गांडीव धनुष्य

२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला? माझ्याजवळ नाही विदा !! अशांचे शहिद दिनच साजरे करतो आपण. पण पुढचे शहिद ऐका..... स्वतंत्र्यानंतरचे........http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/6603984.cms
>>>अखेर ते घडले......६ डिसेंबर १९९२
'राम कथा कुंज'च्या गच्चीवरून अडवाणी भाषण करण्यास उभे राहतात. 'अब दुनिया की कोई ताकद राममंदिर को रोक नही सकती', अडथळे आणले तर केंद्रात सरकार चालू देणार नाही. ''जो शहीद होने आये है, उन्हे शहीद होने दो. रामचरण मे जाना अगर उनगे भाग मे होगा, तो उन्हे शहीद होने दो''

लष्कर ए तोएबा, तालिबान, ओसामा तरी वेगळे काय म्हणतो ?? दोघांमधे फ़रक काय?? फ़क्त धर्माचा?? हा कोणता धर्म??
राम ऐवजी ते फ़क्त अल्ला हा शब्द वापरतात!!
धर्म धर्म म्हणजे तरी काय?? हिन्दु आईच्या पोटी जन्मला कि तो हिन्दु, आणि मुस्लिम आइच्या पोटि जन्मला कि तो मुस्लिम, अस काहि आहे का?? पुढे दोन दुवे देत आहे, एक चिथावणिखोर आणि एक शांततेचा संदेश देणारा. आपल्या धर्माने कोणता मार्ग आक्रमायचा ते आपण ठरवा.
http://news.in.msn.com/national/article.aspx?page=3&ucpg=1&cp-documentid=4417985#uc2Lst
या लेखाला एकुण ६२ प्रतिसाद आलेत, त्यातला पहिला मला जास्त महत्त्वाचा वाटतो. आपल्याला?
आणि काही लोकांचा हृदयसिंहासनी वि-राज-मान माणसाचे हे वक्तव्य----- कोणता मार्ग योग्य??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6618860.cms

धर्म म्हणजे नेमके काय???

(स्पेलिंग मिश्टेक, चु. भु. दे. घे.)

Comments

बिल क्लिंटन...

वर दिलेल्या धाग्यातील खालील वाक्य वाचले
"Our Hindu brothers are dependent on us...We have been supplying them garlands for the last several years. As the matter is related to faith and sentiments, we don't hesitate in buying flowers from outside to help our Hindu brothers," said Saleem, another Muslim artisan.

मला बिल क्लिंटनचे मोठ्या बुशविरुद्धच्या निवडणूकीतले वाक्य आठवले, "It's the economy, stupid!" आणि या इकॉनॉमिक्सचा विचार करत ती टिकण्यासाठी मंदीर होणे महत्वाचे आहे असे कुणाला वाटू शकले तर त्यात काय गैर काय असे वाटले. ;)

(चला आता पळ काढतो)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

धर्म

इकॉनॉमिक्स टिकण्यासाठी धर्म तयार केला आहे का??

असे नाही

इकॉनॉमिक्स टिकण्यासाठी धर्म तयार केला आहे का??

असे मी म्हणलेले नाही. मात्र धर्माचा उपयोग इकॉनॉमि टिकण्यासाठी देखील होऊ शकतो, होत असतो. तेंव्हा तो मोडायला जाताना त्यावर अवलंबून असलेल्या सामान्यांना* नक्की पोटापाण्यासाठी आल्टरनेटीव्ह काय देता येईल हे बघितले पाहीजे असे नक्कीच वाटते. नाहीतर गिरणी कामगारांच्या संपासारखे होते आणि त्यातून जनतेला वेठीस धरणारे डॉन देखील तयार होऊ शकतात... (*भडजी/बडवे/ट्रस्टीज् वगैरेंना मी सामान्य समजत नाही)

लष्कर ए तोएबा, तालिबान, ओसामा तरी वेगळे काय म्हणतो ?? दोघांमधे फ़रक काय?? फ़क्त धर्माचा?? हा कोणता धर्म??
आपले निधर्मी माओवाद्यांबद्दलचे मत देखील या संदर्भात समजून घेयला आवडेल.

अवलंबून

>>तेंव्हा तो मोडायला जाताना त्यावर अवलंबून असलेल्या सामान्यांना* नक्की पोटापाण्यासाठी आल्टरनेटीव्ह काय देता येईल हे बघितले पाहीजे असे नक्कीच वाटते.

बर्‍याच वाईट समजल्या जाणार्‍या व्यवसायांवर बरेच सामान्य अवलंबून असतात.

नितिन थत्ते

तसे म्हणाल तर

बर्‍याच वाईट समजल्या जाणार्‍या व्यवसायांवर बरेच सामान्य अवलंबून असतात.

"समजल्या" जाणार्‍या ना? तशा असतातच असे कुठे आहे? :-) बरं, तसे म्हणाल तर बर्‍याच वाईट ठरलेल्या गोष्टी अनेक असामान्य व्यवसाय म्हणत करत असतात आणि त्यावर रग्गड पैसा देखील करतात...

मत्

>> निधर्मी माओवाद्यांबद्दलचे मत देखील या संदर्भात समजून घेयला आवडेल.
माओवाद् हा माओवाद्यांचा धर्म झाला

भगतसिंग

>>२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला.

लेखाच्या बाकी विषयात या वाक्याचा संदर्भ लागला नाही.

लोकांना भगतसिंग (सुभाषबाबू वगैरे नॉन सत्याग्रहींसह) आणि त्यांच्या कामगिरीशी काहीही घेणेदेणे नसते.
स्वातंत्र्यलढ्यातल्या गांधी मार्गाला क्रेडिट नाकारण्यासाठी या नावांचा वापर करता येतो म्हणून त्यांची नावे घेतली जातात.
(पुलंच्या "टिळकपुण्यतिथीच्या दिवशी आगरकरांविष्यी जाज्ज्वल्य अभिमान" सारखं)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

मुहं मे राम बगल मे छुरी असे जरी भाजपचे धोरण असले तरी...........

खोटा प्रचार करणाऱ्या
मुहं मे राम बगल मे छुरी असे जरी भाजपचे धोरण असले तरी लष्कर ए तोएबा, तालिबान, ओसामा
या अतिरेकी संघटनान बरोबर भाजपला रांगेत उभे कारणे चूक आहे. जुन्या राजवटीच्या अत्त्याचाराच्या स्मारकाचे नष्ट करणे जगभर चालत असते. इंग्रज गेल्यावर कॉंग्रेस ने तरी भारतात काय केले. मुंबईतील इंग्रजांची शेकडो स्मारके पुतळे उखडण्यात आले. इंग्रजांचे नाव असलेल्या नावांचे काँग्रेसीकरण केले गेले तेंव्हा कोणी बोंबाबोंब केली नाही. आणि मुख्य म्हणजे बाबरी मशीद जमीनदोस्त केली गेली ती हिंदूंचे मंदिर पाडूनच हे ऐतिहासिक सत्य सर्वधर्म या मुसलमानाच्या मतांच्या राजकारणापायी नाकारले जाते. याचे काय? वर्तमान पत्र तर सरकारची बटिक झालेली आहेत.

thanthanpal.blogspot.com

रांग

मी रांगेत उभ केलेलच् नाही...फक्त त्या वक्तव्यात राम काढा आणि अल्ला घाला असच् म्हटलय....

चोर के दाढी मे तिनका.

लष्कर ए तोएबा, तालिबान, ओसामा तरी वेगळे काय म्हणतो ?? दोघांमधे फ़रक काय?? याचा सरळ अर्थ ते सारखेच आहेत एकच माळेचे मणि आहेत. चोर के दाढी मे तिनका. म्हणतात.

thanthanpal.blogspot.com

दसर्‍याच्या लाख - लाख शुभेच्छा ..! तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत!

दसर्‍याच्या लाख - लाख शुभेच्छा ..! तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत! काळजी घ्या - प्रेमाने पहा :)
कोणत्याही सणाप्रमाणे यावेळी हि समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतात त्यामुळे विचारांची आदानप्रदान होते.प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात.समाज हि एक मोठी ताकत असून ती कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा फार मोठी आहे हे यानिम्मित्त प्रत्येकाच्या मनावर ठसते.
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा, सोन्यासारख्या लोकांना ..!
आपल्या साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे हीच दसऱ्याची शुभेच्छा

 
^ वर