उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी
धूमकेतू
November 17, 2010 - 1:15 pm
मिसळपाव संकेतस्थळावर नथुरामप्रेमींची एक चर्चा वाचनात आली. ती चर्चा वाचून वाटले की हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी आजही राजरोस नथुरामप्रेमाचे गोडवे गात असतात.
नथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का? असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत? या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?
दुवे:
Comments
उदारमतवाद
>>>म्हणून ते काँग्रेसमध्ये आल्यावर सगळ्या* गुन्ह्यांसाठी माफी दिली गेली तरी या एका गुन्ह्यासाठी दिली जाऊ नये असे माझे मनातले** मत नोंदवले.<<<
तसे काँग्रेस हे उदारमतवादी आहे. म्हणूनच नथुरामने गांधीहत्या केल्यावर उसळलेल्या दंगलीतील गुंडांना काही शिक्षा केल्याचे अथवा ठोस उपाय केल्याचे ऐकीवात नाही, (अपवादः मोरारजी देसाई). तेच इंदीरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत जेंव्हा ३०००+ निरपराध शिखांना मारले गेले त्याला कारणीभूत असलेल्यांना बाजूला केले गेले नाही, माफी जाउंदेत पण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी त्या घटनेचे समर्थन देखील केले. अर्थात त्याचा अर्थ काँग्रेस, हा आपल्या लेखी जे इतर पक्ष जातीय, धर्मांध वगैरे आहेत, तसा नसून उदारमतवादी आहे असाच असणार. असो.
अर्थातच
>>>म्हणजे काँग्रेस मध्ये आल्यास काही गुन्ह्यांसाठी माफी मिळते का?
अर्थातच, तुम्ही फक्त "आदर्श" असणे हे काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाचे असते....
गडकरींचा बेनामी
गडकरींचा 'बेनामी आदर्श' विसरू नका.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
श्राद्ध
अर्थातच!
संभाव्यता योग्य आहे, नाहीतरी काँग्रेसी नेते कुणाविरुद्ध कधी बोलत नाहीच*, आणि "हे" तर आपले "आदर्श" मित्र या अनुषंगाने त्यांनी "मित्रा"वर चिकलफेक करण्याचे मनातल्या-मनात दाबले असावे.
* ~ स्वतःच एवढे घोटाळे यांनी करुन ठेवलेत त्यांना निकाली लावून हिशोब ठेवता-ठेवताच यांच्या इतका नाकी दम येत असेल की इतर पक्षांतील त्यांच्या "त्याच जातीच्या**" मित्रांचे घोटाळे उघडणे त्यांना कष्टप्रद वाटत असतील किंवा तसं करतांना आपलंच पितळ उघड पडणार या भावनेनेच ते मन मारत असतील.
** ~ भ्रष्ट लोकांची जात
असहमत
आपण वर लिहीलेला भाग पाहता चर्चा करण्यासारखे बरेच काही असल्यासारखे वाटते. जालावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नथुरामची गरज भासत नाही.
नथुरामचे
नथुरामचे समर्थन करणारे बरेचसे नाझींचे पण समर्थक असतात. त्यांना अततायीपणा आवडत असावा.
सहमत आहे.
सहमत आहे. एकंदरित अतिरेकी विचारसरणीचे हे लोक असतात. उपक्रमावरच्या ह्या चर्चेत त्यांचे बिंग फुटले होते.
-डॉन कोर्लिओनी
शिवसेना आणि ब्राह्मण
शिवसेनेचा राजकीय प्रवास वळणावळणाचा आहे. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार हे कट्टर ब्राह्मणविरोधी सुधारक म्हणता येतील. (त्यांच्या ब्राह्मणद्वेषाला पेशवेकालीन कायस्थ समाजाच्या छळाचा संदर्भ असावा.) शिवसेनेचा उगम मुंबईच्या कामगारांमधला डाव्या पक्षांचा प्रभाव रोखण्यातून झाला. त्यामुळे सुरुवातीची धोरणं ही लालबाग-परळमध्ये चालणारी अशी, अर्थात बहुजनवादी होती (पण ब्राह्मणविरोधी मात्र नव्हती). मराठी अस्मितेच्या मुद्द्याचं आकर्षण हळूहळू काही ब्राह्मणांनाही वाटू लागलं. गिरणगावातून दादर आणि मग ठाणे, डोंबिवली, विलेपार्ले अशा संघाच्या ब्राह्मण बालेकिल्ल्यांतही शिवसेनेचा नंतर थोडा शिरकाव झाला. जुन्या पिढीतल्या समाजवादी ब्राह्मणांना शिवसेनेबद्दल राग हा कामगार चळवळ हातातून गेल्यामुळे होता. तर जुन्या पिढीतल्या हिंदुत्ववादी ब्राह्मणांना शिवसेनेबद्दल राग हा शिवराळ आक्रस्ताळेपणामुळे होता. पण नव्या पिढीत (१९७० मध्ये तरुण असणारे आणि नंतरचे) मात्र शिवराळ आक्रस्ताळेपणाविषयी इतका तिटकारा नव्हता, किंबहुना आकर्षणच होतं. (या पिढीतले अनेकजण मराठी संस्थळांवर जी भाषा वापरतात किंवा तिची वाहवा करतात त्यातही हे आकर्षण दिसेल.) हळूहळू मराठी अस्मितेपोटी आपण मर्यादित होतो आणि हिंदुत्ववादाला चांगला बाजारभाव मिळेल असं जाणवल्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्ववादाची कास धरली (अर्थात आपल्या आक्रस्ताळेपणाला जपत) आणि नंतर भाजपशी युती केली.
शिवसेनेला गांधींविषयी कधीच प्रेम नव्हतं. गांधींना प्रातःस्मरणीय करणं त्यांच्या आक्रस्ताळेपणात कुठेच, कधीच बसत नव्हतं (संघाला ते करता आलं). पण गोडसेही तसा संघाच्या जुन्या पिढीच्या मुशीत शोभावासा होता. त्याची जी काही थंड डोक्याची वैचारिकता अशी म्हणता येईल ती निव्वळ दंडुकेशाही आणि शिवराळ धटिंगणपणात सहज बसणारीही नव्हती. पण आधीच गांधीद्वेष आणि त्यात हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेला गोडसे दूर ढकलताही येत नाही. अशी ही पंचाईत आहे.
(मुंबई-पुण्यातल्या मर्यादित निरीक्षणांवर आधारित)
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
छान प्रतिसाद
जंतूंनी घेतलेला आढावा आवडला.
-डॉन कोर्लिओनी
काही प्रश्न...
सर्वप्रथम इतके मान्य आहे की पिढ्यांच्या संस्कारातून आपल्या आवडीनिवडी तयार होतात आणि त्या अर्थाने आपल्यात जाती आहेत. पण मी इतका मर्यादीत अर्थ सोडल्यास जात मानत नाही. वैयक्तीक जीवनातही नाही आणि दुसर्याकडे बघताना पण नाही. म्हणून जातीय दृष्टीकोनातून लिहीणे हे मला पटत नाही.
गोडसे
गोडसे संघाच्या मुशीत शोभावा असा नव्हता काय? तात्याराव सावरकरांचा तर त्यावर विशेष जीव होता. प्रदीप दळवींच्या नाटकात एक संवाद आहे,
तात्याराव म्हणतात" "नथुरामा, आधुनिक भारताचा दधिचि आहेस. तू अस्थि मागे ठेवत नाहीयेस, विचार ठेवतोयस..ह्याच विचारांची उद्या शस्त्रं होतील! "
-डॉन कोर्लिओनी
संदर्भहीन
त्यांच्या नाटकात गांधीजींच्या चुका सांगणारे पण संवाद आहेत ते ऐतिहासीक संदर्भ म्हणून मान्य आहेत का? ते पण येथे छापूयात.
छापा
मला त्यांचे संपूर्ण नाटकच बकवास वाटते. ते लोकांसमोर आणायचे असल्यास बिनधास्त छापा.
-डॉन कोर्लिओनी
प्रश्नच मिटला!
द्या टाळी! मग त्यातील ते वाक्य संदर्भ म्हणून कसे काय वापरता? का असा बकवास संदर्भ केवळ आपण दळवीप्रेमी आहात म्हणून देत आहात?
विकास यांना प्रतिसाद
पहिल्या दोन वाक्यांशी बरेच जण सहमत होतील. पण् तिसर्या वाक्याबाबत धनंजय यांनी त्यांच्या मूळ प्रतिसादात जे म्हटलं आहे ते वाचावं. पृथक्करण सर्व अंगांनी करणं गरजेचं असतं.
सुधारक असणं महत्त्वाचंच आहे. पण प्रबोधनकारांचा ब्राह्मणविरोध दुर्लक्ष करण्यासारखा नाही, हेही तितकंच खरं. ठाकरे कायस्थ होते हे ही खरं आणि पेशवेकालीन कायस्थ समाजाचा छळही दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता, हेही खरं. प्रबोधनकारांचं लिखाण नुकतंच जालावर प्रसिध्द करण्यात आलं. त्या निमित्तानं हे लक्षात आलं की फुल्यांचा ब्राह्मणविरोध जितका परिचयाचा आहे तितका आज प्रबोधनकारांचा ब्राह्मणविरोध परिचित नाही. त्याचं कारण कदाचित शिवसेनेला ब्राह्मणांचा असलेला पाठिंबा हेही असू शकेल. कल्पना नाही. मी केवळ अंदाज व्यक्त केला. आणि म्हणूनच 'संदर्भ होता' असं न म्हणता 'असावा' असं म्हटलं.
हा शैलीचा प्रश्न आहे; अस्मितेचा नव्हे. अशा शिवराळ, धटिंगण अस्मितादर्शनाच्या शैलीविषयी ब्राह्मणांना सुरुवातीला फारसं प्रेम नव्हतं. म्हणजे त्यांची मराठी अस्मिता बहुजन समाजापेक्षा कमी होती असं नाही, तर अस्मितेच्या प्रदर्शनाच्या शैलीमुळे ते शिवसेनेपासून दूर होते. मग ब्राह्मणांच्या मानसिकतेत झालेल्या बदलांमुळे त्या शैलीविषयी आकर्षण निर्माण झालं. हे काहीसं अमिताभ बच्चनच्या चित्रपटांसारखं आहे. व्यवस्थेविषयीची जी चीड त्यांतून व्यक्त होत होती, त्यामुळे त्यांनी सत्तरच्या दशकात प्रामुख्यानं तरुणांचं हृदय जिंकलं. पण १९४७ मध्ये तरुण असणार्यांना १९७०मध्ये अमिताभ बच्चन आकर्षक वाटत नव्हता. त्याची उग्र अभिव्यक्ती त्यांना अप्रिय होती. म्हणून त्यांची देशभक्ती कमी ठरत नाही.
गोडसे शाखेत गेला होता की नाही हा इथे मुद्दा नाही, तर मुद्दा पुन्हा एकदा शैली आणि अभिव्यक्तीचा आहे. गोडसेच्या कृतींचं त्यानं एका प्रखर वैचारिकतेतून समर्थन केलं. ते ज्या पध्दतीनं केलं ते त्या पिढीच्या ब्राह्मणांना भावण्यासारखं होतं. त्यानं शिवसेनेसारखी शिवराळ भाषा वापरली असती तर ते तसं भावलं नसतं.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
थोडी दुरुस्ती
शिवसेनेला ब्राह्मणवर्गात फारसा पाठिंबा ७० च्या दशकात नव्हता. तो जनसंघाला होता. ७० च्या दशकात शिवसेना मुंबईबाहेर फक्त ठाण्यात खरोखर अस्तित्वात होती. ती देखील विष्णुनगरात नव्हती (तशीच डोंबिवलीतही नव्हती) तर चरई आणि खारकर आळीत होती. तेथली कायस्थांची मोठी संख्या हे त्याचे कारण होते.
मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत शिवसेनेला पाठिंबा मिळू शकला कारण तेथला मराठी माणसाचा प्रश्न मुंबईतील अमराठी लोकांच्या मोठ्या संख्येमुळे "खरा" होता. तसा तो इतरत्र खरा नव्हता कारण इतरत्र अमराठी लोकांची संख्या मराठी लोकांना थ्रेटनिंग वाटण्याएवढी नव्हती.
ब्राह्मणांचा शिवसेनेला पाठिंबा ही घटना बाबरी मशिदीच्या धामधुमीत (भाजपशी युती केल्यामुळे घडलेली घटना होती). तरीही ब्राह्मणांच्या पाठिंब्यावर शिवसेना वाढली नाही.
शिवसेनेची खरी वाढ हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर सर्वदूर मिळणार्या पाठिंब्यावर झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना कधीही वाढली नसती.
शिवसेनेचा गांधीद्वेशही फारसा रिअल नव्हता. (नथुरामप्रवृत्तीतला तर नक्कीच नव्हता). नडगीफोड मनात नैसर्गिकपणे अहिंसेविषयी जो तिरस्कार असेल तसलाच होता.
बाकी शिवसेना हे काँग्रेसचे अपत्य होते हे तर जगजाहीर आहे (१९९० पूर्वी वेळोवेळी ते शिवसेनेने दाखवलेले आहे). तिला वसंतसेना म्हणत असत.
नितिन थत्ते
थत्त्यांना प्रतिसाद
हे बरोबरच आहे. मी आजच्या ब्राह्मणांना त्यांच्या शिवसेना/बाळ ठाकरे/राज, ई.-प्रेमापोटी की काय, पण प्रबोधनकारांचा ब्राह्मणविरोध फारसा परिचित नाही, असं म्हणतो आहे. खुद्द सेनेलाही आज ब्राह्मणविरोध परवडणारा नसल्यामुळे तो स्मृतीआड करायचा आहे.
हेही खरंच आहे. फक्त एकच वाटतं - ऐंशी-नव्वदच्या (अमिताभ बच्चन पचवून वाढलेल्या) तरुण ब्राह्मणवर्गात आधीच्या पिढीसारखी शिवराळपणाविषयी घृणा नव्हती; कौतुक होतं. भाजप-सेना युती होण्याला जहाल हिंदुत्वाबरोबरच हा मानसिकतेतला बदलही पूरक होता. जुन्या पिढीच्या संघ-कार्यकर्त्यांना ते रुचलं नसतं/रुचत नाही.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
जुन्याच दृश्टीतून घटनांकडे किती काळ पाहणार?
मी मिपावरील चर्चा वाचलेली नाही. हा प्रतिसाद चर्चाप्रस्तावात जे आणि जेवढे लिहीले आहे त्यास धरून लिहीला आहे. माझा प्रतिसाद ज्यांना दुर्बोध वाटतो त्यांनी तो वाचू नये.
नथुरामाचे गोडवे गाणारे मी तरी माझ्या आजूबाजूला पाहीलेले नाहीत. पण हो गांधींजींचे गोडवे गाणारे सगळीकडेच आहे. पण मी स्वत: नियतीचे गोडवे गातो.
श्री. मोहनदास करमचंद गांधींना ते वैश्य जातीतील होते म्हणूनच नियतीनेच मोठे केले*. नथुराम गोडसे ह्याला फक्त तो बामण जातीतील व तो मराठी होता म्हणूनच नियतीने गांधींची हत्या करण्यासाठी निवडले होते असे मी समजतो. गांधींचे राजकिय गुरू श्री. गोपाळ कृश्ण गोखले हे मराठी होते, बामण जातीतील होते. भारतात मराठी बामण जातीत जे शहाणपण आहे ते वादातीत आहे असे मी मानतो. फक्त लाईफ मध्ये 'ट्वीस्ट ऍन टर्न' असल्यामुळे श्री. गोपाळ गोखले यांना महत्व मिळण्याऐवजी वैश्ययुगात 'वैश्य गांधींना' मोठेपण व नथुरामाला 'बामण व्हीलन' ची भुमिका मिळालेली आहे. काही वर्शानंतर बहुधा ह्या त्रांगडाचे गणित उलगडू शकेल.
*(फर्स्ट क्लासचे तिकीट काढण्यापूर्वी गांधींच्या मनात एक विचार नक्की आला असेल की नको आपण फर्स्ट क्लासचे तिकीट नको काढुया. उगीचच शिक्शा होईल. पण त्यांनी त्या विचारावर ठरवले असावे कि आपण तिकीट काढून व प्रवास करून तर पाहुया, बघुया तरी पुढे काय होते ते.... ! त्यांचा गोळी द्वारे मृत्यू गोर्या पोलिसांकडूनच झाला असता. पुढेचे निर्णय मग नियतीनेच घेतले. पण त्यानंतर गांधींजींना सवय लागली धाडस करायची...!)
फाउल
"कॉज आणि इफेक्ट" / "नियती" हे मुद्दे तार्किक सभेत मांडू नये..फाउल समजला जातो. (पण कदाचित हा प्रतिसाद देण्यास आपल्याला नियतीने भाग पाडले असावे)
मराठी
मराठी म्हणुन शिवसेनेने दिलेला पाठींबा पहायचा असेल तर अविनाश कुलकर्णीने जेव्हा सीमा शुल्क चुकवुन् जेव्हा वस्तु आणल्या होत्या असे उघडकीस आले तेव्हाचे सामनाचे अग्रलेख पहावेत.
कुलकर्णी का भोसले?
अविनाश "कुलकर्णी" का "भोसले"?