला महत्त्व वाटणार नाही.
शुचि यांना "दिवाळीचे महत्त्व" म्हणजे त्यामागच्या पुराणातल्या गोष्टी, नरकासूर, त्या दिवसाचे पावित्र्य वगैरे गोष्टी अभिप्रेत असाव्या असे वाटले. त्याला अनुसरून माझा प्रतिसाद होता.
नितिन थत्ते
खुलासा
चांगले वाईट असे मी म्हणणार नाही. मी हा धडा वाचला आहे, जे काही लिहिले आहे ते सत्याधारित ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि मला असा धडा शिकवण्यास काहीही हरकत घ्यावीशी वाटत नाही. जे आहे ते आहे. जिथे हरकत घ्यावीशी वाटली ते वर म्हटलेच.:-)
बरं! तुम्हाला होते का टायटॅनिक इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात? निदान आपली केटताई तरी? ;-)
दुसरी बाजू
दुसरी बाजू खूप छान मांडली आहेत विकास आपण.
धर्म
काही अंशी सहमत. तरिही मुद्दा धर्म हा होता, पैसे हे अधिक पैसे कामाविण्यासाठीच दिले होते (व्यापारी वर्गाशी संबंध सुधारण्यासाठी वगैरे) पण धार्मिक मने दुखावली गेली म्हणून निषेध केला गेला.
गरज
तुम्ही कधी पासून कायद्याची हिंदू ही व्याख्या मानायला लागला? तुमच्या दृष्टीने तर खरा हिंदू तोच जो सावरकरांच्या व्याख्येत बसतो तो. बरोबर ना? त्या व्याख्येनुसार हे वरचे ऍडवोकेट्स तर चुकिचाच प्रचार करत आहेत म्हणायचे.
अमेरिकेत धर्मस्वातंत्र्य आहे म्हणूनच असल्या ऍडवोकसी ग्रूप्सची गरज वाटते का? असे विचारले आहे.मला गरज वाटत नाही असे मत दिले आहे. (त्यांना अर्थातच वाटते त्याबद्दल मला काहीच आक्षेप नाही) प्रस्ताव हा आहे की तुम्हाला गरज वाटते का?
माझ्या मते जिथे धर्मस्वातंत्र्य नाही अशा ठीकाणी अशा ग्रूप्सची गरज असली तर आहे अमेरिकेत नाही.
नक्की का?
तुम्ही कधी पासून कायद्याची हिंदू ही व्याख्या मानायला लागला? तुमच्या दृष्टीने तर खरा हिंदू तोच जो सावरकरांच्या व्याख्येत बसतो तो. बरोबर ना?
नक्की का? कदाचीत ज्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात "टिटॅनिक" का काय होते त्यातच माझ्या नावाने हे वाक्य असेल! मी नक्की, "खरा हिंदू तोच जो सावरकरांच्या व्याख्येत बसतो तो," असे कुठे म्हणले आहे ते दाखवून द्याल का?
अमेरिकेत धर्मस्वातंत्र्य आहे म्हणूनच असल्या ऍडवोकसी ग्रूप्सची गरज वाटते का? असे विचारले आहे.मला गरज वाटत नाही असे मत दिले आहे.
मला तर म्हणायचे आहे की तुम्हाला गरज वाटते म्हणूनच अशी उलट चर्चा काढून लोकांना ती चित्रफित बघायला लावली. त्यांनी पाचच जणांना पाठवायला सांगितली होती आता तर काय ती पाचशेच्यावर पोचली! उगाच नाही आपण "डार्क मॅटर" असा आयडी घेतलाहेत ते! आणि हो मला ऍडव्होकसीची गरज वाटते आणि आपण ती परीणामकारकरीत्या केल्याबद्दल मनःपुर्वक आभार!
माझ्या मते जिथे धर्मस्वातंत्र्य नाही अशा ठीकाणी अशा ग्रूप्सची गरज असली तर आहे अमेरिकेत नाही.
ते तुमचे मत झाले. माझ्या मते वर म्हणल्याप्रमाणे, अशा ग्रूप्सची गरज आहे.
हिंदू
तुम्ही सावरकरांची हिंदू व्याख्या प्रमाण मानता असे तुमच्या लेखनातुन दिसून येते. तुम्ही नेमके असे वाक्य लिहिले नसेल तरी. म्हणूनच "बरोबर ना?" ही पुस्ती जोडली होती.
ही ती कोण ?
उत्तम!
तुम्ही नेमके असे वाक्य लिहिले नसेल तरी. म्हणूनच "बरोबर ना?" ही पुस्ती जोडली होती.
उत्तम! म्हणजे मी कुठेही असे म्हणलेले नाही हे आपण एकदाचे मान्य केलेत तर!
ही ती कोण ?
आपण चित्रफितीतील ऍडव्होकसी परीणामकारकरीत्या केल्याबद्दल मनःपुर्वक आभार!
एकदाचे??
एकदाचे मान्य केलेत म्हणजे काय? मी एकदाही हे वाक्य तुमचे आहे असे म्हंटले आहे का?
बाकी तुम्ही सावरकरांची व्याख्या प्रमाण मानता का? हा माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
फक्त
मी एकदाही हे वाक्य तुमचे आहे असे म्हंटले आहे का?
बरं बरं!
बाकी तुम्ही सावरकरांची व्याख्या प्रमाण मानता का? हा माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
शोधा म्हणजे सापडेल. :-) नाहीतर आपल्याला नवीन चर्चा चालू करता येईलच. इथे तुर्तास ऍड्व्होकसीबद्दल आणि चित्रफितीबद्दल (अजून उरली असली तर) चर्चा करूयात.
नविन चर्चा
त्यापेक्षा सुरू असलेल्या चर्चा आधी पूर्ण करुया मग नविन चर्चा. एक ना धड.... असे नको व्हायला!
जे सापडले ते दिले आहे. गोल गोल विधाने करण्यापेक्षा प्रश्नाचे सरळ उत्तर द्या.
काय?
जे सापडले ते दिले आहे. गोल गोल विधाने करण्यापेक्षा प्रश्नाचे सरळ उत्तर द्या.
आधी माझ्यावर (वर) काही आरोप केले, ते सिद्ध करता येत नाही म्हणल्यावर, "बरोबर ना? इतकेच म्हणालो" असे म्हणत त्याचे श्राद्ध घालून झाले. आता नक्की काय सापडले म्हणता?
आरोप?
तुम्ही सावरकरांची व्याख्या प्रमाण म्हणून वापरता असे म्हंटणे म्हणजे आरोप करणे? मग कशाला पान पान भर लिहिता सावरकरांवर?
आता
तुम्ही सावरकरांची व्याख्या प्रमाण म्हणून वापरता असे म्हंटणे म्हणजे आरोप करणे?
कुठलाही संदर्भ देता येत नसताना फुटकळ विधान करत इतर व्यक्तीबद्दल लिहीण्याला आरोप म्हणण्यात काही गैर वाटत नाही.
मग कशाला पान पान भर लिहिता सावरकरांवर?
इथे आधी एक आयडी होता, त्यांच्याप्रमाणेच तुमचा देखील अभ्यास कमी पडत आहे अथवा अभ्यास न करताच बोलायची तुम्हाला पण सवय आहे असे दिसतयं. म्हणजे अगदी आयडी बंधूच... असो. असे म्हणायचे कारण इतकेचः
"विकास" चे लेखन:
* बदल *सागरी तेलविहीर दुर्घटना - ३ *सागरी तेलविहीर दुर्घटना - २ *सागरी तेलविहीर दुर्घटना - १ * काही पडलेले प्रश्न * चाळीशी *३ ते ६ जून १९८४
* उबंटु अनुभव *७०० बिलीयन डॉलर्सचा प्रश्न * आधुनिक द्वारका बुडू लागली आहे का? * निव्वळ राजकारण की देशद्रोह? * सोनियाचा "चिनू"
* अतिरेकी आणि अतिरेक *आर्थिक सत्तेचे नवीन केंद्रीकरण *उदर भरण नोहे... *सामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट) *सामाजीक गुंतवणूक
* समर्थ रामदास * सामाजिक उद्यमशीलता *गुढी पाडवा - मेड इन चायना *उडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी... *तुक्या रंगी रंगलो
* कम्यूनिझम - मार्क्सवाद्यांसाठीची अफूची गोळी *माझे वाड्मयचौर्य *स्वातंत्र्यवीर सावरकर - माहीतीपूर्ण संकेतस्थळ
* वैभवी दारीद्र्य आणि दरीद्री वैभव *सेन्सॉरशीप आणि स्वातंत्र्य *बाबा आमटे *नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ? *खंडीत आंतर्जाल प्रवाह (इंट्रनेट ट्रॅफिक) *महात्म्याचा पराभव *मंगळावरची बाई *अरूण गांधी, ज्यू समाज, वॉशिंग्टन पोस्ट - काही प्रश्न *पितृत्व * मराठि लेखिकेवरील "माया"
* ओळख *भारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने *२००७ - तुम्हाला काय आठवतेय? *पाणी *कुमार बर्वे *उपक्रम...मराठीतून व्यक्त होण्याचा! *धगधगता पश्चिम बंगाल आणि मार्स्कवादी *गुगलचे ऍन्ड्रॉईड $१० मिलियन चे आव्हान *स्वा. सावरकर आणि हिंदूत्वाची व्याख्या
* आपण किती नियम आणि शिस्त पाळतो? * नोबेल शांतता पुरस्कार् *अनंत अमुची ध्येयासक्ती... * सोनीया क्रमांक सहा... *संप्टेंबर ११ - अमेरिकेत काय बदलले *खरडवही.कॉम *तीन देवियॉं... *शाळेतील शिक्षा *भारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला
* मेड इन चायना *हा "फ्रेंडशीप डे" काय प्रकार आहे? * भारताचा परतणारे वैभव - बिझीनेस ऍज युज्वल *दळणवळण - इन्फ्रास्ट्रक्चर* अमेरिकन काँग्रेसमधील ठराव * जैतुनबी ' जन्माने मुसलमान... कर्माने अखंड वारकरी ' *आपापली दैवते* लोकमान्य टिळक *कलाम यांना सलाम *विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ *दारू...एक दृष्टांत *अमेरिकन संसदेत मंत्रघोष घुमला, पण... *९-११ आणि ७-११ *पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणूक * * नको नको रे पावसा...* पंडीत नेहरू, चीन आणि सीआयए * ऋग्वेद * कसा वाटतो आपला महाराष्ट्र? * न्यूटनचा चौथा नियम... * प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम * पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -उत्तरार्ध * पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -पूर्वार्ध *
पर्यावरण * धर्मांतर * पुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश *
आता यातील एक लेख हा सावरकरांवरील तर दुसरे एक त्यांच्या संकेतस्थळाच्या माहीतीवरील. उरलेले ८१ लेख/चर्चा विविध विषयांवर आहे. पण तरी त्यातील तुम्हाला केवळ एकच चर्चा दिसते ज्यात तुमच्यासारख्यांना उत्तरे देताना सर्व प्रतिसादांमुळे उपक्रमाची अडीच पाने गेली... तरी तुम्हाला फक्त तेव्हढेच दिसावे याला सगळीकडे पिवळे दिसणे असेच म्हणावे लागेल. एकतर् त्याचे कारण स्वतःकडे इतरांचा तिरस्कार करण्याशिवाय काही नाही अथवा सावरकर आणि त्यांच्या विचारांची भिती. कारण कुठलेही असले तरी शोभा देणारे नक्की नाही.
असो.
बरं मग?
विकास ह्यांनी इतर लेखनही भरपूर केले आहे म्हणून त्यांचे सावरकरांवरच्या लेखनाकडे दुर्लक्ष करावे असा अर्थ अपेक्षीत आहे का?
सदर व्हिडियोतील लोक जी ऍडवोकसी करत आहेत तो हिंदू धर्म आणि सावरकरांना अपेक्षीत असलेला हिंदू हे वेगळे आहेत हे दाखवून द्यायल तुम्हीच कळफलक झिजवला आहे. आणि वर आता ह्या लोकांची ऍडवोकसीही करत आहात. ह्यात काहीच विसंगती नाही का?