अनिल अवचट : एक न आवडणं

बृहत्कथा या ब्लॉगवरून साभार

अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही - प्रेडिक्टेबल आहे, ‘बाय वन गेट वन फ्री’च्या हिशोबानं. मध्यमवर्गीय समाजवादावर अविर्भावात्मक शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत दारु पिणा-यांची गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!

अनिल अवचट व तत्सम लेखक आणि ज्ञानदा देशपांडे यांचे त्याविषयीचे मत याविषयी इथे चर्चा करूया.

Comments

इतरत्र चर्चा झाली आहे

थोडी शोधाशोध केली असता मायबोली या संकेतस्थळावर या विषयी चर्चा झाली असल्याचे दिसते. उपक्रमावर चर्चा करण्यास हरकत नाही.

:)

वार्ताहराला खास लोकाग्रहास्तव मारून मुटकून पत्रकार बनविले असे काही आहे काय?
--------
"पुरोगामी व्हायला आवडेल पण बुद्धिप्रामाण्य नको" अशी काहीतरी त्यांची भूमिका दिसते.
--------
देशपांडे यांचे आधुनिकोत्तरवादाला समर्थन आहे असे वाटते, ते मान्य नाही.
--------
"जिच्यासोबत आपण खेळत होते ती कोंबडीच आता आपण खातो आहोत" याची जाणीव झाल्यावर अवचट यांच्या मुलींनी मांसाहार सोडला. मी "प्राण्यांवर प्रेम करणे" सोडले.

अवचटांनी की मुलींनी?

माझ्या माहितीप्रमाणे 'कोंबडी' प्रकरणानंतर अवचटांनी मांसाहार सोडला. मुली मात्र अंडी, मासे खात होत्या.

सहमत

+1

अवचटांनी मांसाहार सोडला होता. मुलींनी नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ठीक

मुलींनी केवळ चिकन/मटन खाणे सोडले असावे.

अजून् एका ठिकाणी....

'अनिल अवचट' कम्युनिटी वर सुद्धा चर्चा होत आहे. खाली लिन्क देत आहे:
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=14827543&tid=554265591829439649...

इथे ही जरूर चर्चा करू या. तिन्ही ठिकाणी वेगवेगळे सुर निघतील....

आवडत नाही

उपक्रमावरही कोणाला अवचट आवडत नाहीत असे दिसते.

वाट पहा

आज काळा शुक्रवार आहे, 'खालच्यां'चे प्रतिसाद रात्री येतील.

बाईंना र्‍या

ऱ्या/र्‍या लिहिता येत नाही असे दिसते. त्यांनी सरळ -या लिहिले आहे. काय हा अधःपात!

काहीही कळलं नाही

उपक्रमावरही कोणाला अवचट आवडत नाहीत असे दिसते.

मी अवचटांचे कधी काहीही वाचले नाही. पु. लंचेही फार कमीच वाचले आहे (भविष्यात वाचण्याची शक्यताही कमीच आहे कारण मला त्यात आवड नाही.) त्यामु़ळे वरील चर्चा नेमकी कशावर आहे ते चर्चा आणि ब्लॉग दोन्ही वाचून फारसे कळले नाही. ब्लॉग वाचून आणि त्या खालील काही "निवडक" प्रतिक्रिया वाचून थोडा अंदाज आला इतकेच.

त्यामुळे उपक्रमींना अवचट आवडत असतील/नसतील यांत मला गणू नये. तूर्तास, मी वाचक म्हणून चर्चा वाचेन.

बाकी,

'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.

याचा अर्थ लागला नाही. उच्चवर्गीय लोक 'आम्ही जगतो ती किती मज्जा' असे म्हणतात तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली कचरा साठलेला असतो की नसतो? भारतात हल्ली मध्यमवर्गाला कसे मोजले जाते?

हा प्रतिसाद ब्लॅक फ्रायडेची खरेदी केल्यावर दिलेला आहे. ;-)

काहीही कळलं नाही

पूर्ण लेख वाचला तरी लेखिका बाइंचा पॉइंट काय आहे कळायला तयार नाही. त्यांना अवचट आवडत नाहीत. अवचट आवडणारे आवडत नाहीत. इतके समजले पण त्याच्या पुष्टीकरणासाठी दिलेले रकानेच्या रकाने डोक्यावरुन गेले.
उदा.

माझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते “ च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली’ या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात.

ह्याचा नेमका अर्थ काय? एक अक्षर कळले तर शप्पथ! पाळीत गरम पाण्याच्या बादलीविषयी काहीही कल्पना नाही पण साबुदाण्याच्या खिचडीने पुरुषांची आयुष्यं उध्वस्त???
ह्याला अवचटांच्या लेखाचा संदर्भ असल्यास त्यावर थोडे विवेचन/पार्श्वभुमी द्यायला हवी होती.

मलाही हे समजले नाही

साबुदाण्याची खिचडी आणि गरम पाण्याची बादली यांचा काहीच अर्थ लागला नाही.

अवचटांना साबुदाण्याची खिचडी आवडते याचा काही संदर्भ इथे आहे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

येथे झडलेली एक चर्चा

http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%9F...

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

३ १४ अदिती ह्यांचा प्रतिसाद मस्त

पण एकतर वाचन करणार्‍या मोठ्या समुदायाला काही ओळींमधे मूर्ख, अश्लील, आतून काहीतरी चुकलेले ठरवायचं, त्यावर दंभ, कचरा, पोस्टमेनॉपॉझल समाजवाद वगैरे बोजड शब्द वापरायचे आणि हळूच आपण चाणाक्ष आहोत हे ही सुचवायचं. हे म्हणजे उडत्या चालींची गाणी आवडणार्‍या बहुसंख्यांना शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांनी (निष्कारण) हिणवणं. किंवा माझ्या क्षेत्राबद्दल बोलायचं तर ४५ मीटरच्या ३० डिश एकाच वेळी वापरणार्‍या प्रोफेशनल्सनी आठ इंची ऑप्टीकल टेलिस्कोप वापरणार्‍यांना हिणवायचं असा प्रकार आहे.

३ १४ अदिती ह्यांचा प्रतिसाद मस्त आहे. "आणि हळूच आपण चाणाक्ष आहोत हे ही सुचवायचं." वा क्या बात है अदितीतै. अगदी मनातलं बोलल्या. असो. मुळात मुद्दा असा आहे की ह्या लोकांकडे ४५ मीटरच्या ३० डिशा आहेत हे कशावरून? आणि असल्या तरी नीट वापरता येत नसेल तर फायदा काय?

बाकी ह्या महत्त्वाच्या लेखकांना, साहित्यिकांना कोण पुसतंय कळत नाही. अरे तुमच्या दोन ओळी कुणाच्या लक्षात राहत नाहीत. ह्यांना काय सिद्ध करायचे आहे कळत नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

3_14 अदिती यांनी चांगलेच हाणले आहे. हाबिणंदण.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बाकीची बरीचशी चर्चा शहाणपंती

बाकीची बरीचशी चर्चा शहाणपंती आहे. तेचते तेचते. चिंतू (चिंतातुर जंतू) ह्यांचा प्रतिसाद आवडला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आम्हाला आवडतात की अवचट

आम्हाला आवडतात की अवचट. पण आम्ही अवचटांना बाबाबिबा म्हणायच्या भानगडीत पडत नाही. आम्हाला ते आवडतात त्याची कारणे आहेत:

१. अवचटांची प्रेमळ दाढी
२. अवचटांची रेखीव चित्रे
३. अवचटांचा साधेपणा

ह्या फुकटबाईंचे एवढे मनावर घेऊ नका हो सदस्य. त्यांच्या आवडीनिवडी फारच उच्च आहे. ज्ञानदाबाई रेवपार्टीवाल्या आहेत की नाही ते माहीत नाही. पण त्यांच्या ब्लॉगचे काही वाचक मात्र गुलजारचे नाव घेत सीत्कारणारे रेवपार्टीवाले [ तेच ते. आमच्या नंदूचे मित्र. आणि तोच नंदू ज्यावर तात्याचा जीव आहे. ( हे आपले उगाच काहीतरी. ) ] दिसतात. तूर्तास एवढेच पण ह्या रेवपार्टीवाल्यांकडे (त्यांच्यासाठी आणखी 'असुंदर' शब्द आहे. masturbatorial) थोडे लक्ष द्यायला हवे. बघू. वेळ मिळाल्यास.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आणखी एक..

प्रतिसाद संपादित.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य्

उपक्रमाचे पान उघडले की दिसणारे प्रतिसाद् या गटात् मोडतात-
एखाद्याची देवावर् श्रद्धा आहे असे दिसले की उडव खिल्ली,
एखादा ब्राम्हणांच्या बाजूने मत देतो की टर उडव,
मध्यमवर्गीय् आहे असे दिसले की घे तोंडसुख त्याच्यावर

ते आजवर् कमी झाले असावे म्हणून आता स्त्रियांवर मानहानीकारक् ताशेरे ओढण्याचा पण एक गट तयार करा. त्यामुळे उपक्रम हे स्थळ किती सुधारणावादी आणि प्रगत् विचार् असणा-या सद्स्यांचे आहे हे सिद्ध होईल्.
देशपांडे बाईंकडे जशी ही जी मुद्दाम लक्ष वेधेल् असे काही सनसनाटी लिहिण्याची वृत्ती आहे तीच डार्क मॅटर् यांच्याकडेपण् आहे.
हे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य! उपक्रमावरचे ! ( आपला तो बाब्या असे काही म्हणतात या प्रकाराला)
अवचट, देशपांडे ताई, तुमचे माझे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य् मान्य आहे का पण्?

डार्क मॅटर यांच्या प्रतिसादातील वाक्य संपादित केल्याने सुवर्णमयी यांच्या प्रतिसादातील तो संदर्भ ही संपादित केला आहे याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ
डार्क मॅटर यांची अतिशय् हीन आणि बिलो बेल्ट् कॉमेट् आहे ही.
त्यामुळे यातील काही शब्द् घेऊन् उहापोह करून् इतर् प्रतिसादात् केलेली सारवासारव मला विशेष उपयोगाची वाटली नाही.

मला चर्चेत पुरुषांचे प्रतिसादही दिसत आहेत.

ह्या फुकटबाईंचे एवढे मनावर घेऊ नका हो सदस्य. त्यांच्या आवडीनिवडी फारच उच्च आहे.
ह एक प्रतिसाद.

त्याशिवाय् डार्क् मॅटर् म्हणतात् त्या वाक्यात उद्धार् मुद्दाम् स्त्रियांचा कशाला? या दोन स्त्रिया आणि इ. महिला वर्ग म्हणजे इतर् स्त्रिया सुद्धा आल्या . दोन् स्त्रियांची मते आणि जालावरचा समस्त स्त्रीवर्ग् सारखा असेल् किंवा नसेलही. या दोन् स्त्रिया किंवा इतर् स्त्रिया केवळ असे काही ठराविक् शब्द् दिसले की लेखाला प्रतिसाद देतात हा निव्वळ गैरसमज् असू शकतो. तर बायकांचेच वेधण्याची आणि तसे करतांनाही स्त्रियांना कमी लेखण्याची पुरुषांची मानसिकता यात् दिसते. यावर एकाही स्त्रीची प्रतिक्रिया आली नाही? किंवा येथील एकाही संपादकाला डार्क् मॅटर् यांच्या प्रतिसादात काही गैर वाटले नाही?त्याचे आश्चर्य वाटले .

की अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा फक्त् पुरुषांना असावे?असे एकंदर मत या स्थळावरच्या लोकांचे आहे का?

सबूर :-)

आता प्रतिसादाच्या पहिल्या पानावर हे प्रतिसाद आहेत :
लेखाचे शीर्षक | प्रतिसादाचे शीर्षक | लेखक
अनिल अवचट : एक न आवडणं | अभिव्यक्ती स्वातंत्र्य् | सुवर्णमयी
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | मयसभा/अभिज्ञानशाकुंतल/मॉक्युमेंटरी | धनंजय
नीकोन कुलपीक्स एल ११० बद्दल | कॅमेरा कशासाठी वापरणार | वाचक
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | साशा बॅरन कोहेनचा फॅशन शो | चिंतातुर जंतू
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | चर्चेची व्याप्ती: धडा पहिला | का
पिंडदानाचे वेळी कावळ्याचे महत्व | क्लोजर | विकास
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | "अधुना" :-) | धनंजय
धर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा ... | दुरुस्ती | प्रभाकर नानावटी
धर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा ... | ब्लेझ् पास्कलविषयी आणखी माहिती | प्रभाकर नानावटी
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | मी | आरागॉर्न
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | ह्यॅ! | रिकामटेकडा
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | रिप्रिव्ह | आरागॉर्न
आधुनिकोत्तर कोणास म्हणावे? | उद्बोधक | मुक्तसुनीत
लेखन स्पर्धा २०१० | उत्तम उपक्रम | असा मी आसामी
नीकोन कुलपीक्स एल ११० बद्दल | अमेरीकेतील स्टोर्स | असा मी आसामी
...

तसे तुम्ही डार्क मॅटर यांच्या प्रतिसादाबद्दल उद्वेग व्यक्त करणे ठीकच आहे. मात्र रायफल ऐवजी शेकडो छर्‍याची शॉटगन वापरली (म्हणजे उपक्रम प्रतिसाद पानावरील सर्व प्रतिसादांना टिप्पणी लागू केली) तर प्रतिसाद हवा तितका भेदक राहाणार नाही, कार्यक्षम होणार नाही.

धारधार्

मला सनसनाटी लिहिता येत् नाही. अथवा लिहायची गरजही वाटत् नाही. पण माझा प्रतिसाद या प्रतिसादाला तर तो नक्कीच लागू आहे ना? मुद्दा फक्त या एका प्रतिसादाचा नाही तर् त्या अनुषंगाने येणारी उपक्रमावर् येणारी वृत्ती, तिला मिळणारी सहमती आणि मिळणारा प्रशासकीय् /संपादकीय् पाठिंबा या सर्वांचा आहे.
सबूर् , म्हणजेच सबुरीने घ्या असे मला सांगता आहात् पण तुमचे वाक्य आक्षेपार्ह् आहे असे तुम्ही डार्क् मॅटर् यांना म्हणणार् आहात् का? ते ऐकणार नाहीत् याची खात्री आहे, की मी ऐकेन् असा विश्वास् आहे? त्याशिवाय् उपक्रमाचे संपादकीय धोरण बरोबरच् आहे असे सुचवायचे आह् एका तुम्हाला?
असो. तुम्ही प्रतिसादाची दखल् घेतली त्याबद्दल् आभारी आहे. माझ्या प्रतिसादानंतर् कदाचित् डार्क् मॅटर् यांचे वाक्यही काढून् टाकतील. पण काही बियाँड् रिपेयर् केसेस् असतात्, त्यांना रायफल सुद्धा काही करू शकत् नाही असा अनुभव् तुमच्याजवळ् आहे का?

या

या पानावरील बाकीच्या वैयक्तिक प्रतिसादांबद्दलही असेच म्हणता येईल का? खुद्द संपादकांनीच उपक्रमाच्या धोरणाची ऐशीतैशी केली तर त्याला वाली कोण? :)

--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/

मत

सार्वजनिक स्थळावर किवा संस्थळांवर असे प्रकार घडतच असतात, कारण "व्यक्ती तितक्या प्रकृती" हे खरे आहे. आणि त्याचवेळी संपादन क्षमता असणे गरजेचे आहे तरच इथली कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहते.

आता डार्क मॅटर ह्यांच्या प्रतिसादाबद्दल बोलायचे तर (मी तो वाचलेला नाही), जर तो आक्षेप घेण्यासारखा असेल (आणि आहे म्हणूनच संपादित झाला) तर त्याविरुद्ध आपण जशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे तशी सगळ्यांची असावी किवा आपण त्यांच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करू शकतो. महत्व कशाला द्यायचे हे देखील महत्वाचे असू शकते. प्रक्षोभक लिहिणे सोपे आहे, म्हणून त्यावर अशी प्रतिक्रिया देऊन त्या प्रतिसादाला एका प्रकारे किंमत देणे देखील चुकीचे असू शकते.

वरील चर्चा अवचट ह्यांच्याबद्दल लिहिणाऱ्या एका व्यक्तीबद्दल होती, काही अवांतर प्रतिसादामुळे आपण ती चर्चा किवा उपक्रमी एकूणच स्त्रीवर्गाबद्दल विरुद्ध मत व्यक्त करीत आहेत असे म्हणणे योग्य नाही.

>>अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा फक्त् पुरुषांना असावे?असे एकंदर मत या स्थळावरच्या लोकांचे आहे का?

नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच असावे पण इथे एकंदरीत स्त्री वर्ग थोडा कमी आहे त्यामुळे असे चित्र दिसत असावे.

सहमत

आजूनकोणमी यांच्या मताशी बर्‍यापैकी सहमत.

काही सदस्य अचानक उठून पाच पंचवीस महिन्यांनी येऊन एखाद्या प्रतिसादावरून संकेतस्थळावरील सदस्य, संपादक, स्त्रीवर्ग, चालक, मालक सर्वांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. असू दे. चालू द्या!

इथे एकंदरीत स्त्री वर्ग थोडा कमी आहे त्यामुळे असे चित्र दिसत असावे.

याच्या उत्तरार्धाशी असहमत. :-) इथे स्त्रीवर्ग कमी आहे पण जो आहे तो इथल्या सर्व पुरुषांना पुरून उरेल असा आहे. :-) (हे विधान अतिशयोक्तीपूर्ण असू शकते.)

दुर्लक्षाबद्दल सांगायचे झाले तर उपक्रमावर असे अनेक सदस्य आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाग पडते. डार्क मॅटर हे अनेकांतले एक आहेत.

बाकी, पन्नासपेक्षा जास्त प्रतिसाद झाले की (कदाचित २०-३०पेक्षा) चर्चा संपून कीस काढणे किंवा उणीदुणी काढणे हे चालण्याची शक्यता अधिक असते. त्याकडे दुर्लक्ष करायचे की त्यातच रस घ्यायचा ही वैयक्तिक अभिरुची आहे.

सहमत

सहमत.

>>याच्या उत्तरार्धाशी असहमत. :-) इथे स्त्रीवर्ग कमी आहे पण जो आहे तो इथल्या सर्व पुरुषांना पुरून उरेल असा आहे. :-) (हे विधान अतिशयोक्तीपूर्ण असू शकते.)

शब्द मागे...जिवंतपणी पुरून नाही घ्यायचं मला! :)

तसे नाही

कारण "व्यक्ती तितक्या प्रकृती" हे खरे आहे. आणि त्याचवेळी संपादन क्षमता असणे गरजेचे आहे तरच इथली कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहते.

पण मुळात कोणी क्ष व्यक्ती म्हणते म्हणून संपादन करायचे हे पटले नाही. हा भावना दुखावल्यामुळे जाळपोळ करणारा (खळ्ळ खट्ट) प्रकार झाला. अनेक संकेतस्थळांवर भारतीयांविरूद्ध, अनिवासी भारतीयांविरूद्ध, हिंदूविरूद्ध, मुसलमानांविरूद्ध, राजकारण्यांविरुद्ध, पत्रकारांविरुद्ध मत व्यक्त केले जाते प्रत्येक ठिकाणी भावना दुखण्याचा विचार केला तर लिहायचे काय?

नाही हो

>>पण मुळात कोणी क्ष व्यक्ती म्हणते म्हणून संपादन करायचे हे पटले नाही

संपादन हे क्ष "व्यक्ती" चे नसून क्ष "प्रवृत्ती" चे आहे, शिष्ठाचार पाळला गेला पाहिजे असे मत असते, आणि इथे थर्ड अम्पायर हा प्रकार नाही सो पंचांची एखादी चूक देखील पोटात घालावी लागते एखाद्या वेळेस (उपक्रम वर असे होते असे नाही, मी आपले एक सामान्य विधान केले..उगाच माझाच प्रतिसाद संपादित व्हायचा! )

आक्षेप

स्त्रियांना कमी लेखण्याची पुरुषांची मानसिकता यात् दिसते

तीव्र आक्षेप. अतिशय हीन आणि बिलो बेल्ट कॉमेट आहे ही. समस्त पुरुषांनी याचा निषेध करावा.

सिंपथी सिकर

सिंपथी सिकर असे म्हणता येईल.

आश्चर्य

डार्क मॅटर यांची कमेंट मला हीन वाटली नव्हती. उपक्रमावरील इतर अभ्यासू आणि प्रगल्भ सदस्यांनीही त्याबाबत काही टिप्पणी केली नव्हती. ती खरेच उडाल्याचे पाहून आश्चर्य वाटले.

हल्लीहल्लीची पुस्तके

लेखिकेची भाषाशैली आवडली. पुस्तकविश्वमधील चर्चेत चिंतातुर जंतू यांनी म्हटल्याप्रमाणे मराठीला अशा भाषेची एक परंपरा आहे. ती परंपरा इंटरनेटवरील अळणी लेखन-प्रतिसादांमुळे लुप्त होत चालली होती, तिला थोडा तरी आधार लेखिकेने दिला आहे. (आदेश विरुद्ध अत्रे हे पु. भा. भावे यांच्या आचरट भाषेने भरलेले किंवा कशी आहे गंमत हे अत्र्यांचे जहाल लेखन मी अनेकदा या झणझणीतपणासाठी वारंवार वाचतो. तुकारामांनीही जोरदार शिवीगाळ कशी करावी याचे वस्तुपाठ अनेक अभंगांतून दिलेलेच आहेत.)

असो.

मला जीए, नेमाडे आणि अवचट हे लेखक संपूर्णपणे आवडतात. गर्द, माणसे हे सामाजिक विषयांवरचे लेखन किंवा स्वतःविषयी, मोर अशा स्वरूपाचे ललित लेखन अवचटांच्या साध्यासोप्या अनालंकारिक शैलीमुळे फार आवडले होते. कुठलाही आव न आणता प्रामाणिकपणे केलेले लेखन मला वाटले. अवचट आवडणाऱ्यांचा एक दांभिक वगैरे टाईप असतो वगैरे आरोप मला लागू होत नसल्याने मी ते मनावर घेतलेले नाहीत. जनरलायझेशन विषयी माझे आक्षेप नाहीत. जनरलायझेशन केले नाहीत तर कोणतेही मत मांडणे अवघड जाईल.

लेखात उल्लेख केलेले बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तकही छान होते. आनंद नाडकर्णी यांची माझ्याकडे इंटरनेट येण्यापूर्वी इनमिन तीनच पुस्तके वाचली होती (मनोविकारांचा मागोवा, विषादयोग आणि ताणतणावांचे नियोजन) त्यापैकी मनोविकारांचा मागोवा छान वाटले होते. आता मनोविकारांबाबतची उत्कृष्ट माहिती अनेक संकेतस्थळांवर छान मिळते.

अवचटांची हल्लीची पुस्तके कंटाळवाणी आहेत यात काहीच शंका नाही. सृष्टीत गोष्टीत, मस्त मस्त उतार किंवा दोन वर्षापूर्वीच्या एका दिवाळी अंकात बॉस, गुरू असे वाचकाला संबोधून त्यांनी केलेले लेखन वाचवले नाही हे खरेच आहे. त्यांची आजकालची भाषणेही ऐकायला - वाचायला आवडत नाहीत. पण त्यामुळे अवचट आवडणे कमी झाले नाही. (मुळात स्वतःचे तत्त्वज्ञान असणारा म्हणावा असा मोठा लेखक जीएंसारखा एखादाच असतो. तरीही तीच गोष्ट जीए - आणि नेमाड्यांनाही - लागू होते - टीकास्वयंवरमधील एकदोन लेख वाचवले नाहीत पण नेमाडे आवडणे कमी झाले नाही. जीएंचे मात्र अथपासून इतिपर्यंत सगळेच आवडले आहे.)

मात्र पुस्तकविश्ववरील चर्चेत दिगम्भा यांचे मत पटले. जो जे वांछील वगैरे ठीक असले तरी लेखन व अभिरुचीच्या तुलना होणारच. त्यात काही वावगे नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बऱ्यापैकी सहमत

लेखिकेची भाषाशैली आवडली. पुस्तकविश्वमधील चर्चेत चिंतातुर जंतू यांनी म्हटल्याप्रमाणे मराठीला अशा भाषेची एक परंपरा आहे. ती परंपरा इंटरनेटवरील अळणी लेखन-प्रतिसादांमुळे लुप्त होत चालली होती, तिला थोडा तरी आधार लेखिकेने दिला आहे. (आदेश विरुद्ध अत्रे हे पु. भा. भावे यांच्या आचरट भाषेने भरलेले किंवा कशी आहे गंमत हे अत्र्यांचे जहाल लेखन मी अनेकदा या झणझणीतपणासाठी वारंवार वाचतो. तुकारामांनीही जोरदार शिवीगाळ कशी करावी याचे वस्तुपाठ अनेक अभंगांतून दिलेलेच आहेत.)
इंटरनेट ही एकमेकांची खाजवाखाजवी (इथे संबंध पाठीशी. यू स्क्रॅच माय बॅक छाप खाजवणे) करण्यासाठी स्वस्त आणि फाष्ट असे साधन. पैसे लागत नाही. कविताबाईही आजकाल इंटरनेटावर कुहू कहू करतात ते उगाच नाही. असो. बाई छान लिहितात पण. ज्ञानदाबाई बरं का. कविताबाईंचे ब्र वाचताना तर मला सारखी झोप येत होती. कारण बहुधा ब्र मधले विश्व फार परिचयाचे होते असेही असावे. असो.

गर्द, माणसे हे सामाजिक विषयांवरचे लेखन किंवा स्वतःविषयी, मोर अशा स्वरूपाचे ललित लेखन अवचटांच्या साध्यासोप्या अनालंकारिक शैलीमुळे फार आवडले होते. कुठलाही आव न आणता प्रामाणिकपणे केलेले लेखन मला वाटले.

पटले. अवचट असेच लिहीत राहावे. आम्ही आनंदे वाचत राहू. ह्या फुकटबाईंनी काही लिहिले तरी.

मुळात स्वतःचे तत्त्वज्ञान असणारा म्हणावा असा मोठा लेखक जीएंसारखा एखादाच असतो.
ह्यातून मी तूर्तास काढलेले निष्कर्ष
१. जीए मोठे लेखक आहेत
२. जीएंकडे तत्त्वज्ञान आहे
३. ते तत्त्वज्ञान त्यांचे स्वतःचे आहे

ह्याबाबत आजानुकर्ण ह्यांनी प्रकाश पाडावा ही विनंती. विशेषतः शेवटचे २ मुद्दे. जीए सोडून कुणाकडे असे तत्त्वज्ञान आढळत नाही की काय!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तत्त्वज्ञान

माफ करा जीएंचे तत्त्वज्ञान स्वतःचे आहे असे नाही. बरेच ग्रीक तत्त्वज्ञान आहे. जीए सोडून कुणाकडे तत्त्वज्ञान नाही असे नाही. तुकाराम, सानेगुरूजी आहेत की. भाऊ पाध्येही मला तत्त्वज्ञानी वाटतात. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा

वा. तुकाराम आणि साने गुरुजी हे दोघेही आमचे आवडते लेखक.

आम्हाला श्रावण मोडक नामक लेखकही आम्हाला फार आवडतात. ते आपल्या उपक्रमावरही वावरत असतात. २ जी स्कॅम आणि इतर घोटाळे त्यांनी आधीच लिहून ठेवले होते म्हणे. द्रष्टा लेखक.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

व्यक्तिगत रोखाचा काही मजकूर संपादित.

तुलना

मात्र पुस्तकविश्ववरील चर्चेत दिगम्भा यांचे मत पटले. जो जे वांछील वगैरे ठीक असले तरी लेखन व अभिरुचीच्या तुलना होणारच. त्यात काही वावगे नाही.
-तुलना आली की मग आपला तो बाब्या.. हे सुद्धा आलेच. या सर्वामुळे एक कल्ट तयार होतो आणखी काय!

संकेतस्थळावर, इंटरनेटवर वाचन करणारा जो वर्ग् आहे तो सर्वसाधारणपणे विविध भाषेतले साहित्य, विविध विषयातले साहित्य वाचणारा वाचक आहे . तसेच् अशाप्रकारचे साहित्य मुद्रित् माध्यमातून् वाचणाराही एक् वर्ग आहे. या दोघांची आवडनिवड एकाच् भाषेतले वाचन करणा-या वर्गापेक्षा वेगळी असू शकते. त्याशिवाय् व्यक्तिगत् आवडनिवड सुद्धा आलीच्. त्यामुळे एका गटाची अभिरुची उच्च असा आग्रह धरण्याचे काही कारण नाही, अणि दुसरा गट सुद्धा कमी मानण्याचे कारण नाही. आपण् सर्वजण् काय् वाचायला शिकलो तेव्हा पासून फक्त् उच्च अभिव्यक्ती जोपासत् आलो आहोत् का? आपली आवडनिवड् बदलली, पुढेही बदलेल. पण् तुलना करणे थांबणार् नाही. ही मनोवृत्ती सगळीकडेच् दिसते. फक्त् तुलना करतांना होणारा युक्तीवाद कोणत्या थरावर जातो त्याचे भान राहत नाही. त्याशिवाय सगळीकडे पूर्वापार चालत् आलेली कमिशन्ड समीक्षकांची प्रथा आहेच् की!त्यांच्याविषयी न बोललेच् बरे.

शिवसेना द्वेष आणि गुटख्याबद्दलची तिडीक यात वाईट काय आहे?

शिवसेना द्वेष आणि गुटख्याबद्दलची तिडीक यात वाईट काय आहे? कोणाही सूज्ञ माणसाला शिवसेना आणि गुटख्याबद्दल तिडीक वाटणारच. लेखिका माणिकचंद आणि शिवसेनेच्या लॉबीस्ट आहेत का? पत्रकारांबद्दल हल्ली भलभलत्या शंका येतात म्हणून म्हटले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एक मस्ती

समाजातील वलयांकित व्यक्तीला भर-अंतर्जालावर नावे ठेऊन त्यातून सेडीस्ट सुख मिळवण्याचा स्वस्त मार्ग, त्याचबरोबर मध्यमवर्गीय लोकांचे वाभाडे फुकट.

व.पु.काळे

समाजातील वलयांकित व्यक्तीला भर-अंतर्जालावर नावे ठेऊन त्यातून सेडीस्ट सुख मिळवण्याचा स्वस्त मार्ग, त्याचबरोबर मध्यमवर्गीय लोकांचे वाभाडे फुकट.

खरे आहे. यापूर्वी व. पु. काळे यांना अशाप्रकारचा मान मिळत असे. :-) आता पात्रे बदलली इतकेच.

हो ना.

:) तेही आहेच. सकारात्मक लिहिता येत नसावं, मग 'मडके फोडावे ....पण प्रसिद्धीस पावावे' ह्या तत्वावर हे लोक असे लिहित असावेत.

असहमत

आम्हाला नकारात्मक लेखनही जाम आवडते. अत्रेंसारख्यांचे नकारात्मक लेखन तर आम्हाला भल्या भल्यांच्या सकारात्मक उपदेशामॄतापेक्षा कैक आवडते.

:)

या किलोबायटी सदस्यांनी माझ्या या 'नकारार्थी' धाग्याचा उल्लेख केला आहे.

शिवाय घटनेने दिलेले विचार-लेखन स्वातंत्र्य आहे, त्याच्याशीही ती भूमिका सुसंगत आहे. पण म्हणून चार भिंतीत बसून बंग दांपत्यावर वा त्यांच्या कार्यावर खालच्या पातळीवर येऊन नेटवर चर्चा करणे मला किंचितही आवडले नाही.

मुळात, येथे त्यांचा असा आविर्भाव आहे की विचार-लेखन स्वातंत्र्य ही एक 'घोडचूक' होती आणि ते मिळणे हे उपकार आहेत. पुढील वाक्यात "अंडी घालता येत नसतील तर ऑम्लेटवर टीका नको" ही जुनीच असंबद्ध मागणीही आहे.

अवांतर...फु.स.

मुळात, येथे त्यांचा असा आविर्भाव आहे की विचार-लेखन स्वातंत्र्य ही एक 'घोडचूक' होती आणि ते मिळणे हे उपकार आहेत. पुढील वाक्यात "अंडी घालता येत नसतील तर ऑम्लेटवर टीका नको" ही जुनीच असंबद्ध मागणीही आहे.

पु.वि.वर तुम्हाला बंदी नाही. प्लीज सदस्यत्व घ्या ;-) आणि किबाला मेबाने उत्तर द्या.

किलोबायटी सदस्यांनी

मस्त! आवडले पण किलोबाईट हा त्यांचा अपमान वाटला.

का?

मुळात, हा धागाच एका ब्लॉगवर टीका करण्यासाठी आहे. त्यात मुक्तसुनीत यांनी पु.वि.च्या धाग्याचा उल्लेख केला तेव्हा तेथील सारे लिखाणही अनवांतर ठरते. मुळात, त्यांनी माझ्यावर तेथे टीका करणे अवांतर नसेल तर मीही येथे टीकेला उत्तर देणे अवांतर नाही.

काही मजकूर संपादित.

मिडास टच

किबा आणि खळ्ळ यांना मुद्देसूद प्रतिसाद दिले तर चर्चा अवांतर ठरवून धागा गोठविण्यात आला.
तरीही, 'ऑपरेशन सक्सेसफुल' असे म्हणता येईल ;)
मिपावर चिंतातुर जंतूंचा धागा गोठविण्यात आला होता त्याची आठवण झाली.

हा हा

मुळात समाज नावाच्या गुंतागुंतीच्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला शिकाल तेव्हाच ह्या शापातून तुम्हाला मुक्ती मिळणार.

किलोबायटी

ह्या किलोबायटी सदस्य महोदयांना (कधी कधीच) थेरपीची गरज आहे असे त्यांचा ओसीडी बघून वाटते.

लोड घेऊ नका. द्या.

येथे त्यांचा असा आविर्भाव आहे की विचार-लेखन स्वातंत्र्य ही एक 'घोडचूक' होती आणि ते मिळणे हे उपकार आहेत.
सहमत.

सखोल डोंगराळ भागातून तीन महिने दिवसरात्र, काटेकोराड्यातून, दगडखळग्यातून, रणरणत्या उन्हातून, प्रसंगी पाण्याशिवाय हिंडत या दांपत्याने काही साथीदारांसह १०४ गावातून फिरूनफिरून दारूची आकडेवारी गोळा केली आणि त्यावर आधारित तो रीपोर्ट तयार केला, तो नेटवरील चर्चेपेक्षा दुय्यम ठरतो?

एप्रिल-मे च्या जाळून टाकणार्‍या उन्हात आठ-नऊ तास माती मुरुम खोदून खोदून हाताची सालटे गेलेल्यांना तीन रूपये मजुरी पडते हे पाहून बंग दांपत्याने 'किमान मजुरी १२ रूपये तर हवी' यासाठी जे आंदोलन छेडले आणि त्यावर तीन वर्षे लढा देऊन तो यशस्वी केला....आणि मग ते जे लिखित स्वरूपात आपल्या वाचकांसमोर मांडले ते वाचल्यावर "यात एक्सायटिंग काही नाही..' असे जर दुसर्‍या ब्लॉगवाल्याने वा वालीने मांडले तर आपण त्यांच्या 'साहित्यप्रेमा'ला दूर राहूनच सलाम करू !

हाहाहाहा. किती इमोशनल. किती इमोशन करायचे. मूळ चर्चेपासून भरकटवायचे असल्यास ही बेस्ट आयडिया आहे. बंग दांपत्याचे कार्य फार मोठे आहे. पण ही अशी वाक्ये (ती वाक्ये लिहिणारी किलोबायटी प्रवृत्ती नव्हे) हास्यास्पद आहेत. रिटे लोड घेऊ नका. द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पॉप्युलिस्ट

हो ना! कोर्टिअर्स रिप्लायची आठवण झाली.
--------
लोड पेक्षा स्पिन देण्यात अधिक मज्या अस्ते.
--------
"लोकांना नको असलेल्या सुधारणा करू नये" हे ते लोक मान्यच करतात. "ऑक्युपेशनल हॅजर्ड भोगणार्‍या मजुराला नुकसानभरपाई द्या" अशी मागणी केली तेव्हा जनतेने त्यांना हाकलून लावले. आरोग्य, व्यसनमुक्ती, हे पॉप्युलिस्ट विषय आहेत.
त्यांच्याच जातकुळीच्या उल्का महाजन यांच्या सर्वहारा जन आंदोलनानेही पॉप्युलिस्ट वागण्याचे ठरविले आहे असे बंग यांच्याच संस्थेच्या एका ब्लॉगवर दिले आहे.

किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्या प्रश्नाला इतरही सामाजिक, आर्थिक बाजू आहेत. तो ‘प्रक्षोभक’ मुद्दा लोकांना आणि संघटनेला सुद्धा अगदी सुरुवातीला पेलवणारा नव्हता. मग काही काळ लोकांमध्ये राहून, संवाद साधून दळी जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न समोर आला. लोकांची ती महत्त्वाची गरज असल्यामुळे उल्काताईंना लोकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. त्यानंतर संघटनेला लोकांकडे कधी जावे लागले नाही. लोकच संघटनेकडे येवू लागले. प्रश्न निवडताना उल्काताईंची भूमिका स्पष्ट होती, प्रश्न जर लोकांना आपला वाटत असेल आणि जर लोक त्या प्रश्नावर काम करायला तयार असतील तरचं तो प्रश्न निवडायचा. लोकांच्या योग्य प्रश्नाला हात घालणे ही लोकसहभाग मिळवण्याची गुरुकिल्ली आहे असं जाणवलं.

या बघा डॉ. राणी बंगः

फरक

इथे मला अभिप्रेत असलेला नकारात्मक मुद्दा आपल्या "या" लेखनामध्ये नाही, तुम्ही मुद्दा घेऊन टीका करत आहात, मुद्दा कितपत योग्य हि गोष्ट वेगळी पण मुद्दा हा isolation मध्ये योग्य आहे बंग ह्यांच्या context मध्ये तितकासा योग्य नाही.

वरील ब्लॉग मध्ये लेखन केवळ उगाच आवडत नाही वर्गातले वाटते, आणि लेखन शैली हि गोविंदाच्या गाजलेल्या सिनेमासारखी आहे, करमणूक नक्कीच होते.

अत्ता?

व्यक्तिगत टीका आणि अर्थपूर्ण समीक्षण ह्या दोन्ही गोष्टी नकारात्मक 'दिसू' शकतात, आपल्याला दुसरी गोष्ट जास्त आवडते असे आपल्या प्रतिसादावरून प्रतीत होते, व माझा पहिल्या गोष्टीबद्दल विरोध आहे.

 
^ वर