हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी

मिसळपाव संकेतस्थळावर नथुरामप्रेमींची एक चर्चा वाचनात आली. ती चर्चा वाचून वाटले की हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी आजही राजरोस नथुरामप्रेमाचे गोडवे गात असतात.

नथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का? असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत? या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?

Comments

हलक्या शब्दावर आक्षेप

हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी
हलक्या शब्दावर आक्षेप आहे. फारच सौम्य शब्द आहे. हे 'हलक्या' मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी अजूनही आसपास दिसतात. काही उघड असतात. तर काही गोलगोल गप्पा करणारे किंवा वाद घालणारे छुपे नथुरामप्रेमी. ते अधिक घातक. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मराठी संकेतस्थळावर कातडीबचाव धोरण

मराठी संकेतस्थळावर कातडीबचाव धोरण पाळण्यासाठी हलका शब्द वापरला. सडका वापरला तर कोमल हृदयाच्या उच्चभ्रूंच्या भावना दुखावतील. लाडूंनी चर्चेत भाग घेऊन मूळ प्रश्नांची उत्तरे देऊन चर्चेत भर घालावी.

कातडीबचाव

मराठी संकेतस्थळावर कातडीबचाव धोरण पाळण्यासाठी हलका शब्द वापरला.

सहमत आहे. मराठी स्थळांवर हलक्यांची/गोल गप्पावाल्यांची लॉबी स्ट्राँग आहे. कातडीबचावू पवित्रा उत्तम.

-डॉन कोर्लिओनी

द्विरूक्ति?

हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी

म्हणजे, "चांगल्या मनोवृत्तीचेही नथुरामप्रेमी असतात" असे सूचित करण्यात आले आहे काय? की "हलक्या मनोवृत्तीचे, नथुरामप्रेमी" असा अर्थ अपेक्षित आहे?
मुळात, चाहत्यांची मनोवृत्ती हलकी असल्याचे प्रतिपादन आहे की "हलक्या मनोवृत्तीचा असलेल्या नथुरामचे प्रेमी" असा अर्थ अपेक्षित आहे? नथुरामच्या मनोवृत्तीविषयी मते व्यक्त करणे अपेक्षित आहे काय?

अवांतरः
'मप्' असे 'एका दमात' लिहिण्याचा प्रयत्न केल्यास

function map() {
[native code]
}

असे का उमटते? गमभन च्या कोडमध्ये दुरुस्ती आवश्यक आहे काय?

"मप" : धन्यवाद

(हा प्रकार मला फार वेळ त्रास देत आलेला आहे. त्याची वाच्यता केल्यामुळे धन्यवाद.)

- - -

मूळ मुद्द्याविषयी : अशा चर्चा मराठी संकेतस्थळांवरती आणि मध्यमवर्गीय मराठी समाजात ऐकायला मिळतात खर्‍या. नथुराम गोडसे विषयी शिवसेनेचे अधिकृत मत आहे काय? शिवसेनेच्या खंद्या समर्थकांना मो.क.गांधी हा नेता आवडत नसावा असा माझा कयास आहे. राजकीय बदल घडवून आणण्यासाठी नथुराम गोडसे याची पद्धतही मान्य असावी असा कयास आहे. मात्र हल्लीच्या भारताच्या इतिहासातल्या कुठल्याही प्रमुख राजकीय-सामाजिक प्रवृत्तीचा जातिवादी किंवा वर्गवादी विश्लेषण करणे आवश्यक असते.

(जातिवादाच्या विरोधात असणार्‍यालाही असे विश्लेषण करावेच लागते. कोणाला क्षयरोग होऊच नये, अशा क्षयरोगजंतूच्या कट्टर विरोधात असलेल्या व्यक्तीला जुनाट खोकल्याच्या संदर्भात क्षयरोगाच्या दृष्टीने विश्लेषण करावेच लागते. क्षयरोगाचा विरोध करताना "क्षयरोगात होणारी दुखणी अस्तित्वात नाहीच अशा प्रकारे वैयक्तिक वागणूक करा, क्षयरोगाची दुखणी आपोआप नाहिशी होतील!" असे म्हणणारे कोणी फारसे भेटत नाही. मात्र जातींच्या विषयात मात्र "जातिभेदातून होणारे तोटे अस्तित्वात नाहीच अशा प्रकारे वैयक्तिक वागणूक करा, जातिभेदातून होणारे तोटे आपोआप नाहिसे होतील!" असे म्हणणारे लोक भरपूर भेटतात.)

नथुराम गोडसे आणि त्याचे प्रमुख सहकारी ज्या जातीतले होते (आणि थोड्यांच जातींतले होते), आणि ज्या सामाजिक वर्गातले होते, ते शिवसेनेच्या मध्यवर्ती समर्थनगटापेक्षा वेगळे होते. (नथुराम गोडसे याच्या काळातला त्याचा प्रमुख समर्थनगट आकडेवारीने शिवसेनेचा दुय्यम समर्थनगट आहे.) म्हणून मनात कुतूहल उत्पन्न झाले. इतकेच.

एक शक्यता

नथुरामचे मूळ (शिवसेनेतर) समर्थक हे महाराष्ट्रातील have गट होते. सबार्ल्टनांकडे सत्ता, ज्ञान, पैसा गेल्याचे त्यांना वैषम्य वाटते. अनेक क्षेत्रांत पुढे असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व राजकारणात आणि सशस्त्र लढ्यातही संख्येच्या मानाने ते अधिकच असावेत असे वाटते. ("आमच्यात (विनोबा/साने गुरुजी वगळता) कोणी 'संत' नाही", असे म्हटले जाते.) त्यामुळे, 'लोकांच्या पुढाकाराने चळवळ' ही कल्पना त्यांना आवडत नसावी. (हिटलरचे आकर्षणही त्यातूनच आले असावे.) त्यामुळे गांधींचे तत्त्वज्ञान त्यांना आवडत नसावे. शिवसेनेसारख्या सबार्ल्टन गटाने तो मुद्दा हायजॅक केला हा त्यांचा बिनडोकपणा आहे.
The best government is a benevolent tyranny tempered by an occasional assassination. - Voltaire
--------
मप् हा खूप पूर्वीपासूनचा त्रास आहे. संपादकांनी कृपया लक्ष द्यावे.

जगन फडणीस

जिज्ञासूंनी महात्म्याची अखेर - ले. जगन फडणीस हे पुस्तक वाचावे.

नितिन थत्ते

जेनेसिस्

नथूरामच्या संदर्भातली चर्चा ही शिवसेनेपेक्षा रास्वसंघ, हिंदू महासभा, जनसंघ, भाजप यांच्या संदर्भात जास्त अर्थपूर्ण ठरेल असे वाटते.

+१

असेच म्हणतो.

नितिन थत्ते

???

मी त्यापेक्षा काय वेगळे लिहिले आहे?

.

तुम्ही नाही, धनंजय यांनी लिहिले आहे.

नितिन थत्ते

+१

बहुदा गोव्यात वाढल्यामुळे धनंजय यांना शिवसेनेची मर्यादा माहिती नसावी.

होय, हे आहे

गोव्यात शिवसेनेची फार मर्यादितच वाढ झाली, आणि त्याचे स्वरूप महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळे आहे.

अर्थातच

जेनेसिस बाबतीत अर्थपूर्ण चर्चा वरच्या संस्थांच्या अंगांनी होईल, याबाबत शंका नाहीच.

युती आणि युतीमधील फुटी या संदर्भात विचार करताना "या दोन सामाजिक प्रवाहांची (तृणमूलांची/कोअर कॉन्स्टिट्युएन्सीची) एकमेकांबद्दल मते काय आहेत?", "'कुठल्या-कुठल्या बाबतीत हे दोन प्रवाह मनापासून समन्वय साधू शकतील आणि कुठल्या बाबतीत समन्वय शक्य नाही, कुठल्या बाबतीत राजकीय संधी साधण्यापुरता समन्वय साधला जाईल?", अशा प्रकारचा विचार करताना असे विश्लेषण उपयोगी पडेल.

वेगळ्याच देशाचे उदाहरण घेतल्यास : ख्रिस्ती मूलतत्त्ववादी आणि मुक्त बाजारपेठवाद्यांचा एक प्रवाह यांची कित्येक दशके युती आहे. उलटपक्षी ख्रिस्ती-मूलतत्त्वविरोधवाद आणि कामगार-अर्थकारणवाद या प्रवाहांची युती आहे. या दोन्ही युत्यांमध्ये काही अंतर्गत विरोध आहेत. ते अंतर्गत विरोध उघड होणार नाहीत इतपत काळजी राजकारणात घेतात, पण हे कालांतराने शक्य होत नाही. केनडी काळातले "आम्ही अतिशय कॅथोलिक म्हणून अर्थातच डेमोक्रॅटिक पक्षाचे" हे बदलून आता "आम्ही अतिशय कॅथोलिक म्हणून अर्थातच रिपब्लिकन पक्षाचे" असे होऊ लागले आहे.* मागच्या दोन वर्षांतला "टी पार्टी" हा प्रकार सुद्धा या युती-अंतर्गत विरोधांच्या विश्लेषणातून नीट समजू शकेल, असे मला वाटते. जुन्या "कट्टर-कॅथोलिक-म्हणून-केनडी-समर्थक" तृणमूलाचे "रो-व्हर्सेस-वेड (गर्भपाताचा हक्क गरोदर बाईला देणारा निवाडा)" बद्दल काय मत आहे, या प्रकारच्या सर्वेक्षणातून-विश्लेषणातून काही ज्ञान मिळू शकते, असे मला वाटते.

- - -
*जॉन एफ केनडी हा १९६१-१९६३ काळात यू. एस.चा राष्ट्रपती होता. तो कॅथोलिक-ख्रिस्ती पंथाचा होता. त्याच्यापूर्वीच्या काळात कॅथोलिक समाज हा नवागंतुक/कमी प्रमाणात खरे-अमेरिकन वगैरे मानणारे लोक खूप होते. अमेरिकेतील बहुसंख्य ख्रिस्ती लोक त्या काळात वेगवेगळ्या बिगर-कॅथोलिक पंथांतले होते.

धनंजय वैद्य विषयांतर का करतात?

या चर्चेत धनंजय वैद्य विषयांतर का करतात? शिवसेना, ख्रिस्ती मूलतत्ववाद, केनडींना या चर्चेपासून दूर ठेवा. लांबणावळ नको.

विषय काय आहे?

विषय काय आहे, हे मला कळले नसेल, तर दिलगीर आहे.

चर्चाप्रस्तावकाराने असे म्हटलेले आहे :

नथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का? असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत? या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?

मराठी अस्मिता हे प्रमुख आणि उघड व्यासपीठ असलेला पक्ष शिवसेना हा आहे. चर्चाप्रस्तावकाराच्या वाक्यावरून या प्रकारात मराठी अस्मितेचा संबंध असावा, हा चर्चाविषय असावा, असे वाटते.
वर अनेक प्रतिसादकांनी म्हटले आहे, की नथुराम गोडसे याच्या जेनेसिसबद्दल रा.स्व.संघ, आणि संघाशी संबंधित अन्य पक्ष आणि संस्थांचा विचार अधिक सुसंदर्भ आहे. ही कल्पना इतकी अतिस्पष्ट आहे, की ती माझ्या प्रतिसादात अध्याहृत आहे, असे मला वाटले होते. ही कल्पना इतकी अतिस्पष्ट आहे, की या बाबतीत आणखी चर्चा करण्यालायक नाही, असे मला आधी वाटले होते. यापेक्षा अधिक माहितीपूर्ण विश्लेषण मला हवे होते. शिवसेना आणि रास्वसंघ-निगडित पक्ष वेगवेगळे आहेत, हे सुस्पष्ट आहे, पुन्हा सांगायला लागू नये, असे मला वाटले होते. रा.स्व.संघाच्या विषयातली मुळे गृहीत ठेवून मराठी अस्मितेबद्दल आग्रही असणारे अन्य तृणमूल प्रवाह नथुराम गोडसेबद्दल काय मत व्यक्त करतात?

हा विचार कल्पनाविलास नव्हे. शिवसेना आणि भाजप यांची महाराष्ट्रातील निवडणुकीत आणि सरकारमध्ये अधूनमधून युती होते. अर्थात मी याच युतीबद्दल बोलत होतो, हे अध्याहृत आहे, असे मला वाटले.

हे सर्व प्रश्न चर्चाप्रस्तावाला अजून सुसंदर्भ वाटतात.

ही सर्व अधाहृते सुस्पष्ट असून ती अध्याहृतेच उत्तरे म्हणून पुन्हा सांगणारे प्रतिसाद येऊ लागले. माझीच अध्याहृते, सुस्पष्ट आहेत, आणि तुम्हाला ती पटतात, तर उपप्रतिसाद म्हणून का येत आहेत? हे कोडे वाटले. याचे गूढ चित्रा यांनी उकलले. माझे बाळपण गोव्यातले असल्या कारणाने "शिवसेना आणि रा.स्व.संघ-प्रणीत पक्ष वेगळे आहेत", "शिवसेना-भाजप युतीवेगळ्या युती महाराष्ट्रात झाल्या आहेत, ते मला माहीत नसेल, म्हणून त्याची जाणीव मला करून द्यावी" वगैरे विचार उपप्रतिसादकांच्या मनात येणे साहजिक आहे. शिवाय युती होतात त्याबद्दल महाराष्ट्राबाहेर वाढलेल्या-राहाणार्‍या व्यक्तीला काय चौकटीत वर्णन करून सांगावे, याबद्दल प्रतिसादकांना प्रश्न पडले असतील.

याबद्दल स्पष्टीकरणे वरील प्रतिसादात आहेत. वेगवेगळ्या युतींबद्दल सामाजिक मुद्दा व्यापक आणि समांतर आहे, म्हणून अन्य उदाहरण दिले तर ते अवांतर कसे होते, ते अजून समजलेले नाही.

चर्चाप्रस्तावक म्हणतात :

या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?

जर "अशा फुटीर अस्मितांच्या प्रसंगी मनुष्यांना काय सिद्ध करायचे असते" या बाबतीत उकल झाली, आणि ती नथुराम गोडसे विषयाच्या प्रसंगी लागू करून दाखवली तर ते या प्रश्नाचे चांगले विवरण होईल असे मला वाटते.

हे सर्व सुसंदर्भीकरणाचे स्पष्टीकरण तुम्हाला पटले नाही, तर मी काय करू? उपक्रमाचे संपादक मंडळ कधीकधी असंदर्भ प्रतिसाद संपादित करतात. त्यांना तुमचे म्हणणे पटले, आणि माझे स्पष्टीकरण पटले नाही, तर ते प्रतिसाद कदाचित संपादित करतील.

आणि तुम्ही म्हणता तसे मी नेहमीच असंदर्भ प्रतिसाद देत असेन, तर माझे प्रतिसाद नेहमीच संपादित करतील, खाते गोठवतील, वगैरे.

या प्रतिसादाला भरपूर उपप्रतिसाद आलेले नाहीत. माझ्या विचारणेने अन्य प्रतिसाद अजून तरी दबले गेलेले नाहीत. तुमच्या प्रतिसादाला मात्र तिरके प्रतिसाद येत गेले, तर अवांतरांची तुमची भीती खरी होईल.पण ते तुमच्या प्रतिसादामुळेच. माझ्या मूळ प्रतिसादामुळे नव्हे.

असहमत

>>मराठी अस्मिता हे प्रमुख आणि उघड व्यासपीठ असलेला पक्ष शिवसेना हा आहे. चर्चाप्रस्तावकाराच्या वाक्यावरून या प्रकारात मराठी अस्मितेचा संबंध असावा, हा चर्चाविषय असावा, असे वाटते.

माझे मत आहे कि, महाराष्ट्रात निदान पुणे-मुंबई इथे नथुराम हा मुद्दा मराठी-अस्मितेचा नसून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा आहे, आणि गांधी हत्येनंतर मुख्यत्वेकरून ब्राह्मणांचे हाल करण्यात आले असे ऐकिवात आहे, निदान रास्वसं आणि हिंदू महासभेचा संबंध जोडून तसे करण्यात आले असे बोलले जाते. मराठी अस्मितेचा मुद्दा नेहमी महाराष्ट्राशी संबंधित राजकारणाशी निगडीत आहे असे माझे मत आहे.
त्यामुळेच आपला प्रतिसाद पूर्णपणे चर्चा प्रस्तावाशी संदर्भित आहे असे वाटत नाही.

मूळ मुद्यावर माझी मते खालीलप्रमाणे -
>>१. ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का?

महात्मा द्वेषी लोकांनी नक्कीच गायली असती, बाकी जात्यंध लोकांबद्दल बोलणे व्यर्थ. मी स्वतः कोणच्याही हत्येच्या विरोधात आहे.(युद्ध वगळता)

>>२.असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत?

बऱ्याच लोकांचे असे मत झाले आहे कि महात्म्यामुळे आपले अपरिमित नुकसान झाले, त्यामुळेच नथुरामचा निर्णय त्यांना योग्य वाटतो. आणि हे लोक विवेकी नाहीत हे माझे मत आहे.

>>३. या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?

तडकाफडकी निर्णय हि सगळ्यांनाच आवडणारी बाब आहे, म्हणूनच अमुक एक हिंसाचार असलेले चित्रपट बहुतांश लोकांना आवडतात, मग त्यातील नायक हा कायद्याविरुद्ध जाऊन योग्य निर्णय घेतो व त्यावेळी लोक खुश होतात हि ती मानसिकता आहे असे मला वाटते. म्हणूनच हिटलर किवा नथुराम आवडणे हे त्या मानसिकतेचे एक लक्षण आहे. सिद्ध वगैरे काही करायचे नसते असे मला वाटते.

प्रश्न

युती आणि युतीमधील फुटी या संदर्भात विचार करताना "या दोन सामाजिक प्रवाहांची (तृणमूलांची/कोअर कॉन्स्टिट्युएन्सीची) एकमेकांबद्दल मते काय आहेत?", "'कुठल्या-कुठल्या बाबतीत हे दोन प्रवाह मनापासून समन्वय साधू शकतील आणि कुठल्या बाबतीत समन्वय शक्य नाही, कुठल्या बाबतीत राजकीय संधी साधण्यापुरता समन्वय साधला जाईल?", अशा प्रकारचा विचार करताना असे विश्लेषण उपयोगी पडेल.

वरील परिच्छेदात कोणाच्या युतीबद्दल प्रश्न विचारला आहे ?

उत्तर

माझ्या प्रश्नाचे उत्तर धनंजय यांच्या वरच्या स्पष्टीकरणात समाविष्ट आहे. धन्यवाद.

शिवसेना भाजप युतीच्या बाबतीतला मला कळलेला ढोबळ मुद्दा "काँग्रेसच्या विरोधात झालेले ध्रुवीकरण" असा आहे. त्याचा बहुदा प्रस्तुत चर्चेशी संबंध नसावा असे मला वाटते.

गांधीवध, नथुरामची पुण्यतिथी वगैरे

गांधीवध, नथुरामची पुण्यतिथी वगैरे शब्दांबाबत आक्षेप घेऊन मी मिसळपाव संपादनाला हे शब्द संपादित करण्याची तक्रार केली होती पण बहुधा त्यांना असे शब्द आक्षेपार्ह वाटले नाहीत.

असो.

गांधी काय नि गोडसे काय!

गांधी काय नि गोडसे काय—दोघांचेही आचार-विचार, वागणे-चालणे-बोलणे इत्यादी इत्यादी, एकूणच काय, तर भूतकाळात होऊन गेलेल्या या दोन्ही माणसांकडून घेण्यासारखं मला आजवर तरी काहीही सापडलेलं नाहिये वा त्या दोघांपैकी सांगीतलेला एखादा विचार मी न अंगिकारल्याने माझं कुठं अडलं देखील नाहीये... आजकाल अनेक तत्ववेत्ते प्रत्येक गल्लीमध्ये विविध विषयांवर त्यांचे तत्वज्ञान वाटत फिरतांना दिसतात, काहीअंशी एकवेळ ते मी पटून घेईन! आजच्या घडीला, गांधी असो वा गोडसे, दोघांचेही आचार-विचार समाजात कुठेच वापरले जात नसल्याचे तरी मी ८०% खात्रीने सांगू शकतो. तसेच, भविष्यातदेखील लोकांना (+ मला) यां विभूतींच्या विचारांची नड भासेल, असे सध्या तरी मला वाटत नाही.

एखादं चांगलं काम केलं (उदाहरणार्थ, मला फार काही मोठा तोटा न होऊ देता बसस्टँडवरील एखाद्या दुर्बल व गरीब वयोवृद्धेला, जीच्यातील काही प्रमाणात असणारी शारिरीक व्यंगे डोळ्यांनी दिसतात—तीला एक-दोन रुपये दिले) की माझा एक मित्र मला नेहमी डिवचत असतो: "आपणच शाहू नाहीत या जगात!"
शाहू महाराजांबद्दल मी बरंच ऐकलंय, पण मित्राच्या म्हणण्याच्या मागच्या मतितार्थाची योग्य उकल मला मिळत नाहीये, आपणास काय वाटते?

माझी उत्तरे

नथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का?

गायले नसते.

असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत? या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?

त्या निमित्ताने लागलेला कलंक (खरे तर एकाच्या प्रमादाने असे कलंक लागण्याची गरज नसते.) पुसून काढायची धडपड असण्याची शक्यता आहे.

आता माझे काही प्रश्न -

मूळ प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत कोणीही दिली नाहीत हा कोणाचा महिमा असेल बरे? ;-)

धनु आणि बियंतसिंग यांच्या पुण्यतिथी साजर्‍या करायच्या का मसंवर यापुढे?

होतात

धनु आणि बियंतसिंग यांच्या पुण्यतिथी साजर्‍या करायच्या का मसंवर यापुढे?

अशा पुण्यतिथी अनुक्रमे इडली-सांबार डॉट कॉम (सुशिक्षित मध्यमवर्गीय उच्चवर्णीय हिंदू तामिळ यांची साइट) आणि छोले-भटुरे डॉट कॉम (सुशिक्षित मध्यमवर्गीय उच्चवर्णीय शीख पंजाबी यांची साइट) ह्या संस्थळावर साजर्‍या होतात असे कळते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्वॉर

मिसळपाव ही सुशिक्षित मध्यमवर्गीय उच्चवर्णीय मराठी हिंदूंची साइट आहे तर!

होय

मजकूर संपादित. कृपया व्यक्तिगत स्वरूपाची टीकाटिप्पणी करू नये.

-डॉन कोर्लिओनी

स्वारी..

सुशिक्षितच्या आधी "कागदोपत्री" हा शब्द घालायला विसरलो!

असो, पण "असल्या" चर्चांचे दळण वर्षानोवर्षे घालण्यासे कसब सुशिक्षित मध्यमवर्गीयांतच आहे!

बाटवले तर?

धनु मराठे/ भोसले/ कांबळे आणि बियंत पटवर्धन/ सावंत/ माळी अशी आडनावे केली तर?

शि. श. भोसले नाही का शिसोदिया वंशातले होते असे म्हटले जाते. वरच्यांचे मूळ पुरुष मराठी करून टाकू. कसें?

होय .. नाही

धनु मराठे आणि बियंत सावंत अशी नावे केली तर?
हॅ हॅ हॅ !!!

धनु मराठे यांची पुण्यतिथी साजरी होऊ शकेलसे वाटते पण् बियंत सावंत ह्याच्याबद्दल थोडी शंका वाटते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नथुराम

नथुरामाचे नाव नथुराम पडले कारण त्याला नाकात नथ घालायची आवड होती म्हणे.

-डॉन कोर्लिओनी

१. Jeffrey, Robin (1990). India, Rebellion to Republic: Selected Writings, 1857-1990. Sterling Publishers. p. 105.

तिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.तिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.तिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.तिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.तिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हाहा

नवीन बाटली, जुनीच दारू.
किंवा जुनी विटी, नवे राज्य. किंवा
नवीन जन्म, चिरंजीव आत्मा इ. इ.

नथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का?
मराठी लोकांनी गायले असते का - माहिती नाही. भारतीयांमध्ये दुसर्‍या राज्यांमधला इतिहास, व्यक्ती जाणून घेण्याची ओढ फारशी नाहीच असे म्हणायला हवे. त्यांच्यासाठी मोस्ट पॉलिटिक्स इज लोकल.

ब्राह्मण नसता तर गायले असते का? - ब्राह्मणच असे गोडवे गातात असे कोणी सांगितले?
इथे बरेच काही गृहित धरले आहे असे दिसते. हे जर गृहित धरणे थांबवले तर चर्चा अधिक व्यवस्थित होईल.

ब्राह्मणांना मुक्ती मिळवणे असा अर्थ काढायचा असला तर काढू शकता, माझ्या मते हा अर्थ इतका जातीयवादी नसून गांधीजींची विचारसरणी न पटता भगतसिंगाची पटणे असा आहे. भगतसिंग बहुदा ब्राह्मण नसावा. शिवाय कम्युनिस्ट होता म्हणे. तेव्हा सर्वसाक्षींची रदबदली करत नाही, पण जे दिसते आहे तसे मांडायचा प्रयत्न करते.

असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत? या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?

वरचेच उत्तर. काही लोकांच्या मते गांधीजींची विचारधारा चूक होती म्हणून नथुरामने केले ते बरोबर आहे असे असावे, तो ब्राह्मण होता म्हणून त्याची आरोपांतून मुक्तता करावी म्हणून ही चर्चा केली असे म्हणणे माझ्या मते तेवढेसे योग्य नाही.

नवीन बाटली

नवीन बाटली, जुनीच दारू.
किंवा जुनी विटी, नवे राज्य. किंवा
नवीन जन्म, चिरंजीव आत्मा इ. इ.

हे सगळे सर्वसाक्षीना उद्देशून आहे का? तसे असल्यास हा प्रतिसाद मिसळपाववर हलवायला हवा.

-डॉन कोर्लिओनी

सहमत आहे

मजकूर संपादित. कृपया व्यक्तिगत स्वरूपाची टीकाटिप्पणी करू नये.

छान चर्चा

>>नथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का ?
सांगता येत नाही.
>>>गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत ?
अंहं, सांगता येणार नाही.
>>लोकांना काय सिद्ध करायचे आहे ?
उपक्रम संस्थळावरील वाचनसंख्या आणि प्रतिसाद वाढवायचे असावे.

-दिलीप बिरुटे

अगदी सहमत!

» लोकांना काय सिद्ध करायचे आहे ?
उपक्रम संस्थळावरील वाचनसंख्या आणि प्रतिसाद वाढवायचे असावे.

इतर संस्थळांवर अगोदर होऊन गेलेल्या "आक्षेपार्ह विषय" असलेल्या चर्चा पुन्हा तोच चर्चेचा विषय घेऊन रंगवणे म्हणजे—त्यामागचे दुसरे कारण तरी काय असणार हो! :-/

नथुरामाची लिगसी

नथुराम समर्थक बरेच असावेत. (मिपा वरील चर्चा मी वाचली नाही.)

जातीनिहाय वर्गवारी करता येईल अशा प्रमाणात ते भेटतात. मात्र नथुरामाची लिगसी ही त्यापेक्षा मोठी असावी.
हल्लीचे उदाहरण म्हणजे मी नथुराम बोलतोय हे नाटक. असे ऐकले की गुजरातेत हे नाटक बरेच चालले. (महाराष्ट्रात दंगल होऊन बंद पडले. नंतर काय झाले हे माहित नाही.)
गुजरातबरोबर निर्वासितांमधे (सिंधी, पंजाबी) हे नाव कधीतरी ऐकतो. याशिवाय इतरांना हे नाव ठाऊक नसावे.

खूपसे हिंदुत्ववादी नथुराम विरोधक असावेत. त्यांचे म्हणणे 'नथुरामाने चूक केली. गांधींचे कुणी ऐकेनासे झाल्यावर मारले. किंवा गांधींचा फोलपणा लोकांच्या लक्षात येऊ लागला होता. त्याने मारले नसते तर पुढील प्रकार घडला नसता (रास्वस वर बंदी).' थोडक्यात ही युद्धनीतिपर (स्ट्रॅटेजिक) चूक झाली. हे सोडलेले गांधीवादाचे टीकाकार त्यामानाने खूप जास्त आहेत. मला असे वाटते की गांधीवादाचे समर्थक आता नगण्य राहिले आहेत. महात्मा गांधींच्या (इतर गांधींपासून वेगळे काढण्यासाठी महात्मा) नावाचा आता कदाचित राजकीय लाभ राहिला नसावा. (जो काही राहिला आहे तो अभिजनात/आंतराष्ट्रीयतेत दिसतो.) अशा वेळी हिंदुत्ववाद्यांकडे नथुराम माध्यम प्रसिद्धी मिळवण्याचा एक मुद्दा आहे. शिवसेनेत असताना छगन भुजबळ यांनी नथुरामाचे नाव निवडणूकीत घेतले होते अशी आठवण आहे. (असेच काहीसे नारायण राणे बोलले असावेत असेही आठवते. पण ते नीटसे आठवत नाही.) त्यास भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.

नथुरामाचे नाव घेऊन चर्चा करण्यासारखे फारसे काही नाही. पण जालावरही त्यास प्रसिद्धी (वाचनसंख्या) मिळते या कारणानेही ती केली जात असणार.

प्रमोद

प्रतिसाद

वरचे प्रतिपादन पटण्यासारखे आहे. नथुराम ही एकंदर हिंदुत्ववाद्यांची लाएबिलिटी आहे. हिंदू महासभा आणि जनसंघ यांचे महत्त्व क्रमाक्रमाने कमी होत गेलेले आहे. (आज या संस्था कागदोपत्री तरी अस्तित्वात आहेत की नाही ठाऊक नाही.) गांधींसारख्या राष्ट्रपुरुषाच्या रक्ताचे लांच्छन शक्य तितके पुसून टाकणे, त्याच्या लेगसीच्या खुणा मिटवणे हेच पोलिटिकली एक्स्पेडीयंट् आहे हे, या विचारसरणीच्या गोतावळ्याने आतापर्यंत हेरलेले आहे. म्हणूनच नथुरामाची पुण्यतिथी ही केवळ एखाद्या संकेतस्थळावर घडणारी घटना ठरते.

हम्म

राष्ट्रपुरुषाचे रक्त लांच्छन पुसण्याचे कारण हे खरे असले तरी आपण काय कोणत्या संघटनेचे नाही आणि आपल्याला कोणाची बाजूही घ्यायची नाही. पंचावन कोटीचे बळी या पुस्तकात काही निवेदनाचा भाग आहे त्यात नथुराम गोडसे असे म्हणतात की, '' मी गांधीजींना राजकीय मंचावरुन दूर करण्याचे ठरविले त्याच दिवशी हे स्पष्ट झाले की माझे म्हणून जे काही असेल ते मी गमावणार आहे'' अन्ये एके ठिकाणी ते म्हणतात '' व्यक्तिशः म्हणाल तर गांधीजी आणि मी यात शत्रुत्त्व ते काय असणार ? पाकिस्ताननिर्मितीला पाठबळ देण्यामागे गांधीजींचा हेतू शुद्ध होता असे जे सांगतात त्यांना मी एवढेच म्हणेन की, गांधी व्यक्तीविरुद्ध अंतिम उपाय योजनेमागे माझ्या र्‍हदयातही आपल्या देशाचे हित हाच शुद्ध होता, आणखी कोणता नव्हता. कारण ज्या भयंकर घटनांचे पर्यवसान पाकिस्तानच्या स्थापनेत झाले, त्यास अधिकात अधिक उत्तरदायी गांधीजी होते'' गोडसेंचा रोष अजून् एक दिसतो की, पाकिस्तानला मान्यता देतांना पंजाब,सिध, इत्यादी प्रांतातील लोकांच्या भावनेचा विचार न करता भारत दोन तुकड्यात वाटला गेला. एका देशात धर्माधिष्ठित लोकांचे राज्य होते मग आपले का नसावे असा विचार त्यांचाही असावा. असो, मला काही कोणाला दैवत्त्व द्यायचे नाही. आणि जयंती-मयंतीही साजरी करायची नाही. आता आपण केवळ वाचत राहून त्या त्या काळातल्या गटांच्या वैचारिक भुमिका समजून घेतल्या पाहिजे असे वाटते. चुभुदेघे.

-दिलीप बिरुटे

विषयांतर

आता आपण केवळ वाचत राहून त्या त्या काळातल्या गटांच्या वैचारिक भुमिका समजून घेतल्या पाहिजे असे वाटते. चुभुदेघे.

ही चर्चा या काळातल्या नथुरामप्रेमींविषयी आहे. विषयाला फाटे फोडू नका. मिसळपाव नथुरामप्रेमी आहे का?

समूहाची स्थापना

मिसळपाव नथुरामप्रेमी आहे का?
तुम्हाला मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल आणि त्यावरील सदस्यांवर चर्चा करण्यासाठी उपक्रमावर एका समूहाची स्थापना करावी, असा माझा सल्ला राहील.
तसेच या समूहात आपले विविध आयडी रजिस्टर करायला विसरू नका अशी आठवण करून देते.

+१

+ १

भुजबळ

>>>>शिवसेनेत असताना छगन भुजबळ यांनी नथुरामाचे नाव निवडणूकीत घेतले होते अशी आठवण आहे.<<<

आठवणीप्रमाणे: बाळासाहेब काहीतरी गांधीजींच्या विरोधात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत बोलले. त्यावर हल्लाबोल झाल्यावर तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ असे काहीसे म्हणाले होते की, "गांधीजींच्या ऐवजी नथुरामचे पुतळे उभारायला हवेत... गांधीजींना मारून नथुरामने चूकच केली", वगैरे... त्यावर अजून आरडाओरड झाली... पण नंतर काही महीन्यातच ते काँग्रेसमधे गेले. काँग्रेस ही गंगा असल्याने उडी मारताक्षणी भुजबळांना पापमुक्ती मिळाली. असो.

>>>नथुरामाचे नाव घेऊन चर्चा करण्यासारखे फारसे काही नाही. पण जालावरही त्यास प्रसिद्धी (वाचनसंख्या) मिळते या कारणानेही ती केली जात असणार.<<<

सहमत

मुक्ती

>>काँग्रेस ही गंगा असल्याने उडी मारताक्षणी भुजबळांना पापमुक्ती मिळाली.

म्हणजे मेनका आणि वरुणला मिळाली तश्शीच म्हणायची आहे का तुम्हाला?

नितिन थत्ते

अगदी तशीच

म्हणजे मेनका आणि वरुणला मिळाली तश्शीच म्हणायची आहे का तुम्हाला?

अगदी तशीच.

पण तुम्हाला देखील भुजबळांना काँग्रेसकडून मुक्ती (aka राजकीय स्वार्थापोटी, "गांधीजींना वाटेल ते बोलून नथूरामचे केलेले त्यांनी समर्थन" या कडे दुर्लक्ष करून मंत्रीपदाचे बक्षिस) मिळाल्याचे मान्य आहे का?

पद

हॅ हॅ हॅ. म्हणूनच तर मी नेहमी लोकशाहीत व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा असे म्हणतो. :)

भुजबळांनी त्यावेळी कोणीतरी येऊन गेल्यावर हुतात्मा चौकातले स्मारक धुवून घेतल्याचे पण स्मरते. :)

नितिन थत्ते

म्हणजे

म्हणूनच तर मी नेहमी लोकशाहीत व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा असे म्हणतो. :)

म्हणजे खाली पुनर्धृत केलेल्या पक्षात काँग्रेसचे वागणे योग्य आहे असे आपले म्हणणे आहे तर.

पण तुम्हाला देखील भुजबळांना काँग्रेसकडून मुक्ती (aka राजकीय स्वार्थापोटी, "गांधीजींना वाटेल ते बोलून नथूरामचे केलेले त्यांनी समर्थन" या कडे दुर्लक्ष करून मंत्रीपदाचे बक्षिस) मिळाल्याचे मान्य आहे का?

हो

हो. जोवर ते अजूनही नथुरामचे पुतळे उभारू म्हणत नाहीत तोवर.

(अडवाणी काँग्रेसमध्ये आले तरी त्यांना बाबरी प्रकरणात माफी देता कामा नये).

नितिन थत्ते

??

म्हणजे काँग्रेस मध्ये आल्यास काही गुन्ह्यांसाठी माफी मिळते का?

निवास

तुम्ही कुठल्या देशात राहता हे माहीती नाही. :(

नितिन थत्ते

विचार

>>>>अडवाणी काँग्रेसमध्ये आले "तरी" त्यांना "बाबरी प्रकरणात" माफी देता कामा नये.

>>तुम्ही कुठल्या देशात राहता हे माहीती नाही. :(

माझा प्रश्नामध्ये खालिल विचार होते.

काँग्रेस काय करते हे माहित आहे, पण हे आपले विधान होते. म्हणून आपल्याला विचारात होतो. काँग्रेस ने ह्या गुन्ह्यासाठी माफी देऊ नये म्हणजे गुन्हा गंभीर आहे आणि काँग्रेस एकदम स्वच्छ आहे असे गणित आपण मांडत आहात, किवा काँग्रेस कशीही असली तरी त्यांनी अडवाणी ह्यांना माफी देऊ नये हे विधान फारसे तर्कसुसंगत वाटत नाही.

हे सगळे अवांतर -

अडवाणी यांना बाबरी प्रकरणात काँग्रेसने माफी देऊ नये, इतर गुन्ह्यात द्यावी असे आपले मत आहे का?

किवा

अडवाणी काँग्रेसमध्ये आले नाही तर त्यांना माफी देऊ नये.

किवा

अडवाणी काँग्रेसकडे माफी मागत आहेत तरी ती त्यांना देऊ नये.

मतितार्थ

आपल्या पक्षात आल्यावर त्या व्यक्तीने आधी केलेल्या चुका/प्रमाद/गुन्हे माफ करण्याची भारतीय किंबहुना जगातील राजकारणात (पूर्वीपासून) चालत आलेली पद्धत आहे.

म्हणून ते काँग्रेसमध्ये आल्यावर सगळ्या* गुन्ह्यांसाठी माफी दिली गेली तरी या एका गुन्ह्यासाठी दिली जाऊ नये असे माझे मनातले** मत नोंदवले.

*टीपः अडवाणी यांनी बाबरी मशिदीच्या निमित्ताने केलेल्या प्रमादांखेरीज इतर कोणते गुन्हे केल्याचे माझ्या माहितीत नाही

** मनातले मत कारण काँग्रेस काही मला विचारून आपली धोरणे आखीत नाही.

(ते काँग्रेसमध्ये येऊ पहात आहेत/माफी मागत आहेत असे माझ्या प्रतिसादातून कुठेही सूचित केलेले नाही).

नितिन थत्ते

 
^ वर