उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अनिल अवचट : एक न आवडणं
सदस्य
November 26, 2010 - 3:57 am
बृहत्कथा या ब्लॉगवरून साभार
अवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही - प्रेडिक्टेबल आहे, ‘बाय वन गेट वन फ्री’च्या हिशोबानं. मध्यमवर्गीय समाजवादावर अविर्भावात्मक शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत दारु पिणा-यांची गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट!
अनिल अवचट व तत्सम लेखक आणि ज्ञानदा देशपांडे यांचे त्याविषयीचे मत याविषयी इथे चर्चा करूया.
दुवे:
Comments
मला अवचट हे लेखक आवडतात.
कोणतेही मत व्यक्त करतांना माणसाच्या मनात एक ठराविक पूर्वग्रह असतो. अनिल अवचटांची बरीचशी पुस्तके वाचली आहेत. त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. लेखन, चित्रकला, शिल्पकला, ओरीगामी आणी मुख्य म्हणजे माणूस वाचणे अशा कितीतरी कला ह्या एकाच माणसाकडे बघायला मिळतात. न आवडण्याचा प्रश्न येतो कुठे !
असो..... !
बाय द वे , लेखीकामहाशयांच्या कार्यावर कुणी प्रकाश टाकू शकेल काय ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
ताजी माहिती
नुकतेच असे समजले की ज्ञानदाताई या बरखागेट प्रकरणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या आयबीएन वाहिनीच्या पत्रकार आहेत. त्यांच्या वाहिनीने एकंदर बरखा प्रकरणात दांभिकपणा केला काय?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
जुनी माहिती
आयबीएन् आणि त्यांचा काडीमोड झाल्याची बातमी जुनी आहे. मार्च मधली.
http://batmidar2.blogspot.com/2010_03_24_archive.html
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
वागळेंशी दुश्मनी
ओह. त्यामुळेच त्यांना शिवसेनेचा द्वेष खपत नाही वाटतं. ;) पण वागळ्यांना फटकावून त्यांनी झकास काम केले बरं का. :-)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
थिंक महाराष्ट्र
थिंक महाराष्ट्रसाठी लिहितात ताई. हेच लेख वरच्या दुव्यावरही आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
स्टिफन कोल्बर्ट
अरे ज्ञानदाबाईंनी आपल्या कोलबेररावांचा उच्चार कोल्बर्ट असा केला आहे. हाहाहाहाहा. स्टिफन कोल्बर्ट. मराठीकरण केले असावे. असो. थ्रिल्लरवरून थिल्लर हा शब्द आला असावा असे मला वाटते आहे. आणि आमच्या एका मित्राची आठवण झाली. तो स्टीब्बन स्लिपबर्ग म्हणायचा. उच्चाराचे जाऊ द्या पण त्या छानच लिहितात. हाहाहाहाहा. मला तेलंग्रे ह्यांच्या 'कॅरिओट्स ऑफ गॉड्स' आठवण झाली. आणि डेली शोच्या जॉन स्टुअर्टचा स्टुअर्ड करून टाकला आहे बाईंनी. हाहाहाहाहा. असो उच्चारात काही नसते. बाई छानच लिहितात. एखाद्याला त्याच्या उच्चारावरून हिणवणे चांगले नाही. वाह्यातपणा आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अरेरे
कोल्बर्ट एकवेळ ठीक आहे. पण स्टिफन??
पाशवी
बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निखिल वागळे आणि आयबीएन-लोकमतच्या फीचर एडिटर ज्ञानदा देशपांडे यांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यवसान ज्ञानदा यांनी वागळेंवर हल्ला करण्यात झाले. ज्ञानदा यांनी भरमिटिंगमध्ये वागळे यांच्या श्रीमुखात भडकावली असे सांगण्यात येते.
वरील बातमी वाचल्यावर वाटले की बाई भलत्याच पाशवी असाव्यात. ;-)
निषेध
पुरुषाने बाईच्या स्त्रीमुखात भडकावली असती तर तुम्ही त्या पुरुषाला पाशवा म्हणाल्या असत्या का? द्य्नानदा बाइंना नावे ठेवणा-यांचा मी निषेध करतो.
हाहाहाहा
नाही. आम्ही फक्त स्त्रियांनाच पाशवी म्हणतो.
बायदवे, पुरुषाला पशुतुल्य विशेषण लावले तर "पाशवा" होत नाही हो. पाशवीच राहते. मराठी भाषेशी इतका पाशवीपणा बरा दिसत नाही. :-(
मराठी बरेच कच्चे
मी कॉन्व्हेंट मधे शिकलो असल्यामुळे मराठी बरेच कच्चे आहे. स्त्रीयांना कजाग असे म्हणतात असे ऐकले होते.
आता कळले
वागळ्यांच्या श्रीमुखावर दाढीचे कुशन का असते ते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कॉलिंग युयुत्सु
ह्युस्टन , वी गॉट् अ प्रॉब्लेम. कॉलिंग युयुत्सु . युयुत्सु , कम इन् प्लीज.
आढावा
बाइंचे इतर लेख मी वाचले व त्यांच्या लेखनाचा आढावा घेतला. त्या सडेतोड लिहीतात त्यामुळे त्यांना टिकेची धनीणी होणे गतप्राप्त आहेच. त्या स्वत: मध्यमवर्गात मोडतात की, उच्चमध्यमनवर्गात ते कळले नाही त्यामुळे त्या काय घेता-घेता वरील लेख लिहीत असाव्यात ते कळणे शक्य नव्हते; पण अंदाज करता येतो.
त्या मध्यमवर्गी असाव्यात
"‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात" - असे त्या म्हणतात; म्हणजे त्या मध्यमवर्गी असाव्यात.
वाक्याच्या प्रेमात
" ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच. त्यातही पुण्यातल्याच', या सुनील तांब्यांच्या मताशी मी सहमत आहे." ह्या वाक्याच्या प्रेमात मी पडलो आहे. - अगदी इंडीका विस्टाच्या त्या य्याड सारखा.
निरिक्षण शक्ति अफाट
"अगदी रॅश उदाहरण द्यायचं तर लोकांच्या घऱची देखणी कुत्री मला आवडतात. पण मग त्या प्रत्येक कुत्रीच्या पाळीच्या काळात तिची काळजी कोण घेत असेल? किंवा त्या कुत्रीला मेटिंगसाठी कुठे न्यायचं? ते कोण ठरवत असेल अशा प्रश्नांनी मी भानावर येते आणि माझ्या पाळीव प्राणिप्रेमाची तात्कलिक नशा उतरते." असल्या साध्या आणि फालतू प्रश्नांनी त्यांची नशा उतरते. त्यांची निरिक्षण शक्ति अफाट आहे.
लेखनास मर्यांदा
प्रकाटा
शंका
आणि देखणा 'कुत्रा' असेल तर आवडतो का? त्याला मासिक पाळीचा (म्हणजे मनुष्य प्राण्याचे मेन्स्ट्रुअल सायलकल नव्हे - अदिती) त्रास नसावा. कुत्रा पाळायची नशा लेखिका कशी उतरवतात?
उता-याविषयी
त्या स्वतः मध्यमवर्गी असल्यामुळे त्या नशा कशी करतात हे बोलतात; उता-याविषयी नाही. - तसे म्हणायला त्यांनी देखणा कुत्रा हा उतारा आहे असे सुचित केलेले दिसतेय.
कुत्री
आमच्या घरी आधी मांजर आणि बोका होते आणि आवश्यक ती सर्व कार्ये ती परस्पर उरकून यायची. जर कुत्री (कुत्रा किंवा कुत्री) पाळली असतील तर त्यांना मेटिंगसाठी न्यावे लागते का? दूध-अंडी असे मानवी फायद्याचे काही मिळत नसताना या मेटिंगचा त्रास कुत्र्यांचे मालक कसा काय करवून घेतात काही कळले नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चतुर्वाद पटतो
अवांतर विषय- हो असे करतात व त्यांच्या मेटींगमधून चांगली पैदास घडवून आणून ती पिल्लं हजारोंना विकतात.
मध्यमवर्गाच्या अनभिद्नतेविषयी बाइंनी केलेला चतुर्वाद पटतो.
मराठी माणूस धंद्यात मागे का
कुत्र्यांची अशी पैदास केल्यावर मालकी हक्क कुत्र्याच्या मालकाकडे की कुत्रीच्या? की त्यात काही टक्केवारी असते.
मध्यमवर्गीय असल्याने या बाबतीत अनभिज्ञ आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मादी- नर
तेथेही व्यवहार आहेच. पिल्लू मादी- नर असेल तर कशी विभागणी करतात हे एखाद्या भागात सांगाता येइल.
मालकी हक्क
कुत्र्याच्या मालकाला एक पिल्लू (+ कोणते ते निवडण्याचे स्वातंत्र्य) आणि बाकीची पिल्ले कुत्रीच्या घरच्यांना असा करार सहसा केला जातो.
माहिती
कुत्रा एका रात्रीसाठी देण्याचे ५०००० रुपयेसुद्धा मिळू शकतात. कुत्रीचे पिल्लूही २५००० रुपयांना विकले जाते.
बाबो
५०००० रुपये? अंमळ जास्त वाटतात. बहुपयोगी बैलही यापेक्षा कमी किमतीत 'दाखवला' जातो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
खाड्कन उतरेल
बाइंची नशा आता मात्र खाड्कन उतरेल.
स्पेइंग
अरे मूळ चर्चा कशावर आहे आणि जाते कुठे आहे!!
बाईंना स्पेइंग माहित नसावे. कुत्री बाळगणारे अनेकदा या मार्गाने जातात. या चर्चेतही आता या विषयाला पूर्णविराम देता यावा/ स्पेइंग करावे.
चांगलीच रंगलीय की चर्चा
अरे वा! उपक्रम रंगलंय चर्चेत. छानच चालली आहे चर्चा. ह्या बाईंनी राज ठाकरे यांना महाराष्ट्राचे ओबामा म्हटले होते म्हणे. यावरूनच त्यांना फारसे महत्त्व देऊ नये असे वाटते. चर्चा टाकून अनेक उपक्रमींचा वेळ दवडल्याबद्दल अपराधी वाटत आहे.
धन्यवाद
आपल्या स्त्युत्य उपक्रमातील प्रतिक्रिया वाचल्या. बरेच शिकायला मिळाले. (कोल्बेरचा उच्चार त्याच्यावर प्रेम करूनही माहीत नव्हता. किंवा' स्ट्युअर्ट 'सुधारला)
ब्लॉग दोन भागात् लिहिला होता. 'बर्तोलुची ते पुलं आणि अवचट प्रेम' एक भाग आणि अवचटांचं लेखन मला का मर्यादित / बोअर करणारं वाटतं हा दुसरा भाग. पहिल्या भागात कितीतरी सुधारणा आवश्यक आहेत. अवचटांचे प्रामुख्याने अलीकडचे लेखन आणि त्यांची पोझ मला बोअर करते. का? ते लिहिले -- अजून नीट लिहिता येईल. आता ब्लॉगऐवजी दीर्घ लेखच लिहून अवचटांच्या लेखनावर लिहायला हवे होते असे वाटते. अनेक वाचकांनी या लेखाला प्रतिक्रिया कळवल्या. ते सारं कवित्व सवडिने लिहिण्यायोग्य आहेच.
बाकी प्रत्येकाचा टीकेचा हक्क मान्य आहे. या निमित्ताने काही कमअस्सल मनोवृत्तींचे दर्शन झाले. तेही एक शि़क्षण.
या निमिताने एक प्रश्नावली लेखक सतीश तांबे यांनी पाठविली आहे.
ती पोस्ट करते.
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
या प्रश्नांच्या उत्तरातून वैयक्तिक टीकेपलीकडे काही अधिक उलगडेल असे वाटते.
असो. इच्छा असल्यास तांबे यांच्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते असे मला वाटते.
-ज्ञानदा.
पु.ल.देशपांडे
एखादा लेखक थोर साहित्यिक वाटण्यासाठी कोणते निकष वापरायचे असतात?
पु.लंच्या लेखनाची यादी येथे मिळाली. त्यात ब्लॉग लेखन सापडले नाही.
मत
This comment has been moved here.
वाचक ज्याकडे "वाचनीय" म्हणून पाहतो ते साहीत्य
This comment has been moved here.
क्षमस्व
भयंकर टायपोबद्दल क्षमस्व.
@अजूनकोणमी - मत पावले. धन्यवाद.
प्रश्नावली
प्रश्नावली सतीश तांबे या कथाकाराची आहे.
सतीश तांबे यांची 'रसातळाला ख.प.च.' , 'माझी लाडकी पुतनामावशी' आणि 'राज्य राणीचं होतं' हे तीन कथासंग्रह् अनि 'लेखाजोखा' हे समीक्षात्मक लेखांचे पुस्तक प्रकाशित आहे.
मी लेखिका म्हणून नाही- एक वाचक म्हणूनच अवचटांची समीक्षा केली आहे. आणि संवादी चर्चा ईष्ट. माझे माझ्या भूमिकेबद्दल अजिबात सुपरलेटिव्ह् गैरसमज नाहीत. निदान पुलं वाचणारे सौजन्याने लिहीत असतील असं मला वाटत होतं. :) ** विनोद अलर्ट! :))
ऍजम्प्शन आहे ते.
--निदान पुलं वाचणारे सौजन्याने लिहीत असतील असं मला वाटत होतं. :)-
ऍजम्प्शन आहे ते.